ProfileImage
681

Post

6

Followers

0

Following

PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

 शेतशिवारात विज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू


 शेतशिवारात विज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू 

 

तुमसर:-

तुमसर तालुक्यातील पाथरी येथे आज दि. 3 एप्रिल ला दुपारी 12 वाजताच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा भारत पुष्पतोडे वय 27 वर्षे आणि प्रमोद मनीलाल नागपुरे वय 45 वर्षे असे या दोन मृतक शेतकऱ्यांची नावे असून दोघेही रा. पाथरी येथील रहिवासी आहेत. सध्या परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली असून शेतात काम करण्यासाठी गेलेले होते  आज अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट सुरू झाला पाहता - पाहता शेतीचे काम करत असताना दोघांच्या अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मात्र गावात शोककळा पसरली आहेव हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

लक्ष्मणपूर येथे एका इसमाने केली गळफास घेऊन आत्महत्या


लक्ष्मणपूर येथे एका इसमाने केली गळफास घेऊन आत्महत्या 

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील लक्ष्मणपूर येथे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि ३ एप्रिल ला सकाळी उघडकीस आली आहे 
मृतकाचे नाव रमेश गजानन चनेकार वय ५२ वर्षे रा.लक्ष्मणपूर असे असून ते काल दि २ एप्रिल चे रात्री ११.३० ते पहाटे ५.०० वाजताच्या दरम्यान घराच्या बाजूला असलेल्या टिनाच्या मांडवाच्या फाट्याला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे 
सकाळी जेव्हा घरातील कुटुंब जागे झाले तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले तेव्हा सुधीर बंडू चनेकार वय २९ वर्ष रा.लक्ष्मणपूर यांनी आष्टी पोलीस स्टेशन ला माहीती दिली त्यावरुन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे 
त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा भाऊराव वनकर करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

राजेश श्रीधर पिंपळशेंडे नवोदय करीता पात्र


राजेश श्रीधर पिंपळशेंडे नवोदय करीता पात्र 

आष्टी:-
लिटील हार्ट इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी ता .चामोर्शी जिल्हा गडचिरोली या शाळेतील राजेश श्रीधर पिंपळशेंडे रा.आष्टी यांची नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे 
नवोदय विद्यालय घोट येथे शिक्षण घेण्यासाठी फार मोठी चढाओढ असते म्हणून त्या शाळेत फक्त हुशार विद्यार्थी घेतले जातात त्याकरीता नुकतीच गडचिरोली जिल्ह्यात पाचव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती त्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात राजेश श्रीधर पिंपळशेंडे हा उतिर्ण झालेला आहे 
त्याने आपल्या यशाचे श्रेय आई - वडील शाळेचे मुख्याध्यापक कृष्णमूर्ती,शिक्षकवृंद यांना दिले आहे


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घराला तळा गेल्यात व शेतीही झाली नष्ट आता भटाळी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती


  खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घराला तळा गेल्यात व शेतीही झाली नष्ट आता भटाळी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

पुनर्वसन प्रक्रियेसाठी आवश्यक पावले उचलण्यास कटिबद्ध

 

भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा

 

चंद्रपूर, दि. 2: भटाळी ओपन कास्ट माइन्समुळे भटाळी गावाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहेत, तर शेती नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासोबत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भटाळी गावात पाहणी दौरा केला. गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार केला असून, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या समवेत पाहणी दौरा बुधवार (दि.02)केला. यावेळी  उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, पायली भटाळीचे सरपंच किसन उपरे, उपसरपंच विकास पेदांम, रामपाल सिंग, अनिता भोयर, सुरज पेदुलवार, राकेश गौरकार तसेच वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गाव पुनर्वसन समिती भटाळीच्या वतीने गावाच्या पुनर्वसनाबाबत नुकतीच बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत पुनर्वसनाला होणारा उशीर लक्षात घेता, डब्लूसीएलकडून कोळसा उत्खनन सुरू असतानाच गावाला धोका निर्माण होत असल्याने पुनर्वसन तातडीने व्हावे, अशी मागणी भटाळीवासीयांकडून करण्यात आली. यासाठी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सदर पुनर्वसन प्रक्रिया गतीने करण्याच्या  सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.  

पुनर्वसनाबाबत वेकोलीने सुचविलेली जागा गावकऱ्यांना मान्य नाही. यावर गावकऱ्यांसोबत बसून तोडगा काढण्यात येईल. पुनर्वसन स्थायी होण्याच्या दृष्टीने सर्वंकष अभ्यास करण्यात येईल. गाव पुनर्वसन समितीने गावाच्या पुनर्वसनाकरिता 13 मागण्या केल्या आहेत. येत्या आठ दिवसात या मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येईल. तसेच 13 मागण्यांचे विभाजन करून पुनर्वसन समिती समोर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. "भटाळी गावाच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे तत्पर असून, लवकरात लवकर या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील," असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday

PostImage

नक्षलवाद्यांनी युद्धविरामाचा केंद्र सरकारपुढे सादर केला प्रस्ताव ?


नक्षलवाद्यांनी युद्धविरामाचा केंद्र सरकारपुढे सादर केला प्रस्ताव ?

गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचा निर्धार केल्यानंतर सुरक्षा दलांनी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये आक्रमक कारवाया सुरू केल्याने नक्षलवाद्यांनी नांगी टाकली असून केंद्र सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय समिती सदस्य अभय ऊर्फ सोनू भूपती याने यासंदर्भात तेलुगू भाषेत पत्रक जारी करून कारवाया रोखण्याचे सरकारला आवाहन केले आहे. आता याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा,ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. गेल्या १५ महिन्यांत झालेल्या चकमकीत तब्बल ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले, शेकडो कारागृहात आहेत, इतकेच नव्हे तर यात अनेक निरपराध आदिवासी मारल्या गेल्याचा दावाही पत्रकात केला आहे. ३० मार्चचे हे पत्रक असून त्यावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याचा उल्लेख आहे

शोषणाविरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सरकारकडून छळ होत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातदेखील अशाच प्रकारे अनेक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले. आदिवासींना पोलिस दलात भरती करून त्यांच्याच हातून आदिवासींची हत्या केली जात आहे, असा गंभीर आरोप पत्रकात केला आहे.

केंद्रापुढे शांती प्रस्ताव ठेवणारा भूपती हा माओवादी चळवळीतील महत्त्वाचा नेता आहे. त्याची पत्नी जहाल माओवादी महिला नेता विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ ताराक्काचा तो पती तर पश्चिम बंगालमध्ये २०११ मधील चकमकीत ठार झालेला जहाल नक्षल नेता किशनजीचा धाकटा भाऊ आहे. ताराक्काने १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. ४ एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा छत्तीसगडला संभाव्य दौरा आहे, या दौ-यापूर्वी त्याने केंद्रापुढे युद्ध विरामाचा प्रस्ताव ठेवला आहे.

आदिवासी, अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीसाठी आदिवासी समाज संघर्ष करत आहे. येथील नैसर्गिक संसाधनांवर डोळा ठेवून हे सर्व सुरू असून सरकारने आता थांबायला हवे, असेही पत्रकात म्हटले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2025

PostImage

 देसाईगंज रेल्वेच्या बोगद्याचे काम दर्जाहिन ; ५ तारखेला सुरु होण्याची शक्यता कमी


 देसाईगंज रेल्वेच्या बोगद्याचे काम दर्जाहिन ; ५ तारखेला सुरु होण्याची शक्यता कमी ?

आ. रामदास मसराम यांची प्रत्यक्ष पाहणी ; नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता !

देसाईगंज  :-
           शहरातील रेल्वे लाईनच्या बोगद्याने रहदारीची मोठी समस्या निर्माण केली होती. पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातही या बोगद्यातून आवागमन करतांना नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच रहदारी करावी लागत होती नगर पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी या बाबीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधल्याने प्रशासनाने पाणि निस्सारणाचे काम दि. २० मार्च २०२४ पासून सुरु केले. सदरचे काम 5 एप्रिल पर्यंत सुरू रहाणार असल्याची सुचना रेल्वे विभागामार्फत न.प.चे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे  केले होते. मात्र नागरिकांनी सहकार्य करून सुद्धा नागरिकांसाठी दुरुस्ती होत असलेला बोगदा दुरुस्तीच्या नावाखाली पूर्णत ओबळधोबळ होत असून दर्जाहीन असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समजते.
             देसाईगंज शहर रेल्वे लाईन मुळे दोन भागात विभागलेले असुन रहदारीसाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्यामुळे पावसाळ्यात रहदारिची मोठी समस्या  निर्माण होत असल्याने नागरिकांना बोगद्यात साचलेल्या घाण पाण्यातुन आवागमन करावे लागत होते ही समस्या पावसाळ्या पुरती नव्हे तर हिवाळ्यातही उद्भवत असल्याने देसाईगंज प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवून समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली, त्यानुसार रेल्वे प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु केले. बोगद्यातील पाणी निचरा होण्यासाठी पुर्वीपेक्षा भले मोठे पाईन टाकण्यात आलेले आहे. यामुळे साचलेले पाणी क्षणात बोगद्याबाहेर जाईल. परंतु बोगद्यात नव्याने पाण्याची लेवल मिळविण्याकतीला कॉंक्रीट  करण्यात आले. ते  कॉन्क्रेट पूर्णत ओबळ ढोबळ असून बोगदा सुरू झाल्यानंतर वाहत चालकांना मोठा त्रास  सहन करीत बोगदा पार करावा लागेल. वास्तविक नव्याने कॉन्क्रेट टाकतांना एक लेवल प्लेन मध्ये यायला हवे होते परंतु तसे न करता कंत्राटदाराने त्या कामाला खराब करून टाकले. याबाबत दि. २ एप्रिलला आ. रामदास मराराम यांनी बोगद्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीच्या मार्गाची पाहणी केली. यात मोठी अनियमीतप्ता दिसून आल्याने आ. मराराम यांनी संबंधितांनी कामात दुरुस्तीचे आदेश दिले.
         यावेळी तहसिलदार प्रिती डूडूलकर न.प.चे कनिष्ठ अभियंता नंदनवार, कंत्राटदाराचे सुपरवाईजर कनिष् अभिन्यनता आरोग्य विभाग प्रमुख गेडाम, रेल्वे सल्लागार समिती सदस्य भास्कर डांगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जिवन पा.नाट, सागर वाढई, युवक काँग्रेस अध्यक्ष अमर भरे, जावेद शेख, कमलेश बारस्कर, ज्ञानदेव पिलारे,जितू चौधरी, धर्मेंद्र लांडे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
          येत्या ५ तारखेपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला बोगदा सुरू होणार की नाही यावर प्रश्ननिर्माण होत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2025

PostImage

पत्नी कडून मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने संतापलेल्या तलाठी पतीने संपविली जीवनयात्रा


पत्नी कडून मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने संतापलेल्या तलाठी पतीने संपविली जीवनयात्रा 

मी मेल्यावर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका 

 

अकोला : पत्नीकडून पतीचा मानसिक व आर्थिक प्रचंड छळ आणि मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने  त्याला कंटाळून पाच दिवसांपासून उपाशी पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मोबाइलवर स्टेटस ठेऊन आत्महत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले आहे 
मृत्यूनंतर माझा चेहरा सुद्धा पत्नीला दाखवू नका, असे त्यामध्ये नमूद आहे. शीलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते तेल्हारा तहसील कार्यालयांत तलाठी म्हणून कार्यरत होते.
तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी " व्हॉटसॲप " वर एक स्टेटस ठेवले. त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यू पूर्वीच्या या स्टेटस मध्ये पत्नी आपला मानसिक छळ करते. मृत्यूनंतर चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही नमूद केले. पोलिसांनी तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
तेलगोटे यांनी " व्हॉटसॲप स्टेटस " मध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केल्याची माहिती आहे. या घटनेवरून परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा. मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते.
आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे.
माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल असे नमूद केले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2025

PostImage

तिहेरी विचीत्र अपघातात सात ठार तर २५ गंभीर जखमी


तिहेरी विचीत्र अपघातात सात ठार तर २५ गंभीर जखमी 

अकोला:-

आज दि .२ एप्रिल सकाळी खामगाव ते शेगाव रोड वर एस टी बस, बोलेरो आणि लक्झरी बस चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून 25 जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघात पुणे परतवाडा बस ला बोलेरो ने मागून धडक दिली नंतर मागून येणाऱ्या लक्झरी बस ने दोन्ही वाहनांना धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून आधी एका चारचाकी वाहनाने धडक दिली, त्यानतंर एका खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. या तिहेरी अपघातात गाड्यांचेही बरेच नुकसान झाले. आज पहाटे पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोकं जखमी झालेत. त्यापैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी तिहेरी अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या जीव गेल्याने हळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ खामगाव शहर पोलिस चौरस स्टेशन चे ठाणेदार राजेश पवार हे आपल्या कर्मचाऱ्यासमवेत पोहचले तसेच स्थानिक तहसीलदार सुनील पाटील ही पोहचले. वाहनांमध्ये अडकलेल्या रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मधील गंभीर रुग्णांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. सात लोक मृत्युमुखी पडले आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2025

PostImage

अपघातात जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो म्हणून अपघात करणाऱ्या चालकाने फेकले पुलावरून


अपघातात जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो म्हणून अपघात करणाऱ्या चालकाने फेकले पुलावरून 

 

नागपूर:-

 जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. येथे रस्ते अपघातातील जखमीला आरोपीने लोकांच्या गर्दीमुळे रुग्णालयात नेण्याचे नाटक केले. मग तो थोडा पुढे गेला आणि त्यांना एका पुलाखालून फेकून देऊन पळून गेला. यानंतर जखमी व्यक्ती बराच वेळ वेदना सहन करत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हे प्रकरण नागपूर जिल्ह्यातील मिहान सेझला लागून असलेल्या कर्करोग संस्थेशी संबंधित आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा बोरसे असे आहे. कृष्णा बोरसे हे त्यांच्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत होते. तेवढ्यात एका भरधाव गाडीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींभोवती लोकांची गर्दी जमली. हे पाहून आरोपी चालक जखमी व्यक्तीला सोबत नागपूरच्या दिशेने रुग्णालयात घेऊन गेला. यानंतर, त्याने जखमी व्यक्तीला पुलाखाली फेकून दिले आणि पळून गेला.

पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी नागपूरच्या सरकारी रुग्णालयात कृष्णा नावाच्या व्यक्तीला दाखल केले आहे का हे शोधून काढले. पोलिस तपासानंतर असे आढळून आले की कृष्णा नावाच्या कोणत्याही जखमी व्यक्तीला नागपूरमधील कोणत्याही सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. यानंतर पोलिसांना संशय आला की जखमी व्यक्तीला कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की एक जखमी व्यक्ती चिच भवन पुलाखाली पडून आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2025

PostImage

बल्लारपूर येथील तहसीलदार अडकला लाप्रवीच्या जाळ्यात, शेतकऱ्याकडून २ लाख २० हजारांची लाच मागणे पडले महागात 


बल्लारपूर येथील तहसीलदार अडकला लाप्रवीच्या जाळ्यात, शेतकऱ्याकडून २ लाख २० हजारांची लाच मागणे पडले महागात 

 

तलाठी धूम ठोकत पसार झाला 


बल्लारपूर:-
 राज्यात गेल्या काही दिवसांत लाच  लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक छोटे-मोठे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत
 चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूरचे तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत लाच लुचपत प्रतीबंधक विभागाने तहसलीदार अभय अर्जून गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाठी सचीन रघुनाथ पुळके हा फरार आहे. 
सध्या, ए.सी.बी.(A.C.B.)कडून आरोपी तलाठी पुळके  याचा शोघ घेण्यात येत आहे.  
बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघेही लाच प्रकरणात अडकले आहेत. फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरूमाचे उत्खनन केले होते.
 मात्र, हे उत्खनन अनधिकृत असल्याचे सांगत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण असून मिटविण्यासाठी लाच मागितली होती. 
संबंधित महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे २ लाख २० हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केली होती. 
लाच म्हणून ठरलेल्या या रकमेतील १ लाख २० हजार रुपये शेतकऱ्याने त्यांना देऊ केले होते. तर, उर्वरीत १ लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता. 
त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने या लाचखोरीची ए.सी.बी.(A.C.B.)कडे तक्रार केली. पडताळणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती 
 त्यानंतर, ए.सी.बी.(A.C.B.)च्या पथकाने सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. दरम्यान, ए.सी.बी.(A.C.B.)च्या कारवाईत तहसीलदार 
अभय गायकवाड आणि कवडजई सांजाचे तलाठी 
सचिन पुकळे त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. ए.सी.बी.(A.C.B.)ने तहसीलदाराला ताब्यात घेतले असून तलाठी पुकळे धुम ठोकून फरार आहे. याप्रकरणी, ए.सी.बी.(A.C.B.)कडून पुढील कारवाई सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2025

PostImage

संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने गळा आवळून संपविले पत्नीला 


संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने गळा आवळून संपविले पत्नीला 

 

रावेर :-

 संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने  गळा आवळून पत्नीची जीवनयात्रा संपवल्याची  घटना रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. आशाबाई संतोष तायडे वय 38 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथील संतोष शामराव तायडे हा पत्नी आशाबाई सोबत राहत होता. आशाबाई रात्री एका व्यक्तीसोबत बोलत होती. याबाबत संतोष तायडे याने पत्नी आशाबाईला कोणासोबत बोलत होती असे विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतोषला याचा राग आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना आज सकाळी अभोडा बुद्रुक येथे घडली.

घटना घडल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना दिली. तात्काळ घटनास्थळी डी वाय एस पी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, उप निरीक्षक तुषार पाटील हजर झाले. मृतदेहाचे शव विच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

आरोपी पती संतोष शामराव तायडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2025

PostImage

एका तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या इसमास , पत्नीनेच दिले पोलीसांच्या ताब्यात


एका तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या इसमास , पत्नीनेच दिले पोलीसांच्या ताब्यात 

 

नागपूर : ओळख लपवून महिलांसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्याचे आक्षेपार्ह फोटो, व्हीडिओ काढण्याचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीची पत्नीच पीडित मुलीसाठी धावून आली. तिनेच हे प्रकरण समोर आणलं आहे. 

नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अब्दुल शरीफ कुरेशी (वय 33) असं आरोपीचं नाव आहे. तो टेका-नाका परिसरात पानटपरी चालवतो. त्याचं चार वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे. त्याला तीन वर्षांची मुलगी सुद्धा आहे. असं असलं तरी, आरोपी स्वतःची ओळख, वय आणि लग्नाबद्दलची माहिती लपवून इतर महिला आणि मुलींसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत होता. त्या महिलांना लग्नाचं खोट आश्वासन द्यायचा.

या आरोपीनं चार ते पाच महिलांची अशी फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. पण, सध्या 19 वर्षांची एक पीडित मुलगी समोर आली आहे. तिनं पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अब्दुलला 29 मार्चला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 64, 69 या कलमानुसार बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षीय मुलगी ही भंडारा जिल्ह्यातली रहिवासी आहे. तिची सप्टेंबर 2024 मध्ये आरोपी अब्दुलसोबत ओळख झाली. एका महाप्रसादाच्या कार्यक्रमात अब्दुल तिला भेटला. पण, यावेळी त्यानं स्वतःचं नाव बदलून सांगितलं. तसेच वय सुद्धा केवळ 24 वर्षे सांगितलं. त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसेच त्यानं तिला लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. पण, हा आपल्यासोबत खोटं बोलतोय असं तिला चार महिन्यानंतर समजलं.या व्यक्तीनं वय, नाव सगळं खोट सांगून आपली फसवणूक केली असल्याचं तिच्या लक्षात आलं.

मुलगी नागपुरात शिकायला राहत असल्यानं आणि कोणाचा पाठिंबा नसल्यानं शांत होती. पण, या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेच या पीडित मुलीची मदत केली. तसेच तिला पोलीस ठाण्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आरोपीच्या पत्नीमुळेच हे प्रकरण समोर आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल हा पॉर्न व्हीडिओ बघून स्वतःच्या पत्नीकडेही तशीच मागणी करायचा. तिनं मागणी पूर्ण केली नाही, तर तिला मारहाण करून तिचा शारीरिक छळ करायचा. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती. पतीच्या या त्रासाला कंटाळून ती 6 महिन्यांपासून माहेरी राहत आहे. तिनं पोलिसांत शारीरिक छळाबद्दल तक्रार दाखल केली होती.

तो या महिलांसोबत फक्त ओळख लपवून बोलतच नाही, तर त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. तसेच त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचंही तिला व्हॉट्सअपर दिसलं. त्यानंतर तिनं सगळे पुरावे गोळा करून पीडित महिलांना फोन केले. पण, महिला भीतीपोटी तक्रार द्यायला तयार नव्हत्या. यापैकी फक्त एक 19 वर्षीय पीडित मुलगी समोर आली. असले प्रकार करणाऱ्या पतीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं तिनं ठरवलं. यानंतर पतीच्या व्हॉट्सअप चॅट आणि फोटोंवरून तो इतर महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं तिला दिसलं.

तिनं आरोपीच्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात जात ओळख लपवून आणि लग्नाचं खोट आश्वासन देऊन वारंवार बलात्कार झाल्याची तक्रार पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल केली. आरोपीनं तिला फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटकही केली. आरोपीनं आणखी 4-5 महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलीस त्यादृष्टीनं तपास सुरु आहे 


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2025

PostImage

शिक्षीका राहायची घरी, विद्यार्थ्यांना शिकवी मजुरीकरी


शिक्षीका राहायची घरी, विद्यार्थ्यांना शिकवी मजुरीकरी 

शिक्षीकेला केले तात्काळ निलंबित 

भोर : आज नौकरी मिळविण्यासाठी बेरोजगार तरुणांना धडपड करावी लागते मात्र नौकरी मिळाली म्हणून गौरहजर  राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेस वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला आहे.
भारती दीपक मोरे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्याधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी अचानक शाळेला भेट दिली. त्यावेळी शिक्षिका भारती मोरे या अनुपस्थित असल्याचे आढळले. मात्र, रजिस्टरवर मोरे यांची सही होती. विशेष म्हणजे त्यांच्या जागी दुसऱ्या महिला होत्या. ती महिला मोरे शिक्षिकेच्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या.

या दरम्यान या गोष्टीचा तपास करण्यात आल्या. भारती या त्या महिलेला ठराविक रक्कम देऊन अध्यापनासाठी ठेवले असल्याची खात्री झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी भारती मोरे यांना खुलासा देण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

भारती मोरे यांच्यावर विनापरवानगी गैरहजर राहणे, विनापरवानगी मुख्यालय सोडणे, कर्तव्यात निष्काळजीपणा करणे, गैरहजर कालावधीत खासगी व्यक्तीला वर्गाचा ताबा देणे, वर्ग उघडे ठेवून चाव्या त्रयस्त व्यक्तीकडे देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस अडथळा निर्माण करणे, या कारणांमुळे निलंबन करण्यात आले. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.समितीचा अहवाल येईपर्यंत मोरे यांचे निलंबन राहणार आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2025

PostImage

राहुलच्या मृतदेह आढळला विहीरीत,पोलिसांचा तपास सुरू


राहुलच्या मृतदेह आढळला विहीरीत,पोलिसांचा तपास सुरू


चिमूर

 चिमूर तालुक्यातील मदनापूर शिवारात आज सकाळी एका युवकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल मंगल शेंडे (वय २१, रा. मदनापूर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा गेल्या दोन दिवसांपासून घरी नव्हता. त्याचे आई-वडील मदनापूर हेटी येथे राहतात. राहुल हा मदनापूर येथील आजीकडे राहून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मदनापुरातील बिरजे यांच्या विहिरीच्या काठावर वडाच्या झाडाच्या सावलीत तो झोपला होता. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना विहिरीत राहुलचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच मदनापूर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
राहुलच्या मृत्यूमुळे मदनापूर गावात शोककळा पसरली आहे. चिमूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 31, 2025

PostImage

वाघाने तोडले शेतकऱ्याचे लचके,शेतात पाण्याची व्यवस्था करीत असताना केला हल्ला 


वाघाने तोडले शेतकऱ्याचे लचके,शेतात पाण्याची व्यवस्था करीत असताना केला हल्ला 

 

लाखांदूर:-

खैरी / पट, विहिरगांव. डांभेविरली व टेंभरी परिसरात गेल्या १० १५ दिवसापासून वाघाचे दर्शन होत असल्याची चर्चा होती. तर वाघाने जनावरांना ठार मारल्याचे ऐकण्यात येत असतानांच दि. 30 मार्च च्या सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान खैरी / पट येथील डाकराम देशमुख नामक शेतकरी मोटार पॅम्प सुरु करण्याकरीता गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांचेवर उडी घेऊन डाकराम चा फरश्याच पाडला व लचके तोडले. डाकराम घरी न परतल्यामुळे घरच्या लोकांनी व गावकऱ्यांनी त्याचा शोधाशोध केला शेवटी आज पहाटे खैरी / पट स्मशान भूमी जवळ त्याचे अर्धवट प्रेतच आढळले वाघाने त्याच्या शरीराचे रात्रभर दोन तुकडेच केले होते. सदर परिसर हा वाघ प्रतिबंधित क्षेत्र असुन सुद्धा व वाघ जनावरांना ठार करीत असतांना वनविभाग लांखादुर मात्र झोपतच होते. प्रेत शवविच्छेदनास ग्रामीण रुग्णालय लाखांदुर येथे नेण्यात आले असुन वनविभाग व लाखांदुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 31, 2025

PostImage

अहेरी येथे गाव माझा उद्योग फाउंडेशन प्रकल्पाचे शुभारंभ उद्योगासाठी महिलांना मिळणार चालना


अहेरी येथे गाव माझा उद्योग फाउंडेशन प्रकल्पाचे शुभारंभ
उद्योगासाठी महिलांना मिळणार चालना 


संसारोपयोगी साहित्य स्वस्त दरात उपलब्ध होणार

 

अहेरी:- येथील हसन बाग हॉटेल लगत गाव माझा उद्योग फाउंडेशन प्रकल्पाचे शुभारंभ सोमवार 31 मार्च रोजी अहेरी नगर पंचायतीचे नगर सेविका तथा सभापती नौरास शेख यांच्या वतीने करण्यात आले.
     शुभारंभ समारंभाच्या अध्यक्षस्थानी गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर राजकपूर भडके हे होते तर मंचावर उदघाटन स्थानी नगर सेविका नौरास शेख होते, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, कांता भडके, आम्रपाली कोसंकर, संजना नेवारे, दीपमाला झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
      सर्व प्रथम नगर सेविका नौरास शेख यांच्या शुभहस्ते फित कापून प्रकल्पाचे विधिवत व शाही थाटात शुभारंभ करण्यात आले.
    त्या नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते  छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
     या प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून गाव माझा फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर राजकपुर भडके यांनी, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांचे हात बळकट करण्यासाठी गाव माझा उद्योग फाउंडेशन सदैव तत्पर असून शासनाचे 'लखपती दीदी' या अभिनव उपक्रमातून महिलाना लखपती करण्याचे लक्ष्य व उद्देश असल्याचे आवर्जून सांगून या प्रकल्पात संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य स्वस्त व माफक दरात मिळणार असल्याचे व याचा लाभ प्रत्येकानी घेण्याचे आवाहन राजकपूर भडके यांनी केले.
    याचवेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, रियाज शेख यांनी 'गाव माझा उद्योग फाउंडेशन'  हे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नतीसाठी धडपड करीत असल्याने या माध्यमातून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महिला व्यवसाय व उद्योगाच्या क्षेत्रातून  विकासाची उत्तुंग झेप घेतील असा आशावाद व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांता भडके यांनी तर सूत्रसंचालन प्रांजली मेकर्तीवार, रुपाली जाकेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार तनवी उराडे यांनी मानले. यावेळी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 31, 2025

PostImage

पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवानीशी मारणाऱ्या पतीस जन्मठेप 


पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवानीशी मारणाऱ्या पतीस जन्मठेप 

 

नांदेड:-

मोटर सायकल घेण्यासाठी माहेरून 80 हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करून एका दिवशी पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करणाऱ्या सिरंजनी तालुका हिमायतनगर येथील एका निर्दयी पतीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय, एम, एच, खरादी यांनी दि. 28 मार्च रोजी जन्मठेप व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 5 वर्ष सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे. सौ महानंदा गजानन पिटलेवाड राहणार शिरंजनी ता. हिमायतनगर या विवाहितेस तिचा पती गजानन नारायण पिठलेवाड वय 30 हा मोटर सायकल घेण्यासाठी बाहेरून 80 हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करत होता.

दि. 15 जुलै 2020 रोजी सदरील विवाहितेची सासू व सासरा हे शेतात गेले असता ती घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी पती गजानन पिटलेवाढ ने पैशाच्या मागणीवरून वाद घातला यात तिने प्रतिसाद न दिल्याने राग अनावरण झाला. गजानन पिटलेवाड ने घरासमोरील जुन्या मोटार सायकल मधील पेट्रोल काढले व ते पत्नी सौ. महानंदाच्या अंगावर टाकून दिला व पेटून दिले यात ती मोठ्या प्रमाणात जळाली असल्याने तिला उपचारार्थ शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले यावेळी तिच्या माहेरच्यांनी हिमायतनगर पोलिसात रीतसर तक्रार दिली . यावर रुग्णालयात जाऊन गंभीररित्या जळीत असलेल्या विवाहितेच्या मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला. परंतु उपचार दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गजानन पिटलेवाड विरुद्ध खून व शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक भगवान बी कांबळे यांनी केला व अतिरिक्त जिल्हा व सत्र  न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र दाखल केले. दरम्यान काळात सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोग्यता एड. सौ. अनुसया शिवराज डावकरे यांनी महत्त्वाचे एकूण 11 साक्षीदार तपासले तसेच अंतिम युक्तीवाद दरम्यान त्यांनी लेखी युक्तिवादासोबत मा. उच्च न्यायालयतील न्यायनिवाडे दाखल केले.
त्याचबरोबर मयत विवाहितेचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा करण्यात यावी अशी विनंती मा. न्यायालयास केली. दुर्दैवी मयत महानंदा पिटलेवाड हिचा मुक्ती पूर्व जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरला व तो निर्दयी पती गजानन पितलेवाड या प्रकरणी दोषी ठरला यावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी दि. 28 मार्च 2025 रोजी गजानन पिटलेवाड यास जन्मठेप व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर सदरील खटल्यास दरम्यानच्या पैरवी अधिकारी म्हणून जमादार रमेश आडे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.


PostImage

Vaingangavarta19

March 31, 2025

PostImage

दारुड्या मुलाने आपल्या  जन्मदात्या आई-वडिलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला , आई - वडील गंभीर जखमी


दारुड्या मुलाने आपल्या  जन्मदात्या आई-वडिलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला , आई - वडील गंभीर जखमी 

 

 अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथे दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या  आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. शेत वाटणीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी विजय समाधान तेलगोटे (३८) रा. घोडेगाव, ता. तेल्हारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ विनोद समाधान तेलगोटे हा दारूच्या नशेत आई-वडिलांशी वारंवार वाद घालत असे. १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता त्याने आई-वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

घटनेनंतर तेल्हारा पोलिसांनी जखमींना तेल्हारा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर २० मार्च रोजी रात्री २.३० वाजता तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अमोल सोळंके करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 30, 2025

PostImage

लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होवून अनखोडा नजीक उलटला ,एक गंभीर  तर तीघे जण जखमी


लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होवून अनखोडा नजीक उलटला ,एक गंभीर  तर तीघे जण जखमी 

  आष्टी -
   आष्टी - चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा येथील वळणावर लोखंडी पत्रे वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होवून उलटला. यात विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारासह  चार जण जखमी झाल्याची घटना दिनांक 30 मार्च 2025 रविवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.

     रमेश शेरकी वय 60 वर्ष रा. आष्टी,  हे गंभीर असून मनोजकुमार दिलीप महंतो ड्रायव्हर,धिरज रामकिशोर ठाकुर कन्डक्टर,धनसींग केपी चौधरी तीन्ही रा.सुपेला भिलाई (छतिसगढ)अशी जखमींची नावे आहेत.


      सविस्तर वृत्त असे की, भिलाईवरून गडचिरोली - आष्टी मार्गे ट्रक क्रमांक CG 07 CR 4622 हा लोखंडी पत्रे घेवुन जात होता दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास अनखोडा येथील वळणावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रित झाला व तो पलटी झाला. याच वेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीवर ट्रक मधील लोखंडी पत्रे पडली यामुळे दुचाकीस्वाराला मार लागला तर ट्रकमधील तिघे जण जखमी झाले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. भर रस्त्यात ट्रक पलटी झाल्याने बराच वेळ आष्टी चा मोर्शी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतुक सूरू कऱण्यात आली.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे


PostImage

Vaingangavarta19

March 30, 2025

PostImage

त्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या शिक्षीका शालिनी खोब्रागडे यांचे उपचारादरम्यान निधन


त्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या शिक्षीका शालिनी खोब्रागडे यांचे उपचारादरम्यान निधन

गोंडपिपरी : पंचायत समिती
गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा आक्सापूर येथे शिक्षीका म्हणून कार्यरत असलेल्या शालिनी खोब्रागडे यांचे काल दि. 29 रोजी रात्री नागपूरात उपचारादरम्यान निधन झाले. सोमवारी कोठारी गोंडपिपरी मार्गावर झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. शालिनी खोब्रागडे यांचे बल्लारपूर तालुक्यातील बाम्हणी येथे घर आहे. सोमवारी त्या कन्या विद्यालयाचे प्राचार्य पोटे यांच्या चारचाकी वाहनाने आक्सापूर येथे शाळेत जात होत्या. दरम्यान कोठारी आक्सापूर मार्गावर झालेल्या अपघातात शालिनी खोब्रागडे, मुख्याध्यापक पोटे व वडस्कर हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान खोब्रागडे व पोटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शालिनी खोब्रागडे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच आप्तपरिवार आहे. खोब्रागडे या 56 वर्षाच्या होत्या. आज बाम्हणी येथे त्यांच्या पार्थीवावर अंतीम संस्कार करण्यात आले. एका उपक्रमशिल, विद्यार्थीप्रिय शिक्षीकेचा अपघातात निधन झाल्याने परिसरात शोक व्यक्त केल्या जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 30, 2025

PostImage

रमझान ईद च्या आदल्या दिवशी मशिदीमध्ये स्फोट


रमझान ईद च्या आदल्या दिवशी मशीदीमध्ये स्फोट 

बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रमजान ईदच्या काही तास आधी, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी तातडीने धाव घेतली असून बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेत मशिदीच्या फरशीला आणि बांधकामाला तडे गेले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.स्फोटानंतर पोलीस विभागाने त्वरीत हालचाल करत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अज्ञात माथेफिरूने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनेच्या मागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. स्फोटामागील सत्य उघड करण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे.

गेल्या काही महिन्यांत बीड जिल्हा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच रमजान ईदच्या काही तास आधीच मशिदीत स्फोट झाल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

घटनास्थळी नमुने जमा करण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पुढील तपशील अधिकृत अहवालानंतरच समोर येईल.


PostImage

Vaingangavarta19

March 30, 2025

PostImage

नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या, भामरागड तालुक्यातील घटना 


नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या, भामरागड तालुक्यातील घटना 

गडचिरोली, ता. ३०: नक्षल्यांनी शनिवारी (ता. २९) रात्री भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्यांतर्गत जुव्वी गावातील एका प्रतिष्ठित इसमाची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुसू गेब्बा पुंगाटी (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शनिवारी रात्री नक्षली जुव्वी येथील पुसू पुंगाटी यांच्या घरी गेले. त्यांनी पुसू यांना झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि टॉवेलने गळा दाबून त्यांची हत्या केली. पुसू पुंगाटी हे गावातील प्रतिष्ठीत नागरिक होते. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुले आहेत. मोठा मुलगा चिन्ना पुंगाटी हा एटापल्ली येथील राजे धर्मराव महाविद्यालयात प्राध्यापक, तर लहान मुलगा किशोर पुंगाटी हा अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतो. प्रा. चिन्ना पुंगाटी यांची पत्नी पोलिस शिपाई आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात पुसू पुंगाटी यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मात्र, नक्षल्यांनी त्यांची काल हत्या केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. पुसू पुंगाटी यांचा नक्षली वा पोलिसांशी काहीही संबंध नव्हता. तरीही त्यांची हत्या करण्यात आली. घटनास्थळी कुठलेही पत्रक किंवा बॅनर आढळले नाही. त्यामुळे हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत तपास सुरु आहे. मात्र, नक्षल्यांनी हत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

यंदा १ फेब्रुवारीला नक्षल्यांनी भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या केली होती. त्यानंतर काल पुसू पुंगाटी यांची हत्या केल्याने खळबळ माजली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

जन्मदात्याने मुलीवरच केला अत्याचार म्हणून न्यायालयाने दिला २० वर्षाचा सश्रम कारावास


जन्मदात्याने मुलीवरच केला अत्याचार म्हणून न्यायालयाने दिला २० वर्षाचा सश्रम कारावास 

 

अकोला :- अकोला जिल्ह्यातून एक घृणास्पद आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं सिद्ध झाल्यानं त्याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवलं. पीडित मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने पूर्ण केली. न्यायालयाने सरकार पक्षाचे ६ साक्षीदार तपासले आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवलं. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

आपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन , ट्रकने दिली  कारला जब्बर धडक 


आपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन , ट्रकने दिली  कारला जब्बर धडक 

 

मुंबई:-

आय.पी.एस.(I.P.S.) सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे  तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 
सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते 
त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. 
सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आय.पी.एस.(I.P.S.) अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. 
सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलीसमध्ये पोर्ट झोनचे डी.सी.पी.(D.C.P.) म्हणून कार्यरत होते. 
सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. 
त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. 
या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. 
दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलीसांना मुंबई पोलीसांना कळवली आहे.  
स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. 
यानंतर १९९६ साली विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले. 
आतापर्यंत त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली

अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई 
तर पोलीस अधीक्षक म्हणून सी.आय.डी. अमरावती येथे सेवा बजावली आहे. 
पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, 
नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. 
एस.पी. डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एम.पी.डी.ए. अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.
सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फ़ार्म भरतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी राज्य सरकारने दूर करावे-डॉ प्रणयभाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना


मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फ़ार्म भरतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी राज्य सरकारने दूर करावे-डॉ प्रणयभाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

 

 

गडचिरोली :-दिनांक 28 मार्च 2025 गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेला आहे परंतु सातबारावर नावे असलेल्या एकाच्या नावाने अर्ज सबमिट केलेला आहे. अर्जदाराचे नाव सातबारावर आहे परंतु सातबारावर असलेली आराजी ही सातबारावर सामायिक क्षेत्र अशी नोंद केली असल्याने कुणाच्यातरी एकाच्या नावाने आराजी  दर्शविण्यात येत आहे. सात बारा धारकांचे नाव या रकान्यामध्ये अर्जदाराचे नाव लिहिले असता आराजी शून्य दाखवते त्यामुळे ऑनलाइन अर्ज सबमिट करता येत नाही. त्यानुसार सातबारा वरील ज्या नावाने आराजी दर्शविली जाते ते नाव त्या ठिकाणी टाकलेले आहे. अर्जदाराचे नाव व सात बारा मधील नाव यात फरक असल्याने महावितरण कंपनीने सदर अर्ज प्रलंबित ठेवलेला आहे . 
शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सातबारा वरील सर्व व्यक्तींचे संमती ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा जोडलेले आहे व डिमांड म्हणून 22 हजार 971 रुपये ऑनलाइन पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भरलेले आहेत परंतु सदर अर्ज महावितरण कंपनीने पुढे फॉरवर्ड न केल्याने मागील तीन चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे मागेल त्याला सौर पंप योजना अर्ज प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप न बसवल्याने शेतीचा हंगाम जवळ असल्याने शेतकरी शासनाच्या या योजनेपासून शेकडी वंचित राहत आहे पुढे महावितरणच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. वास्तविक ऑनलाइन फॉर्म भरताना अर्जदार व सातबारा नाव  वेगळे असल्याने त्याच वेळेस अर्ज सबमिट व्हायला नको होता परंतु दोन्ही नाव वेगळे असताना सुद्धा अर्ज सबमिट  होत आहे याचा अर्थ जे संमती पत्र जोडलेले आहे त्यानुसार अर्ज मंजूर होणे अभिप्रेत आहे. याबाबत तहसीलदार यांना भेटून विचारले असता सहमती पत्र त्याच्यासाठी जोडले जाते सातबारा मध्ये सामायिक क्षेत्र दर्शविल्याने कोणाच्याही एकाच्याच नावाने आराजी दर्शविलेली जाते असे तहसीलदारांचे म्हणणे पडले कदाचित हा महावितरण कंपनीच्या पोर्टलचा दोष असावा असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या योजनेसाठी लागणारी रक्कम भरलेली असून  व लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर केलेली असताना सुद्धा जर अर्ज मंजूर होत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करावे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात निर्माण होत आहे तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या समस्या कडे लक्ष देऊन तात्काळ ही समस्या दूर करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदरकर,  प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल भाऊ झोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानू भाऊ उपाध्ये, महेश अलोणे,चामोर्शी तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर,वडसा तालुका अध्यक्ष रजनीकांत गुरनुले, कुरखेडा ता, अध्यक्षा रुपाली कावळे,अहेरी ता, अध्यक्ष नागेश मडावी यांनी केले आहे,


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

सहचारिणीला झोपेत असताना कुऱ्हाडीने डोक्यावर प्रहार करुन केले ठार 


सहचारिणीला झोपेत असताना कुऱ्हाडीने डोक्यावर प्रहार करुन केले ठार 

 

जळगाव:-

 चारित्र्याच्या संशयातून पतीने आपली पत्नी झोपेत असतानाच तिचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शितल सोमनाथ सोनवणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमनाथ सोनवणे याने चारित्र्याच्या संशयातून पत्नी शितल हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेत दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला आहे. मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात घडली.

सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता. नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते. रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शितल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात शितल गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी सोमनाथ सोनवणे यास गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

तक्रार करणाऱ्या महीलांना उर्मट ,उद्धटपने वागणूक देणाऱ्या पोउनी म्हात्रे यांना निलंबित करा - शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा छायाताई कुंभारे यांची  मागणी


तक्रार करणाऱ्या महीलांना उर्मट ,उद्धटपने वागणूक देणाऱ्या पोउनी म्हात्रे यांना निलंबित करा - शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा छायाताई कुंभारे यांची  मागणी

 

 

 गडचिरोली:-
गडचिरोली  पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिल्या नंतर पोलीस अधिकारी चौकशी, तपासा करिता कनिष्ठ अधिकाऱ्याला तक्रार देतात .आणि ज्यांची तक्रार असेल त्यांचे म्हणणे ऐकून घेतात परंतू गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिस उप निरीक्षक म्हात्रे हे तक्रार वाचून घेतल्या नंतर तक्रार कर्त्या बरोबरच उद्धट अपमानास्पद उंच आवाजात धमकी वजा बोलतात त्यात कात्रोजवार नावाच्या महिला आपला भाऊ व नातेवाईक सोबत आपल्या पती विरोधात तक्रार द्यायला गेली असता तक्रार कर्तीची बाजू एकूण न घेता तक्रारीचा संदर्भ घेऊन उंच आवाजात आम्हाला तेच काम आहे का साले हरामखोर दिवस भर त्रास देतात असे उद्धट व अपमानास्पद शब्द वापरून अपमान केला तसेच खुर्सा गावाचे सरपंच मंजुळा पदा ह्या तक्रारी संदर्भात भेटले असता अशाच प्रकारे उद्धट बोलून त्यांनाच उलट प्रश्न विचारत होते तसेच मिस्त्री नावाची एक बंगाली महिला पतीच्या विरोधात तक्रार दिल्याने तिचे पती जेल मध्ये आहे. तर जेल मध्ये जाण्या पूर्वी त्याने आपल्या मुलाला नातेवाईकाकडे लपून पाठवून दिले तर सदर महिला यांनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली की माझ्या पतीने मुलाला आपल्या नातेवाईका कडे ठेवले आहेत तर आपण मुलाला आणण्यास मदत करा त्या वेळेस पोलिस निरीक्षक म्हात्रे यांनी सदर महिलेला रात्री ११ वाजता बोलविले महिला पोलिस स्टेशन मध्ये गेले असता म्हात्रे यांना विचारले माझा मुलगा मला द्या तेव्हा तु दिवस भर बसून होतीस बस चूप चाप म्हणून ओरडून धावले आणि रात्री दीड वाजता मुलाला दिले. अशा प्रकारे काही महीलाच्या तक्रारी शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष छायाताई कुंभारे यांच्या कडे आल्या त्या तक्रारीची दखल घेऊन. महिलांचे एक शिष्ट मंडळ घेऊन मा. पोलिस अधीक्षक निलोत्पाल साहेब यांचे कडे तक्रार केली की वीस पंचवीस वर्षा पासून आम्ही पोलिस स्टेशन ला येतो लोक प्रतिनिधी म्हणून तक्रार घेऊन जातो परंतु असे उद्धट बोलणारे पोलिस अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी भेटले नाही उलट तक्रार करताना समजून सांगून तक्रारीचे निराकरण केले आहेत परंतू   सदर तपास कामातून  पोलिस उप निरीक्षक म्हात्रे यांना हटवून सक्षम अधिकारी नेमावे असे तक्रारीचे निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून पोलिस उप निरीक्षक म्हात्रे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती छायाताई कुंभारे ,उप संघटिका सौ सीमा पराशर,तालुका समन्वयक सौ गीता मेश्राम, ज्योत्स्नाताई राजुरकर शाखा संघटिका,रामको बाई नरोटे,ज्योती मिस्त्री यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

अवैध रेती उपसा प्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्याने कंत्राटदाराचे देयके थांबविण्याचे तहसीलदाराने दिले आदेश


अवैध रेती उपसा प्रकरणी ठोठावलेला दंड न भरल्याने कंत्राटदाराचे देयके थांबविण्याचे तहसीलदाराने दिले आदेश 


अहेरी; अवैध उत्खनन करूनही ऐटीत फिरणाऱ्या एका कंत्राटदाराला अहेरी तहसीलदारांनी चांगलाच धळा शिकविला आहे
सदर तहसील कार्यालयातून एनओसी प्राप्त झाल्याशिवाय कामाचे देयके थांबविण्याचे आदेश दिले आहेत 
अवैध रेती तस्करी केल्याचे आरोप सिद्ध झालेले कंत्राटदार मे. जी. एस. डी. इंडस्ट्रीज नागपूरचे गजानंद मेंढे या कंत्राटदाराने चंद्रा येथील शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या उत्खनन केलेली रेतीचा मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवली होती.
सदरची रेती भामरागड तालुक्यातील लीलावातील येचली नदी घाटातून उत्खनन न करता इतरत्र ठिकाणावरून रेती आणल्याचे समोर आले होते 
त्या नंतर चौकशी केली असता ४६६.४३ ब्रास रेतीसाठा अवैध असल्याचे आढळून आले, त्यानंतर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी संबंधित कंत्राटदार व कंपनीला ८४,३४,६०० रुपयांचा दंड ठोठावला परंतु सहा महिने उलटूनही दंडाची रक्कम न भरल्याने आलापल्ली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उपभियंत्याना पत्र लिहून संबंधित कंत्राटदाराने देयके थांबविण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती मिळाली आहे 

 तक्रार कर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी शासनाची फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या अशा कंत्राटदाराला तहसीलदाराने दिलेल्या आदेशाचे स्वागत आहे. व सदर कंत्राटदाराचे अजून काही प्रकरण येत्या काही दिवसात समोर येणार असे म्हटले आहे


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

सुरक्षादलाने चकमकीत केले १६ नक्षलवाद्यांना ठार


सुरक्षादलाने चकमकीत केले १६ नक्षलवाद्यांना ठार 

 

सुकमा : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाने आक्रमक कारवाया करत नक्षलवाद्यांना जेरीस आणले आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आणखी एक मोठी कारवाई करत १६ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. शनिवारी छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. तर या चकमकीत दोन जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलात झाली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा रिझर्व्ह गार्ड आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या भागात नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

१६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर सीआरपीएफच्या दोन जवानांना किरकोळ जखम झाली आहे. सुकमा जिल्ह्यातील केरलापाल क्षेत्रात नक्षलवादी असल्याचा सूचना २८ मार्च रोजी डीआरजी आणि सीआरपीएफ यांच्या दलाने ही संयुक्त कारवाई केली. नक्षल्यांसोबत चकमक सुरू झाली. गोळीबाराने हा संपूर्ण परिसर दणाणून गेला.

२० मार्चला बीजापूरमध्ये ३० नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात पोलीसांनी मोठी मोहीम सुरु केली आहे. २० मार्च रोजी पोलीस आणि संयुक्त सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेत नक्षलवाद्यांवर प्रहार करण्यात आला. गंगालूर पीएस लिमिटजवळ बीजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले होते. याठिकाणी जवळपास ४५ नक्षलवादी होते. शोध मोहिमेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा मिळाला. या चकमकीत बीजापूर डीआरजीचा एक जवान शहीद झाला.

२० मार्च रोजी नक्षलवादी चकमकीनंतर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देश लवकरच नक्षलवाद मुक्त करण्याचे सूतोवाच केले होते. त्यांनी एक्सवर याविषयी पोस्ट लिहिली होती. नक्षलवाद मुक्त भारत अभियानात आपल्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. बीजापूर आणि कांकेर या दोन ठिकाणी दोन सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवादी ठार झाल्याचे ते म्हणाले होते. इतक्या सुविधा देऊनही जे नक्षलवादी आत्मसमर्पण करणार नाही, त्यांच्यासाठी झिरो टॉलेरन्सचे धोरण राबवण्यात येईल, असे ते म्हणाले होते. ३१  मार्च २०२६ रोजी देश नक्षलवाद मुक्त होईल असे त्यांनी नमूद केले होते.


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीच सर्वांनी सजग राहावे - प्राचार्य डॉ. संजय फुलझेले   


नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीच सर्वांनी सजग राहावे - प्राचार्य डॉ. संजय फुलझेले   
 
आष्टी (अशोक खंडारे/वैनगंगा वार्ता १९)

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गिरविले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे.     


नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीच सर्वांनी सजग राहावे असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ संजय फुलझले यांनी केले 
मानव भौतिक प्रगती करीत असताना निसर्गाच्या विरोधात जाऊन अनेक तऱ्हेने विकास केलेला आहे आणि या विकासातूनच मानवाने अनेक नैसर्गिक आपत्तीची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाच्या विरोधात जातो तेव्हा तेव्हा निसर्ग देखील महामारी, भूकंप, महापूर अशा अनेक मार्गातून आपत्ती निर्माण करून निसर्गाच्या समतोल राखीत असतो आणि म्हणून युवकांनी आपत्ती येण्यापूर्वी आपत्ती येऊच नये आणि आपत्ती आली तरी हानी ही कमी व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहायला हवे असेही त्यांनी सांगितले 
 सदर प्रशिक्षणाचे  उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. अनिता लोखंडे एन.चंद्रा महाविद्यालय आष्टी डॉ. राजू किरमीरे सदस्य विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली , प्राचार्य डी एम माटे,डॉ. नंदकिशोर पडोळे, डॉ. ओ. पी सिंग सद्गुरू महाविद्यालय  मुख्याध्यापक पाचभाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्देश व काळाची गरज या अनुषंगाने प्रा.डॉ. भारत पांडे कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी विकास विभाग यांनी प्रस्तावना केली. या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये सुद्धानशिव परीडा असिस्टंट मॅनेजर सुरक्षा विभाग लॉयड्स मेटल कोनसरी यांनी अग्निशामक यावर मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना शासनाचे नियम आग कशी लागते आग लागू नये व लागल्यास कशी ती नियंत्रणात आणावी याकरिता प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर वैभव उईके सुरक्षा विभाग लॉयड्स मेटल कोनसरी यांनी दैनंदिन जीवनात आपण जे विद्युत उपकरणे वापरतो त्यामध्ये मोबाईल चार्ज करणे, चालू कुलर मध्ये पाणी भरणे, एखाद्या व्यक्तीला शाक लागल्यानंतर कोणताही विचार न करता त्याला हात लावू नये विद्युत उपकरणाच्या दुरुस्ती करताना चप्पल चा वापर न करणे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून अपघात कसे घडतात आणि म्हणून अपघात घडू नये याकरिता अनेक चित्राद्वारे प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सुमन कांबळे सुरक्षा विभाग लॉयड्स मेटल कोनसरी यांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात सकाळ पासून तर रात्र पर्यंत आपण वाहतुकीच्या दुचाकी, कार चा वापर करतो आणि अशा वेळेला आपल्याला वाहतुकीचे नियम माहिती नसतात त्याचबरोबर रस्त्यावर असणारे अनेक चिन्ह जे चिन्ह आपल्याला संकेत करीत असतात की मोडवा आहे रस्ता खराब आहे नदी आहे पूर आलेला आहे त्यांचा पुरेपुर वापर करायला पाहिजे किंवा हेल्मेट वापरूनच गाडी चालवावे असे आवाहन केल्यानंतर देखील आजही समाजातील अनेक लोक हेल्मेटचा वापर करीत नाहीत किंवा कार चालवताना सीटबेलच्या वापर करीत नाही आणि त्यातूनही अपघात होतात आणि या अपघातातूनच अनेक जीव हानी होत असते आणि म्हणून अपघात होऊ नये त्याकरिता छोटे छोटे महामार्गावरील चिन्ह सुरक्षा साहित्य अशा अनेक गोष्टीच्या उदाहरणासहित प्रात्यक्षिक करून चित्राद्वारे मार्गदर्शन केले त्याचबरोबर साप हा मनुष्याच्या शत्रू नसून मित्र आहे आणि म्हणून सापापासून असणारी आपली भीती ही दूर करावी याकरिता प्राचार्य किशोर पाच भाई महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय आष्टी यांनी सापाविषयी असणारे समाजातील गैरसमज दूर केले आणि त्यांनी विषारी आणि बिनविषारी अशा अनेक सापाचे  चित्राद्वारे मार्गदर्शन केले 
 आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता डॉ. गणेश खुणे,डॉ.राज मुसणे डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. श्याम कोरडे,प्रा.रवी गजभिये प्रा.ज्योती बोभाटे, प्रा. विजया सालुरकर, प्रा. नाशिका गबणे, राज लखमापूरे,निलेश नाकाडे, इरफान शेख,मोहम्मद मुस्ताक, प्रभाकर भोयर, संचित बचाड, दीपक खोब्रागडे,संतोष बारापात्रे,   विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

माझ्या मुलीची का छेड काढता असे जाब विचारणाऱ्या वडीलाचा केला धारदार शस्त्राने खून


माझ्या मुलीची का छेड काढता असे जाब विचारणाऱ्या वडीलाचा केला धारदार शस्त्राने खून 

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

 
नागपूर:-
नागपूरच्या इमामवाडा परिसरात 26 मार्चला एक धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये एका वडीलाला त्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या विरोधात जाब विचारला होता म्हणून त्याची धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृताचे नाव नरेश वालदे वय 53 वर्षांचे रंगकामाचा व्यवसाय करणारे होते. ही घटना त्यांच्या मुलीला सतत त्रास देणाऱ्या तरुणांविरुद्ध ते विरोध करीत होते म्हणून घडली.
नरेश वालदे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फिर्याद दिल्यानुसार काही तरुण बराच काळापासून त्यांच्या मुलीला सतत त्रास देत होते. या विरोधात नरेश वालदे यांनी टोकाची भूमिका घेतली आणि त्यांचा आरोपींशी वाद झाला. त्यानंतर आरोपींनी नरेश यांचा काटा काढायचा असा बेत आखला होता 
बुधवारी, 26 मार्च रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्यांना जट्टारोडी परिसरात भेटायला बोलावले. तिथे जेव्हा ते गेले, तेव्हा आरोपींनी त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली.
नरेश वालदे हे त्यांच्या वृद्ध आई आणि तीन मुलींसोबत नागपूरच्या इमामवाडा परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती, पोलिसांना माहिती दिली होती पण पोलिसांनी तेव्हा याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्याच वेळी पोलीसांनी तत्परता दाखवली असती तर हा अनर्थ घडला नसता अशी चर्चा सुरू आहे 
या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून घटनेची तपास सुरू आहे. आरोपींची नावे निलेश उर्फ नाना मेश्राम आणि इश्वर उर्फ जॅकी सोमकुवार अशी आहेत

©


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

 देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्रातील एकुण 61,77,330/- रुपयांचा जप्त मुद्देमाल पोलीसांनी केला नष्ट


 देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्रातील एकुण 61,77,330/- रुपयांचा जप्त मुद्देमाल पोलीसांनी केला नष्ट   

गडचिरोली जिल्ह्यातील फसव्या दारुबंदीचा नमुना 

 एकुण 520 गुन्ह्रांमधील मुद्देमाल करण्यात आला नष्ट


    गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे आदेशान्वये जिल्ह्रातील अवैध दारु विक्री करणा­यांवर कठोर कार्यवाही केली जात असते. त्याअनुसार विविध पोस्टे येथे दाखल गुन्ह्रांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवाई  दरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागे अभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. यावरुन पोस्टे देसाईगंज येथील सन 2018 ते 2024 या कालावधीतील दाखल एकुण 520 गुन्हयांमधील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दिनांक 28/03/2025 रोजी नष्ट करण्यात आला.     

सविस्तर वृत्त असे आहे की, मा. न्यायालय व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने दिनांक 28/03/2025 रोजी पोस्टे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक  अजय जगताप यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक. चंदन भगत व शु. के. चौधरी यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्रांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात 1) विदेशी दारुच्या 180 मिलीच्या 2666 बॉटल 2) विदेशी दारुच्या 2 लिटर क्षमतेची 1 बॉटल 3) विदेशी दारुच्या 1000 मिलीच्या 6 बॉटल 4) विदेशी दारुच्या 90 मीली मापाच्या 62 बॉटल 5) विदेशी दारुच्या 375 मीली मापाच्या 7 बॉटल 6) देशी दारुच्या 180 मिलीच्या 28 बॉटल 7) देशी दारुच्या 90 मिलीच्या 101015 बॉटल 8) 650 मिली बिअरच्या 29 बॉटल 9) 500 मिली मापाचे बियरचे 245 टिनाचे कॅन 10) 330 मिली मापाचे बियरचे 48 बॉटल याप्रमाणे एकुण 61,77,330/- (अक्षरी:- एकसष्ठ लाख सत्याहत्तर हजार तीनशे तीस) रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने 15 न् 15 फुटाचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला त्यानंतर काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड¬ात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन). एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा  रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप, सपोनि. प्रेमकुमार दांडेकर, श्रेणीपोउपनि. दुर्योधन सरपे, पोअं/शैलेश तोरकपवार, पुंडलीक मानकर, सतीश बैलमारे यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2025

PostImage

छत्तीसगढ येथून दुचाकी चोरट्यांना  गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद


छत्तीसगढ येथून दुचाकी चोरट्यांना  गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद

 

 विविध गुन्ह्रांतील एकुण 3,15,000/- रुपये किंमतीच्या 09 दुचाकी वाहनांचा पोलीसांनी लावला शोध 

 

  गडचिरोली जिल्ह्रात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोस्टे कोटगुल येथे दि 24/03/2025 रोजी कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. 02/2025 गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
सदर गुन्ह्राचा तपास चालु असताना सिसिटीव्ही फुटेजच्या मदतीने दि. 25/03/2025 रोजी पो. स्टे. कोटगुल येथील पोउपनि. दयानंद शिंदे यांनी आरोपी नामे प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे याची ओळख पटविली होती. त्यानंतर गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा टेमली (छ.ग.) येथून आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे, वय 19 वर्षे, रा. टेमली ता. मोहल्ला, जि. मानपूर-मोहल्ला (छ.ग.) याला मौजा टेमली येथून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने व त्याचा साथीदार नामे टेमनलाल रामखिलावन साहू, वय 19 वर्षे रा. चिलमगोटा ता. दौंडी लोहारा, जि. बालोद (छ.ग.) यांनी मिळून सदर गुन्ह्रात चोरीस गेलेली मोटारसायकल वाहन क्र. सी.जी-07-बी.व्ही.-5653, किंमत अंदाजे 30,000/- रु. चोरी केली असल्याचे आरोपीने  पोलीसांसमक्ष कबूल केले होते. यानंतर दिनांक 25/03/2025 रोजी दोन्ही आरोपीतांस पोस्टे कोटगुल पोलीसांनी अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 
यादरम्यान आरोपींना विश्वासात घेवून गुन्ह्राच्या संदर्भाने अधिकची विचारपूस केली असता, पोस्टे कोटगुल येथे दाखल अप. क्र. 002/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. सह 1) पोस्टे कोरची येथे दाखल अप.क्र. 0029/2025 कलम 303(2) भा.न्या.सं., 2) छत्तीसगडमधील पोस्टे बसंतपूर येथे दाखल अप.क्र. 0097/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. असे गुन्हे उघडकीस येऊन या गुन्हयांतील एकुण 03 दुचाकींसह इतर 06 दुचाकी अशा एकुण 09 दुचाकी किंमत अंदाजे 3,15,000/- रु. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. पोस्टे कोटगुल पोलीसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे सदर गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. दयानंद शिंदे हे करीत आहेत. 
सदर तपास पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा  रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वात पोउपनि. दयानंद शिंदे व पोहवा/भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, पोअं/विनय सिध्दगु, किशोर बावणे, अनिल मडावी यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

March 28, 2025

PostImage

प्रसुती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू 


प्रसुती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू 

गडचिरोली : रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याचा फटका रुग्णांना बसत असतो. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ मार्च रोजी असाच प्रकार घडला. प्रसूतीदरम्यान एका नवजात बाळाचा मृत्यू झाला.

कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थायी एकही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. डॉ. डोंगरवार यांची नियुक्ती कुरखेडा रुग्णालयात आहे. पण, त्यांना प्रतीनियुवर गडचिरोली येथील रुग्णालयात नेमण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात एकूण ७ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यापैकी ३ वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर बाहेर आहेत. अनेकदा सर्जन बाहेरून बोलविला जातो; पण ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. बाळाच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे पालक दिव्याणी व प्रफुल्ल चवरे यांनी सांगितले.

वैद्यकीय अधीक्षक काय म्हणतात...

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ठमके यांनी, बाळाचा मृत्यू गर्भातच झाला होता. सदर महिला लवकर भरती झाली असती तर तिला रेफर करण्यासाठी वेळ मिळाला असता, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

रुग्णालयात परिपूर्ण नाश्ता मिळतो काय?

नातेवाइकासाठी जेवणाची सोय असणे आवश्यक आहे. परंतु, कुरखेडा रुग्णालयात उपचारार्थ भरती होणाऱ्या रुग्णांच्या एकाही नातेवाइकास जेवण मिळत नाही.

नाश्त्यात दूध, अंडी, केळी मिळणे गरजचे आहे. परंतु, केवळ केळी वितरित केली जाते, असा आरोप नातेवाइकांचा आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची हेळसांड होत असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला. नेहमीच डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे गरीब रुग्णांचा जीव जातो, असे म्हटले जाते आहे 


PostImage

Vaingangavarta19

March 28, 2025

PostImage

दारुसह १२ लाख रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी केला जप्त,एक आरोपी ताब्यात तर दोघांचा शोध सुरू


 

दारुसह १२ लाख रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी केला जप्त,एक आरोपी ताब्यात तर दोघांचा शोध सुरू 

मुल:-
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्हयात दारूचा अवैध व्यवसाय करण्याचे उद्देशाने दारूची वाहतुक करीत असतांना मूल पोलीसांनी दारूसह १२ लाख ९१ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील परीविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले, पो. हवा. जमीरखान पठाण आणि नरेश कोडापे मूल गोंडपिपरी मार्गावरील नवेगांव भुजला ते बेंबाळ गांवादरम्यान एका शेताजवळ नाकाबंदी करून उभे असतांना संध्याकाळी ७ वाजताचे सुमारास गोंडपिपरी कडून खेडी कडे येत असलेल्या एमएच-३४- सीडी-७११६ क्रमांकाच्या ग्रे रंगाच्या सुझुकी इंडीका कारची तपासणी केली, तेव्हा सदर वाहनाच्या मागील सिट आणि मागील डिक्कीमध्ये ठेवलेल्या खोक्यांमध्यें विदेशी कंपनीची २ लाख ९१ हजार ५४० रूपयाची दारू असल्याचे दिसून आले. यावरून पोलीसांनी सदर वाहनाचा चालक खुशाल भैयाजी बांगडे रा. नांदाफाटा ता. कोरपना जि. चंद्रपूर याला ताब्यात घेवून अटक केली. सदर घटनेत पोलीसांनी २ लाख ९१ हजार ५४० रूपयाच्या विदेशी दारूसह १० लाख किंम्मतीचे वाहन जप्त केले. ताब्यात घेतलेल्या वाहन चालक खुशाल बांगडे यांना विचारणा केली, तेव्हा पोलीसांनी हस्तगत केलेली विदेशी दारू बल्लारशा येथील पवन जयस्वाल यांचेकडून सावली तालुक्यातील व्याहाड येथील निखील मंडलवार यांना पोहोचवून दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वाहन चालकांच्या बयाणानुसार पोलीसांनी वाहन चालकासह पवन जयस्वाल आणि निखील मंडलवार यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पवन जयस्वाल आणि निखील मंडलवार यांचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक प्रमोद चौगुले सहका-यांचे मदतीने करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 28, 2025

PostImage

 ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी, एका मजूराचा करुन अंत 


 

 ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी, एका मजूराचा करुन अंत 

 

धानोरा :-

 तालुका मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राजोली गावाजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका मजुराचा करुन अंत झाल्याची घटना गुरुवारी (दि.27) दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. आशिष मन्साराम मडावी (22) रा. मेंढा (लेखा) ता. धानोरा असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, धानोरा येथून ट्रॅक्टरने घरकुल बांधकामाचे साहित्य घेऊन राजोली येथे निघालेल्या चालकाचे वळणावर समोरुन येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या नादात नियंत्रण सुटल्याने राजोली गावाबाहेरील शेतशिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने मजुर तरुण आशिष मडावी याचा जागीच मृत्यू झाला. सदर ट्रॅक्टर ही शिवदास तोफा रा. मेंढा यांच्या मालकीची आहे. हा ट्रॅक्टर त्यांचाच मुलगा चालवीत होता. तो दारु प्राशन करून असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती धानोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 28, 2025

PostImage

वेगवेगळ्या दोन अपघातात दोन ठार तर आठ जण जखमी


वेगवेगळ्या दोन अपघातात दोन ठार तर आठ जण जखमी 

 

कुरखेडा :-

 कुरखेडा तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार, तर एकूण 8 जण जखमी झाल्याची घटना कुरखेडा-कढोली व मौशी-कुरखेडा मार्गावर घडली. पहिली घटना कुरखेडा-कहोली मार्गावर

कढोलीपासून 1 किमी अंतरावर दोन विरुद्ध दिशेने येणान्या दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर व दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची बुधवारी (दि.26) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रशेखर बालाजी जुमनाके (55) रा. चिनेगाव ता. कुरखेडा असे मृताचे नाव आहे. जखमीमध्ये जयपाल मडावी (38), रुपेश कवडो (40) दोघेही रा. गांगुली ता. कुरखेडा व माणिक पेंदाम (35) रा. चिनेगाव यांचा समावेश आहे. जयपाल मडावी हे गंभीर जखमी असून, त्यांना गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघातात मृत झालेले चंद्रशेखर जुमनाके हे कढोली वरून सायंकाळी आपले काम आटोपून स्वगावी चिनेगाव येथे परत जात होते. दरम्यान, समोर जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही दुचाकी क्षतीग्रस्त झाल्या. याव्शवत कढोली येथील पोलिस पाटील यांनी कुरखेडा पोलिसांना माहिती दिली. जखमींना लगेच कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात

उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत. दुसरी घटना कुरखेडा तालुक्यातील मौशी कुरखेडा मार्गावर असलेल्या रिलायंस कंपनीच्या टॉवर जवळ गुरुवारी (दि.27) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.

दोन दुचाकींची समोरासमोर धड़क बसल्याने एक दुचाकी चालक ठार तर 5 जण गंभीर जखमी झाले. अक्षय निरंगसू पोरेटी (26) रा. सलंगटीला असे

मृतकाचे नाव आहे. तर सारधी पोरेटी (21) रा. सलंगटोला व गौरव नैताम (15) रा. मौशी, जिया नैताम (32), विवेक कोडाप (21) दोन्ही रा. मौशी, विहार मडावी (30) रा. चडेगाव अशी जखमीची नावे आहेत. मृतक अक्षय व त्याची पत्नी सारथी तसेच गौरव हे एमठ्च 40 क्यू 7465 या क्रमांकाच्या दुचाकीने कुरखेडा वरून सलंगटोला येथे जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने जिया नैताम, विवेक कोडाप, विलास मडावी हे तिघे एमएच 31 केआर 755 या क्रमाकाचा दुचाकीने कुरखेडाकडे येत असताना दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक बसली. भडक एवढी भीषण होती की, दुचाकींचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. दुचाकी चालक अक्षय पोरेटी याचा जागीच मृत्यू तर इतर 5 जण जखमी झाले. त्याना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमीना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरु होती.


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

सासुच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या,सासुची कारागृहात रवानगी, मात्र मुले झाली पोरकी 


सासुच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या,सासुची कारागृहात रवानगी, मात्र मुले झाली पोरकी 

 

बारामती - पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथील विवाहित महिलेनं सासूच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय. नीता सचिन निगडे (वय ३३) रा. वार्ड क्र. ६ नीरा असं विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर तिची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विजया निगडे - जगताप मूळ रहिवासी वाणेवाडी (ता. बारामती) ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिणवणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे असा त्रास देत होती. नवीन फ्लॅट घेतल्यानंतर तिथे राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून अखेर नीताने नीरा येथील राहत्या घरात आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत. विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तिला आता येरवडा कारागृहात पाठण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७ मार्च) रोजी माध्यमांना दिली आहे.

पोलिसांनी संतप्त जमावाला रोखले - नीता यांनी रहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर नीरा तसंच जेजुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. नीताच्या माहेरचे लोक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नीरा पोलीस दूरक्षेत्रात आल्यावर प्रचंड संतापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता नीराचे फौजदार सर्जेराव पूजारी, घनशाम चव्हाण, हरिश्चंद्र करे यांनी माहेरच्या लोकांची समजूत काढत कायदेशीर कारवाई करू असं आश्वासीत केलं. अंत्यविधीवेळीही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

निताच्या जाण्याने एका मुलासह दोन मुली झाल्या पोरक्या - नीता यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या पतीने नीरा शहरात एक फ्लॅट घेतला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फ्लॅटमध्ये हे कुटुंब राहण्यासाठी जाणार होते. यावरुन सासू सुनेला कुरबुर करतं होती. आता पत्नीच्या पश्चात फ्लॅटमध्ये या तीन मुलांचं संगोपन कसं करायचं असा प्रश्न आहे. तर या दोन्ही मुली आता आई विना पोरक्या झाल्या आहेत.

आई गेल्यानंतर लेकीन ठेवला मिस यू आईचा स्टेटस - नीता गेल्यानंतर नीताच्या मुलीने मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटसवर आणि फेसबुकवर मिस यू आई हा मेसेज करत आईचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा मिस यू आईचा स्टेटस पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. नीताने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या या दोन कोवळ्या मुलींचा विचार करायला हवा होता, अशी भावना आता लोकांनी व्यक्त केली आहे. क्षणभराचा राग आपल्या आप्तांना आयुष्यभर दुःख भोगायला लावतो अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

गडचिरोली शहरात अत्याधुनिक नाटय / सांस्कृतिक सभागृह उभारावे.  -  माजी. आमदार  डॉ. नामदेव उसेंडी


गडचिरोली शहरात अत्याधुनिक नाटय / सांस्कृतिक सभागृह उभारावे.  -  माजी. आमदार  डॉ. नामदेव उसेंडी

गडचिरोली:-

गडचिरोली शहरातील लोकसंख्या जवडपास ८०हजार  असून गडचिरोली शहराला व जिल्ह्याला झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा इतिहास लाभलेला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात विकासाला सुरवात झाली असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बैठका घेण्यासाठी अद्यावत सभागृह उपलब्ध नाही. हि अडचण लक्षात घेता डॉ . नामदेवराव उसेंडी माजी. आमदार गडचिरोली विधान सभा क्षेत्र यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार ऍंड. आशिष शेलार साहेबची अधिवेशन  काळात  विधान भवन मुंबई येथे भेट घेतली  व चर्चा केली.  तसेच निवेदन देऊन गडचिरोली शहरात अद्यावत नाट्य / सांस्कृतिक सभागृह  मंजूर करण्याकरिता  निवेदन देऊन मागणी केली.  यावर  मंत्री महोदयांनी साकारातक निर्णय घेऊन गडचिरोली जिल्यातील गडचिरोली शहरात  नाट्य / सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्याचे आश्वासन दिले.


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

 शासनाने बंदी घातलेली कापसाचे बियाणे (चोर बिटी )आष्टीत येण्याची शक्यता?


 शासनाने बंदी घातलेली कापसाचे बियाणे (चोर बिटी )आष्टीत येण्याची शक्यता?

कारवाईअभावी वापर वाढला : 

आष्टी : चोर बीटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाणांवर बंदी घातली आहे. मात्र  गुजरात,तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे गडचिरोली जिल्ह्यात आणली जातात कृषी विभाग, पोलिस विभाग लक्ष देण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. चामोर्शी, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्यांमध्ये दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तण नाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात.तण नाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र चोर बीटी या कापसाची लागवड केल्यास तण नाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बीटीची लागवड करून मोठ्या प्रमाणात शेतकरी तण नाशकांचा वापर करतात. तण नाशकाच्या अतिवापरामुळे शेतजमीन पूर्णपणे नापीक होते. तसेच पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो.अतिशय घातक असलेली तण नाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यू सुध्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बीटी या बियाणांवर बंदी घातली आहे.चामोर्शी, सिरोंचा या तालुक्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून आहेत. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र तेलंगणा राज्यातून प्रतिबंधीत बियाणे गडचिरोली जिल्ह्यात आणले जाण्याची शक्यता आहे. करीता कृषी विभागातील वरिष्ठ अधिकरी व पोलीस विभागाने लक्ष देऊन वेळीच आवर घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सुज्ञ नागरिक करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

लक्ष प्राप्ती होईपर्यंत कधीही थांबू नका -  अब्दुल जमीर अब्दुल हकीम      


लक्ष प्राप्ती होईपर्यंत कधीही थांबू नका -  अब्दुल जमीर अब्दुल हकीम      

 

आष्टी :-       केवळ बाह्य सौंदर्य म्हणजेच व्यक्तिमत्व नसून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिस्त अनुशासन अभ्यास रोज नवनवीन ज्ञानात भर टाकून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व त्यातून आपल्या राष्ट्राची सेवा करावी असे आआवाहन  अब्दुल जमीर अब्दुल हकीम( बबलू भैया) यांनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून केले

त्यासोबतच विज्ञानाशी मित्रता करून अनेक नवीन आदर्श पुढे ठेवून सातत्य साधना चिकाटी यातूनही व्यक्तिमत्व घडत असतो असे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला प्रमुख उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. डी.जे. मशाखेत्री कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी यांनी देखील युवकांनी व्यसन न्युनगंड वाद भौतिकवाद यापासून दूर राहून ज्ञानसाधना करावी व सतत व्यक्तिमत्व घडवत राहावे असे आवाहन केले यावेळेला शून्यातून विश्व निर्माण करणारे राहुल जवादे यांनीदेखील अल्पशा पगारापासून ते उद्योगपती पर्यंत कसा प्रवास केला याविषयी आपले अनुभव कथन केले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला प्राचार्य किशोर पाचभाई यांनी देखील छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्ती घडत असतो असे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले यांनी देखील विद्यार्थ्यांनी अनेक आदर्श पुढे ठेवावे आणि आपल्या समाजाचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेची प्रस्तावना प्रा. डॉ. भारत पांडे कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी विकास विभाग यांनी केले तर संचालन प्रा. डॉ. गणेश खुणे यांनी केले त्यासोबतच  ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. राज मुसने,डॉ. रवी शास्त्रकार डॉ. श्याम कोरडे प्रा. रवी गजभिये प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. विजया सालुरकर,प्रा. नाशिका गबणे ,राज लखमापूरे, निलेश नाकाडे इरफान शेख, मोहम्मद मुस्ताक, प्रभाकर भोयर,संचित बाचाड, दीपक खोब्रागडे   संतोष बारापात्रे आदींनी सहकार्य केले


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

प्रा.आ.केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला डॉ. लुबना हकीम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


प्रा.आ.केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला डॉ. लुबना हकीम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

अहेरी:-

प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम यांच्या वाढदिवस आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचार्‍यांनी विशेष उत्साहाने साजरा केला 

वाढदिवसाच्या  सुरुवातीला डॉ. लुबना हकीम यांनी केक कापले व त्यांचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले  आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर उपस्थित व्यक्तींनी आपल्या मनापासून आदर व्यक्त केला. यावेळी, डॉ. येर्रावार,  पर्यवेक्षीका डोगरे मॅडम, पर्यवेक्षीका गोगे मॅडम, चीचघरे सर, दीपक भाऊ, दिनेश भाऊ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. 

शेवटी, वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांना नास्ता  व कोल्ड्रिंक देण्यात आले 
 शेवटी डॉ. लुबना हकीम यांनी माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे  आभार व्यक्त केले


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

अहेरी येथील वसतीगृहात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, अधीक्षक व मुख्याध्यापक यांचेवर कारवाई करण्याची मागणी


अहेरी येथील वसतीगृहात विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, अधीक्षक व मुख्याध्यापक यांचेवर कारवाई करण्याची मागणी 

 

अहेरी (गडचिरोली): एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, अहेरीच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर अमानुष छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मारहाण, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. या संदर्भात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून अधीक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. या षडयंत्र दाबण्याचे प्रयत्न चालू आहे.

विद्यार्थ्यांचे गंभीर आरोपः

नववीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणः

सकाळी ५ वाजता झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना बांबूच्या काठीने तंगडीवर जबरदस्त मारहाण करण्यात आली.

► बारावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक छळ आणि धमकीः

अधीक्षकाने विद्यार्थ्यांना वारंवार धमक्या देत मानसिक दबाव टाकला.

अमन कुलसंगे याला बेदम मारहाणः
७ मार्च २०२५, रात्री ११:१५ वाजता तब्येत खराब असलेल्या अमन कुलसंगे याला स्वतःच्या चप्पलने आणि काठीने तंगडीवर ४० वेळ बेदम मारहाण करण्यात आली.

▶ सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांवर कठोर शिक्षाः

रात्री १० नंतर पाढे विचारले जातात, चुकल्यास ४० वेळा हातावर मारले जाते.

▶ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरणः

सततच्या छळामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले असून त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

पुरावे स्पष्ट - अमानुष छळाचे प्रत्यक्ष चित्रण

विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध असून, त्यांच्या पायावर खोल जखमा झालेल्या स्पष्ट दिसत आहेत.
आदिवासी विभागाला इशारा - तात्काळ कारवाई करा !

या अमानुष वर्तनाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, महाराष्ट्र यांनी कठोर भूमिका घेतली आहे. प्रदेश सचिव अॅड. राकेश तोरे आणि गिरीश जोगे, चंद्रकांत वेलादी (सामाजिक कार्यकर्ता) यांनी अधीक्षक ईश्वर शेवाळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद आणि समाज बांधव विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2025

PostImage

लाचखोर वैद्यकीय अधिकारी सापडला लाप्रवीच्या जाळ्यात, एक लाख तीस हजार रुपयांची मागणी


लाचखोर वैद्यकीय अधिकारी सापडला लाप्रवीच्या जाळ्यात, एक लाख तीस हजार रुपयांची मागणी 

गडचिरोली:-

थकीत वेतनासाचे बिल काढण्यासाठी आरोग्य सहायकडून एक लाख 30 हजारांची रक्कम लाच म्हणून स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकिय अधिकारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हीं कारवाई दिनांक 26 मार्च बुधवारी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.

डॉ. संभाजी भोकरे असे लाचखोर वैद्यकिय अधिकाऱ्याचे नाव आहे.

डॉ. संभाजी भोकरे लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. याच आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी ते सप्टेंबर 2024 व नोव्हेंबर महिन्यातील 14 दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरिता डॉ. संभाजी भोकरे यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. या नाहरकत प्रमाणपत्रासाठी डॉ भोकरे यांनी दिड लाख रूपयांची मागणी केली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने आरोग्य सहायकाने लाचलूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तडजोडी अंती डॉ भोकरे यांनी एक लाख तीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक संतोष पाटिल, शिवाजी राठोड व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोग्य सहायकडून एक लाख तीस हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ भोकरे यांना रंगेहाथ पकडले


PostImage

Vaingangavarta19

March 26, 2025

PostImage

चंद्रपूर येथील तिन तरुणांना बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व जीवंत काळतुसासह केली अटक 


चंद्रपूर येथील तिन तरुणांना बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व जीवंत काळतुसासह केली अटक 

 


बल्लारपूर:-
बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केली सदर कारवाई २५ मार्च रोजी करण्यात आली. अभि वाल्मीक साव (२४) रा.दत्त नगर चंद्रपूर, FCविनीत तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा.राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. बल्लारपूर पोलीसांनी एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस सह तीन युवकांना अटक केले.२५ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक चे सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे हे डि.बी. स्टॉफसह पेट्रोलींग करित असतांना त्यांना गोपनीय माहिती की साईबाबा वार्ड, बल्लारपुर येथे ३ युवक देशी कट्टा घेऊन फिरत आहेत
त्यावरून त्यांना ताब्यात घेत एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ज्याची एकुण लांबी २४ सेमी बॅरलची लांबी ११ सेमी, बॅरलची गोलाई ५.५ सेमी, बॅरल पासुन लाकडी मुठेची लांबी १३ सेमी असलेली किंमत २० हजार रुपये व एक नग पितळी धातुचे जिवंत बुलेट ज्याची लांबी ७.५ सेमी बुलेट पितळी धातुचे असुन त्याची गोलाई ४ सेमी बुलेटच्या मागिल बाजुच्या पेंदयावर ८ एम.एम. के.एफ. असे लिहलेले किंमत २ हजार रुपये असे एकुण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्या जवळून जप्त करण्यात आला. आरोपी अभि वाल्मीक साव (२४) रा. दत्त नगर चंद्रपूर, विनीत नानाजी तावाडे (२४) रा. बापट नगर चंद्रपूर, संकेत रविंद्र येसेकर रा राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपूर यांचा विरुध्द अप क्रं. २२४/२०२५ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करुन तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे 

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल धांडे, सफौ. आंनद परचाके, पो.हवा. सुनिल कामटकर, पो.हवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पो.हवा. संतोष पंडित, पोहवा. सत्यवान कोटनाके, पो.अं. वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, चापोअ. कैलास चिचवलकर, म.पो.अं. अनिता नायडु सह गुन्हे शोध पथकांनी केले


PostImage

Vaingangavarta19

March 26, 2025

PostImage

आष्टी पोलीसांनी कोनसरी येथे पकडला सुगंधीत(मजा) तंबाखू,१० लाख विस हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त


आष्टी पोलीसांनी कोनसरी येथे पकडला सुगंधीत(मजा) तंबाखू,१० लाख विस हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त 

तिन आरोपींची कारागृहात रवानगी 

 

आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनाच्या साहाय्याने, सुगंधी तंबाखूच्या तस्करीचा डाव आष्टी पोलिसांनी मंगळवारी (दि.25) उधळवून लावला आहे. या कारवाईत 19 हजार 800 रुपयांच्या सुगंधित तंबाखूसह, वाहन असा एकूण 10 लाख 19 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीकांत नंदकुमार आकुलवार (38) रा. देवापूर वार्ड, ता. गडचिरोली पराग अरविंद रामटेके (38) रा. नागभिड जि. चंद्रपूर, हेमंत देविलाल चव्हाण (38) रा. अहेरी तिघांना अटक करण्यात
 आली आहे. आष्टी-चामोशी वाहनातून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती  प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कोनसरी गावातील एका दुकानासमोर सापळा रचला एमएच 19 बीयू-7860 क्रमांकाचं वाहन संशयास्पद अवस्थेत येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात 19,800 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आढळून आला. यावेळी सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात  रवानगी केली आहे 
सदर माल कुठून आणण्यात येत आहे हे गुलदस्त्यातच आहे


PostImage

Vaingangavarta19

March 25, 2025

PostImage

विनाशकारी लोह प्रकल्पाची पोलखोल टाळण्यासाठी रोखले : बोगस जनसूनावणी विरोधात तक्रार दाखल करणार


 

विनाशकारी लोह प्रकल्पाची पोलखोल टाळण्यासाठी रोखले : बोगस जनसूनावणी विरोधात तक्रार दाखल करणार

शेकाप, भाकप, माकप या डाव्या पक्षांच्या नेत्यांना जनसूनावणीत सहभागी होण्यास पोलिसांचा मज्जाव

गडचिरोली : वडलापेठा येथे प्रस्तावित स्पाॅंज आयर्न प्रकल्प हा जगातील सर्वात उच्च प्रतीचा प्रदुषण निर्माण करणारा प्रकल्प असून तो पाचव्या अनुसूची क्षेत्रातील अनेक तरतूदी धाब्यावर बसवून बेकायदा  पध्दतीने करण्याचा प्रयत्न असून पर्यावरणीय मुद्यांवर आक्षेप नोंदवू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले.

सदर जनसूनावणी ही सर्वांसाठी खुली असतांना केवळ प्रकल्पाची पोलखोल होवू नये यासाठी आम्हाला विविध कारणे सांगून पोलीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनसूनावणी संपेपर्यंत अडवून ठेवले. यापूर्वीही तगडा पोलीस बंदोबस्त लावून जनसूनावणीत सहभागी होण्यासाठी आम्हाला रोखण्यात आलेले होते. त्यामुळे या अशा बोगस जनसूनावण्यांच्या विरोधात वरिष्ठ स्तरावर लवकरच सविस्तर तक्रार दाखल करुन न्याय मागण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ.अमोल मारकवार यांनी दिली असून हुकूमशाही पध्दतीने घेतलेल्या  जनसूनावणीचा निषेध केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 25, 2025

PostImage

शाळा व्यवस्थापन समिती जयनगर यांनी शाळेला ताला ठोको आंदोलन केले सुरू 


शाळा व्यवस्थापन समिती जयनगर यांनी शाळेला ताला ठोको आंदोलन केले सुरू 


चामोर्शी:-
तालुक्यातील जयनगर शाळेतील 
मुख्याध्यापक व विषय शिक्षिका  यां दोन्ही शिक्षकांना बळतर्फ करण्यासाठी जयनगरच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापक समिती व गावकऱ्यांच्या पुढाकाराने आज मंगळवार दि.25.03.2025 पासून शाळेला ताला ठोको आंदोलनाला सुरवात केली आहे .

मुख्याध्यापक , विशेष शिक्षिका यांना जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन यांना बडतर्फ करणार नाही.तोपर्यंत जयनगर शाळेला तालाबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा व्यवस्थापन समितीने संकल्प केलेला आहे.

या ताला बंद आंदोलनाला अनेकांनी. आपला पाठिंबा सुध्दा दर्शविलेला  असून आंदोलन  तीव्र होण्याच्या मार्गावरती  असल्याचे सांगितले जात आहे

 प्रसंगी न्याय न मिळाल्यास आंदोलन रस्त्यावर येऊन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे


PostImage

Vaingangavarta19

March 25, 2025

PostImage

महागाव येथे जागतिक क्षयरोग दीनानिमीत्य विशेष मार्गदर्शन


महागाव येथे जागतिक क्षयरोग दीनानिमीत्य विशेष मार्गदर्शन 

 

महागाव (अहेरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे माजी सरपंच विनोद वेलादी होते, तर ग्राम पंचायत सदस्य राजेश दुर्गे आणि महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, आरोग्य सहायीका शीतल डोंगरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

डॉ. लुबना हकीम यांनी क्षयरोगाच्या लक्षणे, प्रसार मार्ग आणि उपचार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. त्याची लक्षणे म्हणजे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, संध्याकाळी ताप येणे, रात्री घाम येणे इत्यादी आहेत. उपचार न केल्यास हा रोग इतरांना पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे उपचार घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रमात क्षयरोगावर यशस्वीपणे मात केलेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. सत्कारित रुग्णांमध्ये जनाबाई अलोने, कोंडाया हिरवकर, वसंत तोरण, संतोष आलम, पापाया आत्राम, पार्वती आत्राम आणि मंगेश पेंदाम यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभवांनी इतरांना आशा आणि प्रेरणा दिली.

या कार्यक्रमाला  आरोग्य साहायीका घोगे , आरोग्य साहायीका शितल डोंगरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि इतरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे गावात क्षयरोगाविषयी जागरूकता वाढली असून, रुग्णांना योग्य उपचार मिळविण्यास मदत झाली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025

PostImage

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष पदी कालिदास बन्सोड यांची निवड


राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष पदी कालिदास बन्सोड यांची निवड.

 

तालुका प्रतिनिधी चामोर्शी..

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी नेताजी सोंदरकर तर वडसा तालुका अध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले, कुरखेडा तालुका अध्यक्षपदी रुपालीताई कावळे, ब्रम्हपुरी ता, अध्यक्षपदी अंकुश कांबडी, चामोर्शी तालुका अध्यक्षपदी कालिदास बन्सोड यांची  एकमताने निवड...
चामोशी तालुक्यातील मौजा घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकारणीची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत वडसा येथील  नेताजी सोंदरकर उपसरपंच ग्रामपंचायत गांधीनगर यांची संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली,,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यासाठी सोंदरकर पूर्णवेळ कार्य करणार व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी नेताजी सोंदरकर गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना विदर्भ कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.तर त्यांच्या नेतृत्वामध्ये वडसा तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्षपदी अंकुश कांबडी, कुरखेडा तालुका अध्यक्षपदी रूपालीताई कावळे,
यांची निवड करण्यात आली आहे व चामोर्शी तालुका अध्यक्षपदी कालिदास बन्सोड यांची नियुक्ती एकमताने करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने कालिदास बन्सोड गेल्या अनेक वर्षापासून दैनिक वृत्तपत्रात आपल्या कार्यतत्पर लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेच्या चामोर्शी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे याबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे,राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, जिल्हा संघटिका अनिता रॉय, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे, , कृष्णा वाघाडे, नानू भाऊ उपाध्ये, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विशाखा सिन्हा,शरीफ शेख, किशोर देवतळे, दिनेश मुजुमदार,सुमेन विस्वास, विकास मैत्र, सरपंच कृष्णा मंडल, उपसरपंच प्रकाश सरकार यांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025

PostImage

हवाई दौरे करणारे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार काय ? काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सवाल


हवाई दौरे करणारे पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार काय ?

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सवाल


गडचिरोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पन्नासहून अधिक नागरिकांचे नाहक बळी गेले. मात्र गडचिरोली जिल्ह्यास स्टील हब बनविण्याचा संकल्प करणारे राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री केवळ हवाई दौऱ्यावर भर देत असून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार काय असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे. ब्राम्हणवाडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोलीस स्टिल हब बनविण्याच्या नावाखाली परप्रांतीयांनाच मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला जात आहे. येथील भुमीपूत्रांची रोजगाराच्या नावावर फसवणूक केल्या जात आहे. राज्याची सुरवात गडचिरोली पासून होईल अशी ओळख आम्ही निर्माण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता तर गडचिरोलीला दोन पालकमंत्री मिळाले आहेत. पण ते हेलीकॉप्टर ने एखाद्यावेळी येतात अनं इव्हेंटसारखे कार्यक्रम राबवितात. येथील बळीराजांचे अश्रू पुसण्यासाठी ही मंडळी गडचिरोली जिल्यातील शेताच्या बांधावर जाणार का असा सवाल गडचिरोली जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विचारला आहे.
गडचिरोली जिल्हयात सध्या नागरिकांना, बेरोजगारांना, आदिवासी बांधवाना व बळीराजाला मोठया समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हत्तीच्या कळपाने तर हैमान घातला आहे. पिकांचे व घरांचेही ते मोठे नुकसान करीत आहेत. नुकतेच तालुक्यातील आरमोरी सुर्यडोंगरी येथील लालाजी मेश्राम यांच्या शेतात हत्तीच्या कळपाने मका पिकाची मोठी नासधूस केली. शेतात असलेली बोअर मशीनही त्यांनी उध्वस्त केली. पण सत्ताधाऱ्यांना याचे काही देणेघेणे नाही. केवळ फॅशन म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घ्यायचे. अनं एखादी वेळी इव्हेंट राबविण्यासाठी हेलीकॉप्टरने येथे यायचे व निघून जायचे असा उपक्रम सध्या सुरू आहे. आता तर जिल्हयाला सहपालकमंत्री लाभले आहेत. पण त्यांनी देखिल हाच फंडा वापरणे सुरू केला आहे. त्यांच्याकडून अपेक्षा करणे गैर आहे असेही ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.

 


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025

PostImage

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरण्यात यावीत -पवण रामगीरकर 


आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरण्यात यावीत -पवण रामगीरकर 

 


आष्टी:-
 येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था अध्यक्ष तथा रुग्णकल्यान समिती सभासद  पवन रामगिरकर यांनी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ  माधुरी किलनाके गडचिरोली यांनी २१/०३/२०२५  ग्रामीण रुग्णालय आष्टी  येथे भेट दिली तेव्हा आष्टी ग्रामीण रुग्णालया बाबतीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पवण रामगीरकर यांनी तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर , बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ याची ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे गेल्या काही वर्षापासून अभाव आहे तरी या पदावरती लवकरात लवकर बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ यांची तात्काळ ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली , यावेळी ग्रा. रु. अधीक्षक डॉ. ऋषिकेश बरडे , शंकर पाटील मारशेट्टीवार, कुळमेथे साहेब आदी सह कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025

PostImage

आशा वर्कर म्हणजे समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा- डॉ लूबना हकीम


आशा वर्कर म्हणजे समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा- डॉ लूबना हकीम

आशा दिनानिमित्त आशा वर्करांचा सत्कार
विविध स्पर्धांचे आयोजन

अहेरी :-
     आरोग्य विभाग आणि समाज यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे आशा वर्कर असून त्यांच्या सेवा,समर्पण आणि कार्य यामुळेच समाजात वैद्यकीय सेवा देणे सोयीचे होते म्हणून त्या वैद्यकीय सेवेतील अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन महागाव आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम यांनी केले. यावेळी कल्याणी नैताम बीसीएम,भारती गोगे एलएचवी आणि श्रीकांत चव्हाण बीसीएम मुलचेरा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
   राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील कन्यका मंदिर येथे आयोजित आशा दिना निमित्त त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. पुढे डॉ हकीम म्हणाल्या की आशा वर्कर यांनी आपल्या कार्याने आणि परिश्रमाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचे स्तर उंचावत आहे त्यांच्यामुळे कार्य आणि सेवा अनमोल असून त्यांनी आपल्या कार्याने न केवळ आरोग्य सेवा सुलभ केल्या तर समाजात आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सेवेविषयी मानसिकता आणि विश्वासहर्ता निर्माण केली. आशा वर्कर म्हणेच फक्त नावातच आशा नसून आरोग्य विभाग आणि समाज यांच्या मधातील आशा आहेत.
  यावेळी उत्कृष्ट कामगिरी बद्दल आशा वर्कर यांच्या सन्मान करण्यात आला. उमा चाकूरकर यांना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार,राजुबाई पुल्लूरवार यांना द्वितीय पुरस्कार मिळाला,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आशा वर्कर ज्योतिका तलांडे,हर्षा गर्गम,सरिता आत्राम,आलापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आशा वर्कर छाया उराडे,आशा सातारे यांच्यासह जिमलगट्टा येथील दोन,देचलीपेठा येथील दोन,कमलापूर येथील तीन, पेरमिली येथून तीन आशा वर्कर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025

PostImage

मोहफुले संकलनासाठी जंगलात गेलेल्या महीलेचा वाघाने घेतला नरडीचा घोट 


मोहफुले संकलनासाठी जंगलात गेलेल्या महीलेचा वाघाने घेतला नरडीचा घोट 

– घटनास्थळी बघ्यांची झुंबड, वाघ तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून


गोंदिया / अर्जुनी (मो) , दि. २३ : मोहफुले संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची थरारक घटना रविवारी (दि. २३) रोजी सकाळी शिवरामटोला येथे घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुसया धानु कोल्हे (वय ५०) , रा. शिवरामटोला असे मृत महिलेचे नाव आहे.
अनुसया कोल्हे सकाळी गावाशेजारील वनविकास महामंडळाच्या जंगलात (कक्ष क्र. 332) मोहफुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर मागून झडप घातली. वाघाने तिला तब्बल १०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि ठार केले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. आश्चर्याची बाब म्हणजे वाघ तब्बल तीन तास मृतदेहाजवळ बसून होता. त्यामुळे नागरिकांना वाघाचे थेट दर्शन झाले. वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्नांनंतर वाघाला जंगलात परतवले. मात्र, तो पुन्हा घटनास्थळाच्या आसपास फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेमुळे शिवरामटोला गावात शोककळा पसरली असून, वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहिम सुरू केली असून, नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 23, 2025

PostImage

आष्टी ग्रापंच्या उपसरपंचदी रेश्मा फुलझेले


आष्टी ग्रापंच्या उपसरपंचदी रेश्मा फुलझेले

 

आष्टी. आष्टी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी (दि.19) ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी रेश्मा जमनदास फुलझेले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आष्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर यांची शासकीय नोकरीत नियुक्ती झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त होते. उपसरपंच पदासाठी रेश्मा फुलझेले यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून आष्टीचे मंडळ अधिकारी व्ही. ना. ढोरे, तलाठी सचिन गुरूनुले यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी लिलाधर मिसार, सरपंच बेबी बुरांडे, ग्रापं सदस्य राकेश बेलसरे, कपिल पाल, संतोष बारापात्रे, दिवाकर कुंदोजवार, छोटू दुर्गे, आशिष बावणे, लाजवंती औतकार, विद्या जुनघरे, पूनम बावणे, वैशाली आंबटकर यांची उपस्थिती होती


PostImage

Vaingangavarta19

March 23, 2025

PostImage

अहेरी पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक शांतता व सलोखा राखण्याचे एसडीपीओ कोकाटे यांचे आवाहन


अहेरी पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक
शांतता व सलोखा राखण्याचे एसडीपीओ कोकाटे यांचे आवाहन

 

 

अहेरी:- अहेरी पोलीस स्टेशन येथे शनिवार 22 मार्च रोजी सर्वधर्मीय जातीय सलोखा राखण्यासाठी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
     सदर शांतता बैठक अहेरी पोलीस स्टेशनच्या सभागृहात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी  पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार होते.
     या प्रसंगी एसडीपीओ अजय कोकाटे यांनी, येणारे दिवस हे रमजान ईद व अन्य सणासुदीचे असून सर्वांनी ईद व अन्य विविध सन व उत्सव एकोप्याने साजरे करून जातीय सलोखा व शांतता राखण्याचे आवाहन केले आणि सामाजिक स्वास्थ बिघडू नये यासाठी विविध उदाहरणासहित महत्त्व पटवून दिले.
     याचवेळी पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी, आपला देश विविधतेने नटलेला असून एकात्मता, प्रेम, बंधुता हे कायमचे टिकून राहणे काळाची गरज असून यातून एकतेची झालर दिसून येते आणि कोणताही जातीय भेदभाव न करता या पृथ्वीतलावर सर्वांचे रक्त लाल असून केवळ स्त्री आणि पुरुष हे दोनच जाती आहेत, त्यामुळे भेदभाव, श्रेष्ठ-कनिष्ठ न ठेवता प्रत्येकानी गुण्यागोविंदाने व सौहार्दपणे नांदण्याचे मोलाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी केले. 
   विशेषतः समाज माध्यमात (सोशल मिडिया) कोणतेही अफवा पसरविण्याचे , विनाकारणचे व नकारात्मकता पडसाद उमटतील असे संदेश पोस्ट कुणीही करू नये आज सर्व यंत्रणा विकसित झाली असून चुकीचे , सामाजिक स्वास्थ बिघडविणारे सोशल मीडियात पोस्ट झाल्यास  त्याला फॉलोअर्स करणारे सर्व साखळी लगेच सापडतात त्यामुळे सर्वांनी सावधगिरी व दक्षता बाळगण्याचेही आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.
    या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम, शाहीन हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगर सेवक अमोल मुक्कावार, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, रवि नेलकुद्री, कैलास कोरेत, संतोष मद्दीवार, सेवा निवृत्त मुख्याध्यापक शफीक शेख, तालीफ सैय्यद, मखमूर शेख आदी व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 22, 2025

PostImage

कोनसरी येथे वीज पडून शेड्या राखणाऱ्या इसमाचा मृत्यू


कोनसरी येथे वीज पडून शेड्या राखणाऱ्या इसमाचा मृत्यू

आष्टी:-

शेळ्या चराईसाठी गेलेल्या इसमाचा वीज पडुन मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी 4 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे घडली. शंकर शिंपतवार (45) रा. उमरी असे मृतकाचे नाव आहे.
उमरी येथील शंकर शिंपतवार हे शेळ्या चराईसाठी कोनसरी लगतच्या जंगल परीसरात गेले होते.  संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटसह पावसाला सुरवात झाली. अचानक यावेळी शंकर यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच तलाठी नाईक व कोनसरी बिटचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधीक तपास सुरू आहे


PostImage

Vaingangavarta19

March 22, 2025

PostImage

शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुसज्ज करून आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने अधिक निधी खर्च करावा--- खा डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी


शासकीय रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुसज्ज करून आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने अधिक निधी खर्च करावा--- खा डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी

गडचिरोली :: केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाकरीता  95,957 कोटी रुपयाची तरतूद केली असून त्यापैकी 9,406 कोटी रुपयाची तरतूद फक्त आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता करण्यात आली आहे.  या योजने अंतर्गत खाजगी रुग्णालयात होणाऱ्या उपचाराबद्दल अनेक वेळा अनियमितता आढळून आली आहे त्याचप्रमाणे महालेखाकारांच्या तपासणीत 300 कोटी रुपयाचा घोटाळा सुद्धा उघडकीस आला आहे. तसेच योजनेअंतर्गत केलेल्या 6.66 कोटी दाव्या पैकी 562.4 कोटी रुपयाचे 2.7 लक्ष दावे खोटे आढळले असल्यामुळे. अशा भ्रष्टाचारयुक्त योजनानवर व जाहिरातीवर शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा, शासकीय रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पात्र डॉक्टरांसह पायाभूत सुविधा व आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासन जास्तीत जास्त खर्च करणार का? जेणेकरून सर्वांना योग्य आरोग्य सेवा मिळण्यासाठी मदत होईल. असा प्रश्न व मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत प्रश्नकाल दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री जगत प्रकाश नड्डा यांचे कडे केली.


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2025

PostImage

ट्राक्टरची ट्राली सोडण्यास पोलीस उपनिरीक्षकाने मागीतली लाच 


ट्राक्टरची ट्राली सोडण्यास पोलीस उपनिरीक्षकाने मागीतली लाच 

अमरावती:- ट्राक्टरची ट्राली सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक याने लाचेची मागणी केली म्हणून त्यांचेवर व वाहण चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
दर्शन पुंडलीक दिकोंडवार,वय -३८ वर्ष, पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, ह्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम ठरलेल्या वेळी न स्वीकारता टाळाटाळ केल्याने सदरहू दोघांवरही अखेर लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याने  अमरावती पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी दि.१२/०३/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१३/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक दर्शन पुंडलीक दिकोंडवार, वय -३८ वर्ष, पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, अमरावती ग्रामिण रा.शिरे लेआउट,चौधरी हॉस्पीटल रोड,अवधुतवाडी,यवतमाळ जि. यवतमाळ यांनी तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे असलेली ट्रक्टरची ट्रॉली सोडुन देण्याकरीता ५००० रूपये लाचेची मागणी केली. तसेच सदर ५,००० रुपये लाच रक्कम सुकेश सारडा याचेजवळ देण्यासाठी सांगितले. त्यावेळी सुकेश सारडा याने तक्रारदार यांना सांगितले की, मी तुला फोन केल्यावर येवुन जा.असे बोलुन सदरचे पैसे लाच रक्कम असल्याचे माहीत असताना सुध्दा लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली व दर्शन दिकोंडवार यांस गुन्हा करणेकामी मदत केली.मात्र दि.१३/०३/२०२५ रोजी दुपारी ३/३५ ते ४/४८ वाजेपर्यंतच्या दरम्यान आयोजीत सापळा कार्यवाही बाबत दिकोंडवार यांस तकारदार यांचेवर संशय आल्यामुळे त्यांने तकारदार यांचेकडुन लाच रक्कम ५००० रुपये घेतले नाहीत. त्यामुळे काल दि १८/०३/२०२५ रोजी दर्शन पुंडलीक दिकोंडवार व सुकेश अनिल सारडा या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरूध्द लाचेची मागणी केल्यावरून पोस्टे. नांदगाव खंडेश्वर,अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2025

PostImage

अवैध दारू विक्री विरोधात,महीलांनी गाठले पोलीस स्टेशन


अवैध दारू विक्री विरोधात,महीलांनी गाठले पोलीस स्टेशन 

 

जिवती:- आपल्या गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी चक्क पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे 

जीवती तालुक्यापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असलेल्या गुडसेला या गावात मागील बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. गावातील ज्येष्ठ व्यक्ती कडून दारू विक्रेत्यांना दारु विक्री करु नका असे समजावून सांगितले असता ते ऐकत नाहीत. गावात अशांतता पसरली आहे. दारूचे दुकान हे सार्वजनिक हातपंपाचे बाजूला असून तळीराम हे दुकानातून बॉटल घेऊन हातपंप वर येऊन दारू ढोसतात 

तेथेच महिला, मुली पाणी भरण्यास आलेल्या असताना त्यांना बाजूला व्हावे लागते. जर एखाद्या महिलेने तेथे दारू पिण्यास विरोध केला तर दारू विक्रेता म्हणतो की हा हातपंप माझ्या जागेत आहे. हातपंप करिता मी जागा दिली आहे. मी काही करू शकतो. माझ्या मालकीचा हातपंप आहे. असे म्हणत महिलांना अश्लील शिवीगाळ करतो. याच्या गुंड प्रवृत्ती मुळे कोणी महिला पुढे जात नाहीत. मात्र बहुतांश लोकांचे संसार दारूच्या पुरात वाहून जात आहेत. आणि गावातील अल्पवयीन पिढी बिघडत जात आहे हे पाहून महिलांनी पुढाकार घेऊन पोलिस स्टेशन जिवती येथे ठाणेदार यांना निवेदन देऊन ही अवैध देशी दारू बंद करण्याची विनंती केली. यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.आता पोलीस काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे 


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2025

PostImage

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला काठीने प्रहार, पती जागीच ठार 


पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला काठीने प्रहार, पती जागीच ठार 

भामरागड तालुक्यातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

भामरागड:- 
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने काठीने प्रहार केला तेव्हा पती जागीच ठार झाल्याची घटना भामरागड तालुक्यातील दोबुर गावात घडली 
भामरागड तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर गटग्रामपंचायत मिरगुळवंचा अंतर्गत येत असलेल्या दोबूर या गावाचा समावेश आहे. दोबूर येथील प्रीतम बहादूर एक्का  वय ५० वर्षे याला त्याची पत्नी मानती प्रीतम एक्का  वय ४० व मुलगा जोसेफ प्रीतम एक्का वय २२ यांनी काठीने मारहाण केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रीतम एक्का हा नेहमी मद्यप्राशन करून कुटुंबीयांना त्रास द्यायचा. शारीरिक छळ करायचा. याबाबत २०२२ साली त्याचावर दोन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी मृतक प्रीतम हा स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्यासाठी आरेवाडा येथे गेला होता. त्यानंतर दुपारी तो १२ वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करून घरी परतला. यावेळी त्याची पत्नी घरी जेवायला बसली होती. दरम्यान, घरात धिंगाणा घालून तो पत्नीला मारायला गेला.  त्यामुळे चिडून जाऊन पत्नीने लाकडाने त्याच्यावर वार केला. नंतर मुलानेही वार केला. यात प्रीतमचा मृत्यू झाला. सध्या तेंदू हंगामाच्या बेलकटाईचे काम सुरू असल्याने गावातील बहुतांश नागरिक बेलकटाईकरिता जंगलात गेले होते. त्यामुळे प्रीतमची आई मानकुवारी बहादूर एक्का (६५) ही शेतात बेलकटाईला गेली होती. ती घरी परतल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तोपर्यंत प्रीतमची जीवनयात्रा संपली होती. यासंदर्भात मंगळवार, १८ मार्च रोजी सकाळी भामरागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रीतमची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास भामरागडचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2025

PostImage

आश्रमशाळेतील शिपाई यांचे आढळले तलावात मृतदेह


आश्रमशाळेतील शिपाई यांचे आढळले तलावात मृतदेह 

मार्कंडादेव येथील आश्रम शाळेत होते कार्यरत 

स्वगावातील मुरखडा (चक) तलावात मृतदेह 

आष्टी :-
मार्कंडा देव येथील आश्रम शाळेत कार्यरत शिपाई हे रात्रीच्या सुमारास कुटुंबीयांना शौचास जातो म्हणून घराबाहेर पडले मात्र  दुसऱ्या दिवशी तलावात मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी (दि.17) ला सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (चक) येथे येथे उघडकीस आली आहे मृतकाचे नाव तुमदेव पिटाले  वय ५७, रा. मुरखळा (चक) असे  आहे.

मृतक तुमदेव पिटाले हे चामोर्शी तालुका मुख्यालयांतर्गत असलेल्या मार्कंडादेव येथील आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. ते तालुका मुख्यालयालगत असलेल्या मुरखळा (चक) या आपल्या स्वगावावरुनच कर्तव्य बजावित होते. दरम्यान, रविवारी
पहाटे 3 वाजताच्या सुमारास शौचास जातो म्हणून ते घराबाहेर पडले. मात्र, सकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थानी सोमवारी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावालगतच असलेल्या तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठूत पंचनामा केला. याप्रकरणी चामोर्शी पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2025

PostImage

मंगळसूत्र चोरांच्या" हल्ल्यात जखमी हेमंत गावंडेचा “मृत्यू”... रेल्वे पोलिस करतात तरी काय?


“मंगळसूत्र चोरांच्या" हल्ल्यात जखमी हेमंत गावंडेचा “मृत्यू”... रेल्वे पोलिस करतात तरी काय?

 


अकोला : अकोला रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर एका महिलेच्या गळ्यातील "मंगळसूत्र हिसकावून" पळ काढणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करीत असताना त्या चोरट्याने पळणे थांबवून उलट पाठलाग करणाऱ्या महिलेच्या पतीवरच प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात तो इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच काल सायंकाळच्या सुमारास त्या दुर्दैवी व्यक्ती हेमंत गावंडेचा मृत्यू झाला असून झालेल्या घटनेमुळे रेल्वे पोलिसांविरुद्ध जनसामान्यांच्या "भावना तीव्र" झाल्या आहेत.पत्नीच्या गळ्यातील "मंगळसूत्र" हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण "चेहरा दगडाने ठेचून" काढल्याचा जीवघेणा प्रकार काल रात्री घडला होता. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरातीलच ही घटना घडली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता.

त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी ह्या मंगळसूत्र चोरट्यांचा "पाठलाग" केला. याच दरम्यान चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगडानी ठेचून काढण्याचा "अंगावर शहारे" आणणारा प्रकार काल रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरातच रेल्वे पोलिसांच्या "बेफिकिरी" वृत्तीने घडला होता. हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना "सर्वोपचार" मधून अकोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने सुरू असलेल्या उपचारांना प्रतिसाद न दिल्याने "निष्पाप व निर्दोष" हेमंत गावंडेची प्राणज्योत मालवली आहे.हेमंत गावंडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने रेल्वे पोलिसांच्या "बेजबाबदार" आणि "कामचोरी" चा विषय ऐरणीवर आला असून ही घटना घडली त्यावेळी ज्यांची "ड्युटी" स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर होती ते खरेच त्यांची ड्युटी करत होते का.? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील गावात अल्पवयीन मुलीवर केला दोघा नराधमांनी अत्याचार


गडचिरोली जिल्ह्यातील गावात अल्पवयीन मुलीवर केला दोघा नराधमांनी अत्याचार 

कुरखेडा:-
तालुक्यातील बेलगांव येथील एका अल्पवयीन मुलीवर दोघ्या नराधमांनी अन्याय अत्याचार करून अब्रु लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे अल्पपवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून त्याच गावातील दोघावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी जेल मधे करण्यात आली. दि. १५ मार्च २०२५ दुपारी दोन चे सुमारास बेलगांव येथील अनु. जातीची अत्यवयीन मुलगी दुकानात चॉकलेट घेण्याकरीता गेली व घराकडे जातांना याच गावातील भावेश राजु कोरेटी वय २४ वर्ष व कोरेटी मोरेश्वर नामदेव कोरेटी वय २४ वर्ष या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून छेडछानीकरून नालीवर झोपवले व तिच्यावर बळजबरीने अन्याय अत्याचार केला. ९ व्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून व प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या बनायानुसार कुरखेडा पोलीसांनी भावेश व मोरेश्वर यांच्या विरोधात कलम ७४,३ (५) व पोस्को अर्तगत कलम ८ व १२ अर्तगत गुन्हा दाखल करून आता त्या दोघाची रवानगी कारागृहात करण्यात आली असून गावात शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्रा वाघ गावात बैठका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील शबरी विकास महामंडळाचा लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


गडचिरोली जिल्ह्यातील शबरी विकास महामंडळाचा लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


गडचिरोलीः बरोजगार युवकास वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी त्याच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कंत्राटी लेखापालस रंगेहाथ पकडून अटक केली आहे रुपेश वसंत बारापात्रे (४०) असे आरोपी लेखापालाचे नाव आहे

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता युवक हा देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी असून, त्याला माल वाहतुकीकरिता वाहन खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्याने गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे अर्ज केला. त्याअनुषंगाने तक्रारकर्त्यास १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याकरिता कार्यकारी लेखापाल रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापक हर्षल बोरोले यांच्या नावाने १२ मार्चला ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रुपेश बारापात्रे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे यास रंगेहाथ पकडून अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजेश पद्मगिरवार, पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025

PostImage

स्वतःहाच्या  मुलाचा विचार न करता त्याने केली  गळफास घेऊन आत्महत्या 


स्वतःहाच्या  मुलाचा विचार न करता त्याने केली  गळफास घेऊन आत्महत्या 


धानोरा:-
 तालुक्यातील विवाहित तरुणाने आपल्या मुलाचा भविष्यात काय होईल याचा विचार न करता गळफास घेऊन आपली संपविली जीवनयात्रा ही घटना धानोरा तालुक्यातील येरकड येथे घडली 
पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून निघून गेल्याने आणि तिचा इतरत्र कुठेही शोध न लागल्याने ही बाब त्याला खटकत होती त्यामुळे शीलवंत आनंदराव सहारे वय 27 वर्षे राहणार येरकड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील येरकळ येथील शीलवंतआनंदराव सहारे व 27 वर्ष याची पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून अचानक निघून गेली मात्र ती आपल्या माहेरी पोहचली नाही इतरत्र कुठे शोध घेतला असता तिचा पत्ता लागला नाही. मात्र ही बाब शीलवंत आनंदराव सहारे यांनी मनावरती चांगलीच घेतल्याने त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आल्याने त्याने 15 मार्च रोजी आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. शीलवंत सहारे यांनी नैराशेतून आत्महत्या केली असावी असे जनतेमधून बोलले जात आहे. मात्र आत्महत्या मागचे स्पष्ट कारण सखोल चौकशी केल्यानंतरच कळेल.अधीक तपास पोलीस करीत आहेत 


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025

PostImage

गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक येथेच मुद्देमालासह केली अटक


गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक येथेच मुद्देमालासह केली अटक 


चिमूर:-
अमली पदार्थ गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक परिसरात रंगेहाथ अटक केल्याची घटना चिमूर बसस्थानकावर काल दि १६ मार्च ला घडली यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. वहीद अब्दुल रहीम (वय अंदाजे ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, वहीद अब्दुल रहीम हा चिमूर बसस्थानकावर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कथ्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात १९६४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी पंच, फोटोग्राफर आणि मापारी यांच्या समक्ष गांजा जप्त केला आणि आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू आणि नयोमी साटम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा अतिरीक्त कार्यभार चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष बाकल, स.पो.नि. निशांत फुलेकर, स.पो.नि. मल्हारी ताळीकोटे, पो.उपनि. दत्ताहरी जाधव, सहाय्यक फौजदार विलास निमगडे, सचिन खामणकर, भरत घोळवे, सचिन साठे, कुणाल दांडेकर, सोनू एलकुचेवार यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

आरोपी वहीद अब्दुल रहीम याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर हे करत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025

PostImage

लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळीला  वनविभागाने केले जेरबंद


लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळीला  वनविभागाने केले जेरबंद 


एटापल्ली,
पुष्पा स्टाईल ने लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळीला वनविभागाने तत्परतेने जेरबंद केले आहे

एटापल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत हालेवारा उपक्षेत्रातील जिजावंडी हे गाव छत्तीसगड सिमालगत असुन दिनांक 12/03/2025 रोजी रात्रीस C.G.08 AV 3294 क्रमांकाचे 16 चाकी ट्रक लाकडानी भरून छत्तीसगडच्या इरपनार मार्गे दुर्ग येथे जात असल्याचे वनविभागास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे वनविभागाचे अधिकारी यांनी त्वरीत सापळा रचुन ट्रक अडविला. चौकशी अंती अवैध मार्गाने जंगलातुन सेमल प्रजातीचे लाकडे विनापरवाना वाहतुक होत असल्याचे निष्पन्न झाले असता ट्रक वनपरिक्षेत्र कर्यालय, एटापल्ली येथे आण्याचा पर्यंत केला परंतू ट्रक मध्ये बिघाड झाल्याने वाहण हलविता आले नाही. वनाधिकारी यांनी ट्रक दुरुस्तीचा पर्यंत केले असता यश आले नाही. सदरचे घटना स्थळ हे अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात असल्याने वनाधिकारी हे त्या रात्री जवळच असलेल्या पिपली (बुर्गी) येथे मुक्कामी थांबले मात्र त्याच रात्री छत्तिसगड राज्यातुन जवळ-जवळ 50 ते 60 इसम येऊन ट्रक जबरदस्तीने छत्तिसगड राज्यात पळविला असता दिनांक 15/03/2025 रोजी पाहाटे 05.00 वाजेपासुन वनविभागाच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करीत छत्तिसगड राज्यातील पाखांजुर येथुन ट्रक जप्त करुन पाखांजुर पोलीस विभागाच्या मदतीने वनपरिक्षेत्र कार्यालय, एटापल्ली येथे आणण्यात आला. घटनेतील आरोपी मिहीर निमाई विस्वास, अनादी मिस्त्री रा. पाखांजुर, शांती अरविंद दत्ता, बप्पी दत्ता, रा. विकासपल्ली हे फरार असून वरील गुन्हा गावकऱ्यांचा संगनमताने घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.


सदरचा तपास  उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग शैलेश मीना यांचें मार्गदर्शनात  दिपक रामटेके, सहाय्यक वनसंरक्षक भामरागड, निलीमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली क्षेत्र सहाय्यक,  प्रदीप गेडाम, भगवान नागोसे, श्रीनीवास आडे, ओमप्रकाश धात्रक, वनरक्षक  राजेश्वर देशमुख, सचिन तोराम, कवि भांडेकर कैलाश मडावी, सुजाता अडगोपुलवर, यांनी पुर्ण केला असुन फरार आरोपींचा शोध सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025

PostImage

बसमधून दारुची तस्करी करणाऱ्या दोन महीला व एका पुरुषाला पोलीसांनी पकडले रंगेहाथ


बसमधून दारुची तस्करी करणाऱ्या दोन महीला व एका पुरुषाला पोलीसांनी पकडले रंगेहाथ 

 

आष्टी पोलिसांनी पकडली ५३ हजाराची दारु 


आष्टी (प्रतिनीधी)##  गोंडपिपरी कडून आष्टी येथे येणाऱ्या  ट्रॅव्हल मधून प्रवास करणाऱ्या   दोन महिला व एका पुरुषाला आष्टी येथे बस स्टॉपवर उतरले असता त्यांच्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली.  त्यात इंग्लिश दारूच्या बॉटल आढलून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. ही घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. 
आरोपी १)सुनील प्रभाकर झोडे , वय ५२ वर्षे , रा. चंद्रपूर याच्या कडून दोन लिटर चे चार आर.एस.चे बंपर , किंमत १० हजार रुपये. २) सपना कैलास बोदलवार , वय ३५ , रा.चंद्रपूर हिच्या पिशवीत आय.बी.कंपनीच्या पाच बंपर जप्त केले.किंमत १२हजार ५०० रुपये.३) रंजना अशोक कोंडावार , वय ४० , रा. चंद्रपूर हिच्या पिशवीची झडती घेतली असता आर.एस. कंपनी च्या पाच बंपर सापडले , किंमत १२ हजार ५०० रुपये तर कुनघाडा (ठाकरी) येथील.४) भूमलिंगण सुनगोरवार याचे कडून एक पेटी देशी दारु व ५० लिटर मोहफुलाची दारु जप्त करण्यात आली.किंमत १८ हजार रुपये. 
सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील कारवाही पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. होळीच्या सणानिमित्त आठ दिवसांपासून  वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून अवैध दारु वाहतूक होत आहे त्यावर अंकुश घालण्याचे काम सुरू आहे त्यामुळे दारु तस्करी करणाऱ्या लोकांची धाभी दनानली आहे 


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025

PostImage

चामोर्शी येथे भजन स्पर्धा, पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार


 

चामोर्शी येथे भजन स्पर्धा, पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार 

चामोर्शी:-

हनुमान मंदिर, साधुबाबा कुटी चामोर्शी जि. गडचिरोली येथे जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था, तालुका कुणबी समाज संघटना, महिला कुणबी समाज संघटना, कृतिशील महिला बचत गट चामोर्शी द्वारा आयोजित संत तुकाराम महाराज (वैकुंठ गमन) निमित्त भजन स्पर्धा पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार समारंभ कार्यक्रमात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सत्कार स्वीकारून मार्गदर्शन केले.
  यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, अँड.संजयराव ठाकरे, प्रा.डॉ.विठ्ठलराव चौथाले, गंगाधर पाल, आनंदरावजी लोंढे, प्रा.सजय मस्के, दिलीप गौरकर, अतुल येलमुले, डॉ.सौ.वंदना चौथाले, सौ.ममता गौरकर, सौ.छायाताई भोयर, रजनीकांत मोटघरे, रूपेश टिकले पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025

PostImage

दोन दुचाकींची धडक तिघे जण जखमी


दोन दुचाकींची धडक तिघे जण जखमी 


आष्टी -
             दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने तिघे जण जखमी झाल्याची घटना आष्टी येथील चामोर्शी मार्गांवर दिनांक 16 मार्च रवीवारी दुपारच्या सुमारास घडली.

     होमेश अलगमकर वय 23 वर्ष रा. उमरी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली, सुरेश दासरवार वय 26 रा. सोमनपल्ली तालुका चामोर्शी, रमेश झाडे वय 60 रा. आष्टी तालुका चामोर्शी असे जखमींची नावे आहेत.


  सविस्तर वृत्त असे की, होमेश अलगमकर व सुरेश दासरवार हे दोघे मित्र दुचाकीने आष्टी कडून उमरीकडे भरधाव वेगाने जात होते तर रमेश झाडे हे आपल्या घरुन मुख्य रस्त्यावर दुचाकीने निघत होते यावेळी दोन्ही दुचाकी ची एकमेकाला धडक बसली. व तिघेही जण रस्त्यावर पडले यात सुरेश दासरवार याची प्रकृती चिंताजनक असुन होमेश अलगमकर व रमेश झाडे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जख्मीवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025

PostImage

 आष्टी येथील एका अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू


 आष्टी येथील एका अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू

आष्टी, 

आष्टी येथील वॉर्ड क्रमांक-2 मध्ये वास्तव्यास असलेल्या 24 वर्षीय अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रागिणी गलबले (24, रा. आष्टी ता. चामोर्शी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मृत रागिणी गलबले हिचे आई-वडील बालपणीच मरण पावले. आष्टी हे तिच्या मामाचे गाव असल्याने ती आष्टी येथेच वास्तव्यास राहायची. ती भांडेधुणी व इतर मोलमजुरीची कामे करायची. शनिवारी सकाळच्या सुमारास ती राहत असलेल्या लीना गोंगले यांच्या घरी मृतावस्थेत

आढळून आली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसले तरी तिच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तिचा मृत्यू संशयास्पद असून तिचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला


गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

 

 जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके गडचिरोली पोलिसांकडून जप्त

 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.
९ मार्चला गडचिरोली पोलीस दलाने छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या कवंडे येथे पोलिस ठाण्याची उभारणी करण्यात आली. शनिवारी कवंडे येथील पोलीस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलीस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक भरमार बंदूक आढळली. शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला.
त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

 


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025

PostImage

पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांना तलावात जलसमाधी


पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांना तलावात जलसमाधी 

चंद्रपूर:-

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेले पाच युवकांना तलावात जलसमाधी मिळाली ही घटना शनिवारी, १५ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवसी चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

सदर युवक हे चिमूर तालुक्यातील सारगाव कोलारी येथील आहेत, जनक किशोर गावडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजरा बालाजी गावंडे व तेजरा संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या युवकांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन घुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे.
शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाय कोलारी वैधील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाडारी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले, त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावडे यश किशोर गावडे, अनिकेत यशवंत गावडे तेजस बालाजी गावंडे. तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.
सर्व मुले १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.

तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवध्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पाचही मुले उलावातच बुढालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना सारगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

अधिक तपास पोलीस करीत आहेत 


PostImage

Vaingangavarta19

March 15, 2025

PostImage

दोन सख्ख्या मावसभावांचा पाण्यात बुडून मृत्यू


दोन सख्ख्या मावसभावांचा पाण्यात बुडून मृत्यू 

 

यवतमाळ:-  रंगपंचमीच्या  दिवशी दोन मावस भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित दोन भाऊ धुळवडीसाठी पाहुणे म्हणून आले होते. पण धुळवड साजरी करण्याचा उत्साह त्यांना चांगलाच महागात पडला. दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मयत भावंडं इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पण आठ पैकी पाच जण अचानक पाण्यात बुडू लागले. इतर तीन जणांनी कसंबसं स्वतःला वाचवलं. पण दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा मृतदेह अद्याप सापडला नाही.

ही घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर घडली आहे. बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

परिसरात अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह सापडला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 15, 2025

PostImage

 १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू


 १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

 

 

देसाईगंज (गडचिरोली):- सर्वत्र रंगपंचमीचा
 उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतांनाच ऐन सणाच्या दिवशीच देसाईगंज शहरातील एका १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, शुक्रवारी १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अथर्व हिवराज सहारे वय १९ वर्षे, रा. एकता कॉलनी, देसाईगंज, जि. गडचिरोली असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.

आज सकाळच्या सुमारास सर्वत्र एकमेकांना रंग लावून मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. आबालवृद्ध रंगामध्ये न्हाऊन गेले होते. अशातच अथर्व सहारे व काही सहकारी मित्र रंग खेळल्यानंतर अंगावरील रंग काढण्यासाठी देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदी तीरावर आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करीत असतांना अथर्व सहारे खोल पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तोगटांगळ्या खाऊ लागला. सहकारी मित्रांनी आरडा-ओरड केली. त्यातच काही नागरिकांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, अथर्व सहारे खोल पाण्यात गेल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले व पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव शवविच्छेदनाकरीता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. अथर्व सहारे याचे वडील हिवराज सहारे हे गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस विभागात कार्यरत असून अथर्व बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. ऐन सणाच्या दिवशीच अनुचित घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 12, 2025

PostImage

बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या अधिपत्याखाली देण्यात आले पाहिजे 


बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या अधिपत्याखाली देण्यात आले पाहिजे 

आष्टी व अधखोडा येथील बौद्ध बांधवांची मागणी 

गडचिरोली जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठवले निवेदन 

1949 चा ॲक्ट रद्द करा  बौद्ध समाज बांधवांची मागणी


 

आष्टी :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे आष्टी व अनखोडा येथील बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले 

 निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध समाज समितीचा पाठींबा आहे,  देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबे आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे  ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी  बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
     महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले  व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन बौद्ध  समाज समितीने करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर ,  सत्यफुला डोर्लीकर,उत्तमचंद बारसागडे, मंगलदास चापले,सोमा चांदेकर, कैलाश दुर्गे,धनराज बावने,हंसप्रीत राऊत, मंगला अवथरे,गौतमा फुलझेले,निकीता निमसरकार,सुजाता देव्हारे, वैशाली लेगला,गोपीका कुकुडकर, भीमाबाई निमसरकार,आकांक्षा झाडे,राखी मडावी,वर्षा मेश्राम,संध्या बावणे,साहील साखरकर, वैशाली लाकडे, यांच्या सह बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

March 1, 2025

PostImage

बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या! 'बौद्ध अस्मिता रक्षण समिती' सर्कल येनापुर व बौद्ध समाज बांधवाची मागणी ....


बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या! 'बौद्ध अस्मिता रक्षण समिती' सर्कल येनापुर व बौद्ध समाज बांधवाची मागणी ....

 

1949 चा ॲक्ट रद्द करा  बौद्ध समाज बांधवांची मागणी...

उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे निवेदन सोपविले ।

 

चामोर्शी  :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे चामोर्शी    उपविभागीय अधिकारी, यांच्या मार्फतीने बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापुर  व बौद्ध समाज बांधवांनी आज दिनांक 28/02/2025 रोजी उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांना निवेदन दिले.

 निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध अस्मिता रक्षण समितीचा पाठींबा आहे,  देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे  ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी  बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
     महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले  व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनबौद्ध अस्मिता रक्षण समिती करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.  

    निवेदन देताना' बौद्ध अस्मिता रक्षण समितीचे अध्यक्ष काजल मेश्राम , उपाध्यक्ष .राजेंद्र रामटेके ,सचिव  प्रितम घोनमोडे सचिव, महासचिव सुनिल गोर्वधन, . प्रमोद उमरे संघटक ,  मंगलदास चापले (प्रवक्ता ) . आनंद गोडबोले प्रवक्ता ,.अँन्ड. दिनेश राऊत सल्लागार . संतोष मेश्राम ,. परीजन दहिवले कोषाध्यक्ष , .संदेश देवतळे सहसचिव ,गिरीधर उंदिरवाडे,.उत्तमचंद बारसागडे पुरुषोत्तम उंदिरवाडे , अंकुश निमसरकार ,  जितु झाडे , चंद्रशेखर पेटकर ,.रोशन गेडाम .मोरोती अवथरे  सौ.शोभाताई कुरखेडे , सौ. रजनी बारसागडे ,सौ. अल्का रामटेके , सौ. योगीता रामटेके , आदीहस बहुसंख्य बौद्ध उपासक व उपासीका बांधव उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 1, 2025

PostImage

पोलीस हवालदार मंथनवार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू 


 

पोलीस हवालदार मंथनवार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू 

गडचिरोली : कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार (वय ४९) यांचे शुक्रवारी (दि. २८) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

संतोष मंथनवार हे अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी होते. आज सकाळी ते गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर होते. साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना गॅरापत्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंथनवार हे पूर्वी आलापल्ली येथे कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 1, 2025

PostImage

रखडलेले रस्ता बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कंकडालवारांच्या नेतृत्वात आंदोलन


रखडलेले रस्ता बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कंकडालवारांच्या नेतृत्वात आंदोलन.

अहेरी : प्राणहीता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी व अहेरी ते वेंकटरावपेठा रस्त्याचे मंजूर काम बऱ्याच काळवाढीपासून रखडलेले आहे.सदरचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आविसं, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रास्तारोखो आंदोलन केले आहे.

प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी व अहेरी ते वेंकटरावपेठा अशा दहा किमी अंतराच्या रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कंत्राटदारांने कामाची सुरुवात करून रस्ता खोदून ठेवलेला आहे.त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्यावरून दळणवळण करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

संबधित विभाग व अधिकाऱ्यांना सतत निवेदने देऊन रखडलेले रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.मात्र गेली बऱ्याच कालावधीपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यास दिरंगाई करणारे कंत्राटदारांला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्याकडून पुन्हा कामे सुरू असल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी आंदोलन दरम्यान केली आहे.यापूर्वी कंकडालवार यांनी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी करतांना अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून दिला होता.

आज जनआंदोलनची रोष बघून समंधित अधिकाऱ्यांनी मा.तहसीलदार साहेबांना भेट घेऊन उद्या पासून काम सुरु करण्यात येईल अशी सांगितले होते.लवकरात लवकर समंधित कामाला सुरुवात होऊन गती न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा सुद्धा त्यावेळी अजय कंकडालवार यांनी दिले आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलन वेळी माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,सुरेखा आलम,गीता चालूरकार,चायाताई पोरतेट,अशोक रापेल्लीवार,अशोक येलमुले,प्रमोद आत्राम,अज्जू पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,किशोर दुर्गे परिसरातील समस्त नागरिक तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते,पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

संविधान सन्मान महोत्सव : निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन


संविधान सन्मान महोत्सव : निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन

 मुलचेरा :-  नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी अंतर्गत, २४ आणि २५ फेब्रुवारी २०२५ रोजी संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रणजीत मंडल होते. त्यांच्यासोबत डॉ. शनिवारी, डॉ. बाचार, डॉ. वाणी आणि शेंडे  आदी मान्यवर उपस्थित होते. या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची महत्ता आणि त्याचे पालन याबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश होता.
निबंध स्पर्धेत अंतिम वर्षाची कुमारी कामेश्वरी मराठे आणि कु. मेरी डिकोंडा यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटकावले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत कुमारी स्मिता बाला (प्रथम वर्ष) आणि कुमारी सोनाली मंडळ (तृतीय वर्ष) यांनी क्रमशः प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींबद्दल आपले ज्ञान प्रदर्शित केले, आणि त्याच्या अभ्यासातून संविधानाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पिंपळ शेंडे यांनी केले, आणि प्रास्ताविक डॉ. सचिन शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. राय यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी  उपस्थित होते.
या संविधान सन्मान महोत्सव चर्चासत्रात विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयाच्या संपूर्ण कुटुंबाने संविधानाच्या मूल्यांची पुन्हा एकदा महत्त्वाची ओळख करून घेतली आणि त्याच्या पालनासाठी प्रेरणा मिळवली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

पुणम कुथे "राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार-२०२५" ने सन्मानित


 पुणम कुथे "राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार-२०२५" ने सन्मानित


देसाईगंज :-
स्वच्छतेचे जनक, थोर समाजसेवी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील "पहाट फाऊंडेशन" मार्फत दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी रविवारला वर्धमान जैन भवन, शेगाव येथे  "राज्यस्तरीय ग्रामविकास परिषद" आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्रातील क्रीडा, समाजसेवा, सांस्कृतिक, शिक्षण, कला,राजकीय, पर्यावरण अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले व्यक्ती उपस्थित होते. त्या सर्वांना त्यांच्या उत्तम कामगिरी बध्दल मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याचे आयोजक संस्थेने ठरविले होते.

यामध्ये, आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी, मागील १० वर्षांपासून पूर्व विदर्भातील चारही जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थेसोबत मिळून, अनेक लहान मोठे समाजपयोगी उपक्रम राबवित असलेल्या, समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा समाजसेविका - कुमारी.पुनम नानाजी कुथे  यांना "राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार - २०२५"  देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या स्वरूपात सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त असलेले भास्कर पेरे पाटील (ग्रा.पं.पाटोदा, छ.संभाजीनगर), श्वेता परदेशी  ( मिसेस इंडिया विजेत्या) लातूर, आदी नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

विषमतेला बाजूला सारत, समतेचा वसा घेऊन, मानवतेसाठी करीत असलेल्या समाजसेवेच्या कार्याला लक्षात घेत, देश -विदेशातील 50 पेक्षा जास्त नावाजलेल्या संस्थांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कार देऊन कु.पुनम कुथे यांना आजवर सन्मानित केलेले आहे. ह्यामध्ये विशेषतः राज्यस्तरीय आदर्श युवती पुरस्कार, सावित्रिज्योती राज्यस्तरीय पुरस्कार, जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार, युथ आयकॉन अवॉर्ड, नॅशनल बेस्ट युथ सोसियल अवॉर्ड, अश्या 50 पेक्षा जास्त जागतिक स्तरांवरील पुरस्कारांवर यांनी आपले नाव कोरून, गडचिरोली जिल्ह्याची व पोटगाव ह्या लहानशा गावची सामाजिक क्षेत्रात एक वेगळीच ओळख, संपूर्ण देशात निर्माण केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

मुलाचा गळा आवळून केला खून व वडीलाने स्वतःलाही संपविले 


 

मुलाचा गळा आवळून केला खून व वडीलाने स्वतःलाही संपविले 

 

जळगाव:-

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे मुलाच्या छळाला कंटाळून एका माजी सैनिक वडिलांनी आपल्या मुलाचा गळा दाबून खून केला. यानंतर वडिलांनीही आत्महत्या केली. जळगावातील एरंडोलमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे, वडिलांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये असे लिहिले होते की त्यांनी त्यांच्या मुलाची हत्या करून त्याला पुरले आहे. तो मुलगा सोशल मीडियावर रील बनवायचा.

 

मृत वडिलांचे नाव विठ्ठल पाटील (५०) होते, तर मुलाचे नाव हितेश पाटील (२२) होते. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे मूळचे भावरखेडा (एरंडोल) येथील रहिवासी आहेत. ते त्याच्या कुटुंबासह एरंडोल येथील वृंदावन नगर येथे राहत होते. त्यांचा मुलगा हितेश पाटील रील बनवण्याचे काम करायचा. तथापि, तो त्याच्या वडिलांपासून वेगळा राहत होता. तो त्याच्या वडिलांना छळायचा आणि मारहाणही करायचा असे सांगितले जात आहे. या गोष्टीला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या मुलाला मारले आणि नंतर आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पाटील यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की ते त्यांचा मुलगा हितेशला कंटाळले होते आणि त्याने त्याला भावरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ मारले आणि मृतदेह जमिनीत पुरला. गुरुवारी हितेश पाटील यांचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळला. त्याचा मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हितेश पाटील यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथून एक दोरीही सापडली आहे. हितेश पाटीलला या दोरीने फाशी देण्यात आली असावी, असा पोलिसांना संशय आहे. सध्या एरंडोल पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

वासल्याने केला पत्नीवर वार व स्वतःलाही केले गंभीर जखमी


वासल्याने केला पत्नीवर वार व स्वतःलाही केले गंभीर जखमी 


आरमोरी:-
 तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे दिनांक २७/०२/ २०२५ गुरुवार रोजी रात्रीचे अंदाजे १२ वाजताच्या 
सुमारास पतीने पत्नीवर वासल्याने वार केला यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. तर पतीने स्वतःलाही चाकुने भोकसल्याने पती सुद्धा गंभीर जखमी झाला. दोघेही पती पत्नी गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलवल्याची 
माहिती मिळाली आहे. पत्नीवर वार केलेल्या पतीचे ताराचंद येळमे अंदाजे वय ५५ असे नाव आहे.. सदर घटनेची माहिती कोजबी येथील पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी पोलीस स्टेशनला  दिली पोलीस विभाग यांनी लागलीच घटनास्थळावर दाखल होऊन
घटनेच्या पंचनामा सुरू केला आहे. मात्र पतीने पत्नीवर हा एवढा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणाने केला हे मात्र अद्याप कळु शकले नाही.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

एका नायब तहसीलदाराला स्वतःच्या मुलाला कापी पुरविताना पकडले रंगेहाथ !


एका नायब तहसीलदाराला स्वतःच्या मुलाला कापी पुरविताना पकडले रंगेहाथ !

अहिल्यानगर :-

बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना चक्क नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रात घडली 
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची बाब उघड झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

 डोळ्यात अश्रूंचा पाट वडीलाचे शव घरात, जड अंतःकरणाने ती पोहचली परीक्षा केंद्रात


 डोळ्यात अश्रूंचा पाट वडीलाचे शव घरात, जड अंतःकरणाने ती पोहचली परीक्षा केंद्रात!

एका शेतकरी कन्येवर झाला आघात 

 कोठारी :- अचानक झालेल्या वडीलाच्या मृत्यूने मुलीच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहत होता तरीही वडीलाचे शव घरात असताना तिने जड अंतःकरणाने बारावीचा पेपर सोडविला ही घटना कोठारी गावात घडली 
बारावीचा पेपर असल्याने मुलगी रात्रभर अभ्यास करीत होती  वडिलांची तब्येत अचानक बिघडली. बघताबघता विपरीत घडलं वडिलांनी शेवटचा निरोप घेतला. कुटुंबावर फार मोठ्या संकटाच आभाळ कोसळले. दुःख बाजूला ठेवले, वडिलांचा मृतदेह घरी असताना ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांत पाणी आणि थरथरत्या हाताने पेपर सोडविला. घरी पोहचली आणि हरबंडा फोडत दाटलेल्या अश्रृंना मोकळी वाट करून दिली. हे दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावात गुरुवारी हा वेदनादायी प्रसंग घडला. कोठारी येथील रहिवासी लक्ष्मण विरूटकर त्यांना तीन एकर शेती त्यावरच कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवायचे. मोठ्या मुलीचे लग्न झाले. एक मुलगी आणि मुलाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. पण बुधवारची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली.
मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र राबणारा बाप कायमचा सोडून गेला. कुटुंबावर दुःखाचा अस्मानी डोंगर कोसळले. मुलगी परी हिचा बारावीचा जीवशास्त्राचा पेपर होता. अभ्यास करतानाच तिने वडिलांना अखेरचा श्वास घेताना तिने बघितले होते. वडिलांचा मृतदेह घरी आणि दुसरीकडे बारावीचा पेपर. ती द्विधा मनस्थितीत होती तेव्हा तीच्या आईने तीला हिंमत दिली म्हणून तीने परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिले वडिलांनी जगाचा निरोप घेतला हे दुःख बाजूला ठेवून जड अंतःकरणाने न डगमगता थरथरत्या हाताने पेपर सोडवून पेपर सुटताच ती धावतच घरी पोहचली. वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून तिने हंबरडा फोडला आणि लेकीचा आक्रोश बघून उपस्थितांचेही मन गहीवरुन आले  लक्ष्मण विरूटकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कर्ता वडील गेल्याने आता परीवरच घराची जबाबदारी आली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025

PostImage

ट्रकला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार


ट्रकला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार 

आष्टी मार्गावरील उमरीनजीकची घटना

आष्टी (वा.) कोनसरी वरून आष्टीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.27) दुपारी 2 वाजताच्या सुमारास उमरी जवळील जिंनिंग फॅक्टरी जवळ घडली.

अमित एकनाथ चहाकाटे (23) रा. कोनसरी ता. चामोर्शी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मृत युवक अमित हा कोनसरी वरुन विठ्ठलवाडाकडे एमएच 33 वाय 5586 क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. तर आष्टीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या एमएच 33 डब्ल्यू 5560 क्रमांकाच्या ट्रकला उमरी गावानजीक जिंनिंगच्याजवळ असलेल्या वळणावर समोरुन धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे दिला. पुढील तपास आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या! 1949 चा ॲक्ट रद्द करा अहेरी बौद्ध समाज बांधवांची मागणी


बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या!
1949 चा ॲक्ट रद्द करा अहेरी बौद्ध समाज बांधवांची मागणी


तहसीलदार मार्फत राष्ट्रपती कडे निवेदन सोपविले

 

अहेरी:- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे अहेरी तहसीलचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्फतीने बौद्ध समाज बांधवांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले.
    निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून त्यासाठी आमचाही पाठींबा आहे,  देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे  ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी  बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केले आहे.
     महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले  व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन अहेरी तहसीलदार मार्फत भारताचे  राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान , बिहार राज्याचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
    निवेदन देताना बोधीसत्व बहुउद्देशीय  सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे, रामचंद्र ढोलगे , करन दहागावकर, आशिष सूनतकर, प्रकाश दहागावकर, शिवाजी ढोलगे, संदीप ढोलगे, किशोर बुरबुरे, महेंद्र मेश्राम, संजय ओंडरे, रामदास ओंडरे, कपिल झाडे, मलयाजी दुर्गे, कपिल ढोलगे आदी व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात संविधान महोत्सवाचे आयोजन, संविधानावर व्याख्यान


नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात संविधान महोत्सवाचे आयोजन, संविधानावर व्याख्यान

मुलचेरा – नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे संविधान महोत्सवाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संविधानाची महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला गेला.
कार्यक्रमात राजे धर्मराव महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वेस्कडे  हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, त्यातील मौलिक अधिकार, तसेच विविध अनुच्छेद याबाबत सविस्तर माहिती दिली. संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेतील महत्वाच्या घटना आणि संविधानाच्या तत्त्वज्ञानावर सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रणजीत मंडल यांची उपस्थिती होती. त्यांनी संविधानापूर्वी आणि संविधानानंतरची परिस्थिती यावर भाष्य केले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीसाठी केलेल्या अविरत कष्ट आणि त्यांचे कौशल्य विशद केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मंडल, व्याख्याते डॉ. वेस्कडे , डॉ. शनिवारे , डॉ. पिंपळशेडे , डॉ. वाणी  यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन पुसतोडे  यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. सचिन शेंडे  यांनी केले. विद्यार्थ्यांना संविधानाच्या महत्वाची आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजावून सांगितल्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले.
संविधान महोत्सवाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधानाची गहन माहिती मिळाली आणि त्यांनी आपल्या देशाच्या संवैधानिक संरचनेबद्दल अधिक जाणून घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

टिसीओसी कालावाधी दरम्यान 02 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण


टिसीओसी कालावाधी दरम्यान 02 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण

गडचिरोली:-

शासनाने जाहिर केले होते एकुण 18 लाख रूपयांचे बक्षिस
    एक डीव्हीसीएम (Divisional Committee Member)  व एकसदस्य पदावरील माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 702 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 फेब्राुवारी 2025 रोजी 01 डी.व्हि.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यासह 01 सदस्य असे एकुण 02 जहाल माओवादी नामे 1) कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो, (डी.व्हि.सी.एम सप्लाय टीम), वय 56 वर्षे, रा. गुडंजुर (रिट), ता. भामरागड, जि. गडचिरोली व 2) सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (दलम सदस्य, भामरागड दलम), वय 30 वर्षे, रा. मिळदापल्ली ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
    
1) कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो
     दलममधील कार्यकाळ
    सन 1993 मध्ये मद्देड दलममध्ये भरती होवून 1995 पर्यंत काम केले.
सन 1995 ते 1998 पर्यंत उत्तर गडचिरोलीतील प्लाटुन क्र. 02 मध्ये सदस्य पदावर काम केले.
    सन 1998 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2001 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
    सन 2001 मध्ये उप-कमांडर पदावर पदोन्नती होऊन पेरमिली दलममध्ये सन 2003 पर्यंत काम केले.
    सन 2003 मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन 2006 पर्यंत उप-कमांडर पदावर काम केले.
    सन 2006 मध्ये एसीएम (Area Committee Member)पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये 2008 पर्यंत काम केले.
सन 2008 मध्ये डिव्हीसीएम (Divisional Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड, चातगाव व कसनसुर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये 2015 पर्यंत काम केले.
    सन 2015 मध्ये माड एरीयामध्ये स्टाफ/सप्लाय टिममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपावेतो काम केले.

 

    कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर आजपर्यंत एकुण 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 07 चकमक, 01 जाळपोळ  व 03 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

      2) सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी
    दलममधील कार्यकाळ
सन 2021 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे सप्टेंबर 2024 पर्यंत काम केले.
    माहे सप्टेंबर 2024 मध्ये डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून आजपावेतो काम केले.

 

    सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर 01 चकमकीचा गुन्हा दाखल असून इतर गुन्हयांत त्याच्या सहभागाची पडताळणी सुरु आहे.

    आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
    गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते.
    नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
    चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
    खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
    माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडून स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
    दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
    वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

   

महाराष्ट्र शासनाने कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते
    महाराष्ट्र शासनाने सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

टेम्पोत घुसवून सासुला जीवंत जाळून,जावयाने स्वतःलाही  टाकले जाळून 


टेम्पोत घुसवून सासुला जीवंत जाळून,जावयाने स्वतःलाही  टाकले जाळून 

 

मुंबई : मुंबईच्या मुलुंड भागातून हादरवणारी बातमी समोर आल आहे. मुलुंडमध्ये जावयाने सासूला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर आरोपीने स्वतःलाही पेटवून दिले. १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी सासूला जबाबदार धरत जावयाने तिला जिवंत जाळून आपला राग व्यक्त केला. सुरुवातीला पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार वाटला होता. मात्र चौकशीनंतर जावयानेच सासूची हत्या करुन स्वतःला पेटवून घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

मुंबईच्या मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटाचा राग मनात धरून जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची भयंकर घटना घडली. आरोपीने सासूला टेम्पोमध्ये कोंडले आणि तिच्यावर क्रूरपणे हल्ला करुन गाडी पेटवून दिली. या आगीत सासू आणि आरोपी जावई दोघांचाही मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी मृत जावयाविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाना सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या वाटत होती. मात्र नंतर सासूमुळे घटस्फोट झाल्याचा रागातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

आरोपीचे नाव कृष्णा दाजी अष्टनकर (५६) असून मृत सासूचे नाव बाबी दाजी उसरे (७२) होते. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून भांडण होते. बाबी उसरे या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा येथे त्यांच्या घटस्फोटीत मुलगी आणि २२ वर्षांच्या नातवासह राहत होत्या. टेम्पो ड्रायव्हर असलेला कृष्णा गेल्या ७-८ वर्षांपासून त्याच्या पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होतं आणि त्याच्या टेम्पोमध्येच राहत होता.

बाबी उसरे यांनी पत्नीला मला सोडून द्यायला सांगितले असे कृष्णाला वाटते होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होता. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कृष्णा उसरेंच्या घरी गेला आणि बाबी उसरे यांना रुग्णालयात घेऊन जातो असे सांगितले. तो अनेकदा त्यांच्या घरी जात होता त्यामुळे बाबी उसरे विश्वास ठेवून त्याच्यासोबत टेम्पोत बसल्या. त्याने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला आणि त्याचे शटर ओढून घेत आतून कुलूप लावले. यानंतर त्याने बाबी उसरे यांच्या डोक्यात हातोड्याने वार करुन त्यांना बेशुद्ध केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

वनौषधी आणायला जंगलात गेलेल्या इसमाचा वाघाने पाडला फडशा 


वनौषधी आणायला जंगलात गेलेल्या इसमाचा वाघाने पाडला फडशा 

 चंद्रपूर : वनौषधी 
आणायला जंगलात गेलेल्या इसमाचा वाघाने फडशा पाड्ल्याची घटना दि २६ ला उघडकीस आली. शामराव मगाम हे वनौषधी आण्याकरिता सिंदेवाही वन परिक्षेत्रातील सिंदेवाही नियत क्षेत्र उपवन परिक्षेत्रातील कारगटा जंगलात गेले असता, अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले.

शामराव अर्जुन मगम, जटलापूर (बाडा) असे मृताचे नाव असून, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ते जंगलात गेले होते. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांचे प्रेत जंगलात मिळाले. पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली.

पंचनामा करताना वन परिक्षेत्र अधिकारी विशाल साळकर, सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, वनरक्षक आर. व्ही. धनविजय, वनरक्षक स्वप्नील चौधरी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविले.

मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली आहे. असून उर्वरित मदत २५ लाख रुपये असेल. अशी माहिती क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांनी दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

बुध्दगया येथील महाबोधी बुध्दविहारासाठी गडचिरोलीत 1 मार्चला धरणे आंदोलन


बुध्दगया येथील महाबोधी बुध्दविहारासाठी गडचिरोलीत 1 मार्चला धरणे आंदोलन

 



गडचिरोली दि.27: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या पूज्य बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून दिनांक 1 मार्च ला धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध धार्मिक स्थळे त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली असून बुद्धगया येथील  महाबोधी बुद्ध विहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेली 50 पेक्षाही अधिक वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि पूज्य बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे. तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही.  ही अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी बाब आहे.
सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी भारतातील पूज्य बौद्ध भिक्षुनी गेली 12 फेब्रुवारी 2025 पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे दिनांक 1 मार्च 2025 ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली यांचे नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
सदर धरणे आंदोलनात भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आणि बौद्ध धम्मावर श्रद्धा असणाऱ्या सर्वांनी न चुकता दुपारी 11.30 वा. उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली, संविधान फाउंडेशन जिल्हा गडचिरोली, सम्यक समाज समिती गोकुळ नगर गडचिरोली, पंचशील बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली, प्रबुद्ध बुद्ध विहार विवेकानंद नगर गडचिरोली, प्रबुद्ध विचार मंच गडचिरोली, विशाखा महिला मंडळ गोकुळ नगर, बौद्ध समाज मंडळ नवेगाव,  कॉम्प्लेक्स, इंदिरानगर, साईनगर, स्नेहनगर,  फुले वार्ड,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , गणेश कॉलनी, फुले वार्ड, विसापूर कॉम्प्लेक्स, कोटगल, त्रिशरण महिला मंडळ रामनगर, संबोधी बुद्ध विहार समिती गडचिरोली आदींच्या वतीने करण्यात येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025

PostImage

खूदीरामपली येथे नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रा शुभारंभ, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण


खूदीरामपली येथे नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रा शुभारंभ, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण

 

 

खूदीरामपली: 26 फेब्रुवारी 2025 रोजी खूदीरामपली येथील नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.गट)विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
या सोहळ्याला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थितांमध्ये प्राचार्य निखुले सर  माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञान कुमारी कौशी, संध्याताई मुगमोडे, गोबाटे ताई, माधुरीताई गोरकर, जयश्रीताई चिल्लरवार यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष हरिपद दास, सचिव बिजय विश्वास, कोषाध्यक्ष परेस विश्वास, उपाध्यक्ष प्रदीप मोहनदास आणि सहसचिव मनोज दास उपस्थित होते
लोकार्पण सोहळ्यात भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम यांनी विशेष योगदान दिले, ज्यामध्ये नाम कीर्तन सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी प्रदान केला. यामुळे या धार्मिक प्रकल्पाच्या पुन्हा एकदा महत्त्वाला वाव मिळाला आहे
मार्कंडेश्वर देवस्थानाच्या या नवनिर्मित सुविधेने स्थानिक आणि परिसरातील भक्तांना आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्याची संधी दिली आहे. देवस्थानच्या यात्रेचा आरंभ अनेक भक्तांसाठी एक पवित्र आणि उत्साही क्षण ठरला
नवीन किर्तन सभा मंडपाच्या लोकार्पणाने स्थानिक समाजाच्या एकजुटीला आणखी बल मिळाला आहे. ही इमारत भक्तांची विविध धार्मिक उपासना आणि कीर्तनांसाठी वापरली जाणार आहे, जेणेकरून संप्रदायाच्या सर्व अनुयायांसाठी अधिक जागा आणि सुवधता उपलब्ध होईल
ही यात्रा आणि लोकार्पण सोहळा सुंदरतेने पार पडला आणि सर्व उपस्थितांनी यावेळी देवाच्या आशीर्वादांची प्राप्ती केली


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2025

PostImage

मार्कंडा  देव येथील वैनगंगा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू,  तर दोन जणांना वाचवण्यात यश


मार्कंडा  देव येथील वैनगंगा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू,
 तर दोन जणांना वाचवण्यात यश 

 


 चामोर्शी :- मार्कंडा देव येथील महाशिवरात्री यात्रेनिमित्त आलेले 3 युवक वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेले असता नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले .
 सदर घटना ही दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 12.30 दरम्यान घडली . सविस्तर असे की , अभिषेक संतोष मेश्राम वय 24 वर्षे , जितू राजेश्वर दुर्गे वय 20 वर्षे , खुशाल सुखराम सोनवने वय 18 वर्षे हे तीघेही  रा. महाकाली वार्ड , लक्ष्मी बजाज शोरूम समोर चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत .  हे तिन्ही युवक यात्रेनिमित्त मार्कंडादेव येथे  महाशिवरात्री यात्रेला आले होते आणि ते आंघोळीला राखीव क्षेत्र ठेवलेल्या भागात आंघोळ न करता दुसऱ्या बाजूला आंघोळीला गेले परंतु त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही व अभिषेक संतोष मेश्राम वय 24 वर्षे याचा नदीत बुडून मृत्यू झाला . तर इतर लोकांच्या प्रयत्नांमुळे  दोन युवकांना वाचविण्यात यश आले . सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल  कातबाने आणि इतर पोलीस पथकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन मृतकाला शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठवण्यात आले .


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2025

PostImage

समस्त शेवटच्या भागातील गावांचा विकास हाच ध्यास -खा.डॉ, नामदेव किरसाण 


समस्त शेवटच्या भागातील गावांचा विकास हाच ध्यास -खा.डॉ, नामदेव किरसाण 

 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत तळोधी, कुनघाडा, पावीलसनपेठ रस्त्यावर भव्य पुलिया बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

गडचिरोली:-

दिनांक 26 फेब्रुवारी 2025 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत तळोधी कुनघाडा पाविलासनपेठ रस्त्यावर भव्य पुलिया बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसाण साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित यांना खासदार महोदय यांनी मार्गदर्शन केले व गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शेवटच्या जंगलव्याप्त व अती दुर्गम भागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असे प्रतिपादन केले यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे काँग्रेस नेते मनोहर पाटील पोरेटी, सतिश भाऊ विधाते, अनिल कोठारे, वसंतराव राऊत, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले सुनील चडगुलवार, विपुल येलेट्टीवार,गौरव येलेट्टीवार,सरपंच सौ मेश्राम ताई , संबंधित विभागाचे अभियंता व तळोधी,कुनघाडा पावीलसनपेठ भागातील शेकडो नागरिक बंधू भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2025

PostImage

वैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून तीन सख्या बहीणीचा करुन अंत 


वैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून तीन सख्या बहीणीचा करुन अंत 

महाशिवरात्री निमित्त आल्या होत्या आंघोळीसाठी 

गडचिरोली:-

वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या तीन सख्या बहीणी पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्याच्या डोहात बुडून मरण पावल्या सदर घटना आज दि २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास व्याहाळ येथे नदी पात्रात घडली 
मृतक मुली ह्या बाबुपेठ चंद्रपूर येथील असून प्रतिमा प्रकाश मंडल वय २३, कविता प्रकाश मंडल वय २२,लिपीका प्रकाश मंडल वय १९ असे त्यांचे नावे आहेत 
चंद्रपूर (बाबुपेठ )वरुन ५ लोक महाशिवरात्रीच्या निमित्ताने वैनगंगा नदीत व्याहाड ला आले होते आंघोळ करीत असताना तिन बहीणी बुडाल्या त्याना वाचविण्यासाठी एक महीला गेली मात्र तीही वाहून जात असताना एका खडकाला पकडून एक तास तीथेच राहीली तसेच एक लहान मुलगा सुध्दा पाण्यात होता त्याला त्याच्या सोबत आलेल्या काकाने पाण्याबाहेर बाहेर काढले 
सावली पोलीस स्टेशन ला माहीती मिळताच बचाव करण्यासाठी पोलीस सरसावले व खडकाला पकडून असलेल्या महीलेला सुखरुप बाहेर काढले 
सावली पोलीस स्टेशन अधिकारी प्रदिप पुल्लरवार,मोहण दासरवार,केवल तुरे, राहुल कुमरेटी यांनी बोटीच्या सहाय्याने मृतक तीनही बहीणीचे शव शोधण्याचे काम करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2025

PostImage

मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यकाविरोधात ग्रामस्थांत रोष, निलंबित करण्याची मागणी


मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यकाविरोधात ग्रामस्थांत रोष, निलंबित करण्याची मागणी 


चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा (कं) वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या विजयनगर, गांधीनगर, कालीनगर या गावातील नागरिकांनी क्षेत्र सहायकाविरुद्ध २४ फेब्रुवारी रोजी तक्रार केली आहे. वन कायद्याच्या आडून क्षेत्र सहायक मारहाण करून धमकावत असल्याचे पुरावे या तक्रारीसोबत दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्याकडे या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन गंभीर आरोप केले आहेत. यावेळी विजयनगर येथील अनेक नागरिकांनी एकत्रित येऊन शेकडो नागरिकांच्या सहीनिशी निवेदन दिले. वनक्षेत्र सहाय्यक रमेश बानोत यांच्याविरुद्ध सदरील तक्रार आहे. 'बानोत हटाव विजयनगर बचाव' असा नारा नागरिकांनी दिला व  वनक्षेत्र सहाय्यकास निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल झोडे, ज्ञानेंद्र विश्वास, जावेद सैयद, मनीषा मडावी, रमेश अधिकारी, नानू उपाध्ये, कृष्णा वाघाडे, भीमराव वनकर हजर होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2025

PostImage

घरकुलाचे दुसरे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने घेतली विस हजार रुपयांची लाच 


घरकुलाचे दुसरे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने घेतली विस हजार रुपयांची लाच 

सावली:-

  घरकुलाच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी सावली तालुक्यातील लोंढोली गावात करण्यात आली.

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले होते. एकूण १.२० लाख रुपये अनुदानापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हफ्ता प्राप्त झाला होता. लाभार्थ्याचा मुलगा आणि तक्रारदार स्वतः या घरकुलाचे काम पाहत होते. याच घरकुलाच्या दुसऱ्या हफ्त्याच्या ७० हजार रुपयांच्या मंजुरीसाठी ग्रामसेवक चंद्रशेखर केशव रामटेके यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत तडजोडीनंतर ग्रामसेवकाने आधी १० हजार आणि उर्वरित १० हजार नंतर घेण्याची तयारी दर्शविली. २५ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष ग्रामसेवक रामटेके यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.

ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांच्याविरुद्ध सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे व संदीप कौरासे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025

PostImage

विस्तार अधिकारी प्रभाकर बारसिंगे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार 


विस्तार अधिकारी प्रभाकर बारसिंगे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार 

 

गडचिरोली:-

स्थानिक कन्नमवार  वार्ड नंबर 17 गडचिरोली  येथे दिनांक  20/02/2025 रोजी शेजारी मित्रपरिवार मंडळातर्फे श्री प्रभाकर बारसिंगे यांच्या  सेवानिवृत्ती  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ रमेश सोनटक्के  ,प्रमुख अतिथी प्रा  शेषराव येलेकर ,श्री विठ्ठलराव साखरे ,श्री दिगंबर पिल्लेवान, मंचावर उपस्थित होते श्री प्रभाकर बारशिंगे हे 1986 ला प्रायमरी शिक्षक नियुक्त झाले तर ते विस्तार अधिकारी या पदावरून ते 31 जानेवारी 2025 ला सेवानिवृत्त झाले ते कन्नमवार वार्ड 17 मध्ये  राहत असून त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे शेजाऱ्यांमध्ये एक कौटुंबिक संबंध निर्माण झाल्यामुळे  सेवानिवृत्त शेजाऱ्यांचा सत्कार करण्याची अनोखी परंपरा या वार्डातील लोकांनी निर्माण केली असल्यामुळे श्री प्रभाकर बारशिंगे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू व त्यांचा मुलगा सिद्धांत व विभास यांना भेटवस्तू  देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ रमेश सोनटक्के  यांनी वार्डातील विविध जाती धर्माचे व संस्कृतीचे लोकांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित व्हावे व जातीय सलोखा समन्वय व प्रेम निर्माण होऊन यातून सामाजिक स्वास्थ सुदृढ राहावे हा मुख्य उद्देश या सत्कारामागील आहे असे विचार व्यक्त केले प्रा शेषराव येलेकर   ,प्रा सौ संध्या येलेकर, सिद्धांत बारशिंगे, चि. आभास बारशिंगे , श्री सचिन लसुंते श्री विकी लसुंते या सर्वांनी आपले विचार व्यक्त केले सत्कारमूर्तींनी आपल्या भाषणातून सर्वांना भावुक करून मी सदैव आपल्या ऋणामध्ये व आपल्या अंतकरणांमध्ये जे मी स्थान  निर्माण केले आहे ते कायम राहील व जे प्रेम आपण मला दिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन व जेवणाची व्यवस्था वार्डातील सर्व महिला मंडळ  प्रा सौ  संध्या येलेकर, सौ ज्योती सोनटक्के, सौ अंजू पिल्लेवान, सौ.कालीनदिनी साखरे ,सौ वैशाली लसुंते , यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन श्री दिगंबर पिल्लेवान यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संध्या येलेकर यांनी केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025

PostImage

तालुका रक्तदूतपदी प्रशांत गावडे यांची नियुक्ती


तालुका रक्तदूतपदी प्रशांत गावडे यांची नियुक्ती


प्रमोद झरकर   उपसंपादक वैनगंगा वार्ता  गड़चिरोली मो. न. ९३२५७६६१३४

गडचिरोली जिल्ह्यातील जनहित ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था, येणापुर द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत प्रशांत प्रकाश गावडे यांची चामोर्शी तालुका रक्तदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
    संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान जनजागृती व रक्तदाता नेटवर्क निर्माण करण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच अभियानाला अधिक बळ मिळावे आणि तालुका स्तरावर रक्तदान चळवळीला गती द्यावी, या उद्देशाने प्रशांत गावडे यांना तालुका रक्तदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  संस्थेच्या अध्यक्षा तथा संचालिका सौ. सुनीताताई बंडावार यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रशांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात रक्तदान चळवळ अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा विश्वास आहे.”

तालुका रक्तदूत म्हणून प्रशांत गावडे यांच्यावर रक्तदाता नेटवर्क तयार करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि रक्तदानाविषयी जनजागृती वाढवणे या जबाबदाऱ्या राहतील.

"रक्तदान - सर्वश्रेष्ठ दान!"


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025

PostImage

कसनसुर येथील अवैध मुरूम उत्खनन आंदोलनाचा 11 वा दिवस, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध आंदोलन तीव्र होणार


कसनसुर येथील अवैध मुरूम उत्खनन आंदोलनाचा 11 वा दिवस, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध आंदोलन तीव्र होणार 

 

 

गडचिरोली: जिल्ह्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, सामाजिक कार्यकर्ते  मुकेश वामन कावळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा आज 11 वा दिवस आहे. प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुकेश कावळे यांनी उपोषण केले होते, त्यावेळी अधिकाऱ्यांनी 3 महिन्यांत कठोर कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिने उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट, वन विभागाच्या प्रधान सचिवांनी मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांना अवैध उत्खनन प्रकरणात 3 दिवसांत कठोर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, 11 दिवस उलटूनही या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन होत असून, या प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांशी संगनमत असल्याचा आरोप केला जात आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असूनही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जर प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केले, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. याबाबत आंदोलनकर्त्यांनी पुढील टप्प्यांची घोषणा केली आहे.
25 फेब्रुवारी – अर्धनग्न ढोल बजाओ आंदोलन. 26 फेब्रुवारी – मुंडन ढोल बजाओ आंदोलन. 3 मार्चपासून – नागपूर (वन भवन) येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण
दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी. शासनाच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून न्यायालयीन चौकशी सुरू करावी. दोषी कंत्राटदारांवर वनगुन्हे नोंदवून, त्यांच्यावर न्यायालयात फौजदारी खटले दाखल करावेत. प्रधान सचिवांच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी.
या प्रकरणावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मुकेश वामन कावळे यांनी संबंधित विभागाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. “जर शासनाच्या अधिकाऱ्यांचे आदेशही अंमलात आणले जात नसतील, तर हा अधिकारांचा दुरुपयोग आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. प्रशासनाने जर कारवाई केली नाही, तर जनतेसह मोठ्या प्रमाणात लढा उभारला जाईल.”
आता सरकार आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!




PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025

PostImage

गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी मागीतली १० हजार रुपयांची लाच  मात्र  पोलीस उपनिरीक्षक सापडला लाप्रवीच्या जाळ्यात


गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी मागीतली १० हजार रुपयांची लाच  मात्र  पोलीस उपनिरीक्षक सापडला लाप्रवीच्या जाळ्यात 

 

भिवंडीः कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाने आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले
त्याच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. राजेश केशवराव डोंगरे (३४) असे अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे याने आरोपीकडून प्रथम ८० हजार रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली. नंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याची तक्रार आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानुषंगाने संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशानुसार, २२ फेब्रुवारी रोजी सापळा लावून कारवाई केली. डोंगरे याला पडताळणी वेळी १० हजार रुपये लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, डोंगरेला रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025

PostImage

वडील घरात असताना तरुणीवर चाकुने वार करून केली हत्या 


वडील घरात असताना तरुणीवर चाकुने वार करून केली हत्या 

 

हिंगोली:-

 तू माझी जिंदगी बरबाद केली, असे म्हणत संजना गजानन खिल्लारी वय १९ या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करीत तिला ठार मारल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली.

घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
२० फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती. त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी याने घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे, असे विचारत घरामध्ये प्रवेश करत वरील खोलीमध्ये गेला. तू माझी जिंदगी बरबाद केली. तू तुझे आई व काकास परवा दिवसाच्या बद्दल का सांगितले, असे म्हणत आरोपीने संजनावर चाकूचे वार केले. संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली. तेथेही पाठीमागून येत पुन्हा चाकूचे वार केले. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील वरच्या खोलीत गेले असता संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तत्काळ दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
घटनास्थळावरून पसार झालेला आरोपी युवक काही वेळात स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची चर्चा होती. याबाबत विचारणा केली असता केंद्रा बु. कडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने पसार होत असताना आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती फौजदार नितेश लेंगुळे यांनी दिली.

 घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांनी घटनास्थळाला भेट दिली. शवविच्छेदन व अंत्यसंस्कारानंतर अशोक मारोती खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात अभिषेक संजय खिल्लारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके तपास करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2025

PostImage

चपराळा येथील भव्य महाशिवरात्री यात्रा उत्सवाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते उद्घाटन


चपराळा येथील भव्य महाशिवरात्री यात्रा उत्सवाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते उद्घाटन 


चामोर्शी: तालुक्यातील आष्टी शहरापासून जवळच असलेल्या प. पु. कार्तिक स्वामी महाराज प्रशांत धाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. येथील यात्रेकरीता तेलंगणा राज्यासह महाराष्ट्रील भाविक दर्शनासाठी येतात. आज दिनांक २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या यात्रेचे उद्घाटन आष्टी - ईल्लूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सलग चार दिवस महाशिवरात्री उत्सव असते त्याकरिता यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आष्टी, चामोर्शी, गोंडपिपरी, अहेरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे तरी भाविकांनी प. पु. कार्तिक स्वामी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार यांनी उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळाचे अध्यक्ष संजय पंदिलवार, रामचंद्र बामणकार यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.

 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2025

PostImage

विहीरीची दरड कोसळून एक मजूर ठार


विहीरीची दरड कोसळून एक मजूर ठार

 

 धानोरा, दि.23 : शेतशिवरात विहीर बांधकाम करतांना दरड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील पनेमारा येथे शुक्रवारी घडली. वसंत बुधेसिंग फाफामारिया (अंदाजे वय 38) रा. बेलगाव आहे मृतकाचे नाव आहे. पन्नेमारा येथील लछ्चन तुलावी यांच्या शेतात महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीचे बांधकाम सुरु आहे. खोदकाम केलेल्या विहिरीत रिंग टाकण्याचे काम सुरु होते. अचानक वरच्या बाजूने मातीची दरड कोसळल्याने मातीमध्ये तिन मजुर सापडले. बांधकाम करीत असलेल्या तीन मजुरांपैकी वसंतच्या कपाळावर काँक्रीटचा मार लागला आणि वरून मातीचा ढिगारा कोसळल्याने तो मांडीपर्यंत विहिरीच्या आत दबल्या गेला. यावेळी त्याच्या बाजूला असलेले दोन मजूर सामू मालिया व संदीप पोयाम यांनी लगेच पावड्याने माती ओढून त्याला बाहेर काढले असता वसंत हा पूर्णता बेशुद्ध अवस्थेत आढळला. विहिरीच्या काठावर असलेल्या मजुराच्या साह्याने त्याला वर काढण्यात आले व तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. राहुल बनसोड यांनी तपासून मृत घोषित केले व पोलीस विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी उत्तरीय तपासणी करिता मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोरा येथे पाठविण्यात आले.
मृतक वसंत फाफामारिया या मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत असून मृतक मजुराला नुकसान भरपाई कोण आणि कुठून दिली जाणार असा सुद्धा प्रश्न विचारीत आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर MRGS चे पं. स.अभियंता खराटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व मृतक मजुराकडे MRGS योजनेचे जॉब कार्ड असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे, कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2025

PostImage

 स्वतःवर गोळी झाडून पोलीस जवानाची आत्महत्या


 स्वतःवर गोळी झाडून पोलीस जवानाची आत्महत्या

धानोरा पोलीस स्टेशन मधली घटना

गडचिरोली:-
धानोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत केंद्रीय रिजर्व फोर्स दलातील पोलीस जवान यांनी आज सकाळी दहा वाजता दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक पोलीस जवानाचे  नाव गिरिराज रामनरेश किशोर ( वय ३० वर्ष) आहे.मृतक पोलीस जवान गिरिराज रामनरेश किशोर आग्रा येथील रहिवासी आहेत.

मागील वर्षी आक्टोंबर महिन्यात ते धानोरा पोलीस स्टेशनला जाईन झाले होते त्यानंतर त्यांना जानेवारी महिन्यात पुणे येथे अटॅचमेंट ड्यूटी वर पाठवल्या गेले होते.ते काल रविवारला सायंकाळी धानोरा येथे परत आले होते.

आज धानोरा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी दहा वाजता जवानाने स्वतःवर बंदुकीतुन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात  भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सुरू आहे. सदर पोलीस जवानाने स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या नैराश्यपोटी व ताण तणावातून केल्याचे बोलल्या जात आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2025

PostImage

नगरसेवकाच्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांचा पाठींबा


नगरसेवकाच्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांचा पाठींबा 


अहेरी:-
अहेरी तालुक्यातील अहेरी येथे नगरसेवक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे 
 अहेरी येथील मुख्य चौकातील रोड  व अन्य सामान्य जनतेच्या ज्वलंत समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी गांधी चौकात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाद्वारे त्यांनी अहेरीतील विविध समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे

राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब गट शाहीन ताई हकीम यांनी उपोषण स्थळी भेट देऊन नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शविला. त्यांच्या या पाठिंब्यामुळे उपोषणाला अधिक बळ मिळाले आहे

अशा उपोषणांच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण करणे आणि जनतेच्या समस्यांवर लक्ष वेधणे महत्त्वाचे असते. या उपोषणामुळे अहेरीतील समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांनी व्यक्त केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2025

PostImage

अवघ्या दोन दिवसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना समाजकंठकांना पोलीसांनी केले जेरबंद 


अवघ्या दोन दिवसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना समाजकंठकांना पोलीसांनी केले जेरबंद 

 

 

आष्टी:-

पोलीस स्टेशन आष्टी हद्दीमधील मौजा सोमनपल्ली व दुर्गापूर येथे गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांद्वारे विकृत पद्धतीने  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण,मानवी अवयवांची चिन्हे, आकृत्या काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणाचा आष्टी पोलीसांकडून तपास सुरु होता. यादरम्यानच दिनांक 21/02/2025 रोजी मौजा सोमनपल्ली येथील सार्वजनिक बस थांब्यावरील शेडच्या पत्र्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अवमानजनक व आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलीसांना कळविले होते. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली होती. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आष्टी पोलीसांना दिला होता.

तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विशाल काळे, पोस्टे आष्टी, पोनि. अरुण फेगडे, स्थागुशा गडचिरोली यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन आष्टी व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची एकूण 10 तपास पथके तयार करण्यात आली होती. पथकांनी केलेल्या तपासामध्ये निदर्शनास आले की, आसपासच्या 10 कि.मी. हद्दीतील परिसरात सदर घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या शाईसारख्याच शाईने विविध अश्लील आकृत्या अज्ञातांद्वारे मागील तीन दिवसांपासून बनविल्या जात आहेत. पोलीस पथकांनी आष्टी व चामोर्शी हद्दीतील अनेक गावांना भेट देऊन मिळविलेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे इसम नामे सुमित जगदिश मंडल, वय 18 वर्षे रा. दुर्गापूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली याने व एक अल्पवयीन आरोपी यांनी सोमनपल्ली बस थांब्यावर सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी तातडीने सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्राविषयी अधिक विचारणा केली असता, आपल्याकडून सदर कृत्य घडल्याचे आरोपींनी कबुल केले आहे. मानसिक विकृतीतून सदर आरोपीतांनी हे कृत्य केले असल्याचे लक्षात येते आहे. आष्टी पोलीसांकडून आरोपी सुमित जगदिश मंडल याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असून अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्राचा अधिक तपास पोस्टे आष्टीचे पोनि. विशाल काळे हे करीत आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आष्टीचे पोनि. विशाल काळे, स्थागुशा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. राहुल आव्हाड, पोस्टे आष्टीचे सपोनि. मदन म्हस्के, पोउपनि. मनोज जासूद, पोउपनि. सोमनाथ पवार, पोउपनि. दयाल मंडल, पोउपनि. काशिनाथ शेडमाके, मपोउपनि. प्रतिक्षा वनवे, पोस्टे आष्टी व स्थागुशा गडचिरोलीचे अंमलदार यांनी केला आहे. सामाजिक सलोख्याचा विचार करुन अशा प्रकारचे कोणतेही कृत्य जिल्ह्रातील नागरिकांकडून करण्यात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन गडचिरोली पोलीसांनी केले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2025

PostImage

राहत्या घराला लागली आग, घरातील साहित्य व दोन  दुचाकी स्वाहा 


राहत्या घराला लागली आग, घरातील साहित्य व दोन  दुचाकी स्वाहा 

 


कमलापूर :-

 सकाळच्या सुमारास घरातील सर्व मंडळी आपआपल्या कामात व्यस्त असतांना एकाएक घराला आग लागली, यात घरात ठेवलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने दोन दुचाकींसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, (दि.22) सकाळी 10 वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे घडली.

सविस्तर वृत्त असे की, कमलापूर येथील महेश गादासवार हे कुटूंबियांसह सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे दैनंदिन काम करीत असतांना एकाएक घराला आग लागली. घरात पेट्रोल साठवून ठेवले असल्याने आगीने क्षणातच रौद्ररुप धारण केले. बघता बघता घरातील आग अंगणापर्यंत पोहचली. यात अंगणात उभ्या असलेल्या दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाल्या. गादासवार कुटूंबियांनी वेळीच सतर्कता बाळगित घराबाहेर पडल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घराला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविली. ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्त्परेतमुळे वेळीच आग नियंत्रणात आली. अन्यथा आजुबाजूच्या घरानांही आग लागण्याची शक्यता बळावली होती. मात्र, या आगीत दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाल्याने महेश गादासवार यांचे प्रचंड नुकसान झाले.

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

प्राप्त माहितीनुसार कमलापूर गादासवार हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरी पेट्रोल तसेच गॅस सिलेंडर साठवून ठेवलेले होते. या आगीमुळे पेट्रोलचा भडका उडाला. घरात तसेच घराबाहेर सिलेंडर ठेलेले होते. सुदैवान या गॅस सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलल्या जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2025

PostImage

वनविभाग कर्मचाऱ्यांच्या धरणा आंदोलना स्थळीं खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भेट


वनविभाग कर्मचाऱ्यांच्या धरणा आंदोलना स्थळीं खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भेट

 

गडचिरोली,

 वनपरिक्षेत्र कार्यालय ता. जि. गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर द्वारा आयोजित शाखा गडचिरोली वन विभाग कर्मचारी संघटना विविध मागण्या घेऊन बेमुदत काम बंद धरणे आंदोलन स्थळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून मार्गदर्शन केले तसेच वनविभागातील सर्व कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचे वेतन तात्काळ लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे वन संरक्षक गडचिरोली यांना निर्देश दिले.
         यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, सुनील चडगुलवार, किशोर सोनटक्के, लतीफ पठाण, अरुण पेंदोरकर, सुनील सोनटक्के, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, गौरव येनप्रेड्डीवार, कुणाल ताजने वनविभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2025

PostImage

सोमनपल्ली येथील घटनेचा खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून निषेध ; दोषीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या पोलीस विभागाला सूचना


सोमनपल्ली येथील घटनेचा खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे कडून निषेध ; दोषीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या पोलीस विभागाला सूचना

 

गडचिरोली :: चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रवासी निवाऱ्यावर महामानम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एका अज्ञात व्यक्तीने अर्वांच्य लिखाण केले,  त्यामुळे सोमनापल्ली - येणापूर  परीसरातील गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून गावाकऱ्यांनी सदर घटनेचा निषेध करून सदर अज्ञात आरोपी व्यक्तीला पकडून कठोर शिक्षा करण्याच्या मागणीला घेऊन निषेध आंदोन करण्यासाठी आयोजित बैठीकीस गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर कोणत्याही जाती धर्मातील महापुरुष हे आपल्यासाठी आदर्श आहेत, त्यांच्या विषयी अर्वांच्य भाषा वापरने किंवा त्यांच्या विषयी अपमानास्पद लिहिणे निंदनीय आहे, या मधील अपराधी व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना खासदार डॉ. किरसान यांनी व्यक्त केली. दरम्यान खासदार डॉ. किरसान यांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे चर्चा करून सदर घटनेचा तातडीने तपास करून दोषीवर कठोर शिक्षा करण्याच्या सूचना दिल्या व गावाकऱ्यांना संवैधानिक मार्गांनेच निषेध व्यक्त करण्याचे सांगितले. 
               यावेळी बैठीस जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रेमानंद (मुना) गोंगले, येणापुर अध्यक्ष जयसुक गेडाम, अँड.दिनेश राऊत , निनाद देठेकर सोमनपल्ली , प्रीतम घोनमोडे वायगाव, जितु झाडे सगणापुर, परिजन दहीवले, मंगलदास चापले, प्रमोद उमरे पी.जी उंदिरवाडे, आनंद गोडबोले,सुनील गोवर्धने,राजू राऊत, नामदेव मेश्राम, काजल मेश्राम सह सगनापुर , चकं न. 2 ,आंबोली, वायगाव,सोमणपल्ली, अड्याळ, किष्ठापुर, मुधोली रीट, कोणसरी येथील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2025

PostImage

सोमणपल्ली बस थांब्यावर डॉ.आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी


सोमणपल्ली बस थांब्यावर डॉ.आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी

आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सोमणपल्ली बस थांब्यावर समाजकंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन बौद्ध अनुयायांनी केली आहे 
दि.२० फेब्रुवारी ला रात्री काही समाज विघातक कृत्य करणाऱ्या नी बस थांब्यावर आक्षेपार्ह लिखाण केले ही बातमी आज सकाळी समाज बांधवांना कळताच आष्टी पोलीस स्टेशन माहिती देण्यात आली व लागलीच हजारोंच्या संख्येने बांधव आष्टी येथे गोळा झाले व निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर घटनेचा निषेध नोंदवला.यावेळी सोमणपल्ली , सगणापूर, येणापूर,कोनसरी,अनखोडा, आष्टी येथील अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते २४ तासात सदर आरोपींना अटक करण्यात यावी अन्यथा आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 16, 2025

PostImage

पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्ती व वाघांचा बंदोबस्त करा - खा. डॉ.नामदेव किरसान


पोर्ला वनपरिक्षेत्रात रानटी हत्ती व वाघांचा बंदोबस्त करा - खा. डॉ.नामदेव किरसान


पोर्ला:- वनपरिक्षेत्रात रानटी हत्ती व वाघांचा बंदोबस्त करा अशी सूचना मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना खासदार डॉ किरसान यांनी केली आहे 
वडसा वनविभाग वडसा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय पोर्ला ता. जि.गडचिरोली येथे रानटी हत्ती यांनी घातलेला हौदोस व वाघांमुळे शेतकरी , सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती मिळताच गडचिरोली-चिमूर 
लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान सोबत जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा करून भ्रमणध्वनी द्वारे मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांच्याशी चर्चा केली.तसेच पोर्ला क्षेत्रातील जनतेला जलावू लाकडांची व्यवस्था पोर्ला प्रादेशिक कार्यालय येथे करण्याच्या सूचनाअधिकाऱ्यांना दिल्या.
 यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेल रुपेश टिकले, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत पाटील राऊत, सरपंच सौ. निवृत्तीताई फरांडे, मनोहर नवघडे,  देविदास भोयर, अशोक बोहरे, भोयर , प्यारमंहन शेख, विजय येवले, उमेश खरवडे, विनोद आजवले, लाकडे , उमेश आछाडे, जितू पोटे, देविदास चापले, बंडू हजारे, सौ. उज्वला खरवडे, देवराव कोलते, डंबाजी झोडगे,  बंडू बावणे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 16, 2025

PostImage

शेतकऱ्यांची वीज जोडणी करा अन्यथा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालणार -खा.प्रतिभा धानोरकर


शेतकऱ्यांची वीज जोडणी करा अन्यथा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालणार -खा.प्रतिभा धानोरकर 

 

चंद्रपूर:-
खासदार प्रतिभा धानोरकर ह्या  सध्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या प्रश्नावर त्या आक्रमक झाल्या असून विज द्या अथवा 2018 पासून जमा केलेल्या सुरक्षा रकमेवर व्याज द्या अन्यथा महावितरण च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर ह्या नागरीकांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असून सध्या त्यांनी 2018 पासून जिल्ह्यातील 1590 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज  मिळवून देण्याकरीता सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर शेतकऱ्यांनी वीज जोडणी करीता सुरक्षा ठेव देखील जमा केलेली आहे

या विषयासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र लिहून शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. उशीर झाल्यास सामान्य नागरीकांकडून विज बिलावर व्याज घेणारे महावितरण 2018 पासून शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यास असमर्थ ठरले आहे.
घेराव करणार

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांना विज किंवा शेतकऱ्यांनी महावितरण कडे सुरक्षा ठेव स्वरुपात भरलेल्या पैशावर व्याज न दिल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसह घेराव घालणार  असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री काय भुमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 16, 2025

PostImage

ट्राक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू


ट्राक्टरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

 

 

कुरखेडा, दि. 15 : तालुक्यातील गोठणगाव येथील युवक मयूर देवराव घुगुसकर (22) हा आपल्या दुचाकी वाहनाने देसाईगंज वडसा वरून परत आपल्या गावी गोठणगाव येथे  येत असताना वडसा - कुरखेडा रोडवरील नांन्ही फाट्याजवळ ट्रॅक्टर अपघातात त्याच्या हाताला पायाला व छातीला गंभीर मार लागून गंभीरित्या जखमी झाल्याने त्याला 12 फेब्रुवारीला प्राथमिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. कुरखेडा येथून प्राथमिक उपचार करुन त्याला ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता शनिवार 15 फेब्रुवारी 2025 रोजी रोजी उपचारादरम्यान  त्या युवकाची दुपारी 12:30 साडेबारा वाजता  प्राणज्योत मालवली.

मयूर घुगुसकर या युवकाचा अपघात हा शेतातून चिखल करीत परत जाणाऱ्या कॅचबिल लावलेल्या ट्रॅक्टरची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी समोरा समोर धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावर नान्ही फाट्याजवळ घडली होती. नान्ही परीसरात असलेल्या शेतात चिखलचे काम निपटवत रुपेश बोधनकार वैरागड असा नाव लिहलेला MH 33 V 6585 क्रमांकाचा ट्रॅक्टर देसाईगंजचा दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली. यावेळी दुचाकीस्वार मयूर देवराव घुगुसकर (वय 22) रा. गोठणगांव हा युवक गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरचा लोखंडी कॅचबिलचा मार लागल्याने युवकाचा एक पाय व हात निकामी झाला होता. याला गंभीर अवस्थेत 108 क्रमांकाचा

रुग्णवाहिकेने प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारा करीता ब्रम्हपुरी व नंतर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मयूर घुगुसकर हा युवक आपल्या वडिलाला मशीन बोरवेलच्या कामात मदत करून कुटुंबात आर्थिक मदत करत होता. मयुरच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचे  डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 16, 2025

PostImage

येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न


येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न

 गडचिरोली: विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने आयोजित गडचिरोली जिल्हा अधिवेशन इंदिरा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालय, येणापूर येथे संपन्न झाले. या प्रसंगी आमदार रामदासजी मसराम  सत्कारमूर्ती व  प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. आमदार रामदासजी मसराम  यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

त्या प्रसंगी  आमदार  सुधाकरजी अडबाले , सचिव,गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ,येनापुर जयंतजी येलमुले, अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ अरविंद देशमुख,जिल्हा कार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ जिल्हा भंडारा,राजेश धुर्वे, सचिव,यंग टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ डॉ. विवेक गोर्लावार, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा गडचिरोली. गुरुदेव नवघडे, अध्यक्ष विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन गडचिरोली प्रा. विजय कुत्तरमारे, अध्यक्ष,अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना  सतीश पवार, आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना प्रमुख प्रकल्प अहेरी, सुरेंद्र अडबाले कार्यवाह चंद्रपूर शहर.सुरेंद्र शेळके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा,दीपक धोपटे,  अजय लोंढे ,अजय वर्धरवार , रवींद्र नैताम, नरेंद्र भोयर,  शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 15, 2025

PostImage

एका महिन्यात दुप्पट  पैसे असे आमिष दाखवून घातला लाखो रुपयांचा गंडा


एका महिन्यात दुप्पट  पैसे असे आमिष दाखवून घातला लाखो रुपयांचा गंडा

 

 मुंबई :-

 प्रभादेवीतील पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सी मध्ये एका महिन्यात  पैसे दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांकडून लाखोंची गुंतवणूक स्वीकारून पळ काढल्याचा प्रकार दादरमध्ये समोर आला आहे. सुनील गुप्ता असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी दादर पोलिस अधिक तपास करत आहेत.

माहीममधील रहिवासी असलेले ५८ वर्षीय तक्रारदार हे बेस्टमधून अधिकारी पदावरून डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले. बेस्टमध्ये काम करत असताना एका सहकाऱ्याने त्यांना पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास  एका महिन्यात पैसे दुप्पट परतावा मिळत असल्याचे सांगितले 

..त्यानुसार, त्यांनीही सहकाऱ्यासोबत गुप्ता याच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली. गुंतवणुकीसाठी आलेल्या लोकांची गर्दी बघून तक्रारदार यांना देखील दामदुप्पट विश्वास बसला. त्यांनी भेट घेताच, गुप्ताने ३० दिवसांत दुप्पट परतावा ही योजना बंद झाली असून ४५ दिवसांत दुप्पट अशी आकर्षक योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

 

गुप्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने १ लाख ८० हजारांची गुंतवणूक केली. आणखीन काही जणांनी सात लाख रुपये गुंतवले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा देण्याची तारीख उलटून गेली. मात्र परतावा न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मागितली. तोपर्यंत गुप्ता पसार झाला होता.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 15, 2025

PostImage

वनविभागाचे अधिकारी गस्त करीत असतांना जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेले ईसम जेरबंद


वनविभागाचे अधिकारी गस्त करीत असतांना जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी आलेले ईसम जेरबंद 

 

वरोरा:-

तालुक्यातील जवळच असलेल्या महालगाव (खु.) कक्ष क्र. २ राखीव वनामध्ये दिनांक १३ फेब्रुवारी रोजी रात्री ०९.३० वाजताचे दरम्यान वनकर्मचारी एस. के. शेंडे व.प.अ. वरोरा, डि. बी.चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्रम्हणाथ वनरक्षक रामपुर, रोजनदारी वनमजुर व पि.आर.टी. टिम गस्त करीत असतांना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापुर पो. कोसरसार ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व संदिप बालीकचंद्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर हे कक्ष क्र. २ राखीव वनामध्ये संक्षयास्पद अवस्थेत आढळुन आले. त्यांची विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आल्याचे सांगितले.

त्यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आलेले असुन त्यांचावरभारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, २ (१६) व ५१ अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना त्याब्यात घेऊन कोर्ट विद्यमान प्रथम न्यायलय वरोरा येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हजर करण्यात आले. पुढील चौकशी व्हि. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा डि. बी. चांभारे क्षे.स. जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्हि. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ वनरक्षक करीत आहे..


PostImage

Vaingangavarta19

Feb. 14, 2025

PostImage

पुलखल ग्रामसभेत ग्रामस्थांनी विमानतळास जमीन देण्यास केला विरोध 


पुलखल ग्रामसभेत ग्रामस्थांनी विमानतळास जमीन देण्यास केला विरोध 

 

 


गडचिरोली : शेती हेच गावातील नागरिकांचे उपजिविकेचे एकमेव साधन असून विमानतळामुळे गावातील तलाव, बोळी, नाले, गुरे चराईचे झुडपी जंगल आणि शेतीक्षेत्र नष्ट होणार असल्याने कोटगल उपसा जलसिंचनाचे लाभक्षेत्र असलेल्या सूपीक शेतजमिनी विमानतळाकरीता भूसंपादीत करण्यासाठी ग्रामसभेची शिफारस देणार नाही, असा ठराव पारीत करत पुलखल ग्रामसभेने गावाच्या हद्दीतील भूसंपादनास विरोध केला आहे.

अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पुलखल ग्रामसभेने बुधवारला ग्रामसभा घेवून सदरचा ठराव पारीत केला. या ठरावात ग्रामसभेने म्हटले आहे की, प्रस्तावित विमानतळ गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता मोलाचे योगदान देणारे ठरणार आहे.

मात्र सदर विमानतळा करिता प्रास्तावित ठिकाण हे आमच्या पुलखल गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील सुपीक जमिनीचे असून याच शेतजमिनींवर गावातील शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. पुलखल गावाच्या हद्दीतील तलाव, बोळी व झुडपी जंगलाची काही जमीन यात समाविष्ट असल्याने गावातील उर्वरित शेत जमिनीचे व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट होणार आहे.

गडचिरोली - चंद्रपूर या महामार्गाला जोडणारा पुलखल गावाचा मुख्य रस्ताही कायमचा बंद होणार आहे. गावाचे पारंपारिक देवस्थान एक बोटी माऊली व इतर श्रद्धास्थाने ही नष्ट होणार आहेत. तसेच मुरखळा गावाच्या हद्दीतून पुलखल - मुडझा गावाच्या सीमेवरून असलेल्या नाल्याला वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची दाब (बॅकवॉटर) मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या राहते. विमानतळामुळे सदर नाला (वगर) बुजविल्या जाणार असल्याने पुलखल - मुडझा रस्त्याला व शेतीला पुराचा मोठा फटका बसणार आहे.

त्यामुळे विमानतळाकरिता पुलखल गावाच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, तलाव, बोळी, झुडपी जंगल, नाला (वगर) व इतर जमीन भूसंपादित करणे हे पुलखल गावातील शेतकरी व इतर नागरिकांवर भविष्यातील उपासमारी आणणारे, शेत जमिनींचे क्षेत्र कमी करणारे, जमिनीच्या मालकी हक्क आणि गावाच्या सामूहिक मालमत्तांच्या मालकी हक्क हिरावणारे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

पुलखल गावाच्या संबंधात अनुसूची क्षेत्रातील कायदे व नियमा अन्वये प्राप्त अधिकारानुसार विमानतळा करिता पुलखल गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गावाच्या सामूहिक साधन संपत्ती असलेल्या बोडी, तलाव, नाला व झुडपी जंगलाच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येऊ नये व त्या संबंधातील ग्रामसभेची शिफारस शासनाकडे करण्यात येऊ नये, तसेच जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामसभेकडे मागणी करण्यात आलेली भूसंपादनाची शिफारस आमच्या आजच्या ग्रामसभेने नाकारावी असा ठराव पारित करण्यात येत असल्याचेही ग्रामसभेने आपल्या ठरावात म्हटले आहे.

तथापि सदर विमानतळाकरिता कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनी, गावाच्या सामूहिक मालमत्ता असलेल्या बोडी, तलाव, नाले, झुडपी जंगल अशा जमिनींचे भूसंपादन करून अनुसूची क्षेत्रातील नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्या ऐवजी चामोर्शी रोड वरील सेमाना देवस्थान समोरील व गडचिरोली शहराला लागून असलेल्या जंगलाच्या जागेत सदर विमानतळ प्रस्तावित करण्यात यावा, अशी सूचना पुलखल ग्रामसभेने शासनाकडे केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 14, 2025

PostImage

मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड


मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड

डोंगरगाव :-मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावचे सुपुत्र मंथन अण्णासाहेब मोहिते यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यपदी निवड झाली आहे.त्यांनी अत्यंत जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करून आपली वर्णी लावली आहे.त्यांनी 1 ली ते 4 थी प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथ. शाळा कचरेवाडी, 5 वी ते 10 वी चे शिक्षण  इंग्लिश स्कूल मंगळवेढा, उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी कॉलेज मंगळवेढा, सिव्हिल इंजिनिअर प्रशिक्षण नांदेड येथे पूर्ण केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आ. समाधान आवताडे, युटोपियन शुगरचे सर्वेसर्वा उमेश परिचारक, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते,कचरेवाडीचे माजी सरपंच बाळदादा काळुंगे, दादा जाधव, डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे, दैनिक अचूक निदानचे संपादक डी. के. साखरे,  वैनगंगा वार्ता न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक अशोक खंडारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के यांच्यासह मंगळवेढा पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 13, 2025

PostImage

नक्षलवाद विरोधी अभियान राबविताना गडचिरोली पोलीस दलातील पुन्हा एका जवानाचा मृत्यू 


नक्षलवाद विरोधी अभियान राबविताना गडचिरोली पोलीस दलातील पुन्हा एका जवानाचा मृत्यू 

गडचिरोली
                   भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील फुलणार च्या जंगलात पोलिस - नक्षल चकमकीत एक जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच. नक्षलविरोधी अभियान राबविताना पुन्हा एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. भामरागड तालुक्यातील कोठी - हलवेर भागात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना C 60 पथकातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना आज दिनांक 13 डिसेंबर गुरूवारी सकाळच्या सुमारास घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  
  रवी मधू मटके रा.गोकुळ नगर ताजी गडचिरोली असे असे त्या. मृत जवानाचे नाव आहे.


     नक्षलवाद विरोधी पथकातील दोन दिवसांच्या आड दोन जवानाना गमवावे लागल्याची वेळ गडचिरोली पोलिसावर आल्यामुळे शोकाकळा पसरली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2025

PostImage

नामदेवची आत्महत्या नसून खून केल्याची कबुली दिली आरोपींनी एक वर्षानंतर


नामदेवची आत्महत्या नसून खून केल्याची कबुली दिली आरोपींनी एक वर्षानंतर 


वणी : राजूर कॉलरी येथे एका विहिरीत सापडलेल्या इसमाच्या मृतदेहाचे रहस्य तब्बल एक वर्षानंतर उघड झाले. याप्रकरणी तिन संशयित आरोपीला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ती आत्महत्या नसून हत्याच केल्याचं नामदेव च्या मारेकऱ्यांनी कबुली दिली.

नामदेव शेनूरवार चा मृतदेह मागील वर्षी मार्च 2024 मध्ये रंगपंचमी च्या दिवशी रेल्वे सायंडींग परिसरातील एका पडक्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दिनांक 25/03/2024 रोजी पोलीस स्टेशन वणी येथे तक्रार नोंद केली होती. मात्र, हा खून अनैतिक संबंधातून आता झाल्याचे उघड झाले आहे. सिद्धार्थ मारुती शनुरवार (वय 34), दिवाकर शंकर गाडेकर (वय 28) व पिंटू उर्फ प्रवीण वामन मेश्राम (वय 39) तिन्ही रा. राजूर कॉलरी असे अटक आरोपीचे नाव आहे. या तिघांनी मिळून प्लॅन केला आणि मृतक नामदेव ला दारू पाजून गावाच्या निर्जनस्थळी नेवून तिथे लाथाबुक्क्यानी मारहाण केली, त्यानंतर त्याला विहिरीत फेकून दिले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार नामदेव शेनूरवार याच्या नात्यातच असलेल्या आरोपींनी कट रचून त्याला ठार केले. जवळपास एक वर्षानंतर नामदेवची हत्या करणारे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिल्याचे सांगण्यात येत आहे. नामदेव शेनूरवार याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या तीनही आरोपींवरपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला गुन्ह्याचा साक्षीदार बनविल्याचे सांगण्यात येत आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि निलेश अपसुंदे, अविनाश बनकर, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, रितेश भोयर यांनी केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2025

PostImage

सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषेचाच वापर करावा महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय


सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषेचाच वापर करावा महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य; राज्य सरकारचा मोठा निर्णय; मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई 


मुंबई-
 मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठा भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला अलिकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेचे महत्व टीकविण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचे संवधर्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे.

मराठी भाषा बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावावा लागणार आहे. शासकीय कार्यालयांतील संगणकावरील कळफलक देखील मराठी भाषेतच असणार आहे. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अनुसार  सर्व शासकीय कार्यालयांतील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असतील आणि  कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे आणि संकेतस्थळे मराठीत असतील याची काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केले आहे.  मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2025

PostImage

भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अविशांत पांडा


भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अविशांत पांडा 

 

 

गडचिरोली दि. १२: सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.

आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मूलन आढावा सभा पार पडली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता भ्रष्टाचाराला सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, काही अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे सांगून भ्रष्टाचाराला सहकार्य करतात, असे खोटे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भ्रष्टाचाराच्या घटनांवर स्वायत्तपणे कारवाई करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कठोर मोहिम राबवावी आणि भ्रष्टाचाराच्या घटनांवर आक्रमक कारवाई करावी 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याचे सांगताच प्राप्त तक्रारींवर वेळीच कारवाई करून दोषींना कायदेशीर शिक्षा द्यावी, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रभावी कारवाईसाठी सापळे रचून भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडावे आणि त्यांच्यावर कठोर पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ठोस पावले

या बैठकीत जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, प्रशासन भ्रष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. नागरिकांनी भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने प्रशासनाची भूमिका ठाम असून, कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी पंडा यांनी या बैठकीत दिला.

बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एक जवान शहीद


गडचिरोली जिल्ह्यात भामरागड परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एक जवान शहीद 

गडचिरोली:-
भामरागड तालुक्यात पोलिस नक्षल चकमक उडाली असुन यात एक पोलिस जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.

भामरागड तालुक्यातील जंगल परिसरातील दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे, काल दिनांक 10/02/2025 रोजी अपर पोलिस अधीक्षक प्रशासन आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वाखाली १८ सी ६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटी चे 2 पथक रवाना करण्यात आले होते.

सदर ठिकाणी आज सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली असता दिवसभरात नक्षलवादी आणि पोलीस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून नक्षल साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत.

सदर कारवाईदरम्यान सी ६० पथकाच्या एका जवानाला गोळी लागून दुखापत झाली असून सदर जवानास तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाला सदर अंमलदार महेश नागुलवार रा.अधखोडा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे त्यांचे नाव असून  उघा दि.१२/०२ २५ ला शासकीय इतमामात अनखोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे महेश यांचे पच्शात आई, पत्नी व दोन मुली आहेत त्यांना विरमरण आल्याची माहिती मिळताच अनखोडा गाव शोकमग्न झाले आहे व त्यांच्या परिवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला ओढणीने गळा आवळून खून केला व गुन्हा लपविण्यासाठी तीला टाकले जाळून


 प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला ओढणीने गळा आवळून खून केला व गुन्हा लपविण्यासाठी तीला टाकले जाळून

 

अवघ्या काही तिसातच पोलीसांनी केली आरोपीस अटक

 

गोंदिया : प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या युवतीला जाळून तिची हत्या केल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील मसगाव ग्रामपंचायत हद्दीतील देऊ तुला शिवारात दि. 10/02/2025 रोज सोमवार ला सकाळी 8:00 वा. दरम्यान उघडकीस आली.

पोर्णिमा विनोद नागवंशी वय, 18 वर्ष रा. मानेकसा (कालीमाती) पो. ठाना ता. आमगाव असे मृत्तक युवतीचे नाव आहे. सविस्तर असे की, गोरेगाव शहरापासून काही अंतरावर देऊटोला हे गाव असून शेतमालक दिसेल पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना पळसाच्या झाडाखाली युतीचा मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली.

ठाणेदार अजय भुसारी यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथे पाठविण्यात आला, विशेष म्हणजे, घटनास्थळाशेजारी दुसऱ्या बांधातील तणसाचा ढीग जाळण्यात आला. स्वानपथकाला पाचारण करण्यात आले असता, काहीही साध्य झाले नाही.

यातच पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडाने यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तपासाचे चक्र फिरवीत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले.

खून अनैतिक संबंधातून आरोपी अटकेत : -पोलिसांनी तपास चक्र फिरवत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून गरोदर झाल्यामुळे तिच्या ओढणीने गळा आवळून खून केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. शकील मुस्तफा सिद्दिकी वय, 38 रा. मामा चौक गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

मृत तरुणीची ओळख पटली असून ती आरोपीच्या वीट भट्टीवर काम करीत होती. दरम्यान आरोपीने तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती होती. तिने आरोपी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली असता, आरोपीला ते मान्य नव्हते. तेव्हा तिच्यापासून सुटका करण्याकरिता बबई देऊटोला शिवारात आणून ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलीस तपासात कबूल केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

 अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार,आरोपीची बालसुधारगृहात रवानगी


 अल्पवयीन मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार,आरोपीची बालसुधारगृहात रवानगी 

चंद्रपूर : जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्यांतर्गत पडोली-घुग्घुस मार्गावर असलेल्या चिंचाडा गावाजवळच्या एका वीटाभट्टीवर काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घृणित कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीचे आई-वडील चिंचाडा गावाजवळच्या एका वीटभट्टीमध्ये काम करतात. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आई-वडील त्यांच्या मुलीला झोपडीत झोपवून कामावर गेले होते, तेव्हा तिथे काम करणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने मुलीला एकटे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई-वडील तातडीने झोपडीत पोहोचले आणि अल्पवयीन मुलाला पकडले. मुलीच्या आई-वडिलांनी पडोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडून बाल सुधारगृहात पाठवले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (अ) आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

कब्बडी स्पर्धा पाहायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा गावाजवळील शेतशिवारात संशयास्पद मृत्यू


 कब्बडी स्पर्धा पाहायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा गावाजवळील शेतशिवारात संशयास्पद मृत्यू 

 

  मृत्यूचे कारण अस्पष्ट 

 

   आष्टी -
   आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जैरामपूर येथे 25 वर्षीय अविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 फेब्रुवारीला सोमवारी उघडकीस आली.

   सुभाष मारोती गेडाम वय 25 वर्ष रा. जैरामपुर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक तरुणाचे नाव आहे.
  
  मृतक सुभाष मारोती गेडाम  कब्बडी पाहण्यासाठी बाहेर गावी जात आहे असे सांगून राहत्या घरातून रवीवारी  घराबाहेर पडला मात्र रात्री उशिरापर्यंत सुभाष घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली.10 फेब्रुवारी सोमवारी सकाळच्या सुमारास सुभाष याचा मृतदेह गावालगत असलेल्या शेताच्या पाळीवर आढळून आला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा करून त्याचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात  शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्प्रयात आला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे आष्टी  पोलीस या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करीत असुन शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.मृतक सुभाष हा शेतीची कामे करायचा. या घटनेमुळे जैरामपूर परीसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. अधिक तपास आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करित आहेत 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

आपल्या शेतजमीनीत खुरपण करीत असताना विषारी सापाने केला दंश, उपचारासाठी नेत असताना वाटेतच महिलेचा मृत्यू


 आपल्या शेतजमीनीत खुरपण करीत असताना विषारी सापाने केला दंश, उपचारासाठी नेत असताना वाटेतच महिलेचा मृत्यू 

आष्टी -
   आपल्या शेतजमिनी मध्ये खुरपणाचे काम करीत असताना विषारी सापाने दंश केल्याने शेतकरी महीलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना अनखोडा येथे 8 फेब्रुवारी शनिवारी घडली.

   शेवंता सुरेश घ्यार वय 51 वर्ष रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.

     सविस्तर वृत्त असे की,शेवंता घ्यार आपल्या शेतात काम करीत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला.नातलग शेजारी यांनी त्यांची प्रकृती बिघडताच त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच अनखोडा गावात शोककळा पसरली. मृतक शेवंता यांच्या पश्चात पती एक मुलगा व मुलगी असा आप्त परिवार असुन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2025

PostImage

जिवापाड प्रेम करणारा मीत्र ह्याने केले मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार,त्याच्याच मित्रांनी व्हिडिओ काढून केले व्हायरल हे करणाऱ्या जोडप्यालाही केली अटक


जिवापाड प्रेम करणारा मीत्र ह्याने केले मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार,त्याच्याच मित्रांनी व्हिडिओ काढून केले व्हायरल
हे करणाऱ्या जोडप्यालाही केली अटक


भिवंडी:-
भिवंडीत २२ वर्षीय तरुणानं आपल्या १९ वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दुसऱ्या मित्रासह मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे 
 भिवंडी शहरातील कामतघर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच एका मित्रानं कट रचून अत्याचार केल्याची धक्कादायक घडली. अत्याचाराचा अश्लील व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार करणाऱ्या मित्रासह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मित्राला आणि मैत्रिणीला बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.

काय आहे घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "२९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मित्र हा पीडित मुलीला फिरण्याच्या बहाण्यानं बाहेर घेऊन गेला. त्यानंतर एका लॉजमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे, अत्याचार करतानाचा अश्लील व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. या कटात त्याला साथ देणाऱ्या दुसऱ्या मित्राला आमि मैत्रिणीला बेड्या ठोकल्या आहेत."
आरोपीला १२ फ्रेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी : अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि या घटनेच्या एक महिन्यानंतर पीडितेनं भिवंडी शहर पोलिसांकडं तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी, त्याचा मित्र आणि मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता "या प्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. आरोपींना १२ फ्रेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे," अशी माहिती त्यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2025

PostImage

महीला पोलीस उपनिरीक्षक यांना  30 हजार रुपये लाच घेताना  पकडले रंगेहाथ


महीला पोलीस उपनिरीक्षक यांना  30 हजार रुपये लाच घेताना  पकडले रंगेहाथ 


नागपूर:- पोलीस दलात लाचखोरीच्या मोठ्या प्रमाणात उत आले आहे. येथे मागील 24 तासांत पोलिस अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या दोन घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. त्यात महीला पोलीस पण मागे नसल्याचे दिसून येत आहे.

चोरीच्या गुन्ह्यातील आरोप टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. ज्योत्स्ना प्रभू गिरी असे या लाचखोर महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्या नागपूर जिल्हातील बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्त आहे.

लाचखोर आरोपी महिला पोलिस अधिकारी बुटीबोरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे आणि ती गुन्हे शोध पथकाची प्रमुख आहे. एक 26 वर्षीय तक्रारदार तरुण बुटीबोरी परिसरात राहतो. एमआयडीसी बोरी पोलिसांनी त्याच्या मित्राला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी ज्योत्स्ना गिरी यांच्यावर होती. पोलिसांना तक्रारदाराचा मोबाईल नंबर त्याच्या मित्राच्या मोबाईल फोनवर सापडला. म्हणून ज्योत्स्नाने तक्रारदाराला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले होते.

यावेळी पोलिसांनी चौकशीदरम्यान त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला. त्याला चोरीच्या आरोपात अडकवण्याची धमकी देण्यात आली. त्याच्यावर खोटे आरोप दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू झाली. यामुळे तक्रार करणारा तरुण घाबरला. गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ज्योत्स्नाने तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोड झाल्यानंतर, तिने 30 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तर तरुणाने ज्योत्स्ना विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

तरूणाने दिलेल्या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर, ज्योत्स्नाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. गुरुवारी संध्याकाळच्या सुमासर ज्योत्स्नाने तक्रारदार तरूना कडून तिच्या खोलीत 30 हजार रुपयांची लाच घेताच, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले. आता पुढील चौकशी असू असल्याची माहिती समोर आली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2025

PostImage

 वनपालाने  घेतली 83 हजारांची लाच. अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात


 वनपालाने  घेतली 83 हजारांची लाच. अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात

 

आलापल्ली:-

घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन कार्रवाई टाळण्यासाठी 83 हजारांची लाच घेताना आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कार्यरत वनपाल लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असुन मारोती गायकवाड असे त्या लाचखोर वनपालाचे नाव आहे. ही कारवाई 8 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.वन विकास महामंडळ प्रकल्प आलापल्लीतील आलापल्ली वनपरिक्षेत्रात समाविष्ट आपापल्ली उप क्षेत्रातील ताणबोडी बीटातून फिर्यादी घरकुल बांधकाम करण्यासाठी माती वाहतूक करत होता सहा फेब्रुवारी रोजी एफडीसीएमच्या आल्लापल्ली कार्यालयातील वनपाल मारुती गायकवाड आणि वनमजुरांनी सदर ट्रॅक्टर पकडून दुसऱ्या दिवशी तडजोडी साठी कार्यालयात बोलावले मारुती गायकवाड यांनी फिर्यादीला तब्बल एक लाख दहा हजाराची मागणी केली तडजोड अंती एक लाख देण्याचे ठरले 17000 दंड पकडुन त्यांनी 83 हजार परस्पर रक्कम स्वीकारले मात्र फिर्यादीला लाभ देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या पथकाकडे याची आधीच तक्रार केली होती एसीबीच्या पथकाने आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मारुती गायकवाड यांना लाच स्वीकारताना आ ल्लापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात रंगेहात पकडून ताब्यात घेतले

     ही कारवाई गडचिरोली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2025

PostImage

गडचिरोली - छतिसगढ सीमेवर पोलिस नक्षलवादी चकमक ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद


गडचिरोली - छतिसगढ सीमेवर पोलिस नक्षलवादी चकमक ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद 

 

विजापूर:-
 गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगढ राज्यामध्ये मध्ये रविवारी (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात झालेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. तर दोन जवान शहीद झाले व दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

        छत्तीसगडमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या आधी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये  मोठी चकमक झाली. डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर सैनिकांनी चकमकीत ३१  नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. बिजापूर जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील राष्ट्रीय उद्यान परिसरात सकाळपासून ही चकमक सुरू आहे. बस्तर पोलिसांनी चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. सध्या इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बस्तर पोलिसांनी सांगितले की, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. शोध मोहीम सुरू आहे.

या कारवाईत सुरक्षा दलांनी अनेक स्वयंचलित शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा देखील जप्त केला आहे. या चकमकीत अनेक वरिष्ठ नक्षलवादी कमांडरही सामील असल्याचे मानले जात आहे, ज्यांना घेरण्यात आले आहे.

    बिजापूरच्या या भागात पंचायत निवडणुकीपूर्वी सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. सुरक्षा दलांना आधीच संशय होता की नक्षलवादी मोठी घटना घडवण्याचा कट रचत आहेत, म्हणून कारवाई तीव्र करण्यात आली. या चकमकीनंतर पोलिस प्रशासनाने आजूबाजूच्या भागात गस्त वाढवली आहे आणि सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 8, 2025

PostImage

एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन


एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन

नागपूर:-

 एका इसमाने बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३३ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या पुरूषाने महिलेसोबत दारू प्यायली होती. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला.

हुडकेश्वर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. परंतु जीएमसीएचमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासणी केली आणि असे आढळून आले की महिलेच्या मानेवर गळा दाबण्याच्या खुणा होत्या आणि त्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता.

सदर  महिलेचे अनेक लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलीसह नागपूरला आली होती. नागपूरला आल्यानंतर त्यांचे अनेक लोकांशी संबंध निर्माण झाले होते. आतापर्यंतच्या तपासात किमान दोन नावे समोर आली आहेत. पतीव्यतिरिक्त, पोलिसांना इतर अनेक लोकांवरही संशय आहे.

आरोपी महिलेच्या घरी वारंवार येत असे तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की आरोपी अनेकदा महिलेच्या घरी येत असे. दोघेही तिथे एकत्र दारू प्यायचे. तो त्या महिलेला काही पैसे देऊन निघून जायचा. हत्येच्या दिवशी महिलेने आणखी पैशांची मागणी केली. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने रागाच्या भरात महिलेचा गळा दाबून खून केला.
अधिक तपास पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार जागीच ठार


दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार जागीच ठार 

 

 पुसदः शहरासह तालुक्यात अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. दर एक दिवसाच्या अंतराने कुठे ना कुठे अपघात घटना घडत आहे. दोन दिवसा अगोदर काटखेडा व कासोळा येथे भीषण अपघात घडले या घटनेला ४८ तास उलटले असताना आज निंबी जवळील भवानी टेकडी जवळ एका अपघातात हिवाळी (त) येथील दुचाकीस्वाराचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव मनोज बळीराम आडे वय ३६ वर्ष रा. हिवळनी (त) ता. पुसद जि. यवतमाळ असे आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, आज दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:०० वाजण्सुयाच्या सुमारास हिवळणी येथील रहिवासी असलेले माजी सरपंच मनोज बळीराम आडे वय ३६वर्ष हा मुलांच्या शिक्षणासाठी पुसद येथे राहत होता. तो सकाळी पुसद वरून हिवाळी येथे आपल्या होंडा यूनिकॉर्न दुचाकी क्रमांक एम एच २९सिजी १७७०गावी जात असताना शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी जवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरच्या वळणाच्या रस्त्यावर या दुचाकीस्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली. व दुचाकीस्वार दगडावर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक प्रथम दर्शनीनी वसंत नगर पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. असता या अपघातात मृत्युमखी पडलेल्या इसमाची ओळख पटवली व मृतदेह शासकीय उपजिल्हा पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत रस्त्याच्या सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले असते, तर हा अपघात एवढा भीषण झाला नसता. हे सुद्धा तेवढेच सत्य. घटनेचा उर्वरित तपास वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या 


जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या 

 

 गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाला पाण्यात विष मिसळून पाजलं. या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर ४७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आरोपी पित्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

अहमदाबादमध्ये एका पित्याने १० वर्षांच्या मुलाला सोडियम नायट्रेट नावाचे विषारी द्रव्य पाजून त्याची हत्या केली. अहमदाबादच्या बापूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कल्पेश गोहेल याने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्याने तसे केले नाही.

मंगळवारी झालेल्या घटनेनंतर गोहेलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कृत्य करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी उलट्या थांबवण्यासाठी मुलगा ओम आणि १५ वर्षांची जियाला औषध प्यायला दिले होते. यानंतर वडिलांनी सोडियम नायट्रेटयुक्त पाणी ओमला प्यायला दिले.

आरोपीने आपल्या मुलांना विष देऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु आपल्या मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून तो घाबरला आणि घरातून पळून गेला. पाणी प्यायल्यानंतर लगेचच मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यानंतर मुलाला मृत घोषित केले. कल्पेश गोहेल हा त्याची दोन मुले, पत्नी आणि आई-वडिलांसह राहत होता. कल्पेश गोहेलने आधी आपल्या दोन मुलांना औषध दिले आणि नंतर पत्नी बाहेर असताना त्याने आपल्या मुलाला विषयुक्त पाणी प्यायला लावले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

 मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश


 


 मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

गडचिरोली, दि. 6: महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, निवास, विशेषत: स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेच्या पूर्वनियोजना आढावा जिल्हाधिकारी यांनी आज मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, तहसिलदार प्रशांत गोरूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पथदिवे, मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात, त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश

सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून यात्रेच्या तयारीत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

अतीवेगात  तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच ठार तर दोन गंभीर


अतीवेगात  तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच ठार तर दोन गंभीर 

 

 


भद्रावती(दि.6 फेब्रुवारी) :- तिघेजन बसून भरधाव दुचाकी उडान पुलाच्या कठड्यास जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला. असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना दि.५ बुधवार ला रात्री ११ वाजता शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. जखमी दोन्ही युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अमोल भिंगारदिवे वय २२, सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवे कडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली.या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले, मृतक ला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे, शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या 


अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

 

 राहुरी:-

कोणीही आपल्या मुला, मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये- पो. नि. ठेंगे.काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. 

राहुरी तालुक्यातील मोकळा येथील विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ या आरोपी तरुणाने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटने संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीवर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.स दरील गुन्ह्यातील आरोपी विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ, वय २४ वर्षे, रा. मोकळ मोहोळ, ता. राहुरी, याला राहुरी पोलिस पथकाने दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज चालू आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.

अशा घटना टाळण्यासाठी राहुरी पोलिसांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की, कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे , गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखार सय्यद, सचिन ताजने आदि पोलिस पथकाने केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा इसमाने केली मारहाण, पोलीसांनी केला दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल


घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा इसमाने केली मारहाण, पोलीसांनी केला दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल 

राहुरी:-
तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत, असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी सासू व सुनेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली. अनिता विजय बोरकर, वय ३० वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.४५ वा. चे सुमारास अनिता बोरकर व त्यांची सासु उषा अण्णासाहेब बोरकर अशा दोघीजणी त्यांच्या घरात स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी बोरकर यांच्या घरात घुसले व म्हणाले की, तुझा नवरा कोठे आहे, असे म्हणुन ते शिवीगाळ करु लागले. त्यावेळी अनिता बोरकर यांची सासु उषा त्यांना म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत. असे म्हणालेचा त्या दोघांना राग आला. त्यांनी दोघींना शिवीगाळ दमदाटी करत हाथाच्या चापटीने मारहाण केली.
 अनिता बोरकर यांच्या गळयातील मनीमंगळसुत्र ओढुन नुकसान केले. तसेच सासु उषा यांच्या गळयातील मणीमंगळसुत्र झटापटीत तुटुन गहाळ झाले आहे. त्यानंतर पुन्हा आमचे नादी लागलातर एका एकाला जिवे ठार मारुन टाकु, अशी आरोपींनी धमकी दिली. अनिता विजय बोरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब जनार्धन शेळके व राहुल जर्नाधन शेळके, दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३२४ (४), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर


आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर

 


प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची हमी आणि गाव तेथे रस्त्याचे नियोजन करा- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके 

 

गडचिरोली, दि. ६: आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४८२ कोटी ३६ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

निधीवाढीसह प्रस्ताव सादर
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर्वी १९७ कोटी ९६ लाख रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कार्यान्वयन यंत्रणेकडून २८४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आल्याने एकूण ४८२ कोटी ३६ लाखांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

गाव तेथे रस्ता – आदिवासी विकास मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील प्रत्येक गाव रस्त्याने जोडला जावा, यावर भर देण्याचे व ‘गाव तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बैठकीत दिले.

शिक्षणाला प्राधान्य – प्रत्येक विद्यार्थ्याला संधी

शाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या सुविधा अधिक सुटसुटीत आणि सर्वसमावेशक करून आदिवासी समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळण्यासाठी  पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास यावर भर देवून महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची गरज असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. 


या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (एटापल्ली) तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदिवासी वार्षिक उपयोजनेचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम


पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम  

सुंदरनगर:-
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवनात पुढे जान्याचा मार्ग मीळतो असे मनोगत शाळेच्या क्रीडा व  सांस्कृतीक कार्यक्रम समारोपप्रसंगी  डॉ.लुबना हकीम  यांनी व्यक्त केले
 नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सुंदरनगर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सत्र 2024-2025 मध्ये शिक्षण विभागातर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच विद्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव (ता. अहेरी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, राणी दुर्गावती विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक लोनबले, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य पाल, प्रा. रॉय, स्वर्णकार , वांढरे , तसेच प्राचार्य निखुले उपस्थित होते.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जीवनात महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,"केवळ पुस्तकांचे ज्ञानच नव्हे, तर कला, नाट्य, संगीत आणि खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडते.       ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत, ते त्यांची मेहनत, समर्पण आणि जिद्द यामुळे मिळवत आहेत. परंतु प्रत्येक सहभाग देखील महत्त्वाचा असतो, कारण विजयापेक्षा मोठे असते, ते म्हणजे शिकण्याची वृत्ती आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द."त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना "मेहनत करा, सातत्य ठेवा आणि यश निश्चितच मिळेल" असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

कोयत्याने केला वार,  तरुण गंभीर सिगारेट न दिल्याचा कारण


कोयत्याने केला वार,  तरुण गंभीर सिगारेट न दिल्याचा कारण

 

पुणे : सिगारेट न दिल्याने तरुणानेएका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी ४ फेब्रुवारी च्या रात्री साडेसात वाजता सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली.रंगनाथ जगदेश गुत्तेदार (४०) रा. पिंपळे गुरव यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष धुळे जाधव (२८) रा. पिंपळे गुरव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंगनाथ हे सृष्टी चौकात सिगारेट ओढत थांबले होते.

त्यावेळी संशयित संतोष तिथे आला. त्याने रंगनाथ यांच्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट देण्यास रंगनाथ यांनी नकार दिला. त्या कारणावरून संतोष याने कोयता काढून रंगनाथ यांच्यावर वार करत त्यांना जखमी केले.

लागलीच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली व आरोपीस अटक केली व तपास सुरू आहे 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025

PostImage

कोकणात लपून बसला तरीही मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पोलीसांनी लावला छळा 


कोकणात लपून बसला तरीही मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पोलीसांनी लावला छळा 


पातूर - 

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील पिडीतेच्या वडिलांनी काही दिवसा अगोदर पोलीस स्टेशनला दाखल केली होती. की त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पडून नेले सदर बाबत पोलीस स्टेशनला अज्ञान आरोपी विरुद्ध अप क्र. 396/24 कलम 137 (2) भा न्या संहिता अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी पिडीतेच्या वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणारा इसम हा बलराज संतोष सरकटे वय 20 वर्ष रा. नवेगाव हा इसम असून त्याला त्यांचे वडील संतोष भीमराव सरकटे यांनी पळवून नेण्यास मदत केली आहे.

अशा फिर्यादी यांचे बयानावरून गुन्ह्यात कलम 96 भा.न्या संहिता वाढ करून पिडीतेस फूस लावून पळवून नेण्यास मदत करणारा आरोपींचा वडील संतोष सरकटे यांस ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास करण्यात आला.गुन्ह्याचे तपासा दरम्यान चान्नी पोलिसांनी गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पीडिता व आरोपी बलराज संतोष सरकटे रा. नवेगाव यांचा शोध घेतला असता पिडीता व आरोपी हे चिपळूण रत्नागिरी येथे असल्याचे समजल्याने चान्नी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्या परवानगी घेऊन तपास पथक नेमले व तपास पथकाने कोकणात जाऊन चिपळूण जि. रत्नागिरी येथून पिडीता व आरोपी बलराम संतोष सरकटे यांना रितसर ताब्यात घेऊन दि. 4 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन चान्नी येथे आणले पिडीतेचे पालकासंक्षम तिने बयान नोंदविण्यात आले असून पीडीतेच्या बयानावरून गुन्ह्यात कलम 64 (2) एम भा .न्या.स. सहकलम 3.4.5. (एल) 6.8.1.2. पोक्सो वाढ करण्यात आली असून आरोपी बलराम सरकटे यांस अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी बाळापुर गजानन पडघन, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र लांडे, संजय कोहळे, पो. अंमलदार उमेश सांगळे, अनिल सोळंके, सुधाकर करवते , पो. अंमलदार राजनर्दिनी निधी पुंडगे, हर्षदा मोरे यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरिक्षक संजय कोहळे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

 धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे  शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे : आम. सुधीर मुनगंटीवार


 धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे  शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे : आम. सुधीर मुनगंटीवार

6 फेब्रुवारीला संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार : पणन महासंघाच्या पवार यांचे आश्वासन


चंद्रपूर जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे पैसे संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याबाबतची मागणी माजी मंत्री आम. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याकडे केली आहे. धान खरेदीचे सदर थकीत पैसे 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन हनुमंत पवार यांनी आम. मुनगंटीवार यांना दिले आहे.या संदर्भात आ. मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याशी देखील चर्चा केली. 

 चंद्रपूर जिल्हयातील एकुण १६,६६९ धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदीचे रुपये ९३ कोटी ९० लाख रक्कम थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आम. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांची कैफियत मांडली. आम. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पवार यांच्याशी त्वरित संपर्क साधला व चर्चा केली. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळे याविषयी संवेदनशील रित्या कार्यवाही करावी असे आ. मुनगंटीवार म्हणाले. हनुमंत पवार यांनी 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

उभ्या असलेल्या रेल्वेत झोपलेल्या महीलेवर नराधमाने संधी साधून केला बलात्कार


उभ्या असलेल्या रेल्वेत झोपलेल्या महीलेवर नराधमाने संधी साधून केला बलात्कार


मुंबई :-

 येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात एका मोकळ्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेवर हमाली काम करणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. एका महिलेवर अशा प्रकारे रेल्वेत अत्याचार झाल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा प्लॅटफॉर्मवरील सुरक्षादल कुठे गेले होते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

एक 55 वर्षीय महिला ट्रेननं हरिद्वार या ठिकाणाहून मुंबईत आपल्या एका नातेवाईकासोबत फिरायला आली होती. यावेळी ती रेल्वेत झोपली असताना हमालाने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधम हमालाला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 55 वर्ष पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासह मुंबई फिरायला आली होती. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दोघांनी वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला दोघंही प्लॅटफॉर्मवर झोपले होते. त्यानंतर पीडित महिलेचा नातेवाईक काही कामासाठी तिथून बाहेर गेला. तेव्हा प्लॅटफॉर्मवर एकटीच महिला झोपली होती.

त्यानंतर महिलेला जास्त झोप येत असल्याने तिने बाजुलाच उभ्या असलेल्या मोकळ्या ट्रेनमध्ये झोपायला गेली. तेव्हा ट्रेनमध्ये तिथे कुणीच नव्हतं. दरम्यान, टर्मिनसवरील आरोपी हमालाने महिलेला ट्रेनमध्ये घुसताना पाहिलं. महिलेला डोळा लागताच आरोपी हमालही ट्रेनमध्ये घुसला. तिला एकटीला पाहून आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

थोड्या वेळानंतर पीडित महिलेचा नातेवाईक घटनास्थळी आला, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकाला सांगितला. यानंतर दोघांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला, महिलेसोबत घडलेली आपबिती सांगितली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून नराधम हमाल आरोपीची ओळख पटवली आणि त्याला तत्काळ अटक केली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या गुन्ह्यात इतरही कुणाचा सहभाग आहे का? त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 


 मुंबई : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिरोधकता निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरियावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासह २०१७ मध्ये विविध निर्णय घेण्यात आले होते. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया निर्मूलन टास्क फोर्स सुरू करण्यात आला होता. त्यानुसार, टास्क फोर्सने राष्ट्रीय आणि जागतिक तज्ञांच्या शिफारशींचा समावेश करून गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. गडचिरोलीत येत्या १ एप्रिल २०२५ पासून या आराखड्यातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेट्स फाउंडेशन आणि सन फार्माचेही सहकार्य गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाच्या या कामासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यामार्फतही महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सन फार्मा/एफडीईसी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. सन फार्मा कंपनीच्या FDEC ने मलेरिया निर्मूलनासाठी मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात काम केले आहे. मलेरिया दूर करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गांचे मॉडेल विकसित केले आहे. मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, फील्ड प्रोग्रामचे निरीक्षण करणे, तांत्रिक पुनरावलोकन यासारख्या विविध गोष्टींमध्ये सन फार्मा कंपनीमार्फत मदत करण्यात येणार आहे. गेट्स फाउंडेशन आणि सन फार्मा यांच्या योगदानामुळे गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण मटत मिल शक्तेल असे मख्यमंत्री फटाणतीस यांनी सांगितले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

 चिमुकला भाचा व बहीण यांची भेट ठरली भावासाठी अखेरची, मालवाहू ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास


 चिमुकला भाचा व बहीण यांची भेट ठरली भावासाठी अखेरची, मालवाहू ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास 

 

 

मारेगाव :  बहीण वरोरा येथे वास्तव्यात असतांना तीला चिमुकल्या भाचा यांची भेट घेऊन भाऊ दुचाकीने मारेगावकडे निघाला.मात्र वाटेतच त्याचेवर क्रूर नियतीने डाव साधला. ट्रकने त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक देऊन चिरडून करून अंत झाला. एकुलता एक असलेल्या भावाच्या अकाली मृत्यूने मारेगावात शोककळा पसरली आहे.

गणेश हरिदास बदकी (27) रा. मारेगाव असे ट्रक धडकेत मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.

बहिणीची प्रसूती झाल्याने तीला बघण्यासाठी तो गेला होता.आज बुधवारला सकाळी वरोरा येथून दुचाकीने निघाला.वरोरा वणी मार्गांवरील संविधान चौकात मालवाहू ट्रकने गणेश बदकीच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत तो जागीच गतप्राण झाला. अपघात होताच ट्रक चालकाने वणी पोलिसात आत्मसमर्पण केले.

या घटनेने लाडक्या बहिणीची व तिच्या गोंडस बाळाची भेट भावासाठी अखेरची ठरली. गणेशच्या अचानक दुर्देवी घटनेने मारेगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025

PostImage

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी 


प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - खासदार डॉ नामदेव किरसान यांची संसदेत मागणी 

गडचिरोली :: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून, राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेत गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले.
यावेळी खासदार डॉ. किरसान यांनी, वाढत असलेली महागाई, सिमेंट, गिट्टी, रेती, लोहा सारख्या विविध वस्तूचे वाढते दर लक्ष्यात घेऊन, केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हप्त्यात ग्रामीण भागात किमान 3 लक्ष रुपये पर्यत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली. या सोबतच केंद्र सरकारच्या वतीने सुरु असलेल्या जलजीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून, अजूनही बऱ्याच गावात नळ पोहचले नाही ज्या गावात नळ पोहचले त्या ठिकाणी पाणी नाही आणि पाणी पोहचले त्या ठिकाणी अशुद्ध पाणी मिळत असून नारिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर योजनेच्या अमलबजावणीत सरकारने जातीने लक्ष घालून प्रत्येक नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळेल याकरिता प्रयत्न करण्याची मागणी खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत केली. याचबरोबर गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासी बहुल क्षेत्र असून आदिवासी चे जल जंगल आणि जमिनीवरचे हक्क अबाधित राहण्याकरीता पेसा कायदा तयार करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून यामध्ये ढवळा ढवळ केले जाते हे योग्य नसल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी भावना व्यक्त केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

घरफोड्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


घरफोड्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

चंद्रपुर :-दिनांक ०३/०२/२०२५ रोजी पोउपनि विनोद भुरले व पोलीस स्टाफ अरो पोलीस स्टेशन, रामनगर ह‌द्दीत पेट्रोलीग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, तिन इसम हे घरफोडी केली असुन संशईतरित्या रयतवारी कॉलरी, चंद्रपुर येथे फिरत आहे अशा खबर वरून आरोपी नामे १) राकेश सुब्रहमण्यम सानिपती, वय-३४ वर्ष, धंदा-मजुरी, रा. तेलगु शाळेजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, २) विश्वजीत बिमल सिकदर, वय-३२ वर्ष, धंदा-मजुरी, रा. बंगाली कॉम्प, पाण्याचे टाकीजवळ, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, ३) दिपक राजु भोले, वय-२१ वर्ष, धंदा-मजुरी, रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी पोलीस स्टेशन, भद्रावती तसेच पोलीस स्टेशन, रामनगर येथे घरफोडी केल्याचे सांगितले.त्यावरून नमुद आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी घरफोड्या करून चोरी केलेले सोन्याचे दागीने हे सराफा सोनार नामे मनोज पवार, रा. सराफा लाईन, चंद्रपुर यास विक्री केले असे सांगितले वरून नमुद सराफा दुकानदार यांचेकडुन व इतर आरोपींकडुन सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकुण ३,७१,३००/- रूपयाचा माल जप्त केला आहे. सदर आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापुर, चंद्रपुर शहर येथे चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीताना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोहवा. सतिश अवयरे, नापोशि/संतोष येलपुलवार,, पोशि/गोपीनाथ नरोटे, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

कुरुड येथे ६ फेब्रुवारी एका रात्री  नऊ नाटकांची मेजवानी


कुरुड येथे ६ फेब्रुवारी एका रात्री  नऊ नाटकांची मेजवानी 

नाट्यनिष्ठा व सांस्कृतिक अस्मिता जोपासणारे गाव 


गडचिरोली :पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही जनसामान्य रसिक प्रेक्षकांच्या आश्रयावर आधारलेली नाट्यप्रयोगाच्या लक्षणीय संख्येमुळे लोकप्रिय आहे. दिवाळी ते होळी दरम्यान चालणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीतील विविध सामाजिक, कौटुंबिक, समस्याप्रधान नाटकातून रंजन व प्रबोधन केले जाते. एकाच रात्री अनेक नाटकांचे प्रयोग हाउसफुल चालणारी  अनेक गावे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असण्याच्या मल्टिमीडियाच्या काळातही  झाडीपट्टीमध्ये प्रकर्षाने आहेत. कुरुड ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली येथे सहा फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  शंकरपट व मंडईचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने झुरे मोहल्यात प्रल्हाद नाट्य रंगभूमीचे दत्तप्रसाद एक नाट्य समाज झुरे मोहल्ला आयोजित प्रल्हाद मेश्राम लिखित संगीत ' पेटलेल्या चुली 'श्रीराम मंदिर देवस्थान कमेटी सुभाष वार्ड जय दुर्गा नाट्य मंडळाचे  , कसे तोडू मी मंगळसूत्र' हे नाटक श्री दत्त  प्रासादिक नाट्य समाज पारधी मोहल्ला येथे रंगतरंग नाट्य रंगभूमीचे ' अंधारलेल्या वाटा ',हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ पाटीलपुरा आयोजित  शिवचंद्र नाट्य कला रंगभूमीचे संगीत 'अंधारातील लाल दिवा ', हे नाटक नूतन शेतकरी नाट्य संपदा कांबळी मोहल्ला येथे युवा रंगमंचचे ' लाडका ' हे नाटक ,कस्तुरबा समाज मंदिर ढीवर मोहल्ला येथे स्थानिक मंडळाचे' सौदा सुहासिनीचा' हे नाटक ,पंचशील नाट्य कला मंडळचे गुरुदेव रंगभूमीचे 'आहुती  '९   हे नाटक अशा प्रकारे ग्रामपंचायत असलेल्या कुरुड या गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये एकाच रात्री नऊ नाटकाचे विविध मोहल्यात आयोजन करण्यात आलेले आहे. झाडीपट्टीतील समृद्धता दर्शविणारे एकाच रात्री विविध मोहल्यात एकापेक्षा अनेक म्हणजेच नऊ नाटकाचे आयोजन  करणारे देशातील हे एकमेव गाव असावे. झाडीपट्टीतील नाट्य रसिकता व  नाटक विषयक सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविणारे हे उत्तम उदाहरण आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

चितळ शिकार करणाऱ्या एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी तर एक आरोपी फरार


चितळ शिकार करणाऱ्या एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी तर एक आरोपी फरार

मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्रातील घटना

आष्टी:-

उपवनसंरक्षक आलापल्ली राहुलसिंग तोलिया व मा. सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली आझाद यांच्या मार्गदर्शनात वनविभाग आलापल्ली, वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कंसोबा) अंतर्गत गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजनगर गावाजवळील जंगलात विद्युत प्रवाह सोडून चितळ वन्यप्राण्याची शिकार प्रकरणी एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, एक फरार आहे. रामरतन बकिम मंडल रा विजयनगर तालुका मुलचेरा असे   आरोपीचे नाव असून, तन्मय बुधदेव बाडाई रा विजयनगर तालुका मुलचेरा फरार आरोपीचे नाव आहे. सदर घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. 
मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्राकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी रामरतन मंडल व सोबती तन्मय बुधदेव हे दोघे चितळ वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर जवळील जंगलात १ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास विद्युत प्रवाह सोडला होता. २ फेब्रुवारी रोजी चीतळाची शिकार केल्याची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यानी आरोपी रामरतन मंडल यांचे घर गाठले असता चीतळाचे मास शिजवताना आढळून आले. रात्री ७.३० ते ८ च्या दरम्यान क्षेत्र सहाय्यक आर एल बानोत यांनी गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेतले तर सोबती तन्मय बाडाई हा फरार झाला. आरोपी रामरतन मंडल यास ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६) ९३९४४ (ब) ४९ ( ब ) व ५१ अन्वये ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी पर्यंत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी इनवते यांच्या  मार्गदर्शनात गुंडापल्ली उपक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आर. एल. बानोत करीत आहेत. मार्कंडा कंसोबा परिक्षेत्रात गस्त घालण्यासाठी वनरक्षक जी एम आखाडे, वनरक्षक एस जी राठोड, किशोर आलम, निरंजन मंडल, क्षेत्र सहाय्यक विवेकानंद चांदेकर, अक्षय राऊत, धानोरकर सहकार्य करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

एका चिमुकल्याची चिता जळाली, अन दुसऱ्या भावाच्या मरणाची बातमी कळाली ! त्यांच्या वेदनांचा अतिरेक झाला. अन् अख्खा गाव झाला शोकमग्न


एका चिमुकल्याची चिता जळाली, अन दुसऱ्या भावाच्या मरणाची बातमी कळाली ! त्यांच्या वेदनांचा अतिरेक झाला. अन् अख्खा गाव झाला शोकमग्न 

 


गोंडपिपरी :- महाराष्ट्र तेलंगाना येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धाबा येथील कोंडय्या महाराज देवस्थान येथे यात्रा भरते. माञ हीच यात्रा घडोली येथील चौधरी कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरली. दुचाकी वर बसून यात्रा पाहायला गेलेल्या दुचाकीचा अपघात झाला.

अन् त्यात दोन चिमुकल्याचा दुर्दैवी अंत तर आई वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सदर घटना दि.३१ जानेवारी दुपारी ३:३० वाजता घडली. कोण गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील रहिवासी सुधीर चौधरी आपल्या कुटुंबासह धाबा येथे सुरू असलेल्या कोंडय्या महाराज संस्थान धाबा येथे जत्रा पाहण्यासाठी जात असताना सोमणपल्ली गाव पार करताच रस्त्यात त्यांचा अपघात झाला.

अपघातात संपूर्ण कुटुंबीयाला जबर मार लागला. त्यात सुधीर चौधरी (वय ३४ वर्ष) त्यांची पत्नी शिवानी (वय ३० वर्ष) आणि मुलगा धीरज (४ वर्ष ) आणि लहान मुलगा विरज (वय २ वर्ष) गंभीर जखमी झालीत. लगेच त्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथं उपचार करणे शक्य नव्हते म्हणून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा १ फरवरीला लहान मुलाने दम सोडला. तर दुसऱ्या मुलाला सावंगी येथे भरती करण्यात आल्यानंतर लहान मुलावर घडोली येते अंत्यसंस्कार पार पडतातच लगेच सावंगी रुग्णालयात हलविण्यात आलेल्या मोठ्या मुलाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्याच्यावरही २ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार पार पडले. दोन्हीही मुलांचे प्राण गेले असल्याची माहिती आई वडिलांना नसून त्यांची ही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून ते अजूनही पूर्णता शुद्धीवर आलेले नाही. एवढा भयानक प्रसंग चौधरी कुटुंबावर आला. एवढा भयानक प्रसंग होता ज्यात संपूर्ण कुटुंबाचा जीव टांगणीवर लागला. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार


गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार...


गडचिरोली, ०४ फेब्रुवारी, २०२५::-

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, या जिल्ह्याबाबत वेगळ्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

यासोबतच यंत्रणेने रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 चा प्रारुप आराखडा अंतीम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यादूरदृष्यप्रणालीद्वारे आज घेण्यात आले.या बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल तसेच गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 अंतर्गतगाभा क्षेत्रासाठी 212 कोटी, बिगर गाभा क्षेत्रासाठी 106 कोटी, आकांक्षित जिल्ह्यासाठी 25 टक्के अतिरिक्त निधील रुपये 83.69 कोटी आणि नाविन्यपूर्ण व इतर योजनांसाठी मिळून एकूण 418.45 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला आहे.तथापि, कार्यान्वयन यंत्रणेकडून 823 कोटी रुपयांची निधी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणीसादर करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली हा विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टावर भर देत विविध योजनांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रादेशिक विकास आराखड्याखेरीज मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर, पर्यटन आणि रोजगार निर्मितीस चालना देणाऱ्या योजनांवर भर, तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन लोकसहभागातून विकास आराखडा राबवावा, असेही ते म्हणाले. 2024-25 मध्ये मंजूर झालेला निधी अद्याप का खर्चझाला नाही, काय अडचण आहे,याबाबत विचारणा करून त्यांनी सदर निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारणी, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविणे आणि योजनेंतर्गत खरेदी साहित्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे यासारख्या सूचनाही त्यांनी केल्या.

भौगोलिक आव्हाने आणि विकास निधीची गरज - सहपालकमंत्री जयस्वाल.राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी जिल्ह्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र तसेच या जिल्ह्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल लक्षात घेता रस्ते, आरोग्य, शिक्षण व पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण दुर्गम भागातील रस्त्यांची अत्यंत खराब परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष निधी देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कोणत्या विभागाला किती निधीची मागणी आहे आणि त्यातून कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची सविस्तर माहिती सादर केली.

बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ सचिव आणि जिल्हा कार्यकारी यंत्रणांचेअधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025

PostImage

सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण  संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई हकीम 


सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण  संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई हकीम 

 

अहेरी:-

आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. सी. व्ही. रमण सायन्स कॉलेज आणि भगतराव कला महाविद्यालय, सिरोंचा मध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण व्यक्ती – प्राध्यापक  ए. व्ही. कांताराव आणि वरिष्ठ लिपिक  एफ. एम. शेख यांच्या सेवानिवृत्तीचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. बबलू भैया हकीम यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनोगतात प्रकट केले की, सेवानिवृत्तीचा प्रत्येक क्षण साधारणत: एक नवीन अध्याय सुरू करतो. शिक्षक व कर्मचारी यांच्या समर्पणाची आणि त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानाची नेहमीच कदर करायला हवी. त्यांच्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात शिक्षणाचा प्रभाव यावर देखील त्यांनी भाष्य केले
शाहीन ताई हकीम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. त्या वेळी, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक संदेश दिला की, शिक्षक व कर्मचारी आपल्या जीवनातील आदर्श असतात आणि त्यांचा आदर्श जीवनभर पाठलाग करणे आवश्यक आहे असे भाष्य केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उरकुडे सर यांनी केले. त्यात, त्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या कामगिरीचा उल्लेख केला
यावेळी त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली की, "शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जीवनात केवळ शाळेतील शिक्षण पुरवणे नाही, तर त्यांचा मानसिक, सामाजिक आणि आचारधर्मात्मक विकास होण्यासाठी मार्गदर्शन करणे हेसुद्धा आहे
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक जक्कु सर यांनी केले. त्यामध्ये, त्यांनी सर्व उपस्थितांचा, विशेषतः बबलू भैया हकीम, शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांचे आभार मानले व उपस्थितांचे आभार मानले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 3, 2025

PostImage

आष्टी परिसरात जळाऊ बिट उपलब्ध करून द्या,माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांची मागणी


आष्टी परिसरात जळाऊ बिट उपलब्ध करून द्या,माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांची मागणी 

आष्टी,

 चामोर्शी  तालुक्यातील आष्टी शहरासह परिसरातील मार्कंडा कंन्सोबा,ईल्लूर,कुनघाडा,ठाकरी,रामनगट्टा,अनखोडा,चंदनखेडी खर्डी इत्यादी गावे चपराळा व वन्यजीव अभयारण्य जंगलाला लागून असल्याने या वन्यजीव अभयारण्यातील जंगलात जाण्यास बंदी आहे. गॅसचे दर परवडत नसल्याने आंघोळीसाठी पाणी गरम करणे, स्वयंपाक इत्यादी दैनंदिन जीवनात वापर करावा लागतो त्याकरिता दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व गॅसवर करणे गरीबांना परवडत नसल्याने आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना वनविभागाने जळाऊ राशन कार्डावर बिट उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. हिंदू धर्म रिवाजनुसार मयत ही जाळण्यात येते तसेच आष्टी शहर हे जंगलशेजारीच आहे कोणी मयत झाल्यास त्या कुटूंबियांना धावफळ करावी लागत असून मयत साठी इकडून तिकडून लाकडे आणावी लागत असून आर्थिक भुर्दंड गोरगरीब सामान्य जनतेला पडत आहे. करीता आष्टी शहराजवळील मार्कंडा (कंन्सोबा) येथे वनविभाग (प्रादेशिक) कार्यालय, वनविकास महामंडळ कार्यालय, चपराळा वन्यजीव अभयारण्याचे वनपाल कार्यालय असे तीन वनविभागाचे कार्यालय आहेत. परंतू एकाही ठिकाणी जळाऊ लाकूड उपलब्ध नाही करीता गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या समस्यांसंदर्भात लक्ष देऊन आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना जळाऊ बिट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करुन जळाऊ बिट उपलब्ध करून देण्यात यावे अशीही मागणी भास्कर फरकडे यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी, फक्त बिहार निवडणूक समोर ठेवला 


केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्र विरोधी, फक्त बिहार निवडणूक समोर ठेवला 

नागपूर:-

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचे आज स्पष्ट दिसले. हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे आहे.

आजच्या अर्थसंकलपात बिहार राज्यासाठी विविध घोषणांचा वर्षाव करण्यात आला. तिथून सरकारला टेकू मिळत असल्याने आणि येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने बिहारला झुकते माप मिळाले. पण यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्र हे राज्य केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देत असताना महाराष्ट्रावर वारंवार अन्याय करण्यात येत आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. पण यातून शेतकरी, तरुण ,महिला, सामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण असा कोणताही दिलासा आज मिळाला नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी बियाणे, पीकविमा याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. 
तसेच आज देशात रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असताना रोजगारासाठी, तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने मांडले नाही.

महाराष्ट्रात मेट्रो , रेल्वे साठी निधी दिला असे सत्ताधारी सांगत असतील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद या अर्थसंकलपात करण्यात आलेली नाही. मध्यमवर्गीय टॅक्स मुळे त्रासले होते, केंद्र सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे त्यासाठी टॅक्स मध्ये सूट देण्यात आली. त्यामुळे हे बनवा बनवी बजेट असल्याची भावना आज जनतेत आहे. 

मेक इन इंडियाची नुसती घोषणा झाली पण त्यातून हाती काही लागले नाही त्यामुळे नॅशनल मॅन्यूफॅक्चरींग हे नवीन मिशन आणले आहे,म्हणजे नवीन बाटलीत जुनेच औषध पुन्हा देण्यात येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
 
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटिल हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दि. २८ ते ३० जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, मा. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी  यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून लेझीम पथक व परेडद्वारे पाहुण्यांना पाचारण केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्म्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक श्री. कृष्णामूर्ती गादे यांनी विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होतात. दरवर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के असून मागील वर्षी दहावीतून शिवम पोलोजीवार हा विद्यार्थी आष्टी केंद्रातून प्रथम आला. तसेच गोळाफेक या स्पर्धेत इयत्ता आठवीतील तन्मय फुलझेले हा विद्यार्थी शारीरिक शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच जिल्हास्तरावर विविध खेळात विद्यालयातील विद्यार्थी प्राविण्य पटकाविले. असे बोलून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकवर्गाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रथमत: लेझीम व परेड द्वारे केलेल्या पाहुण्यांच्या स्वागताविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे. 
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल आल्लूरवार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, विद्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकच्या रुपाने आवडत्या क्षेत्राची निवड त्याविषयी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा, स्टेज डेअरिंग निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे तसेच शालेय जीवनात आवश्यक मूलभूत बाबी च्या माध्यमातून व विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार, आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे केंद्र प्रमुख आष्टी,  मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, संस्थेच्या सहसचिव सौ. दिपा आल्लूरवार, सदस्या सौ. भवानी निलम, सौ. सरिता गादे, तसेच शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाल, सदस्या सौ. सपना पांडे, सदस्य श्री. जितेंद्र निमसरकार, म.ज्यो. फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरडे, श्री. कपिल मसराम, शारी. शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय आष्टी, कु. श्वेता कोवे राष्ट्रीय धनुर्विद्या खेडाळू, श्री. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी, श्री. प्रमथ मंडल मुख्याध्यापक शिशु मंदिर पब्लिक स्कूल आष्टी, डॉ. ओ. पी. सिंग प्राध्यापक महिला महाविद्यालय आष्टी, डॉ. पी. के. सिंग सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी, श्री. शरद कोदेट्टीवार, श्री. अनिल बोमकंटीवार, श्री. गणेश सिंगाडे पत्रकार आष्टी, तसेच पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

आता भोग आपल्या कर्माची फळे,महिला पोलीस शिपाई यांचे केले पोलीस निरीक्षक यांनी विनयभंग 


 

आता भोग आपल्या कर्माची फळे,महिला पोलीस शिपाई यांचे केले पोलीस निरीक्षक यांनी विनयभंग

 

 

यवतमाळ:- दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये एक घटना समोर आली असून, एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची छेड काढणाऱ्या ठाणेदाराच्या रायटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा पोलिस स्टेशन येथे कार्यरत एका महिला कॉन्स्टेबलची पोलिस स्टेशन मधिलच ठाणेदाराच्या रायटर ने छेड काढल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी सुरेश काशिराम राठोड हा त्याच ठाण्यात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. त्याने अश्लील शेरेबाजी, विनयभंगासारखी कृत्ये केली आणि पीडितेच्या इच्छेविरुद्ध वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलेने प्रथम सहकाऱ्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. मात्र, आरोपीने आपल्या वर्तनात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अखेर तिने थेट कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कलम ३५४ (महिलेला विनयभंग करण्याचा प्रयत्न), ५०९ (महिलेला अपमानित करणारे कृत्य किंवा शब्द), अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, आरोपीला तडकाफडकी निलंबित करण्याची शक्यता आहे. तसेच, विभागीय चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या घटनेमुळे पोलिस दलात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतच अशा घटना घडत असतील तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी सुद्धा या पोलिस कर्मचार्यावर याच दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल असुन या आधी सुद्धा पोलिस स्टेशनमधील अनेक महिला कर्मचार्यांना मानसिक त्रास देत असुन बदनामी व दबाव पोटी कोणी तक्रार केली नसल्याचे कळते. तालुक्यासह शहरातील अवैध धंद्याच्या वसुलीतही हा पोलिस कर्मचारी माहिर आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025

PostImage

पंचायत समिती माजी सभापती  यांची केली नक्षलवाद्यांनी हत्या 


पंचायत समिती माजी सभापती  यांची केली नक्षलवाद्यांनी हत्या 

 

 

भामरागड;- तालुक्यात नक्षल्यानी पंचायत समिती माजी सभापती याची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे, सदर पंचायत समिती माजी सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या कियेर या गावात झाली असून हत्या केल्या नंतर नक्षल्यानी पत्रके देखील टाकले आहे. त्या पत्रकात नक्षल्यानी उल्लेख केला आहे

(सदर हे लिखाण नक्षली पत्रकाचे असून यात काही बदल केले गेले नाही)

जन दोही और पार्टी द्रोही सुखराम मडाडी (माजी सभापत्ती) जिला गड़चिरोली, तहासील भामरागढ़, केयेर, गांव निवासी को पीएलजीए मौत को सजा दिया !

जन द्रोही सुखराम मडावी भामरागढ़, डोडाराज, और गड़चिरोली जिला, पोलिस प्रसशान के सांठ घांठ होकर लाखों पैसों का लालच में फसकर मुखबीर काम कर रहा था!

नेलगुंड़ा, कउंड़े, पेनगुंड़ा, आलदंडी, पोयोरकोटी, मीडंगुरवेचा, ऐसे कैयों गांव के हमारा जन संगठन कार्यकर्ताओं को पकड़वना जेल ठूंसने का कारण सुखराम मडावी का हाथ हैं!

और सुखराम मड़ावी ग्राम सभा पेसा कानून का विरोध में पेनगुंड़ा गांव में नया पोलिस कैंप बैंठने का और अलग-अगल खदान कोलने के लिए जनता का लाखों करोड़ सम्पत्ती को घरानों कारपोरेट कंपनीयों को सोंपवना, इस कारण से जन द्रोही सुखराम मड़ावी को पीएलजीए ने मौत का सजा दिया गया!और कुछ लोग भी सुखराम से मिल कर दुश्मन से सांठ घांठ होकर लाखों पैसा के लालच में फसकर जन द्रोही मुखबीर काम कर रहा है। और पोलिस कैंप, खदान कोलने में भी हाथ हैं। ऐसे गलत काम नही चोंड़ने से उनको भी सुखराम जैसा सजा दिया जाएगा

माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी ह्याची हत्या १

फेब्रुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नक्षल्यानी गावालगत असलेल्या क्रिकेट ग्राउंड जवळ बेदम मारहाण करून केली. कियेर हे गाव कोठी मदतकेंद्राअंतर्गत येते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण – काम बंद आंदोलनाची तयारी


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण – काम बंद आंदोलनाची तयारी


“मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” कंपनीला ठेका मिळाल्यापासून कामगारांच्या पगार आणि पीएफमध्ये ( PF ) गडबड कायम….


चंद्रपूर  :- चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कंत्राटी कामगारांना “मे. स्मार्ट सर्विसेस प्रायवेट लिमिटेड” या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषणाचा सामना करावा लागत आहे. कंपनीला ठेका मिळाल्यापासून कामगारांच्या पगार आणि पीएफमध्ये गडबड सुरू असून, जुन्या स्थायी कामगारांना कमी करण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
कंपनीने सुरुवातीला काही सुपरवायझर पाठवले होते, ज्यांनी जुन्या कामगारांना कमी करण्यासाठी तडजोड केली आणि नवीन कामगारांची भरती करण्यासाठी 50,000 ते 1 लाख रुपयांची मागणी केली होती. या धोरणामुळे जुन्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. शिक्षणाच्या अपुऱ्या अटी, डॉक्युमेंट्सची अपूर्णता, वयाची अट अशा कारणांसह त्यांना काढून टाकले जात होते. काही कामगारांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला, त्यानंतर थोडा दबाव आल्यानंतर जुन्या कामगारांना त्यांच्या स्थानावर ठेवण्यात आले, मात्र कंपनीने मोठ्या प्रमाणावर नवीन कामगारांची भरती केली, ज्यामुळे कंपनीचे नफा वाढले.

परंतु आता, कंपनी कंत्राटी कामगारांना पगार देण्यास सक्षम नाही. अनेक कामगारांना मागील तीन ते चार महिन्यांपासून पगार नाही मिळाल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यात काही कामगारांना केवळ 7,000 ते 15,000 रुपयांच्या भेदभावात्मक पगाराची रक्कम मिळाली, यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

तसेच, पीएफमध्ये देखील गंभीर भेदभाव दिसून येत आहे. काही कामगारांचे पीएफ 400 रुपयांपर्यंत आहे, तर काहींचे 4000 रुपयांपर्यंत जमा झाले आहेत, ज्यामुळे कामगारांचा हक्क व मेहनतीचे योग्य मोबदला मिळवण्याचे अधिकार संकटात आले आहेत.

या सर्व समस्यांवर शासकीय अधिकारी गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूरातील कंत्राटी कामगारांची समस्या आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. सरकार आणि संबंधित अधिकारी यावर त्वरित कारवाई करतील का? यावरच कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.

कामगारांचा संघर्ष आता एक पाऊल पुढे जाऊन काम बंद आंदोलनच्या रूपात उभा आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याच्या तयारीत आहे. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लवकर कारवाई न केली, तर कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरावे लागेल.

चंद्रपूरमधील कंत्राटी कामगारांचा संघर्ष आता आणखी गंभीर होतोय. काम बंद आंदोलनाच्या इशाऱ्यावर सरकारने योग्य कारवाई केली नाही, तर परिस्थिती आणखी ताणली जाऊ शक


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे कडक कारवाईचे आदेश


अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे कडक कारवाईचे आदेश

 


अवैध वाहतूक आढळल्यास तात्काळ कारवाई आणि वाहन जप्तीचे आदेश

संयुक्त पथकाचे गठण

अनुपस्थित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

दररोज अहवाल सादर करणे बंधनकारक.

गडचिरोली दि. 31: जिल्ह्यातील अवैध गौण खनिज

उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट आणि कडक उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश एका आदेशान्वये आज यंत्रणेला दिले आहेत.

यानुसार जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागांमध्ये स्थायी चेकपोस्ट (FRB कॅबीन) स्थापन करून ते त्वरित कार्यान्वित करण्याचे आणि या चेकपोस्टवर मंडळ अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी आणि नायब तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून8:51 PM | 2.8KB/s

234

जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चेकपोस्टवर दररोज 24 तास (24×7) कर्मचारी आणि पोलिस तैनात करण्याचे आदेश असून, महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र आदेश काढावेत व प्रत्येक वाहनाची ईटीपी तपासणी करून त्याची वैधता निश्चित करण्यासही निर्देश दिले आहेत.

गौण खनिज वाहतूक तपासणी आणि कारवाई*

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांनी प्रत्येक वाहनाची ईटिपी (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) तपासून ती वैध आहे का, याची खात्री करावी. नियमबाह्य उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास, वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत.

या मोहिमेअंतर्गत महसूल, पोलिस आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करून अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल त्यासबधाचा माहिता जिल्हाधिकारा कायालयात गुगल शिटवर अद्ययावत करायचे आहेत.

चेकपोस्टवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियमावली*

सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कोणीही विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

तसेच, वाहन चालक किंवा मालकाकडून गैरवर्तन आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 221 अंतर्गत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईसाठी जप्त केलेली वाहने संबंधित तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात पुढील आदेशापर्यंत ताब्यात ठेवण्याचे निर्देश आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाने आपसी सहकार्याने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक पूर्णतः रोखण्यासाठी प्रयत्नकरण्याचे आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भात कठोर कारवाई करून अवैध उत्खननाला आळा घालावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन

 

अहेरी:-

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनाच्या वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अशा गटप्रवर्तक यांच्या विषयी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अशा मागणीची निवेदन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनातून आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

विधवा महिलेचा असाहयतेचा फायदा घेत ग्रामपंचायत ऑपरेटरने केला विनयभंग


 विधवा महिलेचा असाहयतेचा फायदा घेत ग्रामपंचायत ऑपरेटरने केला विनयभंग

मुल : चार महिन्यापूर्वी पतीचे निधन झाल्याने दोन मुलींसह राहत असलेल्या विधवा महिलेचा खुशाल पाल (३१) याने घरात घुसून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार आहे.

मूल पोलिस ठाणे अंतर्गत बेंबाळ दूरक्षेत्राच्या हद्दीतील फुटाणा येथील महिलेच्या पतीचे सप्टेंबर-२०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे आपल्या मुलींसहमिळेल ती रोजी करून ती कुटुंबाचा गाडा हाकत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मृत्यू दाखला व शासकीय योजनेच्या लाभासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी ग्रामपंचायतचा ऑपरेटर असलेला आरोपी खुशाल पाल याच्याकडे गेली. तेव्हा आरोपींनी महिलेचा मोबाइल नंबर घेऊन दाखले पाठवून देतो असे सांगितले.

बुधवारी रात्री महिला आपल्या घरी असताना आरोपी घरात घुसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर तिने पोलिसात तक्रार दिली.

घटनेची तक्रार मूल पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी कलम ७४, ७५(२), ३३२ (क), ३५१ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

घराला कुलूप लावल्याचे पाहुण चोरट्यांनी केली १.७७ लाख रुपयांची रोकड लंपास 


घराला कुलूप लावल्याचे पाहुण चोरट्यांनी केली १.७७ लाख रुपयांची रोकड लंपास 

भद्रावती:-
सरस्वती नगर येथील एका घराला कुलूप लावल्याचे पाहुण अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची २९ जानेवारी रोजी घरमालक घरी पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे 

माहितीनुसार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे एजंट संतोष देविदास उंबरकर (५७) हे पत्नी चंदा, मुलगा रोशन आणि सून वैदेही यांच्यासह राहतात. २८ जानेवारी रोजी त्यांच्या सुनेला प्रसूतीसाठी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोष उंबरकर यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्या सोबत होते. सायंकाळी संतोष शहरातील पतसंस्थेसाठी पैसे गोळा करत असताना ६.३० वाजता त्यांची पत्नी चंदा हिने फोन करून आपला नातू अशक्त असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला बालरोगतज्ञांकडे दाखल करावे लागेल. हे ऐकून त्यांनी वसुलीची रक्कम घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटात ठेवली. त्यांनी पत्नीला चंद्रपूर येथील रुग्णालयात पोहोचवून अर्भकाला (नातू) बालरोगतज्ञांकडे दाखल केले आणि चंद्रपुरात त्यांच्या सोबत रात्रभर मुक्काम केला. २९ जानेवारी रोजी ते भद्रावती येथील घरी परतले असता त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर कपाटात कपडे इकडे तिकडे विखुरलेले दिसले असता कलेक्शनमधील पैसे गायब असल्याचे दिसले. त्यावरून तो चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ भद्रावती पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. या आधारे भद्रावती पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

शिक्षिकेच्या अपघातास कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा


शिक्षिकेच्या अपघातास कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनी पोलीस प्रशासनाद्वारे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली येथे उपस्थित राहण्याची नोटीस बजाविल्याने गोंधळलेल्या पोलिस जवानासोबत दाबंरंचा कडून गडचिरोलीला जात  असताना झालेल्या अपघातात दामरंचा जि. प. शाळेतील शिक्षिका पौर्णिमा कुकुकडर गंभीर जखमी झाल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या संबंधित बेजबबादार अधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई करून गंभीर जखमी शिक्षिकेच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च पोलीस प्रशासनाने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संविधान फॉउंडेशन, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदनातून दिला आहे.
अहेरी तालुक्यातील दामरंचा जि. प. शाळेतील मुख्याध्यापक नियमित शाळेत येत नसल्याने सहाय्यक शिक्षिका पौर्णिमा कुकुडकर यांच्याकडे मुख्याध्यापकाचा प्रभार देण्यात आला होता. दरम्यान संजय चांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी कविता संजय चांदेकर यांनी शिक्षण विभागाकडे त्यांना मिळणाऱ्या देय रक्कमेत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य व लिपिक मृणाल मेश्राम यांनी अफरातफर केल्याचा आरोप करीत त्यांचविरुद्ध कारवाई करावी असे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. यावर काहीच कारवाई न झाल्याने चांदेकर यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे प्रांगणात दोन मुलांसह आत्मदहन करण्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासन व पोलीस विभागाला दिले होते. या पत्राचा संदर्भ देत प्रभारी अधिकारी उपपोलिस ठाणे दामरंचा यांनी शिक्षिका पौर्णिमा कुकुडकर यांना प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद गडचिरोली येथे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजाविली. सदर नोटीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापूर्वी मिळाल्याने शिक्षिका कुकूडकर गोंधळून गेल्या. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे आवश्यक असताना पोलीस प्रशासन दामरंचा यांनी एका पोलिसासह रात्रोच्या सुमारास दुचाकीने गडचिरोलीला पाठविले. दरम्यान चामोर्शीपासून काही अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे दुचाकी चालक पोलिस सांगत असले तरीही दुसऱ्या दुचाकीने मागे जबरदस्त धडक दिली असेल तर धडक देनाऱ्या दुचाकीस्वार याला कहीच मार लागला नाही असे होऊ शकते काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पोलिस जवानासह शिक्षका पौर्णिमा कुकुडकर हे दुचाकीवरून कोसळून यांचा अपघात झाला. त्यामुळे या प्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संविधान फॉउंडेशन गडचिरोली, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र मजदूर युनियन, भारतीय बौद्ध महासभा आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचेशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025

PostImage

अवैध रेती तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा केला प्रयत्न, तलाठी बालबाल बचावले 


अवैध रेती तस्करांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा केला प्रयत्न, तलाठी बालबाल बचावले 

 


भद्रावती:-
 सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच अधिका-यांनासुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

याबाबत अधिकारी वर्ग प्रत्येक गावाना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. तर एकीकडे भद्रावती तालुक्यातील शेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गीते यांनी तक्रार दिली आहे.महसूल उत्पन्न वाढीत क्रमांक एक वर असलेल्या जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हित जोपासत हा व्यवसाय सध्या चांगला सुरू आहे.

 30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारेगाव येथे तलाठी अनंत गीते व सहायक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे रेतीने भरलेला ट्रॅक्टर अडवीत परवाण्याबाबत विचारपूस केली, परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर हा भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर चालकाला तलाठ्यांच्या अंगावर वाहन चालविण्यास सांगितले. 

चालकाने वाहन तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, तलाठी गीते वाहनसमोरून न हटल्याने त्या 2 व्यक्तींनी तलाठी गीते सोबत धक्काबुक्की करीत त्यांना बाजूला सारले. त्यांनतर ट्रॅक्टर चालकाने वाहनसहित तिथून पळ काढला.या सर्व प्रकाराची माहिती गीते यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली, ट्रॅक्टर चालक व त्या दोन इस्माविरुद्ध गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या घटनेचा पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तीव्र करणार-सरपंच रेखाताई पिसे


पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तीव्र करणार-सरपंच रेखाताई पिसे

 

नेरी (दि. ३० जानेवारी):- चिमुर तालुक्यातील नेरी येथील पिएचसी चौकातील अतिक्रमण हटाव मोहीमची प्रभावीपणे अंमलबजावणी करत राबविण्यात आली असुन अतिक्रमण हटाव मोहिम अधीक तिव्र करण्यात येणार आहे.गावाचा विकास करण्यासाठी ग्राम कमेटी मागे हटणार नाही, एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायतने अनेक विकासाची कामे केली आहेत. ७० हजार वर्षांपूर्वीपासून येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात नेरी ग्रामपंचायतला यश मिळविले आहे तसेच घोडाझरी धरनातुन गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. ही योजना ग्रामपंचायतने आणली आहे, जल जिवन मिशन अंतर्गत युद्ध स्तरावर काम सुरू आहे. असे अनेक विकासात्मक कामे नेरी ग्रामपंचायत ने हाती घेतले आहेसरपंच रेखा पिसे पुढे म्हणाल्या, गावातील अनेकांनी दुकानदारांनी त्यांना निर्धारित केलेल्या जागे व्यतीरिक्त सिमा निर्धारित केलेल्या असुन मर्यादित जागेवर धंदा करावा, पुढे पुढे सरकु नये व रस्ते वाहतुकीस मोकडे असावेत वाहतुकीस अडथळे निर्माण होईल असे क्रुत्य करु नये. अन्यथा अतिक्रमण हटविताना कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत कमेटीने दिला आहे. शासनाच्या अधिनस्त राहुन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाविण्यात येत असुन गावाचा विकास व्हावा, विकासाच्या शासकीय योजना राबविण्याचा नेरी ग्रामपंचायत प्रयत्न करत असतांनाच या अतिक्रमणाचा सामना करावा लागतो. अनेक शासनाच्या योजना राबवताना अतिक्रमण केलेले आड येत असते, विकास कामाला खिड बसते, परिणामी गावकऱ्यांनाही ग्राम विकासाचा फटका बसतो. शासनाच्या वतीने महाराष्ट्र भर अतिक्रमण हटाव मोहिम तिव्र करण्यात आली आहे.अतिक्रमण निर्मूलन करतांना गावकऱ्यांच्या तोंडुन ग्रामपंचायतची स्तुती करताना दिसुन येत आहे. अतिक्रमण हटविताना ज्यांना स्वतःच्या मालकीची घरे आहेत, त्यांनी घरी जावे ग्रामपंचायतच्या शासकीय कामात अडथळे आनु नये. अतिक्रमण हटाव मोहिमेत राजकीय रंग देवु नये, "आपला गाव-आपला विकास, "आपली माती आपली नाती" असे समजून गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नेरी ग्रामपंचायत सरपंच रेखाताई पिसे यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

अवघ्या २४ तासात उभारले नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन


 अवघ्या २४ तासात उभारले नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन

 

 

गडचिरोली:-
1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे 
विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान)  संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र  अंकित गोयल, पोलीस अधीक्षक. नीलोत्पल, 113 बटा. सिआरपीएफचे कमांडण्ट  जसवीर सिंग, 09 बटा. चे कमांडण्ट  शंभु कुमार, 37 बटा. चे कमांडण्ट  दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले

 
मागील वर्षी 14 जून रोजी नेलगुंडा गावातील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली होती.

नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल पोलीस अधीक्षक  नीलोत्पल
माओवाददृष्ट अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 30/01/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन 2024 या वर्षाअखेर दिनांक 11/12/2024 रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. भामरागड पासून 20 किमी., धोडराज पासुन 14 किमी., पोमकें पेनगुंडा पासुन 04 कि.मी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 600 मीटर अंतरावर असलेल्या अति-दुर्गम नेलगुंडा व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन नेलगुंडा मैलाचा दगड ठरेल.

सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 10 जेसीबी, 19 ट्रेलर, 04 पोकलेन, 45 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 19 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 49 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 10, सोलापूरचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 113 बटा. डी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 06 पथक (150 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन नेलगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांना लोअर पॅन्ट, टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.

सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)  संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र  अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली  अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक. नीलोत्पल, कमांडण्ट 113 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  जसवीर सिंग, कमांडण्ट 09 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  शंभु कुमार, कमांडण्ट 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल  दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड  अमर मोहिते व पोलीस स्टेशन नेलगुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. अमोल सोळुंके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

सुट्या पैशांवरून एसटी बसच्या वाहकाला केली मारहाण


सुट्या पैशांवरून एसटी बसच्या वाहकाला केली मारहाण


अमरावती : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सुटे पैसेबाबत झालेल्या वादातून बसच्या वाहकाला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर घडली. एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवाशी व वाहक यांच्यात झालेल्या सुट्या पैशांवरून दररोज बाचाबाची होत असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसात अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना सोशल मीडियावर फिरत असून यातून पुढे काही अनर्थ घडू नये यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तात्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने या पूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली व आर्थिक नुकसान होण्याचे कारण देत अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला असून सध्या चलनात सुट्या पैशाचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत.ए.टी. एम. मधून सुद्धा शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निधत असल्याने कोणताही प्रवाशी सुटे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करतांना प्राधिकरणाकडून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली व एसटीला तोटा होण्याची भीती दाखऊन अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेला असल्याची टीकाही बरगे यांनी केली आहे. या घटनेनंतर एसटी प्रशासन या घटना टाळण्यासाठी काय उपाय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एसटी प्रशासनाने पुन्हा पत्र द्यावे
भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहे. १६ जून २०१८ रोजी व २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी जी भाडेवाढ करण्यात आली आहे. ती पाचच्या पटीत करण्यात आली असून त्याच सूत्रानुसार भाडेवाढ पाचच्या पटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना सांगायला हवे.सुट्या पैशाची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याच प्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी व पोलिसात दाखल झालेले गुन्हे याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठवला जावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

 

गडचिरोली : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर आधारित पूरक उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक लोह आधारित पूरक उद्योग निर्मितीसाठी उद्योग मित्रांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समन्वय समिती, जिल्हा आजारी उद्योग पुनर्वसन समिती आणि जिल्हा स्थानिक लोकांना रोजगार सनियंत्रण समितीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कंपन्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी, तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने युवकांना अधिकाधिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सभेत उद्योजकांच्या अडचणी, औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांसह जिल्हा उद्योग केंद्र,  जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, खादी ग्रामोद्योग, नगररचना, विज महावितरण कंपनी, एम.आय.डी.सी., कामगार विभाग, खनिकर्म विभाग इत्यादी विभागांचे प्रतिनिधी आणि गडचिरोली जिल्हयातील उद्योग संघटना आणि इतर उद्योजक हजर होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश


मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

 

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

 

गडचिरोली, दि.३० – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक ३०६ मध्ये दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या. कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी. रघुवंशी, सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले. प्रा. डॉ. नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध, श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला. मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे. शेंडे यांनी परिश्रम घेतले. सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला पक्ष प्रवेश


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजीत पवार)विविध पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला पक्ष प्रवेश

 

 माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

गड़चिरोली:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार, 27 जानेवारीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालय गड़चिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश करतांना अमोल कुळमेथे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कार्यप्रणाली आणि गडचिरोली जिल्ह्यात आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेक विकासकार्य केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांच्यामध्ये समाजातील मागास घटकांपर्यत पोहचून विकास घडवून आणण्याची क्षमता असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू, असे मत अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केले. पक्ष प्रवेश करतांना माझी नगरसेवक खूमेश कुळमेथे, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रसाद पवार, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमाताई येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, युवक शहराध्यक्ष अजय कुकडकर, जेष्ठ नेत्या उमा बन्सोड, चामोर्शी निरीक्षक आरती कोल्हे, महिला शहर उपाध्यक्ष नईमा हुसैन, महिला शहर सरचिटणीस मीना मावळनकर, आशा मुळेवार,  सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम कुळमेथे, सेवानिवृत्त वनपाल बळवंत येवले, माजी जिल्हा परिषद कर्मचारी प्रदीप वडेट्टीवार, खुशाल तरोने, संजय भोयर, साहित्यिक व आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुसराम, अजय कोवे, धनु गेडाम, रुपेश गेडाम, रुपेश सलामे, रेणू कुळमेथे, अंजू कुळमेथे, किरण मंगरे, कविता चिचघरे, तेजस लाकडे, सुरेश चिकराम, स्वप्निल येडलावार, रोशनी पुडो, विक्की केळझरकर, मयूर सूर्यवंशी, डिंपल सहारे, आबिद शेख, मोना बोरकर, सोनू कुळमेथे, सोनाली राईंचवार, अस्मिता खोब्रागडे, महेश निमगडे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश महासचिव युनूस शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक


 महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक


रग्गड पैसा कमवता येतो असे दाखवित होता आमीश

 

मुंबई : पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली. आरोपीला अटक करतानाच पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.भांडुपमधील सह्याद्री नगर परिसरात राहणारा शिरीशकुमार शेंडगे वय, 42 वर्ष काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती भांडुप पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने आरोपीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी तो वास्तव्यास असलेल्या भांडुपमधील सह्याद्री नगरमध्ये मंगळवारी छापा घातला.

पोलिसांनी तेथून आरोपीसह दोन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आणि दोन्ही महिलांची सुटका केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा - जिल्हाधिकारी


गडचिरोली जिल्ह्यात विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करा - जिल्हाधिकारी 


गडचिरोली दि.३०: विविध योजनेंतर्गत निधी खर्च करतांना त्याद्वारे जिल्ह्यात शाश्वत विकासाची कोणती कामे पूर्ण होणार आहेत, याची माहिती देणे यंत्रणांना बंधनकारक आहे. विकास निधीची मागणी करतांना जिल्हा कोणत्या निर्देशांकात जिल्हा मागे आहे, याचे विश्लेषण करून सुधारित विकास निधी मागणी प्रस्ताव तसेच अतिरिक्त मागणी प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे तसेच निधीच्या प्रभावी वापरावर भर देण्याच्या सूचना गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत  पंडा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त मागणी व कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल नियोजन भवन येथे घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. रमेश, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पूनम पाटे, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, श्रीमती मानसी, कुशल जैन, नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी ७७ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असताना त्यांचा गैरवापर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांचे निदर्शनात आणून देताच त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले तसेच जिल्हा परिषदेने यासाठी तपासणी पथक नेमण्याच्या सूचनाही दिल्या. यातील ५५ जुन्या बसेस बदलून नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुका स्पेसिफीक योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. यातून रोजगार निर्मितीसाठी मानव विकासाशी संलग्न कामे पूर्ण करण्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध विकास कामांसाठी निधी खर्च करण्यात येतो मात्र त्यातून अपेक्षित उद्देश साध्य होतोय का, लाभार्थ्यांच्या गरजा ओळखून साहित्य खरेदी केली जाते का, खरेदी केलेले साहित्य संबंधीतांपर्यंत पोहचले का याची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

2025-26 च्या वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त निधी मागणी करणाऱ्या यंत्रणांनी त्या मागणीचे ठोस कारणे स्पष्ट करावी. तसेच जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षांच्या विकास आराखड्यानुसार आणि पुढील एक वर्षात आवश्यक बाबींची प्राथमिकता निश्चित करून नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीला कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंधारण, वन, महसूल, पशुसंवर्धन यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

 तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन तर ठाणेदाराची तडकाफडकी बदली


 तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन तर ठाणेदाराची तडकाफडकी बदली 


 वर्धा:- पोलीस दलातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्वी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आर्वी येथील अजय कदम यांच्या मालकीच्या जागेवर इतरांनी जबरदस्तीने ताबा घेतल्या त्यामुळे अजय कदम यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याबाबत पोलिसांना विनंती केली होती. पण या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर ठाणेदार यांना तडकाफडकी मुख्यालय ठिकाणी बदली केली आहे.

पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेवून येणाऱ्याची तक्रार घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असून त्यानंतर तपास करुन गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे. पण, स्टेशन डायरीवरील कर्मचारी गजानन मरस्कोल्हे व अंमलदार सतिश नंदागवळी यांनी पोलीस निर8क्षक यांच्या आदेशाशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, असे अजय कदम सांगितले. त्यानंतर बराच वेळ त्यांना पोलीस स्टेशन मध्येच बसवून ठेवले होते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली होती.

पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याने हे प्रकरण थेट पोलिस महानिरीक्षक यांच्या पर्यंत गेले. त्यानंतर पोलिस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ, वर्धा जिल्हाचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वर्धा डॉ. सागर कावडे आर्वीत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची पोलीस मुख्यालयी बदली करण्यात आली. तर मरस्कोल्हे व नंदागवळी या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने, जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी


अमृतसर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

 


शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने, जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी 

 


समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी

 


नगर - प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन सदरील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. वारंवार बाबासाहेबांचा पुतळा व संविधानाच्या विटंबनेवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी अमृतसर मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शिडीच्या सहाय्याने चढून एका समाजकंटकाने हातोड्याचे साहाय्याने सदर पुतळा फोडण्याचे कृत्य केले. सदर आरोपीला पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे कायदा करुन देशातील महापुरुषांचा अवमान व विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतुद केल्यास अशा प्रवृत्तींना लगाम लागणार आहे.  देशात सातत्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाची विटंबना होत आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हेतू हा राजकीय भाग असल्याचे आंबेडकरी समाजाला जाणवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी परभणीत सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा मोठी दंगल झाली. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला, अद्यापि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वारंवार बाबासाहेबांच्या पुतळ्याची व संविधानाच्या विटंबनेच्या मागील मास्टरमाइंड शोधण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अमृतसर येथे घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. बाबासाहेब एका जाती धर्माचे नसून, सर्व धर्मीयांचे व समाजाचे आहे. संविधान देशातील सर्व समाजासाठी आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना होत असताना कोणताच राजकीय पुढारी पुढे येऊन निषेध नोंदवत नाही, तर ज्या समाजाला त्यांच्यामुळे आरक्षण मिळाले ते समाज देखील गप्प आहेत. इतर देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले जातात, मात्र आपल्या देशातील त्यांचे पुतळे असुरक्षित आहेत. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर देखील जातीयता संपलेली नसल्याची भावना आंबेडकरी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी सदर घटनेच्या चौकशीसाठी कमिटी नेमून अमृतसर व परभणी येथील घटनेच्या मागे कोण मास्टर मार्इंड आहे? याचा तपास करावा, महापुरुषांच्या पुतळ्याचे विटंबन करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.......................


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025

PostImage

30 जानेवारी रोजी खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांचे चिमूरमध्ये स्वागत - आझाद संघरामगिरीत संबोधित करणार


30 जानेवारी रोजी खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांचे चिमूरमध्ये स्वागत - आझाद संघरामगिरीत संबोधित करणार


 चंद्रपूर - चिमूर तहसीलच्या संघरामगिरी येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेअंतर्गत आयोजित महापरित्राण पथात आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद उपस्थित राहणार आहेत. बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी दरवर्षी 30 आणि 31 जानेवारी रोजी संघराम गिरी (रामदेगी) येथे धम्म संमेलन आयोजित केले जाते. यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन धम्मदेसनाचा लाभ घेतात. या काळात महापरित्राण पथाचेही आयोजन केले जाते. या परिषदेला संबोधित करण्यासाठी आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद यांची नियुक्ती करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आझाद समाज पक्षाने अमित भीमटे यांच्या रूपाने आपला उमेदवार उभा केला होता. त्यांना मतदानात चौथा क्रमांक मिळाला. आझाद चिमूर मतदारांचे कृतज्ञता व धम्मदेसना स्वीकारून तथागत बुद्धांना नमन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी चिमूर शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. चिमूर शहरातील हजारे पेट्रोल पंप चौकात आयोजित स्वागत कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्ते व आंबेडकरी मिशनरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आझाद समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित भीमटे यांनी दिली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर


गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा)पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

 

 

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

वासुदेव शेडमाके जिल्हाप्रमुख , रामकृष्ण मडावी जिल्हा समन्वयक, विजय पवार सहसंपर्कप्रमुख , राजू अंबानी जिल्हा संघटक, अरविंद कात्रटवार उपजिल्हाप्रमुख , घनशाम कोलते (तालुकाप्रमुख - गडचिरोली ), कुणाल कोवे (तालुकाप्रमुख - गडचिरोली ग्रामीण), अब्दुल शेख (शहरप्रमुख - गडचिरोली शहर), कृष्णा वाघाडे (उपशहरप्रमुख - गडचिरोली शहर), ज्ञानेश्वर वाघमारे (तालुका संघटक-गडचिरोली तालुका), गजानन नैताम (तालुका समन्वयक - गडचिरोली तालुका), मनोज पोरटे (तालुकाप्रमुख - चामोर्शी शहर), दीपक दुधबावरे (तालुकाप्रमुख - चामोर्शी ग्रामीण), बंडू नैताम (शहरप्रमुख- चामोर्शी शहर), अंकिम साबनवार (तालुका संघटक- चामोर्शी तालुका), सुभाष करणे (तालुका समन्वयक- चामोर्शी तालुका), दिलीप सुरपाम (उपजिल्हाप्रमुख - अहेरी विधानसभा), प्रफुल्ल येरने (तालुकाप्रमुख- अहेरी विधानसभा), टिल्लू मुखर्जी (तालुकाप्रमुख मुलचेरा तालुका), अक्षय पुंगाटी (तालुकाप्रमुख-इटापल्ली तालुका), राजेंद्र लानजेकर (सल्लागार-गडचिरोली जिल्हा). आदि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजन ची बैठक ऑनलाईन का? काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल


पालकमंत्री दोन तरीही जिल्हा नियोजन ची बैठक ऑनलाईन का? काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल

 

 

गडचिरोली :: कधी नव्हे तर जिल्ह्याच्या इतिहासात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवून नवा इतिहास रचला, मात्र या सोबतच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांच्या भुवया उंचावल्या, जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतील येथील नागरिकांशी संवाद साधतील अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाली इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना मदत म्हूणन जिल्ह्याला सह पालकमंत्री सुद्धा देण्यात आले, मात्र विधानसभा निवडणूकी नंत्तर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक 31 जानेवारी रोजी, सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरेन्स च्या माध्यमातुन पार पडणार असून, जिल्ह्याला ऐक नव्हे तर दोन - दोन पालकमंत्री असताना देखील नियोजन समितीची बैठक ऑनलाईन का असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटी चे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.  इतकेच नाही तर बैठक ऑनलाईन असतांना देखील मुख्यमंत्री फडणवीस हे बैठीकस राहु शकत नाही हे देखील मोठी शोकांतिका असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले का?  कीं फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा करून, देण्यासाठी पालकमंत्री पद स्वतः कडे ठेवले असाही प्रश्न महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील असंख्य नागरिक विविध समस्यांना घेऊन मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे, अनेक शेतकऱ्याचे धानाचे चुकारे अजून मिळाले नाही, घरकुल धारकांच्या अनेक समस्या आहेत, जिल्ह्यातील रानटी जनावरांचे बंदोबस्त संदर्भातील समस्या आहेत, जिल्ह्यातील रस्ते, दवाखाने सारख्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे अनेक कंत्राट दारावर उपास मारीची वेळ आलेली आहे असे अनेक समस्या असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यासाठी वेळ देत नसतील तर जिल्ह्यातील नागरिकांना पाकमंत्री हटाओ गडचिरोली जिल्हा बचाओ अशी मोहीम राबविण्याची वेळ येईल का असेही मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम


शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली बस तिकीट दरवाढीचा निषेध व चक्का जाम

 

गडचिरोली:-

  आज दिनांक 29/01/2025 ला शिवसेना (उबाठा) पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली विजय  श्रुंगारपवार सह संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्ह्या यांच्या उपस्थितीत स्थानिक बस स्थानक गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. नुकताच राज्य शासनाने बस तिकिट दरवाढीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लाडकी बहिण योजना अंमलात आणल्या पासून राज्यात जिवनावशक वस्तूंची कमालीची दरवाढ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सपाटाच लावला असुन याचाच एक भाग बस तिकीट दर वाढ निर्णय घेतला असून या निर्णया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी नंदुभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डिवार, राजेंद्र लांजेकर, किरण शेडमाके, पवन गेडाम, संदिप वाघरे, गोविंदा बाबनवाडे, प्रशिक झाडे, हिंमत भुरसे, रामगिरवार , विजय पत्तीवार.आणि बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

गुराख्याचा वाघाने पाडला फडशा, दुसऱ्या दिवशी मिळाले अवयव 


गुराख्याचा वाघाने पाडला फडशा, दुसऱ्या दिवशी मिळाले अवयव 

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बंडू कोल्हे वय ५५ वर्ष रा. रामपुरी हा इसम बकऱ्या गुरं चारण्या साठी चिचोली च्या जंगलात नेहमी प्रमाणे गेला असता अंदाजे ४. ००वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला केला असावा अशी शंका आहे.. वनविभागाने गावकऱ्यांच्या  मदतीने  शोध मोहीम चालवली होती. रात्री ९.०० वाजे पर्यंत इसम मिळाला नव्हता. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती,ती सकाळी पुन्हा सुरू करुन शोध घेतला जाणार होता.

आज सकाळी वन विभागाच्या पथकाने पुन्हा शोध मोहीम सुरू केली त्यात काटवण येथील कक्ष क्रमांक ७५६ काटवण नियत क्षेत्रात मृतदेहाचे काही अवयव आढळले त्यापैकी काही उर्वरित अवशेष रुग्णालयात आणण्यात आले यावेळी चंद्रपूर येथील वन उपसंचालक बफर जगताप मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर, क्षेत्रपाल वरगंटीवार, वनरक्षक भास्कर परचाके उपस्थित होते.मृतकाच्या कुटुंबीयांना तात्काळ २०,००० रुपये मदत देण्यात आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागात  वाघ बिबट्या यांचा वावर असून सतत वाघाचे हल्ले  होत असतात त्यामुळे वन विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे.  वन विभागाचे याकडे विशेष लक्ष नाही त्यामुळे  गावात नागरिकांमध्ये अत्यंत घबराटीचे वातावरण असून वन विभागाच्या कार्यप्रणाली वर शंका निर्माण झाली असून शासनाच्या विरोधात जनता रोष व्यक्त करीत आहे. वाघाचे हल्ले वाढतच असून मानवाचे प्रिआण जातच आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

रेल्वे लाईन च्या कामास साखरा ग्रामस्थांनी रोखले तरीही प्रशासशाचे दुर्लक्ष 


रेल्वे लाईन च्या कामास साखरा ग्रामस्थांनी रोखले तरीही प्रशासशाचे दुर्लक्ष 

 

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे द्वार बनविणार अशी भूलथापा देणाऱ्या राज्यसरकार ने तथा सरकारी अधिकाऱ्यांनी, साखरा गावातील काही ग्रामवासियांनी रेल्वेचे काम थांबविण्याच्या घटने कडे चार महिन्यांपासून मुद्दाम दुर्लक्ष केल्याची लाजिरवाणी बाब उघडकीस आली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता साखरा येथील गावकऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून ठरलेल्या दरा प्रमाणे आपल्या जमिनीचे विक्री पत्र रेल्वे प्रशासनाला करून दिले होते.
त्या जागेचे विक्री पत्र झाल्यावर संबंधित जागेचे फेरफार होऊन ती जागा आज रेल्वे प्रशासनाच्या नावाने नोंद करण्यात आलेली आहे,तरी सुध्दा अशा प्रकारे गावकरी रेल्वेचे काम थांबविण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला प्रशासन दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील लाखो लोकांमध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे.


एकीकडे राज्याचा पहिला जिल्हा आहे म्हणून बोलायचे आणि दुसरीकडे रेल्वेच्याच कामाकडे दुर्लक्ष करणे, अशी प्रशासनाची ही भूमिका आता संशयित वाटू लागली आहे.
या बद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की साखरा गावातील लोकांनी रेल्वेचे काम थांबविल्याची माहिती, गडचिरोली चे जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी तथा भू संपादन अधिकारी यांना तीन वेळा लिखित पत्र देण्यात आले आहे,पण कोणत्याही शासकीय यंत्रणेने होणाऱ्या कामाला सुरक्षा पुरविली नाही अशी धक्कादायक बाब आमच्या प्रतिनिधी कडे सांगितली .

सदर चे काम थांबविल्या ची माहिती माजी खासदार अशोक नेते यांना सांगितली असता, त्यांनी सुध्दा प्रशासनाच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करून रेल्वे कामांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब याची दखल घेण्याची सूचना केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न


लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

विज्येत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण

आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथे तीन दिवसीय (दि. २८ ते ३० जाने.) वार्षिक स्नेहसंमेलन समारोहाचे आयोजन करण्यात आले असून प्रथम दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव  रमेश आरे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी शालेय जीवनात घडतो त्यांच्या आत असलेले सुप्तगुण प्रदर्शित करण्याची त्यांना प्राप्त व्हावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते दहावीतील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अश्या चार गटात १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असून विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून प्रदर्शन केले. 
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन सादर करीत पूर्व प्राथमिक गटातून प्रथम मास्ट. द्विज अलोणे, द्वितीय कु. अगस्त्या आभारे, तृतीय कु. परी खामनकर, प्राथमिक गटात कु. तमना कडते, द्वितीय मास्ट. श्रीहीत आरे, तृतीय कु. वंशिका बामनकर, उच्च प्राथमिक गटात कु. लिजा हलदार, कु. अंजली वेलादी, तृतीय मास्ट. निवृत्ती नागरगोजे तर माध्यमिक गटात कु. अर्नवी रोहनकर, द्वितीय कु. तनवी मंडल, तृतीय मास्ट. आर्यन मुद्रिकवार अश्याप्रकारे क्रमांक पटकाविला विज्येत्या विद्यार्थ्यांना उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळीच्या शुभहस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला साईराम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष  अनिल आल्लूरवार, सचिव  रमेश आरे, सदस्या भवानी आरे, सरिता गादे, मुध्याध्यापक  कृष्णमूर्थी गादे तसेच या स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून  रोशनी अवथरे,  सपना पांडे, सुहासिनी बोरकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमची शोभा वाढविली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025

PostImage

ईल्लूर गावा जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक, तिघेही जखमी 


ईल्लूर गावा जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक, तिघेही जखमी 

 

आष्टी  (प्रतिनिधि) ## दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसली यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन  वाजताच्या सुमारास ईल्लुर गावा जवळील वळणावर घडली .                                    जखमी युवकाचे नाव संदिप टेकूलवार , वय २७ ,  संतोष गोर्लावार , वय ३४ रा. दोघेही कुनघाडा (माल) व स्वप्निल मोहूर्ले, वय २८ , रा . दरुर असे आहे.     
   कुनघाडा येथून दुचाकीवर संदीप टेकुलवार , व संतोष गोर्लावार  हे दोघे आष्टीकडे येत असताना व आष्टी कडून  स्वप्नील मोहुर्ले हा इलुर कडे जात असताना इल्लूर येथील वळणावर दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक बसली. यात दुचाकीवरील तिघेही जण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील संदिप टेकुलवार व संतोष गोर्लावार यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025

PostImage

दुचाकीची अनखोडा वळणावरील कठड्याला धडक,कोनसरीचा दुचाकीस्वार ठार 


दुचाकीची अनखोडा वळणावरील कठड्याला धडक,कोनसरीचा दुचाकीस्वार ठार 

 


आष्टी (प्रतिनिधि) ##  आष्टी येथून कोनसरीकडे दुचाकीने जात असताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अनखोडा वळणावर असलेल्या  लोखंडी कठड्याला दुचकीची बसली धडक यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली.
मयत दुचाकीस्वाराचे नाव आशिष कुळमेथे , वय २५ वर्षे , रा. कोनसरी असे आहे.
मयत आशिष हा दुचाकी क्रं. एम.एच.३३  , ए बी ९५९८ ने आष्टी कडून आपल्या कोनसरी गावाकडे दुपारी निघाला होता. दरम्यान अनखोडा नाल्याजवळील वळणावर त्याचे गडीवरचे नियंत्रण सुटले व गाडी लोखंडी कठड्यावर आदळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करुन प्रेत शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविले.पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025

PostImage

 डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे  उद्घाटन



 डॉ लुबना हकीम यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे  उद्घाटन

 

अहेरी:-

अहेरी तालुक्यातील मौजा  वेलगूर येथे स्वर्गीय चाचमा अब्दुल हकीम  यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  जय भवानी क्रिकेट  क्लब वेलगुर  आयोजित   भव्य रात्र कालीन खुले क्रिकेट सामने  स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लुबना  हकीम यांच्या हस्ते संपन्न झाले-
. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भावनांचा आणि कृतज्ञतेचा उल्लेख केला. त्यांनी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांचे, तसेच उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले. त्यांना असे कार्यक्रम गावातील एकजूट आणि एकमेकांच्या सहाय्याने अधिक कार्यक्षम होऊ शकतात, असे सांगितले. त्यांच्या मनोगतात त्या गावच्या सामाजिक एकतेची महत्त्वता आणि क्रीडा क्षेत्रातील सकारात्मक योगदानावर जोर दिला
यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशी,  माजी सरपंच आशांना दुधी,  आदिल पठाण, वामन मडावी ,इंजिनीयर नितीन देवनाथ , मनोहर चालूरकर ,बापू निकोडे, दिलीप राऊत, मुक्तेश्वर गदेकर , रोहित  गलबले,  डॉ .सपन हलदर ,अरुण टाकरे, वासुदेव मळावी, संतोष गुरलुले ,शंकर सोनुले, राजू निकोडे ,ईश्वर गुरलुले क्रिकेट स्पर्धक व ग्रामस्थ  बांधव महिला भगिनी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025

PostImage

गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त


गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त

 

अमरावती:-
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही.

ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी  तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती. तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली.  काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा  तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे. परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे शब्द आठवत होते. मी आयएएस अधिकारी होणारच, व अखेर तीने यशोशिखरावर गाठलेच.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

 कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 


 कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 


 चंद्रपूर:-

जिल्ह्यात कार आणि ऑटोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातील येन्सा इथं ही घटना घडली आहे. जखमींवर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरु आहेत.  
रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोऱ्याला जात होते. यावेळी चंद्रपूरकडे जाणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक  दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (46) आणि सविता अरविंद बुरटकर (42) यांचा मृत्यू झाला आहे.  तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून एका गंभीर जखमी झालेल्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहात असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात ऊस तोडण्यासाठी गेले होते. परतिच्या प्यारवासाचे वेळी वेळी ही घटना घडली. जखमी मजुरांचे नावे कळू शकलेली नाहीत 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

महावितरणच्या अधीकाऱ्यासोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची बैठक ;  विद्युत विभागातील प्रलंबित समस्यांना  तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश


महावितरणच्या अधीकाऱ्यासोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांची बैठक ;  विद्युत विभागातील प्रलंबित समस्यांना  तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

गडचिरोली - :

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ. नामदेव किरसान यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील विदुय्यत विभागातील स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या विविध समस्या तातडीने मार्गी लावण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 
           सदर बैठकीत महावितरण चे अधिक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता संजय डोंगरवार, सह सर्व अधिकारी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते,  जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, श्रेयस बेहरे उपस्थित होते.
अनेक वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषीपंपा करीता विद्युत मीटर उपलब्ध करून देणे किंवा सोलर पंप बसविण्यास इच्छुक शेतकऱ्यास तातडीने सोलर पंप उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा नियमीत व सुरळीत करण्यात यावे, अतिरिक्त लोडशेडींग करू नये, शासन स्तरावून राबविण्यात येणाऱ्या योजनाचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देणे या सारख्या अनेक विषयावर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस (श प) विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी दिले नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद


राष्ट्रवादी काँग्रेस (श प) विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी दिले नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद 


अहेरी:-
सुंदरनगर ता.मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील सहायक शिक्षक कांती मंडल यांच्या स्वागत समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता सदर समारंभ एक उत्साह पुणं आनंददायी प्रसंग होता त्यांच्या संसाराच्या गाडीची नवी सुरुवात होती या समासरंभास राष्ट्रवादी काँग्रेस (श प) गटाच्या विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम,वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष अब्दुल जमीर हकीम (बबलूभैया) व प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले 
हा समारंभ उपस्थितांच्या हृदयात एक सुखद छाप सोडून गेला 
यावेळी प्राचार्य लोनबले, प्राचार्य निखुले, वरिष्ठ लिपिक मुक्तदीर भैय्या व बहुसंख्य कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे डॉ.लुबना हकीम यांनी केले ध्वजारोहण 


भगवंतराव हायस्कूल इंदाराम येथे डॉ.लुबना हकीम यांनी केले ध्वजारोहण 

अहेरी:-

आज 76 व्या गणराज्य दिनाच्या शुभ पर्वावर  इदाराम येथील  भगवंतराव हायस्कुल  येथे डॉ लुबना हकीम  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  अजयभाऊ ककडालवार  मुख्याध्यापक मामीडलवार आरोग्य  उपकेंद्र इंदाराम  सीएचओ सुरभी शिल्पकर, एएनएम सी.सी. मडावी आणि अंगणवाडी सेविका,व सह ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सर्व शिक्षक-शिक्षिकांनी, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी यथासांग एकत्र येऊन हा दिवस साजरा केला. डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांची आणि भारतीय संविधानाची महत्ता सांगितली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी आणि देशाभिमान यांचे महत्त्व पटवून दिले. या खास प्रसंगी शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले, ज्यामुळे सर्व उपस्थितांना मनोरंजन आणि प्रेरणा मिळाली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2025

PostImage

इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार परिषद


इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे राष्ट्रीय मतदारदिनी निदर्शने व पत्रकार परिषद

 

 

गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, इंदिरा गांधी चौक येथे २५ जानेवारी २०२५, निदर्शन आंदोलन करून पत्रकार परिषद घेण्यात आली.
या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांसह व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळावी, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, लोकशाही व्यवस्थेत हस्तक्षेप करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी खासदार डॉ. नामदेवजी किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर,  तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमाद भगत, प्रशांत कोराम, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर,   नेताजी गावतुरे, काशिनाथ भडके, हरबाजी मोरे, दिवाकर निसार,  संजय चन्ने, घनश्याम वाढई, दत्तात्र्य खरवडे, अजय भांडेकर,रवी मेश्राम, सुभाष धाईत, उत्तम ठाकरे, बंडोपंत चिटमलवार, रुपेश टिकले, दीपक रामने, सुरेश भांडेकर, अनिल भांडेकर, विनोद लेनगुरे, भैयाजी मुद्दमवार, आशा मेश्राम, प्रति बारसागडे, कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, गणेश कोवे, जावेद खान, स्वप्नील बेहरे सह सर्व सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.


सिडीसीसी बैंकेच्या बोगस भरती विरोधात आंदोलनकर्त्याचे मुंडन आंदोलन.

आमरण उपोषणकर्ते रमेश काळबाँधे यांच्यासह रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व इतरांनी मुंडन करुन केला निषेध.

चंद्रपूर :-

सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट व बोगस नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं जे आमरण उपोषण सुरु आहे त्याचा आज दहावा दिवस असून आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सिडीसीसी बैंकेच्या बोगस नोकर भरतीचा निषेध करण्यासाठी समितीचे सदस्य व आमरण उपोषणकर्ते रमेश काळबांधे यांनी आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी स्वतः मुंडन करुन निषेध केला आहे व त्यांनी सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष संचालकांना इशारा दिला आहे की आज आम्ही केवळ मुंडन केलं आहे जर भरती रद्द केली नाही तर तुम्हची प्रतिकात्मक शवयात्रा काढू, दरम्यान यावेळी रोहित तुराणकर, अशोक पो्हेकर व आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या अनेक सदस्यांनी आरक्षण डावलून भ्रष्ट मार्गाने केलेल्या नोकर भरतीचा निषेध केला आहे. यावेळी समितीचे समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजेश बेले, आशिष ताजने, महेश वासलवार, सुनील गुढे, विजय तूरक्याल, पियुष धुपे, स्वप्नील देव व इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.

राज्यात सद्या सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरतीचा मुद्दा गाजत असून मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण नोकर भरतीत डावलल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारी पासून साखळी ठिय्या आंदोलन आणि 16 जानेवारी पासून समितीचे मनोज पोतराजे आणि 21 जानेवारी पासून रमेश काळाबाँधे आमरण उपोषण करत आहे, परंतु खासकरून सहकार विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या जिल्ह्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे आंदोलनकर्त्यानी निवेदन देऊन मागणी केली की सिडीसीसी बैंकेने आरक्षण डावलून नियमबाह्य नोकर भरती केली त्यावर स्थगिती आणा पण ओबीसीच्या हक्काच्या लढाई लढतो म्हणणाऱ्या हंसराज अहिर जे स्वतःला ओबीसी समजतात ते व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या लढाईला न्याय मिळवून देण्याचं काम नाही ही खरी चंद्रपूर जिल्ह्याची शोकांतिका आहे. केवळ माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्याच्या मागणीला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी 


स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी 

 

 

यवतमाळ:-

जिल्ह्यात स्कुल बस चा अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील उमरखेडमध्ये स्कूल बसला अपघात झाला आहे. यात अपघातात एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीचे नाव महिमा आप्पाराव सरकटे असं नाव आहे. ती दिवटीपिंपरी येथे राहात होती. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान ही घटना घडली आहे. उमरखेडच्या दिवटीपिंपरीवरून ही स्कूल बस दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. यावेळी हा अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्वरित वैद्यकीय सेवा बोलवून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली. मुलांच्या गाडीचा झालेला अपघात पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लहान मुलांचा आक्रोश अंगावर काटे आणणारा होता. यात एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

एकुलता एक मुलगा पोलीस होइल असे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडीलांना त्याचा मृतदेह मिळाला पहायला


एकुलता एक मुलगा पोलीस होइल असे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडीलांना त्याचा मृतदेह मिळाला पहायला 

 

 

कुरखेडा  : बीएससी द्वितीय वर्षात शिकणारा एकुलत्या एक मुलाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न गरीब आई- वडिलांनी पाहिले होते, पण दुर्दैवाने त्याचा मृतदेह आढळून आला. हृदय पिळवटणारी सदर घटना २५ जानेवारीला सकाळी कुरखेडा येथे उघडकीस आली.


माहितीनुसार, रोहित राजेंद्र तुलावी (२०) रा. जैतपूरटोला ता. कुरखेडा असे मयताचे नाव आहे. घरी आई- वडील, वृध्द आजी व बहीण असा हा परिवार. शेतीसह मजुरीकाम करुन गुजराण करणाऱ्या रोहितची पोलिस बनण्याची इच्छा होती. कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात तो बीएससी द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. यासोबतच पोलिस भरतीचीही तयारी करायचा. त्यासाठी रोज पहाटे उठून तो धावायला व व्यायामाला जात असे. २४ रोजी रात्री नित्याप्रमाणे जेवण करुन झोपी गेला. त्यानंतर पहाटे तो गायब होता. नित्याप्रमाणे फिरायला गेला असावा असे समजून कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह  कुंभीटोला मार्गावरील सतीनदीपात्रात आढळल्याची बातमी आली अन् कुटुंबाला धक्काच बसला. नदीपात्रात  पाणी नव्हते. रेतीमध्ये तो निपचित पडलेला आढळला. बनियान, शर्ट व स्वेटर बाजूला काढून ठेवलेले होते, तर अंगावर केवळ पँट होती.

दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना रोहित तुलावी याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब शहरात कळवली. त्यानंतर सतीनदीपात्रात मोठी गर्दी झाली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे वातावरण शोकमग्न झाले होते. रोहितचा मृत्यू नेमका कसा झाला, तो कोणासोबत व्यायामाला गेला होता, हे पोलिसांच्या चौकशीतच समोर येणार आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण  नाहीत, त्यामुळे मृत्यूमागचे गूढ वाढले आहे.

कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील खरे कारण उजेडात येईल, असे पो.नि. महेंद्र वाघ यांनी सांगितले. सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे ते म्हणाले


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

२० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात


 


२० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी वनपाल सापडला एसीबीच्या जाळ्यात

 

 

कुरखेडा, दि. 24: तक्रारदार हा आपल्या ट्रॅक्टरने घरकुलासाठी लागणाऱ्या रेतीची वाहतूक करीत असताना त्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी 25 हजारांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारताना वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालय पुराडा, उपक्षेत्र कोहका येथील वनपाल नरेंद्र सिताराम तोकलवार यास लाच स्वीकारताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 24 जानेवारी 2025 रोजी रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदाराकडे ट्रॅक्टर असून घरकुलासाठी लागणारी रेती ट्रॅक्टरने वाहतूक करीत असताना वनपाल नरेंद्र तोकलवार याने त्यास थांबवून ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यास सदर लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे 23 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी दरम्यान नरेंद्र सिताराम तोकलवार याने तक्रारदारास ट्रॅक्टर वर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवार 24 जानेवारी रोजी ला.प्र.वी गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचखोर वनपाल नरेंद्र तोकलवार यास पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईने वनविभागातखळबळ उडाली आहे.

सदर कारवाई दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात व चंद्रशेखर ढोले, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली यांच्या परिवेक्षणात शिवाजी राठोड, पोलिस निरिक्षक, पोलिस निरिक्षक संतोष पाटिल, स.फौ.सुनिल पेद्दिवार, पो. हवा. शंकर डांगे, संदीप घोरमोडे, संदीप उडान, राजेश पद्मगिरवांर, प्रविण जुमनाके हितेश जेट्टिवार, म.पो.शी. जोत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, चालक . पो हवा राजेश्वर कुमरे यांनी केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025

PostImage

जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर


जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

     
प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गड़चिरोली

मो. 9325766134

 

          जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्ह्यातील युवकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देण्यासाठी देण्यात येतो. या पुरस्काराच्या माध्यमातून युवा विकासाचे काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन मिळते. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दिल्या जाते.
              महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली द्वारा सन 2022 -23 या वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्काराचे वितरण दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री.ना.ॲड. आशिष जयस्वाल, यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक  नीलोत्पल व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  रवींद्र सुनीता मोहन बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
               जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये व वेळेवर गरजू व्यक्तीला तात्काळ रक्तसेवा उपलब्ध होण्याच्या दृतिकोनातून त्यांनी जिल्ह्यात क्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियान गडचिरोली हा नवीन उपक्रम यांच्या संकल्पनेतून राबिण्याबाबत येत आहे. ज्यांना रक्ताची गरज भासली अशा आजपर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त व्यक्तीला मदत केली आहे. सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी मोलाचं वाटा असतो. निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या अशा युवकाचा प्रशासनाने दखल घेवून त्यांची आज जिल्हा युवा पुरस्कार म्हणून निवड होऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे श्रेय आई-वडील, मित्र परिवार यांना दिलं आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

निवृत्त अधिकाऱ्याच्या कुटुंबाला डिजिटल अरेस्टमध्ये ठेऊन ६५ लाखांचा  घातला गंडा


निवृत्त अधिकाऱ्याच्या कुटुंबाला डिजिटल अरेस्टमध्ये ठेऊन ६५ लाखांचा  घातला गंडा

 

नागपूर:-
कुटुंबालाच डिजिटल अरेस्टमध्ये ठेवत ६५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. कुटुंबाला तुमचे सीम कार्ड मनी लाँड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची भिती दाखविण्यात आली होती. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत घटना घडली आहे.

८ जानेवारी ला त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर ७०७७४०४१२५ या क्रमांकावरून फोन आला व समोरील व्यक्तीने तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर खरेदी केलेल्या सीमकार्डचा उपयोग करून उघडलेल्या बँकखात्यातून मनी लॉड्रिंग सुरू असल्याने सीबीआयकडून पडताळणी करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी एका व्यक्तीचा सीबीआय अधिकारी म्हणून व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल आला व त्याने त्याला विविध तपशील विचारले, तुमचा संबंध नरेश गोयल मनी लॉड्रिंग स्कॅमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात येत आहे असे सांगितले.

आरोपीने त्यानंतर मुलाकडून कुटुंबीय तसेच आर्थिक स्थितीबाबत जाणून घेतले. पालकांना मुलाच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली. त्याने हा प्रकार सांगितल्यावर तेदेखील घाबरले. आरोपीने त्यांनादेखील डिजिटल अरेस्टमध्ये राहण्यास सांगितले. त्यांचा व्हिडीओ कॉल सातत्याने सुरू होता. समोरील आरोपीने त्यांच्याकडून बँक खात्याचे तपशील घेतले. या प्रकरणातून बाहेर निघायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले.

१० जानेवारी ला अधिकाऱ्याने नागपुरातून ४९ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते केले तर त्यानंतर १३ जानेवारी ला विदर्भातील एका मोठ्या शहरात जाऊन तेथून २६ लाख रुपये वळते केले. बाहेर असतानादेखील त्याचा व्हिडीओ कॉल सुरू होता. संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असताना एक नातेवाईक त्यांना भेटले. त्यांनी का घाबरलेले दिसता असे विचारले असता अधिकाऱ्याने आपबिती सांगितली. तुमची फसवणूक झाली आहे असे नातेवाईकाने सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

ट्रकने दिली मागेहून प्रवासी ॲटोला जब्बर धडक , ९ प्रवासी गंभीर जखमी


ट्रकने दिली मागेहून प्रवासी ॲटोला जब्बर धडक , ९ प्रवासी गंभीर जखमी

 

बल्लारपूर:-

कोठारीहून प्रवाशांनी घेवून बल्लारपूरकडे जात असलेल्या प्रवासी ऑटोला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघतात ९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना २३ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास कोठारीजवळील नाल्यावरील पुलाजवळ घडली कोठारी येथून प्रवाशांना भरून ऑटो क्रं एमएच ३४ बीएच १२२५ बल्लारपूरकडे जात होता. दरम्यान, कोठारी नाल्याजवळ ट्रक क्रं एमएच ४० बीसी ७८०९ भरधाव वेगाने बल्लारपूरकडे जात होता. यावेळी ट्रकची ऑटोला मागून जोरदार धडक बसली. त्यात ऑटोने प्रवास करीत असलेले प्रवासी परिवर्तन जुनघरे (३३) रा. कोठारी, दीपक मारस्कोले (३६), कवडू ढुमने (६४), मीना ढुमणे (६०), संतोष गडकर (३५), अमोल गडकर (३५), चंद्रकला पेंदोर (५३), विजया पिल्लेवार (१८) व कल्पना गुरनुले (३८) जखमी झाले.

अपघाताची माहिती होताच पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथे उपचारासाठी आणले. पुढील उपचारासाठी सर्व जखमींना चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कोठारी पोलीसांनी ट्रक चालक याच्यावर २८१, १२५ (ए) बीएनएस, १८४ मोवाका अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

पुढील तपास कोठारी चे ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश तोटावार करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

प्रॉपर्टी डीलरचा दगडाने ठेचून केला खून , एकाच रात्री दोन जनाची हत्या 


 प्रॉपर्टी डीलरचा दगडाने ठेचून केला खून , एकाच रात्री दोन जनाची हत्या 

नागपूर :

उपराजधानीत हत्यांचे सत्र सुरूच असून एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनांत गैंगवॉरमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे शहरातील क्राईम ग्राफचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. सक्करदरा व वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. एका घटनेत प्रॉपर्टी डीलरचा दगडाने ठेचून खून करण्यात आला तर दुसऱ्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची टोळक्याने चाकूने भोसकत हत्या केली. एकीकडे शहर पोलीस टायगर मॅरेथॉन मध्ये व्यस्त असताना दुसरीकडे गुंडांच्या दहशतीने डोके वर काढल्याचे चित्र आहे.

पहिली घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमोल कृष्णा वंजारी (३१) अंतुजीनगर, भांडेवाडी असे मृतकाचे नाव आहे. १ जानेवारी ला अमोलने त्याचे साथीदार हर्ष नाईक, राजू नाईक, किशन तांडी, शेखर शेंद्रे, रोहीत या साथीदारांसोबत तुलसीनगर सिमेंटरोडवर जब्बार उर्फ यश प्रवीण प्रधान याच्यावर चाकूने हल्ला केला होता. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व इतरांसोबत अमोलची तुरुंगात रवानगी झाली होती. मंगळवारी अमोल जामिनावर बाहेर आला. त्यानंतर तो बुधवारी सायंकाळी केबलच्या कामाने इतवारीत गेला. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास जब्बारने तेजस मेंढे, लकी बल्का व इतर ३-४ साथीदारांसोबत अमोलला न्यू सूरजनगर झोपडपट्टीत गाठले व बेदम मारहाण केली. आरोपींनी मिना कुमार यांच्या झोपडीच्या दरवाजातच अमोलवर चाकूने सपासप वार केले. त्यात अमोलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले. मिना कुमारने अमोलच्या वडिलांना व पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. अमोलचे वडील कृष्णा वंजारी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

गब्बरकडून इतरांचादेखील गेम करण्याची धमकी -

अमोलवर चाकूने वार केल्यानंतर गब्बर त्याच्या मृतदेहासमोर उभा झाला व तू माझ्यावर हल्ला केला म्हणून मी तुला संपविले. इतर लोक बाहेर आल्यावर त्यांनादेखील सोडणार नाही अशी धमकी त्याने दिली. सर्व आरोपींच्या हातात शस्त्र असल्याने घटनास्थळावर कुणीही त्यांना थांबविण्याचीदेखील हिंमत केली नाही.

पोलीस ठाण्यात तक्रार दिली अन तीन तासांत हत्या -आरोपी दिनेश गायकी हा कुख्यात गुंड असून तो काही दिवसांअगोदर पॅरोलवर बाहेर आला होता. दिनेश व शुभम हे दोघेही राजू भद्रेच्या टोळीशी जुळले आहेत. दिनेशला पिंटू शिर्के हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो जमीन कब्जा करण्याच्या मागे लागला होता. त्याने शुभमसोबत मटकाझरीत मुरूम खोदण्यासाठी जमीनीचा सौदा केला होता. अमोलदेखील त्याच जमिनीच्या सौद्यात इच्छुक होता. त्यातूनच वाद झाला होता.

तर वाचला असता अमोलचा जीव -

शुभमने हल्ला करत धमकी दिल्याची तक्रार अमोलने बेलतरोडी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र जमिनीच्या वादातून भांडण झाल्याचे कारण देत तक्रार फारशी गंभीरतेने घेतली नाही. जर पोलिसांनी लगेच कारवाई केली असती तर अमोलचा जीव वाचू शकला असता.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

विहरीत उडी घेऊन अल्पवयीन मुलाने आपली संपविली जीवनयात्रा आत्महत्या


विहरीत उडी घेऊन अल्पवयीन मुलाने आपली संपविली जीवनयात्रा आत्महत्या

प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गड़चिरोली

शेगाव बू(दि.24 जानेवारी) :- येथून जवळच असलेल्या व भद्रावती तालुक्यातील सांसद ग्राम चंदणखेडा गावात आज अल्पवयीन मुलगा आरोहन माणिक बागेसर याने गावातीलच बाजारवाडी मधील हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक विहारीत उडी मारून जीवन यात्रा संपवली. 

सविस्तर माहिती अशी की, आरोहन हा घरातून बुधवार दि. २२ ला सायंकाळी ६ च्या सुमारास घरून निघून गेला. घरून निघून गेल्या कारणांनी मोठा भाऊ व आई यांनी सर्वत्र त्याची शोधाशोध केली. पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही.

दरम्यान २ दिवसा नंतर आज दि. २४ डिसेंबर ला गावातीलच विहरीत त्याचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील काही मुलांना दिसून आले. ही बातमी गावात पसरताच गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बघण्यासाठी गर्दी केली होती. त्या नंतर भद्रावती पोलीस यांना याची सूचना मिळाल्या बरोबर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या नंतर पंचनामा करून  मृत्यूदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथे पाठविण्यात आला आहे. 

३ वर्षा आधी आरोहन च्या वडिलांनी सुद्धा कर्ज बाजारी पणामुळे अशीच विहरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली होती. तेव्हा पासून एकट्या आई च्या भरोशावर सम्पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती. आई मोलमजुरी करून यांचे पालनपोषण करीत होती. आरोहन च्या अशा एकाकी घेतलेल्या टोकाच्या पावलांमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

तरुणीवर बलात्कार करूनही समाधान झाले नाही तरुणीच्या योनीमध्ये ब्लेड आणि टाकले दगड


  तरुणीवर बलात्कार करूनही समाधान झाले नाही तरुणीच्या योनीमध्ये ब्लेड आणि टाकले दगड

 

मुंबई:-

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत क्राईम देखील मोठ्या प्रमाणावर घडतात. येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसई बीचवर एका अज्ञाताने 20 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर पीडित तरुणी बीचवरच रडत बसली होती. तरुणीला बीचजवळील परिसरात रडताना पाहून काहींनी या घटनेची माहिती वनराई पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पीडित तरुणीचा विचारपूस केली असता तिच्यावर बीचवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अश्या गजबजलेल्या ठिकाणी ही  घटना घडलीच कशी असा  प्रश्न जनतेसह पोलिसांना देखील पडला आहे.
खरं तर, वसई बीच हा तसा गजबजलेला परिसर असतो. इथे अनेक पर्यटक फेर फटका मारण्यासाठी येत असतात, अशा गजबलेल्या ठिकाणी एका 20 वर्षांच्या तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वनराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 वर्षीय पीडित तरुणी 22 जानेवारी रोजी वसई बीचवर फिरायला गेली होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणी गोरेगाव ई रेल्वे स्थानकाजवळ बसून रडत होती. यावेळी याच परिसरातून जाणाऱ्या एकाने पीडित तरुणीला रडताना बघितलं आणि याची माहिती वनराई पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वनराई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडित तरुणीची विचारपूस करत तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक ब्लेड आणि दोन दगड आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

लालपरी’च्या प्रवासात 15 % वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार, शासणाचा निर्णय


लालपरी’च्या प्रवासात 15 % वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडंही 1 फेब्रुवारीपासून वाढणार, शासणाचा निर्णय 

 


 

मुंबई:-

सर्वसामान्याचा आधार असलेल्या लालपरी अर्थात एसटी बसचा प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही भाडेवाढ लागू होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.एसटी बससह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी पासून दोन्ही वाहनांच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे एसटी बसने लांब पल्ल्याचा आणि रिक्षा किंवा टॅक्सीने जवळचा प्रवास करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

भाडेवाढीच्या वृत्ताला परिवन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाची गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एसटीसोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ प्रत्येक वर्षी होणे अपेक्षित असते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून एसटीची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित 14.97 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. ही भाडेवाढ आजपासूनच लागू होईल. यासह रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.

दरम्यान, आगामी काळामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा होत आहेत. त्याआधी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने गावखेड्यातून परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचे किमान भाडे 23 वरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 वरून 31 रुपये होणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

मोहझरी येथे पोहोचणारी अवैध दारु गडचिरोली पोलीसांनी चारचाकी वाहनासह पकडून ५३२८०० मुद्देमाल केला जप्त


मोहझरी येथे पोहोचणारी अवैध दारु गडचिरोली पोलीसांनी चारचाकी वाहनासह पकडून ५३२८०० मुद्देमाल केला जप्त 

 

 



गडचिरोली, २४ जानेवारी २०२५

 जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी इसम नामे महेश हेमके रा मुडझा ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर हा अवैध रित्या आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करून पो. स्टे. गडचिरोली हद्दीतील मोहझरी गावात राहणारा इसम नामे शिवा ताडपल्लीवार यास पुरवठा करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर सदर पथक रात्री 23.30 दरम्यान गडचिरोली येथील सत्र न्यायालय समोरील चौकात सापळा रचून बसले असता, एक चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा दिला. त्यानंतर वाहनाची जवळून तपासणी केली.सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 40 पेटी (बॉक्स) किंमत अंदाजे 3,32,800/- रु. (तीन लाख बत्तीस हजार आठशे) मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी महिंद्र कंपनीचे झायलो वाहन क्र. एम. एच. 14 सी.एस. 4221 किंमत अंदाजे 2,00,000/- (दोन लाख) रु. असा एकुण 5,32,800/- (पाच लाख बत्तीस हजार आठशे) रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे इसम नामे 1) रंजीत अरुण सरपे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर, 02) चेतन देवेंद्र झाडे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर याचे विरुध्द कलम 65 (अ), 83, 98 (2) म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सदर गुन्हयात पाहिजे असलेले दोन आरोपी नामे 1) महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर व 2) शिवा ताडपल्लीवार रा. मोहझरी ता. जि. गडचिरोली यांच्या शोध घेणे सुरु असून सदर गुन्हाचा पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  एम. रमेश, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे आणि चापोअं/माणिक निसार यांनी पार पाडली. मोहझरी व काटली चक या दोन्ही गावात बऱ्याच प्रमाणात देशी विदेशी दारुची विक्री वारेमाप सुरु आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होते आहे असेच दिसते आहे या दोन्ही गावांतील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

स्मार्ट मीटरच्या नावावर वीज ग्राहकांना सरकारकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न - आ. विजय वडेट्टीवार


स्मार्ट मीटरच्या नावावर वीज ग्राहकांना सरकारकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न - आ. विजय वडेट्टीवार

 मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील आश्वासनावरून घुमजाव

 स्मार्ट मीटर न लावण्याचे जिल्हा वासियांना काँग्रेसचे आवाहन

गडचिरोली:-

निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारने व्यवसायदारांचे हित जोपासण्यासाठी राज्यातील वीज वापर करणाऱ्या जनतेच्या मानगुटीवर आर्थिक भुर्दंड लादणारे व दीड पट अधिक गतीने चालणारे स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने लावणे सुरू केले असून जनतेने सरकारच्या या अन्यायकारक धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करीत असून प्रीपेड स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. असा सज्जड इशारा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने केवळ सत्ता प्राप्तीसाठी प्रलोभने देऊन जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजवर केले आहे. देशासह राज्यात महागाई, बेरोजगारी यामुळें सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच विवीध जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून सर्व सामान्यांना जिवन जगणे अवघड झाले आहे. अशातच गेल्या वर्षभरापूर्वी विज वितरण कंपनी कडून विज ग्राहकांचे विद्युत मीटर बदलाविण्यात आले होते. मात्र वर्ष लोटताच आता सरकारने स्मार्ट मीटर च्या नावाखाली वेठीस धरण्याचा सपाटा सुरू केला आहे. या संदर्भात विरोधी बाकावरून स्मार्ट मीटर ला कडाडून विरोध करीत आम्ही जनहिता करिता आवाज उचलला असताना मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यावरून आता तुछच्या केले असून जनतेला दिलेले स्मार्ट फिटर न लावण्याचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. तर स्मार्ट मीटर हे दीड पट अधिक गतीने चालणारे मीटर असुन हे प्रीपेड असल्याने यात अगोदर रिचार्ज कारणे अनिवार्य आहे. आहे मोबाईल प्रमाणेच रिचार्ज संपला की विज पुरवठा आपोआप बंद होईल. म्हणजेच जनतेला रात्रौ बेरात्री लहान मूल,अभ्यासक मुले तसेच इतर सर्व कार्यासाठी चक्क अंधारात रात्र काढावी लागणार आहे.
 देशांतील व राज्यातील महायुती सरकार हे गोरगरिबांसाठी नसून केवळ व्यापारी हीत जोपासणारे सरकार असुन स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) योजने अंतर्गत जनतेची अर्थिक लूट करु पहाणाऱ्या या लुटारू सरकारच्या अन्यायकारक धोरणाला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने प्रखरपणे विरोध करणे गरजेचे असुन जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर आहे. आपण सर्व विज ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शवावा. तसेच विज वितरण कंपनी कडून कुठल्याही ग्राहकाकडे  बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न होत असल्यास आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल काँग्रेस नेते, राज्याचे माजी विरोधी विरोधी पक्षनेते,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

लॉयड्सच्या लोह प्रकल्पाला विरोध नाही, परिसरातील गावाचा विकास महत्त्वाचा 


लॉयड्सच्या लोह प्रकल्पाला विरोध नाही, परिसरातील गावाचा विकास महत्त्वाचा 

 


प्रतिनिधी / प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गड़चिरोली
Mo. 9325766134

 गडचिरोली उद्योगविहीन आणि बेरोजगारीने गांजलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि. च्या कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी गुरुवार २३ जनसुनावणी अतिशय उत्साहात व शांततामय वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे विस्तारीकरणाअंतर्गत असलेल्या गावांतील नागरिकांनी लॉयड्सच्या लोहप्रकल्प विस्तारीकरणाचे एकमताने स्वागत केले. सोबतच स्थानिकांना रोजगार व आरोग्य, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या सुविधा पुरवण्याची मागणी कंपनीकडे केली.

लॉयड्सच्या लोहप्रकल्प विस्तारीकरणाची ही पर्यावरणविषयक जनसुनावणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोनसरी येथील प्रकल्पस्थळी गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.

या जनसुनावणीसाठी लॉयड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोनसरी येथील स्टील प्लान्टचे विस्तारीकरण करून तो २ बाय ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), १० दशलक्ष टन प्रतिवर्ष थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट आणि २ बाय ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष आयरन ओर पेलेट प्लान्ट, तसेच इंटेग्रेटेड स्टील प्लान्ट (४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता) एवढा वाढविण्याकरिता ही जनसुनावणी घेण्यात आली. कोनसरी व आसपासच्या गावांतील नागरिकांनी या सुनावणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी करताना माओवादग्रस्त असलेल्या जिल्ह्यात कंपनीमुळे विकासाचा सूर्य उगवल्याचे सांगितले. पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत अनेकांनी आपले सकारात्मक मत मांडले. उद्योगाचा विस्तार होताना प्रदूषण वाढू नये, याकरिता कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यासह, सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयीचे कौतुक केले. मात्र उद्योगातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये व त्याचा त्रास जनसामान्यांना होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2025

PostImage

एक फेब्रुवारीपासून आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके


एक फेब्रुवारीपासून आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके

 

गडचिरोली:-

आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत 1 फेब्रुवारीपासून बदल होणार असून, शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या

आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे सहआयुक्त दिगांबर चव्हाण, सरपंच पूनम किरंगे, तसेच प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), नमन गोयल (भामरागड), कुशल जैन (अहेरी) व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे, त्यांचेसोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल, याबाबत मी आपणास आश्वस्त करतो असे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रम शाळा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उईके यांनी 7 फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल, असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे सांगितले. "एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील," असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आर्थिक मदतीमुळे व्यवसाय सुरू करूंन रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे आभार व्यक्त केले. तसेच घरकुलाची रक्कम वाढविण्याचीही मागणी केली. यावेळी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे व जात प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी केले. मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 23, 2025

PostImage

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू,वडीलांची तक्रार 


वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू,वडीलांची तक्रार 

 

राजुरा, ता. प्र. -राजुरा तालुक्यातील भेंडाळा या गावातील युवक समाधान दीनानाथ जीवतोडे, वय 20 हा युवक शेतात फवारणी करून घरी आला असता त्याची अचानक तब्येत बिघडली आणि त्याला तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिका-यांनी त्याच्याकडे एक तास दुर्लक्ष केले आणि नंतर त्याची प्रकृती गंभीर होताच सलाईन लावून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचवेळी या युवकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे गावकरी व नातेवाईक गोळा झाले आणि त्यांनी वैद्यकीय अधिका-यांना जाब विचारला. यावेळी रूग्णालयात पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर गावकरी व नातेवाईकांनी राजुरा पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली. आज दिनांक 23 जानेवारी ही घटना घडली.

समाधान हा युवक गावातून मोटरसायकल वर बसून आणि चालत बोलत रूग्णालयात आला. मात्र त्याचेवर परिस्थिती पाहून तातडीने त्याचेवर योग्य औषधोपचार झाला असता तर त्याचा जीव वाचला असता, परंतु येथील उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हेळसांड केल्यामुळेच आपल्या मुलाचा जीव गेला, असा आरोप समाधानचे वडील दीनानाथ जीवतोडे आणि गावकऱ्यांनी केला आहे. आपला मुलगा मरण पावल्यावर त्याला चंद्रपूर ला रेफर करण्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येंने गावकरी जमा झाले आणि रूग्णालयातून प्रेत उचलण्यास विरोध केला. यानंतर राजुरा पोलिसांनी समजूत घालून नागरिकांना शांत केले. अखेर राजुरा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात वडील व‌ नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. उशिरा या युवकाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर 7-30 वाजता प्रेत परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले.

समाधान हा गावातील अतिशय मनमिळाऊ आणि एकुलता एक मुलगा होता. त्याला वेकोलित भूमी अधिग्रहण झाल्याने लवकरच नोकरी मिळणार होती. या युवकाच्या अकस्मात मृत्यूने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. त्याच्यामागे आई वडील आणि दोन विवाहित बहिणी आहेत.

यासंदर्भात राजुरा उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांना विचारणा केली असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिका-यानी योग्य औषधोपचार केला. मात्र त्याला विषबाधा झाल्याने या युवकाला वाचवू शकलो नाही


PostImage

Vaingangavarta19

Jan. 23, 2025

PostImage

मार्कंडेश्वर मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा - मुख्य सचिव सुजाता सौनिक


मार्कंडेश्वर मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा - मुख्य सचिव सुजाता सौनिक

 

  मार्कंडा  येथील मंदिरला भेट व पाहणी

 

गडचिरोली दि.२३: जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिव मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
श्रीमती सौनिक यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन विकासकामांचा आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट, वाहनतळ, बगीचा यांसारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मार्कंडा परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारे भव्य स्वरूप देण्याच्या सूचना दिल्या. त्यात जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वाराची उभारणी, शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय, बैठक व्यवस्था, पुस्तकालय, प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन यांचा समावेश करण्याचे सांगितले.

मंदिर परिसरात भाविकांसाठी सुयोग्य रस्ता आणि वाहनतळ उभारणे, भक्तनिवास दुरुस्ती व त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले. मंदिरालगतचे ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी ठराव मंजूर करून स्थानिक ग्रामस्थांची संमती तातडीने मिळवण्यावर भर देण्याचे सांगून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी व नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाल मंजुरी देणे सोयीचे होईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरातत्त्व विभागाद्वारे मुख्य मंदिराचे सुरू असलेल्या बांधकामांना गती देण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्य सचिवांनी या विकास कामांमध्ये विलंब न करता पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेवर निर्णय घेऊन कामे गतिमान करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त, पुजारी, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 23, 2025

PostImage

दुचाकीस्वारांनी चारचाकी वाहन अडवून बंदुकीचा धाक दाखवून दोन लाख चोवीस हजार रुपयाचे  लुटले दागिने


दुचाकीस्वारांनी चारचाकी वाहन अडवून बंदुकीचा धाक दाखवून दोन लाख चोवीस हजार रुपयाचे  लुटले दागिने 

 गोंदिया : गंगाझरी पोलीस
ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुनेवानी ते मंगेझरी रोडवरील जंगल परीसरात बंदुकीच्या धाकावर एका व्यापाऱ्याचे २ लाख २४ हजार रुपयाचे दागिने लुटल्याची घटना २१ जानेवारीच्या रात्री ११.४५ वाजता घडली. आरोपींनी एक राऊंड हवेत फायर करून त्यांच्या मनात धडक भरवली. या संदर्भात तिन्ही अनोखळी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरोडाच्या सुभाष वॉर्डातील गौरव सेवकराम निनावे (३३) हे मित्र दृश्यत रेबे यांचा पुतण्या राम रेबे यांच्या लग्नाचा स्वागत समारोह २१ जानेवारी रोजी पलाश रिसोर्ट दांडेगाव येथे असल्याने त्या कार्यक्रमासाठी आकाश नामदेव नंदरधने (३२) रा. तिरोडा यांच्यासोबत चारचाकी वाहन एमएच ३५ एजी १८३६ गाडीने तिरोडा येथून रात्री ९ वाजता पलाश रिसोर्ट येथे गेले होते. पलाश रिसोर्ट येथील कार्यक्रमाला रात्री ११:३० वाजता पलाश रिसोर्टचे बाहेर लावलेले रेडीयम एरो मुळे निनावे हे १० मिनीटांनी जुनेवानी गावात आले. जुनेवानी गावापासून काही अंतरावर पुढे गेल्यावर सिंमेट रस्ता संपून कच्चा रस्ता सुरु झाला. १ किमी अंतरावर निनावे यांच्या कारच्या पुढे पल्सर मोटारसायकलवर ३ व्यक्ती ट्रीपल सिट जातांना दिसले. त्यानी मोटारसायकल थांबवून कारला हात दिला.

तिघेही मंकी कैंप घालून त्यावर स्कार्फ गुंडाळून होते. त्यापैकी दोघे निनावे यांच्या बाजुला व एक व्यक्ती आकाशच्या बाजुला आल्याने कारचे खिडकीचे काच खाली उतरवून आकाश याने त्याला हा रस्ता कुठे जात आहे असे विचारताच त्या तिघांनी त्याचाजवळ असलेल्या पिस्तुल काढुन निनावे व आकाशच्या कानाजवळ लावली. तुमच्या जवळ जो सामान आहे तो काढून द्या असे म्हटले. ते दोघेही घाबरल्याने थोडा वेळ गप्प राहीले. यात त्यांनी त्या दोघांच्या जवळून २ लाख २४ हजार ५०० रूपयाचा माल हिसकावून नेला. आरोपींवर गंगाझरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५), ३५१ (२), सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहेत.

आकाशच्या हातात ठेवली बंदुकीची गोळी अन् केला फायर -

आकाशच्या बाजुला असलेल्या तरूणाने आकाशच्या हातात एक बंदुकीचा गोळी देवुन तुम्हाला गम्मत वाटते काय असे म्हणत त्याने बंदुकीतुन एक रांऊड हवेत फायर केला. अन् दागिणे लुटून नेले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 23, 2025

PostImage

जिगोलो सोबत महागड्या हॉटेलात पत्नी करीत होती शय्या साजरी,पतीने रंगेहाथ पकडले  नको त्या स्थितीत


जिगोलो सोबत महागड्या हॉटेलात पत्नी करीत होती शय्या साजरी,पतीने रंगेहाथ पकडले  नको त्या स्थितीत 

 

 

 

नागपूर : महिलांच्या किटी पार्टीत आयोजक महिलांनी काही'जिगोलो' युवकांना बोलावले. तेथून संपर्कात आलेल्या एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची पोलिसांत जरी तक्रार नसली तरी शहरभर मोठी चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहतूकदार असलेल्या युवकाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्यातून त्याला सुबत्ता आली. त्याने स्वतःसाठी आणि पत्नीसाठी स्वतंत्र कार घेतल्या.

उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत वारंवार जाण्याची सवय होती. दुसरीकडे पती सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात व्यस्त राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्या महिलेच्या मैत्रिणींनी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये किटी पार्टी आणि स्नेहमिलन आयोजित केले. रात्रभर चालणाऱ्या पार्टीत 'एस्कॉर्ट सर्व्हिस' पुरविणाऱ्या कंपनीकडून काही 'जिगोलो' (पुरुष वेश्या) बोलावण्यात आले होते. पार्टी संपल्यानंतर दिल्लीतील एका 'जिगोलो' युवकाचा मोबाईल क्रमांक महिलेने घेतला. काही दिवसांनंतर तिने त्याला फोन केला. 'स्पेशल सर्व्हिस' म्हणून विमानाचे तिकिट आणि मोबदला म्हणून १ लाख रुपये त्या युवकाने मागितले. महिलेने सर्व अटी मान्य करीत पैसेही दिले. तेव्हापासून ही महिला त्या युवकाला पैसे देऊन दिल्लीवरुन नागपुरात बोलवित होती. अनेकदा तो युवक नागपुरात येऊन गेला. दोघेही रात्रभर महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवत होते. पहाटेच्या सुमारास महिला घरी परत येत होती.पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या

दर महिन्याला त्या युवकासोबत रात्र घालविता यावी, यासाठी महिला पतीला जेवनातून झोपेच्या गोळ्या देत होती. तो झोपल्यानंतर बाहेरुन दार लावून ती कारने वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये जात होती. तेथे त्या युवकासोबत रात्र घालवायची. पहाटे घरी परत येत होती. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता.असा झाला उलगडा

काही दिवसांपासून पत्नीच्या वागण्यावर पतीला संशय आला. त्याने पत्नी कुठे कुठे जाते, याची माहिती घेण्यासाठी कारमध्ये जीपीसी प्रणाली लावली. महिलेने दिल्लीवरुन 'जिगोलो' युवकाला बोलावले. रात्री पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मुलीला बाजुच्या रुममध्ये झोपवले. कारने थेट हॉटेल गाठले. मुलीची प्रकृती बिघडल्याने ती रात्री एक वाजता उठली. आई न दिसल्यामुळे तिने वडिलांना उठवले. पत्नी बेपत्ता असल्यामुळे त्याने कारचे लोकेशन तपासले. कार एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये असल्याची माहिती मिळाली. तो भावाला घेऊन त्या हॉटेलमध्ये गेला. तेथे पत्नीच्या नावाने बुक असलेली खोली उघडायला लावली असता पत्नी एका युवकासोबत नको त्या अवस्थेत आढळून आली. त्याने दोघांनीही तेथे मारहाण केली. प्रकरण पोलिसांत गेले. मात्र, बदनामीच्या भीतीने पतीने तक्रार केली नाही. त्याने पत्नीला लगेच माहेरी पाठविले आणि तिच्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची सध्या शहरभर चर्चा आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 23, 2025

PostImage

दुचाकी वाहन चोरट्याच्या पोलीसांनी आवळल्या मुस्क्या 


दुचाकी वाहन चोरट्याच्या पोलीसांनी आवळल्या मुस्क्या 

देसाईगंज:-
सविस्तर वृत्त असे आहे की, देसाईगंज पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 21/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहीता व अपराध क्रमांक 128/2024 कलम 379 भादवि अन्वये वाहन चोरीबाबात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेतले असता मिळून आले नाही. याबाबत दि. 18 जानेवारी 2025 रोजी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि. संदीप आगरकर यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, इसम नामे तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार, वय 22 वर्ष हा हनुमान वार्ड देसाईगंज जि. गडचिरोली याने आपल्या राहत्या घरी दोन चोरीचे दुचाकी वाहन लपवून ठेवलेले आहेत व ते वाहन कोणाला तरी विकण्याच्या तयारीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 22.30 वा. सपोनि. संदीप आगरकर हे पोलीस पथकासह सदर ठिकाणी रवाना झाले.
सदर ठिकाणी पोहचताच आरोपीस नमुद गुन्हयात ताब्यात घेऊन विचारपूस केले असता आरोपीने उडवा-उडवीची उत्तरे दिली. आरोपीकडे वाहनाच्या कागदपत्राबाबत सखोल चौकशी केली असता त्याबाबत त्याने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यानंतर पोस्टे येथील अभिलेख तपासले असता, वाहन क्र. 1) एम.एच.35ए.एल.6170 काळया रंगाची हीरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल ही पोस्टे दाखल अप. क्र. 21/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. गुन्हयातील चोरीस गेलेला वाहन असून किंमत अंदाजे 80,000/- रुपये असल्याचे दिसून आले. तसेच वाहन क्र. 2) एम.एच.33 यु 3930 होंडा शाईन ही पोस्टे. दाखल अप. क्र. 128/2024 कलम 379 भादवि किंमत अंदाजे 45,000/- रुपये मधील असल्याचे आढळून आले. त्यानंतर नमुद गुन्हयामध्ये आरोपी नामे तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार वय 22 वर्ष याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीच्या ताब्यातील दोन्ही दुचाकी वाहन अंदाजे किंमत 1,25000/- रू. चा मुद्देमाल जप्त करुन नमुद गुन्ह्रात त्याला अटक करुन माननीय प्रथम श्रेणी न्यायालय देसाईगंज यांच्या समक्ष हजर करण्यात आले. मा. न्यायालयाने त्याला 02 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधीक तपासात असे दिसून आले की, सदर अटक आरोपी हा पोलीस ठाणे ब्राम्हपुरी जि. चंद्रपूर येथील एका खुनाच्या गुन्हयातील रेकॉर्ड वरील आरोपी आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील पो.नि. अजय जगताप, यांच्या नेतृत्वात सपोनि. संदीप आगरकर, सपोनि. मनीष गोडबोले, पोअं/विलास बालमवार, पोअं/नितेश कढव, पोअं/सतीश बैलमारे पोअं/रोशन गरमडे यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 23, 2025

PostImage

अल्पवयीन विद्यार्थिशी लगट करुण विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल 


अल्पवयीन विद्यार्थिशी लगट करुण विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल 

 

गोंदिया:-

शाळेत शिकतअसलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, त्या शिक्षकावर सोमवारी २० जानेवारीला रात्री १ वाजता तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुनील आत्माराम शेंडे (५२) रा. गांधी वॉर्ड, तिरोडा असे आरोपीचे नाव आहे.

सुनील शेंडे हा तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत एनसीसी शिक्षक पदावर कार्यरत असून, दहाव्या वर्गातील १५ वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा. मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी शेंडे तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा. गुरुवारी १६ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता शाळेत गेली असता आरोपीने तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा हात पकडला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ऑफिसमध्ये तिचा उजवा हात पकडला. त्याच्या हाताला झटका देत ती मुलगी ऑफिसच्या बाहेर गेली. 

संधी मिळेल त्या ठिकाणी तो तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ७४, ७५ (१) (१) सहकलम ८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनयमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक दिव्या बरड करीत आहेत.

कुणाला सांगू नको अन्यथा याद राख

त्या १५ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता कुणाकडे करू नकोस, घरच्यांना काही सांगू नकोस अन्यथा याद राख, याचा भुर्दंड तुला सहन करावा लागेल अशी धमकी देत असल्याचे मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विनयभंगासाठी शनिवारी, रविवारी सराव ?

आरोपी शिक्षक सुनील शेंडे हा एनसीसीचा सराव करण्याच्या नावावर दर शनिवारी व रविवारी विद्यार्थ्यांना बोलवत होता. या सरावाच्या नावावर आरोपी त्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायचा. विनयभंग व अश्लील चाळे करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही एनसीसीचा सराव आयोजित करायचा का? असा सवाल उपस्थित होत आहे.

चार दिवसांपासून करीत होता अश्लील चाळे -

१६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता ते १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान या चार दिवस आरोपीने पीडित मुलीशी अश्लील चाळे केले. तिचा विरोध असतानाही आरोपी तिला वारंवार शाळेच्या ऑफिसमध्ये बोलावून आलमारीतील फाइल काढायला सांगण्याच्या बहाण्याने छेडायचा. या घटनेसंदर्भात चौथ्या दिवशी तिरोडा पोलिसांत तक्रार करण्यात आली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 22, 2025

PostImage

वडलापेठ येथे गरोदर आणि बाळंतीण महिलांची आरोग्य तपासणी


वडलापेठ येथे गरोदर आणि बाळंतीण महिलांची आरोग्य तपासणी

अहेरी:-
 महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वडलापेठ  येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. लूबना हकीम यांच्या नेतृत्वात किशोरवयीन आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम अंतर्गत गरोदर माता तसेच बाळंतीण झालेल्या मातांची तपासणी करण्यात आली आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी गरोदर मातांना घ्यावयाची काळजी आणि बाळंतीण महिलांनी स्वतः तसेच आपल्या नवजात बाळांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ लुबना हकीम यांनी मार्गदर्शन केले.
 तसेच यावेळी  किशोवयीन मुलांच्या शारीरिक,मानसिक व भावनिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी जागरूकता,समुपदेशन व नियमित तपासणी यावर भर देण्यात आला.पोषण,स्वच्छता व पुनरुत्पादक बद्दल माहिती देण्यात आली.
  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मध्ये मातांना मिळणाऱ्या ५ हजार रोख रक्कम बद्दल, जननी सुरक्षा योजना मध्ये घरी प्रसूती न करता दवाखान्यातच प्रसूती करावी,पोषण अभियानामध्ये राष्ट्रीय पोषण अभियानाचे महत्व पटवून देत अंगणवाडी केंद्रातून मिळणाऱ्या पूरक पोषण आहाराचे महत्व सांगण्यात आले. त्याचप्रमाणे १०० दिवस टी बी कार्यक्रम यांबदल मार्गदर्शन करण्यात आले.
  याच कार्यक्रमात मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून हळदी कुंकू चां आणि वान वाटप करण्यात आले. 
   यावेळी डॉ लूबना हकीम यांनी नवजात बाळांसाठी स्वतः स्वखर्चाने दूध पावडर ची व्यवस्था करून दिली.
  यावेळी RDK,रक्तदाब,हिमोग्लोबिन,ब्लड शुगर तपासणी,उंची वजन आदी तपासणी करण्यात आली.
  यावेळी अधीपरीचारिका सिंग,महिला आरोग्य तपासिका गोगे,आरोग्य सहायक मुलकलवार तसेच वडलापेठ,चींतलपेठ आणि दिणाचेरपल्ली च्या आशा वर्कर उपस्थित होत्या.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 22, 2025

PostImage

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसम ठार


अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसम ठार

आष्टी :-
 तारसा कडून आष्टी कडे पादचारी जात असलेल्या इसमास अज्ञात वाहनाने जब्बर धडक दिली तेव्हा इसम जागीच ठार झाल्याची घटना दि. (21) ला मंगळवारी रात्री आठ वाजताचे दरम्यान  आष्टी पुलाजवळ घडली.

संदीप देवान वय 50 श्रीनगर तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव असून तो पायदळ आष्टी कडे जात होता. गोंडपिपरी मार्गे आष्टी कडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने संदीप देवान याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना दिली घटनास्थळी ठाणेदार व गोंडपिपरी पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी येथे पाठविले. पुढील तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 22, 2025

PostImage

 पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 03, 42, 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त


 पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 03, 42, 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.


गडचिरोली
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी एका चारचाकी सिल्वर करलची फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहनाने काही इसम आरमोरी दिशेकडून वडसा मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे, अशी गोपनिय माहिती पोअं/शैलेश तोरकपवार, पोस्टे वडसा यांना मिळाली. सदरची माहिती वडसा येथील पो.नि. अजय जगताप यांना याबाबत कळविले असता, पो.नि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोस्टे वडसा येथील पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग करत असतांना शंकरपूर येथून वाहन चालक हा पोलीसांना चकमा देवून कुरखेडाच्या दिशेने वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर बाबत पो.नि. जगताप यांनी पोस्टे कुरखेडा येथील पो.नि. महेंद्र वाघ यांना माहिती दिली.

सदर माहितीवरुन पोस्टे कुरखेडा येथील पो. नि. महेंद्र वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह गोठणगावाजवळ सापळा रचून बसले असता, रात्री 22.00 वा दरम्यान एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसली. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन थांबविण्याचे प्रयत्न केले असता, वाहन चालक पोलीसांना हुलगावणी देवून भरधाव वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर वाहनाचा पाठलाग करुन मौजा कढोली येथील तूकाराम विदयालयासमोर वाहनाला थांबविण्यात आले. त्यावेळी वाहन रस्त्यावर उभी करुन वाहन चालक अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. त्यानंतर सदर वाहन चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात खाखी रंगाच्या खडर्यामध्ये एकुण 25 पेटी ज्यामध्ये प्रत्येकी देशी दारू टायगर ब्रॉन्ड संत्रा कंपनीचे 90 एम.एल. मापाच्या 95 नग निपा असे एकुण 2375 नग निपा किंमत अंदाजे 1,42,500/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन क्र. एम. एच. 31 सी. एन. 7120 किंमत अंदाजे 2,00,000/- रु. असा एकुण 3,42,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे कुरखेडा येथे अप.क्र. 12/2025 कलम 65 (अ) महा. दा. का. सहकलम 184 मो.वा.का. अन्वये अज्ञान इसमा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा पो. नि. श्री. महेंद्र वाघ, पोउपनि. दयानंद भोंबे, पोहवा/शेखलाल मडावी, पोअं/ संदेश भैसारे, पोअं/नरसिंग कोरे, चासफौ/घागी, तसेच पोस्टे वडसा येथील पो.नि.श्री. अजय जगताप, सपोनि. मनीष गोडबोले,
पोउपनि, चेतन परदेशी, पोहवा/राकेश डोनाडकर, पोअं/शैलेश तोरकपवार, पोअं/नितेश यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 21, 2025

PostImage

मोठी बातमी  पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षलवाद्यांना कंठस्नान, अधूनमधून चकमक सुरूच..


मोठी बातमी 
पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षलवाद्यांना कंठस्नान, अधूनमधून चकमक सुरूच..


विजापूर :-
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस नक्षल चकमकीत १५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जयराम ऊर्फ चलपतीही मारला गेला आहे. रविवारी रात्रीपासून ते आज मंगळवारच्या सकाळपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू आहे. सदरची कारवाई छत्तीसगड आणि ओडिशा पथकाद्वारे करण्यात आली. यात १० संघ एकत्र येत ओडिशातील ३ पथके, छत्तीसगड पोलिसांचे २ पथके आणि सीआरपीएफची ५ पथके या कारवाईत सहभागी होती. जवान परिसरात शोध मोहिमेवर असतांना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गारियाबंदचे एसपी निखिल राखेचा, ओडिशाचे नुआपाडा एसपी राघवेंद्र गुंडाला, ओडिशाचे डीआयजी नक्षल ऑपरेशन अखिलेश्वर सिंह आणि कोब्रा कमांडंट डीएस कथैत यावर देखरेख करीत आहेत. चकमकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही मैनपूरला पोहोचले. सुरक्षेच्या कारणास्तव भातीगढ स्टेडियमचे छावणीत रूपांतर करण्यात आले. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी ३ आयईडीही जप्त करण्यात आले. कुऱ्हाडी घाटातील भालू दिग्गी जंगलात १ हजार जवानांनी सुमारे ६० नक्षलवाद्यांना घेरले आहे. त्यामुळे नक्षली मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
वर्तविण्यात येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 21, 2025

PostImage

वडील करतो अवैध दारु विक्री तर मुलगा करतो रेतीची तस्करी, यांच्यावर कारवाई करणारा तरी कोन? परिसरात खमंग चर्चा


वडील करतो अवैध दारु विक्री तर मुलगा करतो रेतीची तस्करी, यांच्यावर कारवाई करणारा तरी कोन? परिसरात खमंग चर्चा 

 

आरमोरी:
आरमोरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या जोगीसाखरा मार्गावरील एका नदीतिरावर जंगल परिसरात एक प्रख्यात दारुविक्रेता सर्रासपणे खुलेआम दारुची विक्री करीत असताना संबंधित विभाग आंधळेपणाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर या दारूविक्रेत्याच मुलगा लगतच्याच नदीपात्रातून रात्री, दिवसा सर्रास रेतीची तस्करी करीत असल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभाग सदर पिता-पुत्राचा शोध घेऊन कारवाई करण्याचे धाडस दाखविणार काय? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारुबंदी असली तरी शहरासह गामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोहफुल, देशी, विदेशी दारुचा महापूर वाहत आहे. संबंधित विभाग मात्र लहान विक्रेत्यांवर कारवाई करून मोठ्या विक्रेत्यांची जणुकाही पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरमोरी शहरासह ग्रामीण भागात खुलेआम अवैध दारुविक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरापासून जवळव असलेल्या

जोगीसाखरा मार्गावरील नदीपात्रात या परिसरातील एक प्रख्यात दारूविक्रेता खुलेआम दारूची विक्री करीत असतानाही त्याच्यावर कारवाई करण्यास संबंधित विभाग आंधळेपणाची भूमिका बजावत आहे. याचे नेमके कारण काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. इतकेच नव्हे तर सदर प्रख्यात दारूविक्रेत्याचा मुलगा दिवसरात्र लगतच्याच नदीपात्रातून रेती तस्करी करीत असतानाही संबंधित विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एकंदरीत

• अवैधरित्यार रेती तस्करी करणाऱ्यावर पाळत ठेवून कारवाई करण्यासाठी एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे. रेती तस्कराचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. सदर भरारी पथक रात्री-बेरात्री सुद्धा गस्त घालण्याचे काम करीत आहे. पथकामार्फत रेती तस्करावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. यात कुणाचीही गय केली जाणार नाही.

-सी. एच. नागापुरे, मंडळ अधिकारी, आरमोरी

आरमोरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासकीय, निमशासकीय बांधकामासह खासगी बांधकामे अविरत सुरू आहेत. रेती घाटाचे लिलाव झाले नसतानाही या बांधकामास रेती येते कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तो प्रख्यात पिता व रेती तस्करी करणारा त्याचा पुत्र यांच्यावर संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी शहरासह ग्रामीण भागातील जनतेकडून केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 21, 2025

PostImage

अल्पवयीन मुलानेच केली वडिलाची हत्या, मुलाला आईने पुरावे नष्ट करण्याकरिता केली मदत


अल्पवयीन मुलानेच केली वडिलाची हत्या, मुलाला आईने पुरावे नष्ट करण्याकरिता केली मदत

 

 नागपूर : वडिलांच्या दारूच्या व्यसनाला व त्यानंतर होणाऱ्या छळवणूकीला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने वडिलांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याच्या आईने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची मदत केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.


मुकेश शंकरराव शेंडे (५७) इंगोलेनगर, हुडकेश्वर असे मृतकाचे नाव आहे. ते ताराचंद भोंगाडे यांच्या घरी पत्नी उर्मिला व १७ वर्षीय मुलासह भाड्याने राहत होते. त्यांचा एक मुलगा बाहेरगावी नोकरी करतो. शेंडे हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते व त्यांना दारूचे व्यसन होते. त्यातूनच ते पत्नी तसेच मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यांच्या या वागणुकीला दोघेही कंटाळले होते. १९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता शेंडे दारू पिऊन घरी गेले व नेहमीप्रमाणे त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते परत दारू पिण्यासाठी बाहेर गेले व रात्री दहा वाजता परतले. नशेत त्यांनी पत्नी व मुलाला परत शिवीगाळ सुरू केली. तेव्हा मायलेक जेवण करत होते. त्यांच्या या वागण्याला अल्पवयीन मुलाने विरोध केला असता शेंडे संतापले. त्यांच्यात भांडण झाले व झटापट सुरू झाली. त्यात अल्पवयीन मुलाने शेंडे यांना गादीवरून खाली ढकलले. खाली पडल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त निघायला लागले. आता वडील काय करतील या भितीपोटी अल्पवयीन मुलाने थेट टॉवेल उचलला व गळा आवळत शेंडे यांची हत्या केली. हा प्रकार पाहून शेंडे यांची पत्नी हादरली. मात्र आता मुलाला वाचविणे आवश्यक आहे. या विचारातून त्यांनी पुरावा नष्ट करायला त्याची मदत केली. त्यांनी शेंडे यांचा मृतदेह पोत्यात भरला. तसेच घटनास्थळावरील रक्ताचे डाग फिनाईलने पुसले. शेंडे यांचे चुलत मंगेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

 

दहावीत असतानादेखील करायचा काम -

आरोपी अल्पवयीन मुलगा हा दहावीत शिकतो. तो अभ्यासात चांगला असला तरी घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तो सुटीच्या दिवशी कामावर जायचा. उन्हाळ्याच्या सुटीतदेखील तो दुकानांमध्ये काम करून घरखर्चात मदत करत होता. वडील दारूच्या व्यसनापोटी घराकडे दुर्लक्ष करत आहेत हे पाहून तो नेहमी चिडायचा.

नदीत फेकणार होते मृतदेह -

हत्येनंतर मायलेकाने शेंडे यांचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरला व तो दोन्ही बाजूंनी शिवला. मृतदेह नदी किंवा नाल्यात फेकण्याचे ठरविले. बंटीने मदतीसाठी एका जवळच्या मित्राला फोन केला. मात्र मित्राने त्याची मदत न करता त्याला पोलिसांत जाऊन सर्व प्रकार कबूल करण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्लावरून मायलेकांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 21, 2025

PostImage

हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर 


हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर 

प्रमोद झरकर/ उपसंपादक 

घोट:-
प्राथमिक आरोग्य केंद्र घोट अंतर्गत उपकेंद्र हळदवाही येथे क्षयरोग मुक्त भारत अभियाना अंतर्गत एक्स-रे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
100 दिवस क्षयमुक्त भारत अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले या वेळी क्षयरोग या आजाराबद्दल माहिती देऊन , क्षयरोग लक्षणे , उपचार , तपासणी व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले ,तसेच LCDC बद्दल माहिती देऊन कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र याविषयी डॉ. विवेक हजारे यांनी माहिती सांगून सर्वांनी अभियान कालावधीत आपले तपासणी करून घेण्यात यावे असे आवाहन केले.IDA कार्यक्रम माहिती देण्यात येऊन सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्याचा सेवन करावे जेणे करून हत्तीरोग आपल्याला होणार नाही  तसेच निक्षयमित्र , प्रोटीन युक्त आहाराचे महत्त्व क्षयरोग रुग्णाला किती महत्वाचे आहे हे पटवून देण्यात आले . या वेळी सौ. निता पुडोजी सरपंच ग्रा. पं हळदवाही, डॉ. विवेक हजारे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र घोट , डॉ शितल चाटे (CHO), डॉ शिवानी खेडकर (MO MMU टीम )  विलास कुभारे जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक , एक्स- रे टीम  सनजली क्षकिरण तज्ञ , मयुरी कोरीवार  ,  निखिल मेश्राम , मनोज बागमारे क्षयरोग पर्यवेक्षक, विलास कस्तुरे आरोग्य निरीक्षक, पुरुषोत्तम चलाख आरोग्य पर्यवेक्षक , डेविड पेंद्राम ,सौ . ऐश्वर्या भैसारे,सूरज राहुलवार, व्यंकटेश गौरावार आरोग्य सेवक , धरती भडके आरोग्य सेविका , सौ. प्रीती उईके आरोग्य सेविका ,कू दिक्ष्या बावणे आरोग्य सेविका , दुषांत गेडाम वाहन चालक,आशा ताई  जयश्री अलोने , इंदिराबाई मधमवार व इतर कर्मचारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 21, 2025

PostImage

ट्रक मागे घेत असतांना प्रवासी ॲटोला लागली धडक, ॲटो झाले पलटी तिन गंभीर चार जखमी 


ट्रक मागे घेत असतांना प्रवासी ॲटोला लागली धडक, ॲटो झाले पलटी तिन गंभीर चार जखमी 

आष्टी : येथून येनापूरकडे जाणाऱ्या
ऑटोला कोनसरी मेटल कंपनीच्या दुसऱ्या गेटजवळ ट्रकने धडक दिली. तेव्हा ॲटो पलटला या धडकेत ऑटोत बसलेले सात जण जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना गडचिरोली रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सरोबला सुभाष हलदर (४५) रा. दुर्गापूर, रामचंद्र गंगाराम मडावी (६५), निर्मला रामचंद्र मडावी (५५), देलिना दीपक मडावी (३) तिघेही रा. सोमणपल्ली असे गंभीर जखमींची नावे आहेत. कोनसरी येथील लोहखनिज़ प्रकल्पाच्या दुसऱ्या गेटजवळ ट्रक मागै घेतला जात होता. दरम्यान, रस्त्याने जात असलेल्या ऑटोला ट्रकच्या मागच्या पल्ल्याची धडक बसली. यात ऑटो उलटला. त्यातील तिघांना गंभीर मार लागल्याने गडचिरोली येथे रेफर केले तर चौघांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तिघांच्या पायाला मार लागला तर तीन वर्षांच्या मुलीच्या डोक्याला मार लागलेला आहे.  ऑटोचालक ऑटो घेऊन पळून गेला. त्याचा शोध आष्टी पोलीस घेत आहेत 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 21, 2025

PostImage

 २ अस्वलांचा वाहनचालकावर हल्ला, ईसम गंभीर


 २ अस्वलांचा वाहनचालकावर हल्ला, ईसम गंभीर 


 चंद्रपूर:-

 जिल्हा चारही बाजूने वन क्षेत्राने व्याप्त असल्याने सतत जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहेत. वन्य प्राणी जंगलातील अधिवास सोडून शहरी भागात येत असल्याने मानवी जीवनाला आता धोका निर्माण होत आहे.

चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन मधील अल्ट्राटेक ऐश लोडींग प्लांट जवळ २० जानेवारीला वाहन चालकावर २ अस्वलीनी हल्ला केला हि घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली, या हल्ल्यात वाहनचालक  रघुनाथ यादव वय ५२ जखमी झाला आहे

सकाळी रघुनाथ यादव हे झुडपी भागात शौचासाठी गेले होते त्यावेळी अचानक २ अस्वलीनी त्यांच्यावर हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्याने यादव घाबरून गेले, त्यांनी काही वेळ अस्वलाचा प्रतिकार करीत आरडाओरड सुरु केल्याने कामगार वर्गाने तात्काळ यादव यांच्याकडे धाव घेतली. कामगार वर्ग आल्याने अस्वलीनी पळ काढला.

सीएसटीपीएस मध्ये दररोज असंख्य वाहने येतात मात्र ऐश प्लांट येथे वाहन चालकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे हे चालक झुडपी भागात शौच करण्याकरिता जात असल्याने त्याठिकाणी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून यामुळे हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसटीपीएस मध्ये अस्वलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, या भागात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे व अस्वल सीसीटीव्ही दिसून येतात, मागील २ महिन्यात तिघांवर अस्वलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले वाहनचालक रघुनाथ यादव यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सीएसटीपीएस मध्ये वनविभागाने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 20, 2025

PostImage

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 

गडचिरोली, ता. २०: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना कायमस्वरुपी रोजगार द्यावा, विद्यावेतनात वाढ करुन ते नियमित व वेळेवर द्यावे या मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

गडचिरोली जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ पासून २ हजार ३०० मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या २७ आस्थापनांवर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात आली होती. परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये हा कालावधीत संपणार आहे. त्यामुळे आम्हाला जुन्याच आस्थापनेवर कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थीनी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील २ हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे, उपाध्यक्ष चरण बन्सोड, सचिव पंकज नैताम आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 20, 2025

PostImage

धारदार शस्त्राचा धाक दाखवून प्रेमवारांना लूटले


 धारदार शस्त्राचा धाक दाखवून प्रेमविरांना लुटले

- पीडितेच्या तक्रारीवरून दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

चंद्रपूर:-
  धारदार शस्त्राचा धाका दाखवून प्रेमविरांना ६ हजार ८०० रुपये लुटणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सदर घटना १८ जानेवारी ला दुपारी ४ वाजता चंद्रपूर नागपूर महामार्गावरील वरोरा येथून ४ किमी अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनीजवळ घडली.

निखिल सुभाष तुरणकर (२६) रा. आनंदवन चौक, वरोरा हा छत्रपती चौक, वणी येथे असलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या विक्री विभागात कार्यरत आहे. त्याचा मित्र प्रेम गोहणे याच्या नातेवाईकाला फायनान्सवर दुचाकी खरेदी करायची होती. त्यामुळे प्रेम याचा बोलण्यावरून वरून तो वरोरा येथे आला. मात्र येथे आल्यावर त्याला सध्या वाहन खरेदी करायचे नसल्याचे लक्षात आल्याने तो एका मुलीला भेटायला गेला. तेथून वरोरा तहसील मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या महाकाली कॉलनीजवळ दोघेही उभे राहून बोलत होते.

दुपारी ४ वाजता काळ्या रंगाच्या पल्सर वर ३० व ३५ वयोगटातील दोन तरुण आले. ते घटनास्थळी पोहोचताच दोन तरुणांपैकी एकाने निखिलच्या गालावर चापट मारून त्याच्या खिशातील १ हजार ८०० रुपये हिसकावले. हे बघताच आजूबाजूला बसलेले प्रेमी युगुल पसार झाले. यानंतर त्यांनी दोघांकडे आणखी पैशांची मागणी सुरू केली असता, त्यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. हे ऐकून एका तरुणाने पल्सरमध्ये ठेवलेले धारदार शस्त्र काढून निखिलच्या पोटावर ठेवले आणि पैशाची मागणी करू लागला.

या अनपेक्षित घटनेने निखिल आणि मुलगी खूपच घाबरले होते पण दोघेही सोडायला तयार नव्हते. त्यामुळे रोख रक्कम नसल्याने निखिलने फोन नंबर देण्यास सांगितले. त्यानंतर एका तरुणाने मोबाईल स्कॅनर दाखवला आणि त्यात निखिलने ५ हजार रुपये ट्रान्सफर केले. तेथून निघताना दोन्ही तरुणांनी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या निखिलने वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यामध्ये स्कॅनरमध्ये सूरज बालाजी गहाणे हे नाव दिसले होते आणि त्याने आपल्या सहकाऱ्याला गोलू असे संबोधित केले होते. निखिलच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी सूरज गोहणे आणि गोलू यांच्याविरुद्ध कलम ३ (५), ३१२, ३५१ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजिंक्य तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल नवघरे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 20, 2025

PostImage

कर्नाटक येथे धान रोवणीसाठी गेलेल्या मजूरांचे दलालाने पैसे थकविले ,आ.विजय वडेट्टीवार यांनी दिला मदतीचा हात


कर्नाटक येथे धान रोवणीसाठी गेलेल्या मजूरांचे दलालाने पैसे थकविले ,आ.विजय वडेट्टीवार यांनी दिला मदतीचा हात 

मजुरांचा परतीचा झाला मार्ग मोकळा 

 

 सिंदेवाही : कर्नाटक
राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील २१ मजूर हे धानपीक रोवणीच्या कामासाठी सुमारे १ महीन्यापुर्वी गेले होते. त्याठिकाणी महीनाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे त्यांना तिथं घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील कंत्राटदाराने मजूरांना दिलेच नाही. व तो पसार झाला. त्यामुळे मजूरांकडे गावाकडे परत यायला देखील पैसे नव्हते. ते सगळे संकटात सापडले होते. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या मजूरांनी कृउबा संचालक प्रभाकर सेलोकर, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा सांगितली.

सदरची बाब ह्या तिन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना कळवली असता लगेचच त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत सदर मजूरांपर्यत आर्थिक मदत पोहचवली. व महाराष्ट्रातील आपल्या स्वगृही पोहचण्यासाठी लागणारा खर्च व संपूर्ण सहकार्य देखील आपण करणार असल्याचे सांगितले.

कर्नाटक राज्यात गेलेल्या मजूरांमध्ये प्रकाश भोयर, तुळशीदास भोयर, माधूरी भोयर, सुनिता कन्नाके रा. आक्सापुर, दिनेश मेश्राम, स्वप्नील मेश्राम, पायल मेश्राम, आशा मेश्राम रा. गडबोरी, देविदास भानारकर, वैशाली सामुसाकडे, गिता भानारकर, रंजू भानारकर रा. मोटेगाव, अशोक जुमनाके, प्रशांत जुमनाके, वंदना जुमनाके, सायली जुमनाके रा. खातगाव, संदीप ठाकरे, वनिता ठाकरे, शिल्पा ठाकरे रा. गिरगाव, चंद्रभागा सामुसाकडे रा. नवरगाव, निशा मेश्राम रा. पाडरवाणी यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर आता परतणार असुन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झालं आहे. त्यामुळे सर्व मजूरांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 20, 2025

PostImage

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिन तरुणांना बसने दिली धडक,तिघेही तरुण ठार 


पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिन तरुणांना बसने दिली धडक,तिघेही तरुण ठार 

 


बीड; मोची पिंपळगाव फाट्यावर बसच्या धडकेत तीन युवक ठार बीड परळी रस्त्यावर बीड शहरापासून पाच किलोमीटर असलेल्या मोची पिंपळगाव फाट्यावर सकाळी 6 वाजता पोलीस भरती सराव व व्यायाम करण्यासाठी गेलेल्या घोडके राजुरी गावातीलच तीन युवकांना बसणे उडवले, या दोघेजण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला बीड येथील शासकीय रुग्णालयात
उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजुरी गावातील पाच विद्यार्थी हे सकाळी व्यायाम करण्यासाठी बीड परळी रस्त्यावर आले असता बस क्रमांक MH 14BT 1473 या बसणे तिघांना उडवले यात 1) ओम सुग्रीव घोडके वय 19 वर्ष, 2) विराट बाब्रुवान घोडके वय 18 वर्ष 3) सुबोध बाबासाहेब मोरे वय 19 वर्ष सर्व रा. घोडके राजुरी याना बसणे उडवल्याने ओम घोडके विराट घोडके जागीच ठार झाले तर सुबोध मोरे हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान याचा देखील मृत्यू झाल्याचे समजते. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्त, मांसाचा सडा पडला होता. बस काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात गेली. या अपघातामुळे घोडकाराजुरी गावावर शोककळा पसरली असून घोडका राजुरी गावातील नागरिकांची बीड शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
अधिक तपास पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 18, 2025

PostImage

अभ्यास करीत नाही म्हणून भिंतीवर डोके आपटून व गळा दाबून जन्मदात्या बापानेच नऊ वर्षीय मुलाचा केला खून


अभ्यास करीत नाही म्हणून भिंतीवर डोके आपटून व गळा दाबून जन्मदात्या बापानेच नऊ वर्षीय मुलाचा केला खून

 

पुणे : बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील होळ येथील नऊ वर्षी मुलाची बापानेच हत्या केल्याचे समोर आले आहे, बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुलगा अभ्यास करत नाही यामुळे वडीलांनी मुलाला रागाच्या भरात भिंतीवर डोके आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी ला दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलघडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणार दिसतोयस, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात त्याचा मृत्य झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवले नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहिती तिने दिली.

संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली.

पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात त्याच्या वडिलांनीच पियुषची हत्या केल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 18, 2025

PostImage

जादूटोण्याच्या संशयावरून  वृद्ध महिलेला केली बेदम मारहाण व काढली गावातून धिंड 


जादूटोण्याच्या संशयावरून  वृद्ध महिलेला केली बेदम मारहाण व काढली गावातून धिंड 

 

अमरावती : जादूटोण्याच्या संशयावरून मेळघाटातील
रेट्याखेडा या गावातील एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण करून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथे उघडकीस आला आहे. या महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावातून फिरवण्यात आले.

तिच्या अंगाला गरम सळाखीचे चटकेही देण्यात आले. काही दिवसांपुर्वी अमरावतीत जातपंचायतीच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून महिलेसह तिच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यातच आता ही नवीन घटना समोर आली आहे.

मेळघाटातील अमानुष छळाची घटना गेल्या ३० डिसेंबर रोजी घडली. पीडित वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून हे रोजगारासाठी गावापासून दूर राहतात. ४ जानेवारी रोजी त्यांना या घटनेची माहिती मिळाली.

त्यानंतर काल शुक्रवारी पीडित महिलेने कुटुंबासह

जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले, असे पीडित महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

ही वृद्ध महिला ३० डिसेंबरला रेट्याखेडा येथील तिच्या घरात एकटीच होती. ती पहाटे घराबाहेर आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने तिला पकडून ठेवले. पीडित वृद्ध महिला आमच्या घराच्या आजूबाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. त्यानंतर एका व्यक्तीने तिला काठीने मारहाण केली. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तिच्या डोक्यावर गाठोडे ठेवून तिची गावातून धिंड काढण्यात आली. नंतर गावातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणामध्ये गावातील पोलीस पाटील देखील सहभागी झाला होता. या दरम्यान पीडित महिलेचा अमानुष छळ करण्यात आला. तिला गरम सळाखीने चटके देण्यात आले, असे तक्रारीत नमूद आहे.

पीडित महिलेसह तिचा मुलगा, सून यांनी शुक्रवारी अमरावती गाठून जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रत राज्य महिला आयोग, पोलीस

महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने २०१३ साली जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला. या कायद्यात १२ कलमे आहेत. तरीही या घटना थांबलेल्या नाहीत. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे सगळ्यांत जास्त शोषण होते, हे दिसून आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 18, 2025

PostImage

एका २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा 


एका २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा 

 

मुर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर सिरसो रोडवरील मनोज ढगे यांच्या शेतातील विहिरीत एका 21 वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 च्या मध्यरात्री घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कामावरून घरी परत आल्यानंतर तिच्या आईसोबत थोडी बाचाबाची झाली असता ती रागाच्या भरात घरून निघून गेली. त्यानंतर आई व मामा यांनी तिचा बराच शोध घेतला परंतु ती कुठेच दिसून आली नाही. मात्र 17 जानेवारी 2025 सकाळच्या दरम्यान गावातील एका शेतात एका व्यक्तीचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याची बातमी पसरली असता घटनास्थळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृतक मुलीचे नाव नम्रता विनोद गर्दे वय २१ वर्ष रा .मुर्तीजापूर असे असून 
सतीश नामदेव भगत, वय 52 वर्ष, धंदा मजुरी, राहणार सांजापूर, तालुका मूर्तिजापुर जिल्हा. अकोला यांच्या तक्रारीनुसार पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली 
मुर्तीजापुर ग्रामीण भागात राहणारे सदर कुटुंब आपल्या उदरनिर्वाह करिता मोल मजुरी करून मुर्तीजापुर येथील बँक कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. तक्रारदार यांची बहीण कांचन विनोद गर्दे एक मुलगा नामे आदर्श व दोन मुली, मोठी मुलगी वैष्णवी व लहान नम्रता असे त्यांचे नाव असून मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे व नम्रता ही 21 वर्षीय दुसरी मुलगी मुर्तीजापूर येथील मातृसेवा हॉस्पिटल येथे काम करीत होती. दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान मनोज ढगे यांनी फोनवर माहिती दिली, की हिरपूर सिरसो रोडवरील शेताजवळ तुझ्या भाचीची स्कुटी गाडी उभी आहे व शेतातील विहिरीच्या काठावर एक बॅग ठेवली आहे तरी तू येऊन पहा अशी माहिती मनोज ढगे यांनी दिली.

मनोज ढगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये बॅटरीच्या उजेडात पाहिले असता विहिरीच्या पाण्यात एक प्रेत तरंगात होते. कपड्यावरून व तिच्या पायातील बुटावरून आपली भाची नामे नम्रता विनोद गर्दै वय 21 वर्ष राहणार मुर्तीजापुर असल्याची खात्री झाली. त्यानंतर नागरिकाच्या साहाय्याने पोलिसांनी प्रेत विहिरीच्या बाहेर काढले कॉलेज बॅग मधील लर्निंग लॉयसन्स वरून खात्री करण्यात आली कि ही 21 वर्षीय मुलगी नम्रता गर्दे  आहे 
 16 जानेवारी 2025 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता कामावर गेलेली नम्रता नेहमीप्रमाणे रात्री 8 वाजता घरी परत आली नाही म्हणून तिच्या आईने हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारणा केली असता ती 7 वाजून 45 मिनीटांनी हॉस्पिटल मधून गेल्याची समजले त्यानंतर आपल्या बहिणीने शोधाशोध केली व मला सुद्धा फोन केला की नम्रता तुझ्याकडे हिरपूरला आली आहे का? विचारपूस केली असता बहिणीने सांगितले की तिला थोडी बोलली होती व ती आतापर्यंत घरी आली नाही असे सांगितले असता सतीश भगत (मामा) यांनी शोधाशोध केला असता ती हिरपूर येथील मनोज ढगे यांच्या शेतात विहिरीमध्ये बुडून मरण पावली असल्याची माहिती मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते बांधकामाच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते बांधकामाच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 


गडचिरोली:-

जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग बांधकामांमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती एकत्र करून ती सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रस्ता विषयक

कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), श्रीमती मानसी (देसाईगंज), अमित रंजन (चामोर्शी), नमन गोयल (एटापल्ली), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे, बळवंत रामटेके (आलापल्ली), आर.बी. कुकडे (विशेष प्रकल्प सिरोंचा), राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋशिकांत राऊत, चंद्रशेखर सालोडकर (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना), जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री दोरखंडे, उपअभियंता राजेंद्र कटकमवार (विद्युत उपविभाग) सहायक अधीक्षक अभियंता दिनेश पाटील, सुमित मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते गुंडेनुर, चामोर्शी-आलापल्ली-सिरोंचा, आरमोरी गडचिरोली, चातगावव धानोरा मार्ग, कोरची ते कुरखेडा तसेच दक्षिण गडचिरोली व उत्तर

गडचिरोलीतील महामार्गाच्या बांधकामाबाबत आढावा घेतला. आरमोरी ते गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने बांधकामासाठी 746 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे संबंधितांनी सांगितल्यावर सदर काम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या मार्ग दुरुस्तीसाठी तसेच पावसाळ्यात पाल नदीवर नागपूर मार्ग बंद होत असल्याने याबाबत अडचणी कशा सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात विशेषता चामोर्शी व एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात

जड वाहतूक सुरू असून यामुळे राज्य महामार्ग लवकर खराब होतात. भविष्यात या मार्गावर जड वाहतूक अधिक वाढणार असल्याने या मार्गाच्या गुणवत्तेत अधिक वाढ करण्यासाठी ज्या निकषांच्या अधीन राहून हे मार्ग बांधण्यात येतात, त्यात बदल करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात 234 पुलांच्या निर्मितीची आवश्यकता आहे, मात्र यासाठी एकत्रितपणे मोठा निधी उपलब्ध होण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून महत्त्वाच्या पुलांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी तसेच या आर्थिक वर्षात मंजूर प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याबाबत एप्रिलमध्ये पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

मका पिकास पाणी करित असतांना विषारी सापाने घेतला चावा,उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू


मका पिकास पाणी करित असतांना विषारी सापाने घेतला चावा,उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू 

जैरामपूर येथील घटना 

 

प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी :-चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथे सोमवारी दुपारी शेतात मका पिकाला पाणी देत असताना विषारी घोणस जातीच्या सापाने चावा घेतल्याने देवीदास प्रकाश उरकुडे (३५) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, देवीदास उरकुडे शेतात पिकाला पाणी देत असताना घोणस जातीच्या सापाने त्याला दंश केला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गडचिरोली येथे आणि नंतर नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे देवीदासच्या मृत्युमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

विद्यापीठांमध्ये ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय शिकवीला जावा - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 


विद्यापीठांमध्ये ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय शिकविला जावा - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 

 


लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच पर्यावरण संवर्धनाची त्रिसूत्री - आ.  मुनगंटीवार

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज - २०२५’चे उद्घाटन

चंद्रपूर - शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण असा विषय प्रत्येक विद्यापीठात शिकविला जावा त्यातून पर्यावरणतज्ज्ञ तयार होतील. पर्यावरण रक्षणाच्या नव्या कल्पना जन्माला येतील. नवे प्रयोग होतील आणि त्यातूनच संवर्धनाचे नवनवे मार्गही गवसतील, असा विश्वास महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-2025’चे गुरुवारी (दि. १६ जानेवारी २०२५) महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसीय संमेलनाला राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार  सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एसएनडीटीच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव,आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, युएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, ‘चंद्रपूरमध्ये होत असलेल्या परिषदेतून मोठी जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. कुठलेही चांगले काम करण्यासाठी पहिले चांगली मानसिकता आणि मनाची तयारी आवश्यक असते. तसे असेल तर नक्कीच यश मिळते. कुणी एका रात्रीत जग बदलू शकत नाही. प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल असते. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित करण्यासाठी अविरत कष्ट करावे लागणार आहेत.’लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार गरजाही वाढत आहेत. आपण आधुनिकतेकडे वळतोय. पण त्याला मर्यादा असली पाहिजे. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण या पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करता कामा नये,’ असेही राज्यपाल महोदय म्हणाले.

 सुधीर मुनगंटीवार यांनी दिली त्रिसूत्री

पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले, ‘यंदा संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधानाने आपल्याला दिलेले हक्क सर्वांना माहिती आहेत. पण संविधानाने दिलेल्या जबाबदारीचा, आपल्याला सांगितलेल्या कर्तव्यांचा विसर पडला आहे. तीन दिवसांच्या परिषदेत पर्यावरण संवर्धनाच्या कर्तव्यावर चर्चा होईल असा विश्वास आहे. त्यासाठी लोकशिक्षण, संशोधन, कृती आणि अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे.’ सी फॉर चंद्रपूर, सी फॉर क्लायमेट चेंजच्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

नक्षलवाद्यांनी तिन ग्रामस्थांचे अपहरण करून एकास केले ठार तर दोघांना केली बेदम मारहाण 


नक्षलवाद्यांनी तिन ग्रामस्थांचे अपहरण करून एकास केले ठार तर दोघांना केली बेदम मारहाण 


विजापूर- नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या कडक कारवाईमुळे बॅकफूटवर आलेले नक्षलवादी आता निरपराध आदिवासींना लक्ष्य करत आहेत. नक्षलवादी हिंसाचाराची ताजी घटना विजापूर जिल्ह्यातील हल्लूर गावात उघडकीस आली, जिथे नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांचे अपहरण केले. सार्वजनिक दरबार उभारून यातील एका गावकऱ्याला फासावर लटकवले गेले, तर दोन जणांना बेदम मारहाण केली 

16 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास, हल्लूर गावातील रहिवासी छन्नू हापका यांचे वडील 48 वर्षीय सुक्कू हापका यांचे माओवाद्यांनी त्यांच्या घरातून अपहरण केले. यानंतर जनता दरबारात फासावर लटकवून त्याची हत्या करण्यात आली. सीपीआय नक्षलवादी संघटनेच्या भैरमगढ एरिया कमिटीने जारी केलेले एक पत्रक घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. या पत्रकात मयत हा पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप करण्यात आला असून हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे.

अपहरण केलेल्या आणखी दोन गावकऱ्यांनाही नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून निष्पाप ग्रामस्थांना नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच मिरतूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक सक्रिय झाले असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या घटनेमागे नक्षलवाद्यांची निराशा आणि संकोच स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर हल्लूर  परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे.

सुरक्षा दलांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी आता त्यांच्या तळाच्या भागातही कमकुवत होत आहेत. अशा स्थितीत निष्पाप गावकऱ्यांवरील अत्याचाराच्या रूपाने त्यांचा संताप बाहेर येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

तिहेरी विचित्र अपघातात ९ जनांचा जागीच मृत्यू


तिहेरी विचित्र अपघातात ९ जनांचा जागीच मृत्यू 

 

 

पुणे - नाशिक महामार्गावर नारायण गावाजवळील घटना 

 


पुणे : राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर मॅक्सीमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावर आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी आणि एसटीमध्ये हा विचित्र अपघात झाला आहे. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्सिमो गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. यामध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आहे. या गाडीतील सर्वच 11 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रवाशांवर नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. या बाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर जात असताना एसटीच्या मागे ही प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होती. मात्र आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्सीमो गाडी ही बसवर जाऊन आदळली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्सीमो गाडी मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

 स्वतःवर झाडली गोळी पोलीस हवालदाराने


 स्वतःवर झाडली गोळी पोलीस हवालदाराने


गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध जवळील सशस्त्र दूरस्थ क्षेत्र धाबेपवणी येथील एका पोलीस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरूवारी (१६ जानेवारी) दुपारच्या सुमारास रास घडली. जयराम कारू कोरेट (५०, रा. संबूटोला/कडीकसा ता. देवरी, जि. गोंदिया) बक्कल क्रमांक २४ असे आत्महत्या केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नुकताच जयराम कारू कोरेट यांचे स्थानांतरण झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्याच्या मित्र मंडळी कडून मिळालेल्या माहिती वरून व्यक्त केला जात आहे. पण, पोलिस विभागाकडून सध्या आत्महत्येचे कारण गुलदस्तातच आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील संवेदनशील नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षल गतीविधी वर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सशस्त्र दूरस्थ क्षेत्र (एओपी) बांधण्यात आल्या आहे. अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध पोलीस स्टेशन जवळ असलेल्या धाबेपवनी येथील एओपी मधील पोलिस हवालदार पदावर कार्यरत जयराम कारू कोरेट यांनी आत्महत्या केल्याने एकच खडबड उडाली आहे.

त्यांनी आपल्याजवळ असलेल्या एके४७ या बंदूकीने गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेचा तपास नवेगावबांध पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक योगिता चापले ह्या करीत आहे. विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.

नोव्हेंबर २०२४ ला गोंदियातील बिर्सी विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या पोलिस शिपाई राकेश भांडारकर (रा. पदमपुर, ता. आमगाव) यांनी कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर त्यांच्या पत्नी यांनी कर्तव्यावर असताना विभागातील वरिष्ठ अधिकारी विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केला होता.

राकेश कर्तव्यावर असताना त्यांच्यासोबत घडत असलेले प्रसंग सांगत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. गुरूवारी जयराम कोरेट यांच्या आत्महत्येची घटना घडली. या प्रकरणाचा तपास नवेगावबांधच्या पोलिस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. त्यात तपास अंती खरे कारण काय ते स्पष्ट होणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

संस्था उपाध्यक्ष बबलुभैय्या हकीम यांनी घेतली नॅशनल आर्चरी चॅम्पियन कु.श्वेता कोवे ची गृहभेट.


संस्था उपाध्यक्ष बबलुभैय्या हकीम यांनी घेतली नॅशनल आर्चरी चॅम्पियन कु.श्वेता कोवे ची गृहभेट.

 

आष्टी:-

  महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेली दिव्यांग विद्यार्थिनी कु. श्वेता कोवे तिने अलीकडेच जयपूर येथे झालेल्या सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये तिने रौप्य पदकाची कमाई केली. त्यानिमित्त तिच्या या कर्तबगारीच्या सन्मानार्थ वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलूभैय्या हकीम तसेच त्यांच्या सहचरणी नागपूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी श्वेताच्या गावी कढोली येथे तिच्या राहत्या घरी जाऊन, तिचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. व तिची आस्थेने विचारपूस केली. कढोली येथून आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी ती एका हाताने सायकल चालवत येणे जाणे करायची. दरम्यान, दुसऱ्यांच्या शेळ्या  चारण्याचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांचे छत्र तिच्या डोक्यावरून हरपले. याही वेळी डॉ. श्याम कोरडे यांनी तिला मदतीचा हात दिला व तिच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी स्वखर्चाने उपलब्ध करून देऊन तिचा सराव सतत कायम ठेवला. परिस्थितीची जाण ठेवून श्वेताने ही आटोकाट मेहनत केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत श्वेताने हे यश संपादन केले. यास्तव शाईनभाभी हकीम यांनी तिचे खूप खूप कौतुक केले.  श्वेताचे मनोबल वाढवण्यासाठी तिला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. या तिच्या नॅशनल पॅरा नॅशनल चॅम्पियनशिप पर्यंतच्या प्रवासात तिला अनमोल योगदान देणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी यांचे सुद्धा शाहीन हकीम व बबलूभैया हकीम यांनी तोंड भरून कौतुक केले व या निमित्ताने का होईना महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकविल्याने तिच्या पाठीवर सर्व उपस्थितांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी कढोली या गावाचे सरपंच जितेंद्र हुलके श्वेताची आई मंजुषा भास्कर कोवे, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, डॉ. राज मुसने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख  डाॅ. श्याम कोरडे व गावातील नागरिक उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन भेट देऊन केला आपला वाढदिवस साजरा


मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन भेट देऊन केला आपला वाढदिवस साजरा

आष्टी:-
येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली ता.चामोर्शी येथील मुख्याध्यापक  संतोष नागरगोजे यांनी आपला वाढदिवस ते कर्तव्यावर असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन भेट देऊन साजरा केला. तेव्हा विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज झाडे, सरपंचा सौ.रेखा कलसार , उपसरपंच दिलीप वर्धलवार, ग्रामसेविका कुंदा कोडापे या मान्यवरांच्या हस्ते शालेय उपयोगी साहीत्य २७ विद्यार्थ्यांना देण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, बहुसंख्य पालक उपस्थित होते 
स्वतःचा वाढदिवस अश्या पद्धतीने साजरा केल्याने मुख्याध्यापक संतोष नागरगोजे यांचे कैतूक करण्यात येत आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

संस्कृती सोबत आरोग्य,पोषण यांचे   प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्गदर्शन


संस्कृती सोबत आरोग्य,पोषण यांचे 
 प्राथमिक आरोग्य केंद्रात मार्गदर्शन 

डॉ.लुबना हकीम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव यांचा पुढाकार 

अहेरी:- (अशोक खंडारे),

भारतीय संस्कृती मध्ये महिलांचा कार्यक्रम मकरसंक्रांत याला फार महत्त्व आहे.महिला विशेष सजून या दिवसात हळदी कुंकू साठी व वान वाटतात किंवा घ्यायला जातात मात्र अनेक विभागाच्या महिलांना कर्तव्यामुळे हा सण वेळेवर साजरा करता येत नाही विशेषतः आरोग्य विभाग च्या महिला या कर्तव्यावर असतात त्यामुळे प्राथमिक महागाव आरोग्य महागाव यांनी मकर संक्रांत संस्कृती साजरा करण्यासह महिलांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर, जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदन योजना यांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले.
  प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉ लूबना हकीम यांच्या संकल्पनेतून महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम तथा वाण वाटप करन्याची संकल्पना सुचली आणि याच कार्यक्रमात महिलांना,गरोदर मातांना,बाळंतपण झालेल्या मातांसाठी असलेल्या विविध योजनेची माहिती दिली. 
   ग्रामीण भागातील महिलांना व नागरिकांना आजही अनेक योजनांची माहिती नाही त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात त्यामुळे डॉ लूबना हकीम यांनी अनोखी संकल्पना राबवून महिलांना एकत्र करून मार्गदर्शन केले.
  त्याप्रमाणे शून्य ते १ वर्ष वयोगट मध्ये मोडणारे लहान बालक,यांच्या साठी सकस आहार याची ही माहिती यावेळी देण्यात आली.उपस्थित महिलांना या वेळी वान ही देण्यात आले.
  तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे ए.एन.एन व आशा वर्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आरोग्य सेवेतील हे दुवे अत्यंत महत्वाचे असून ग्रामीण भागात ग्राउंड लेव्हल ला या काम करीत असतात त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला..
  यावेळी महागाव चे सरपंच पुष्पा ताई मडावी पर्यवेक्षीका गोगे, ए एन एम डोंगरे, ए एन एम दुर्गे तसेच इतर आरोग्य कर्मचारी आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 17, 2025

PostImage

सामजिक बांधिलकीने सेवेचे व्रत अंगिकारा , मा. शाहीनभाभी हकीम 


सामजिक बांधिलकीने सेवेचे व्रत अंगिकारा ,
मा. शाहीनभाभी हकीम 

आष्टी: राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला चालना देणारे त्यांच्यात सेवेचे बीजारोपण करणारे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमसंस्काराची रुजवणूक करत सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि सेवेचे व्रत्त अंगीकारण्याचे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नागपूर विभागीय अध्यक्षा मां.शाहीन यांनी प्रतिपादन केले त्या वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीद्वारा संचलित गोडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कडोली कढोली  येथे बोलत होत्या. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम उर्फ बबलू भैय्या  हे होते. यावेळी सरपंच जितेंद्रजी हुलके, उपसरपंच अलका हुलके, प्राचार्य डॉ.संजय फुलझेले ,प्राचार्य किशोर पाचभाई, रासेयो विभागीय समन्वयक डॉ. राजकुमार मुसने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोडापे सर, सदस्य मंगलाताई कोवे, बंडोजी इजमनकर, आबाजी हुलके , खुशाबराव कुकुडकर, ललित इजमानकर, लहुजी हुलके, फकीरा कनाके ,अशोक कस्तुरे, संतोष वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना शाहीन हकीम यांनी डिजिटल साक्षरता या अनुषंगाने विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय मोबाईलचा अतिरेकी वापर टाळत नवीन नवीन संधी शोधत विद्यार्थ्यांनी करिअरकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वेगवेगळ्या संधीचे सोने करून आपले आयुष्य यशस्वी करावे ,असे आवाहन केले. 
यावेळी मा. बबलूभैयाजी हकीम यांनी विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे होणाऱ्या सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सजग राहून कोणत्याही फसवणुकीला किंवा गैरप्रकाराला बळी पडू नये याविषयी मौलिक सल्ला दिला. सरपंच जितेंद्र हुलके, डॉ .राजकुमार मुसने, प्राचार्य संजय फुलझेले, मुख्याध्यापक किशोर पाचभाई व मुख्याध्यापक श्री लालदेवजी कोडापे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू श्वेता भास्कर  कोवे हिने जयपूर येथील सहावी पारा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सांघिक रोप्यपदक प्राप्त केल्याबद्दल तिचे मा. शाहीनभाभी हकीम व मा. बबलू भैयाजी हकीम व मान्यवरांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. गणेश खुणे यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रवी गजभिये यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. ज्योती बोबाटे यांनी मांनले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 16, 2025

PostImage

आता शिक्षकांना सुद्धा बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक, अन्यथा शाळेच्या वेतन अनुदानाला लागणार ब्रेक


आता शिक्षकांना सुद्धा बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक, अन्यथा शाळेच्या वेतन अनुदानाला लागणार ब्रेक.

 

 


पुणे:-
ज्यातील अनुदानास पात्र असलेल्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

बायोमेट्रिक, चेहरा ओळख प्रणालीतून उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी स्वतः अंशतः अनुदानित शाळांना दिलेल्या मदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखले जाईल असा सज्जड दम शिक्षण विभागाने दिला आहे. राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या, वेतन अनुदानाचे टप्पा घेत आलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्रता तपासून एक जानेवारी २०२३ पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे.

अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्यात येत असल्याची खात्री करावी. मुदतीत अटीचे पालन न करणाऱ्या शाळेचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात आले आहेत. अटीची पूर्तता होईपर्यंत वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार शिक्षण आयुक्त यांना दिले असून, याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी डॉक्टर स्मिता देसाई यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

शाळांना बायोमेट्रिक प्रणालीची सर्व माहिती देण्यात आली असून त्या अनुषंगाने काही अडचणी किंवा समस्या आल्यास त्याची माहिती १३ जानेवारी पर्यंत सादर करावी असे ही सांगितले आहे. मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर २०२४ च्या बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीचे रिपोर्ट, शाळेतील विद्यार्थ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर २०२४ चे रिपोर्ट सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक हरून आतार व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत.

शाळेने अहवाल सादर करावेत 

'अनुदानास पात्र शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे का? शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संग्रहित अपहर आयडी कार्य कार्यान्वित करण्यात आले आहेत का? याबाबत अहवाल सादर करावा. सर्व माहिती पूर्णपणे यादी मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संस्था मुख्याध्यापक यांची राहील, असेही शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे."


PostImage

Vaingangavarta19

Jan. 15, 2025

PostImage

भरधाव कारने दुचाकीस्वारांना चिरडले,दोघांचाही जागीच मृत्यू


भरधाव कारने दुचाकीस्वारांना चिरडले,दोघांचाही जागीच मृत्यू


 गडचिरोली (दि. १५ जानेवारी):-
गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री १० वाजता चे सुमारास एका कारने मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला आहे. मयुर विलास भुरसे (२५) रा. ठाणेगाव, ता. आरमोरी, विकास मधुकर धुडसे, (२५) रा. डोगरसावंगी, ता. आरमोरी अशी मृतकांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार मृतक मयुर विलास भुरसे हा त्याच्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३३ वाय २५१३ ने गडचिरोली वरुन ठाणेगाव कडे १० वाजताचे दरम्यान त्याचा मित्र विकास मधुकर धुळसे सह जात असतांना एक पांढऱ्या रंगाच्या रेनाल्ड कॉप्टर वाहन क्रमांक एम. एच. ३३ व्ही ४३३३ चा चालक आशीष माणीक एंचिलवार, रा. देऊळगाव, ता. आरमोरी याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने व भरधाव वेगाने व रस्त्याच्या परीस्थीतीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे वाहन चालवुन वाहनास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही मोटरसायकल स्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचे नातेवाईक कार्तीक श्रीकृष्ण कुनघाडकर वय २० वर्ष, रा. तळोधी मोकासा ता. चामोर्शी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिपक मोहीते प्रकरणाची चौकशी करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 15, 2025

PostImage

मला का हटकले म्हणत  पेचकसने पाठीत केला वार, उपसरपंच गंभीर 


मला का हटकले म्हणत  पेचकसने पाठीत केला वार, उपसरपंच गंभीर 

गोंदिया:-
 शिवीगाळ करीत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला तू शिवीगाळ कशाला करतोस, असे हटकले असता उपसरपंचाला शिवीगाळ करून पेचकसने भोसकले. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी (दि. 12) ला सायंकाळचे सुमारास घडली.

 गंभीर जखमी उपसरपंच नेपाल देवनाथ शेंडे  वय वर्षे 45 रा. कोरंभी असे असून त्यांचे गावात मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दुकान बंद करून ते गावातीलच आंबेडकर चौकात बसून होते. यावेळी अशोक गुलाब मेश्राम (50) हा रस्त्याने शिवीगाळ करीत जात होता. दरम्यान नेपाल यांनी त्याला विनाकारण शिवीगाळ कशाला करतोस असे म्हणत हटकले. दरम्यान अशोकने अश्लील शब्दात शिवीगाळ करून नेपालच्या पाठीवर पेचकसने वार केला. त्यानंतर विलास केवळराम मेश्राम (35) हा देखील तेथे आला. त्यानेही शिवीगाळ करून ढकलून मारहाण केली. यात नेपाल शेंडे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्राप्त तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 15, 2025

PostImage

दोन चिमुकल्या झाल्या आईविना पोरक्या,आईने केली आत्महत्या 


दोन चिमुकल्या झाल्या आईविना पोरक्या,आईने केली आत्महत्या 

चंद्रपूर : दोन चिमुकल्या आईविना पोरक्या झालेल्या आहेत त्या दोन चिमुकल्या मुलिंचे काय चुकले की आईने त्यांना कायमचे सोडून जान्याचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे 
वेकोलिच्या एकतानगर चारगाव वसाहतीमधील एका विवाहित महिलेने स्वतःच्याच घरात गळफास  घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १३)ला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रुबी पवन राय वय (३२) वर्षे मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतक महीलेचे वडील आणि भावाने केला आहे.

पवन राय हे वेकोलित नोकरीला आहेत. रुबी यांच्यासोबत त्यांचा १२ वर्षापूर्वी विवाह झाला होता त्यांच्या संसाराच्या वेलीवर  दोन मुली आहेत. वेकोलिच्या एकतानगर वसाहतीत पत्नी, दोन मुली व आईसह ते राहत होते सोमवारी पती व सासू बाहेर गेली असता, पत्नी रुबी हिने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 15, 2025

PostImage

मानसोपचारतज्ज्ञाने उपचाराच्या नावाखाली १५ महिलांचे  केले लैंगिक शोषण : आरोपीची कारागृहात रवानगी 


मानसोपचारतज्ज्ञाने उपचाराच्या नावाखाली १५ महिलांचे  केले लैंगिक शोषण : आरोपीची कारागृहात रवानगी 

 

 नागपूर :

शहरातील एका तथाकथित मानसोपचारतज्ज्ञाने १५ महीला- -मुलींची लैंगिक शोषणाची  खळबळजनक बाब समोर आली आहे. महिन्याभराअगोदर या प्रकरणात पहिली तक्रार समोर आली होती व त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून १५ महिला-मुलींच्या लैंगिक छळवणुकीची बाब समोर आली असली, तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, पोलिसांनी हे प्रकरण गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला असून, अधिकारी देखील बोलण्याचे टाळत आहेत.

संबंधित आरोपी समुपदेशक म्हणून विविध ठिकाणी शिबिरे घेतो, तसेच तो क्लिनिकदेखील चालवतो. नैराश्यात असलेल्या अनेक महिला-मुली त्याच्याकडे समुपदेशनासाठी येत होत्या. तसेच, तो काही विद्यार्थिनींना मार्गदर्शन देखील करायचा. रुग्णांच्या मानसिक स्थितीचा फायदा उचलत त्याने अनेकींची छळवणूक केली. त्याने काही विद्यार्थिनी-महिलांचे व्हिडीओदेखील काढले होते व ते दाखवून तो त्यांना ब्लॅकमेल करीत होता. महिन्याभरा अगोदर यातील एका पीडितेने त्याचा छळ असह्य झाल्याने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. सध्या तो नागपूर कारागृहात आहे. त्याच्या मोबाइलमध्ये काही क्लिपिंग्ज सापडल्या आहेत. चौकशीदरम्यान त्याने १५ महिला-मुलींना टार्गेट केल्याची बाब समोर आल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

अनेक विवाहित महिला टार्गेट -

आरोपीने विद्यार्थिनींसोबतच अनेक विवाहित महिलांनादेखील टार्गेट केले होते. त्याच्याकडे छायाचित्रे-व्हिडीओ असल्याने सर्वजणी मूग गिळून गप्प बसल्या होत्या. पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. त्याची पत्नीदेखील एकेकाळी त्याची विद्यार्थिनीच होती. ती या तक्रारीनंतर फरार झाली आहे.

शिबिराच्या बहाण्याने न्यायचा आऊटिंगला -

१ संबंधित आरोपी उपचाराच्या नावाखाली किंवा शिबिराच्या बहाण्याने महिला, तसेच विद्यार्थिनींना आऊटिंगला न्यायचा. तेथे तो त्यांच्यावर जवळीक साधायचा किंवा गुंगीचे औषध देत अत्याचार करायचा. त्याचे तो मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करायचा. त्यानंतर त्याच्या आधारावर ब्लॅकमेलिंग करायचा.

अल्पवयीन मुलीवरदेखील त्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात पोलिस अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 15, 2025

PostImage

वाघाने वनमजूरावर हल्ला करून केले ठार व मांडला मृतदेहाजवळ ठिय्या 


वाघाने वनमजूरावर हल्ला करून केले ठार व मांडला मृतदेहाजवळ ठिय्या 


बल्लारपूर:-
 चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाजवळ ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले.

१४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कंत्राटदार यांना वाटप करण्यात आलेल्या बांबू युनिट क्रमांक ५ राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये कामगार ५७ वर्षीय लालसिंग बरेलाल मडावी रा. जिल्हा मंडला राज्य मध्यप्रदेश हा बांबू निष्कासनाचे काम करीत होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंग वर हल्ला करीत त्याला ठार केले.

घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ उलट वन कर्मचाऱ्यांवर धावण्याचा प्रयत्न करीत होता. वाघ मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता, बराच वेळ निघून गेल्याने वनविभागाने अतिशीघ्र दलाला पाचारण केले.

अतिशीघ्र दलाचे शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले, पशुवैधकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी वाघाची तपासणी करीत त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सदर वाघ हा नर असून तो ४ वर्षाचा आहे, वाघाला पुढील तपासणी साठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले असून मृत लालसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता रुग्णालयात नेण्यात आला आहे सदर मृतकाचे नातलगांना वनविभागाने तत्परतेने कारवाई करुन आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे 

 

 


PostImage

Vaingangavarta19

Jan. 15, 2025

PostImage

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत


अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत

 


विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा


गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत. श्री. धर्मपाल मेश्राम यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 
दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० पर्यंत अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेसोबत आढावा व चर्चा. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या योजनांचा आढावा. दुपारी १.०० ते २.०० गोंडवाणा विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिव व प्रबंधकांसोबत शैक्षणिक विषयांवरील चर्चा. दुपारी २.०० ते ३.०० राखीव. दुपारी ३.०० ते ४.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत विविध योजनांबाबत चर्चा. दुपारी ४.३० ते ५.०० अनुसूचित जाती-जमातीच्या संघटनांसोबत चर्चा व निवेदने स्वीकारणे. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
१७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता गोंदियाकडे प्रयाण.
000


PostImage

Vaingangavarta19

Jan. 14, 2025

PostImage

 नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय तरुणाचा गळा कापला


 नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय तरुणाचा गळा कापला

 

भंडारा:-नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. मात्र, हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. लाखनी येथील उड्डाणपुलावर भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला. ही धक्कादायक घटना १३ जानेवारीरोजी सायंकाळच्या सुमारास घडली. शुभम जियालाल चौधरी रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे जखमी तरुणाचे नाव आहे.

शुभम हा मकरसंक्राती निमित्ताने दुचाकीने भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात होता. दरम्यान, लाखनी शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापला गेला. यात शुभम गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला भंडाराच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते. यात नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बंदी असतानाही मांजाची विक्री होत आहे. यात पशुपक्षी तर जखमी होत आहेत. मात्र, आता याचा सर्वाधिक दुष्परिणाम मानवावरही दिसून येत आहे. याच नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय शुभमचा गळा कापला गेला. सुदैवाने तो बचावला.

नायलॉन मांजा बंदीबाबत प्रशासनाने गंभीर पावले उचलावीत, त्याचबरोबर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 14, 2025

PostImage

फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार


फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

 


अहेरी:-
 'फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी वय २२ रा. मालेगाव जि. नाशिक असे आरोपीचे नाव आहे. अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला.
दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४० (१),६५ (१) भारतीय न्याय संहिता, सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे. आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला १३ जानेवारी रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातही 'ऑनलाईन'चा विळखा

एरवी समाज माध्यमावर झालेल्या ओळखीतून अत्याचार झाल्याचा घटना शहरी भागात दिसून येतात. मात्र, याचे लोन गडचिरोलीतील ग्रामीण भागातही पसरल्याचे चित्र आहे. अहेरीतील घटनेने पालकांना धक्का बसला आहे. यापूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मधल्या काळात वृद्धांचीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. परंतु आता यामाध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येत आहेत
यातील केवळ काहीच प्रकरणाचा उलगडा होतो तर अनेक प्रकरणात सामाजिक प्रतिष्ठेमुळे पालक तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन पाल्यांना मोबाईल देत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून केल्या गेले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 14, 2025

PostImage

दुचाकीची कट मारुन, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने केला हल्ला, दोन्ही तरुण गंभीर


दुचाकीची कट मारुन, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने केला हल्ला, दोन्ही तरुण गंभीर 

चंद्रपूर :

दुचाकीची कट लागल्याच्या वादातून ३ जानेवारी रोजी तन्मय जावेद शेख याची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याची शाई वाळत नाही तेच काल १२ जानेवारी ला कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना चंद्रपुरात घडली.

जटपुरा गेटकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकी चालकाने कट मारले. यावरून वाद झाल्यानंतर कट मारणाऱ्यानी दोन जणांवर धारदार शस्त्राने वार करून दोघांना जखमी केले. ही घटना गिरनार चौकात १२ जानेवारी ला रात्री १०.३० वाजता घडली. शहर पोलिसांनी हल्लेखोर आकाश येलेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर साहिल चंद शेख (३३) रा. इंदिरा नगर पंचशील चौक चंद्रपूर हा त्याचा मित्र राहुल गजानन वानखेडे (३०) रा. बालाजी वॉर्ड याच्यासोबत त्यांच्या दुचाकीने गांधी चौकाकडे जात असताना आकाश सुधाकर येलेवार, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर हे गांधी चौकाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीने कट मारले. साहिलने त्याला अडवल्यावर त्याने शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात वाद झाला असता आकाशने साहिलच्या पोटावर व डाव्या खांद्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. राहुल त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता त्याच्या पोटावरही वार करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले. तेथे जमलेल्या जमावाने हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. जखमीचा तक्रारी वरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे शहर पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध कलम ११८ (१), २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गुरनुले तपास करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 13, 2025

PostImage

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी


महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी 

आष्टी (अशोक खंडारे):-
वाचन संकल्प महाराष्ट्र या संकल्प ने वर आधारित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आष्टी येते, वाचन संस्कृती पंधरवडा  महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने “ग्रंथप्रदर्शनी “आयोजित करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रंथालयात उपलब्ध संदर्भ ग्रंथ,चरित्र,स्पर्धापरीक्षा,विश्वकोष, मासिके इत्यादी वाचन साहित्याचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. आणि त्यातून विविध विषयांवरील ग्रंथा विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. संजय फुलझेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याच्या मनात वाचनाविषयी उत्सुकता ,वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थिती डॉ. राज मूसने,डॉ. रवि शास्त्रकार ,प्रा.नाशिका गभने .कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योती बोबाटे तर आभार प्रदर्शन प्रा.रवि गजभिये यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राजकुमार लखमापुरे,श्री. निलेश नाकाडे,श्री. आय.आर.शेख, श्री.एम.डी. मुश्ताक, संजित बच्चाड,श्री.प्रभाकर भोयर, दिपक खोब्रागडे,संतोष बारापात्रे, महा.विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 13, 2025

PostImage

जयपुर येथील सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत आष्टीच्या दिव्यांग श्वेताला रौप्य पदक


जयपुर येथील सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत आष्टीच्या दिव्यांग श्वेताला रौप्य पदक


नागपूर विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांनी केले अभिनंदन 

आष्टी:-(अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९)

 दिनांक 11/01/2025 ते 13/01/ 2025 दरम्यान पौर्णिमा विद्यापीठ जयपूर या ठिकाणी सहावी राष्ट्रीय पॅरा धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खेलो इंडिया सेंटर आष्टी तथा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने संघिक रौप्य पदकाची कमाई केली.व गडचिरोली जिल्ह्याचे तथा वन वैभव शिक्षण संस्थेचे नाव रोशन केले. त्याबद्दल वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम तसेच त्यांच्या सहचरणी नागपूर विभागीय राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांनी श्वेताचे  मनःपूर्वक अभिनंदन केले व तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,प्रा.सर्फराज आलम, यांनी श्वेताचे अभिनंदन केले.पर्यवेक्षक घाटबांधे तथा सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा श्वेताचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र दिव्यांग  खेळाडू श्वेतासाठी झटणाऱ्या डॉ. श्याम कोरडे यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन केले. श्वेताने सुध्दा  आपल्या यशाचे श्रेय डॉ. श्याम कोरडे यांना दिले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 13, 2025

PostImage

दिड महिण्यापुर्वीच्या दुखःतून सावरण्याअगोदरच दुसरा आघात 


दिड महिण्यापुर्वीच्या दुखःतून सावरण्याअगोदरच दुसरा आघात 

माजी उपसरपंच पुण्यमुर्तीवार यांचे अपघातात उपचारा दरम्यान मृत्यू 

एटापल्ली; (गडचिरोली)

येथील माजी उपसरपंच पापा उर्फ अभय वसंतराव पुण्यमुर्तीवार (वय ४५) यांचे स्वतःच्या दुचाकीवरून कोसळून झालेल्या अपघाताने चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःखद निधन झाले.
पापा उर्फ अभय पुण्यमुर्तीवार हे (ता. १० जानेवारी) शुक्रवारी एटापल्ली वरून तोडसा गावाकडे जातांना दोन किमी अंतरावरील एकरा फाट्याजवळ त्यांचे स्वतःच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ते खाली कोसळले होते सदरची माहिती त्यांनी स्वतः नातेवाईकांना फोन करून अपघाताची सांगितली होती. माहितीवरून नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, अपघातात त्यांच्या छातीच्या खालच्या बरगळीला जबर गुप्त मार लागल्यामुळे अधिक उपचारासाठी  त्यांना चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते, यावेळी त्यांना झालेले दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, गेली तीन दिवसांपासून उपचार सुरू असतानाच (ता. १३) सोमवारी पहाटे तीन वाजताचे दरम्यान पुण्यमूर्तीवार यांची प्राणजोत मालविली, त्यांच्या अकाली व दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून सामाजिक कार्यात अग्रेसर व मनमिळावू स्वभावाचे पापा पुण्यमूर्तीवार यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पापा पुण्यमूर्तीवार यांचे वडील वसंतराव पुण्यमूर्तीवार यांचे दीड महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते, वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच मुलाचे अपघाती निधना झाल्याने पुण्यमूर्तीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पापा यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (ता. १३) सोमवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान वन विभाग तपासणी नाका जवळील डुम्मे नाला मोक्षधाम घाटावर केल्या गेला घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 13, 2025

PostImage

 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक झाली जवाहर नवोदय विद्यालय शिक्षकाची 


 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक झाली जवाहर नवोदय विद्यालय शिक्षकाची 


• यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है असे म्हणत लाखो रूपाचा गंडा घातला आहे.

गोंदिया, दि. 13 जानेवारी: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका शिक्षकाची बनावट पोलीस अधिकाऱ्याकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे घडला असून या प्रकारामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सविस्तर प्रकरण काय आहे ते समोर पाहूया.

नवेगावबांध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादि भोजलाल रामलाल लिल्हारे वय 51 वर्ष शिक्षक, रा. लवेरी तालुका- किरणापूर जिल्हा- बालाघाट ह. मु. जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध, तालुका अर्जुनी मोर. जिल्हा गोंदिया असे असून यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे, प्रकाश अग्रवाल असे आरोपीचे नाव असून यांचे मोबाईल क्रमांक - 82578 85667 असे असून त्यांनी दिनांक 26/12/24 रोजी पासून फसवणूक केल्या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये तक्रार दिनांक 10/1/2025 रोजी दाखल करण्यात आली आहे.

आरोपी प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 8210107669 वर फोन करून व्हाट्सअप कॉल वरून फिर्यादीस मैं पी.ओ. प्रकाश अग्रवाल बॅच नंबर- 3378 क्राईम ब्रांच मुंबई से बात कर रहा हूं। आपके नाम पर मुंबई ठाणे मे ईलिगल एडोटाइजमेंट अँड हरासमेंट का केस दर्ज है! और आपके नाम से कॅनरा बँक मे खाता खोला गया है.

और नरेश गोयल ने 2 करोड रुपये अकाउंट से फ्रॉड किया है! जिसके आप 148 वे सस्पेक्ट हो. जिसका 20% कमिशन आपको दिया है. इसलिये आप अपने सभी खातो की जानकारी दो उनकी जाच होगी, और ये पैसा आपका सायबर सेफ कस्टडी खाता मे ट्रान्सफर करना होगा! ट्रान्सफर नही किये, तो आपको मुंबई क्राईम ब्रांच मे आना होगा. या तो फिर आपको अरेस्ट करके लायेंगे, तो आपकी क्या इज्जत रह जायेगी, सही पाया गया तो आपके पैसे वापस हो जायेंगे. यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है.

तुम अभी के अभी एन. आय. खाते मे पाच लाख रुपये ट्रान्सफर करो असे आरोपीने मी लोकसेवक आहे असे बतावणी करून बनावट अरेस्ट वॉरंट मोबाईल व्हाट्सअप वर दाखवून बोलल्याने फिर्यादीने दिनांक : 28/12/2024 ला 5 लाख रुपये दिनांक : 27/12/24 ला 4 लाख 68 हजार रुपये व 99 हजार रुपये दिनांक 28/12/24 ला तसेच 2 लाख 77 हजार रुपये असे एकूण 13 लाख 44 हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खाते क्रमांक वर पाठविले असल्याची माहिती दिली आहे.

तर मोबाईल क्रमांक 8257885567 चा धारक इसम नामे प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीस अरेस्ट करण्याची धमकी देऊन फिर्यादीची एकूण 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक केली आहे, असा फिर्यादीच्या तोंडी तक्रार वरून आरोपीचे कृत्य वरील कलमान्वये होत असल्याने आरोपी विरुद्ध अप क्रमांक : 03/2025 कलम 336 (2), 319 (2), 318 (4), 340 (1), 340 (2), 204, 351 (2) भा. न्या. स. 2023 सह कलम-66 (D) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून नवेगावबांध पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 13, 2025

PostImage

त्रिवेणी कंपनीचे एमडी .बी. प्रभाकरण यांनी दिले मोफत हेल्मेट व जनजागृतीचा संदेश 


त्रिवेणी कंपनीचे एमडी .बी. प्रभाकरण यांनी दिले मोफत हेल्मेट व जनजागृतीचा संदेश 

आष्टी:- (अशोक वासुदेव खंडारे)


त्रिवेणी कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडच्या टेकड्यांवर तिन वर्षांपूर्वी लोहखनिज उत्खननाचे काम सुरू केले असून ते काम अजूनही सुरू आहे.

कंपनी जिल्ह्याच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करीत असून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता सेवा पुरवत आहे. यासोबतच वाहतूक व्यवस्थित आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी वाहतूक मार्गावर विनोद कुमार यांच्या देखरेखीखाली बचाव प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. रेस्क्यू रिस्पॉन्स टिम रस्ते अपघातांचा तपास करणे, जखमींना हॉस्पिटलमध्ये नेणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील वर्षांत झालेल्या अपघातांचे विश्लेषण केल्यास असे दिसून आले की, बहुतांश अपघात हे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे आणि रस्त्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाले आहेत. या सर्व चुका लक्षात घेऊन त्रिवेणी कंपनीचे एमडी श्री.बी. प्रभाकरन  यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात चार एलईडी व्हॅनच्या माध्यमातून लोकांना जनजागृतीचा संदेश दिला आणि मोटारसायकल स्वारांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करून आनंदी जीवन जगण्याचा सल्ला दिला.दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच वाहण चालवावे जेणेकरुन आपल्या जीवनात आनंदी आनंद राहील  असा संदेश दिला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 12, 2025

PostImage

राज्यात मदिरा  महागणार , मदिरा प्रेमींसाठी वाइट बातमी


राज्यात मदिरा  महागणार , मदिरा प्रेमींसाठी वाइट बातमी 

 

मुंबई:-
मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येत आहे. आता राज्य सरकार दारूच्या किमतीत वाढ करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार दारूच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. दारूपासून उत्पन्न कसे वाढवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जनतेला अनेक लोकप्रिय आश्वासने दिली आहेत, ज्यांची अंमलबजावणी जमिनीवर करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. हे लागू केल्याने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडेल. हा भार कमी करण्यासाठी सरकार दारूवरील कर वाढवण्याची तयारी करत आहे.


५ सदस्यीय समितीची स्थापना

महाराष्ट्र सरकारने दारूपासून उत्पन्न कसे वाढवायचे हे शोधण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दारूचे उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतेचा अभ्यास करेल. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये वित्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य जीएसटी आयुक्त आणि उत्पादन शुल्क आयुक्त हे समितीचे सदस्य आहेत. या समितीला दारूचे उत्पादन वाढवण्याचे, नवीन दारू परवाने देण्याचे आणि महसूल वाढवण्याच्या इतर मार्गांचा अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्याची शिफारस समिती करू शकते अशी अपेक्षा आहे.

सरकारला पैशांची गरज

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, राजकीय पक्षांनी लाडकी बहिण योजनेची मदत रक्कम वाढवणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे, मोफत वीज देणे इत्यादी अनेक लोकप्रिय आश्वासने दिली होती. आता हे करण्यासाठी सरकारला पैशांची गरज आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून, सरकार येत्या काळात दारूच्या किमती वाढवून आपले उत्पन्न वाढवेल.


आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच कर्जमाफी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिक राव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली किंवा वाईट नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय सहकार विभागाच्या अखत्यारीत येतो. ही यादी फक्त सहकार विभागामार्फत मागवली जाते. आमच्या कृषी विभागाकडे ते काम नाही, पण तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ४ ते ६ महिन्यांत निर्णय घेतला जाईल.

शेतकरी कर्जमाफी रखडली आहे का?

लाडकी बहिण योजनेमुळे आर्थिक भार वाढला आहे, असेही कृषीमंत्री कोकाटे म्हणाले. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी थोडेसे अधिशेष निर्माण करणे शक्य नाही. यासाठी आपण थोडे पुढे-मागे करत आहोत. आम्ही एक दिवस शेतकऱ्यांबाबत निर्णय घेऊ.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 12, 2025

PostImage

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा 


अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा 

 


गडचिरोली- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक चांदेकर भवन येथे नुकतीच पार पडली.
    पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधान सभा अध्यक्ष प्रदीप भैसारे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे , जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे हे प्रामुख्याने हजर होते.
    या बैठकीत पक्ष संघटना व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली व संगठन बांधणीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. आगामी निवडणुका पक्षातर्फे लढविण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक असल्याने संबंधीत क्षेत्रात जनसंपर्क वाढवून संगठन अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
   लवकरच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा सुद्धा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.  रिपब्लिकन पक्ष हा दलित आदिवासी व गोरगरीब लोकांसाठी लढणारा पक्ष असल्याने जास्तीती जास्त लोकांना पक्षात सहभागी करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
    रिपब्लिकन पक्ष आज गटातटात विखुरलेला असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आंदोलनाची व विचारधारेची खरी ओळख हाच पक्ष आहे आणि म्हणून तीच आंबेडकरी   लोकांची पहिली पसंती असल्याचे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी यावेळी बोलताना केले व हा पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. 
   बैठकीला कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, तालुका अध्यक्ष पुंजाराम जांभूळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते पुण्यवान सोरते, सिद्धार्थ खोब्रागडे, विजय देवतळे महिला आघाडी शहर अध्यक्ष वनमाला झाडे, चंद्रभान राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025

PostImage

महागाव येथे  क्षयरोग उच्चाटनसाठी जन जागृती रॅली


महागाव येथे  क्षयरोग उच्चाटनसाठी जन जागृती रॅली

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

अहेरी:-

टी बी म्हणजेच क्षय रोगाच्या उच्चाटनासाठी १०० दिवस टी बी कार्यक्रम अंतर्गत महागाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे क्षयरोगाबाबत जनजागृती साठी भव्य रॅली काढण्यात आली.
  टी बी प्रतिबंध,लवकर तपासणी,उपचार, समुपदेशन करून नागरिकांना या रोगाबद्दल माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 या वेळी महागाव प्राथमिक आरोग्य  केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम, प्राथमिक आरोग्य केंद्र च्या एएनएम गोगे,आरोग्य उपकेंद्राच्या ए एन एम सिंग,आशा वर्कर जिजा सडमेक,चालक दिनेश अलोणे तथा जिल्हा परिषद शाळा महागाव चे मुख्याध्यापक आत्राम तथा शिक्षक उपस्थित झाले होते.
  रॅली ही संपूर्ण गावात काढण्यात आली आणि रस्त्यावरील घरोघरी माहिती देण्यात आली.
   टी बी विषयी भीती न बाळगता त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे कारण योग्य औषध उपचार आणि चांगला आहार,योग्य काळजी याने टी बी आजार बरा होऊ शकतो.आणि रोग्याने कोणती खबरदारी घेतली तर तो इतरांना होणार नाही याबाबत डॉ लूबना हकीम यांनी विद्यार्थी तथा इतरांना मार्गदर्शन केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025

PostImage

कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी घातली कांस्य पदकास गवसणी


कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी घातली कांस्य पदकास गवसणी 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी कांस्य पदकास गवसणी घातली आहे 
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल ,खणीज संपत्ती आणि जमीन यांनी समृद्ध आहे.
अत्यंत दुर्गम भागात क्रीडा सुविधांची वानवा असतानाही त्यांनी आपल्या मेहनतीने गाव व जिल्ह्याला नाव लौकिक मिळवून दिले आहे सामान्य कुटुंबातून जन्माला आलेला 22 व्या अखिल महाराष्ट्र वू-शू असोसिएशनच्या मान्यतेने खेळाची आवड असलेल्या 3 दिवसीय राज्यस्तरीय वू-शू कराटे स्पर्धेत यशवंत महाविद्यालय क्रीडा संकुल नांदेड जिल्ह्यामध्ये गडचिरोली वू-शू झिग-झॅग अकॅडमीचे प्रतिनिधित्व करीत
महेश पांडुरंग शेंडे याने आपल्या अथक परिश्रमाने आणि आपल्या असामान्य खेळाचे चमकदार प्रदर्शन करून कांस्य पदक जिंकून गावासह जिल्ह्याचे नाव उंचावले. त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, क्रीडा प्रशिक्षक मिलिंद साळवे, वु-शू मास्टर गुलाब मेश्राम, कराटे मास्टर कपिल मसराम, मार्गदर्शक विनय बोडखे, आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पवार, पीएसआय वनवे, पोलीस उपनिरीक्षक जगताप आदिंनी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत शारीरिक तंदुरुस्ती सोबतच  या ठिकाणी पोहोचण्यात मोलाचा वाटा उचलला. आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025

PostImage

पाणिपुरीच्या  हातठेल्याला  अर्टीकाची  जब्बर धडक एक ठार  तर ६ जन गंभीर जखमी


पाणिपुरीच्या  हातठेल्याला  अर्टीकाची  जब्बर धडक एक ठार  तर ६ जन गंभीर जखमी

 

यवतमाळ :- पांढरकवड्या वरुन शिबला रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या अर्टिका गाडीने समोरुन येणाऱ्या पाणीपुरी च्या हातठेल्या ला जोरदार धडक दिल्याने हातठेला चालक जागेवरच ठार झाला. हि भंयकर घटना चालबर्डी गावाजवळील लहान पुलाजवळ दिनांक ०८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता च्या दरम्यान घडली आहे. मृतक रामजनक बाबूराम बघेल वय ४१ रा. रामनगर पांढरकवडा असे अपघातात ठार झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. रामजनक बघेल हा हात ठेल्यावर गावोगावी जावून पाणीपुरी विक्री चा व्यवसाय करीत होता व आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह चालवित होता. अपघाताच्या दिवशी रामजनक हा चालबर्डी या गावी दुपारी ०२ वाजता पाणीपुरी विकण्याकरीता गेला होता.


पाणीपुरीचा व्यवसाय करुन रात्री ८.४५ वाजता दरम्यान चालबर्डी येथून आपल्या घराकडे परत येत असताना चालबर्डी जवळील लहान पुलाजवळ समोरून येणाऱ्या अर्टीका वाहन क्रं. एम एच ३४ बीबी ०९९८ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजी पणाने चालवून समोरुन येणाऱ्या हातठेल्याला जोरदार धडक दिली या मध्ये हात ठेला चालक रामजनक याच्या जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून खुप रक्त वाहले त्याचा डावा पाय शरीरापासून वेगळा झाला होता.

त्यामुळे रामजनकचा जागेवरच मृत्यू झाला. तर अर्टिका मधील सहा जण जखमी झाले व अर्टीका गाडी दुरपर्यंत घासत जावून रोडच्या बाजूला असलेल्या शेतात जावून पडली. गाडीतील जखमी रघुनाथ कोवे वय ५३ वर्ष, सुरेंद्र नैताम वय ३९ वर्ष, युवराज पेंदोर वय ३० वर्ष, अंकूश कोवे वय ४ वर्ष जयप्रकाश पेंदोर वय ९ वर्ष सर्व रा. महाडोंळी व अर्टिका वाहन चालक नागेश्वर वसंता कोवे २७ रा.साखरा ता. घांटजी आहे. पांढरकवडा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटना स्थळी पोलीस निरीक्षक दिनेश झाबरे , पोलीस आशिष गजभिये, लक्ष्मी मलकुलवार , सचिन काकडे, सुनिल कुंटावार, जुनुनकर साहेब, राजु बेलयवार, यांनी पंचनामा करून जखमीना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी असलेल्या ६ पेशंटला वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ ला लगेच रेफर करण्यात आले या अपघाताची तक्रार विवेक माधवसिंग बघेल ३६ रा. रामनगर यांनी पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीसांनी अर्टिका चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लक्ष्मी मलकुलवार  करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025

PostImage

तळिरामाने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून केले गंभीर जखमी 


तळिरामाने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून केले गंभीर जखमी 

कोरची : 
एका तळिरामाने शुल्लकच्या वादातून आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे 
कोरची तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील दोडके येथे पतीने घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. 

संतारोबाई कोरेटी (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. आशू कोरेटी (५०, रा. दोडके) हा  दि ६ रोजी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी घरगुती कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आशू
कोरेटी याने रागाच्या भरात कुन्हाडीने पत्नीवर हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी संतारोबाई यांना त्यांच्या भावाने कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलीसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 10, 2025

PostImage

अंगणवाडी स्वयंपाकी महिलांची वेठबिगारी थांबवावी,स्वतंत्र मजूर युनियनची मागणी


अंगणवाडी स्वयंपाकी महिलांची वेठबिगारी थांबवावी,स्वतंत्र मजूर युनियनची मागणी

प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक/ वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली- डॉ.ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांना फक्त १,००० रुपये दरमहा मानधन देऊन शासन या महिलां कडून एक प्रकारे वेठबिगारी करवून घेत आहे. ही वेठबिगारी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र मजूर युनियन चे जिल्हा सरचिटणीस गौतम मेश्राम यांनी केली आहे.

उत्तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्वयंपाकीन महिलांचा मेळावा कुरखेडा येथे नुकताच आयोजिण्यात आला होता त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर सामाजिक कार्यकर्ते तुलाराम राऊत, स्वयंपाकीन महिला संगठनेचे नेते कृष्णा चौधरी हे प्रामुख्याने हजार होते.

सदर स्वयंपाकीन महिला मागील नऊ वर्षांपासून १,००० रुपये एवढ्या अत्यल्प मानधनावर काम करून गरोदर मातांची सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस या सर्व दिवसात त्या आपले काम नियमितपणे करीत असून वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत त्यांचे मानधन वाढविण्यात आलेले नाही, हा या महिलांवर खूप मोठा अन्याय आहे.

तेंव्हा शासनाने त्याचे मानधन त्वरित वाढवून द्यावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणीही मेश्राम यांनी यावेळी केली. स्वतंत्र मजूर युनियनतर्फे या समस्ये बद्दल आवाज उचलण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.

रोहिदास राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन करून स्वयंपाकीन महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शासन स्वतःच आपल्या किमान वेतन कायद्याला हरताळ फासत असून ग्रामीण व गरीब महिलांसोबत क्रूर थट्टा करीत असल्याचे ते म्हणाले. शासनाने हि थट्टा त्वरित थांबवावी आणि महिलांना न्याय द्यवा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

तुकाराम राऊत यांनी महिलांचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे व या अन्याया विरुद्ध आवाज उचलण्याचे आवाहन केले. महिला संघटनेचे कृष्ण चौधरी यांनी प्रास्ताविकातून अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांच्या समस्या मांडल्या आणि या मागण्या पुढे रेटण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.

अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांचे मानधन किमान २०,००० रुपये एवढे वाढविण्यात यावे, त्यांचे मानधन नियमितपणे दरमहा देण्यात यावे, या महिलांचे स्वतंत्र मस्टर बुक ठेवण्यात यावे, साप्ताहिक सुटी देण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन लागू करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे ठराव मेळाव्यात पारित करण्यात आले.

या मेळाव्याला आरमोरी, वडसा कुरखेडा कोरची व धानोरा या पाच तालुक्यांतून दोनशेहून अधिक महिला कामगार उपस्थित होत्या.

दिपालीबावनथडे, संध्या लोंबले, वैशाली नरोटे, वैशाली मडावी, ममता नाकाडे, गायत्री सयाम सीमा गोटा, शकुंतलागावडे, अश्विन गुरनुले, रीमा नैताम, शारदा बर्डे, अंजु गेडाम व अन्य महिलांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 9, 2025

PostImage

पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  पत्रकारांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे मागणी


पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
 पत्रकारांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे मागणी


 गडचिरोली:-

छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे, त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की पत्रकार चंद्राकर यांची खाण माफियांनी निघृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. ही गंभीर बाब आहे. गडचिरोली जिल्हा सुद्धा छत्तीसगडच्या सीमेवर असून जिल्ह्यात सुध्दा अनेक खाण माफिया असून ते मुरुम, रेती माती, गिट्टी या सह गौनखनिज आणि गौन वनोपजांची अवैध वाहतूक करीत असतात. त्यांची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या अशा कुकृत्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकार हे निर्भिडपणे आपले काम चोख बजावू शकत नाहीत.
सरकारने पत्रकार संरक्षण कायदा बनविला आहे. मात्र या कायद्याची प्रशासनाकडून प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी उचित पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पत्रकार चंद्राकर यांच्या हत्येनंतर सरकार आणि प्रशासनाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली असून चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि देशभरातील पत्रकारांना उचित संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील पत्रकार एकवटले होते. पत्रकारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा मुक मोर्चा पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बैठक कक्षात सर्वांना पाचारण करून त्यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदिंसाठी तयार केलेल्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांचे कडून नेमका विषय समजून घेतला व सदर विषयावर गडचिरोली जिल्हा प्रशासन सकारात्मक भूमिका घेतानाच पत्रकारांच्या तीव्र भावना राज्य सरकार पर्यंत पोहोचविल असे आश्वासन दिले. यानंतर पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुध्दा निवेदन देऊन आपल्या मागण्या पोलीस प्रशासनापुढे ठेवल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी निवेदन स्वीकारले.मोर्चाचे संयोजक पत्रकार मुनीश्वर बोरकर, गडचिरोली प्रेस क्लबचे सुरेश पद्मशाली, ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर, गामाचे संयोजक उदय धाकाते, व्हाइस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय तिपाले, जयंत निमगडे, मुकुंद जोशी, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे जगदिश कन्नाके, मारोती भैसारे विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कहूरके, कालीदास बुरांडे, नासिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा, मंगेश भांडेकर, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतिश ढेंभुर्णे गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे या सह जिल्हयातील शंभराहून अधिक पत्रकार उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 9, 2025

PostImage

जंगलात केली चितळाची शिकार, सरपंच फरार तर तिन इसम जेरबंद 


जंगलात केली चितळाची शिकार, सरपंच फरार तर तिन इसम जेरबंद 


प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता 19 गडचिरोली
सिरोंचा:-
जंगलात रात्री चितळाची शिकार करुन विल्हेवाट लावण्यासाठी लगबग सुरू असताना अचानक वनविभागाने पथकाने धाड घातली असता सरपंच फरार झाला तर मोठ्या शिताफीने तिन इसमास अटक करण्यात आली आहे 
सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार केल्याची घटना ८ जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाने यातील आरोपींचा शोध घेतला असता या घटनेत वडधमच्या सरपंच व अन्य दोघांचा समावेश आहे. तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सरपंच फरार आहे.समय्या किष्टय्या सिंगनेनी (सरपंच पोचमपल्ली), सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी, राजेश्वर सवेश्वर आकुला (सर्व रा. वडधम) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश्वर, सवेश्वर व राकेश यांना अटक करण्यात आली आहे. तर सरपंच समय्या हा फरार आहे. ८ जानेवारी रोजी

वनविभागाचे पथक गस्तीवर असताना वडधम गावात विद्युत लाइन ट्रीप झाल्याचे लक्षात आले तेव्हा अनुचित घटनेचा संशय आला. वर्धम गावात चौकशी केली असता जंगलात वन्यप्राण्यांची विद्युत तारेचा स्पर्श लावून शिकार केल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी शिकार झालेल्या ठिकाणाचा शोध घेत

असताना राजेश्वर सवेश्वर आकुला हा दिसून आला. त्याचवेळी राजेश्वरच्या भ्रमणध्वणीवर शिकारसंदर्भात फोन आला. तेव्हा त्याला अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की गोदावरी नदीपात्रापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावरील जंगलात शिकार झाली. त्याला सोबत घेऊन शिकारीचा शोध घेत असताना वाटेत चितळाचे शिर मिळून आले. समोर काही इसम दिसून आले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. सुरपाम करीत आहेत. ही कारवाई वनपाल डी. बी. आत्राम, वनरक्षक आर. वाय. तलांडी, डी. यु. गिते, एस.एस. चौधरी, व्ही. ए. काटींगल, आर. के. आत्राम यांनी केली.नदीपात्र ओलांडून आरोपींना केली अटक

वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत गोदावरी नदीपात्र ओलांडून सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी यांना ताब्यात घेतले. समय्या किष्टय्या सिंगनेनी फरार होण्यात यशस्वी झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आला नाही.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 9, 2025

PostImage

ग्रामस्थांनी उधळला अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव


ग्रामस्थांनी उधळला अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव 

पांढरकवडा (यवतमाळ): एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव असफल केला   याबाबत पोलिसांनी तीनः जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.आरोपींमध्ये एका मुलीसह एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. आदिलाबाद येथील रणदिवसनगर मधील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, अजय गंगाधर आडे (३०), वीणा मारोती किनाके (२३, रा. पाटणबोरी) अशी आरोपींची नावे आहेत. ७ डिसेंबरला सायंकाळच्या दरम्यान पाटणबोरी येथील एका शाळेतील दहाव्या वर्गातील १६ वर्षीय मुलीस तिच्या ओळखीच्या गावातीलच वीणा मारोती किनाके (२३) हिने शाळेतून घरी नेले व त्यानंतर ती तिला इतर दोन आरोपीसोबत अदिलाबाद येथे घेऊन जात होती. यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या मित्रास ती मुलगी दिसून आल्याने त्याने मुलीच्या मामाला याची माहिती दिली. तेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या मामासह गावातील इतर नागरिक पाटणबोरी येथील अदिलाबाद मार्गावर आले. त्यांनी तिनही आरोपींना मुलीस कुठे नेत आहे याची विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. नागरिकांनी त्या सर्वांना पाटणबोरी आऊटपोस्टमध्ये नेले. पोलिसांनी विचारपूस केली असता, या मुलीस फूस लावून अदिलाबाद येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 8, 2025

PostImage

भीमशक्ती महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी : पद्मिनी शेवडे


भीमशक्ती महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी : पद्मिनी शेवडे

 सोलापूर :-काँग्रेस (i)पक्षाचे राष्ट्रीय नेते  व राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी वरिष्ठराव शेवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 परवा सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नागनाथ बंगाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड घोषित करण्यात आली.
 शेवडे ह्या आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्यां असून विविध आंदोलनात सहभाग नोंदवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
  यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद (नाना )प्रेक्षाळे, समता सैनिक दलाच्या वैशाली उबाळे,नंदा चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विलास सरवदे व लहुजी शक्ती सेनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राहुल मस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 निवडीनंतर बोलताना शेवडे म्हणाल्या की माननीय हंडोरे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय बहुजन समाजाला पर्याय नसून भीम शक्ती च्या माध्यमातून उपेक्षीताना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असून कामाच्या माध्यमातून आपण  संघटना बांधणी करणार आहे.
शेवडे यांची कर्मभूमी जरी मुबई असली तरी त्यांचे जन्म भूमी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही आहे. त्यांच्या निवडीचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 3, 2025

PostImage

लोहखनिज घेऊन जानाऱ्या ट्रकने दिली समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक,चालक जागीच ठार 


लोहखनिज घेऊन जानाऱ्या ट्रकने दिली समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक,चालक जागीच ठार 

आष्टी:-
लोहखनिज घेऊन जानाऱ्या ट्रकने समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना दि २ जानेवारी ला रात्री १० .३० वाजताच्या दरम्यान अनखोडा व उमरी जवळ घडली.
मृतक चालकाचे नाव  मोहीत यादव वय २६ रा.कोइलरा मध्यप्रदेश असे असून तिन ट्रक मिळून स्टॉक यार्डमधून लोहखनिज घेऊन रायपूर कडे जाताना आष्टी पुढील अनखोडा व उमरी दरम्यान ट्रक क्रमांक एम एच ३४ बि झेड २३७७ हे ट्रक पुढे होते त्यापुढे जनावराचा कळप दिसल्यावर त्याने ब्रेक घेतला तेव्हा त्याच्या मागे येणारा ट्रक क्रमांक एम एच ३३ डब्ल्यू १९७७ त्याने धडक दिली मात्र ती सौम्य स्वरूपाची होती परंतू त्या मागे येणारा ट्रक क्रमांक जिएफसी ट्रान्सपोर्टचा एम एच ४० सी टी १२८५ या ट्रकने समोरच्या ट्रकला जबरदस्त धडक दिल्याने चालक जागीच ठार झाले 
सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी लागलीच धाव घेतली व अपघातातील चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले 
अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करित आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 3, 2025

PostImage

अनखोडा ग्रामपंचायतीने लायड्स मेटल्स कंपनीला जमीन अधिग्रहणाविरोधात केला ठराव पारित


अनखोडा ग्रामपंचायतीने लायड्स मेटल्स कंपनीला जमीन अधिग्रहणाविरोधात केला ठराव पारित 


कोनसरी लोहनिर्मीती कारखाना विस्तारिकरणास शेतजमीन देण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध 

आष्टी -
 गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लोहनिर्मिती कारखान्याच्या विस्तारीकरण प्रक्रियेला वेग आला असून 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकिकृत स्टील प्रकल्प नियोजित आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने 23 जानेवारीला कोनसरी येथे जनसुनावणी आयोजीत केली आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणामुळे प्रभावित गावातील शेतकरी धास्तावले असून लोहनिर्मिती प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे सुपीक जमिनीवरील पिके नष्ट होणार असून जल, जंगल व  मानवी जीवाची फार मोठी हाणी होणार असल्याने या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या विरोधात प्रभावित अनखोडा ग्रामपंचायतीने  दोन जानेवारीला 
 ग्रामसभेत ठराव पारीत केला. तसेच  वरील ग्रामपंचायत हद्दीत भूसंपादनाचा शासनाने व कंपनीने विचार केल्यास याला तीव्र विरोध करण्यात येईल असेही ठरावात नमूद केले आहे 

  ग्रामपंचायती च्या विशेष सभेस अनखोडा   येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांमध्ये प्रकल्पाच्या विस्तारी करणावरून मोठया प्रमाणात रोष बघावयास मिळाला

    परीसरातील प्रभावित गावांनी जमीन अधिग्रहणास तीव्र विरोध करीत ठराव घेण्यास सुरवात केली असुन येत्या काळात स्थानीक शेतकरी कंपनी प्रशासन व सरकार यामध्ये संघर्ष होणार अशी चिन्हे आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 2, 2025

PostImage

आष्टी येथील हरीश चायनीज सेंटरला लागली आग, वेळीच अग्निशमन पोहचल्याने मोठा अनर्थ टळला


आष्टी येथील हरीश चायनीज सेंटरला लागली आग, वेळीच अग्निशमन पोहचल्याने मोठा अनर्थ टळला 


आष्टी :-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील हरीश चायनीज सेंटरला आग लागली मात्र वेळीच अग्निशमन पोहोचले व मोठा अनर्थ टळला ही घटना आज दि.२ जानेवारी ला दुपारच्या सुमारास घडली 
 आष्टी येथील प्रकाश बोभाटे यांचे भाडेकरू हरीश विश्वास यांचे हरीश चायनीज सेंटर आहे दुपारच्या सुमारास सिलेंडर च्या गॅस गळतीमुळे आग लागली तेव्हा आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते तेव्हा 
घटनेचे गांभीर्य ओळखून 
श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचे अध्यक्ष पवन  रामगिरकर ,सचिव संदीप  तिवाडे, कोषाध्यक्ष देवाभाऊ बोरकुटे, प्रणय व्‍यंकटी बुर्ले  जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस   यांनी  लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर  एस.व्येकटेश्वरन यांच्याशी संपर्क करून तात्काळ अग्निशामक वाहनाला घटनास्थळी पाठविण्याचे माहिती दिली  त्यावेळी एस व्यंकटेशवरण  यांनी कर्मचारी मृणाल वाकुडकर व अग्निशमन दलाची गाडी व  कर्मचारी यांना पाठवून आग विझविली  लायड्स मेटल्स यांच्या मदतीने एक मोठा भीषण अपघात होता होता वाचलेला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 2, 2025

PostImage

वेमुलवाडा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या वाहनाच्या अपघातात एका महीलेचा मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी


वेमुलवाडा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या वाहनाच्या अपघातात एका महीलेचा मृत्यू तर पंधरा जण गंभीर जखमी

 

अहेरी : 
वेमुलवाडा येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या वाहनाच्या अपघातात एका महीलेचा मृत्यू तर पंधराजन गंभीर झाल्याची घटना घडली 
अहेरी तालुक्यातील वेलगूर येथील कांताबाई सूर्यभान मराठे असे मृत महिलेचे नाव आहे वेलगूर येथील मजूर तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कापूस वेचणीसाठी गेले होते. काल नवीन वर्षच्या निमित्याने देवदर्शनसाठी वेमूलवाडा येथे जात असतांना चार चाकी वाहनाचा सिरसिल्ला जवळ अपघात झाले होते. या अपघातात कांताबाई मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे कांताबाई मराठेसह वेलगूर येथील आनंदराव मराठे, गंगुबाई मराठे, कविता पालोजवार, रेखा गाताडे, लक्षमीबाई मंडरे, वनिता सातारे, भिकू सातारे, उषा मराठे, सुनंदा राऊत, माया मराठे, ज्योती मराठे, विमल मराठे, निर्मला मंडरे, सुधाकर गदेकर, सुरेखा गदेकर हे सर्व कापूस वेचणीसाठी घेले होते. या सर्वांनी देवदर्शनसाठी जात असतांना हा अपघात झाला. अपघातात कांताबाई जागीच ठर झाल्या आणि इतर पंधरा जण गंभीर जखमी झाले त्यांना करीमनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 

या गंभीर अपघाताची माहिती गावाकडे नातेवाईकांना मिळाली  मात्र त्यांना करीमनगर जाण्यासाठी आणि तिकडे उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी खूप अडचण भासत होती. त्यावेळी त्या नातेवाईकांनी आविसं, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सांगितली तेव्हा कंकडालवारांनी त्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना जाण्यासाठी तसेच दवाखान्यात उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

यावेळी मदत करतांना अजय कंकडालवार सोबत अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 2, 2025

PostImage

जन्मदात्या आई वडिलांची मुलानेच केली निघृण हत्या


  जन्मदात्या आई वडिलांची मुलानेच केली निघृण हत्या

 

नागपूर 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या हत्याच्या घटनेमुळे नागपूरकर दहशतीत आहेत.नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इंजिनिअर मुलाने आपल्या जन्मदात्या आई - वडिलांची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना खसाळा कॅम्पसमध्ये घडली असून लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी हत्या करण्यात आलेल्याची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे.

प्राप्त माहितीनुसार, हत्या करण्यात आलेले लीलाधर डाखोडे हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तर अरुणा डाखोडे या विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई- वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन केला.हत्या करण्यापूर्वी आरोपी उत्कर्ष याने 26 डिसेंबरला सकाळच्या सुमारास आपली धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते. सेजल BAMS चे शिक्षण घेत होती आणि ती वर्धा रोडवर असलेल्या कॉलेजमध्ये जाते.

उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोहोचला, तिथे 1.00 वाजताच्या दरम्यान त्याने प्रथम आपल्या जन्मदात्या आई अरुणाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो आपल्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला. 5.00 वाजताच्या दरम्यान वडील लीलाधर त्यांच्या ड्युटीवरून घरी आले त्याचवेळी आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन घेऊन कोराडी येथे राहणाऱ्या आपल्या मामाकडे गेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की तो काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगलोरला जात आहे व बहिणीला काकाकडे सोडून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी ते पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेले असता, शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत तपासले असता घरभर रक्ताने माखलेले अरुणा व लीलाधर यांचे मृतदेह अखंड अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या आई- वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 30, 2024

PostImage

स्टाफरूममध्येच विद्यार्थ्यांस एका शिक्षीकेने शारिरीक संबंध ठेवण्यास केले बाध्य 


स्टाफरूममध्येच विद्यार्थ्यांस एका शिक्षीकेने शारिरीक संबंध ठेवण्यास केले बाध्य 

पुणे:-
एका शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला आपल्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाग पाडले मात्र मुख्याध्यापकाने सदर प्रकार उघडकीस आनला 
 ज्ञानदानाच्या पवित्र पेशाला काळिमा फासणारी घटना विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यावर शाळेतील 27 वर्षीय शिक्षिकेनेच लैंगिक अत्याचार केल्याचे उजेडात आले आहे. शाळेच्या आवारात स्टाफरूममध्येच या मुलावर जबरदस्ती करीत शिक्षिकेने संबंध ठेवण्यास भाग पाडले. हा विद्यार्थी परीक्षेसाठी शाळेत आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडलाअसून, पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. धानोरी भागात राहणाऱ्या आरोपी शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व शाळेच्या स्टाफरुममध्येच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. स्टाफरूममध्ये सुरू असलेल्या मुख्याध्यापिकेला या कृत्याबाबत कळताच त्यांनी स्टाफरूममध्ये येऊन बघितले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शाळेने मुलाच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 26, 2024

PostImage

बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची ठरली अखेरची भेट


बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची ठरली अखेरची भेट 

पिकअप च्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर 

प्रमोद झरकर/ उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:- बहिणीला भेटून जाणाऱ्या भावाची अखेरची भेट ठरल्याची  पोलीस स्टेशन अंतर्गत कन्नाळगाव जवळ पिकअप वाहनाने दुचाकीस्वार याला जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना काल दि २५ डिसेंबर ला सायंकाळी तिन ते चार वाजताचे सुमारास घडली.

मृतकाचे नाव रवी गुरुदास मडावी वय २७ रा. मलकापूर व गंभीर जखमी नितेश गोपिचंद शिडाम हे दुचाकी नंबर एम एच ३३ ई एल ७०३४  ने रवी मडावीच्या बहिणीला भेटायला
जामगीरी येथे गेले होते व भेटभलाई करुण मलकापूर कडे जाताना कन्नाळगाव जवळ समोरुन येणाऱ्या पिकअप क्रमांक एम एच ४० बि एल १२२३ ने जबरदस्त धडक दिली
त्यामध्ये रवी जागीच ठार झाला तर नितेश गंभीर झाला लागलीच घटनेचे गांभीर्य ओळखून पिकअप चालकाने  आपल्याच वाहणात त्या दोघांनाही घेऊन चामोर्शी रुग्णालयात दाखल केले तेव्हा रवीला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमी नितेश याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविले 
सदर अपघाताची नोंद आष्टी येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा वनकर 
हे करीत असून मृतदेह चामोर्शी रुग्णालयात असल्याने पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मृतक बहीणीला भेटायला जाऊन परतीच्या प्रवासात असताना अचानक अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच मलाकापूर येथे व जामगीरी येथे शोककळा पसरली.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 25, 2024

PostImage

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला :-डी. के. साखरे


छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला :-डी. के. साखरे

मंगळवेढा :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी मंगळवेढा येथील श्री. संत चोखामेळा चौकात मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी साखरे बोलत होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा शहराध्यक्ष अजय गाडे व बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी शेवडे यांच्या हस्ते  श्री. संत चोखामेळा यांच्या समाधीला पुष्पचक्र  अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.पुढे बोलताना साखरे म्हणाले की, ज्या मनुस्मृतीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, विषमतेचा पुरस्कार केला तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले त्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी दहन केले. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण भारतात मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेविरुद्ध पुकारलेले बंड असून जिवंत आंबेडकरांपेक्षा आज प्रस्थापित मेलेल्या आंबेडकरांनाचं जास्त घाबरतात.तर वंचित बहुजन आघाडीचे अजय गाडे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला जगात तोड नसून मनुवादी प्रवृतीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे.यावेळी विजय शिकतोडे, समाधान भोसले, सुनिल शेंबडे, ब्रम्हदेव वाघमारे,संदेश लोखंडे,विकास जावळे,नितीन लोकरे, श्रीपती लोकरे, नितीन शेंबडे, नंदू लांडगे,बाबा घनवजिर यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 24, 2024

PostImage

वसंतपूर जंगल परिसरात आढळले युवकाचे प्रेत


वसंतपूर जंगल परिसरात आढळले युवकाचे प्रेत 

 


आष्टी (प्रतिनिधी )## चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वसंतपूर जंगल परिसरात एका युवकाचे प्रेत आढलले ही घटना आज सकाळी १o.oo वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मयत युवकाचे नाव दिपक दिलीप सरकार , वय २२वर्षे , रा. वसंतपूर असे आहे.
सविस्तर वृत्त असे की मयत युवक सोमवार ला दुपारी घरुन बाहेर गेला होता .रात्रीपर्यंत  तो परत आला नाही.आज सकाळी १०.०० वाजताच्या दरम्यान त्याचे प्रेत वसंतपूर जंगल परिसरात आढळले. घटनेची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व सदर मयताचे प्रेत आष्टी ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
सदर युवकाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.सदर घटना सायंकाळी ६.०० ते सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान घडली .अशी माहिती पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी दिली. मयत युवक हा अविवाहित होता. 
त्याच्या मृत्युने  वसंतपूर परिसरात खळबळ उडाली असुन नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 23, 2024

PostImage

सरपंचांने केला अपहार, आयुक्तांने केले अपात्र


सरपंचांने केला अपहार, आयुक्तांने केले अपात्र 


गडचिरोली :- आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील सरपंच वासुदेव मंडलवार यांनी नियमबाह्य कामे करून भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत अपर आयुक्तांनी मंडलवार यांना अपात्र घोषित केले आहे. ग्रामपंचायत सदस्य स्नेहा गोपाल भांडेकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर न्यायनिवाडा करताना अपर आयुक्तांनी हा निर्णय दिला.
2020-21 या कालावधीत मंडलवार हे ठाणेगाव ग्रामपंचायतवर निवडून आले आहेत. दरम्यान सरपंच म्हणून मंडलवार यांनी आरमोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निविदा मंजूर करण्याआधीच काम केले. सरपंच आणि सचिवांनी कोणतीही जाहीरात न काढता निविदा मंजूर करण्याआधीच विहिरीवर जाळी बसविण्याचे काम केले.

त्या कामाची रक्कम दि. 19 एप्रिल 2022 च्या मासिक सभेत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून खर्चास मंजुरी प्रदान केली. त्यानंतर त्याच कामाची रक्कम 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून खर्च न करत, मासिक सभेत परवानगी न घेता 21 जुलै 2023 च्या मासिक सभेत विहिर देखभाल व दुरूस्ती म्हणून पाणी पुरवठा निधीतून खर्च केल्याचे दाखविण्यात आले. ते काम 25 हजार रुपयांच्या वरील रकमेचे असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 अंतर्गत कलम 50 अन्वये कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता प्राप्त करणे आवश्यक होते. परंतू अंदाजपत्रकच तयार केले नाही आणि निविदासुद्धा काढली नाही.

याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता आणि अंगणवाडीतील साहित्य खरेदी करतानाही सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संगनमत करून साहित्य खरेदी केल्याचे दिसून आले. याप्रमाणे इतरही अनेक कामांत नियमांना डावलल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आढळले.त्यात मंडलवार यांच्या कार्यकाळातील कामात नियमांना डावलल्याचे आणि भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला चौकशी अहवाल ग्राह्य धरत भांडेकर यांचा तक्रार अर्ज मान्य केला. त्यामुळे सरपंच मंडलवार अपात्र ठरले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 21, 2024

PostImage

गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर दोन नक्षलवादी यांनी केले आत्मसमर्पण 


गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर दोन नक्षलवादी यांनी केले आत्मसमर्पण 

 शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयांचे बक्षिस.

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९


आष्टी:-

दोघांपैकी एकाचा गेल्या 30 वर्षापासुन माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग होता

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 680 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग (ए.सी.एम), वय 55 वर्ष, रा. गट्टानेली, ता. धानोरा, जि. गडचिरोली व 2) रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (दलम सदस्य), वय 25 वर्ष, रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

 रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग
 दलममधील कार्यकाळ
 शासन 1992 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 1995 पर्यंत कार्यरत होता. सन 1995 मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन 1996 पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम करीत होता.
 सन 1996 ते 1998 पर्यंत पुन्हा टिपागड दलममध्ये कार्यरत होता.
 सन 1998 मध्ये माड एरीया (छ.ग.) येथे बदली होऊन सप्लाय टिममध्ये सन 2001 पर्यंत कार्यरत होता.
 सन 2001 ते 2002 पर्यंत प्रेस टिममध्ये प्रशिक्षणाकरीता कार्यरत होता.
 सन 2002 मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन माआवाद्यांसाठी कृषी कामाकरीता मौजा कोडतामर्का गाव परिसरात सन 2005 पर्यंत कार्यरत होता.श्व सन 2002 मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन माआवाद्यांसाठी कृषी कामाकरीता मौजा कोडतामर्का गाव परिसरात सन 2005 पर्यंत कार्यरत होता.
 सन 2005 ते 2010 या कालावधीत मौजा डुमनार, फरसगाव व कोडेनार या गावांमध्ये माओवाद्यांसाठी कृषीची कामे करत होता.
 सन 2010 ते आजपावेतो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे
रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग याच्यावर आजपर्यंत एकुण 12 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 05 खुन, व 01 दरोडा इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.
रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित दलममधील कार्यकाळ सन 2019 मध्ये मिलिशिया म्हणून माओवाद्यांची कामे करत होता. सन 2020 मध्ये चेतना नाट- मंच (सिएनएम) येथे सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत.
 सन 2021 मध्ये कुतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत.

■ कार्यकाळात केलेले गुन्हे, हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

□ आत्मसमर्पित होण्याची कारणे.

■ गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.

■ दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.

■ दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात.

प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात.

जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

□ वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

□ वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

■ शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

□ महाराष्ट्र शासनाने रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

□ महाराष्ट्र शासनाने रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.शासनाकडुन रमेश शामु कंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी फक्त यावर्षात 20 जहाल माओवाद्यांसह सन 2022 ते आतापर्यंत एकुण 33 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. सुजीत कुमार, प्रभारी समादेशक, 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 19, 2024

PostImage

अखेर घरमालकच निघाला रशिदच्या खुनाचा मारेकरी


अखेर घरमालकच निघाला रशिदच्या खुनाचा मारेकरी 

चार दिवसांनंतर झाला उलगडा 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी:- येथे किरायाने वास्तव्यास असलेल्या एका दीव्यांग वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली .ही घटना १५ तारखेला उघडकीस आली त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला.त्यामध्ये रशिदचा खून पोलिसांच्या माहिती प्रमाणे निष्पन्न झाले .   
 आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार मृतकाचे आपल्या नातेवाईकांना मी गावाला येणार आहे.असे सांगितले होते. दिनांक १० डिसेंबरला रशीद आणि आरोपी खुशाल कुकुडकार यांच्यामध्ये घरभाड्यवरून वाद सुरु झाला .तू घरसोडून जात आहे मला घरभाड्याचे पैसे देणार नाही तर  तू पैसे दिल्याशिवाय जाऊ नकोस त्यावरून मयत रशीद ने आरोपीच्या पत्नीवरुन काही तरी अपशब्द बोलल्यामुळे खुशाल याचे मनात खुप राग आला. त्यामुळे त्याने रशिदच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने डोक्यावर प्रहार केला.त्यांनतर त्याचे समाधान न झाल्यामुळे त्याने सत्तुर ने त्याचा गळा चिरला व तो मृत झाल्याचे पाहून त्याच्या खोलीतून बाहेर निघून रशीद च्या खोलीला बाहेरुन कुलूप ठोकले आणि याठिकाणी कोणताच प्रकार घडेलेला नाही अशा स्थितीत आरोपी वावरत होता. रशिदच्या नातेाइकांना मी स्वतः गावाकडे येणार आहे अशी माहिती दिल्यामुळे रशिद का आला नाही म्हणून वारंवार त्याच्या फोन ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे पाच दिवसांनंतर रशीद का आला नाही म्हणून त्याचे नातेवाईक नागपूर वरुन आष्टीत दाखल झाले त्यामुळेच सदर गुन्ह्याचा खुलासा झाला आष्टी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी त्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे 
या तपासात गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक लोढा , उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे , यांच्या मार्गर्शनाखाली तपाशिय अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल काळे, साहाय्यक पोलीस उपनरीक्षक सोमनाथ पवार , महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप , पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा वणवे , पोलीस शिपाई रवींद्र मेदाळे, प्रवेश राऊत , पराग राजूरकर , प्रकाश बोरकुटे , प्रताप तोगरवार , प्रमोद दुर्गे , संतोष नागुलवार तसेच त्यांचे सहकारी टीम यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 19, 2024

PostImage

परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन


परभणी घटनेच्या निषेधार्थ आष्टी येथे निषेध आंदोलन


अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:- परभणी येथे देशद्रोही समाजकंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ   बुधवार दिनांक 18.12.2024 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आष्टी येथील चौकात महिलांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले

 संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो.संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधीकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य व केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलकर्त्यांच्या कडून करण्यात आल्या
यावेळी निकीता निमसरकार, राखी मडावी,इंदिरा गोंगले,माधूरी जोडे, साहील साखरकर, ममता साव, कवडू डोर्लीकर, रेखा राजपूत, रेखा सुनतकरी, अशोक साव, यांच्या सह आष्टी येथील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते आष्टी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता


PostImage

Vaingangavarta19

Dec. 18, 2024

PostImage

आष्टी येथील एका इसमाने आपल्या शेतात केली गळफास घेऊन आत्महत्या 


आष्टी येथील एका इसमाने आपल्या शेतात केली गळफास घेऊन आत्महत्या 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

 आष्टी येथील एका इसमाने आलापल्ली मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्वताच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना आज दि.१८ डिसेंबर ला उघडकीस आली आहे 
सविस्तर वृत असे की, मृतक सुरेश कारुजी लांबाडे वय ४९ रा आष्टी हे व्यक्ती सायंकाळी सहा वाजता घरुन निघून गेले ते घरी  रात्री १० वाजेपर्यंत जेवण करण्यासाठी परत आले नाही त्यामुळे मुलाने शोध सुरू केला गावात इतरत्र शोध घेतला तेव्हा तो आढळून आला नाही त्यामुळे  शेताकडे रात्री  ११ वा जाऊन पाहिलं असता वडील  शेतातील मचाणीच्या फाट्याला धान्य बाधण्याच्या पांढऱ्या रंगाचे कापडी धाग्याने गळफास घेऊन फाशी लागले असल्याचे दिसून आले 

तेव्हा त्याने लागलीच पोलीस स्टेशन आष्टी येथे सदर घटनेची माहिती दिली लागलीच पोलीस घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आष्टी येथे पाठविला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला 
सदर व्यक्ती घरुन जाऊन 
  आपल्या शेताची 
 राखण करायला केलेल्या मचाणीच्या फाट्याला शेतातीलच धान्य बाधण्याच्या पांढऱ्या रंगाचे कापडी धाग्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ डिसेंबरला सायंकाळी ६ ते रात्रौ १० वाजताच्या दरम्यान का केली याचा तपास आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास काळे करीत आहेत 
मृतक इसमाचे नाव सुरेश कारुजी लांबाडे,वय ४९ वर्षे रा . आष्टी तालुका चामोर्शी असे आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 18, 2024

PostImage

परभणी घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको


परभणी घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको

संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी - डी. के. साखरे

मंगळवेढा :-भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक डी. के. साखरे यांनी केले.परभणी येथे देशद्रोही समाजकंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ   बुधवार दिनांक 18.12.2024 रोजी मंगळवेढा येथील शहीद किसन माने चौक (जुना बोराळे नाका )येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते मारुती (एम. के.)गायकवाड, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, विक्रम अवघडे, खंडू खंदारे, गणेश धोत्रे,मराठा आघाडीचे पोपट पडवळे,विजय शिकतोडे, सिद्धार्थ लोकरे,सागर जाधव,जनार्धन अवघडे,लक्ष्मण गायकवाड, नितीन सोनवले, विकास सोनवले,प्रदीप परकाळे,अशोक शिवशरण, प्रदीप खवतोडे,सागर जाधव, सागर खरबडे, नेताजी अवघडे, बाळासाहेब निकम, सुभाष भंडारे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना साखरे म्हणाले की,  संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो.संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधीकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य व केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलकर्त्यांच्याकडून करण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड, सिद्धार्थ लोकरे, धनाजी माने, प्रदीप परकाळे व पोपट पडवळे आदिनी आपल्या मनोगतातून परभणी घटनेचा निषेध नोंदविला. 
     यावेळी मंगळवेढा तहसील च्या नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.तर
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी जातीने उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 16, 2024

PostImage

परभणी येथील प्रकरणात कठोर कारवाई करा गडचिरोली येथील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची मागणी


परभणी येथील प्रकरणात कठोर कारवाई करा

गडचिरोली येथील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांची मागणी


गडचिरोलीः दि. 16 डिसेंबरः  परभणी येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी भारतीय संवीधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तसेच आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंषी या तरुणाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली येथील विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांनी केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या नावाने लिहिलेले निवेदन आज 16 डिसेंबर रोजी दुपारी या संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय दैने यांना सादर केले व याबाबत सविस्तर चर्चा केली.
यासोबतच गडचिरोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन आदीवासी मुलीवर झालेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयाव्दारे आरोपीला कडक शिक्षा देउन सदर मुलीला अर्थसहाय्य देण्यात यावे, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.
परभणी येथे दि. 10 डिसेंबर 2024 रोजी भारतीय संवीधानाच्या प्रतीकृतीची समाजकंटक माथेफिरुने विंटबना केली आहे. या देशद्रोही कृत्याचा तीव्र निषेध करीत हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकावर देशद्रोह कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन यातील मास्टर माईडंचा शोध घेण्यात यावा व त्याचेवर सुध्दा कारवाई करण्यात यावी. परभणी प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयील कोठडीत असतांना मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आंदोलन करणाऱ्या नागरीकांवर दाखल केलेल्या केसेस त्वरीत मागे घेण्यात याव्या व आंदोलकांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गडचिरोली तालुक्यातील एका अल्पवयीन आदीवासी मुलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार केला. या प्रकरणाचा त्वरीत निकाल लागण्याच्यादृष्टीने जलदगती न्यायालयात केस चालविण्यात यावी व आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच सदर मुलीचे आई-वडील अतिशय गरीब असल्याने तिच्या पुढील शिक्षण व संगोपणासाठी शासनाच्या वतीने किमान 50 लक्ष रुपयाचे आर्थिकसहाय्य देण्यात याव, अशीही मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, बिआरएसपीचे जिल्हा प्रमुख मिलिंद बांबोळे, कम्युनिष्ट पार्टीचे रोहिदास फुलझेले, नारायणसिंग उईके समितीच्या कुसुम अलाम, संविधान फाउंडेशनचे गौतम मेश्राम, भारतीय बौध्द महासभेचे तुलाराम राऊत, आदिवासी एम्पालाईल फेडरेशनचे भरत येरमे, अंध्दश्रंध्दा निर्मुलन समितीचे विलास निंबोरकर, माळी समाज समितीचे हरिदास कोटरंगे, प्रा. गौतम डांगे, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे  नारीशक्तीच्या जयश्री येरमे, कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष वसंत राऊत, जेष्ठ कार्यकर्ते, समशेर खान पठाण, रजनीकांत मोटघरे, नंदु वाईलकर रिपब्लिकन पक्षाचे ज्योती उंदीरवाडे , प्रदीप भैसारे, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, पुण्यवान सोरते, नरेंद्र रायपुरे, लहुजी रामटेकेे, अरविंद वाळके, रेखा तोडासे, मंजू आत्राम, विना उईके, कविता उराडे, शालीनी पेंदाम, सुनिता उसेंडी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 16, 2024

PostImage

आष्टीत घडली खुनाची घटना, रशिदचा कुणी केला खून पोलीस तपास सुरू 


आष्टीत घडली खुनाची घटना, रशिदचा कुणी केला खून पोलीस तपास सुरू 


आष्टी (प्रतिनिधी)# आष्टी येथे किरायाने वास्तव्यास असलेले रशीद अहमद शेख  ,वय ६० वर्षे याचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना दिनांक १५ ला उघडकीस आली.
सदर वृत असे की रशिदने आपल्या नातेवाईकांना चार पाच दिवसांपूर्वी दूरध्वनी द्वारे मी गावाकडे येणार अशी माहिती दिली होती.त्यांनतर चार पाच दिवस लोटूनही तो न आल्यामुळे व त्याचा फोन न लागत असल्यामुळे नातलगांना शंका येऊन ते स्वतः नागपूर येथून आष्टीत दाखल झाले व त्याचा फोटो दाखवून सदर व्यक्ती कुठे असतो अशी विचारणा केली.तेव्हा काही चौकातील लोकांनी चामोर्शी मार्गावर असलेल्या खुशाल कुकुडकर यांच्या घरी किरायाने रहात असल्याचे समजले तेव्हा ते त्याठिकाणी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावून दिसले तेव्हा खिडकी मधून डोकावून पाहले असता त्यांना आत रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला तेव्हा नातलगांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली.तेव्हा लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कुलूप तोडून आतमध्ये बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसून दुर्गंधी पसरलेली होती.त्यानंतर पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाचारण केले . त्यांनतर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी घराच्या सभोवताल फिरुन चौकशी करण्याकरिता उघडलेल्या दारामधून घरात गेले व त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही घटना चार पाच दिवसांपूर्वीची असावी असे बोलले जात आहे. सदर व्यक्तीचा खुन का करण्यात आला व  कुणी केला याचा तपास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची चमू करीत आहे. अजूनपर्यंत पूर्ण माहिती कळू शकली नाही.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 16, 2024

PostImage

 रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला लागली आग, मोठी दुर्घटना टळली.


 रेल्वे स्थानकावर असलेल्या प्रवासी शेडला लागली आग, मोठी दुर्घटना टळली.

प्रमोद झरकर उपसंपादक गड़चिरोली

 वर्धा:-  येथील मुख्य रेल्वे स्थानक संकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पॅसेंजर शेडला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना बुधवार 11 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. आगीत प्रवासी शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्राप्त माहितीनुसार, वर्धा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रवासी शेड बांधण्यात आले आहे. वर्धा- यवतमाळ रस्त्यावरील रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला. येथील तिकीट घर हे प्रवासी शेडला लागून आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास या शेडला अचानक आग लागली. त्यावेळी आवारात अनेक प्रवाशांची ये-जा सुरू होती. आग लागताच सर्वत्र पळापळ सुरू झाली. आग विझवण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. वर्धा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास वर्धा रेल्वे पोलिस करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 16, 2024

PostImage

पिकअप वाहनाने दिली दुचाकीला धडक दुचाकी स्वाराचा जागीच करुन अंत्य 


पिकअप वाहनाने दिली दुचाकीला धडक दुचाकी स्वाराचा जागीच करुन अंत्य 

जारावंडी

  जारावंडी पासून सुमारे 6 किलोमिटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.

मृत व्यक्तीचे नाव प्रकाश उसेंडी वय 42 वर्ष असून ते शिरपूर (जारावंडी) गावचे रहिवाशी होते. प्रकाश हे परिसरात नावलौकिक प्राप्त समाजसेवक होते आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे अनेकांच्या गळ्यातले ताईत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातग्रस्त पिकअप वाहन हे पेंढरी येथील एका प्रचलित व्यापाऱ्याचे असल्याचे समजते. सदर घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वेगामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

प्रकाश उसेंडी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन लहान मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकाश हे त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार होते, समोरचा तपास जारावंडी पोलीस करीत आहे


PostImage

Vaingangavarta19

Dec. 15, 2024

PostImage

शुल्लकचव्या वादातून सख्या  लहान भावानेच मोठ्या भावाला  पाठविले यमसदनी


शुल्लकचव्या वादातून सख्या  लहान भावानेच मोठ्या भावाला  पाठविले यमसदनी

छत्रपती संभाजीनगर:- घरगुती वाद विकोपाला जाऊन

छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना कुंभेफळ तालुका छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी रात्री घडली. सुनील भाऊसाहेब पवार (३४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.सुनील भाऊसाहेब पवार आणि राजू भाऊसाहेब पवार (३०) हे दोघे भाऊ कुंबेफळ येथे राहत. दोघे सख्खे भाऊ मजुरीचे काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. मात्र, अचानक त्यांच्यात कौटुंबिक वादाने कटुता आली. गुरुवारी रात्री वाद विकोपाला जाऊन राजू याने मोठा भाऊ सुनील याचा खून केला. माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे फौजदार प्रताप नवघरे हे आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी राजू पवार याला कुंभेफळ परिसरातून ताब्यात घेतले. नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करमाड पोलीस ठाण्यात सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 15, 2024

PostImage

परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर लिहित असताना अचानक झाला मृत्यू 


परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पेपर लिहित असताना अचानक झाला मृत्यू 

बीड:- वर्गात पेपर लिहिता लिहिता एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर शिक्षकांनी तातडीने त्याला दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यूने त्याला गाठले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बीएससची परीक्षा देताना परीक्षा कक्षातच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या के एस के महाविद्यालयात घडली. सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ (वय २४) असे मृत परीक्षार्थी विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा सुरू असताना अचानक हा विद्यार्थी कोसळला. त्यावेळी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला.बीड शहरातील सावरकर महाविद्यालयात सिद्धार्थ बीएससी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो दिल्ली येथे अभ्यास करत होता. परीक्षा असल्याने तो बीडमध्ये आला. आज सकाळी बीएससीची परीक्षा के एस के कॉलेजला तो परीक्षेसाठी आला होता परीक्षा देत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शिक्षकांना ही माहिती समजल्याबरोबर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलला घेऊन आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचे वडील खाजगी गाडीवर चालक आहेत. तर आई एका दुकानात काम करते. अचानक ही घटना घडल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे. शिवाय, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 14, 2024

PostImage

बेपत्ता महिलेच्या हत्येचा पोलीसांनी केला पर्दाफाश : आरोपीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल


 बेपत्ता महिलेच्या हत्येचा पोलीसांनी केला पर्दाफाश : आरोपीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल

 

 प्रतिनिधी / प्रमोद झरकर

चंद्रपूर : चिमूर पोलीस स्टेशन
हद्दीतील देवांश जनरल स्टोअर्स दुकानदार ३७ वर्षीय विवाहित महिला अरुणा अभय काकडे हया २६ नोव्हेंबर २०२४ ला नागपूर येथील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्याकरीता जावून नागपूर येथून बेपत्ता झाल्याने पो. स्टे. चिमुर येथे तिची हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

सदर हरविल्याची तक्रारी संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सपोनि बलराम झाडोकर यांनी तांत्रिक तपास करुन प्रकरण उघडकीस आणले. सदर प्रकरणी आरोपी नामे नरेश पांडुरंग डाहुले याने सदर बेपत्ता महिला अरुणा अभय काकडे हिला नागपूर येथे निवानिशी ठार करुन तिचे प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

यातील बेपत्ता महिला अरुणा अभय काकडे हिचा शोधासाठी सपोनि बलराम झाडोकर यांनी स्वतःहून सातत्याने अतिपरिश्रम घेवुन केलेल्या कौशल्यपूर्ण तपास कार्यप्रणालीमुळे सदर गंभीर संवेदनशील प्रकरण उघडकीस आल्याने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी सपोनि बलराम झाडोकर व पथकास रुपये ३५ हजार रोख बक्षिस देण्याचे जाहीर केले असुन यापुढे चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतःहून अशा प्रकारे स्वतः दखल घेवुन प्रकरणे उघडकीस आणल्यास त्यांना सुध्दा अशाच प्रकारे रोख बक्षिस देवून प्रोत्साहित करण्यात येईल असे आवाहन केले आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन चिमूर येथे कलम १०३, १३७, १४० (१), २३८ भारतीय न्याय संहिता -२०२३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस


PostImage

Vaingangavarta19

Dec. 14, 2024

PostImage

अबुझमाड जंगलात सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये चकमक : ७ नक्षल्यांचा कंठस्नान


अबुझमाड जंगलात सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये
चकमक : ७ नक्षल्यांचा कंठस्नान


प्रतिनिधी /

 गडचिरोली : छत्तीसगडच्या नारायणपूर-दंतेवाडा सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या घनदाट जंगलात सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यात सात नक्षल्यांना ठार करण्यात यश आले. गुरुवार १२ डिसेंबर ला सकाळी हा थरार घडला.

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे. एकीकडे गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांची नाकाबंदी केली आहे तर दुसरीकडे छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सध्या नक्षल्यांची धावाधाव सुरू आहे.

छत्तीसगड राज्यातील अबुझमाडच्या जंगलातील नारायणपूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात काही नक्षली दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्याच्या राखीव पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम राबवली. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर गुरुवारी सकाळी ६ वाजता नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यास जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दुपारी १ वाजेपर्यंत चकमक सुरू होती. त्यानंतर नक्षल्यांनी तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता सात माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सर्व गणवेशात होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 13, 2024

PostImage

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना भारतात राहण्याचा अधिकार  नाही :-आनंद लोंढे


ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना भारतात राहण्याचा अधिकार  नाही :-आनंद लोंढे

 


 पंढरपूर :- ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना भारत देशात राहण्याचा कसलाही अधिकार नाही, असे रोख ठोक उदगार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे यांनी काढले.
 परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे निषेध नोंदवताना लोंढे बोलत होते.
 पुढे बोलताना लोंढे म्हणाले की, भारताच्या संविधानाचे रक्षण करणे, जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना या देशात राहण्याचा कसलाही अधिकार नाही. परभणी येथे घडलेल्या घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे असून या पाठीमागील मस्तरमाईंड कोण ? याचाही तपास होणे आवश्यक आहे.
तसेच सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी जनतेवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करून भीम अनुयायावर दाखल केलेले खोटे गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत असे आवाहनही लोंढे यांनी केले.
 यावेळी दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक डी. के. साखरे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके,रिपब्लिकन चळवळीतील आघाडीच्या नेत्या पद्मिनी शेवडे,प्रा. हणमंत आढाव, दशरथ पाटोळे, सोमा पाटोळे, कपिल पाटोळे व धनाजी भुसनर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 13, 2024

PostImage

पोलिस भुसुरुंग वाहण्याच्या धडकेत दुचाकीस्वार १ ठार तर १  गंभीर जखमी 


पोलिस भुसुरुंग वाहण्याच्या धडकेत दुचाकीस्वार १ ठार तर १  गंभीर जखमी 

विस दिवसाची चिमुकली वडीलाच्या प्रेमास मुकली 

आष्टी , अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आष्टी - आलापल्ली महामार्गावरील चौडमपल्ली लगामच्या मध्ये दिनांक १३ डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अहेरी कडून येत असणारा वाहन क्रमांक (एम पी वि २८५) पोलिस भुसुरूंग वाहण्याच्या धडकेत आष्टी कडून लगामकडे जाणाऱ्या एम एच ३३ एक्स (३३०७) दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली 
गणेश बाजीराव मडावी वय वर्षे ३३ रा. लगाम असे मृतकाचे नांव असून रवी हनमंतू मडावी वय वर्षे ३८ रा. लगाम असे गंभीर इसमाचे नांव आहे त्याला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रुग्णालयात रेफर करण्यात आले अधिक तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भाऊराव वनकर, पोशी श्रीमनवार व पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत मृतक हा विवाहीत असून २० दिवसाची मुलगी आहे व पत्नी आसा बराच मोठा आप्त परिवार आहे या अपघातात गणेशचा मृत्यू झाल्याने २० दिवसाची मुलगी वडीलावीना पोरकी झाली आहे हे मात्र विशेष.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 9, 2024

PostImage

. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान अणुबॉम्बपेक्षाही स्फ़ोटक ---प्रा. डी. के. साखरे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान अणुबॉम्बपेक्षाही स्फ़ोटक ---प्रा. डी. के. साखरे

पंढरपूर :-भारतीय राज्यघटनेचे निर्माते, महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान अणुबॉम्बपेक्षाही स्फ़ोटक असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे  संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. के. साखरे यांनी केले.
    शुक्रवार दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूर येथे आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते.
      पुढे बोलताना साखरे म्हणाले की   
,संपूर्ण जगाचा सत्यानाश करण्याची ताकद अणुबॉम्बमध्ये आहे तर नवीन जग निर्माण करण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानात आहे.बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. जगामध्ये फक्त विज्ञान सत्य असून विज्ञानशिवाय जे कांही आहे ते सारे अज्ञान आहे.मनुष्यमात्राला पुनःर्जन्म नाही परंतु या देशाचे संविधान बदलण्यासाठी किंवा लिहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच पुनःर्जन्म घ्यावा लागेल हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.

बाबासाहेबांमुळे आम्हाला हवे ते मिळाले -ऍड. सुहास माळवे
 
प्रारंभी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव ऍड. सुहास माळवे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी बोलताना ऍड सुहास माळवे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समग्र मानव जातीचे नेते होते. बाबासाहेबांच्या मुळे आम्हाला हवे ते सर्व कांही मिळाले.यावेळी आर. पी. आय. चे जेष्ठ नेते अप्पासाहेब जाधव, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष पवार, मध्यवर्तीचे अध्यक्ष अमित कसबे, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे व आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या नेत्या वैशाली चंदनशिवे, मायाताई खरे, दैनिक अचूक निदानचे पंढरपूर तालुका प्रतिनिधी हणमंत आढाव, वंचितचे नेते राजाभाऊ शिंदे, पूजा चीतारे, बिरबल बाबर, गोरख कांबळे यांच्यासह मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


PostImage

Vaingangavarta19

Dec. 9, 2024

PostImage

विकास मडावी यांची गोंडवाना विद्यापीठ फुटबॉल संघात निवड


विकास मडावी यांची गोंडवाना विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

अशोक खंडारे/वैनगंगा वार्ता १९ /मुख्य संपादक 


शहीद बिरसा मुंडा महाविद्यालय लगाम येथील बीएससी फायनल मधील विद्यार्थी विकास विठ्ठल मडावी याची गोंडवाना विद्यापीठ फुटबॉल मुलाचा संघामध्ये निवड झाली असून दिनांक 16 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान पारुळ विद्यापीठ वरोडा गुजरात येथे होणाऱ्या वेस्ट झोन फुटबॉल स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या संघाचा प्रतिनिधित्व करणार असून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात तो नियमित फुटबॉल या खेळाचा सराव करीत असतो त्याच्यासोबत विवेक गोगले व यश म्हशाखेत्री यांची पण निवड  विद्यापीठ च्या फुटबॉल संघामध्ये झाली आहे वरील फुटबॉल खेळाडू विद्यार्थ्यांना वन विभाग निवृत्त अधिकारी श्री विठ्ठल मडावी श्री सुशील अवरमोल व डॉ. श्याम कोरडे सरांचा मार्गदर्शन लाभले असून वरील खेळाडू 14 डिसेंबर रोजी गुजरात करिता रवाना होत आहे निवड झालेल्या फुटबॉल खेळाडूचे आष्टी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे


PostImage

Vaingangavarta19

Nov. 7, 2024

PostImage

येणापूर च्या नाल्याजवळ एका इसमाला चक्क जाळले


येणापूर च्या नाल्याजवळ एका इसमाला चक्क जाळले 

आष्टी:-
पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाला येणापूर नाल्या शेजारी चक्क जाळून मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
दि.सहा नोव्हेंबर दुपारच्या दोन वाजताचे सुमारास ही घटना घडली असून मृतकाचे नाव मनोज आनंदराव मेकर्तीवार वय ३५ रा. सोमणपल्ली ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे आहे 
आष्टी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून  मृतदेहाची ओळख पटवली लागलीच संशयित दोन तरुणांना अटक करण्यात आली
राहुल गुंजनकर रा.चंद्रपूर व श्रीनिवास मेकर्तीवार रा.सोमणपल्ली असे आरोपी 
 असून त्याचा खुन का करण्यात आला याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोलीस उपनिरीक्षक मानकर व कर्मचारी करीत आहेत मृतकास का मारले प्रश्न अनूत्तरीत आहे


PostImage

Vaingangavarta19

Nov. 4, 2024

PostImage

अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला अत्याचार


अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला अत्याचार 

आरोपी तरुणा विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


अशोक वासुदेव खंडारे वैनगंगा वार्ता १९ 


आरमोरी:-
फेसबुक वर ओळख करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची घटना 3 नोव्हेंबरला उघडकीस आली आहे. पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला बेळ्या ठोकल्या आहेत. सूजीत कैलास गेडाम वय 22 वर्षे राहणार मोहाडी तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 17 वर्षीय पीडित युवती सोबत सुजित गेडामची काही महिन्या पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली एकमेकांना फेसबुकच्या माध्यमातून मेसेज करणे सुरू झाले. दरम्यान याचे रूपांतर प्रेमात झाले एकमेकांची फेसबुक वर ओळख झाली होती अशातच दोघांनी परस्पर एकमेकांना भेटण्याचा निश्चय केला. परस्पर एकमेकांना भेटल्यानंतर सुजित गेडामने युवतीला शरीर सुखाची मागणी करून युवतीवर अत्याचार केला. झालेल्या प्रकारामुळे युवती घाबरुन जावून सोबत
घडलेला सर्व प्रकार युवतीने आपल्या स्वगावी जावून कुटुंबीयांना सांगितला. असता कुटुंबीयांनी लगेच आरमोरी पोलीस ठाणे गाठून सुजित गेडाम विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड न्याय संहिता 64 (1)64(2)(1),64(2)87 137 (२) अन्वये गुन्हा दाखल करून 31 ऑक्टोबरला आरोपी सूचित गेडाम ला पोलिसांनी त्याच्या स्वगावातून ताब्यात घेतले आणि न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले तपास करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Nov. 4, 2024

PostImage

शेतशिवारा जवळील तलावात बुडून इसमाचा झाला करुन अंत


शेतशिवारा जवळील तलावात बुडून इसमाचा झाला करुन अंत


आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील घटना.


प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गडचिरोली

आरमोरी:-
 शेतशीवाराजवळील तलावात बुडून इसमाचा करुन अंत झाल्याची घटना आरमोरी तालुक्यातील लोहारा येथे  दिनांक 4- नोव्हेंबर-2024 सोमवार रोजी 11.30 वाजताच्या दरम्यान घडली

 सविस्तर वृत्त असे की लोहारा येथील मृतक वामन बाजीराव कुमरे वय 45 वर्ष हे आपल्या मुलासोबत नामे सुमित वामन कुमरे वय 17 वर्षे याला सोबत घेऊन शेतातील धान्य कापले असल्याने ते पाहण्याकरिता शेताकडे गेले होते . मात्र ते शेतामध्ये गेले असताना त्यांना शौचास लागल्याने ते शेतापासून जवळच असलेल्या खोलबोडी तलावात गेले मात्र  तलावातील काठावर गेले असता त्यांना चक्कर मिर्गी आल्याने ते तलावातील पाण्यामध्ये पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वामन कुंमरे यांचा मुलगा शेतामध्ये त्यांची वाट पाहत होता. वडिलांना शेताकडे येण्याकरिता अति जास्त वेळ झाला म्हणून मुलगा सुमित तलाव कडे गेला असता वामन कुमरे पडलेल्या अवस्थेमध्ये दिसले.
लगेच मुलाने आरडाओरडा  करून घटनेची माहिती गावातील लोकांना दिली घटनास्थळी गावातील लोकांनी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली लगेच पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. आरमोरी पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होऊन मृताचा पंचनामा करुन  मृतदेह शवविच्छेदनाकरिता करिता आरमोरी येथे पाठवीण्यात आला. घटनेचा तपास एपीआय कामतूरे, पीएसआय विजय चलाख हेड कॉन्स्टेबल पिल्लेवान करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 27, 2024

PostImage

अति प्रेमभराने लुप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या नादात स्वतःहला लावला गळफास 


अति प्रेमभराने लुप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या नादात स्वतःहला लावला गळफास 

 

 सिरोंचा : 
अती प्रेमाने लुप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या मृत्यू झाला अशी भावनिक माहिती मिळताच त्याने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा स़पवली
कोटा पोचमपल्ली येथे घरगुती भांडणातून पतीने २३ ऑक्टोबरच्या रात्री झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, विवाहित महिलेचे गावातीलच एका युवकाशी विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याच्या संशयातून पतीने महिलेची हत्या केली. दरम्यान, महिलेच्या प्रियकराचाही मृतदेह अहेरी तालुक्याच्या आलापल्लीजवळ २६ ऑक्टोबर रोजी सकाळी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला


लिंगय्या गट्ठ येलकुच्ची (३२, रा. कोटा पोचमपल्ल) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. समय्या मुतय्या बोल्ले याला पत्नी पद्मा हिचे समय्या बोल्ले गावातीलच लिंगय्या येलकुच्ची याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये भांडण होत होते. गत आठवड्यापासून दोघांमध्ये खटके उडत होते. २३ ऑक्टोबर रोजी पद्मा हिचा धारदार शस्त्राने खून करून पसार झाला होता. या घटनेमुळे प्रियकर लिंगय्या गट्ठ येलकुच्ची याच्यावर मानसिक आघात झाला. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले.
ह्या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत लवकरच सत्यता समोर येणार आहे


PostImage

Vaingangavarta19

Oct. 27, 2024

PostImage

प्रेमाची भाषा बोलून अल्पवयीन मुलीशी केले शारिरीक संबंध, मुलगी राहीली गर्भवती व फुटले बिंग 


प्रेमाची भाषा बोलून अल्पवयीन मुलीशी केले शारिरीक संबंध, मुलगी राहीली गर्भवती व फुटले बिंग 

शारीरिक संबंध करणाऱ्या इंजेवारी येथील युवकास आरमोरी पोलिसांनी केली अटक

आरमोरीः
प्रेमाची आस दाखवून एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी युवकास आरमोरी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची घटना दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घडली. विनोद घनश्याम पात्रीकर वय (२०) रा. इंजेवारी ता. आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी पिडीतेची आई ही दि २२ ऑक्टोबर २०२४ रोजी काम करुन घरी आल्यावर त्यांना त्यांची मुलगी पिडीता ही घरी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेवुनही ती मिळून नआल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी आली असता आरमोरी पोलीसांनी तिच्या लोकेशन बाबत माहीती काढुन तिचा त्वरीत शोध घेतला. मुलगी मिळुन आल्याने कोणतीही तक्रार करायची नाही असे लेखी दिले व रिपोर्ट न देता मुलीला ताब्यात घेवुन घरी गेली.

त्यानंतर दि. २३ ऑक्टोबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्याने पिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले. पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.यामुळे पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाण्यात येवून तोंडी रिपोर्ट वरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (नं, भा. द. वी. सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद केली व दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

पीडितेला पुढील वैद्यकीय उपचारासाठी गडचिरोली येथील महीला व बालरुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे 

आरमोरी तालुक्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची वाढली संख्या

आरमोरी हे विद्येचे माहेरघर असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आरमोरी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करीत असल्याने आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो खालील गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. याकरीता शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 25, 2024

PostImage

गडचिरोली  जिल्ह्यात कामगार म्हणून आलेल्या इसमास रानटी हत्तीने चिरडले.


गडचिरोली  जिल्ह्यात कामगार म्हणून आलेल्या इसमास रानटी हत्तीने चिरडले.


सेल्फीचा नाद जीवाच्या अलंगट आला 


गडचिरोली, दि. 24 : रानटी हत्ती परिसरात आल्याने त्यासोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जीवावर बेतला. रानटी टस्कर हत्तीने हल्ला करीत मजुराला चिरडून जागीच ठार केल्याची घटना गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आबापूर जंगलामध्ये घडली. श्रीकांत रामचंद्र सतरे, रा. नवेगाव (भु), ता. मूल, जि. चंद्रपूर असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापूर्वी ओडिशा राज्यातून रानटी हत्तीचा कळप दाखल झाला. जिल्ह्यातील विवध भागात कळपाने मार्गक्रमण करीत शेतपिकांची नासाडी केली तर विविध घटनेत नागरिकांचा हत्तीच्या हल्यात मृत्यू झाला.श्रीकांत सतरे हा आपल्या काही सोबत्यांसह गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता आला होता. दरम्यान गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच काम सुरु होते. 23 ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला होता. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली असता तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते. हत्ती दूरवर असताना श्रीकांत हा हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असताना हत्तीने हल्ला करुन त्याला चिरडले. घटनेच्या वेळी अन्य दोघांनी तेथून पळ काढत आपला जीव कसाबसा वाचविला. जिल्ह्यात आणखी एकाचा रानटी हत्तीच्या हल्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून रानटी हत्तीच्या जवळ जावू नये, सेल्फी च नाद करु नये, हत्ती असलेल्या परिसरात प्रवेश करु नये अशा सूचना वारंवार वनविभागामार्फत देण्यात येत आहेत. तरी मात्र काही नागरिक हत्तींना बघण्याकरिता जंगल परिसरात जात असल्याने अशा घटना समोर येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 22, 2024

PostImage

गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळींनाच द्यावी 


गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळींनाच द्यावी 

महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली मागणी 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली:-
भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनाच महायुतीच्या शिवसेना,राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी आज पत्रकार परिषद मधून करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत
डॉ. होळी यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक हे नाराज
झाले असून त्यांच्या मदतीला मित्र पक्ष धावून आल्याने
राजकीय समीकरण बदलत आहेत.

२५ ऑक्टोंबरला डॉ. देवराव होळी हे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात २५ हजार कार्यकर्ते येणार असल्याचा दावा महायुतीतील नेत्यांनी केला आहे.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे. त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्यांनाच आमचा पाठिंबा असून भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश  बेलसरे, उपजिल्हाप्रमुख हेमंत  जंबेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, प स उपसभापती विलास दशमुखे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथजी बुरांडे, चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई, आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 22, 2024

PostImage

माते तु झाली ग वैरीणी,माझी दया का आली नाही, नवजात अर्भकाचा टाहो 


माते तु झाली ग वैरीणी,माझी दया का आली नाही, नवजात अर्भकाचा टाहो 

 

 

गडचिरोली , 
माते तु झाली ग वैरीणी माझी दया का आली नाही असा टाहो नवजात अर्भकाचा लोकांना ऐकू आला त्यामुळे नवजात अर्भक फेकल्याची घटना उघडकीस आली आहे 
सदर घटना गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या खरपूंडी येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरपूंडी ते आकरटोली कडे जाणाऱ्या कच्चा व सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याच्या बाजुला कचऱ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने नर जातीचे जिवंत अर्भक फेकूण दिले. याबाबत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला  कळताच त्यांनी गावातील व्यक्तींना माहिती देत गडचिरोली पोलीसांना कळविले. पोलीसांनी घटनास्थळ गाठून अर्भक ताब्यात घेत महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. सदर अर्भक हे पुरुष जातीचे असुन कोणीतरी आपले पाप लपविण्यासाठी हा लाजिरवाणा प्रकार केला असून पोलीसांकडून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. अद्याप बाळाला जन्म दिलेल्या मातेचा थांगपत्ता लागलेला नाही
मात्र माता एवढी वैरीणी कशी होऊ शकते हा यक्ष प्रश्न निर्माण होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

Oct. 22, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी  पाच नक्षल्यांचा केला खात्मा


गडचिरोली पोलीसांनी  पाच नक्षल्यांचा केला खात्मा

अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या दौऱ्या दरम्यानची घटना,

प्रमोद झरकर उपसंपदक गड़चिरोली वैनगंगा वार्ता १९

भामरागड; (गडचिरोली)
तालुक्याला लागून छत्तीसगड राज्य सीमेवरील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर्शी गाव जंगल परिसरात पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान राबवितांना पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांनी यश आले आहे.

 

सदरच्या चकमकीत एक सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहिती आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असून चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे विशेष!

कोपर्शी गाव जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणा द्वारे प्राप्त झाली होती. त्यावरून (ता. २१ ऑक्टोंबर) सोमवारी पोलिसांच्या नक्षल शोध अभियान पथकाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत असतांना दुपारी एक वाजता दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलीस जवानांनी नक्षल्यांविरुद्ध चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. विधानसभा निवडणूक जाहीर पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा इरादा असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे पोलिसांकडून नक्षल्यांचा हातापती मनसुबा हाणून पाडण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे सकाळपासूनच भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत भरपूर प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांना पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. चकामकीनंतर पोलिसांकडून परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आला असून मृत  ओळख पाठविली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 19, 2024

PostImage

लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरावर झाली निवड


लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरावर झाली निवड

अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:- लिटिल हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली आहे 
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरिय मैदानी स्पर्धेत तन्मय चंद्रमणी फुलझेले या विद्यार्थ्यानी 14 वर्षे वयोगटातील गोळाफेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत रजत पदक पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे .
तन्मय चंद्रमणी फुलझले या    विद्यार्थ्यानी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव रमेश आरे, मुख्याध्यापक  कृष्णमुर्ती गादे, क्रीडा शिक्षक नितेश पुंगाटी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 19, 2024

PostImage

महिला पोलीस शिपाई विवाहित राहुनही, केलं दुसरे लग्न पोलिसांनी केला गुन्हा दाखल.


महिला पोलीस शिपाई विवाहित राहुनही, केलं दुसरे लग्न पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

 सांगली:- 
येथे पोलिस महिला पोलीस हिने विवाहित राहुनही दुसरे लग्न केले हि खळबळजन घटना उघडकीस आली आहे 
पोलीस महिला शिपाई महिलेने पहिले लग्न लपवून ठेवत चक्क दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वंदना महेश कांबळे वय 39, रा. इनाम धामणी, ता. मिरज या महिला विरोधात सांगली ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्या विरोधात पती महेश लक्ष्मण कांबळे वय 36 वर्ष, रा. आष्टा यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंदना ही सांगली पोलिस विभागात कार्यरत आहे. वंदना कांबळे सह जनाबाई चंद्राप्पा कांबळे वय 60 वर्ष, राजशेखर चंद्राप्पा कांबळे वय 42 वर्ष, उषा शंकर माळी वय 40 वर्ष, सर्व रा. इनाम धामणी यांच्यावरही तरुणाची फसवून केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कांबळे हे आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कांबळे हे आष्टा येथे मजुरीचे काम करतात. त्यांचे लग्न वंदना बरोबर 22 जून 2022 रोजी झाले होते. लग्नानंतर एका आठवड्यात म्हणजे 30 जून 2022 रोजी ती पतीला काही न सांगता आपल्या माहेरी इनाम धामणीला निघून गेली. त्यानंतर पती महेश यांचे मामा सुहास पठाणे व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन महेश हे वैवाहिक संबंध ठेवण्यास पात्र नाहीत अशी तक्रार केली.

मी नांदण्यास त्यांच्याकडे जाणार नाही. महेश व त्यांच्या कुटुंबाने माझी फसवणूक केली, त्याबद्दल 9 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली. पैसे न दिल्यास खटल्यात अडकविण्याची धमकी दिली. यादरम्यान, वंदना, जनाबाई, राजशेखर व उषा यांनी महेशच्या घरी माणसे पाठवून दिली. महेशच्या कुटुंबातील माणसांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.

दरम्यान, महेश यांनी न्यायालयात तक्रार केली की, वंदना हिच्या आरोपांमुळे आपल्या लौकिकास बाधा पोहोचली आहे. वंदना विषयी चौकशी केली असता तिचा पहिला विवाह सांगलीतील संजय राजाराम शिंदे रा. वखारभाग यांच्याशी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिने आपली फसवणूक केली आहे. पोलिसांनी वंदना व अन्य तिघा संशयितां विरोधात गुन्हे दाखल केले.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 16, 2024

PostImage

आमोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या धडकेत ग्रामसेवक  ठार


आमोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या धडकेत ग्रामसेवक  ठार


अहेरी; (गडचिरोली)

तालुक्यातील आलापल्ली वळणावर दोन दुचाकीच्या सामोरासमोर झालेल्या जबर धडकेत रघुनाथ तुगे मुळमा, (वय ३८ वर्ष) रा कुकामेट्टा, ता. भामरागड यांचा उपचारार्थ रुग्णालयात हलवितांना मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने पंचायत समिती प्रशासनात शोककळा परतली आहे.रघुनाथ मुळमा हे एटापल्ली तालुक्यातील घोडसुर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते, ते (ता.१५ ऑक्टोंबर) मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एटापल्ली येथून स्वतःच्या दुचाकीवरून भामरागडच्या दिशेने जात होते, त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीत समोरासमोर भीषण धडक झाली, यात रघुनाथ मुळमा याच्या छाती व डोक्याला जबर मार लागला होता, त्यांना नागरिकांकडून उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. चंद्रपूरला जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे.रघुनाथ मुळमा यांच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणी केली जाऊन अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाहिकांना सुपूर्द करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास अहेरी पोलिसांकडून केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 15, 2024

PostImage

चुलत मामाने केला भास्याचा घात मात्र उमरखेड पोलीसांनी अवघ्या बारा तासात  खुनाच्या आरोपीला केले जेरबंद


चुलत मामाने केला भास्याचा घात मात्र उमरखेड पोलीसांनी अवघ्या बारा तासात  खुनाच्या आरोपीला केले जेरबंद 


उमरखेड:- . चुलत मामाने केला भास्याचा घात मात्र पोलीसांनी तात्काळ शोध घेत अवघ्या बारा तासात आरोपी मामास जेरबंद केले आहे 
दि. १२ ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे
तक्रारदार रतेराव अप्पाराव सोळंके वय ७० वर्ष धंदा सेवानिवृत्त कर्मचारी रा. महागाव रोड जि. प. कॉलनी उमरखेड यांनी तक्रार दिली की, त्यांचा पुतण्या मृतक सुमीत प्रभाकर सोळंके वय २३ वर्ष रा. जिल्हा परिषद कॉलनी महागाव रोड उमरखेड हा दि. १२/१०/२०२४ रोजी चे सकाळी ०९:०० वा.चे दरम्यान हा कामा निमीत्ताने नेहमी प्रमाणे घराबाहेर गेला व सायंकाळी उशीरापर्यंत तो घरी परत आला नाही म्हणुन दिनांक १३/१०/२०२४ रोजी पोलीस स्टेशन येथे तो हरविल्याबाबत तक्रार दिली त्यावरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे हरविल्याची क्र.५७/२०२४ दाखल करून शोध सुरू केला.दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास माहीती मिळाली की, सुमित हा चुरमुरा शेत शिवारातील जंगलामध्ये मृत अवस्थेत पडुन आहे. लगेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता चुरमुरा फाट्यापासुन चुरमुरा फुलसावंगी रोडवर रोड पासुन सुमारे १०० मीटर अंतरावर जंगलात मृतक सुमीत प्रभाकर सोळंके वय २३ वर्ष जिल्हा परीषद कॉलणी उमरखेड याचे प्रेत रक्ताने माखलेले दिसुन आले त्याचा चेहरा कपडे व शरीरयष्टीवरुन ते प्रेत सुमीतचे असल्याचे खात्री झाली. त्याच्या मानेवर व गळ्यावर कापल्याच्या जखमा दिसल्या.

कोणीतरी अज्ञात आरोपीने मृतकचा खुन केल्याचे दिसत असल्याने तक्रारदार रतेराव अप्पाराव सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र.६८८/२०२४ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतला.

गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता  अपर पोलीस अधीक्षक  पियुष जगताप यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आरोपीने केलेल्या खुनाची माहिती पाहता आरोपी शोध बाबत महत्वपूर्ण सुचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरखेड  हनुमंत गायकवाड  व पोलीस स्टेशन उमरखेड पो. नि. पांचाळ  यांच्या आदेशाने वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपी च्या शोध साठी रवाणा करण्यात आल्या. स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे यांचे पथक तपास करीत असतांना मृतक हा त्याचा चुलत मामा संदीप अवधुत जगताप रा. नेर ता. माहूर याच्या दुचाकीवरून  बसुन जातांना दिसल्याने त्याच्यावर संशय बळावल्याने आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक टीम नेर ता. माहूर येथे रवाणा केली.

आरोपी हा मृतका च्या अंतविधीसाठी आला आहे अशी माहिती मिळाल्याने आरोपीला महागाव रोडवरून ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारणा केली असता आधी त्याने उडवा उडविची उत्तरे दिली परंतु विश्वासात घेऊन विचारणा केली असता आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीला गुन्हात अटक करण्यात आली आहे.

आरोपी याने मृतकला पैशाच्या वादातुन धारदार शस्त्राने गळा चिरुन खुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असुन अधिक तपास सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

Oct. 15, 2024

PostImage

जन्मदात्या बापानेच तुझ्या आईला मारुन टाकतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर  करायचा बलात्कार 


जन्मदात्या बापानेच तुझ्या आईला मारुन टाकतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर  करायचा बलात्कार 


 तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल

 


नागपूर (Nagpur): दारुड्या बापाने सख्ख्या १४ वर्षीय मुलीला तुझ्या आईला जीवे मारुण टाकतो अशी धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या तीन महिन्यांपासून ती मुलगी बापाचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. शेवटी आईला प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी किसन (बदललेले नाव) हा बेरोजगार असून पत्नी, मुलगी आणि मुलासह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गेल्या चार वर्षांपासून बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. किसन कामाला जात नसल्यामुळे पत्नी घराबाहेर पडली. ती खासगी काम करुन संसाराचा गाडा हाकत आहे. मुलगी १४ वर्षाची असून ती नवव्या वर्गात तर मुलगा पाचवीत आहे. दारुड्या किसनाची गेल्या काही दिवसांपासून आपल्या सख्ख्या मुलीवर वाईट नजर होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तिला बाहुपाशात घेऊन अश्लील चाळे करीत होता. तू आता मोठी झाली आहेस, म्हणून मी तुझा लाड करीत आहे. असे सांगून तो वारंवार तिच्याशी लगट करीत होता. मुलीने बापाच्या या घाणरेड्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी आंघोळ करुन बाहेर आल्यानंतर तिला  त्याच्यासमोरच कपडे बदलण्याची सक्ती करीत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी नातेवाईकाकडे धार्मिक समारंभासाठी गेली असताना मध्यरात्रीनंतर झोपेत असलेल्या मुलीशी बापाने अश्लील कृत्य केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला बापाने मारहाण केली. त्यानंतर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आईला जीवे मारण्याची धमकी -

पत्नी कामावर गेल्यानंतर किसन हा मुलाला खेळायला बाहेर पाठवायचा. त्यानंतर मुलीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. ती अनेकदा त्याला नकार द्यायची. त्यानंतर तो शिक्षण बंद करण्याची धमकी द्यायचा. तसेच आईला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी घाबरुन त्याला संबंधासाठी होकार द्यायची. शिक्षण बंद आणि आईच्या जीवाला धोका असल्यामुळे झालेला प्रकार ती आईला सांगत नव्हती.

नातेवाईकांनी दिली हिम्मत

गेल्या आठवड्यात आई कामावरुन लवकर घरी आल्यानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगून रडायला लागली. आईने तिची आस्थेने विचारपूस केल्यानंतर वडिलांनी नुकताच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीला विचारणा केली. त्याने कबुली दिली आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने काही नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी हिम्मत दिल्यामुळे ती मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 14, 2024

PostImage

वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात चक्क  बिबट्याने घरात शिरुन महिलेवर केला हल्ला


वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात चक्क  बिबट्याने घरात शिरुन महिलेवर केला हल्ला

चंद्रपूर :- . वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात आता चक्क घरात शिरून बिबट्याने महिलेस जखमी केले असल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे काल शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याने चक्क घरात शिरून हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. वंदना परशुराम निमगडे वय ४८, रा. शिवापूर चक, असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मूल तालुक्यातील मौजा- शिवापूर चक येथे परशुराम आबाजी निमगडे आपल्या कुटुंबीयासह राहतात. घराला लागूनच बगिचा तसेच काही अंतरावर बफर क्षेत्राचे जंगल आहे. निमगडे यांचे कुटुंबीय रात्री झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून वंदना परशुराम निमगडेवर हल्ला केला. काही अंतरावर असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला बघून भुंकण्याचा आवाज केल्याने निमगडे कुटुंबीय जागे झाले. दरम्यान,बिबटया वंदनावर हल्ला करीत असल्याचे दृश्य बघुन इतरांनी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने बिबट पळुन गेला. मात्र, बिबट्याच्या हल्यात वंदना निमगडे ही जखमी झाली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी वंदना निमगडे हिला मूल येथील उपजिल्हा रूग्णलयात उपचारार्थ दाखल केले. वनविभागाने पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.

मुल तालुका हा बल्लारपूर मतदार संघात येतो. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असल्याने चक्क वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातच वन्यप्राण्यांची एवढी दहशत निर्माण झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वनमंत्र्यांनी विधानसभा क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 14, 2024

PostImage

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती- खोब्रागडे   


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती- खोब्रागडे   

 

 


    गोकुळनगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न


गडचिरोली -डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती होती. या धम्मक्रांतीमुळे दलितांच्या जीवनात नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. धम्मक्रांतीची हि पताका अधिक डौलाने फडकविण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत  डॉ प्रेमकुमार  खोब्रागडें   यांनी केले.   
    सम्यक समाज समिती, विशाखा महिला मंडळ व सम्यक ज्येष्ठ नागरिक समितीच्या संयुक्त विद्यमाने येथील गोकुळनगर येथील सम्यक बुद्ध विहाराचे प्रांगणात आयोजित धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 
   सम्यक समाज समितीचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, डॉ. खुशाल दुर्गे, माली समाज संघटनेचे हरिदास कोटरंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कवडूजी उंदीरवाडे, विशाखा महिला मंडळाच्या चंद्रकला  टेम्भूर्णे प्रामुख्याने उपस्थित होते. 
   बाबासाहेबानी माणसाला माणुसकीची जाणीव करून दिली. त्यांच्यात स्वाभिमान जागृत करून बुद्धाचा नवा मार्ग दिला आणि मूकनायकाला प्रबुद्ध भारतात रूपांतरित केले . त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे आणि धम्माच्या या दिशेनेच मानवी समूहाचे कल्याण होणार आहे असेही डॉ. खोब्रागडे याप्रसंगी म्हणाले आणि धम्म प्रचाराचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन केले. 
   रोहिदास राऊत म्हणाले बुद्धाचा धम्म आज सर्व जगात पोहोचला आहे. धम्म मार्गाचे अनुसरण देश विदेशात केल्या जात आहे हि बौद्धांसाठी अत्यंत अभिमानाची बाब  आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती आज सर्व मानव जातीसाठी उपकारक झाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन हे बाबासाहेबानी केलेले अलौकिक कार्य आहे आणि त्यामुळे  दलितांच्या जीवनात झालेले परिवर्तन ही अत्यंत ऐतिहासिक बाब आहे.
अन्य मान्यवर पाहुण्यांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मेश्राम यांनी केले. संचालन नमिता वाघाडे यांनी तर आभार प्रदर्शनअश्विनी  साखरे यांनी  केले. कार्यक्रमाला बौद्ध बांधव व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   प्रारंभी पंचशील ध्वजारोहण तथा गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमान वंदन करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 13, 2024

PostImage

तलावात नेले देवी विसर्जनाला मात्र खड्ड्यात पडून 3 तरुणांना झाली जलसमाधी 


तलावात नेले देवी विसर्जनाला मात्र खड्ड्यात पडून 3 तरुणांना झाली जलसमाधी 

 

गोंदिया : देवी विसर्जन दरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथील संकुलात शनिवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली.

आशीष फागुलाल दमाहे वय, 22 वर्ष, अंकेश फागुलाल दमाहे वय, 19 वर्ष, यश गंगाधर हिरापुरे वय, 19 वर्ष तिघे रा. सावरी ता. गोंदिया असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावातील तलावात रस्त्याच्या कामासाठी मे 2024 मध्ये खोदण्यात आलेल्या खड्ड्यात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तीन तरुणांचा तोल जाऊन खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सावरी येथे घडली.

12 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री 3 तास तलावात मृतदेह शोधून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आणि दुसरा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आणि एक उपचारासाठी घेवून जात असताना तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.

शनिवारी सावरी गावातील इतर रहिवासी दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते. अंतिम टप्प्यात सावरी टोला येथील तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावातील 9 तरुण देवीची मूर्ती घेऊन तलावाकडे गेले असता.

यश हिरापुरे, आशिष दमाहे, अंकेश दमाहे आणि मागून मूर्ती धरून बसलेला आणखी एक युवक पुढे आला. तलावात खोदलेल्या खड्ड्यात तीन तरुणांची जलसमाधी झाली आणि दुसऱ्या तरुणाने कशी तरी वरून मूर्ती हलवून त्यांचे प्राण वाचवले.

या घटनेत मृत्यू झालेल्या आशिष दमाहे या तरुणांची नुकतीच लष्करात निवड झाली होती आणि काही प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो सरकारी सेवेत रुजू होणार होता.

तलावाच्या खोल खड्ड्यात बुडून या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हृदय द्रावक घटनेमुळे रावणवाडी, सावरी, सावरीटोला परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रावणवाडी पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 13, 2024

PostImage

शिक्षक पदभरतीत घोळ करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करा :- आझाद समाज पक्षाची मागणी


शिक्षक पदभरतीत घोळ करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करा :- आझाद समाज पक्षाची मागणी


गडचिरोली :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरती मध्ये शिक्षण विभागाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली.          ज्या उमेदवारांनी Bed झालेच नाही अशाही उमेदवारांना नियुक्ती दिली. परंतु ज्ञानेश्वर नंदेश्वर, नलिनी भोयर, मीना गोवर्धन यांचा Bed झाला असताना नियुक्ती दिली नाही. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

         05 सप्टेंबर रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्च्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीरपणे स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचे कबूल केले आणि राज्य सरकारने सुद्धा याची दखल घेऊन नविन 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत पदभरती करताना निवृत शिक्षकांना या प्रक्रियेतून बाद केले, पंचायत समिती अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य दिले आणि CTET, TAIT सारख्या अट शिथिल केल्या या तिन्ही मागण्या पूर्ण करून आदेश काढला. 

          शिक्षण विभागाने 11 ऑक्टोबर ला 189 उमेदवार बाहेर जिल्ह्यातील बोलविले हे मात्र समजले नाही. नेमके जिल्हा परिषदेने चालविले काय, शासकीय आदेश असताना आणि स्वतः उघडपने कबूल केले असताना आता अशा प्रकारे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना स्थान देणे म्हणजेच हा मनामानी कारभार असल्याचा आरोप आझाद समाज पक्ष व बेरोजगार संघटनेने पत्रकार परिषदेतून केला आहे.

        एक तर ज्यावेळी पदभरती चालू होती त्यावेळी Tait, Ctet नसलेल्या Ded, Bed धारकांचे अर्ज आले असताना स्वीकारले नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील Ded, Bed धारकांना संधी असताना अर्ज नाही म्हणून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देत आहेत यातून “शिक्षण विभागाने भ्रष्टाचार तर केला नाही ना? ” असा सवाल उपस्थित होतो.  

          एवढेच नव्हे तर 7 ऑक्टोबर 2024 रोजी 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून केवळ 3 दिवस मुदत देऊन 10 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली हा प्रशासनानी बेरोजगारांशी मांडलेला खेळ आहे. कोणतीही भरती निघाली तर 2 दिवस ती माहिती होण्यासाठी लागतात मग केवळ 3 दिवसाची मुदत देऊन जिल्हा परिषद नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न आहे. आचारसंहिता लागणार म्हणून काय कशाही पद्धतीने मनमानी चालवीणार का?

          तसेच कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करताना उमेदवारांना त्याच्या गावाजवळ चीं शाळा देण्यात यावी असे असताना गावाजवळचीं शाळा न देता 100-150 km दूर पाठविण्यात आले. सुरुवातीला आदेशात 20 हजार मानधन असताना आदेशात 15 हजार मानधन करण्यात आले हा मोठा प्रमाणात भोंगळ कारभार असल्याचे सिद्ध होत आहे..

          आझाद समाज पार्टी व बेरोजगार संघटनेकडून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांची पदभरती त्वरीत स्थगित करून, जिल्ह्यातील DEd, Bed धारक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व न्याय द्यावा. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

          राज बन्सोड जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी गडचिरोली यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 13, 2024

PostImage

धारदार शस्त्राने केली सख्या भावाने मोठ्या भावाची हत्या


धारदार शस्त्राने केली सख्या भावाने मोठ्या भावाची हत्या

सिरोंचा:-
तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे दोन सख्ख्या भावांच्या झालेल्या भांडणात लहान भावाने मोठ्या भावाची धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक दहा ऑक्टोंबर शुक्रवारला रात्रो पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास घडली.

चीन्नना मल्लया वडगुरी वय 40 वर्ष रा. रंगय्यापल्ली ता. सिरोंचा असे मृतकाचे नाव असून सत्यम मलय्या वडगुरी वय 31 वर्ष रंगय्यापल्ली असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, रंगय्यापल्ली येथील चीन्नना वडगुरी व सत्यम वडगुरी या दोन भावंडा मध्ये जुन्या काही कारणाने वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, लहान भाऊ सत्यम वडगुरी याने मोठा भाऊ चिन्नना वडगुरी यांच्या वर धारधार शस्त्राने वार केला. चिन्नना च्या कानाच्या पाठीमागे जबर दुखापत झाली. यावेळी रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सीरोंचा पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक व ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Oct. 7, 2024

PostImage

आदिवासी समाज संघटनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात महाआक्रोश मोर्चा 


आदिवासी समाज संघटनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात महाआक्रोश मोर्चा 

गडचिरोली:-
 गडचिरोली जिल्हा कार्यालयावर आदिवासी समाज संघटनाच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान सहभागी झाले, आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी  रस्त्यावर,  संसदेत का मग न्यायालयातील लढा असो लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी मी त्यांच्या सोबत आहे असे मत खासदार डॉ. किरसान यांनी व्यक्त केले.
 यावेळी मोर्चात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे, रामदास मसराम, छगन शेडमाके, माधवराव गावडे, गुलाब मडावी, पुष्पलता कुमरे, भारत येरमे, मिलिंद खोब्रागडे, निजान पेंदाम, रुपेश टिकले, दिलीप घोडाम, प्रशांत कोराम, गिरीधर तीतराम, विश्वेश्वर दरो, रमेश कोडापे, सदानंद ताराम, वर्षा आत्राम, सह इतर काँग्रेस पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते


PostImage

Vaingangavarta19

Oct. 6, 2024

PostImage

ट्रकची स्कुटीला जब्बर धडक , आजोबा नातवाचा जागीच ठार 


ट्रकची स्कुटीला जब्बर धडक , आजोबा नातवाचा जागीच ठार 


उमरखेड :- मध्य धुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवीत स्कुटी वरील दोघांना अक्षरशा चिरडून टाकले यात आजोबा व नातू जागीच ठार झाल्याची घटना दि. ५ रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान बोरी तुळजापुर महामार्गावरील महागाव रस्त्यावरील नांदगव्हाण घाटात घडली 
दोघांना चिरडून वाहनासह फरार होऊ पाहणाऱ्या ट्रकचालकास पोलिसांनी पाठलाग करून पकडले 
रमणीकभाई भीमजीभाई पटेल (६५) व केतव राजेश पटेल (१९) दोन्ही रा. हनुमान वार्ड उमरखेड असे भीषण अपघातात मृत पावलेल्या आजोबा व नातवाचे नाव असून रमनिकभाई पटेल यांचा ऑटोमोबाईल चा व्यवसाय आहे ते महागाव येथे नातवाच्या कॉलेजच्या कामासाठी स्कुटी वरून नातवाला घेऊन जात होते.

यावेळी नांदेड कडून यवतमाळ कडे जात असलेल्या ट्रक क्र.एम एच ४९ एटी २९०८ चे चालक महेंद्र नथुजी बागडे (५६) रा. सावनेर. हा अमली पदार्थाच्या नशेत भरधाव वेगाने ट्रक चाळवीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.भरधाव वेगात झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक अधिक भरधाव वेगाने कळवला.

सदर घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शिनी  तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना दिली त्यानी महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, शेख वसीम, आणि पोलीसांचा ताफा सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. अवघ्या १० मिनिटात अंबोडा गावाजवळ या ट्रक चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

महिंद्र नत्थुजी बागडे (५६) असे ट्रकचालकाचे नाव असून तो सावनेर येथील रहिवासी असल्याचे कळते. मृतदेहावर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Oct. 6, 2024

PostImage

अमृत आहार योजनेंतर्गत काम करणाऱ्या महीलांनी केले अभारीप च्या माध्यमातून धरणे आंदोलन


अमृत आहार योजनेंतर्गत काम करणाऱ्या महीलांनी केले अभारीप च्या माध्यमातून धरणे आंदोलन 

कुरखेडा:-
अमृता आहार योजनेंतर्गत काम करणाऱ्या महीलांनी अभारीप च्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन केले 

 यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  एकनाथ शिंदे  मंत्रालय मुंबई यांना  उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय कुरखेडा याच्या वतीने निवेदन देण्यात आले उपविभागीय कार्यालय समोर तिन तास धरणे 
आंदोलन करण्यात आले आंदोलन स्थळी येऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी तुमच्या मागण्या पूर्ण करु असे आश्वासन दिले
डॉक्टर ए,पि,जे,अब्दुल कलाम अमृत आहार जिल्हा महिला संघटनेचे प्रमुख  कृष्णा चौधरी ,यांचे नेतृत्वात महिला जिल्हा अध्यक्ष गिता ऊईके सचिव सरीता गावडे,उपाध्यक्ष अंजु गेडाम,तालुका अध्यक्ष वडसा ,प्रियंका रामटेके तालुका सघटिका कुरखेडा,दिपाली बावणे तालुका अध्यक्ष धानोरा तसेच धरणे आंदोलन साठी सहभागी हंसराज उंदिरवाडे,जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष प्रदिप भैसारे अ,भा,रि,पक्ष विधानसभा प्रमुख गडचिरोली प्रदेश सचिव केशव सामृतवार अ,भा,रि,पक्ष कार्यालयीय सचिव अशोक खोब्रागडे  ,दादाजी धाकडे ,तसेच डॉक्टर ए,पि,जे,अब्दुल कलाम अमृत आहार स्वयंपाकी महिला कुरखेडा, कोरची,धानोरा,वडसा,आदी तालुक्यातुन १५० महिला उपस्थित होत्या 
धरणे स्थळी भेट देण्यासाठी उपस्थित ,ॲड. उमेश जी वालदे ,सुरज गावतुरे,व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते 
या प्रसंगी धरणे आंदोलणात आमच्या मागण्या पूर्ण करा
मानधानात वाढ झाली पाहिजे ,
एकत्रित येऊ संघटित राहु,
अशा अनेक घोषणा देत शांतिचा मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले,यावेळी पोलीसाचा चोख बंदोबस्त होता त्यांनी सुद्धा सहकार्य केले,


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024

PostImage

चंद्रपूर  येथील दीक्षाभूमीचा  स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षण करण्यात यावे 


चंद्रपूर  येथील दीक्षाभूमीचा  स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षण करण्यात यावे 

चंद्रपूर:-
चंद्रपूर येथील दीक्षाभूमीचा स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षण करण्यात आला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे 
 आज दिनांक: 3 ऑक्टोबर 2024 चंद्रपूर येथे जिल्हा सचिव राजकुमार नगराळे मा. राज्यपाल महोदयांना चंद्रपूर दीक्षाभूमीसाठी स्वतंत्र सातबारा व लेखापरीक्षणाची मागणी करणारे निवेदन सादर केले. या वेळी आम आदमी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनील मुसळे आणि जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर उपस्थित होते.चंद्रपूर दीक्षाभूमी हे बौद्ध समाजाचे अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांना येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. सध्या या ऐतिहासिक स्थळाची जमीन एका शैक्षणिक संस्थेच्या नावावर नोंदवलेली असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे  दीक्षाभूमीसाठी स्वतंत्र सातबारा उतारा स्वतंत्र ट्रस्टची स्थापना निधी व्यवस्थापनाचे शासकीय लेखापरीक्षण या मागण्या मान्य झाल्यास
 दीक्षाभूमीचा योग्य विकास होईल निधी व्यवस्थापनात पारदर्शकता येईल ऐतिहासिक वारसा जतन होईल

बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेता या मागण्यांवर शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024

PostImage

वसतिगृहात  वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा झोपेतच मृत्यू


वसतिगृहात  वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा झोपेतच मृत्यू

शंका कुशंकांना फुटले पेव

चंद्रपूर:- 
शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी
आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खबळळ उडाली आहे. आचल प्रमोद गोरे (२३) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळचे रहिवासी आहे.
आचल ही येथील विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थीनी होती. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता रूममेटने उठवले.पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा शासकीय रूग्णालय दाखल केले असता, डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024

PostImage

विधानसभा निवडणुकी संदर्भात रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत चर्चा सुरु.


विधानसभा निवडणुकी संदर्भात रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत चर्चा सुरु.

 अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय समितीची गडचिरोली येथे बैठक संपन्न.

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

 


गडचिरोली :- गडचिरोली विधान सभा निवडणुकीसाठी
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत सकारात्मक रीतीने चर्चा सुरु असून जागा वाटपाबाबत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास अन्य पर्यायासाठी मार्ग मोकळे ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. 
रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कमिटीची बैठक येथील विश्राम गृहात पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विधान सभा निवडणुकी सोबतच पक्ष संगठन व जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सार्वजनिक उद्योगांचे खाजकीकरण करण्यात येऊ नये, खाजगी उद्योगांमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे. शिक्षणाचे व आरोग्य सेवांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे आणि लोकांना दर्जेदार सेवा पुरविण्यात याव्या, सरकारी शाळा खाजगी संस्थांना देण्यात येऊ नये. निवृत्त शिक्षकांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती करण्याचा निर्णय रद्द करावा व बेरोजगार युवकांना शिक्षक पदी नेमण्यात यावे.

गडचिरोली जिल्ह्यातील खनिज व वन संपत्तीची लूट थांबविण्यात यावी. जिल्ह्यातील खराब झालेले रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तात्काळ लाभाच्या योजनांद्वारे मतांसाठी जनतेला आकर्षित करण्याऐवजी लोकांना रोजगार व अर्थ सहाय्य्य उपलब्ध करून देण्यात यावे इत्यादीप्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली व सरकारने या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस घनश्याम फुसे, उपाध्यक्ष रोहिदास राऊत अशोक निमगडे कोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकर, केंद्रीय सदस्य प्रा. सुरेश पानतावणे,विशालचंद्र अलोणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकी नंतर गडचिरोली जिल्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला व पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, महिला आघाडीच्या सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवार, विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, दादाजी धाकडे, विजय देवतळे, अरुण भैसारे, कल्पना रामटेके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024

PostImage

रेतिचोर कंत्राटदार याचेवर आरोप सिद्ध होऊन बसला ८४ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा दंड


रेतिचोर कंत्राटदार याचेवर आरोप सिद्ध होऊन बसला ८४ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा दंड

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

अहेरी;- 
तालुक्यातील चंद्रा येथील शेतक-यांच्या शेतात अवैधरित्या
उत्खनन केलेल्या रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्या प्रकरणी अहेरी तहसिलदारांनी संबंधित कंत्राटदारास तब्बल 84 लाख 34 हजार 600 रुपयाचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 विशेष म्हणजे, यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी तक्रार दाखल करीत प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून संबंधितावर कारवाईची मागणी लावून धरली होती.

तहसिलदारांच्या या दंडात्मक कारवाईमुळे त्यांच्या प्रयत्नाना यश आले.
 सविस्तर वृत्त असे की, अहेरी तालुक्यातील चंद्रा गावालगत एका खाजगी कंत्राटदाराने एका  शेतकऱ्याच्या प्लांटवर रेतीची साठवणूक केली असल्याचे निदर्शनास येताच सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यासंदर्भात 7 सप्टेंबर 2022 रोजी अहेरी तहसिल कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने चौकशी केली असता 466.43 ब्रास रेतीसाठा अवैध असल्याचे आढळून आले. सदर रेतीसाठा मे. जि. एस.डी. इंडस्ट्रिज नागपूरचे गजानन मेंढे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच सदरची रेती भामरागड तालुक्यातील लिलावातील येचली नदी घाटातून उत्खनन न करता इतरत्र ठिकाणावरून रेती आणून वाहतूक केल्याचे सिद्ध झाले होते. पेरमिली मंडळ अधिका-यांच्या चौकशीअंती साठवणूकीतील रेतीचे परवाने येचली येथील असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातही प्रशासन, शासनाची शुद्ध फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले. याअंती अहेरीचे तहसिलदार यांनी 466 ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी संबंधितावर 84 लाख 34 हजार 600 रुपयाची दंडात्मक कारवाई सुनावली आहे. येत्या सात दिवसात दंडात्मक रक्कम जमा करण्याचे निर्देशही तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी दिले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024

PostImage

लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर झेप


लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर झेप

३१ विद्यार्थ्यांनी मारली मैदानी स्पर्धेत तालुकास्तरावर बाजी

आष्टी :-

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथील ३१ विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धेत यश संपादन करीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत झेप घेतली.
    सदर स्पर्धेत हर्डल्स, लांब उडी, गोळा फेक, थाडी फेक, भाला फेक, १०० मी. धावणे, २०० मी. धावणे, ३ किमी. चालणे, ५ किमी. चालणे, रिले ४ x १०० अश्या विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादित करीत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
    यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल आल्लूरवार, यांनी विद्यार्थ्यांना पटांगणाची सोय करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री. नितेश पंगाटी यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशिक्षण घेत मिळालेल्या संधीचे सोने करता आले.
    जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल आल्लूरवार, सचिव श्री. रमेश आरे, मुख्याध्यापक श्री. कृष्णमुर्ती गादे, तालुका क्रीडा संयोजक श्री. राकेश खेवले यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 4, 2024

PostImage

आधारकार्ड व्दारे पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाची केली फसवणूक 


आधारकार्ड व्दारे पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाची केली फसवणूक 

 १००० रुपये ऐवजी काढले ५००० रुपये लक्षात येताच दिला चोप 


अहेरी;- 
 आधारकार्ड व्दारे पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाची आधार सेवा केंद्र मालकानी फसवणूक केली 
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील माजी सरपंच बापुजी सडमेक हे २ ऑक्टोबर रोजी आपल्या वैयक्तिक कामाकरिता आलापल्ली येथे गेले होते बाजारपेठेतून काही वस्तू घेण्याकरिता पैशाची अडचण आली. त्यामुळे त्यांनी आलापल्ली बस स्थानक जवळ असलेल्या सिम विक्री करणाऱ्या आधार सेवा केंद्र वाल्याजवळ जाऊन आधार कार्ड द्वारे एक हजार रुपये काढायला सांगितले. त्यावेळी त्या आधार सेवा केंद्र वाल्यांनी या संधीचा फायदा घेत त्याने त्यांच्या आधार कार्ड द्वारे 5000 रुपये विड्रॉल केले. व संबंधित ग्राहकाला फक्त एक हजार रुपये हाती दिले. त्यानंतर काही वेळाने संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर पाच हजार रुपये विड्राल झाल्याचे मेसेज आले. तो मेसेज पाहताच माजी सरपंच बापूजी सडमेक यांना धक्काच बसला. त्यांनी त्वरित त्या आधार एटीएम वाल्याकडे जाऊन विचारना केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवी चे उत्तर देत विचारणा करणारा ग्राहकालाच धमकी देत असल्याचे वायरल व्हिडिओ वरून दिसत आहे दिले.

त्यामुळे माजी सरपंच बापुजी सडमेक यांनी काही नागरिकांना बोलावून पुन्हा एकदा विचारणा केली. त्यावेळी नागरिकांची गर्दी पाहता त्या आधार एटीएम वाल्याने 'मी त्यांची गंमत केलो 'असे म्हणून उर्वरित रक्कम परत दिली 

अहेरी तालुक्यात प्रत्येक गावागावात सीएससी सेंटर, सेतू केंद्र, व आधार एटीएम असून त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार करीत असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे. 2 ऑक्टोंबर ला झालेल्या एक प्रतिष्ठित नागरिक पेरमिली गावचे असलेले माजी सरपंच यांना आपल्याच रकमेसाठी त्रास सहन करावा लागला. इतरांचे काय हाल होणार हे त्या घटनेवरून दिसून येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 2, 2024

PostImage

दगडाने ठेचून मित्रांनीच केला सवंगड्याचा खून


दगडाने ठेचून मित्रांनीच केला सवंगड्याचा खून 


प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता 19 गडचिरोली


नागपूर : दारू पार्टीत बहिणीच्या प्रेमप्रकरणावरून झालेल्या भांडणात तिघांनी मिळून मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मित्राच्या घरी दारू पार्टी सुरू असताना एकाने 'तुझ्या बहिणीशी माझे प्रेमप्रकरण सुरू असून आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत,' असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या तिघांनी मित्राचा खून केला.

सागर नकुल नागरे (२७, सुदामनगर), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वीर विनोद थापा (१८, रा. सुदामनगर), अजित संतन नेताम (२६, रा. सुदामनगर) आणि सुरेश मनोहर यादव (२५, रा. अंबाझरी), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मृतक सागर नागले आणि 
आरोपी वीर, अजित आणि सुरेश हे सोमवारी रात्री १०.३० वाजता बंटी उईके या मित्राच्या घरी दारू पार्टी करीत बसले होते. पार्टी रंगात आल्यानंतर सागरने वीर थापाशी हुज्जत घातली. तुझ्या मामेबहिणीशी माझे मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध आहेत, आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे. तुझी बहीण मला भेटायला रात्री माझ्या घरी येते. तुझ्या बहिणीचे माझ्यावर प्रेम असून आम्ही लवकरच पळून जाऊन लग्न करणार आहोत, असे म्हणाला. त्यामुळे वीरला राग आला. त्याने सागरला समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो समजत नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात वीर व त्याच्या दोन्ही मित्रांनी सागरला मारहाण केली. त्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. मात्र तो मानायला तयार नव्हता. त्यामुळे तिघांनीही सागरच्या डोक्यात दगड, गङ्क घालून खून केला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले.

आरडाओरडा ऐकून शेजारी झोपेतून उठले. त्यांनी घरात जाऊन बघितले तर सागर हा मृतावस्थेत पडून दिसला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Oct. 2, 2024

PostImage

अचानक विवाहित महिला  घरातून झाली बेपत्ता


अचानक विवाहित महिला  घरातून झाली बेपत्ता 

 

आलापल्ली; नागेपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांच्या घरून त्यांची पुतनी बेपत्ता झाल्याची घटना उघडीस आली आहे

या घटनेची शहानिशा करून सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे 

सविस्तर या प्रमाणे आहे की बेपत्ता झालेली महिला नामे प्रियंका ही विवाहित आहे सदर महिलेचे विवाह मोरेश्वर वलादे रा. कळमटोला ता धानोरा याच्याशी सात आठ वर्षांपूर्वी झाला होता परंतु काही दिवसांपासून त्यांच्या दोघात कौटुंबिक कलह निर्माण झाला पटत नसल्या कारणाने ही महिला आपले काका एप्रिल 2024 पासून संतोष ताटीकोंडावार यांच्या घरी राहत होती, परंतु दिनांक 30/9/2024 रोजी महिलेचे काका संतोष ताटीकोंडावार सकाळी 10.45 ला कामानिमित्य गेले होते तेंव्हापर्यंत बेपत्ता महिला ही घरचे कामे करतच होती, त्यानंतर एक तासाने संतोष ताटीकोंडावार यांची पत्नी घरी आल्याने त्यांना प्रियंका दिसून आली नाही, तेव्हा संतोष ताटीकोंडावार यांच्या आईने मला सांगितले नाही अशी सांगितल्यावर एक दोन तास झाले प्रियंका घरी न आल्याने नातेवाईकांकडे फोन द्वारे विचारणा केली, मिळून आली नाही या मुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी अहेरी पोलीस स्टेशन गाठून पोलिसात बेपता झाल्याची तक्रार दिली आहे अधीक तपास पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Sept. 20, 2024

PostImage

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या;  खासदार डॉ  नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना


राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या;  खासदार डॉ  नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

गडचिरोली ::  गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दैनिय अवस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असल्याने, आरमोरी -गडचिरोली, आष्टी -आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याचे व रस्त्याचे काम पूर्ण होत पर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने भुजवून तात्पुरते दुरुस्त करण्याच्या सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी राष्ट्रीय महामार्ग च्या अधिकाऱ्यांना दिल्या. शासकीय विश्राम भवन, गडचिरोली  येथे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची राष्ट्रीय महामार्ग (वेस्ट झोन ) मुख्य अभियंता मनोज कुमार, मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग संतोष शेलार, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर न. व. बोरकर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली एन. एस. बोबडे यांच्या सॊबत बैठक पार पडली यावेळी सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.
 राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या ब्रिज ची उंची वाढविण्याचे व नवीन ब्रिज तयार करत असतांना शक्यतो जुना ब्रिज कायम ठेवून बाजूला नवीन ब्रिज उभारण्याच्या देखील सूचना खासदार डॉ.किरसान यांनी केल्या जेणे करून काम पूर्ण होत पर्यंत प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही, याव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गाच्या कामास पर्यावरणीय किंवा वनविभागाच्या परवानगी संदर्भात किंवा इतर कुठल्याही अडचणी येत असल्यास त्या दूर करण्याकरिता क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हुणुन पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी बैठीत सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 19, 2024

PostImage

लिटील हार्ट्स विद्यालयात ‘एक झाड आईच्या नावे "अंतर्गत वृक्षारोपण


लिटील हार्ट्स विद्यालयात ‘एक झाड आईच्या नावे "अंतर्गत वृक्षारोपण

आष्टी:- 
येथील लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम हॉयस्कूल येथे केंद्रीय जल आयोग, नागपूर विभाग निवली वैनगंगा उपप्रभाग चंद्रपूर यांच्या सौजन्याने CWC आष्टी द्वारा ‘एक झाड आईच्या नावे "अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यालयात २० झाडे लावण्यात आली 
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ज्यू. व्यवस्थापक मो. आसिफ यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले व अश्याप्रकारच्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग होण्यासाठी प्रोत्साहित केले. पर्यावरण विषयक जागरुकता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षरोपणाचे महत्व पटवून देणे काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यात वृक्षरोपनाबरोबरच इतर पर्यावरण पूरक उपक्रम विद्यालयात राबविणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अश्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. 
यावेळी CWC आष्टी येथील ज्यु. इंजिनियर मो. आसिफ, बी. शामकुमार (OBE), बी. शंकर सहा. कुशल कर्मचारी, प्रफुल चतुर, टेमाजी बांगरे, पियुष पोत्राजवार, चेतन बेल्कीवार, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  कृष्णमूर्ती गादे, सचिव रमेश आरे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 12, 2024

PostImage

कोल्हापूर येथे दि. 22 सप्टेंबरला ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन 


कोल्हापूर येथे दि. 22 सप्टेंबरला ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजन 

दगडू भास्कर करणार नवीन संघटनेची घोषणा 

 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १८

 कोल्हापूर :-एकेकाळचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे फायरब्रँड नेते दगडू भास्कर यांच्यावर प्रेम करणाऱ्या समर्थकांचा राजव्यापी ऐतिहासिक मेळावा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होत असून या मेळाव्यास महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भास्कर समर्थक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकाच्याकडून देण्यात आली.
      याच मेळाव्यात ते नवीन संघटनेची घोषणा करणार असून मेळाव्याच्या उदघाट्नप्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदात सतेज पाटील व माजी प्राचार्य डॉ. हरिष भालेराव हे उपस्थित राहाणार आहेत तरी दगडू भास्कर यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी नियोजित वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 11, 2024

PostImage

आष्टी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते  संजयभाऊ पंदीलवार यांच्या परिवाराची महालक्ष्मी स्थापनेची १७ वर्षा पासून परंपरा कायम


आष्टी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते 
संजयभाऊ पंदीलवार यांच्या परिवाराची महालक्ष्मी स्थापनेची १७ वर्षा पासून परंपरा कायम


 दरवर्षी प्रमाणे यंदाही होणार भक्तांची दर्शनासाठी गर्दी 


आष्टी:-
आष्टी येथील प्रतिष्ठित शेतकरी, व सामाजिक कार्यकर्ते संजय नानाजी पंदीलवार व माजी जिल्हा परिषद सदस्या रूपालीताई पंदिलवार यांच्या परिवारात १८ वर्षांपासून अखंडपणे दरवर्षी भाद्रपद महिन्यात महालक्ष्मी स्थापनेची परंपरा कायम राखली जात आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा पंदीलवार परिवारात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे.
पंदीलवार परिवारात २००८ पासून भाद्रपद महिन्यात महालक्ष्मीची स्थापना करून पूजाअर्चना केली जात आहे. ही अखंड परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालविला जात आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आष्टी परिसरातील इल्लूर, अनखोडा, कढोली, चपराळा, चौडमपल्ली, ठाकरी, कुनघाडा, चंदनखेडी, मार्कंडा (कं) आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने येऊन मनोकामनेसाठी प्रार्थना करतात. या उत्सवात सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी होत असल्याने सर्व धर्म समभावाचे वातावरण येथे निर्माण होत असते.
पंदिलवार परिवारांकडून सातत्याने सामाजिक कार्यात योगदान राहत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्सवात परिसरातील नागरिक सहभागी होत असतात. परिवाराकडून अपघातग्रस्तांना मदत वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, नैसर्गीक आपत्ती ग्रस्तांना मदत केली जाते हा वारसा त्यांनी मागील अनेक वर्षांपासून चालविला आहे. यामुळे त्यांच्या घरील महालक्ष्मी उत्सवाला विशेष महत्व प्राप्त होत असते. संजयभाऊ पंदिलवार हे स्वतः या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी परिसरातील जनतेला निमंत्रित करतात व सर्व भाविकांना स्नेहभोज करण्याची विनंती करतात असे संजूभाऊ मनमिळाऊ स्वभावाचे धनी असल्याने परिसरातील जनतेला त्यांचे कौतुक वाटते आहे


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024

PostImage

मी तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलले व महिन्याभरात चौघांनी केला अत्याचार  मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले 


मी तुझ्यासोबत लग्न करतो असे बोलले व महिन्याभरात चौघांनी केला अत्याचार 

मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले 

 

 1 जण अटकेत 3 जण फरार.

 

चिमुर : 
चिमूर तालुक्यातील एका मुलीला मी तुझ्या बरोबर लग्न करतो असे म्हणून  4 व्यक्तीनी
तिचेवर महिनाभर अत्याचार केला मात्र मुलगी गर्भवती झाल्याने बिग फुटले.
 प्राप्त माहितीनुसार दिनांक 01 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या दिवसा दरम्यान सदर युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणीला पैशांचे, व लग्नाचे आमिष दाखवून तिचे सोबत जबरदस्तीने वेगवेगळ्या दिवशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहे.

त्यामुळे माहे मार्च 2024 पासुन युवती ची मासिक पाळी बंद होऊन तिचे पोट वाढून लागल्याने दिनांक 06 सष्टेबर ला खाजगी नर्सिंग होम मध्ये तपासणी केली. असता सोनाग्राफी करून अहवालानुसार ती सात महिण्याची गर्भवती असल्याचे  निष्पन्न झाले 

दिनांक, 07 सप्टेंबर ला सदर युवती च्या आईच्या तोडी तक्रार  वरुन चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली
 या घटनेचे आरोपी  प्रविण दाबेकर, विक्की गोरवे, प्रज्वल गोडेकर, संदिप देविदास खोडेकर, या चार व्यक्तीनी सामूहिक लैंगीक शोषण अत्याचार केला असे सांगीतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नात्याला काळीमा फासणारी आहे. लैंगिक शोषण करणारा एक युवतींचा नात्यांनी भाऊ आहे अशी चर्चा परीसरात सुरू आहे.

कलम 376, 376G (2) (F), 34 भादवी सहकलम 4.8, पोक्सो कलम 3(1) (w) (1) (ii), 3(2) (va) अनू, जाती, जमाती अत्या प्र.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप देविदास खोडकेर वय, 30 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे.

3 व्यक्ती अजूनही फरार असून शोध सुरु आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी:-
 श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, प्रमुख अतिथी डॉ.अपर्णा मारगोनवार, डॉ. एम पी सिंग, डॉ. कश्यप, प्रा.सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे  उपस्थित होते. 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग बारावीची विद्यार्थिनी रिया कर्मकारने हिने महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे, 'बेटी बचाओ,बेटी पढाओ चा' नारा आपल्या भाषणातून दिला. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी के सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की रासेयो विद्यार्थ्यांनी समाजामध्ये जाऊन समाजातील निरक्षरांना साक्षर करण्याचे कार्य व समाजामध्ये असलेला अज्ञान तथा अंधश्रद्धा दूर करून समाजाला शिक्षित करण्याचे कार्य स्वयंसेवकांनी करावे असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार रासेयो प्रमुख प्रा.सुबोध साखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक नागापुरे, डॉ. सोनाली ढवस, डॉ.प्रकाश राठोड प्रा.महेशकुमार सीलमवार, प्रा. सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा.जया रोकडे, प्रा. कवींद्र साखरे, विजुभाऊ खोबरागडे,अविनाश जीवतोडे, संदीप मानापुरे,रवींद्र झाडे, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहणे आदींनी सहकार्य केले आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 9, 2024

PostImage

पुरस्कारापेक्षा मला सत्काराच मोठा वाटतो  - कविता वाघमारे


पुरस्कारापेक्षा मला सत्काराच मोठा वाटतो  - कविता वाघमारे

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

डोंगरगाव :- पंचायत समिती मंगळवेढा मार्फत मला दिलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराप्रित्यर्थ डोंगरगावच्या गावकऱ्यांनी आज माझा जो सत्कार केला तो मला मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो असे
 भावूक उदगार डोंगरगाव शाळेच्या पुरस्कारप्राप्त शिक्षिका कविता वाघमारे यांनी काढले. गावकऱ्यांच्यावतीने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.मंगळवेढा पंचायत समिती मार्फत दिला जाणारा सन 2024 चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच वाघमारे यांना आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, दैनिक अचूक निदान चे संपादक डी. के. साखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के,  मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी,दत्तात्रय लोहार, विजय भुसे, तुकाराम साखरे, तानाजी साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाल्या की,माझ्या कार्याची दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार दिला असून; पुरस्कारामुळे मला एक नविन ऊर्जा प्राप्त झाली असून यापुढे ही मी अधिक जोमाने काम करून  विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा आणि शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करेन.वाघमारे ह्या गेली 20 वर्षे अध्यापनाचे काम करीत आहेत.त्यांनी अनेक  विद्यार्थी घडविले असून  सध्या त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर  कार्यरत आहेत.यावेळी विवेक खिलारे, डी. के. साखरे, मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी, सहशिक्षिका अंबिका कर्वे व बाजीराव गवळी सर आदींनी आपल्या मनोगतातून वाघमारे मॅडम यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. साखरे यांनी केले तर मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 5, 2024

PostImage

कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


कविता वाघमारे यांच्या सह २१ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मंगळवेढा -; मंगळवेढा पंचायत समिती मार्फत सन २०२४-२५ मध्ये दिले जाणारे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शिक्षिका श्रीमती कविता महादेव वाघमारे यांच्या सह २१ जणांना जाहीर झाले असून आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोड वरील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे शानदार समारंभात आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी  रूपाली भावसार या भूषविणार असून गटविकास अधिकारी योगेश कदम, गटशिक्षणाधिकारी  बिभिषण रणदिवे, शिक्षणविस्तार अधिकारी पुरुषोत्तम राठोड व शामराव सरगर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Sept. 2, 2024

PostImage

दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य 


दुसऱ्याच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने एका महिलेचा जागीच करुन अंत्य 

 

 

सिंदेवाही : 
पर्जण्यवृषृटी खूप झाल्याने एका घराची भींत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे घडली आहे 
मृतक रसिका देवराम मसराम वय,52 वर्ष ही सकाळी झोपून उठल्यावर अंगनाची सफाई करीत असतांना अचानक घरा शेजारील धुरपता वासुदेव मडावी यांच्या घराची भिंत  रसीका यांच्या अंगावर कोसळ्याने रसीका मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.

यावर्षी रत्नापूर व परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे घराच्या भिंत कोसळण्याचे प्रमाणही जास्तच आहे परंतु दुसऱ्याची भिंत कोसळ्याने आजस्थीतीत अंगणातील रशीका मसराम यांचा दुदैवी मृत्यू आज दि.1 सटेबर 2024 सकाळी 6.00 वा.चे दरम्यान झाला.
मोलमजुरी करुण आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रशीका मसराम यांचा हा मृत्यु वेदनादायी आहे. या अचानक घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस,तलाठी,पोलीस पाटील यांनी उपस्थीत राहुन पंचनामा केला. 
त्यांचे मृत्यु पश्चात दोन मुली,एक मुलगा,नातवंड  असा बराच मोठा परिवार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 27, 2024

PostImage

अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.-राजे अम्ब्रीशराव आत्राम


अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.-राजे अम्ब्रीशराव आत्राम

भामरागड येते पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न, दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती.

भामरागड:-मुलचेरा येतुन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या झंझावाती दौऱ्याची सुरुवात केली होती, त्यानंतर भामरागड येथे काल भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग राजेंनी फुंकले, ह्यावेळी तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रातुन आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य ह्यांची मोठी गर्दी झाली होती त्यांनी राजेचे जोरदार स्वागत केले.

यावेळी राजेंनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना गेल्या ५ वर्षात संपूर्ण विधानसभा क्षेत्रात विकासाचे एक मोठे काम झाले नाही, आजही मी केलेले विकासकामेच प्रगतीपथावर आहेत उलट संपूर्ण विधानसभा क्षेत्र सद्या खड्डयात गेला आहे, रस्ते, आरोग्य, वीज ह्या प्रत्येक क्षेत्रात जनता कमालीची हैराण झाली असतांना आपले मंत्री साहेब सद्या कंपनीचा आशीर्वादाने हेलिकॉप्टर दौरे करीत हवेत फिरत आहेत, जनतेच्या समस्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही अशांना हवेतून जमिनीवर आणण्याची वेळ आत्ता आली आहे, त्यासाठी त्यांची खरी जागा आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवा, त्यासाठी आजपासूनच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागून मोठ्या मताधिक्याने मला निवडुन येण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन ह्यावेळी राजेंनी केले
      
यावेळी जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, सुनीलभाऊ बिस्वास, रवीभाऊ नेलकुद्री, चिन्नना चाकूरकर,जाधव हलधर, राजू येग्लोपवर अर्जुन आलाम भाजप तालुका अध्यक्ष,तापस हलदार,झाकीर हुसेन, रामा बोगामी,रमाबाई कोमटी,शारदा कोरेत सरपंच,सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 27, 2024

PostImage

तुला खर्रा चारतो पण, माझी कामेच्छा पूर्ण कर, यातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती व फुटले बिंग


तुला खर्रा चारतो पण, माझी कामेच्छा पूर्ण कर, यातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती व फुटले बिंग 

 दुर्गापूर :-
तुला मी नेहमी खर्रा चारतो पण माझी कामेच्छा तु पुर्ण कर असे म्हणून एका पानटपरी वाल्या इसमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला व त्यामधून ती गर्भवती राहीली आणि घटनेला वाचा फुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे 
 पिडित अल्पवयीन मुलिच्या हालचालीवरून आईला संशय आला ही अशी का वागते म्हणून  तिची तपासणी करण्यासाठी तिला वरोरा येथील रुग्णालयात नेले असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ही बाब वरोरा पोलिसांना रुग्णालयातर्फे कळविण्यात आली. मात्र घटना ही दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने त्यांनी दुर्गापूर पोलिस यांना याबाबत माहिती दिली, दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांनी लगेच आरोपीला अटक केली. पानठेल्यावर खऱ्याच्या उधारीच्या मोबदल्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६, पोक्सो, ॲट्रॉसिटी एक्ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 दुर्गापूर येथे बबन रोहणकर याचा पानठेला आहे. पानठेल्यावर एक १६ वर्षीय मुलगी खर्रा खरेदी करण्यासाठी येत होती. तिची खर्चाची उधारी तीन हजारांवर पोहोचली होती. बबनने मुलीला खर्चाची उधारी मागितली. उधारी दिली नाही तर तुझ्या वडिलांना सांगेल अशी धमकी दिली. मुलीकडे खऱ्याची उधारी चुकविण्यासाठी तीन हजार रुपये नव्हते. ही संधी साधून तिला शारीरिक सुखाची मागणी करून
मागील तीन ते चार महिन्यांपासून लैंगिक शोषण केले. ती गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला याबाबत दुर्गापूर ठाण्यात शनिवारला मध्यरात्री गुन्हा दाखल करून ठाणेदार लता वाडीवे यांनी आरोपी बबन रोहनकरला अटक केली आहे व अधीक तपास सुरू केला आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 25, 2024

PostImage

प्रेमविवाह केलेल्या दांम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा 


प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा 


 गोंडपिपरी तालुक्यातील घटना

 गोंडपिपरी :-
प्रेमविवाह करुन भावी जीवनाच्या सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दाम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे 
घरगुती कारणातून वाद
झाल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पतीनेसुद्धा विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांचाही विहिरीत बुडून अंत झाला.

ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात शनिवारला रात्रो ९.३० वाजताचा सुमारास घडली. पती-पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावातच शोककडा पसरली आहे.

प्रकाश शरबत ठेंगणे वय (३०), उषा प्रकाश ठेंगणे वय  (२७) अशी मृत दांपत्याचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतने मागील तीन महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील इल्लूर येथील उषा हिचासोबत आंतरजातीय प्रेमाविवाह केला होता. सुखी संसार सुरु असतानाच शनिवारी रात्री दोघात कडाक्याचे  भांडण झाले 

रागाच्या भरात उषाने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने सुद्धा लगेच विहिरीत उडी घेतली. दरम्यान शेजारच्या मुलाने हे दृश्य बघून इतरांना या संदर्भातील माहिती दिली.

नागरिकांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठून विहिरीत शोध मोहीम राबवली असता, दोघांचेही मृतदेह आढळून आले. वृत्तलिहीपर्यंत नेमके आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 24, 2024

PostImage

परिस्थिततीला न जुमानता आपले यश संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे  ॲड. विश्वजीत कोवासे 


परिस्थिततीला न जुमानता आपले यश संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे 

ॲड. विश्वजीत कोवासे 


आष्टी:  परिस्थितीला न जुमानता आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रयत्नशील राहिल्यास यश संपादन करता येते असे प्रतिपादन ॲड.विश्वजीत कोवासे यांनी मार्कंडा (कं)येथील सत्कार समारंभा प्रंसंगी व्यक्त केले 
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंनसोबा येथी तीन तरुण व एक तरुणी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलिस दलात भरती झाले.त्या निमित्ताने गावकऱ्यांनी त्यांचा व विषेश कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला 

अजय बेलकिवार,प्रफुल्ल बेलकीवार, दिपक कांबळे, वर्षा सातर, या तरुणाची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली. यांचे वडील मोलमजुरी करुन घरचा गाडा हाकलत असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व विध्यार्थी घरच्या परिस्थितीला न डगमगता शिक्षण घेत असतानाच पोलिस दलात निवडीसाठी गावातील वाचनालयात  सराव करत होते.
गावातील विध्यार्थी पवन मस्के यांनी वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विध्यार्थी कसे घडले पाहिजे या हेतूने लोकवर्गणीतून वाचनालय सुरू केले व ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही सुविधा मिळवून घेतली व हे वाचनालय सुरळीत सुरू राहील आणि गावातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सारख्या शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या काही वाचनालयाच्या अडचणी लक्षात आणून दिले असता सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार व माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी पंचवीस हजार रुपयांचे पुस्तके घेऊन दिले. व त्यावेळी आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुंदन गावडे यांनी सुद्धा या वाचनालयासाठी बरेच काही सहकार्य केले या सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाचा लाभ मार्कंडा कंन्सोबा येथील तरुणांना झाला. या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड‌. विश्वजीत कोवासे व माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या उपस्थितीत मार्कंडा कंन्सोबा येथे पोलिस भरतीत निवड झालेल्यांचा व विविध विभागातील तीन वर्षे उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून विशाल काळे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी,भारती राऊत, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक मार्कंडा कंन्सोबा, लांडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव अभयारण्य चपराळा, रोखडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा कंन्सोबा, शिंपले, वनविकास वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा कंन्सोबा,व पोलीस भरतीत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परिसरातील व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच वनश्री चापले, नाना पसफूलवार, संजय पंदिलवार, सुरेश फरकडे, नानाजी बिटपल्लीवार, देशमुख, दामोदर पोटवार, आत्माराम मस्के, विजय बहिरेवार, दिलीप तिवाडे, आत्माराम मडावी, साईनाथ कुळमेथे, भाऊजी सिडाम, सत्यवान भडके,शंकर मारशेट्टीवार,बिजन मंडल, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अशोक खंडारे,भास्कर फरकडे, विलास हुलके,अजय पोटवार, राजाराम गुंडावार उपस्थित होते.
ॲड विश्वजीत कोवासे, नाना पसफूलवार, संजय पंदिलवार व इतरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


PostImage

Vaingangavarta19

Aug. 22, 2024

PostImage

अनुसूचित जाती व जमाती यांनी पुकारलेल्या बंदला आष्टीत पुर्ण प्रतिसाद 


अनुसूचित जाती व जमाती यांनी पुकारलेल्या बंदला आष्टीत पुर्ण प्रतिसाद 


आष्टी:-
सर्वोच्च न्यायलयाच निर्णय दिनांक 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर अटी मान्यता दिली. ही असंविधानिक बाब आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर अट येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय संविधानाच्या कलम 341 व कलम 342 ला बाधा येत आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरणामुळे जाती जातीत भांडण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजात तणाव निर्माण होऊ शकतो. भविष्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर अन्याय होऊ शकतो.  
सर्वोच्च न्यायालयाचा 1ऑगस्ट 2024 चा निर्णय रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती करावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण व क्रिमिलियरच अट रद्द करावे.या करिता आज आष्टी येथे दिनांक २१ ला कडकडीत बंद पाळण्यात आला हे बंद करण्याकरिता धम्मदीप बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष अमीत नगराळे व क्रांतिवीर बाबुराव शेडमाके समीती आष्टी येथील पारंपरिक इलाका समीती सल्लागार संतोष सोयाम यांच्या माध्यमातून आज आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला यावेळी सहकार्य गौतमा फुलझेले, निकिता निमसरकार, सुमित्रा देठे, वयजंता बारसागडे, अशोक खंडारे,सुरज सोयाम, नितीन शेडमाके,रवी कन्नाके, नितीन मडावी, देवा वनकर, सुरज देवगडे, उत्तम चंद बारसागडे,राधे थेरकर,प्रतिक निमसरकार, सुधीर उंदिरवाडे, आनंद कांबळे, प्रतिक निमसरकार, थोरात अवथरे, सुनील खैरे, राहुल फुलझेले, अंगीरश कुकुडकर यांच्यासह अनुसूचित जाती व जमातीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Aug. 17, 2024

PostImage

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  पोलीस भरतीमध्ये स्थान मिळविलेल्या युवक- युवतींचा अनखोडा वासियांनी केला सत्कार


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने  पोलीस भरतीमध्ये स्थान मिळविलेल्या युवक- युवतींचा अनखोडा वासियांनी केला सत्कार


  
 
   अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी - 
               गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलिस शिपाई  भरतीत आष्टी - अनखोडा परिसरातील  निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट गुरुवारला अनखोडा वासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक विशाल काळे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वसंत चौधरी,पोलीस पाटील अशोक चहारे,अरुण चहारे, मोरेश्वर चरडे, महेश चहारे,शरद कोहपरे,रोहीत कोडापे,आदी मान्यवर उपस्थित होते 
 यावेळी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खाकीची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या सोळा युवक - युवतींचा गुण गौरव शाल व पुस्तके देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात आष्टी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व शांत संयमी व मृदू स्वभावाचे अधिकारी म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या ठाणेदार विशाल काळे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
 यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून मत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी संयम ठेवून अपयशानी खचून न जाता जिद्दीने मेहनत घेतली तर यश संपादन करणे कठीण नाही. ग्रामीण भागातील युवकांनी मेहनतीच्या जोरावर अनेक यशोशिखर गाठले असून त्यांची प्रेरणा घेवून सेवेत रुजू झालेल्यानी आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडावे असे सांगितले. यावेळी पोलीस भरतीत निवड झालेल्या वयाती आत्राम चंदनखेडी, दुषाली अलगमकर उमरी, रीना घ्यार कढोली, नागेश वाट, समीर निमरड, अमरदिप निमसरकार, सचिन निमरड, पंकज डोंगरे, सोहन तिमाडे, चेतन बट्टे, अनखोडा, धर्मा शेडमाके, विद्याताई देठे, रभूश लांबाडे, गायत्री झाडे, आचल ताकलपल्लीवार, तन्वी गंधारे या यशवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अनखोडा येथील बहुसंख्य नागरिक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मारोती चहारे तर आभार  राजेश घ्यार यांनी मानले.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 17, 2024

PostImage

पायदळी येत एका इसमाने वैनगंगेच्या नदीपात्रात उडी घेऊन केली आत्महत्या


पायदळी येत एका इसमाने वैनगंगेच्या नदीपात्रात उडी घेऊन केली आत्महत्या

आरमोरी : 
 येथील एका इसमाने पायदळी नदीपात्र गाठत नदीपात्रातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे 
आरमोरी येथील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवासी सुरेश
फाल्गुन दोनाडकर  वय (५०) या इसमाने आरमोरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास घडली. त्याचा आज १६ ऑगस्ट रोजीही थांगपत्ता लागला नव्हता.
प्राप्त माहितीनुसार सुरेश दोनाडकर याची पत्नी व मुलगी हे बाहेरगावी गेले होते. तो घरी एकटाच असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास घरून बाहेर पडला ला व पायीच वैनगंगा नदी गाठून वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी वैनगंगेच्या नदीपात्रात स्थानिक पोहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधून शोधमोहीम राबविली. तसेच नाव चालविणाऱ्या नाविकांना हाताशी घेऊन तब्बल १० किलोमीटर पर्यंत जाऊन शोध घेतला. परंतु अद्याप पर्यंत त्याचे प्रेत मिळाले नाही. मागील चार दिवसांपासून आरमोरी पोलिसांनी शोध मोहीम राबवली असून अजूनही सदर इसमाचे प्रेत हातात आले नाही.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 17, 2024

PostImage

शेतातील कामे आटोपून शेतातीलच विहिरीत हातपाय धुवायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू


शेतातील कामे आटोपून शेतातीलच विहिरीत हातपाय धुवायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

एटापल्लीः 
आईवडिलांसोबत शेतातील कामासाठी मुलगा सोबत गेला कामे आटोपून हातपाय धुण्यासाठी शेतशिवारात असलेल्या विहिरीवर हात पाय धुऊन घेण्यासाठी गेला व पाय घसरून पडल्याने विहीरीत बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी डुम्मे गावात घडली.

निखिल सदाशिव दुर्वा (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावा वर्ग उत्तीर्ण झालेला होता  डुम्मे गावात आईवडील व भावासमवेत तो राहायचा. १५ ऑगस्टला स्वतःच्या शेतात धान
रोवणीचे काम सुरू होते. त्यासाठी तो गेला होता. दुपारी २ वाजता जेवणाची वेळ झाली. हातपाय धुण्यासाठी निखिल हा विहिरीवर गेला, यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही निखिल न आल्याने आई विहिरीजवळ गेली असता तिला त्याची चप्पल दिसली.
तेव्हा मुलगा विहीरीत पडला असल्याचे चित्र दिसून आले लागलीच पोलीस स्टेशन ला माहिती दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 6, 2024

PostImage

जम्मू काश्मीर च्या बार्डरवर तैनात असलेल्या जवानांवर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला विषप्रयोग


जम्मू काश्मीर च्या बार्डरवर तैनात असलेल्या जवानांवर प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला विषप्रयोग 


 पंधरा दिवसांनी झाला नवऱ्याचा मृत्यू


कोल्हापूर:-  देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या जम्मू काश्मीर येथील बार्डवर तैनात असलेल्या जवानांवर त्यांच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या विषप्रयोग केला त्या जवानाचा पंधरा दिवसांनी मृत्यू झाला आहे 
जम्मू काश्मीर राज्यामध्ये कर्तव्य बजावणारे जवान गावी सुट्टीवर आल्यानंतर वारंवार पत्नीसोबत भांडण करून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने त्याचे हातपाय बांधून डोळ्याला पट्टी बांधून जवानांच्या पत्नीने जवानाला वीष पाजल्याचा धका दायक प्रकार कोल्हापूर शहरात घडला आहे. हा जवान गेल्या पंधरा दिवसापासून मृत्यूशी देत होता अखेर त्याची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली असून शनिवार दिवशी त्याची प्राणज्योत मालवली अमर भीमगोंडा देसाई असे जवानांचे नाव आहे. सोमवार रोजी त्याचे मुळगाव असलेल्या नूल गाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्याच्या पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पत्नी व तिच्या प्रियकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा दिवसापासूनची जवानाची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली असून सैन्य दलातील जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर होते.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 6, 2024

PostImage

स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही केली आत्महत्या


स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही केली आत्महत्या

 

मुंबईः स्वतःच्या पत्नीचा खून करून त्यानेही आत्महत्या केली असल्याने गोरेगाव येथे खळबळ उडाली आहे 
 गोरेगाव पश्चिम भागातील टोपीवाला सोसायटीमध्ये सकाळी पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले होते. किशोर पेडणेकर यांनी पत्नी डॉ. राजश्री पेडणेकर यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यानेही इंमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्या- हत्या प्रकरणा मागील नेमका हेतू काय होता, हे जाणून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.  धक्कादायक म्हणजे आपल्या मृत्यूची माहिती समजल्यावर मुलाला मोठा धक्का बसेल, त्यामुळे त्याची गडबड उडू नये, याची खबरदारी किशोर पेडणेकर पहिलेच  करून ठेवल्याचे समोर आले.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 6, 2024

PostImage

चंद्रपूर वरुन डॉक्टरी उपचार करून आष्टी कडे येत असताना ३२ वर्षीय तरुण वाटेतच झाला बेपत्ता


चंद्रपूर वरुन डॉक्टरी उपचार करून आष्टी कडे येत असताना ३२ वर्षीय तरुण वाटेतच झाला बेपत्ता

 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी: -  गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील एक युवक चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार करुन स्वगावी येत असतांना अचानक बसमधून बेपत्ता झाल्याने आई, वडील सुन्न झाले 

हि घटना दि. २९/०७/२०२४ रोजी  नामे चरनदास (हरी, दौलत), दादाजी चनकापूरे वय ३२ वर्ष हा पाच वर्षा पासुन मंदबुध्दीचा असल्याने त्याचा उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलगा चरनदास यास असे तिघे मिळुन बसने चंद्रपूर येथे पोहचुन मुलगा चरनदास याचे डोक्याचे उपचार करण्यासाठी डॉ. सचिन वेधे यांच्या दवाखान्यात गेले. व  मुलागा चरनदास याचेवर डॉक्टरांनी उपचार करून परत जाण्यास सांगीतल्याने, असता आई, वडील, मुलगा गावाकडे अनखोडाला जाण्यासाठी चंद्रपूर येथुन अहेरी बसमध्ये तिघेही येत असतांना एका सिटवर वडील व माझा मुलगा चरनदास व पुढच्या सिटवर आई हि बसुन होती. त्यानंतर वडीलाला बसमध्ये झोप लागल्याने बसमध्ये झोपी गेला आष्टीला बस थांबल्यावर आई, वडील दोघेही  आष्टी बसस्थानकला उतरले असता,  मुलगा  चरनदास हा उतरला नाही तेव्हा आई वडीलांनी बसमध्ये शोध घेतले असता तो मिळुन आला नाही. तो कोठेतरी उतरला असावा सांयकाळी घरी येईल असे समजुन आई वडील आपल्या गावी अनखोडा आले सायंकाळ होवून सुध्दा तो घरी परत न आल्याने, त्याचा गावात व आजुबाजुच्या परीसरात शोध घेतले असता तो कोठेही मिळुन न आल्याने, नातेवाईकांकडे माझ्या मुला बाबत विचारले असता तो तिथे आला नसल्याचे सांगीतले. व आजपावेतो त्याचा शोध घेणे सुरू आहे.
चरनदास दादाजी चनकापूरे वय ३२ वर्ष, धंदा मजुरी, रा.अनखोडा, ता. चामोर्शी जि. गडचिरोली हा मंदबुध्दीचा असल्याने कोनाला काही न सांगता बस मधुन उतरून कोठे तरी गेला आहे. त्याचा आज पावेतो शोध घेवून सुध्दा मिळुन न आल्याने पोस्टेला मुलगा बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

बेपत्ता ईसमाचे वर्णनः-१) वर्ण- गोरा, २) उंची १६४ सेमी ३) बांधा- मजबुत, ४) केस काळे ५ पेहराव-फिकट पिवळ्या रंगाचा फुलबाहयाचा शर्ट, कथ्या रंगाचा पन्हें ६) भाषा- मराठी असुन सदर युवक कोणालाही दिसून आल्यास दादाजी विठोबा चनकापूरे रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोल्ली मोबाईल क्रमांक ७४९८४३६२५७  या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चरनदासच्या वडीलांनी केले आहे व माहिती देणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीसही देण्यात येईल असे वडीलांनी सांगितले


PostImage

Vaingangavarta19

Aug. 4, 2024

PostImage

आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुणीने नदी पात्रात उडी घेऊन केली आत्महत्या 


आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुणीने नदी पात्रात उडी घेऊन केली आत्महत्या 


भावाने केली पोलिसात तक्रार,  प्रशासनाची युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू

 मारेगाव:-
येथील एका तरुणीचे आई - वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे की काय परंतू तिने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे मारेगाव येथील प्रभाग क्र. पाच घरकुल कॉलनी मध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवतीने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला, या प्रकाराने मारेगाव तालुका हादरला आहे.

माधुरी अरुण खैरे, असे वर्धा नदीत उडी घेतलेल्या युवतीचे नाव आहे. तीचे डी-फार्म पर्यंत शिक्षण झाले असून वडील अरुण खैरे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले तर जि. प. शाळेच्या शिक्षिका उषाताई खैरे ह्या मागील मार्च महिन्यात  कचरा जाळतांना पन्नास टक्के भाजल्या होत्या दिड महिन्याच्या दीर्घ उपचारानंतर त्यांचेही निधन झाले होते.

दि . २ ऑगष्ठ शुक्रवारला सकाळी १० वाजताचे सुमारास वणी कॉलेज ला जात असल्याची आपल्या भावाला सूचना करीत ही युवती वणीहून ऑटोरिक्षात बसून वरोरा मार्गे निघाली दुपारी १२.३० वाजताचे सुमारास पाटाळा वर्धा नदी जवळ माधुरी हिने थांबा घेतला. काही वेळात माजरी येथील एक दाम्पत्य 'त्या' ठिकाणी थांबले असता त्यांना मोबाईल, पर्स व चप्पल निदर्शनास आली. यावेळी माधुरी हिच्या मोबाईलवर कॉल आला असतांना घटनास्थळवरील हकीकत नातेवाईकांना विषद केली. आणि नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेत सि सि टी व्ही फुटेज तपासाअंती माधुरी ही वर्धा नदीत उडी घेत असल्याचे स्पष्ट झाले. भाऊ यश याने वणी पोलीस प्रशासनात तक्रार दाखल केली आहे. आई-वडील नसतांना आता बहिणीच्या टोकाच्या निर्णयाने एकुलता एक मुलगा एकाकी पडला आहे. सदर घटनेचे गांभीर्याने घेत प्रशासन तिचा शोध घेत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 3, 2024

PostImage

ठाकरी ग्रामस्थांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत जायचे तरी कसे?


ठाकरी ग्रामस्थांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत जायचे तरी कसे?

ग्रामपंचायत ठाकरीने  केले ग्रामस्थांचे बेहाल

सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी एकदा तरी भेट दिली काय आरोग्य उपकेंद्रत 

आष्टी ता. ३ : चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील आरोग्य उपकेंद्र येथे रुग्णांना जाण्यासाठी मार्ग खडतर व चिखलमय झालेला असून या बाबी करीता ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे 
ठाकरी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील पेनय्या वर्धलवार यांच्या घरापासून ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत तांडा वस्ती योजनेअंतर्गत रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासनाने नाली खोदकाम करून सुरुवात केली. हे काम एक महिन्यापासून रेंगाळत असल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याप्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दोन्ही बाजूने रस्ताच बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच याची गंभीर दखल ग्रामपंचायत प्रशासनाने न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ठाकरी येथील ग्रामस्थांसाठी रहदारिच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे शाळेत, अंगणवाडीतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व येथील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाकरी ग्रामपंचायत प्रशासनाने सदर रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला. पावसाळ्यात हे काम पूर्ण होणार नाही हे माहीत असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने एवढी घाई करुन कामाला का सुरुवात केली? असा प्रश्न ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. रस्त्याच्या बाजूने नाली खोदकाम करून रस्त्यावर केवळ दोन तीन ब्रास खडी आणि दोन तीन ब्रास वाळू टाकून ठेवण्यात आली आहे. नाली खोदकाम करून ठेवले असल्याने नालीची माती रोडवर पसरल्याने मोठ्या प्रमाणात या रोडवर चिखल पसरलेला  आहे या चिखलातून वाट काढण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे. गेल्या १ महिन्यापासून रस्त्याचे काम ठप्प आहे.पावसाळ्याला सुरुवात होत असताना रस्त्याचे काम सुरू केले आहे आणि पावसाळा सुरू असल्याने काम अपूर्ण राहिल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. सदर काम ठप्प का झाले असे ग्रामसेवकास ग्रामस्थांनी विचारले असता ग्रामसेवक पावसाळा आहे या रस्ता बांधकाकरीता निधी नाही तुमच्या हिशोबाने काम होईल का असे उत्तर ग्रामसेवक देत असल्याचे ग्रामस्थ सांगतात या कामाकरीता निधी नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने कामाला सुरुवात कशी काय सुरुवात केली घरचे पैसे लावुन काम करणार होते का? नाहीतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून आम्हाला जाणूनबुजून त्रास देण्याकरिता कामाला सुरुवात करुन काम ठप्प केले? आम्ही काम आणले आणि कामाला सुरुवात केलेत पण पावसाळा सुरू असल्याने काम थांबले आहे हे दाखवण्यासाठी का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत सरपंच, उपसरपंच राहत गावात  स्थानिक राहत नसल्याने त्यांना या अडचणी काय समजणार आहेत काय?

 सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी एकदा या रस्त्याने आवागमन करून पहा तुम्हालाही समजेल चिखलातून वाट काढण्याकरिता काय त्रास होतो अशी येथील ग्रामस्थांची ओरड सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रत रुग्ण जाणार तरी कसे असाही प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 2, 2024

PostImage

गढुळ पाणी तुम्हीही प्या,पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी


गढुळ पाणी तुम्हीही प्या,पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले गढुळ पाणी

 

चंद्रपूर:- आम्ही पंधरा गावातील लोक जेव्हा गढूळ पाणी पीतो तेव्हा तुम्हीही प्यायला पाहिजे म्हणून पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकारी यांच्या अंगावर गढूळ पाणी फेकण्यात आले 
सदर आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे 
 पोंभूर्णा तालूक्यातील पंधरा गावांसाठी असलेली वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना वीजबिल भरणा न केल्यामुळे मागील दीड महिन्यापासून बंद आहे १५ गावांना होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने पोंभूर्णा तालुक्यातील पंधरा गावांना दुषीत पाणी प्यावे लागते, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध आजारांचा नागरिक सामना करावा लागतो आहे. अशास्थितीत वारंवार सूचना करूनही संबंधीत विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर पंधरा गावातील प्रमुख नागरिकांनी युवा नेता शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना आपबिती सांगितली पंधरा गावातील नागरिकांना होणारा त्रास बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिन्हे यांनी आंदोलन पुकारले काल दि.१ जुलै गुरूवारला पोंभूर्णा पंचायत समिती समोर "घागर फोड आंदोलन" चे आयोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनकडून दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने संतापलेल्या नागरिकांसह शिवसैनिकांचा ताबा सुटला कार्यालयातच घागर फोडून पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्याच्या अंगावर गढुळ पाणी पाणी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिन्हे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे, शहर प्रमुख गणेश वासलवार, वेळवा सरपंच जितेंद्र मानकर, घनोटी सरपंच पवन गेडाम, आष्टा सरपंच किरण डाखरे, थेरगाव उपसरपंच वेदनाथ तोरे, रवींद्र ठेंगणे, महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार, महेश श्रीगिरीवार, बालाजी मेश्राम, सुनीता वाकुडकर, सुरेखा कुडमेथे, मंगलदास लाकडे, गोकुळ
तोडासे, किशोर वाकूडकर तसेच पोंभूर्णा तालुक्यातील अनेक शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेच्या पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, सदस्य व त्या समस्या ग्रस्त पंधरा गावातील नागरिकांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 2, 2024

PostImage

गोंडपिपरी तालुक्यातील अजय कोरडे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड


गोंडपिपरी तालुक्यातील अजय कोरडे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

गोंडपिपरी:-
गोंडपिपरी तालुक्यातील तेलंगणा सिमेवरिल सकमूर या छोट्याश्या गावातील अजय रमेश कोरडे यांनी नुकतेच एम.पी.एस.सी.परीक्षेत यश संपादन करीत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी पात्र झाल्याची आनंददायी बाब समोर आली आहे.गोंडपिपरी तालुक्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे.काही दिवसांपूर्वी त्यांची जिल्हा परिषद चंद्रपूर येथे शिक्षकपदी निवड झाली होती.मात्र जिद्द,परिश्रम आणि सातत्याच्या बळावर अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या पट्याने सहा महिण्यातच दूसरे घवघवीत यश मिळविले आहे.ही माहीती समजताच कामानिमित्त गोंडपिपरी तालुक्यातील मंडळी गडचांदूरला आली होती.त्यांनी  अजय कोरडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.यावेळी गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्रसिंह चंदेल,चंद्रजित गव्हारे,संदिप पौरकार,समीर निमगडे,जेष्ठ पत्रकार बाळू निमगडे,अनिकेत दुर्गे आदिंची उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

Aug. 1, 2024

PostImage

सुरजागडचा मालवाहू ट्रक घुसला जंगलात जिवीत हाणी टळली 


सुरजागडचा मालवाहू ट्रक घुसला जंगलात जिवीत हाणी टळली 

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
येथून जवळच असलेल्या मार्कंडा (कं) गावाजवळ सुरजागळ वरुन माल घेऊन जाणारा ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जंगलात घुसला मात्र जीवीत हाणी टळली आहे

सुरजागडे लोहखनिज भरून आज दि. १ आगष्ठ ला आष्टीच्या दिशेने येत असलेला मालवाहू ट्रक क्रं एम एच ४० सी टी १५८५ हा वनविभागाने लावलेल्या बॉरिकेट मुळे ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक जंगलात घुसला प्रसंगावधान राखत चालक लागलीच ट्रक थांबवून पसार झाला अशी माहिती प्राप्त झाली आहे 
सुरजागड लोहप्रकल्प सुरू झाले तेव्हा पासून आल्लापल्ली ते आष्टी पर्यंत रोडवरील अपघाताला निमंत्रणात आणण्यासाठी सेक्युरीटी ची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी अधिकारी वाहनाने नेहमी फिरत असतात तरीही अशा चुका होतांना दिसत आहे 
मग फिरणारे अधिकारी आपले कर्तव्य बरोबर बजावतात की फक्त रोडवरुन चारचाकी वाहनाने मजा मारतात असा प्रश्न सामान्य नागरिक चर्चेतून करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Aug. 1, 2024

PostImage

लोकसभेचे विरोधी पक्षनेते  खासदार राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या खासदाराचा  गडचिरोली जिल्हा कांग्रेस कडून निषेध आंदोलन 


लोकसभेचे विरोधी पक्षनेते  खासदार राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या खासदाराचा  गडचिरोली जिल्हा कांग्रेस कडून निषेध आंदोलन 

 

गडचिरोली:-

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. हा मुद्दा सभापती समोर रेटून धरला आणि त्याच्याच हेतूने  खासदार अनुराग ठाकूर यांनी माननीय खासदार यांची तुमची जात काय असा प्रश्न करत आमच्या लोकप्रिय खासदार राहुलजी गांधी यांचा भर संसदेमध्ये अपमान केला. त्याच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे गांधी चौक येथे अनुरागजी ठाकूर यांच्या निषेधार्थजिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी  माजी आमदार आनंदराव गेडाम,  मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष, शंकर पाटील सालोटकर, राजेश ठाकुर, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नितेश राठोड, हनुमंत मडावी आदिवासी जिल्हा अध्यक्ष, जीवन पाटील नाट, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, कल्पना नंदेश्वर तालुका अध्यक्षा, वामन सावसागडे सर, प्रमोद भाऊ वैद्य माजी नगराध्यक्ष, नामदेव मंडलवार अध्यक्ष रोजगार सेल, मंगला कोवे आरमोरी महिला तालुकाध्यक्ष, प्रभाकरजी वासेकर कोषाध्यक्ष,  नंदू नरोटे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, घनश्याम वाढई महासचिव, रजनीकांत मोरघरे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, भैय्याजी मुद्दमवार पंचायत सेल, रमेश भाऊ चौधरी माजी नगरसेवक,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, पुष्पलता कुमरे कार्याध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार, सुनील भाऊ डोगरा माजी शहर अध्यक्ष,  अब्दुल भाई पंजेवानी अध्यक्ष सहकार सेल, शालिकराम पात्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Aug. 1, 2024

PostImage

ताराबाईने स्वतःच्या इभ्रतीची पर्वा न करता नदीपुरात वाहून जाणाऱ्या दोघांना साडीच्या साह्याने दिले जीवदान तर एकाला जलसमाधी


ताराबाईने स्वतःच्या इभ्रतीची पर्वा न करता नदीपुरात वाहून जाणाऱ्या दोघांना साडीच्या साह्याने दिले जीवदान तर एकाला जलसमाधी

शिर्डी:-
 शेतीच्या उपयोगासाठी नदीपात्रातील लावलेल्या विद्यूत मोटारी काढत असताना अचानक नदीला पूर आल्याने पुरात वाहून जाणाऱ्या दोन इसमास आपल्या इभ्रतीची पर्वा न करता ताराबाईने आपली साडी सोडून त्यांच्याकडे फेकली त्या आधारे दोघांचे प्राण वाचले तर एका तरुणाला जलसमाधी मिळाली आहे 
कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात असलेल्या आपल्या विद्युत मोटारी वरती काढत असताना पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्यामुळे त्या प्रवाहात संतोष भीमाशंकर तांगतोडे ,प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे तरुण  भावंडं वाहून जात असताना शेजारी शेळ्या चारणाऱ्या ताराबाई पवार व त्यांचे पती छबुराव पवार यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मदतीसाठी धावून आले. ताराबाईने प्रसंगावधान राखून आपल्या अंगावरील साडी क्षणार्धात सोडून ती बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने फेकली त्या साडीच्या साह्याने त्यातील दोन तरुणांना वाचविण्यात यश आले परंतु संतोष भीमाशंकर तांगतोडे वय वर्ष 25 या तरुणाच दुर्दैवी बुडून अंत झाला. ताराबाईच्या चेहऱ्यावरती दोघांना वाचवल्याचा आनंद ओसंडून वाहत होता मात्र  एकाला वाचू शकले नाही याचे दुःख व्यक्त करताना ती धाय मोकलून रडत होती. दोन तरुणांना जीवदान देणाऱ्या अशा या शूरवीर मातेच्या शौर्याचे कौतुक करून तिचा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी सत्कार केला. ताराबाई या आदिवासी महिलेची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट असून तिला राहायला चांगल्या प्रकारे घरीसुद्धा नाही. शासनाकडून तिला आर्थिक मदत व शौर्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात व सुनील मोकळ यांनी व्यक्त केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Aug. 1, 2024

PostImage

दलीत वस्तीकडे जाणाऱ्या रोडकडे फिरविली ग्रामपंचायत ने पाठ


दलीत वस्तीकडे जाणाऱ्या रोडकडे फिरविली ग्रामपंचायत ने पाठ

सरपंच व उपसरपंच गाव सोडून निवासी राहतात बाहेर गावात

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील ठाकरी गावात दलीत वस्तीकडे जाणाऱ्या रोडकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पाठ फिरवल्याने चिखल तुडवीत ग्रामस्थांना आवागमण करावे लागते आहे 
ग्रामविकासाच्या बाता मारणाऱ्या सरपंच नंदा कुळसंगे व उपसरपंच विठ्ठल आचेवार हे दोन्ही गावांतील प्रमुख गावात न राहता बाहेर गावात राहून प्रशासन सांभाळीत आहेत आता सघा स्थितीला पुरामुळे गावातील शेतकऱ्यांचे व घर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याने ते गावात येत आहेत 
चपराळा कडे जाणारा मुख्य रोड पासून ठाकरी गावात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे मात्र त्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्याच मार्गाने ठाकरी येथील  आबालवृद्ध,नागरिकांना मार्ग क्रमण करावे लागते चिखल तुडवीत जाताना तारेवरची कसरत करावी लागते आहे  वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सदर रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी करुनही ग्रामपंचायत प्रशासन या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते आहे त्यामुळे ठाकरी येथील जनता त्रस्त झाली आहे 
एवढ्या विकास कामाचा आव आणणारे लोकप्रतिनिधी दलीत वस्तीकडे दुर्लक्ष कसे काय करतात हा प्रश्न उपस्थित होतो आहे 
दलीत वस्तीकरीता शासनाच्या अनेक योजना ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबविण्यात येत असतात परंतू ठाकरी ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे 
गावातील नागरिकांची ससेहोलपट केव्हा थांबणार असे विक्की आचेवार,आशिष कंचर्लावार,प्रभाकर तिरुपतीवार,संजय गोरडवार, रामदास माडेमवार,मधुकर कारकुरवार,विलास गोरडवार,मल्ला भटृटीवार, विश्वनाथ कारकुरवार,दुर्गाजी जिल्लेवार,पार्वता गोरडवार,सुनिता चिंतमवार,सुरेखा आचेवार,कमला प्यारमवार 
आदिंनी प्रसीद्धी पत्रकातून प्रश्न उपस्थित केला आहे


PostImage

Vaingangavarta19

July 31, 2024

PostImage

अतिदुर्गम भागातील मंडळ अधिकारी, तलाठ्यांची मुख्यालायाला दांडी, दाखल्यांसाठी शेतकरी , विद्यार्थी हतबल


अतिदुर्गम भागातील मंडळ अधिकारी, तलाठ्यांची मुख्यालायाला दांडी, दाखल्यांसाठी शेतकरी , विद्यार्थी हतबल 


एटापल्लीः  अतिदुर्गम भागातील तलाठी व मंडळ अधिकारी हे मुख्यालयी उपस्थित न राहिल्याने आणि आपल्या कर्तव्याप्रती उदासीन असल्याचे चित्र आदिवासी भागात दिसून येते आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता, शेतकरी विद्यार्थी, मेटाकुटीला आले आहेत 
 हा प्रकार सध्या जारावंडी साजाचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास कुलूप लावलेले असते. त्यामुळे सदर साजातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.

गेल्या आठवड्या पासून संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे  संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते नदी नल्यांना पुर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसले त्यामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाले आहेत 

दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर पाहणी करिता वरिष्ठ अधिकारी ऑनफिल्ड जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत परंतु एटापल्ली तालुक्यातील जारावंडी साजातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सदर साजातील पुरपीडित शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहेत

मुलाच्या शैक्षणिक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्याची व पीक कर्जासाठी सातबारा व खातेउताऱ्यांची आवश्यकता असताना अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत 
सदर बाबीकडे संबंधित वरीष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष केंद्रित करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 31, 2024

PostImage

रोपवन लागवड घोटाळ्यात चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे निलंबित, मोठे मासे मोकाटच 


रोपवन लागवड घोटाळ्यात चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे निलंबित, मोठे मासे मोकाटच 

 

गडचिरोली :  गडचिरोली वनविभागात  एका रोपवन घोटाळ्यात  चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांना निलंबित करण्यात आले आहे. संजय पडवे यांच्या गैरव्यवहाराची वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली होती. चौकशीत ते दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे 

गडचिरोली वनवृत्तातील वनविभाग गडचिरोलीअंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश
होतो. मार्च २०२१ ते २०२४ पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष, विजय खरवडे यांनी तक्रार केली होती.

प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री, वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. याशिवाय साहित्य खरेदी मधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती.

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. या शिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण, अवैध उत्खनन, वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.

संजय पडवे यांनी वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी खरवडे यांनी केली होती. दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली. त्यात पडवे दोषी आढळले. प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई केल्याचे रमेशकुमार यांनी सांगितले.

घोटाळ्यांच्या आरोपांनी वनविभाग चर्चेत.

जिल्ह्यात असलेले ७५ टक्के वनक्षेत्र यामुळे वनविभागाची मोठ्या प्रमाणात कामे इथे सुरु
असतात. मधल्या काळात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले. त्यासाठी सुद्धा विशेष निधी देण्यात येतो. परंतु यात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी योजना, रस्ते बांधकाम, साहित्य वाटप सारख्या प्रकरणात अनेक तक्रारी झाल्या होत्या.

काही अधिकाऱ्यांनी तर चक्क वनविभागाची जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे केवळ वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने हा प्रश्न सुटणार नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 31, 2024

PostImage

खा. प्रतीभा धानोरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मांडली चंद्रपुरात गुन्हेगारी वाढल्याची समस्या 


खा. प्रतीभा धानोरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मांडली चंद्रपुरात गुन्हेगारी वाढल्याची समस्या 


चंद्रपूर:- खा.प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेली गुन्हेगारी याला वेळीच आळा घालावा अशी मागणी केली आहे 
 चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जंगलराज संपुष्टात यावे, अवैध धंद्यांमुळे वाढणारा अग्नीशंस्त्रांचा वापर यावर नियंत्रण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारी वर चर्चा करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. वारंवार होणाऱ्या गोळीबारीच्या घटना व निरपराध नागरीकांचे गेलेले जीव यावर देखील खासदार धानोरकर यांनी चर्चा केली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहेत तेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारला वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आदेश द्यावे, अशी विनंती देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 31, 2024

PostImage

भामरागड तालुक्यात पुन्हा एका इसमाची नक्षल्यांकडून हत्या


भामरागड तालुक्यात पुन्हा एका इसमाची नक्षल्यांकडून हत्या

 

मृतदेहावर टाकलेल्या चिट्ठीत पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मीने घेतली जबाबदारी

भामरागड; (गडचिरोली)

 गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्याची पुन्हा उच्छाद माडल्याचे चित्र दिसून येत आहे भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा येथील लालू मालू दुर्वा, (४०वर्ष) या व्यक्तीची पोलीस खबरी असल्याचा संशयावरून हत्या केली आहे. सदरची हत्या तो पोलीस खबरी असल्यामुळे केल्याचे मृतदेहावर ठेवलेल्या हस्तलिखित चिट्ठीत पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मी या संघटनेचे केल्याचे नमूद केले आहे सदरची हत्या नक्षल्यांकडून २८ जुलै ते ०३ ऑगस्ट नक्षल चळवळीचा स्थापना दिन प्रित्यर्थ पाळला जाणाऱ्या शहीद सप्ताह दरम्यान घडल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. शहीद सप्ताहाच्या सुरू होण्यापूर्वी (ता.२५ जुलै) गेल्या गुरुवारी भामरागड तालुक्यातीलच आरेवाडा येथील जयराम कोमटी गावडे (३८वर्ष) या आत्मसमर्पिताची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर पाच दिवसांचा फरकानेच लालू दुर्वा या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाहिकांची नक्षल्यांनी हत्या केल्याचे (ता. ३१ जुलै) बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आले आहे.

लालू मालू दुर्वा यांची (ता. ३० जुलै) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या राहते घरी नक्षल्यांनी लालूची हत्या केली असून मृतदेहावर एक हस्तलिखित चिट्ठी टाकण्यात आली आहे. चिट्ठीत लालू धुर्वा हा पोलिसांचा खबरी होता, त्याने अनेकदा नक्षल चळवळीच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिली आहे, एकदा त्याने दिलेल्या माहितीवरून आम्हाला आमचा कॅम्प खाली करून पळून जावे लागल्याचेही चिट्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे एरिया दलमने सभा घेऊन लालू याला तंबी देण्यात आली होती, त्यानंतर तो दोन वर्षे पोलिसांच्या मदतीने गावातून फरार होता, मात्र आमच्या दलमची त्याच्यावर पाळत होती, तो गावात परत आल्याने त्याची पीएलजीए (पीपल्स लिब्रेशन गुरीला आर्मी,) या नक्षल संघटनेने नागरिकांच्यावतीने हत्या केल्याचे नक्षल्यांनी मृतदेहावर ठेवलेल्या माडिया भाषेतील हस्तलिखित चिठ्ठीतून म्हटले आहे. शेवटी चिट्ठीत भामरागड एरिया कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे.

घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून घटनेचा पुढील तपास भामरागड पोलिसांकडून केला जात आहे. जिल्हा पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 30, 2024

PostImage

पुराच्या पाण्यात ट्रॉक्टरची झाली आंघोळ


पुराच्या पाण्यात ट्रॉक्टरची झाली आंघोळ 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक 
लगाम:-
रोवणी करीता चिखल करीत असलेल्या ट्रॉक्टरची पुराच्या पाण्यामुळे आंघोळ झाल्याची घटना काल दि.२९ जुलै ला मरपली येथे घडली 
सविस्तर असे की, सुखदेव अलोणे रा मरपली यांच्या शेतात रोवणीचे चिखलटीचे कामाकरीता ट्रॉक्टर लावण्यात आली होती चिखल करीत असताना अचानक ट्रॉक्टर शेतीमध्ये फसली तेव्हा शर्तीचे प्रयत्न करुनही ती निघाली नाही काही वेळातच नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले व ट्रॉक्टर पुर्णतः पाण्यात बुडाले सदर ट्रॉक्टर सुनील मोतीराम नैताम रा.मच्छीगट्टा ता.मुलचेरा यांच्या मालकीचे असल्याचे वृत आहे 
पुराचे पाणी कमी झाल्या नंतर ट्रॉक्टर ला बाहेर काढले जाईल असे प्रत्यक्षदर्शी ने कळविले आहे मात्र अजुनही ट्रॉक्टर शेतीमध्ये फसली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 29, 2024

PostImage

महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी खा. प्रतीभा धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतींची भेट.


महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी खा. प्रतीभा धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतींची भेट.


प्रवीण तीवाडे /कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९

चंद्रपूर:-
महाराष्ट्रात मराठा समाज मनोज जरांगे याचे नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी आदोंलन करित असताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत जातीनिहाय जनगणेची मागणी केली. विविध जातीचा आरक्षणासाठी लढा सुरु असुन अनेक आदोंलने महाराष्ट्रात सुरु आहेत.मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आदोंलन सुरु आहे. या आदोंलनाचा तिढा अद्यापही राज्य शासन सोडवु शकले नाही. अनेक आदोंलनकर्त्यानी आरक्षणासाठी प्राण देखिल गमावले. मागिल १४ वर्षापासून अदयापही केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. 

 

यामुळे सरकारकडे कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. या पार्शभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत, महाराष्ट्रातील तिढा सोडविण्याची मागणी या वेळी केली.राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकार कढुन केंद्र सरकारने अहवाल मागवुन जातनिहाय जनगणना करुन ५० टक्के अरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. 

 

या संदर्भात राष्ट्रपती यांनी सकारात्मक चर्चा होवुन भविष्यात या मध्ये सरकारला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार,प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत खासदार वंसतराव चव्हाण, खासदार नागेश पाटील,खासदार संजय जाधव याची देखिल उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

July 29, 2024

PostImage

महाराष्ट्र सरकार राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सूचिमध्ये समावेश करणार काय?


महाराष्ट्र सरकार राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सूचिमध्ये समावेश करणार काय?


उपसंपादक प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९

चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सूचिमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसींवर शुक्रवारी,२६ जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली.

 

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह १६ जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व १८ जातींचा समावेश केंद्रीय सूचिमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल.असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.

 

 १८ जातींचा समावेश शक्य : - 

महाराष्ट्रातील लोध,लोधा,लोधी, बडगुजर,वीरशैव लिंगायत, सलमानी,सैन,किराड,भोयर पवार,सुर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे,झाडे कुणबी,डांगरी,कलवार,निषाद मल्ला, कुलवंतवाणी,कराडी, शेंगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग,नवी दिल्ली यांच्याकडे निवेदने प्राप्त झालेली आहेत. 

 

या जातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्याबाबत नुकतीच मुंबई येथे बैठक पार पडली आहे.विशेष म्हणजे ही बैठक अतिशय सकारात्मक पद्धतीने पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

July 29, 2024

PostImage

 घन कचऱ्याचे साम्राज्याने अंगणवाडीतील  बालकांचे दुर्गंधीने आरोग्य धोक्यात 


 घन कचऱ्याचे साम्राज्याने अंगणवाडीतील  बालकांचे दुर्गंधीने आरोग्य धोक्यात 


आष्टी :  चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील वार्ड क्रमांक तीन मधील अंगणवाडी केंद्राजवळ धन कचरा बऱ्याच दिवसांपासून जमा असल्याने त्या दुर्गंधीने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे 
 सदर अंगणवाडी जवळ प्लॅस्टिकसह अन्य टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणावर येथीलच काही ग्रामस्थ  पाच सहा वर्षांपासून केरकचरा आणून टाकीत असल्याचे बोलल्या जात आहे. पण स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबतीत माहिती देऊनही कचरा टाकणे बंद केले नाही आणि उपाय म्हणून या ठिकाणी कचराकुंडी लावली नाही त्यामुळे या ठिकाणी पावसाचे दिवस असल्याने दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायते पदाधिकारी गावातच राहतात परंतु या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनखोडा गावातील वार्ड क्रमांक दोन मधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. व दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली बांधकाम केले आहे. परंतु या ठिकाणी कचराकुंडी नसल्याने प्लॅस्टिकसह अन्य टाकाऊ वस्तू बिनधास्तपणे या ठिकाणी फेकल्या जातात. त्यामुळे नाल्याची वहनक्षमता कमी झाली असून, वाढत्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष  होत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठी हानी पोहचण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता नाल्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्वच्छता विभागाची आहे. अनेक दिवसांपासून या नाल्यातील प्लॅस्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असताना कोणीही याकडे लक्ष देत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
 या ढिगाऱ्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे स्थानिक नागरिक प्लॅस्टिक व टाकाऊ वस्तू या नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नालीमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे आणि निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना साथीच्या आजारांची भीती सतावत आहे. या साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून लवकरात लवकर परिसरातील दुर्गंधी नष्ट करायला पाहिजे होती मात्र अद्याप ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिक चर्चेतून बोलत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या कचऱ्याच्या समस्येवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. 


नाल्यात नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जातो. या ठिकाणी कचराकुंडी लावावी व कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी.
- संतोष तिमाडे, नागरीक

या ठिकाणी कचराकुंडी नसल्याने कचरा नालीत अडकून बसला असून, त्यामुळे पाणी तुंबत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी परसली आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ न शकल्यास ते परिसरातील नागरिकांच्या घरात शिरण्याचाही धोका आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन नाल्यातील कचरा काढून नाला साफ करण्याची गरज आहे.
- वाकुडकर, नागरिक


PostImage

Vaingangavarta19

July 29, 2024

PostImage

एका अपघातात जखमी तरुणीचे देवदूत ठरले डॉ.लाडे


एका अपघातात जखमी तरुणीचे देवदूत ठरले डॉ.लाडे

 

बोंडगावदेवी :
अज्ञात ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला देवदूता प्रमाने डॉ. भारत लाडे धाउन आले असेच म्हणावे लागेल डॉ लाडे यांनी वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने  अपघातात जखमी तरुणीचे प्राण वाचले आहे 
 ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास गोंदिया - कोहमारा मार्गावर घडली. स्नेहा पारधी रा. गणखैरा ही काही कामानिमित्त जात असताना एका अज्ञात ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होऊन रोडलगत निपचीत झालेल्या  स्थीतीत पडून होती 
डॉ. भारत लाडे हे मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाववरून त्यांच्या वाहनाने गोंदियाकडे येत होते. दरम्यान, कारंजा जवळ एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. डॉ. लाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला वेळीच स्वतःच्या वाहनाने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्या जखमी तरुणीचे प्राण वाचले.

तरुणीचे वडील उमेश पारधी यांनी
डॉ. लाडे यांचे आभार मानले. विशेष म्हणजे याच मार्गावरून
एक पोलिस वाहन व रुग्णवाहिका गेली. पण, त्यांनी त्या अपघातग्रस्त तरुणीला मदत करने टाळले. रस्त्यात कुणाचा अपघात झाल्यास जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन लाडे यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 28, 2024

PostImage

अतिवृष्टीमुळे कोसळले घर, जीवीत हाणी टळली


अतिवृष्टीमुळे कोसळले घर, जीवीत हाणी टळली 

प्रवीण तिवाडे/कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली:-
तालुक्यातील काटली येथील अतिवृष्टीमुळे अशोक वासुदेव खंडारे यांचे घर कोसल्याची घटना २४ जुलै च्या रात्री घडली आहे 
सुदैवाने त्यांची आई बाहेरगावी गेली असल्याने जीवीत हाणी टळली 
गडचिरोली जिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगफुटी झाली असल्याचे चित्र दिसून येते आहे संततधार पावसामुळे घराच्या भिंतीवर पावसाचे पाणी पडून पुर्णतः ओलीचिंब झाल्याने रात्रीच्या सुमारास भिंत कोसळली व पुर्णपणे घर कोसळले त्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे 
त्याच बरोबर अरुण मुनघाटे व रामदास पाल यांचेही घर कोसळले आहेत त्यांचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे 
त्याचप्रमाणे अतिवृष्टी व सरोवरांचे पाणी सोडण्यात आले असल्याने शेतशिवारात पाणीच -पाणी साठून आहे त्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे त्यामुळे धानपीकिचे मोठे नुकसान होत आहे 
तरी शासनाने अतिवृष्टीमुळे घरे कोसळले, शेतीतील धानपीकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्था कडून करण्यात येत आहे


PostImage

Vaingangavarta19

July 27, 2024

PostImage

निवृत्त शिक्षकांची भरती करने म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय, आदिवासी विकास परीषद व आजाद समाजवादी पार्टी  आक्रमक


निवृत्त शिक्षकांची भरती करने म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय, आदिवासी विकास परीषद व आजाद समाजवादी पार्टी  आक्रमक


आदिवासी विकास परिषद व एएसपी कडून मुख्यमंत्र्यांना निवेदन.

कुरखेडा:-

    'पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याच्या' शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 15 जुलै 2024 रोजी काढलेल्या आदेशाला विरोध करत आजाद समाज पार्टी ने  18 जुलै रोजी प्रशासनाला निवेदन देऊन सुशिक्षित बेरोजगारांना या भरतीत संधी द्यावी अशी मागणी केली होती.
   या मागणीचा कोणताही पाठपुरावा न करता 22 जुलै 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीने निवृत्त शिक्षकांना आवेदन करण्यासाठी पत्रक काढले. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची ही अवहेलना असून, 30-40 हजाराची पेन्शन घेणाऱ्यांना शिक्षक पदावर घेणे म्हणजे बेरोजगारीला वाढविण्याचे धोरण आहे असा आरोप करत आजाद समाज पार्टी व आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली असून जिल्ह्यातील विविध तालुक्यात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्रीना निवेदन देऊन सेवानिवृत्त शिक्षकांना पदावर न घेता बेरोजगार डीएड, बिएड, एमएड झालेल्या तरुणांना संधी देण्यात यावी.अशी मागणी केली. जर 30 जुलै पर्यंत सदर निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी कुरखेडा येथे निवेदन देताना आजाद समाज पार्टी तालुकाध्यक्ष सावन चिकराम,  सचिन गेडाम, व आदिवासी विकास परिषद तालुकाध्यक्ष अंकुश कोकोडे, प्रवेश सहारे, रवींद्र कुमरे , भूपाल सयाम, शिवम जुमनाके, रामेश्वर राऊत, महेंद्र मडावी, विकास कुळमेथे , राजेश्वर राऊत, श्याम कुळमेथे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 27, 2024

PostImage

नागराज व्हनवटे यांच्या प्रयत्नातून कलावंतांच्या मानधनात वाढ


नागराज व्हनवटे यांच्या प्रयत्नातून कलावंतांच्या मानधनात वाढ

पुणे :राज्यातील वृद्ध कलावंताना देण्यात येणाऱ्या मानधनात नुकतीच राज्य सरकारने वाढ केली आहे. राज्यातील वृद्ध कलावंताना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी ही मागणी मूळचे सलगर खुर्द ता.मंगळवेढा येथील रहिवाशी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्य करून असलेले सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांनी गेल्या अनेक  दिवसापासून सरकार दरबारात ही मागणी लावून धरली होती.पूर्वी या योजनेतून अ वर्ग कलावंतास 3150 रुपये, ब  वर्ग कलावंतास 2700 रुपये व क वर्ग कलावंतास 2250 रुपये मानधन मिळत होते. आता सुधारित शासन निर्णयानुसार या मानधनात वाढ करण्यात आली असून सर्वच वृद्ध कलावंताना सरसकट 5000 रुपये मानधन मिळणार आहे.गेल्या दहा वर्षांपासून व्हनवटे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

वृद्ध, महिला, दिव्यांग कलावंत ज्यामध्ये मृदुंगवादक, टाळकरी, कीर्तनकार, ढोलकी वादक, जागरण गोंधळी, साहित्यिक इत्यादी प्रकारचे कलावंत म्हणून ओळख असलेल्या 55 वर्षांपुढील लाभार्थ्यांना दरमहा मानधन दिले जाते. 

या योजनेच्या लाभासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती  मार्फत प्रस्ताव स्वीकारले जातात. विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, कलावंत म्हणून काम केल्याचे काही पुरावे, कात्रणे, तसेच आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यापैकी एकाची शिफारस असलेले पत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. 

अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून कलावंतांनी त्या त्या पंचायत समितीत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन  नागराज व्हनवटे यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 27, 2024

PostImage

मुलीने प्रेमविवाह केल्याने संतप्त वडीलाने जावयाला चाकुने भोकसले 


मुलीने प्रेमविवाह केल्याने संतप्त वडीलाने जावयाला चाकुने भोकसले 

छत्रपती संभाजीनगर:-   मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतप्त वडीलाने जावयाला चाकुने भोकसून यमसदनी पाठवले असल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगरमध्ये  घडली आहे. लग्ना नंतर केवळ तीनच महिन्यात सासऱ्याने जावयाचा काटा काढला  या प्रकरणी मुलीचे वडील आरोपी गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघेही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमित साळुंखे याचे त्याच्या बाल मैत्रिणी सोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांचा धर्म वेग - वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले. काही दिवसांनी अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी नेहमीच देत होते.

शेवटी 14 जुलै रोजी विद्याचे वडील आणि चुलत भावाने संभाजी नगरच्या इंदिरानगरमध्ये दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमितवर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला. या घटनेत अमित गंभीर रित्या जखमी झाला होता. त्याच्या पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गंभीर अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली व गुरुवारलाइ उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 27, 2024

PostImage

प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणीवर केला वर्षभर अत्याचार,लग्नाची गळ घालताच प्रियकर झाला पसार


प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणीवर केला वर्षभर अत्याचार,लग्नाची गळ घालताच प्रियकर झाला पसार

 


आरमोरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील एका तरुणाने प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणावर वर्षभर अत्याचार तर केलाच परंतू तरुणीने लग्नाची गळ घालताच प्रियकर मात्र पसार झाला आहे 
. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.

यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणा भाकासुद्धा घेतल्या होत्या मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा बोलावली मात्र निष्पन्न निघण्यासाठी तरुणाने बेजबाबदारपणा दाखविला त्यामुळे तळजोळ होऊ शकली नाही 
तेव्हा वैतागून सदर पिडीत तरुणीने पोलीस स्टेशन गाठले.


PostImage

Vaingangavarta19

July 27, 2024

PostImage

चक्क खाटेची कावड करून मुलाची चिखलातून 18 कि.मी. पायपीट


चक्क खाटेची कावड करून मुलाची चिखलातून 18 कि.मी. पायपीट

 भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील वास्तव 


 भामरागड : - चक्क खाटेची कावड करून आपल्या वडीलास १८ की.मी. पायदळ जाऊन  भामरागडच्या रुग्णालयात उपचार केले व पुन्हा त्याच पद्धतीने घरी सुद्धा पोहचविले हे आहे भामरागड तालुक्यातील वास्तव मात्र लोकप्रतिनिधीचे या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे 
 शेतशिवारात शेतीचे काम करीत असताना घसरून पडल्याने जखमी झालेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी कसल्याही प्रकारची सोय व वाहन उपलब्ध होत नसल्याने मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल 18 कि.मी. पायपीट केली. वाटेत नदी तुडूंब भरलेली होती, पण पितृ प्रेमही ओसंडून वाहत होते, त्यामुळे नावेतून नदी पार केल्यानंतर रुग्णालयात दाखल केले.

मालू केये मज्जी वय, 67 वर्ष, रा. भटपार ता. भामरागड जिल्हा, गडचिरोली असे जखमी पित्याचे नाव आहे.

जिल्ह्यात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागाला बसला. पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे 

पुसु मालू मज्जी व त्याचे मीत्र कावड घेऊन जातिअसतांना पामुलगौतम नदी तुडूंब भरुन वाहत होती, पण पुसू मालू मज्जी व त्याच्या मित्रांनी हिंमत न हारता नावेत खाट टाकून नदी पार केली. तेथून पुन्हा खाटेवरुनच त्यांनी मालू  मज्जी यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली, त्यानंतर एक्सरे काढला. यात त्यांचा पाय फ्रैक्चर असल्याचे निदान झाले. या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच, पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत, हे देखील वास्तव यामुळे चव्हाट्यावर आले आहे या परिसरात विकासाचे आव आणणारे लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेऊन आहेत काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे  दुर्गम भागातील आदिवासींचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत


मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. गडचिरोलीचा संपर्क तुटलेला असल्याने मुलगा पुसू मालू मज्जी हा निराश झाला. तात्पुरत्या उपचारानंतर वडिलांना घेऊन तो पुन्हा खाटेची कावड करुनच भटपार येथे घरी परतला.


PostImage

Vaingangavarta19

July 26, 2024

PostImage

आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ


आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ

 

गडचिरोलीःनक्षलविद्यांनी एका आत्मसमर्पीत नक्षलवाद्याची र्गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करीत होते 25 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.

नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तोच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली.

विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात मात्र सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 26, 2024

PostImage

नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


 गडचिरोली - : गडचिरोली जिल्ह्यातील लागुनच असलेल्या नवरगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून जात असलेल्या तीन इसमास गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करीत वाचविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली 

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत . अश्यातच  चुरचुरा- नवरगांव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला होता नवरगाव ला जाण्यासाठी नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला, मुलगा व भाचा बाईक वरून नवरगांव पुलावरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव फुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुझपाचा आधार घेवुन लटकले तर एकजन पुलावरच मध्यतरी थांबुन कढल्यांला धरून होते.  त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता भयावह स्थिती पाहून गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी पोहचले परंतु हतबल होवून  त्यांना आल्या पावली परत जावे लागले
 आता आप्पती व्यवस्थापन  DDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते. 

मात्र सांयकाळचे ७ वाजले तरीही  काहीच हालचाली दिसत नव्हत्या तेव्हा चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना  सुखरूप बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले 
आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाहीत


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी - महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर


आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी - महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

 

नवी मुंबई:-

नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या. आज पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. आयोगाने लगेच दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास यादरम्यान चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.

चाकणकर यांनी गुरुवारी (दि.२५) पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई-वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी असेही पोलिसांना सांगितले आहे. या भेटीच्या वेळी सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगितली

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरे जात होती. त्यांच्यावर देखील योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठी ही आयोग प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्दैवाने एखाद्या महिलेला घराबाहेर पडावे लागले; तर नजीकचे पोलीस स्टेशन, वन स्टॉप सेंटर यांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. अश्या महिलांना मदत मिळू शकते, असा विश्वास देण्याची गरज आहे. माध्यमांनी जनजागृतीसाठी पुढाकार करावा, असेही त्यांनी माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून खड्डे बुजविणार


मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून खड्डे बुजविणार

 सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार यांची नगर पंचायत अहेरी च्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनातुन मागणी


अहेरी:- अहेरी नगर पंचायत हद्दीत व अहेरी शहरातील रस्त्यावर खड्डेच- खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर खड्डे पाण्याने भरून आहेत.खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा असल्याचे अंदाज येत नसल्याने अहेरी शहरात नागरिकांची व वाहनांची वर्दळ नेहमीच असते म्हणून पाणी भरलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची  शक्यता नाकारता येत नाही म्हणून अहेरी शहरातील व प्रभागातील खड्डे बुजवा अन्यथा अहेरी शहरात सामाजिक कार्यकर्ते वर्गणी गोळा करून सदर खड्डे बुजवण्याचे प्रावधान हाती घेतील  असे अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी व ईशारा दिला आहे.

अहेरी शहरात व्यापार व आठवडी बाजार आणि शासकीय कामे, रुग्णालयात उपचारासाठी, विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात असे विविध कामे घेऊन सामान्य जनता व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे मोठी  वर्दळ निर्माण होते
अहेरीतील रस्त्यावर खड्डे पाण्याने भरून आहेत भरलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे दाट शक्यता आहे आणि ये-जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन धारकांना वाहतुकीस कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.करिता खड्डे बुजवणे आवश्यक आहे.नगर पंचायत ने या समस्येचा गंभीरतेने विचार करून  सदर खड्डे बुजवा अन्यथा अहेरीत वर्गणी करून खड्डे बुजवणार  मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी व ईशारा देण्यात आले आहे. 

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार, सचिन येरोजवार युवक मंडळी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


अंगावर शहारे आणणारा योगायोग 

 

चंद्रपूर:- "वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता" याच म्हणी प्रमाणे वाघ अचानक समोर उभा झाल्याने एका शेतकऱ्यास जीव मुठीत धरून त्याचेकडे पहात राहावे लागत होते 
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप सुटतो  आणि तो अचानक समोर आला तर भीतीने  बोबळी वळून बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा राहिला.
सध्या सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. पाऊस असूनही शेतकरी आपल्या शेतात रोपे लावण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नावाचे शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलवरून गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलवरून गोविंदपूर या गावी परतत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर अचानक वाघ जंगलातून बाहेर येऊन रस्त्यावर आला. दोघेही समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या मागे किंवा पुढे कोणीच नव्हते. शेतकऱ्याने समोर वाघ पाहून तो अवाक होऊन आता आपले काही खरे नाही असे त्याला मनोमन  वाटत होते
तेवढ्यात मंगरुड कडून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस तेथे पोहोचली. बस चालकाने तात्काळ बस थांबवून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी  वेळ वाया न घालवता एसटी बसमध्ये बसवून त्याची सायकलही बसमध्ये ठेवून एसटी बस रवाना केली तेव्हा वाघ ताबडतोब जंगलाच्या दिशेने निघून गेला 'वेळ आली होती, पण काळ आला नव्हता' या म्हणीच्या धर्तीवर शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. यावेळी वाघ यांना समोर पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितल्याने वाघ व शेतकऱ्याच्या समोरासमोर उभे टाकल्याच्या घटनेची गावात खमंग जोरदार चर्चा झाली.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी


धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी


विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी 10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन

गडचिरोली/नागपूर दि. 25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती
श्रीमती बिदरी यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या

सूचना दिल्या आहेत. धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून

त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर

जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या
योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक
आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप 


गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप 


मुलचेरा:-
मुलचेरा तालुक्यातील गोमणी पासून तर विवेकानंदपूर पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात त्या खड्डयांना तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर मुलचेरा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेकडो विध्यार्थी दररोज ये-जा करतात. विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे. एवढेच नव्हेतर कर्मचारी आणि अधिकारी देखील याच रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना याचा जबर फटका बसत आहे.


मागील एक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्डयांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर रस्त्यावर दुचाकी चालविणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक कसा प्रवास करत असतील याचा विचार न केलेला बरा.

गेल्या पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आंबटपल्ली आणि खुद्दीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला होता. पूर ओसरला असला तरी पुराच्या पाण्याने पुलावर साचलेला गाळ आणि कचरा साफ करण्यात आला नाही. एकीकडे कचरा साचला तर दुसरीकडे खड्यात पाणी साचला आहे. त्यामुळे या पुलावर देखील अपघाताची शक्यता बळावली आहे. मागील चार दिवसांपासून पुलावर कचरा पडून आहे मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही.

आलापल्ली ते आष्टी मार्गावर खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने खाजगी वाहनधारक मागील दोन वर्षांपासून आलापल्ली ते मुलचेरा याच मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्या आलापल्ली ते आष्टी रस्त्यावरील दीना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने हाच एक पर्यायी मार्ग वापरण्यात आला. अश्या परिस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024

PostImage

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू 


सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू 


वरोरा:-
 वरोरा तालुक्यातील टेमृर्डा येथून जवळपास सात लाखाची चोरी करणाऱ्या चोरांना अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सहा आरोपींना जेरबंद केले आहे 
मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शरद सीताराम गुघाणे वय 53 वर्ष हे टेभूर्डा येथे आपल्या पत्नीसह चहाचे दुकान चालवतात 17 जुलै रोजी ते व त्यांची पत्नी उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरांनी चहाच्या दुकानातून सोन्याचे दागिने, रोख एक लाख रुपये, कोको कंपनीचा मोबाईल असा एकूण 7, 80, 500 रुपयाचा माल चोरून नेला. यासंबंधीची तक्रार शरद गुधाने यांनी वरोरा पोलीस ठाण्यात करताच वरोरा येथील गुन्हे शाखा तसेच  चंद्रपूर व कोरपणा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे शिताफिने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे प्रदीप संजय शिरकुरे, आकाश नारायण शिरकुरे, चिंतामण संजय शिरकुरे, हरिणा प्रदीप शिरकुरे, माया देवगडे सर्व राहणार पारधी गुडा धोपटाळा तालुका कोरपणा यांचे सह विकास काळे राहणार चिनोरा यांना अटक केली व त्यांचे जवळून आठ सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चार बांगड्या, एक चपला कंठी, सोन्याचे कानातले दागीने, सोन्याची पोत व सोन्याचा गोफ या दागिन्यासह दोन मोबाईल व चोरी करण्यासाठी वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच 34 ए ए 3324 व एक्टिवा क्रमांक एम एच
31 ईव्ही 9188 असा एकूण 6,85000 रुपयाचा माल जप्त केला. या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचे जवळून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम,  चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोन्डावार, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना व पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शाखा पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं. संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निदर्शनं


राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

 


सिरोंचा :- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही व निधी वाटपात सुद्धा काहीच दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सिरोंचा निषेध आंदोलन करण्यात आले 
 देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.या अर्थसंकल्पात आज पासून सुरू होणाऱ्या जाहिरात बाजीसाठी विविध योजना आहेत, पण आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तर समाधान मानले असते. परंतु लोकसभा निवडणुकीत एन. डी. ए. सरकारला आलेल्या कमी जागा मुळे महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागले अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे.आंध्र प्रदेश, बिहार व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्पात- २०२४ मधून काहीही मिळालेले नाही.हे त्रिवार सत्य आहे.
महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय कदापीही सहन करणार नाही. राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आपण या आंदोलना द्वारे मांडून भाजप पक्षाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे, याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिरोंचा मुख्यालयात बस स्टँड चौक येथे "अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रात रोष, महाराष्ट्रात रोष" असे नारेबाजी करत आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे,
        त्यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला, सचिव - विनोद नायडू,शहर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजू मूलकला, उदय मूलकला, गणेश संड्रा, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण


गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

 


गडचिरोली, दि. 24 : गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल नक्षल्याने पोलीसासमोर आत्मसमर्पण केले आहे 
 शासनाने 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 24 जूलै 2024 रोजी जिल्ह्यात मुसाधर पाऊस असतानाही गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, (वय 45), रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार लच्चु ताडो 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून नक्षल्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षल्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षल्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल नक्षल्यांना माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके जनतेपर्यंत पोहचविणे व इतर काम तो करीत होता. 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. त्याचा 2022 मध्ये ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्यशासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षल्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप- महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात 


गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात 


रानमुल - माडेमुल पोटफोडी नदीच्या पुरामुळे ६ दिवसापासून आवागमन बंद 

 गडचिरोली:-
गंभीर आजारी (साप चावल्याचा संशय) महीलेस आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप रुग्णालयात पोहचवून उपचारासाठी दाखल केले आहेत 
गडचिरोली  मुख्यालयाला पासून अवघ्या १५ कि.मी अंतरावर अतिदुर्गम भाग रानमुल ते माडेमुल असून पोटफोडी नादीला संततधार पावसामुळे पुर आल्याने गेल्या आठ दिवसापासून त्या गावांच संपर्क  तुटला आहे माडेमुल वरुन रानमुल ते गडचिरोली येणे जाणे अजुनही बंदच आहे.

दि.२४ चे रात्रौ माडेमुल येथील कल्पना परसे हि गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे आणावयाचे होते. तेव्हा माडेमुल येथील गावकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक( SD RF)
यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी बोटीच्या सहाय्याने  कल्पना हिला गडचिरोली रुग्णालयात पोहचविण्यात आले. मालेमुल ते गडचिरोली संर्पक अजुनही तुटला असुन आता मात्र आप्पती व्यवस्थापन व गावकरी सहकार्य करीत आहेत.

पोटफोडी नदी पुरामुळे आजुबाजुच्या शेतात पुराचे पाणी घुसले असुन शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहेत तेव्हा शासनाने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर  हल्ला करून जागीच केले ठार


शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर  हल्ला करून जागीच केले ठार

नागभीड : -
 आपल्या स्वतःच्या शेतात धान रोवणी करीत असताना एका शेतकऱ्यावर वाघोबाने हल्ला करून शेतकऱ्यास जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.  मृतक दोडकू झिंगर शेंदरे  वय(६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू होता. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला.  काही बांद्यामधील रोवलेले धान वाहून गेले होते त्या ठिकाणी  दोडकू धान रोवणी करीत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळपास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करुन  त्याचे शव
उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
त्वरित त्या गरीब शेतकऱ्याच्या परीवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024

PostImage

सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन 


सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन 


नंदुरबार:-आपल्या गावातील शाळा दुरुस्ती करीता चक्क सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे 
खांडबारा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेची इमारत ही जीर्ण अवस्थेत पोहचली असल्याने सरपंच अविनाश गावीत यांनी जिल्हा परिषद कडे शाळा दुरुस्ती करीता वारंवार पाठपुरावा केला मात्र या बाबतीत शासन उदासीन असल्याचे दिसून येत होते 
ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी मला निवडून दिले मात्र मी लोकांना काय उत्तर देणार म्हणून त्यांनी अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले व काही ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्याचा हात पुढे केला 
तेव्हा त्यानी जिल्हा परिषदेच्या पुढे अर्धनग्न आंदोलन सुरू केले 
 भारतीय लोकशाहीमध्ये गावाचा सरपंच हा तळागाळातील लोकांचा लोकसेवक असतो.

आपल्या गावातील शाळेच्या दुरुस्ती कडे शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी असे सरपंचास अर्धनग्न आंदोलन करावे लागते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल 

सरपंचांना आपल्या गावातील लेकरांचा शिक्षणासाठी उत्तम सोय व्हावी म्हणून पहिल्यांदाच सरपंच कपडे काढताना पाहिला असल्याचे बोलले जात आहे सरपंच अविनाश गावित खरंच आपलं पाऊल गावाचा हितासाठी पुढे आहे आपणास शुभेच्छा आपली व खांडबारा ग्रामस्थांच्या लढाईला यश मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे 

ही चमकोगिरी नाही तर वास्तव आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024

PostImage

शेतात जात असताना पती- पत्नीवर केला जंगली वराहाने हमला,पती पत्नी दोघेही जखमी


शेतात जात असताना पती- पत्नीवर केला जंगली वराहाने हमला,पती पत्नी दोघेही जखमी

चामोर्शी तालुक्यातील कढोली येथील घटना

कार्यकारी संपादक/ प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता १९

चामोर्शी:-
तालुक्यातील कढोली (अनखोडा) या गावातील पती पत्नी मिळून आपल्या शेतशीवाराकडे जात असताना अचानक जंगली वराहाने हमला करुन जखमी केल्याची घटना 23/07/2024 ला सकाळी घडली आहे 

प्रफुल ताराचंद सिडाम वय 38 वर्ष कविता प्रफुल सिडाम वय 35 वर्ष रा. कढोली ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे जंगली वराहांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पती पत्नीचे नावे आहेत

प्रफुल व त्याची पत्नी कविता दोघेही आपल्या शेतशिवाराकडे जाताना जंगली वराहांनी त्यांच्यावर हल्ला केला व फरफटत नेले त्या दोघांनी जंगली वराहांविरूद्ध भरपूर प्रमाणात प्रतिकार केला व त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटले जशी गावात ही घटना माहिती झाली ते त्यांना जखमी अवस्थेत आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व लागलीच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत कढोली गावात जंगली डुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असून शेतीची नुकसान तर करतातच परंतू आता मानवावर सुद्धा हल्ले सुरू झाले असल्याने या हल्ल्यात जखमीना वनविभागाकडून त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024

PostImage

मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ


मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

वैरागड :-
 आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये दारुबंदी असली तरी बहुतेक गावामध्ये दारुचा महापूर वाहत आहे. मेंढेबोडी आणि मोहटोला जवळील बहुतेक गांवात दारुबंदी असल्याने दारु पिण्यासाठी मेंढबोडी आणि मोहोला या गावात दररोज संध्याकाठी तळीरामांची गर्दी असल्याने महिलांचे जगणे कठीन होत असून याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हयात दारुबंदी कायद्याने बंदी असली तरी संपूर्ण जिल्हयात
दारुचा महापूर वाहत आहे गडचिरोली लगतच्या चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह‌यातून जिल्ह्यात दररोज देशी विदेशी दारुचा पुरवठा होत असतो. तर काही गावात गावठी मोहफुलाची अवैध्य दारू विक्री सुरु आहे असाच प्रकार आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतेक गोव्यामध्ये सर्रासपणे दारुविक्री सुरु असल्याचे दिसून येतेय. काही गांवात महिलाच्या व बचतगटाच्या पुढाकाराने दारुबंदी केल्याचे दिसून येते परंतु आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढेबोडी आणि मोहटोला येथे मुबलक दाऊ विक्री केली जाते. मोहझरी,सुकाळा,शिवणी या गावात दारुबंदी असल्याने नजीकच्या मेंढेबोडी  येथे दारु पिणाऱ्या तळीरामांची सायंकाळच्या सुमारास गर्दी दिसून येते तर कोजबी, लोहारा, करपडा, विहीरगांव येथे दारुबंदी असल्याने न‌‌जीकच्या मोहटोला येथे दारु पिणा-यांची वर्दळ असते त्यामूळे मेंढेबोडी आणि मोहटोला ही दोन्ही गावे तडीरामासाठी आवडीचे ठिकाण असल्याचे दिसून येत आहे 

प्रतिक्रिया,
" दाऊ विक्रेत्यांचा शोध घेणे सुरु असून दाऊ विक्रने विक्री करतांना आढवल्यास त्याचे वर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल"

सागर बिट अमलदार वैरागड.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024

PostImage

जन्मदात्या बापाचा मुलाने  दगड मारुन  केला खून


जन्मदात्या बापाचा मुलाने  दगड मारुन  केला खून.


उपसंपादक/ प्रमोद झरकर 


सिंदेवाही : दिनांक २२/०७/२०२४ रोजी सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील श्री देवेंद्र तलांडे यांनी फोन वरून श्री तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांना माहिती दिली की,आंबेडकर चौक वॉर्ड क्र.२ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा.वासेरा यांनी आपल्या वडीलाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

 

या माहिती नुसार सपोनी तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही  तात्काळ पोलीस ठाण्याचे सपोनि स्थूल,पोउपनी सागर महल्ले,पोहवा विनोद बावणे,पोलीस अंमलदार रणधीर मदारे यांचेसह वासेरा गावासाठी रवाना झाले.परंतु प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट घोषित केला होता.अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वासेरा गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद होते.त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी आव्हान होते.

 

शेवटी अथक परिश्रम व पोलीस मित्र तसेच आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने वाकल ते जामसाळ्या मध्ये असलेल्या शेतातील नाल्यातिल कमरेच्या वर पाण्यातुन ट्रॅक्टरने मार्ग काढत जामसाळ्या पर्यँत पोहचुन पुढील प्रवास ट्रक्टरच्या मुंडीवर बसून घटनास्थळ गाठले.

 

पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्या नंतर जखमी अवस्थेत असलेले अशोक आबाजी रामटेके यांना पोलीस पथक व वासेरा गावातील युवक व त्यांचे नातेवाईक यांचे मदतीने आल्या मार्गानेच परत सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

सदर घटनेसंबंधाने मृतक याची पत्नी अर्चना अशोक रामटेके यांनी सिंदेवाही पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की,मृतक हा उसनवार घेतलेले पैसे परत करावयाचे आहेत.तुझे कानातील सोन्याचे रिंग मला दे असे म्हटल्याने मृतकाच्या पत्नीने त्याला ५०० रुपये दिले व ज्याचे घेतले त्याला दे म्हणून सांगितले.

 

मृतकाने त्यातील ४०० रुपये देऊन १०० रुपये स्वतःकडे ठेवून घेतले.त्याबाबत मृतक व त्याचा चुलत भाऊ कैकाडू रामटेके याचे सोबत मृतकाच्या पत्नीसोबत बोलचाल करीत असतांना यातील आरोपी हा येऊन मृतकास तू दारू पिण्यासाठी घरी पैसे का मांगतोस ? तुला दारू प्यायची सवय आहे तर दारू पिऊन चुपचाप झोपस का नाही ? असे म्हटल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.झगडा भांडण होऊन आरोपीने मृतकास लाथाबुक्क्यानी मारहाण करून खाली पाडले.

 

त्यानंतर मृतक उठून मनोज रामटेके यांच्या घराकडे चालत चालत जात असतांना आरोपीने मृतकास जिवाने मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील दगड मृतकास फेकून मारल्याने कानाचे मागील बाजूस  डोक्यावर लागून मृतक गंभीर जखमी झाला.

 

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे डॉक्टरांनी तपासनिअंती मृत घोषित केले.मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा अमित अशोक रामटेके वय २४ रा.वासेरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार,तुषार चव्हाण करीत आहेत.

 

सदर कामगिरी  मुम्मका सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तुषार चव्हाण सिंदेवाही यांचे नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल,पोउपनी सागर महल्ले,अनिल चांदोरे,विनोद बावणे,रणधीर मदारे,सुहास करमकर,मोहीत मेश्राम यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

 शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची  मदत वितरित


 शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची  मदत वितरित

गडचिरोली दि.२२ : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. 

 याच महिन्यात दिनांक ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील  दोलू लुला तीम्मा यांना, २ जुलै रोजी मौजा जीवनगट्टा येथील  चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते, त्याचे वारस  पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना  तसेच मौजा मरपल्ली येथील  अंकुश  पांडू कुळयेटी हे दिनांक ८ जुलै  २०२४ रोजी  मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते. त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी भाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली

यावेळी  आदित्य  आंधळे  गटविकास अधिकारी , सचिन  कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी ,  पी. एन . उसेंडी तलाठी एटपल्ली ,. पी . डी. आत्राम तलाठी तोडसा  , देवाजी गावडे कोतवाल , सुरेश दुर्गे कोतवाल ,  सचिन गेडाम कोतवाल उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 


 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 


धुळे:-
जिल्ह्यातील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा येथील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण झाली असून उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 
विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना आजार होत आहेत त्यामुळे सदर शाळेच्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधिक्षक,व ईतर बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक शाखा (साक्री) धुळे चे गणेश गावीत, तानाजी बहीरम यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे यांना निवेदन देऊन केली आहे 
 प्रत्यक्ष अनुदानित आश्रम शाळा कुसुंबा ता. जि.धुळे या शाळेला भेट दिली असता अजून 45 ते 47 विद्यार्थी बाधित आहेत.या घटने नंतर साफ सफाई करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून एकदा ही पाणी परीक्षण करण्यात आले नाही. स्वयंपाक चुलीवर बनवला जातो गॅसचे अनुदान लाटले जाते मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही.जे विद्यार्थी तक्रार करतात त्यांना बोर्डाच्या परीक्षेत टार्गेट केले जाते.म्हणून विद्यार्थी बोलत नाही.वरून संस्था एका भाजप पक्षाच्या राजकीय नेत्याची शाळा असून या शाळेत असा गंभीर प्रकार घडला आहे.यांच्यावर सरकार कायदेशीर कार्यवाही करणार का ? कुसुंबा येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे भयानक हाल व अपेष्टा होत आहेत 
दि.20/7/2024रोजी  कुसुंबा आदिवासी आश्रम शाळेतील दुषित पाणी पिल्याने उलट्या,ताप संडास  विद्यार्थ्यांना व्हायला लागले.दि.17/7/2024 रोजी विहीरीतील पाणी आटल्याने बाहेरून पाण्याचे टँकर मागितले असेही सांगण्यात येत आहे.एकीकडे विहीरीत संडासाचे पाणी जमिनीत मुरते असे ही शाळेतील विद्यार्थी सांगत आहे.खर तर विद्यार्थाचे निवासी इमारत आहे.त्या इमारतीला लागून विहीर व संडासाचे कुंड्या ही विहीर जवळ आहे. असे दुषित पाणी पिल्याने शाळेतील विद्यार्थी उलट्या, संडास करतांना शिक्षकांना दिसून आल्या नंतर लगेच धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले तरी काही मुले ,मुली अजून ही शुद्धीवर नव्हत्या यात लहान मुले जास्त होते.त्याच दिवशी पुन्हा दुपारी आणि संध्याकाळी तीन मुले एम्बुलंस  मध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचारासाठी आणले . धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा कुसुंबा येथील ज्या धडगाव शहादा तळोदा अक्कलकुवा या तालुक्यातील पालकांचे विद्यार्थी कुसुंबा आश्रम शाळेत असतील त्या पालकांना आपल्या मुलांना बघण्यासाठी यावे कारण की लहान लहान लेकरू या ठिकाणी राहतात ते कसे राहतात हे पाहणं गरजेचं आहे.अनुदानाच्या पायी लहान जीवाशी खेळलं जात आहे.मी स्वतः त्रास करताना बघितले आहे. तरी या शाळेतील या विद्यार्थ्यांना कशामुळे आजारी पडले याकडेही आपलं लक्ष दिलं पाहिजे प्रत्यक्षपणे आपल्या मुलांना विचारा कोणते पाणी पिले आणि ते पाणी कसे होते तेही विचारा आणि पुढील कारवाई आपल्या पालकांनीही करावी . 25 लोकांना करणे दाखवा नोटीस एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बजावली आहे.तसेच झालेल्या घटनेची चौकशी तीन अधिका-या मार्फत केली जाणार आहे.संबधित संस्थाचालक व इतर लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल का?असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान 


कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान 

कुरखेडा:-
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूल कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहून गेला आहे असा सनसनाटी आरोप गडचिरोली - चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केला आहे 
प्रत्यक्षात सती नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाची  पाहणी करताना खासदार गडचिरोली-चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी  यावेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शाळेंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची व्यवस्था करण्यात यावी व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी  नदीच्या पलीकडे टेन्ट उभारून डॉक्टरची टीम व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी.
  यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना सुरेंद्रभाऊ चंदेल, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयंत पाटील हरडे, नीताराम कुमरे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुका अध्यक्ष कुरखेडा आम आदमी पार्टी ईश्वर ठाकरे, नाशिर हासमि, मुनेश्वर बोरकर, मुजफ्फर शेख, गिरधर तीतराम, प्रभाकर तुलावी, छगन शेडमाके, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार पिकु बावणे, मोहित अत्रे, लीलाधर भरे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024

PostImage

मानवी सांगाडा सापडला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत 


मानवी सांगाडा सापडला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत 

विठ्ठलवाडा येथील घटना 

आष्टी:-
गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी सांगाडा कुणाचा याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्गावर
विठ्ठलवाडा बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत आहे. मागील बऱ्याच वर्षापासून कुणीही या इमारतीत वास्तव्य करीत नसल्याने दुरावस्था झालेली आहे. आजू बाजूला हिरवे गवत यासह छोटे मोठे झाडे झुडपे वाढलेली आहेत. अश्यातच गोंडपिंपरी तालुक्यात मागील दोन तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. दि. २१ जुलै रविवारला सकाळ पासूनच पावसाला सुरवात झाली.


दुपारच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतल्याने गावातील एक इसम बकऱ्या चारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गेले. बकऱ्या चारत असतानाच अचानक जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याने सदर इसम चक्रावला. लागलीच सदरची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची महिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा असल्याची माहिती गोंडपीपरी पोलीसाना देण्यात आली. गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. पाहणी केली असता जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा दिसला. यात सदर अज्ञाताची डोक्याची कवटी शरीरापासून वेगळी झालेली दिसली. शरीराचा काही भागाचा सापळाही

दिसून आला. मानवी सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलविन्यात आले. रात्री सात वाजे पर्यंत चौकशी सुरू होती. तपासणीअंती मानवी सांगाडाचे काही नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले.

एखादा वेडसर इसम तिथे वास्तव्यास राहिला अन् तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर इसमाचा सांगाडा एका पिशवीत भरून विठ्ठलवाडा येथील स्मशानभूमीत पुरविण्यात आला आहे. यावेळी गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य शुभम पिंपळकर, पोलीस पाटील शारदा पिंपळकर, टीकाराम डाहुलेसह गावातील नागरिक हजर होते.

अगदी गावाला लागूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची जीर्ण इमारत आहे. हाकेच्या अंतरावरच खाद्य पदार्थाची दुकाने यासह इतर दुकाने आहेत. उन्हाळ्याचे दिवसात याच इमारतीच्या परिसरात तरुण मंडळी क्रिकेट खेळत असतात. लघुशंका आली की अनेकजण याच इमारत परीसराचा आधार घेतात. असे असतानाही मृतदेहाची दुर्गंधी का आली नाही असा प्रश्न अनेकांना पडला. अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा सापडल्याने नागरिकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ तर धापेवाडाचे ५ गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू 


अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाचे ३३ तर धापेवाडाचे ५ गेट मधून पाण्याचा विसर्ग सुरू 


प्रतिनिधी / भंडारा : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खोलगट भागात अनेक तास पाणी पाणी साचून राहील्याने हाहाकार उडाला.

वाहतूक प्रभावीत झाली. घरादारात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. व्यापारी प्रतिष्ठानांतील तळभागात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. अतिवृष्टीमुळे गोसे खुर्द धरणाचे ३० गेट अर्धा मिटरने तर ३ गेट एक मिटरने उघडण्यात आली असून ३९८७.७५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडाची ५ गेट ०.७५ मिटरने उघडण्यात आली असून ३६३.१५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भंडारा शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला. दुपारी १२.३० पर्यंत ९५.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४० मंडळापैकी २३ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. सर्वाधिक ३४१.५ मिमी पाऊस लाखांदूर तालुक्यातील बारव्हा मंडळात नोंदविण्यात आला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक मार्ग अवरूद्ध झाले. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील नाली, गटारे ओसंडून वाहीले. नाली व गटारातून पाणी परिसरात पसरल्याने सगळीकडे प्लास्टीक व कचऱ्यांचा खच पहावयास मिळाला. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुट पाणी शिरल्याचे चित्र पहावयास मिळाले. प्रशासनाच्यावतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. सायंकाळपर्यंत नुकसानीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

या भागात शिरले पावसाचे पाणी -

शहरातील ग्रामसेवक कॉलोनी परिसर, भोजापूर व शिक्षक कॉलोनी महामार्ग परिसर, शिवाजी नगर नागपूर नाका भाग, भंडारा-वरठी महामार्गावरील डीमार्ट परिसरातील खोलगट भाग, आयटीआय परिसर, खात रोड आनंद मंगल कार्यालय परिसर, जुना साई मंदिर कारधा रोड परिसर, मेंढा परिसरातील सखल भाग पावसामुळे प्रभावीत झाले. खोलगट भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा सामान्य रूग्णालयातील खोलगट भागातही अर्धा फुटापर्यंत पाणी साचून होते. नागरिकांनी पाण्यातून मार्गक्रमण केले. शहराचा बाहेरील भाग अतिवृष्टीने सर्वाधिक प्रभावीत झाला.

नगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन मदतीला -

शहरात अतिवृष्टीमुळे नाली व गटारे अवरूद्ध झाली. परिस्थिती सामान्य करण्यासाठी सकाळपासून नगरपालिका कर्मचारी हाती टिकास, फावडे व अन्य साहित्यांसह गटारांची स्वच्छता करताना दिसून आले. नाल्यांतील केरकचरा बाजूला सारून पाणी वाहते करण्याची कामे प्राधान्याने करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली -

शहरातून जाणाऱ्या भंडारा-साकोली महामार्गावरील जूना कारधा टोल नाका शेजारील डोंगराची दरड कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक प्रभावीत झाली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत वाहतूकीचा मार्ग प्रशस्त केला.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

 गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना  22 जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर 


 गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना  22 जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर 

गडचिरोली:-
अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे प्रादेशिक हवामान विभागाने सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील त्या त्या भागाचा आढावा घेऊन त्या स्थानीक क्षेत्रात शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत 
गेल्या तीन दिवसांपासून ढगफुटी सुरू असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा , गोदावरी, प्राणहिता,बांडीया,इंद्रावती इत्यादी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात नदी नाल्यांना पुर आल्याने ३७ मार्ग बंद आहेत शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरू असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देने आवश्यक आहे 
त्यामुळे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था अशा सर्व शाळांना २२ जुलै सोमवार ला सुट्टी जाहीर केली आहे 
सदर माहिती सर्व विभागांना पाठविण्यात आली आहे 
 पुन्हा २४ तास पाऊस संततधार कोसळण्याची चिन्हे असल्याने बाहेर गावाहून आवागमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा मुख्यालयाशी तुटला संपर्क 


अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा मुख्यालयाशी तुटला संपर्क 

गडचिरोली:-
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे 
जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगफुटी झाली असल्याचे चित्र दिसूत येत आहे आणि संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहेत जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा,वडसा (देसाईगंज), आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली,अहेरी, भामरागड, सिरोंचा आदी तालूक्यात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची अपरिमीत हाणी झाली आहे . शेतकऱ्यांचे सर्व पीके पाण्याखाली तीन दिवसांपासून असल्याने पीके सडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन पुढे काय होणार या विवंचनेत सापडला आहे 
जिल्ह्यातील ३० ते ३५ मार्ग नदीनाल्याच्या पुरामुळे बंद झाले आहेत तसेच जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यांनी सुद्धा संपर्क तुटला आहे  अशा परिस्थितीत एखाद्या अति आजारी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास संभवतो आहे 
शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणं सुद्धा शक्य नाही त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासन देणार काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सम्पन्न


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सम्पन्न


गडचिरोली :-
राज्यात विधानसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारी करीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, आमदार अभिजीत भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान,  माजी खासदार मारोतराव कोवासे,  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम.  पेंटारामजी तलांडी उपस्थित होते. तसेच माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी,  शहराध्यक्ष  सतीश विधाते, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष  वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, मनोज अग्रवाल, राजेंद्र बुल्ले, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, डॉ. अब्दुल हकीम, सतीश जवाजी,  दत्तात्रय खरवडे,  दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार,  वामनराव सावसाकडे, राजेश ठाकूर, कल्पनाताई नंदेश्वर, सोनलताई कोवे, रजनीकांत मोटघरे, राकेश रत्नावार, लालाजी सातपुते, अनिल कोठारे, शँकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, केसरी पा. उसेंडी मंगलाताई कोवे, पुष्पलताताई कुमरे, पुष्पाताई कुमरे, रिताताई गोवर्धन, यशवंत हलामी, संदेशाताई, विद्याताई दुग्गा, वैशालीताई कोमलकर, मंजूताई आत्राम, आशाताई वेलादि, मालताताई पुढो, प्रीती बारसागडे,आचल चलकलवार, रजनी नन्नेवार, रवींद्र चलाख, शिवराम कुंभरे, वसंत चलाख,स्वप्निल बेहरे, नीलकंठ गोहने, विनोद कुंभरे, मोहन मस्के, अनिल किरमे, खुशाल कुकुडे, हर्ष भांडेकर, रमेश कोठारे, दिवाकर निसार, ढीवरू मेश्राम, नेताजी गावतुरे, नीलकंठ निखाडे, मनोज बोरकर, मोरे साहेब, सुभाष कोठारे, राजाराम ठाकरे, मिलिंद बारसागडे, पुरुषोत्तम सिडाम, जीवनदास मेश्राम, सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी 


दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी 


 देसाईगंज:- 
दोन दुचाकींच्या आमोरासमोरच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कोंढाळा गावाजवळ आज सकाळी १०.३० वाजताचे सुमारास घडली 


प्राप्त माहितीनुसार एक तरुण आपली दुचाकी क्रं.MH40BU8293 ने देसाईगंज कडे जात होता तर विरुद्ध दिशेने आरमोरी कडे एक वयस्क इसम आपल्या स्कुटी क्रं.MH 34 BT8541 ने येत असताना कोंढाळा जवळील धोंडीनाला येथे दोन्ही दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक झाली त्यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले 
 ४० वर्षीय ब्रम्हपुरी येथील वयस्क इसमाचे पाय मोडले असून निलज येथील २९ वर्षीय तरुनही गंभीर जखमी झाला आहे 
सदर घटनेबाबत गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी  झाली होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश तुपाट यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वृत्त लिहिपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाहीत.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

चिचपल्ली येथील  मामा तलाव फुटल्याने ३०० घरात घुसले पाणी ,नागरिकांचे बेहाल  नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा-पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


चिचपल्ली येथील  मामा तलाव फुटल्याने ३०० घरात घुसले पाणी ,नागरिकांचे बेहाल

 नागरिकांपर्यंत तातडीने मदतकार्य पोहोचवा-पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर, दि.२१- संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अश्यात चंद्रपूर येथील चिचपल्ली गावातील ३०० घरांमध्ये पाणी शिरल्याचे कळताच पालकमंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील नागरिकांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून यासंदर्भात पहाटे ६.३० वाजता माहिती दिली. तातडीने मदतकार्य मिळणे अपेक्षित असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात आले.

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य पोहोचविण्याचे निर्देश दिले. ‘चिचपल्ली गावाची प्रत्यक्ष पाहणी करा. तेथील नुकसानीचे पंचनामे करा. यासोबतच गावातील लोकांची तातडीने जिल्हा परिषद शाळेत राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करा,’ असे स्पष्ट आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे आणि महानगर उपाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राकेश बोमनवार यांनी देखील प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024

PostImage

मासे पकडण्याचा नाद बितला जीवावर,वर्षीय बालकाचा तलावात बुडून झाला मृत्यू.


मासे पकडण्याचा नाद बितला जीवावर,वर्षीय बालकाचा तलावात बुडून झाला मृत्यू.


देसाईगंज:

देसाईगंज तालुक्यापासून जवळच असलेल्या कोंडाळा येथे गाव तलावांमध्ये बुडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंश विजय भुते वय आठ वर्षे असे मृतक बालकाचे नाव आहे सदर घटना 20 जुलै रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकिस. आली  कोंडाळा येथील वंश भुते व घराशेजारील दोन ते तीन मुले शनिवारला दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते मात्र काही वेळानंतर सोबत असलेली मुले आपापल्या घरी आले मात्र वंश हा घरी आला नाही एकटाच तलावाजवळ राहिला गावातील काही नागरिक सतत पाणी येत असल्याने तलाव पाण्याने किती भरला म्हणून बघण्याकरिता गेले असता त्यांना तलावातील पाण्यावर एक मुलगा तरंगताना त्यांना दिसला आणि त्या मुलाचे शालेय कपडे सुद्धा तलावाच्या पाळीवर दिसले असता लगेच तलाव बघण्याकरिता गेलेल्या लोकांनी गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतक मुलाला पाण्यातून बाहेर काढले आणि घटनेच्या पंचनामा करून मृतक बालकाचे शव शवविच्छेदनाकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथे पाठवीले. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

नाबालीक मूलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका यूवकाला अटक


नाबालीक मूलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका यूवकाला अटक

 


कूरखेडा-
   शहरातीलच एका नाबालीक मूलीला फूस लावत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपा वरून येथील आझाद वार्ड निवासी शूभम सूरेश जौसीया वय २७ या यूवकाला आज कुरखेडा पोलीसांनी अटक केली आहे 
 नाबालीक मूलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा यूवक अल्पवयीन मूलीचे मागील काही महिण्यापासून लैंगिक शोषण करीत होता  सदर बाब तिचा कूटूंबियाना समजताच त्यानी त्या यूवका विरोधात पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल केली तक्रारीवरून आरोपी शूभम यांच्या विरोधात भारतिय न्याय संहिता ६४(१) ६४(२) एम.आय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपीला गून्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला होता यावेळी पोलीसानी तत्परता दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या माहीतीवरून त्याला अटक केली.घटनेचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

नाल्याचे पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोघांना गमवावा लागला जीव 


नाल्याचे पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोघांना गमवावा लागला जीव 

चंद्रपूर जिल्ह्यातील घटना,  एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू

 

नागभीड:-
  तालुक्यात पुर पाहण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्ती पुरात वाहून गेल्यात त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोधमोहीम सुरू आहे.  या दोन घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत.

पहिली घटना विलम येथे घडली. विलम येथील ऋणाल प्रमोद बावणे (११) हा मुलगा सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा या नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करीत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. आजुबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला.

दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

खा.डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांची घेतली भेट 


खा.डॉ.नामदेव किरसान यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांची घेतली भेट 


गडचिरोली ::  जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी संजय दैने यांचे सोबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली व कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुसी सिंग, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, नदीम नाथानी योगेंद्र झंजाळ उपस्थित होते. 
बैठकी दरम्यान आस्टी -सिरोंचा महामार्गाचे काम जलद गतीने करने, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहेत त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता नियमित बससेवा पूरविणे 
या सारख्या इतर विकासात्मक कामाच्या दृष्टीने आणि मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापण च्या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सुविधा तातकाळ पूरविण्याच्या सूचना केल्या.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024

PostImage

 शेतातरोवणीच्या कामात व्यस्त असतांना अचानक कोसळली विज एक महिला ठार तर तीन जखमी


 शेतातरोवणीच्या कामात व्यस्त असतांना अचानक कोसळली विज एक महिला ठार तर तीन जखमी

 

 भंडारा : तुमसर तालुक्यातील मांगली शेत शिवारात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. यावेळी वीज कोसळल्याने रोवणीच्या कामावर असलेल्या एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन महिला मजूर जखमी झाल्या. अन्य २ पुरुष मजूर थोडक्यात बचावले.

अंतकला हिरामण नेवारे (६०) रा. मांगली असे मृत महिला मजुराचे नाव आहे. तसेच निला नीलकंठ करंडे (६२), शशिकला साहेबलाल शरणागत (५५), विजया मुन्नालाल शरणागत (५७, सर्व रा. मांगली अशी जखमी महिला मजुरांची नावे आहेत. जखमी महिलांना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच देवसर्रा गावात आलेल्या वादळाने अनेक घरांचे छत उडाले आहे. शेतकऱ्यांचे सौर ऊर्जेवरील पॅनलचे नुकसान झाले आहे.

वीज कोसळून महिला मजूर आणि शतेकरी दगावण्याची ही याच आठवड्यातील सलग तिसरी घटना आहे. जिल्ह्यात सध्या रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

कर्णकर्कश बुलेट दुचाकीच्या सायलेन्सवर पोलीसांनी चालविला बुलडोझर


कर्णकर्कश बुलेट दुचाकीच्या सायलेन्सवर पोलीसांनी चालविला बुलडोझर

 

अहेरी :-
अहेरी पोलिसांच्या वतीने शहरामध्ये कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्या बुलेट दुचाकीच्या सायलेन्सवर बुलडोझर चालविले आहे त्याचबरोबर कागदपत्र नसलेल्या वाहनांच्या विरोधात तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या विरोधामध्ये धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान कालपासून तब्बल 06 बुलेटवर फटाके फूटण्याचा आवाजाचे सायलेन्सर बसवल्या कारणाने कारवाईचा बडगा अहेरी पोलिसांतर्फे उगारण्यात आला आहे. त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर व कागदपत्र नसलेल्या वाहनांवर देखील दंडात्मक कारवाई अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्याकडून करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून अहेरी व आलापल्ली शहरात बुलेटचा सायलेन्सर बदलवून कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज करीत फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना माहिती दिली. तेंव्हापासून अहेरी पोलिसांनी अशा टवाळखोर तरुणावर नजर ठेवली होती. अखेर एक-एक करत तब्बल सहा बुलेट धारकांवर त्यांनी कारवाई केली. एवढेच नव्हे तर सहा बुलेटचे सायलेन्सर काढून त्याच्यावर बुलडोजर चालविला आणि त्या सहा बुलेट धारकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे अहेरी व अल्लापल्ली शहरातील त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
   अहेरी पोलिस विभागाच्या या धडक कारवाईमुळे बेजबाबदारपणे चालविणाऱ्या दुचाकी धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 
त्यामुळे बुलेट धारकांनी आपल्या बुलेटला कंपनीकडून मिळालेले साधेच सायलेन्सर बसवावे जेणेकरून कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना याचा त्रास होणार नाही. व पोलिसांच्या कारवाईला देखील त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दखल घेण्याचे आवाहन अहेरी पोलिसांच्या वतीने वतीने दुचाकी धारकांना करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

मोठी बातमी  मुसळधार पावसामुळे रपटा गेला वाहून, गर्भवतीला जेसीबीच्या बकेटमधून करावा लागला नाला पार


मोठी बातमी 
मुसळधार पावसामुळे रपटा गेला वाहून, गर्भवतीला जेसीबीच्या बकेटमधून करावा लागला नाला पार

 


भामरागड:-
तालुक्यातील (१०३) या मुख्य मार्गाचे काम सुरू असून नाल्यांची पुलीयांची कामे सुरू असल्याने तात्पूरत्या रपट्याची व्यवस्था करण्यात आली मात्र काल दि.१८ जुलै ला मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याच्या नाल्यावरील रपटा वाहून गेला,अवजड वाहनांची वर्दळ आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आधीच दयनीय अवस्था झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची आता मुसळधार पावसामुळे पुरती 'वाट' लागली आहे. या रस्त्याच्या वाईट अवस्थेचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह गरोदर मातांनाही सोसावा लागत आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील एका नाल्याचा रपटा वाहून गेल्याने प्रसूतीसाठी जाणाऱ्या एका गरोदर महिलेवर चक्क जेबीसीच्या बकेटमध्ये बसून नाला ओलांडण्याची धोकादायक वेळ ओढवली.
मात्र रुग्णालयात पोहोचल्याचे त्या महिलेला समाधान मीळाले


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

मुलचेरा तालुक्यातील मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली आर्थिक मदत.


मुलचेरा तालुक्यातील मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली आर्थिक मदत.


मुलचेरा:-  तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील उपचारासाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली.आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा दिले.

यावेळी समस्त पेंदाम कुटूंबाने राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे नेहमी आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील अपघात ग्रस्त,आजाराने पीडित तसेच अडी-अडचणीत असलेल्या प्रत्येक गरजूला मदत करीत असतात.यावेळी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप आत्राम, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, इंदारशाह पेंदाम हे उपस्थित होते.!


PostImage

Vaingangavarta19

July 19, 2024

PostImage

मार्कडेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार अद्याप पूर्ण झाले नाही यांची खंत  शिवसेना(ऊबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खांडवे


मार्कडेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार अद्याप पूर्ण झाले नाही यांची खंत 
शिवसेना(ऊबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खांडवे

 


चांमोर्शी -: 
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील मार्कडा देव येथे वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडेश्र्वर मंदिराचे जिर्णोद्धार काम गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत आहे ते पूर्ण करण्यास भारतीय पुरातत्व विभाग व लोकप्रतिनिधी दखल घेतली याची खंत शिवसेने ( उबाठां) चे संपर्क प्रमुख शिवाजी खोंडवे यांनी मंदिर स्थळाला भेट दिली त्यावेळी व्यक्त केले 
     गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड व मुलचेरा तालुक्याचे शिवसेना ( उबाठा) चे संपर्क प्रमुख शिवाजी खोंडवे हे १६ व १७ जुलै या दोन दिवशीय जिल्हा दौऱ्यावर आले असता ते १७ जुलै रोजी मार्कडेश्र्वर मंदिराला भेट दिली त्यावेळी दत्ता पवार उपस्थित होते. शिवाजी खोंडवे हे १६ जुलै रोजी अहेरी, भामरागड व मुलचरा येथे शिवसेना कार्यकर्ते , पदाधिकारी व इतर नागरिकांशी संवाद साधत आगामी विधान सभा निवडणुकी संबंधी मत जाणून घेतले दरम्यान कालच हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आंबटे यांच्याशी ही संवाद साधला असून यावेळी अहेरी व गडचिरोली विधान सभा निवडणुकी साठी संभाव्य उमेदवार बाबत तालुका प्रमुख, व  अरुण कुमार धूर्वे, दिलीप सुरपाम, आदी सोबत चर्चा केली यावेळी  जिल्हा संघटक विलास ठोंबरे, दत्ता पवार आदी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे केले वाटप 


उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे केले वाटप 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आक्सापूर:- येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख दर्शन वासेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप करुन एक नवा पायंडा पाडला आहे 
आजच्या युगात लोक आपल्या वाढदिवसाला वारे माप पैसे खर्च करतात पण काही लोक पैशाचा उपयोग गोरगरीब, होतकरू  विद्यार्थ्यांना होउन त्याचा सदुपयोग व्हावा याकरिता प्रयत्न करीत असतात 
असाच आक्सापुर येथील उबाठा शिवसेना शाखाप्रमुख असलेले दर्शन वासेकर यांनी जिल्हा परिषद शाळा आक्सापुर येथील 105 विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वाटप केले
वाढदिवसाच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या दर्शन वासेकर हे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद शाळेत नोटबुकचे वाटप करीत असतात तसेच गावातील शिवाजी चौकात वृक्ष लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे 
नोटबुक वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल तालुका काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर, ग्रामपंचायत सदस्य नितेश मेश्राम, अनिकेत बुरांडे काँग्रेस शाखाप्रमुख आक्सापुर, विकी शाहू, व बराच मित्रपरिवार उपस्थित होता 
   सदर कार्यक्रमात  मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात दर्शन वासेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यानंतर सर्व शिक्षक वृदांनी दर्शन वासेकर याच्या कार्याचा कौतुक करुन अभिनंदन केले  बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाने भुमीअभीलेख अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन


 

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाने भुमीअभीलेख अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन 

 

देसाईगंज-
     देसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी या मागणीला घेऊन काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात शहराच्या कुरखेडा टी-पाईन्टवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांनी येत्या तीन महिण्याच्या आत सर्व्हेक्षण करून नागरीकांना सनद व आखिव पत्रीका देण्यात येणार असल्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेत्या डाॅ.शिलू चिमुरकरांच्या चक्काजाम आंदोलनाचे हे फलित असुन सर्व्हेक्षणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
      देसाईगंज शहर सिटी सर्व्हेच्या कामासाठी देसाईगंज नगर पालिकेच्या वतीने सन २०१८ मध्ये जवळपास ८० टक्के रक्कम शासना जमा केली आहे.मात्र भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतिने सिटी सर्व्हेचे काम किमान जमा करण्यात आलेल्या रकमेच्या प्रमाणात करण्यात आलेले नाही.या संदर्भात दि.९ जुलै २०२४ रोजी उपविभागीय कार्यलयास निवेदन सादर करून यथाशिघ्र आखिव पत्रिका देण्यासंदर्भात कळविले होते.मात्र देसाईगंज शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आली नसल्याने दि.१८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्टवर चक्का जाम आंदोलन करण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात देसाईगंज शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असता भुमिअभिलेख कार्यालयीन अधिकाऱ्यांने पुढाकार घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला आहे.
     लेखी आश्वासनाचे पत्र देतेवेळी जिल्हा अधिक्षक  भुमी अभिलेख गडचिरोलीच्या नंदा आंबेकर,देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रभारी उपअधीक्षक एस.एन. पवार,चौकशी अधिकारी पी. एल.कुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आंदोलनात युवा नेते पिंकु बावणे,लिलाधर भर्रे, काँग्रेस ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, महादेव कुंमरे,भुमेश्वर शिंगाडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष पुष्पा कोहपरे,रजनी आत्राम, मालता गेडाम,विमल मेश्राम, वैष्णवी आकरे,गीता नाकाडे, पुजा ढवळे,प्रमोद दोनाडकर, नितीन घुले,भुमित मोगरे, सुनिल चिंचोळकर,अमन गुप्ता,शुभम शिवुरकर,संदीप प्रधान,मनिष मेश्राम,सरस्वती मराठे,शालुबाई कोराम,प्रेमिला लिचडे आदी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करीता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना टाळे ठोकणार - आजाद समाज पार्टीचा इशारा 


डी.टी. एड. बी.एड.बेरोजगारांना वगळून निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल त्या शाळांना टाळे ठोकणार - आजाद समाज पार्टीचा इशारा 

गडचिरोली : दि. १५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमीत शिक्षकांची भरती होई पर्यंत अनुसूचित जमातीतील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती करण्याचे सूचना सर्व जिल्हा परिषद सीईओ ना देण्यात आल्या आहेत तसातर हा आदेश म्हणजे सरकारी शाळांचे व शिक्षकांचे भविष्यात खाजगीकरण करण्याचा डावच आहे यावर वेगळ्या स्वरुपात राज्यव्यापी आंदोलन करूच तथापि सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती करताना संदर्भीय आदेशात क्रमांक १ मध्ये "नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी नियुक्ती करावी," हि सूचना  आजाद समाज पार्टी कदापी मान्य करणार नाही. ज्याअर्थी जिल्ह्यात अनुसूचित जमातीतील स्थानिक बेरोजगारांची एका बाजूला प्रचंड मरमर होत असताना आणि जिल्ह्यात हजारोच्या संख्येने डी टी एड, बी एड ,एम एड पदवीधारक शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवार बेरोजगार असताना प्रशासन जर ५८ वर्षापर्यंत नौकरी करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करून बेरोजगारांशी खेड मांडत असेल तर आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.
 सदर निवेदनाची तातडीने दखल घेऊन शासनाच्या आदेशातील निवृत्त शिक्षकांना रिक्त पदावर नियुक्त करण्याची क्रमांक १ ची सूचना ताबडतोब मागे घेऊन जिल्ह्यातील पात्र स्थानिक बेरोजगारांना संधी देण्यात यावी, तसे न झाल्यास ज्या शाळेत निवृत्त शिक्षक नियुक्त झाले अशा शाळांना टाळे ठोकून आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तसेच जिल्ह्यात ८४ सरकारी शाळा शिक्षकाविना आहेत त्या ठिकाणी सुद्धा तातडीने शिक्षक नेमणूक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी आजाद समाज पार्टीचे  गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, महिला सचिव शोभा खोब्रागडे, अंकुश कोकोडे, आशिष गेडाम, सतीश दुर्गमवार, घनश्याम खोब्रागडे, महेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024

PostImage

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


 पत्नीची हत्या करुन मृतदेहाजवळ  बसून राहिला पती

 

अहेरी: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करीत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. ही घटना गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यात १७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केला आहे. रत्ना सदशिव नैताम (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सदाशिव लखमा नैताम (४५ रा. मांड्रा ता.अहेरी) असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, सदाशिव लखमा नैताम हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. बुधवारी १७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास दोघांत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी पतीने पत्नीच्या तोंडावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप दोन वार केले अन् ती रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळली. त्यांनतर आरोपी पती देखील रक्ताच्या थारोळ्यात तिच्याच बाजूला बसून  राहिला.
 सदाशिव नैताम याचा १८ वर्षीय मुलगा चिरंजीव नैताम हा आपल्या शेतात काम करीत असताना घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने हत्या केली. त्याला रक्ताने माखलेल्या कपड्यावर आणि रत्नाला रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याचे पाहून चिरंजीवचा चुलत भाऊ राहुल हनमंतू नैतामने शेतात धाव घेऊन चिरंजीवला माहिती दिली. मुलगा चिरंजीव घरी येऊन पाहताच त्याने एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
चिरंजीवने आपल्या आजी आजोबा आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या वडिलांना बांधून ठेवले व घटनेची माहिती दामरंचा पोलिसांना दिली. त्यांनतर लगेच रत्नाला चारचाकी वाहनाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्ना सदाशिव नैताम यांना मृत घोषित केले. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रयावरून व फिर्यादी मुलगा चिरंजीव सदाशिव नैताम याच्या बयानावरून गुन्हा नोंद करून अहेरी पोलिसांनी तपासात घेतला आहे.या घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात दामरंचा उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 17, 2024

PostImage

वैद्यकीय अधिकारीच झाले पॉझिटिव्ह तरीही हाताला सलाईन लावून करीत आहेत रुग्णसेवा


वैद्यकीय अधिकारीच झाले पॉझिटिव्ह तरीही हाताला सलाईन लावून करीत आहेत रुग्णसेवा

 

गडचिरोली: वैद्यकीय अधिकारी मलेरिया पॉझीटीव्ह झाल्याने हाताला सलाईन लावून रुग्णसेवा करीत आहेत 
 भामरागड तालुक्यातील लाहेरी हे राज्याच्या शेवटचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाहेरी पलीकडे जंगल परिसरात अनेक खेड्यापाड्यांचा समावेश आहे. नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्र असून १० हजार ३४६ एवढी लोकसंख्या असलेल्या ४२ अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गावांचा या आरोग्य केंद्रात समावेश आहे. सध्या या परिसरात मलेरियाने डोकं वर काढले असून जुलै महिन्यात एका लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल अडीचशेच्या वर मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. रुग्णांवर उपचार करता करता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे हे स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. या भागात दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांसोबत इतर रुग्ण वाढत असल्याने त्यांना हाताला सलाईन लावून रुग्णांवर उपचार करावा लागत आहे. लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी (गट अ) म्हणून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील डॉ. संभाजी भोकरे हे नोव्हेंबर २०१८ पासून अत्यंत खडतर परिस्थितीत सेवा देत आहेत. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका आदी स्टाफ देखील कार्यरत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाहेरी परिसरातील ४२ गावांतील आणि लगतच्या छत्तीसगड राज्यातील विविध आजाराचे रुग्ण आणि महिला प्रसूतीसाठी येतात. त्यामुळे येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. दोन दिवसांपासून प्रकृती बरं वाटत नसल्याने डॉ संभाजी भोकरे यांनी स्वतःचे रक्त नमुने तपासून बघितले. RDK आणि BS दोन्ही मध्ये ते Positive आढळले. सध्या दिवसेंदिवस मलेरिया रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यासोबत इतर रुग्णांवर उपचार करणे आणि ओपीडी सांभाळणे एका गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांना शक्य नसल्याने त्यांना हाताला सलाईन लावून उपचार घेत बाह्यरुग्ण विभाग सांभाळावे लागत आहे. एकीकडे अचानक काही अनुचित प्रकार घडल्यास आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यावर खापर फोडले जाते. मात्र, स्वतः मलेरिया पॉझिटिव्ह निघाल्यावरही रजेवर न जाता स्वतःच्या हाताला सलाईन लावून उपचार घेत ओपीडी सांभाळणाऱ्या डॉ. संभाजी भोकरे यांचा करावा तेवढा कौतुक कमीच.

अश्याप्रकारे सुरू आहे उपाययोजना व रुग्णांवर उपचार
सध्या मलेरिया नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या संकल्पनेतून "टार्गेट मलेरिया" विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हिवताप प्रवण क्षेत्रात कीटकनाशक फवारणी करणे, मच्छरदाणी वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे, आरोग्य विषयी जनजागृती करणे आणि गावात जाऊन रक्ताचे नमुने घेऊन दूषित आढळल्यास तात्काळ आरोग्य सेवक आणि आशा ताई रुग्णांना फर्स्ट डोस देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवतात. ओरल ट्रीटमेंट मध्ये जर ताप कमी होत नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करतात. मात्र, ० ते १५ वयोगटाच्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत असल्याची माहिती डॉ संभाजी भोकरे यांनी दिली.


PostImage

Vaingangavarta19

July 16, 2024

PostImage

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचेकडून सुरेखा येरोजवार यांना आर्थिक मदत.


माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचेकडून सुरेखा येरोजवार यांना आर्थिक मदत.

अहेरी:-

महागाव बूज. येथील सुरेखा येरोजवार ही महिला मागील पुष्कळ दिवसांपासून गाठीच्या कँन्सरने ग्रासलेली होती.गेल्या आठवड्यामध्ये या महिलेच्या गाठीच्या कँन्सरचा ऑपरेशन चंद्रपूर येथील रूग्णालयात करण्यात आले. सुरेखा येरोजवार यांची घरची परिस्थिती फार हलाखिची ( गरिब ) आहे.त्यांना औषधी वगैरे घेण्यासाठी पैशाची फारच चणचण होत आहे. हि बाब जेव्हा राजे अम्ब्रीशराव महाराज यांना कार्यकर्त्यां द्वारे कळाली तेव्हा त्यांनी सुरेखा येरोजवार यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत ( दहा हजार रू. ) महागाव बूज येथील उपसरपंच संजय अलोने यांच्या मार्फत पाठवले. व पुढे कोणतीही मदत लागल्यास आपण करू असेसुद्धा म्हटलेले आहे.यावेळी येरोजवार कुटुंबियांनी राजे साहेबांचे आभार मानले.या वेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 16, 2024

PostImage

मार्कंडा (कं) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर


मार्कंडा (कं) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर

संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कंन्सोबा) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराची संरक्षण भिंत गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात कोसळली परंतू अजूनही त्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घोट या मार्गाला लागून असणाऱ्या मार्कंडा कंन्सोबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी जिल्हा परिषद ही शाळा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेच्या आवारात अंगणवाडी केंद्र आहे या अंगणवाडी केंद्रात लहान- लहान मुले येतात व शाळेच्या समोर घोट मार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खेळण्याची सुट्टी जेव्हा होत असते तेव्हा विद्यार्थी खेळताना सुसाट रोडपर्यंत धावत सुटतात त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही शाळा सुटण्याच्या वेळेला सर्व विद्यार्थी या मार्गावर येत असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अपघाता होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने सकारात्मक विचार करून या शाळेला लवकरात लवकर संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. 

मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचा वनश्री चापले यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही 

शाळेच्या प्रवेशद्वाराची भिंत बांधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत तसा प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाकडे पाठविला आहे - बि. टि. घोडाम मुख्याध्यापक


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024

PostImage

शाळेची वाट झाली बिकट ,वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत नागेपल्लीचा दुर्लक्ष


शाळेची वाट झाली बिकट ,वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत नागेपल्लीचा दुर्लक्ष

आलापल्ली-ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शाळे समोरील रस्त्यावर केरकचरा,असून पावसामुळे नाल्या तुंबून रस्त्यावर पाण्याचे डबके तसेच केरकचरा रस्त्यावर आला आहे. आणि सर्वत्र चिखल झाला आहे. या चिखलातून शाळेत जाताना विद्यार्थ्यांना मात्र कसरत करावी लागत आहे.

नाली व गटारी पावसाच्या पाण्यानी भरल्याने त्यातील दुर्गंधी युक्त व घाण पाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्यात मिश्रित होत आहे. सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. आता कुठे त्या पूर्ववत व नियमित सुरू झाल्या आहेत.महिन्याभरापूर्वी बऱ्याच कालावधीनंतर शाळेची घंटा वाजली. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत, पण चिखलाचा रस्ता आडवा येतोय. या रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते.

शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत जावे लागते. अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात.पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून नागरिकांना त्याचप्रमाणे खास करून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024

PostImage

नवरगाव जंगलात निलगाईची शिकार,10 आरोपींना अटक,दोन आरोपी फरार


नवरगाव जंगलात निलगाईची शिकार,10 आरोपींना अटक,दोन आरोपी फरार

 

अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक 

गडचिरोली : जंगलात निलगाईची शिकार करून तिच्या मांसाची गावात विक्री करीत असताना वनविभागाने धाड टाकून १० आरोपींना ताब्यात घेतले आहे तर दोन आरोपी फरार आहेत. सदर घटना दि .१३ जूलैला  नवरगाव येथे घडली. आरोपींकडून नीलगाईचे शिर, पाय, मांस व इतर अवयव तसेच कापण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर घटनेने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे
खुदकम रघुनाथ गेडाम वय 25 रा. कुऱ्हाडी, अक्षय प्रभाकर सेलोटे वय 22  रा. नवरगाव, रोशन दामोधर भोयर वय 22 रा. नवरगाव, निखिल गिरिधर ठाकरे वय 30 रा. चुरचुरा, सौरभ सुरेश आवारी वय 20 रा. नवरगाव, विक्रांत प्रकाश बोरकुटे  23 वर्ष, रा. गोगाव, संकल्प संजय उंदीरवाडे वय 24  रा. नवरगाव, संदीप कानिफ चुधरी रा. नवरगाव, आकाश प्रभाकर सेलोटे रा. नवरगाव, जगदीश देवराव थोराक रा. नवरगाव यांना अटक करण्यात आली आहे.
समीर रवींद्र मडावी (रा. कुऱ्हाडी) व ओमराज विजय राजगडे (रा. चुरचुरा) हे दोन आरोपी फरार आहेत.
त्यांना रविवारला गडचिरोली जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहाही आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी चुरचुरा चे क्षेत्र सहायक के. बी. उसेंडी, पोर्लाचे क्षेत्र सहायक अरुण गेडाम, मरेगावचे क्षेत्र सहायक समर्थ, पोर्ला चे वनरक्षक विकास शिवणकर, दिभना चे वनरक्षक, गणेश काबेवार, किटाळीचे, वनरक्षक संदीप लामकासे, वनरक्षक नितीन भोयर, वाहनचालक देवीदास चापले, वनमजूर विजय म्हशाखेत्री, गिरिधर बांबोळे, छत्रपती डहाले, दुर्योधन मेश्राम, सोनू खोब्रागडे, रवि डहाले, रूपेश मुनघाटे यांच्या पथकाने केली.


PostImage

Vaingangavarta19

July 15, 2024

PostImage

मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी केला पुरातून जीवघेणा प्रवास 


मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी केला पुरातून जीवघेणा प्रवास 

भामरागड:- मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी  पुरातून जीवघेणा प्रवास करत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे 
राज्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचे काम केले जात आहे. याठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाली असली तरी कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अजूनही बरेच ठिकाणी मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात दुर्गम भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच १३ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील बंगाडी गावात ३ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून लेकीला खांद्यावर घेत तुडुंब भरलेले दोन नाले ओलांडत प्रवास केला होता आणि तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे छत्तीसगड सीमेवर वसलेला भामरागड तालुका जंगल, नदी-नाल्यांचा प्रदेश असल्याने हा तालुका 'इंडोमिक झोन' मध्ये मोडतो. त्यामुळे येथे नेहमीच मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंगाडी गावातील रविना पांडू जेट्टी हिला ताप येत असल्याने सकाळच्या सुमारास तिच्या वडिलांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला मलेरिया असल्याचे कळले. त्यामुळे तिला भरती करून तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते, तसा सल्ला देखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र भरती राहून उपचार घेण्यासाठी पांडू जेट्टी तयार नव्हता. अखेर त्याने दवाखान्यातून पळ काढला. भामरागड तालुक्यात आजही अशीच परिस्थिती आहे.

मात्र उपचाराअभावी रविना जेट्टी हिच्या जीवाला धोका संभवला होता. त्यामुळे येथील आरोग्य विभागातील अधिकारी आणि तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मीकांत गोगामी आणि ग्रामपंचायतचे संगणक परिचालक ज्ञानेश्वर भांडेकर यांनी लाहेरी वरून ६ किलोमीटर अंतरावर असलेले बंगाडी गाव गाठून पांडू जेट्टीची समजूत घालून चिमुकलीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यासाठी विनवणी केली.

त्यांनतर त्या मुलीच्या वडिलांनी होकार देताच बाप लेकीला घेऊन तुडुंब भरलेल्या दोन नाले ओलांडत सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी लाहेरी गाठले. अखेर रविना जेट्टी या चिमुकलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांनी दिली आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील प्राथमिक आरोग्य केंद्र
भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्रातील जवळपास ४४ अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. गोरगरिबांना याचा मोठा त्रास संभवतो आहे


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

भरधाव दुचाकीस्वाराने उडविले बकऱ्या राखणाऱ्या इसमास


भरधाव दुचाकीस्वाराने उडविले बकऱ्या राखणाऱ्या इसमास

देसाईगंज:-
चोप - शंकरपूर मार्गावर भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने चोप येथील श्यामराव मोतीराम पर्वते वय 63 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला 
सदर इसम हा चोप गावाजवळील आग्याबोवा मंदिराच्या शेजारी शेळ्या राखत असताना दुचाकी स्वार स्वप्निल सत्यवान लांजेवार राहणार चोप हा आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून दुचावरील नियंत्रण सुटल्याने शामराव मोतीराम पर्वते यांना धडक दिली व धडक एवढी जबरदस्त होती की मृतक हा 50 ते 60 फूटापर्यंत दुचाकी बरोबर फळकटत गेला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे उपचारासाठी दाखल केले  असता डॉक्टराणी मृत घोषित केले तसेच दुचाकी स्वार हा सुद्धा गंभीर जखमी झालेला होता तेव्हा सदर रस्त्यावरून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे कोरेगाव चे कार्यक्रम आटपून वडसाकडे जात असताना दुचाकी स्वार गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला  रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे पाहून मानुसकिचा परिचय देत स्वतःच्या  गाडीत टाकून रुग्णालयापर्यंत पोहोचवून भरती केले
 सदर घटनेचा तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  जगताप  यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चौधरी , ज्ञानेश्वर धनगर तसेच पोलीस हवालदार पाडी व कुमोटी हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी दिले जीवदान 


कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी दिले जीवदान 

१४ जनावरे मिळून ५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

आष्टी:-
कत्तलखान्यात नेत असलेल्या गोवंशास आष्टी पोलीसांनी जीवदान दिले असल्याची घटना  दि.१२ जूलै रोजी घडली आहे 
गोपनीय माहितीनुसार वैनगंगा नदी पुलाजवळ  नाकाबंदी करीत असताना एक पांढऱ्या रंगाची ट्रक क्रं टी एस ०८ यु जी ७७०३ ला पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये १४ नग गोवंश दाटीवाटीने, निर्दयपणे बांधून नेत असल्याचे दिसून आले 
ट्रक चालक शेख इरफान मोहम्मद अली शेख वय २० रा.ता.जैनूर जि आदिलाबाद यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर वाहन तेलंगणा येथे नेत असल्याचे सांगितले सदर वाहनात १४ गोवंश किंमत एक लाख तीन हजार रुपये व ट्रक किंमत चार लाख रुपये असा एकूण ५ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकामी अटक करण्यात  आली आहे 
हि कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक  एम रमेश , उपविभागीय पोलिस अधिकारी  कोकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मानकर,पोहवा  मडावी ,करमे,पोशी  डोंगरे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम, नागुलवार,राउत यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

अनखोडा येथील पांदण रस्त्याची झाली चाळण,  प्रशासनाचे दुर्लक्ष 


अनखोडा येथील पांदण रस्त्याची झाली चाळण,  प्रशासनाचे दुर्लक्ष 


आष्टी,

 चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे मात्र देखभालीअभावी या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. या पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून काही प्रमाणात मातीकाम झाले असल्याचे गावकरी सांगतात. तर काही शेतकरी रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हा रस्ता पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. या पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनखोडा येथील बस्टापपासून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने पाळीव पशू चारण्यासाठी जंगलात नेण्यासाठी अडचण होत असल्याने गुराखी चराईसाठी नेत नसल्याने घरीच पुर्ण पाळीव पशू ठेवून चाऱ्याअभावी ठेवले जात होते. हि समस्या सोडविण्यासाठी गावातील सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडे मांडली असता सरपंच, पोलिस पाटील यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन पांदण रस्त्याची पाहणी करून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना समजावून तात्पुरता समस्या सोडवून दिले.तर ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर छोटा पुल  फुटलेला आहे. जागोजागी रस्त्यावर पाणी जमा होऊन आहे व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना बैलबंडी नेण्यास त्रास सहन करावा लागत आहे. येथे मुरूम टाकून नुतनीकरण करावे व कायमचं अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 14, 2024

PostImage

ट्रकने दिली दुचाकीला धडक भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी


ट्रकने दिली दुचाकीला धडक भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी


गडचिरोली:-
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज रात्रौ 7:30 च्या दरम्यान हिरापूर येथे एका दुचाकी ला ट्रकने उडविल्याने त्यात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये 3 वर्षाचा बालकाचा समावेश आहे तर दुसरा हा युवा आहे. मृतक हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील फराळा येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
अपघात झाल्या बरोबर या अपघाताची माहिती हिरापुर येथील सामजिक कार्यकर्ते रवी झरकर यांना मिळताच सावली पोलीसांना अपघाताची माहिती दिली व जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे. शेवंता कावळे 65 वर्ष, नवेगाव, हरिदास बापुजी बोरुले 30 वर्ष हे जखमी आहेत. 

.पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत असून नेमका अपघात कसा झाला याची माहिती हे वृत्त लिहे पर्यंत कळू शकली नाही.


PostImage

Vaingangavarta19

July 13, 2024

PostImage

आधार कार्ड  अपडेट करण्यासाठी लाडक्या बहिणींची आधार कार्ड सेंटर वर तूफान गर्दी.


आधार कार्ड  अपडेट करण्यासाठी लाडक्या बहिणींची
आधार कार्ड सेंटर वर तूफान गर्दी.


चामोर्शी: आधार सेंटर चामोर्शी येथील आधार कार्ड मध्ये  मोबाईल नंबर जोडणी करण्यासाठी तसेच नाव  चूक भूल ऑन लाइन करण्याच्या प्रक्रिये करीता भल्ली मोठी गर्दी दररोज होतांना दिसत आहे, संथ गतिने होत असलेले काम, आणि कागदाचा बंच हातात घेऊन नंबर लावण्याकरिता महीलांची चांगलीच गर्दी उसळली असल्याचे चित्र दिसून येते आहे 

या प्रतिक्षेत् नागरिक चांगलेच वैतागले आहेत. सदर बाब अशी की आधार कार्ड अपडेट व नावात चूक समाविष्ट करण्यासाठी तालुका परिसरातील शेकडो नागरिक आधार सेंटरवर जात  आहेत, त्यात नव्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्या कड़े जुने आधार कार्ड आहेत ते अपडेट करावे लागते आहे


PostImage

Vaingangavarta19

July 13, 2024

PostImage

जिल्हा परिषद शाळेला आले दारु अड्डयाचे स्वरूप


जिल्हा परिषद शाळेला आले दारु अड्डयाचे स्वरूप 

धाबा:-
धाबा येथील जिल्हा परिषद ची शाळा दारुडे व जुगाऱ्यांचा अड्डा बनली आहे 
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा सन 1888 मध्ये धाबा गावात उघडल्या गेली. एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेने अनेक अधिकारी घडविले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी या शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र येतात. शाळेच्या इमारती समोर नतमस्तक होतात. आता मात्र या शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. कधी शिक्षणाचे माहेरघर असलेली ही शाळा आता दारुड्यांच्या आणि जुवारीचा अड्डा बनली आहे. शाळा परिसरात दारूचा रिकामा बाटलांच्या अक्षरस सडा पडलेला. ठीक ठिकाणी शौच केलेलं. शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर इथं जुआरी एकत्र येतात. दारूंच्या घोटासोबतच पत्त्यांची अदलाबदली करतात. या शाळेतील शिक्षक चंद्रपूर येथून धाबा गावाला येतात.वेळेवर शिक्षक कधीच हजर होत नाही अशी पालकांची तक्रार. शिक्षक वेळेवर येत नाहीत. आलेच तर मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. शाळेला लागूनच  लहान नाला आहे. या नाल्यात विद्यार्थी खेळायला जातात. त्यांचा जीव गेला तर जबाबदार कोण? या शाळेत गरिबांची मुलं शिकतात. त्यामुळे पालकांनी तक्रार केली, ओरड केली तरीही शिक्षण विभाग त्याकडे लक्ष देतच नाही असा अनुभव पालकांना आलेला आहे. ज्या शाळेला दैवत मानल्या जाते त्या शाळेची ही दयनीय अवस्था बघून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

आदिवासी महिला सरपंचाची बनावट सही करुन बॅंकेतून काढले उपसरपंचानी पैसे 


आदिवासी महिला सरपंचाची बनावट सही करुन बॅंकेतून काढले उपसरपंचानी पैसे 

उमरखेड (दि. 10 जुलै) पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येत असलेल्या सुकळी (जं) येथील महिला सरपंच प्रणाली मस्के यांच्या नावाने असलेली डिजिटल सिग्रेचर (डीएसी) उपसरपंच शिवाजी रावते यांनी स्वतःच्या मोबाईलला जोडून ग्रामपंचायतीला येथील कार्यरत ग्रामसेवक दीपक भगत यांच्यासोबत संगणमत करून व सरपंच महिलेची बनावट सही करून बँकेतून पैसे काढले असल्याबाचतची तक्रार उमरखेड पोलिसात सरपंच महिलेकडून दाखल करण्यात आली असून या तक्रारीमुळे उमरखेड तालुक्यात - एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील येथील 2023 सुकळी (ज) 2024 या वर्षात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एसटी प्रवर्गातून थेट महिला सरपंच म्हणून मस्के या निवडून आल्या व त्यांनी सरपंच म्हणून पदभार देखील स्वीकारला पदभार स्वीकारल्या नंतर ग्रामपंचायतीच्या आर्थीक व्यवहाराच्या खात्यात नियमानुसार बदल झाला.

ग्रामविकासासाठी आलेला निधी उपसरपंच शिवाजी रावते याने स्वतःच्या मोबाईलवर ओटीपी घेऊन काढून घेतला तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या फाईलवर सरपंच यांच्या बनावट सहह्या मारल्या व तसेच महात्मा गांधी ग्रामीन रोजगार हमी योजनेमध्ये सरपंचाच्या बनावट सह्या करुन भ्रष्टाचार केला.

हा सर्व प्रकार सुकळी ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर कनचाले, अरबिंद बडेराव, राहुल चानखेडे, यांनी सरपंच यांच्या निदर्शनास आणून दिला त्यामुळे सुकळी (ज.) वेथील सरपंच प्रणाली मस्के यांनी याबाबत वरिष्ठांना लेखी निवेदन देऊन कळविले तसेच बनावट सह्या करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

केल्यामुळे शासनाची

फसवणूक झाली असून याबाबतीत सखोल चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करण्यात याची यासाठी दिनांक 1 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), यवतमाळ उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या तसेच उपसरपंच शिवाजी रावते यांची पत्नी रंजना रावते यांच्या नावे घरकुल योजनेचा लाभ माझ्या बनावट सहीने घेऊन त्या पोटी संगणमताने दोन हप्ते उचलले ही हप्त्याची रकम उचलण्यासाठी जिओ ट्रेकिंग अधिकारी व इतर अधिकारी यांना हाताशी धरून बनावट सह्यांचे आधारे शासन निधी हडपविला असून संगणमताने झालेल्या या प्रकारामुळे सुकळी (जं) येथील सरपंचाने थेट उमरखेड पोलिसात उपसरपंच शिवाजी रावते ग्रामसेवक दीपक भगत व उपसरपंच यांच्या पत्नी रंजना रावते, यांच्या विरोधात

उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक ठार, दोन गंभीर


दोन दुचाकीच्या धडकेत एक युवक ठार, दोन गंभीर,

एटापल्ली; तालुक्यातील तोडसा फाट्याच्या वळणावर दोन दुचाकीच्या सामोरासमोर झालेल्या जबर धडकेत रावजी मेस्सो गावडे, (वय २६ वर्ष) रा तोडसा, जागीच ठार झाला असून उलगे तिम्मा (वय ४५ वर्ष) रा जवेली (खुर्द) व शिवाजी कोत्तु वेळदा (वय ४१ वर्ष) रा तोडसा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांत दोन युवकांचा मृत्यू झाल्याने तोडसा गावात शोककळा परतली आहे.
रावजी गावडे, शिवाजी वेळदा व अन्य एक असे तिघे (ता.०९ जुलै) मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान तोडसा येथून एम एच ३३ आर २४०८ क्रमांकाच्या दुचाकीवरून एटापल्लीच्या दिशेने येत होते, त्याच वेळी उलगे तिम्मा व अन्य एक असे दोघे विरुद्ध दिशेने एटापल्लीवरून एम एच ३३ यु २९२५ क्रमांकाच्या दुचाकीवरून जवेली गावाकडे जात होते, यावेळी तोडसा फाट्यावरील वळणावर या दोन्ही दुचाकीत समोरासमोर भीषण धडक झाली, यात रावजी गावडे याच्या छातीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर उलगे तिम्मा व शिवाजी वेळदा या दोघांनाही पायाला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात

हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी (ता.१० जुलै) बुधवारी दुपारी बारा वाजता घटनेचा पंचनामा केला असून मृतक रावजी गावडे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात केली जाणार आहे, रुग्णालयात एकाच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याने जखमींवर वेळीच उपचार करण्यात व मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीवर वरिष्ठ पातळीवरून कारवाही करून वैद्यकीय सेवा सक्षम करण्याची मागणी तालुका भाजप अध्यक्ष तथा तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम व नागरिकांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू , नदीवर पूल असता तर वाचला असता जीव 


सर्पदंशाने युवकाचा मृत्यू , नदीवर पूल असता तर वाचला असता जीव 


- पर्यायी मार्गाचा गंभीर रुग्णांनाही फटका
 
ता. प्र / कुरखेडा  दि. ०९ : तालुक्यातील सावरगांव (येगंलखेडा) येथे शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. करण संजय उईके (वय २२) रा.बोरटोला भरनोलि ता. अर्जुनी मोर जि.गोंदिया असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण हा कुरखेडा तालुक्यातील सावरगाव (येंगलखेडा) येथे शेती कामानिमित्त आला होता. दरम्यान सोमवार ८ जुलै रोजी शेतात काम करतांना त्याला सर्पदंश झाला. लागलीच त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याला मृत्युने कवटाळले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करत काही क्षणांपूर्वी पोहचले असते तर रुग्ण दगावला नसता असे सांगितले. युवा शेतकऱ्याचा अशा मृत्युने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नदीवर पूल असता तर वाचला असता जीव

करन ल सर्पदंश झाल्याने रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र पुलाभावी ते पोहचण्यास अधिक विलंब लागणार असे सांगतात आल्याचे कळते. त्यामुळे सहकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता खासगी वाहनाने कुरखेडा येथे हलविले मात्र पर्यायी मार्गाचा अधिकचा अंतर आणि लागणारा वेळ यामुळे रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाला आणि करन चां मृत्यू झाला, नदीवर पूल असता तर जीव वाचला असता असे बोलण्यात येत आहे.
कुरखेडा येथील सती नदीवरील जुना पूल पडून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान शेजारीच नदीतून रपटा तयार करण्यात आला होता मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने ४ जुलै रोजी वाहून गेला. त्यामुळे आता कुरखेडा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी आंधळी - वाघेडा - मालदुगी - गोठणगाव फाटा असा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र हे अंतर आता अधिक असल्याने या मार्गाने तालुका गाठण्यासाठी अधिकचा वेळ लागत असल्याने याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. वेळेवर रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही अशी ओरड नागरिकांची आहे


PostImage

Vaingangavarta19

July 10, 2024

PostImage

ट्रक- कारच्या भीषण अपघातात २ जण ठार, तिघे जखमी


ट्रक- कारच्या भीषण अपघातात २ जण ठार, तिघे जखमी

गडचिरोली : नागपूरहून लग्न समारंभ आटोपून परत येत असताना ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने दोन जण ठार, तर तिघे जखमी झाले. ही घटना आज 10  जुलै ला
 पहाटे पाचच्या सुमारास नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ घडली.

मृतांची आणि जखमींची नावे :
दिलीप परसवाणी (वय ५५) व महेक जितेंद्र परसवाणी (वय ४२, दोघेही. रा. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात जितेंद्र परसवाणी (वय ४५) आणि त्यांची दोन मुले गौरव परसवाणी (वय १७) व उदय परसवाणी (वय १०) हे जखमी झाले आहेत.

जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर
देसाईगंज येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी हे पत्नी महेक, दोन मुले गौरव व उदय आणि नातेवाईक दिलीप परसवाणी यांच्यासह नागपूरला नातेवाईकाच्या विवाहासाठी गेले होते. विवाह समारंभ आटोपून मध्यरात्री परत येत असताना नागभिड-ब्रम्हपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाली. यात दिलीप परसवाणी आणि महेक जितेंद्र परसवाणी हे जागीच ठार झाले, तर जितेंद्र परसवाणी, गौरव परसवाणी व उदय परसवाणी हे जखमी झाले. तिघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आज दुपारी नागपूरला हलविण्यात आले. या घटनेमुळे देसाईगंज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 9, 2024

PostImage

माकडाने मारली भिंतीवर उडी,एका तरुणाचा भिंत कोसळून गेला बळी!


माकडाने मारली भिंतीवर उडी,एका तरुणाचा भिंत कोसळून गेला बळी!


भंडारा :- पावसामुळे घराची भिंत ओली होती.त्यातच अचानकपणे शेतशिवारातून आलेल्या माकडांच्या कळपातील एका माकडाने भिंतीवरून उडी मारली. यात भिंत कोसळून मलब्याखाली दबून एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. योगेश खुशाल देशमुख, रा. कन्हांडला, ता. लाखांदूर असे मृताचे नाव असून ही घटना, रविवार ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.

शौचालय व राहत्या घराच्या मधात असलेल्या मोकळ्या जागेत ही भिंत कोसळली. मागील दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांतील मातीने बनविलेल्या बहुतांश घरांचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. रविवारी योगेश स्वतःच्या राहत्या घराच्या घरगुती उपयोगातील शौचालय व मोठ्या भावाच्या मातीने बनविलेल्या घराच्या मध्यात असलेल्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त पडलेल्या विटा व दगड निवडत होता. यावेळी अचानक शेतशिवारातून गावात प्रवेश केलेल्या माकडाने योगेशच्या मोठ्या भावाच्या राहत्या घरावर उडी घेतली.

माकडाने उडी घेताच योगेशच्या अंगावर भिंत पडली. या घटनेत योगेश गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती योगेशच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या लक्षात येताच भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या योगेशला बाहेर काढत घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह गोमलाडू व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

सह भागिदारांची फसवणूक केल्याने बहीण व भावास अटक


सह भागिदारांची फसवणूक केल्याने बहीण व भावास अटक


गडचिरोली, 8 जुलै
येथील सोनापूर शिवारातील सर्व्हे क्र. 18/1 मधील शेतजमीन आपल्या सहभागीदारांना अंधारात ठेवून त्या जमिनीला अकृषक करुन परस्पर विक्री केल्याप्रकरणी जयश्री चंद्रिकापुरे (निकोसे) व विशाल निकोसे या दोन भावंडांना आज, 8 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. 
प्राप्त माहितीनुसार, जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या भावंडासह येथील कंत्राटदार नागनाथ (राजू) भुसारे आणि मनोज सुचक यांनी सामूहिकरित्या मौजा सोनापूर शिवारातील सर्वे क्र. 18/1 मधील 0.51.59 हेक्टर आर शेतजमीन जमीनमालक सुरेश नैताम यांच्याकडून खरेदी केली. आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगून जमीन खरेदीसाठी निकोसे भावंडांनी भुसारे यांच्याकडून 24 लाख व सूचक यांच्याकडून 24 लाख 13 हजार असे एकूण 48 लाख 13 हजार रुपये घेऊन जमीन मालकाला दिले व जमीन चारही सहभागीदारांच्या नावाने रजिस्ट्री करुन घेतली. जमीनीची खरेदी झाल्यानंतर नागनाथ भुसारे व मनोज सूचक यांना कुठल्याही प्रकारची भनक लागू न देता जयश्री चंद्रिकापुरे व विशाल निकोसे या दोन भावंडांनी सहभागीदार भुसारे आणि सूचक यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या संमतीचे संमतीपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे 8 डिसेंबर 2022 रोजी सादर केले व सदरची जमिन अकृषक करुन घेतली. त्यानंतर या जमिनीचे प्लॉट पाडून सहभागीदारांच्या परवानगीशिवाय जयश्री चंंद्रिकापूरे व विशाल निकोसे यांनी सदर जमीनीतील प्लॉट शितल राहुल ठवरे, डॉ. राहुल रमेश ठवरे, मंगला राजेश भट्टलवार व राहुल मधुकरराव निलमवार या चार जणांच्या नावाने करारनामा करुन त्यांच्याकडून प्रती प्लॉट 40 लाख रुपयेप्रमाणे विक्री केली. 
यासंदर्भात सहभागीदार भुसारे व सुचक यांना आपली फसवणूक करुन परस्पर निकोसे भावंडांनी जमीन विकल्याचे माहित झाल्यानंतर त्यांनी गडचिरोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याशिवाय त्यांच्याविरोधात न्यायालयातही धाव घेतली. याप्रकरणी आज, गडचिरोली पोलिसांनी निकोसे भावंडांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. 
यासंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्याशी संपर्क साधला असता, निकोसे भावंडांविरोधात चार दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला असून आज त्यांना अटक करण्यात आली असून, उद्या 9 जुलै रोजी त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
--------------


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

पोस्टात खाता उघडण्याचे  प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक  यांचे लाडक्या बहिणींना आवाहन


पोस्टात खाता उघडण्याचे  प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक  यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

सिरोंचा :-
संपूर्ण महाराष्टात चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महा एक हजार पाचसे रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी गडचिरोली जिल्यातील शेवटचा टोकावर असलेले सिरोंचा तालुक्यात पोस्ट ऑफिस जवळ येऊन महिला मोठया संख्येने  कागदपत्रे तयार करून बँक खाते आवश्यक असल्याने सिरोंचा पोस्ट ऑफिसमध्ये महिलांचे मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
प्रत्येक तालुक्यात राबविले जात असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत वय २१ते ६५ वयोगटातील महिलांना शासनाच्या माध्यमातून दर महा १५०० रुपये दिले जाणार आहे.या योजनेचे अंमलबजावणी १जुलै २०२४पासून सुरु करण्यात आली आहे.
त्या नुसार विवाहित,अविवाहित घटस्फोटीत, विधवा,परितक्यता, निराधार, महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पोस्ट कार्यालयातून खातेही उघळले जात असल्याने पोस्ट खात्यातील कर्मचारी.समिती, कलाम शेख, वाणी कोठारी, सुधाकर गडपल्लीवार, वकील चव्हाण,  बादेश,अल्ताब शेख, अंजल तल्ला व प्रवर डाक अधीक्षक यांनी जास्तीत जास्त पोस्ट खात्यातील I PPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक )खाता उघळून महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रवर डाक उपविभागीय निरीक्षक सुभाष जावळे यांनी आवाहन केले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

शालेय पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या इसमाने केला ९ वर्षीय बालीकेचा शाळेतच विनयभंग


शालेय पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या इसमाने केला ९ वर्षीय बालीकेचा शाळेतच विनयभंग 

अकोला:-

एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप करणाऱ्या मदतनीसाने एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाइकांनी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर ५० वर्षीय आरोपीविरूध्द विनयभंगासह पोस्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिल्हा परिषद शाळेत इयता चौथ्या वर्गामध्ये नऊ वर्षीय चिमुकली शिकते. विनयभंग करणारा आरोपी व त्याची पत्नी शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेत खिचडी तयार करुन वाटप करतात. ४ जुलैला दुपारी आरोपी चंद्रमणी चव्हाण पिडित चिमुकलीला खिचडी तयार करण्याच्या खोलीत घेऊन गेला व तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार चिमुकलीने तिच्या घरी नातेवाईकांना सांगितल्यानंतर या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार सिव्हील पोलिसांनी ५ जुलै ला आरोपी चंद्रमणी चव्हाण याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४,७५ व सहकलम ७,८ पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

गुन्ह्याचा पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे करीत आहेत.

चिमुकली म्हणाली शाळेत जात नाही आरोपीने मुलीचा विनयभंग केल्यामुळे ती भयभित झाली होती. दोन दिवस झाले ती शाळेत का जात नाही, असे आइने विचारले असता तीने घटनेचा उलगडा केला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली.

मुख्याध्यापकाने पाठवला अहवाल शाळेत घडलेल्या प्रकारामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने तातडीने शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेत आरोपीचे काम बंद करुन त्याच्यावर कारवाइचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती आहे


PostImage

Vaingangavarta19

July 8, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात" एक पेड मा के नाम"अंतर्गत वृक्षरोपण


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयात" एक पेड मा के नाम"अंतर्गत वृक्षरोपण

 

आष्टी,
 भारत देश व जगभरातील सर्व नागरिकांना मातृत्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "एक पेड मा के नाम" हा उपक्रम सुरू केला आहे त्यानिमित्ताने आष्टी येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे परिसरात जांभूळ, आवळा, साग, नीम, जाम अशा विविध प्रजातीच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांचे वृक्षारोपण प्राचार्य डॉ.पी के सिंग, डॉ.अपर्णा मार्गोनवार, रासेयो प्रमुख प्रा.सुबोध साखरे, प्राध्यापिका पल्लवी शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
 या आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, तर रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा. सुबोध साखरे, डॉक्टर अपर्णा मारगोनवार, डॉक्टर एम पी सिंग,डॉक्टर प्रदीप कश्यप, डॉक्टर दीपक नागापुरे, डॉक्टर सोनाली ढवस, डॉ. प्रकाश राठोड, प्रा. महेश सीलमवार,प्रा.पल्लवी शहा, शुभांगी डोंगरे, विजुभाऊ खोब्रागडे, पोर्णिमा गोहणे, उषाबाई माहूरपवार, रमेश वागदरकर व रा. से. यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 7, 2024

PostImage

स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 च्या सभेचे आयोजन.


स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 च्या सभेचे आयोजन.

आलापल्ली:-

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्व महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू करण्यासंदर्भात दिनांक 6 जुलै 2024 ला दुपारी 3 वाजता  स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय, आलापल्ली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

 संस्थाध्यक्ष, प्राचार्य आणि प्राध्यापक वृन्दात, नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करताना अनेक समस्या भेडसावत होत्या.  त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदरणीय कुलगुरू महोदय यांच्या अध्यक्षतेखाली, प्र-कुलगुरू यांच्या प्रमुख उपस्थित सभा झाली 
या सभेला मार्गदर्शन करतांना भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल , नवनवीन धोरण लागू करून त्यांची केलेली अंमलबजावणी आणि आता पूर्णपणे नव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू करतांना विद्यार्थी एडमिशन, प्राध्यापक वर्कलोड, अतिरिक्त प्राध्यापक झाले तर होणाऱ्या समस्या यावर प्रश्नोत्तर चर्चा घेऊन त्यांचे निराकरण प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या कडून करण्यात आले. 

या सभेचे अध्यक्ष दीपक दादा आत्राम  हे होते तर, प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , बबलूभैया हकीम, सिनेट सदस्य डॉ बूटे, प्राचार्य डॉ. मंडल  विचार मंचावर उपस्थित होते.  प्राचार्य डॉ. मनोरंजन  मंडल ,  प्राचार्य डॉ. टिपले ,  प्राचार्य डॉ. बूटे प्राचार्य डॉ. लाड , प्राचार्य डॉ. सोनकुवर  हेही उपस्थित होते.

 या सभेचे सूत्रसंचालन प्रा . राजेश गर्गम, प्रास्ताविक भाषण सिनेट सदस्य डॉ बुटे  यांनी केलेत तर आभार प्रा अजय बरसागडे  यांनी मानले. 
या सभेच्या यशस्वीतेसाठी स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय. आलापल्लीचे संस्थाध्यक्ष दिपक दादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अमित कोहपरे  यांच्या नेतृत्वात सर्व प्राध्यापक वृन्द आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


PostImage

Vaingangavarta19

July 6, 2024

PostImage

संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच उज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर .-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच उज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर .-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 ब्रम्हपूरी :-
ज्ञानातुन मिळणारे सामर्थ्य हे चिरकाल टिकते. मिळालेले हे सामर्थ्य अंगिकारून समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती व विद्यार्थी यांनी संघर्षातुनच उज्ज्वल भविष्य घडविल्याचा इतिहास आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी परिस्थिती नाही तर उत्तम मनस्थिती, दृढ आत्मविश्वास, प्रगल्भ इच्छाशक्ती यांची नितांत गरज आहे. आपणा सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभे असुन संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशाचा मार्ग सुकर करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ब्रम्हपूरी मतदारसंघातील ब्रम्हपूरी, सावली , सिंदेवाही येथील १०वी व १२वी च्या परिक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, मोटीव्हेशनल स्पीकर सचिन बुरघाटे हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजीत वंजारी, काॅंग्रेस नेते देविदास जगनाडे, ने.ही. महाविद्यालय माजी प्राचार्य डॉ नामदेव कोकोडे, ॲड. गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प.माजी सभापती विलास विखार, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सतीश डांगे, सुरज मेश्राम यांनी प्रास्ताविक डॉ राजेश कांबळे तर आभार खेमराज तिडके यांनी मानले


PostImage

Vaingangavarta19

July 6, 2024

PostImage

कोडपे ग्रामस्थांनी केला नक्षल गावबंदीचा ठराव ,व चार भरमार बंदुका पोलीसांच्या केल्या स्वाधीन 


कोडपे ग्रामस्थांनी केला नक्षल गावबंदीचा ठराव ,व चार भरमार बंदुका पोलीसांच्या केल्या स्वाधीन 

अहेरी:-
नारगुंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोडपे ग्रामस्थांनी नक्षल गावबंदीचा ठराव संमत करून चार भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत 
दि.५ जुलै  ला गावातील लोकांना एकत्र करून बैठक घेण्यात आली आणि नक्षल गावबंदीचा ठराव मांडला तेव्हा सर्व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ठराव मंजूर केला.यापुढे नक्षलवाद्यांना कोणतेही सहकार्य करायचे नाही, त्यांच्या प्रलोभनाला बळी पडायचे नाही आणि गावात येऊच द्यायचे नाही असा संकल्प करुन गावातील चार भरमार बंदुका पोलीसांच्या ताब्यात दिल्या.
गावात नक्षल बंदीचा ठराव केल्याने पोलीस स्टेशन नारगुंडाचे प्रभारी अधिकारी सतिश बेले यांनी कोडपे ग्रामस्थांचे आभार मानले आहेत


PostImage

Vaingangavarta19

July 6, 2024

PostImage

खळबळजनक: पिता पुत्रानी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करून केला खून


खळबळजनक: पिता पुत्रानी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने वार करून केला खून 

मूल (चंद्रपूर) :- मूल तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावामध्ये आज, शनिवार दिनांक- ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भयावह घटना घडली. घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर राजू बोदलकर यांनी पिपरे यांना केबल बाजूला करा असे सांगितले, मात्र केबल बाजूला कर असे का म्हटले म्हणून पिता-पुत्रांनी राजू यांच्यावर हल्ला केला. गुरुदास पिपरे व त्यांचा २१ वर्षीय मुलगा सूरज गुरुदास पिपरे यांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय राजू शेषराव बोदलकर यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. या हल्ल्यात बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांचा राग अनावर झाल्याने ते आरोपींना पकडण्यासाठी जमले. यावेळी आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागले असते तर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार गावात घडला असता. मात्र मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले


PostImage

Vaingangavarta19

July 5, 2024

PostImage

घोट- मार्कंडा (कं) रोडवरील खड्यांने घेतला दुचाकीस्वाराचा जीव 


घोट- मार्कंडा (कं) रोडवरील खड्यांने घेतला दुचाकीस्वाराचा जीव 

खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार

आष्टीः खड्डा चुकवितांना नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल झाडावर आदळून एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना मार्कंडा कंन्सोबा- घोट मार्गावरील बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दिनांक ५ जूलै रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. मानवेंद्र नरेंद्रनाथ रॉय वय (३८) रा. गांधीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मानवेंद्र नरेंद्रनाथ रॉय हे आपल्या  दुचाकी क्रमांक (एम.एच. ३३ एल ५७५१) ने दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर येथून घरून आपल्या मुलास  गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथील कारमेल ॲकाडमीला सोडून परत गावाकडे जात असताना बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने सरळ मोटारसायकल झाडाला आदळून मानवेंद्र हे जागीच ठार झाले.

 १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे
सदर रोडवरील खड्डे किती जीव गेल्यानंतर शासनास जाग येणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

गावकऱ्यांनी केला रेतीतस्करांवर जिवघेणा हल्ला , एक ठार तर दोन गंभीर 


गावकऱ्यांनी केला रेतीतस्करांवर जिवघेणा हल्ला , एक ठार तर दोन गंभीर 


 चंद्रपूर : -
राजुरा तालुक्यातील
धोपटाळा येथे गावकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे रेती तस्करी करणाऱ्यांवर अचानक हल्ला चढविला. दरम्यान दगडफेक केली. यामध्ये ट्रॅक्टरवरील एक जण ठार झाला तर अन्य चारपैकी दोन जण जखमी झाले.

रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुरुवारी सकाळी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. मोहम्मद शहादत खान (५२) असे मृतकाचे नाव आहे. जखमींमध्ये ट्रॅक्टर मालक देविदास येवले (४७) व मजूर कैलास कुळसंगे (३०) यांचा समावेश आहे. तर रोशन बावणे (२८), बंडू कुकर्डे (४०) हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा येथून पाच जण ट्रॅक्टरने सास्तीजवळील धोपटाळा नाल्यावर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास रेती तस्करीसाठी गेले होते. ही बाब हेरून आधीच गावकऱ्यांनी त्यांना पकडून आणण्याचा बेत आखला होता. ट्रॅक्टर रेती घाटावर पोहचली. यानंतर गावकऱ्यांनी अचानक त्यांच्यावर धावा केला. ट्रॅक्टरमध्ये सुमारे दोन ते तीन घमेले रेती टाकण्यात आली होती. यानंतर गावकऱ्यांनी ट्रॅक्टरसह सर्वांना धोपटाळा येथील चौकात आणले. नंतर आमच्या गावातून रेती चोरता असे म्हणत अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

यामध्ये एक जण छातीवर दगड लागल्याने खाली कोसळला. ट्रॅक्टरमधील इतर दोन जण जखमी झाले होते. जखमी व इतर दोघांनी जमिनीवर कोसळलेल्या मजुराला ट्रॅक्टरमध्ये टाकून राजुरा ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेने रेती तस्करांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा रेती तस्करीचा विषय ऐरणीवर आला आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार,आरोपी फरार


मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्षावर दिवसाढवळ्या गोळीबार,आरोपी फरार

चंद्रपूर :-
शहरातील माध्यभागी असणाऱ्या आझाद बगीचा जवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये जुन्या वैमनशातून मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर जवळपास दुपारी 2.00 च्या दरम्यान अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली असून गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनं ची चमू घटनास्थळी दाखल झाली व अमन अंदेवार यांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर नागपूर ला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणाने शहरात दहशत पसरली आहे.

मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर झालेल्या गोळीवर प्रकरणाला मागील सन 2020 मध्ये बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरीया याची भरदिवसा भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या घटनेशी जोडले जातं आहे, बहुरिया हत्त्या प्रकरणात अमन अंदेवार यांच्यासह त्यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार, आल्फ्रेड उर्फ बंटी लॉजिस्ट अँथोनी, प्रणय राजू सैगल, बादल वसंत हरणे, अविनाश उमाशंकर बोबडे सर्व राहणार बल्लारपूर यांचा समावेश होता, या हत्येला दारुतस्करी आणि कोळसा तस्करीचे कारण असल्याचे म्हटल्या जातं होते. दरम्यान हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी अमन अंदेवार याने व्हाट्सएप स्टेटसवर ‘जंगल जंगल ही रहेगा, मगर शेर बदल जायेगा’ अशी पोस्ट टाकली होती त्यामुळे सुरज बहुरिया यांचा सुनियोजित कट होता हे स्पष्ट होते, या घटनेनंतर सुरज बहुरिया गैगने अमन अंदेवार यांना ठार करण्याचा मन्सूबा जाहीर करून खुलं आव्हान केलं होतं, हा वचपा काढण्यासाठी मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी याचं सुरज बहुरिया समर्थकांनी अमन अंदेवार यांचे बंधू आकाश उर्फ चिन्ना अंदेवार यांच्यावर याचं रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये गोळीबार केला होता आणि आता त्याची पुन्हा पुनरवृत्ती झाली असून आता अमन अंदेवार यांच्यावर त्याचं प्रकरणातून गोळीबार झाला की आणखी कुठले कारण आहे हे पोलीस तपासात समोर येईल मात्र या गोळीबाराने शहरात दहशतीचे वातावरण आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

अशिक्षित महीलांसह सरसकट मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा - माजी जि.प.सदस्या रुपाली पंदिलवार


अशिक्षित महीलांसह सरसकट मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा - माजी जि.प.सदस्या रुपाली पंदिलवार 

आष्टी:-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली मात्र कागदपत्रे ज्या महिलांकडे आहेत अश्या महीलांना त्याचा लाभ मिळणार परंतू ज्या महीला अशिक्षित आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट दिसत आहे 
सदर योजना एक जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली असून मतदान करताना १८ वर्षे व लाभ देण्यासाठी २१ वर्षे का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार परंतू गाव खेड्यातील या वयाच्या महीला मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहेत आणि हेच वास्तव आहे 
 अशिक्षित महीलांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत मग त्या महीला लाभापासून वंचित राहतील तेव्हा तेव्हा गोरगरीब, निराधार, अश्या महीलांना सरसकट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रुपाली पंदिलवार यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

सती नदीवरील रपटा खचला ,पर्यायी मार्ग क्रमन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 


सती नदीवरील रपटा खचला ,पर्यायी मार्ग क्रमन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन 


कुरखेडा :- येथील कोरची मार्गावर असलेल्या सती नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. सदर काम सुरू असतांना या मार्गावरील वाहतुक नदीमधून तात्पुरत्या स्वरूपात बाधंण्याता आलेल्या वळण मार्गावरून करण्यात आले होते. मात्र सदर वळती मार्ग हा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने आता खचला आहे. सदर मार्गाची वाहतुक इतर मार्गाने वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी २२ जून रोजी पारित केले होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील कुरखेडा-कोरची मार्गावरील सती नदीवरील जुना पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर मार्गावर वाहतुक सुरळीत असावी यासाठी नदीमधून रपटा तयार करून वाहतुक सुरू होती. मात्र सदर नवीन पुलाचे बांधकाम वेळेत पुर्ण होऊ न शकल्याने व सदर तयार करण्यात आलेला रपटा हा पुराच्या पाण्याने वाहुन जाण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २२ जून रोजी आदेश निर्गमित केले होते. सदर मार्गावरील वाहतुक २९ जून पासून बंद करून इतर पर्यायी मार्गाने वळती करण्याचे सांगितले होते. दरम्यान सदर रपटा हा नदीमधील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने ४ जुलै रोजी काही प्रमाणात खचला आहे. सदर मार्गावरून पुर्णतः वाहतुक आता बंद पडली असुन पर्यायी मार्गाचा वापर करून तालुकास्थळ नागरिकांना गाठावे लागणार आहे.
‘असा’ असेल पर्यायी मार्ग
हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा
जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना' बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?


महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना' बहिणी खूष पण भाऊजी नाराज ?

चामोर्शी  : अर्थमंत्री अजित पवार  यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत फार्म भरण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे तर एकमेकींना महिला  तू लाडकी बहिणचा फार्म भरली का ? असे विचारत आहेत तर आष्टी शहरात व परिसरात सलून दुकानात, पानटपरीवर पुरुषांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. पुरुष वर्ग एकमेकांना म्हणतात की सरकार लाडकी बहिण योजना चांगली काढली आहे माझी बायको तर मला सरकार माझा भाऊ मला महिन्याला १५०० रुपये देणार आहे म्हणून मस्त खुष आहे म्हणून सांगतो आहे तर दुसरा पुरुष म्हणतो की सरकार भाऊ बहिणीसाठी चांगली योजना काढली पण आम्हाला  (भाऊजी) म्हणून एक योजना काढायला पाहिजे अशी खमंग चर्चा सुरू आहे या होणाऱ्या चर्चेवरून सरकारच्या बहीण सरकार भाऊ वर खुष आहेत आणि भाऊजी मात्र नाराज आहेत यावरून असे दिसून येत आहे
आता तर दाखल्यांचे अटी सुद्धा कमी करण्यात आल्याचे ना.अजीत पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे व कोणताही अधिकारी या कामात कुचराई केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे व सदर योजनेचा फार्म भरण्यासाठी मुद्दत वाढविण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 4, 2024

PostImage

शाळेतून स्वगावी जात असलेल्या बालकास ट्रकने चिरडले


शाळेतून स्वगावी जात असलेल्या बालकास ट्रकने चिरडले 

एकुलता एक मुलावर काळाचा घाला,अख्खे गाव गहिवरले 

 गडचिरोली, 

 शाळेतून सुटी झाल्यानंतर सायकलने परी जाणाऱ्या विद्यार्थ्यांला ट्रकने चिरडल्याची घटना काल, 3 जुलै रोजी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला-बसा मार्गावर बुधवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. ऋतुराज प्रशांत शिवणकर (वय 11, रा. वसा) असे मृतक विद्यायांचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, ऋतुराज शिवणकर हा पोला येथील शिवाजी हायस्कूल शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे तो बुधवारी (दि. 3) सकाळी वसा येथून

सायकलने पोर्ला येथे शाळेत गेला, सायंकाळी 5 वाजता सुटी झाल्यानंतर तो आपल्या वर्गमित्रांसह सायकलने स्वगावी वसा येथे जात दरम्यान, गडचिरोलीवरून होता. आरमोरीकडे जात असलेल्या टीएस 09/ युई 4590 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने वसा बसस्थानकानजीक त्याच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ऋतुराजचे नियंत्रण सुटल्याने तो ट्रकच्या मागील चाकात सापडला. यात

त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून तो जागीच ठार झाला. तर दुसरा वर्गमित्र किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वसा व पोलों येथील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प पडली होती. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक व चालकास ताब्यात घेतले. अपघातामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास आरमोरी पोलिस करीत


PostImage

Vaingangavarta19

July 3, 2024

PostImage

संभाजी भिडे तोंड आवरा, नाहीतर मीश्या सावरा - विद्या लोलगे 


संभाजी भिडे तोंड आवरा, नाहीतर मीश्या सावरा - विद्या लोलगे 

सोलापूर:-
 संभाजी भिडे आपल्या तोंडाला आवरा अन्यथा स्वतःच्या मिश्या सावरा असा इशारा सोलापूर विधवा संघटना अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्या विद्या लोलगे यांनी दिला आहे 
वटपौर्णिमेच्या दिवशी नटया आणि ड्रेस घातलेल्या स्त्रियांनी पुजेला जाऊ नये, असे विधान शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. भिडे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून महिलांनी भिडे गुरुजींना सज्जड दम दिला असून 'भिडे तोंड आवरा, नाहीतर मिशाही कापू' असाही इशारा दिला आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवरून अनेक वेळा वादाचे प्रसंग ओढवत आहेत. अशातच त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. मात्र या वेळी भिडे यांच्या वक्तव्याचा सोलापूर शहरातील विधवा संघटनेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे यांनी निषेध करीत महिलांच्या वतीने त्यांना सज्जड दम दिला आहे. विधवा महिलांसाठी वर्ल्ड ऑफ वुमेन्स संघटनेच्या स्थापनेची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भिडेंना इशारा दिला. भिडे यांनी यापुढे महिलांबद्दल वादग्रस्त विधान करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापून टाकतील, असे म्हटले आहे.

भिडे गुरुजी म्हणाले...

"वटसाकित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनीही जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं," असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. तसेच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असेही संभाजी भिडे म्हणाले आहेत. मात्र संभाजी भिडे यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 3, 2024

PostImage

कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल केले लंपास- सायबर सेलकडे तक्रार दाखल


कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल केले लंपास- सायबर सेलकडे तक्रार दाखल

 मोबाईल परत करावे अन्यथा खावी लागेल जेलची हवा.


मुख्य संपादक/अशोक खंडारे 

कोंढाळा (देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीचे अँड्रॉइड मोबाईल एका अज्ञात चोरट्याने ग्रामपंचायत कार्यालयातून चोरून नेले असल्याची घटना काल, मंगळवार दिनांक-२ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञात चोरट्या विरुद्ध देसाईगंज पोलीस पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत तक्रार दाखल केली असून त्वरित सायबर सेलकडे प्रकरण वलती करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण
योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता गावातील नागरिकांची झुंबड
रहिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व इतर कागद
पत्रांसाठी कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयात सकाळ पासून ते सायंकाळपर्यंत दिसून येत आहे. अशातच काल, मंगळवारी कार्यालयातील कर्मचारी कामात व्यस्त असतांना टेबलावर ठेवलेला ग्रामपंचायतीचा अँड्रॉइड मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. सदर मोबाईल हा मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात खरेदी करण्यात आला होता. एखादा प्रमाणपत्र काढण्यासाठी मोबाईलवर ओटीपी जात असतो. त्यामध्ये ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून इतरांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार गेली असल्याने 'तो' मोबाईल चोरटा कोण? हे लवकरच कळणार आहे. ज्या व्यक्तीने मोबाईल चोरून नेला असेल, त्यांनी कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयात आणून देण्याचे करावे; अन्यथा ग्रामपंचायत आवारातील लावण्यात आलेल्या सिसीटिव्ही कॅमेरा च्या माध्यमातून शोध घेऊन संबंधित चोरट्याला जेलची हवा खावी लागेल; अशी माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत यांनी दिली


PostImage

Vaingangavarta19

July 2, 2024

PostImage

शुल्लक वादातून आई आणि मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या


शुल्लक वादातून आई आणि मोठ्या भावाने केली छोट्या भावाची हत्या

 नागपूर :
 आई आणि मोठ्या
भावासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालून घरातील साहित्याची तोडफोड करणाऱ्या युवकाला शांत करताना गळा आवळल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २८ जूनला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आई आणि भावाला अटक केली आहे.

प्रयाग उर्फ बंटी श्रीराम गौर (३४) रा. कुशीनगर जरीपटका असे या भांडणात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो रागीट स्वभावाचा होता. तो मोबाईल शॉपीत काम करायचा. तर प्रभात श्रीराम गौर (३६) आणि मीरा श्रीराम गौर (६०) दोघे रा. कुशीनगर जरीपटका अशी आरोपी आई आणि भावाची नावे आहेत. जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक प्रयागचा लहान भाऊ सुशांतचे दोन मित्र आणि त्यांच्या पत्नी घरी आल्या होत्या. बोलताना प्रयागचा सुशांतसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात प्रयागने मोठ्या भावाला लग्नात मिळालेली आलमारी फोडली.

यावरून त्याच्या आईने प्रयागला विचारना केली असता त्याने रागाच्या भरात रिमोट टीव्हीला फेकून मारला. तो घरातील साहित्याची तोडफोड करीत असल्याचे पाहून त्याच्या आईने प्रयागचे पाय धरले आणि मोठा भाऊ प्रभातने त्याच्या गळा पकडला असता त्याचा गळा आवळल्या गेल्याने तो जागेवरच निपचित पडला. या प्रकरणी प्रयागचा भाऊ सुशांत श्रीराम गौर (३२) याने दिलेल्या सुचनेवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी आई आणि भावाविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 29, 2024

PostImage

आईलाही नाही आली नव महीण्याच्या बाळाची कीव,बाळाला विष पाजून स्वतःचे संपविले जीवन


आईलाही नाही आली नव महीण्याच्या बाळाची कीव,बाळाला विष पाजून स्वतःचे संपविले जीवन 

 

चंद्रपूर 

ज्या जीवाला पोटात 9 महिने आनंदाने वाढवलं त्याला जन्म दिल्यानंतर 9 महिन्यांनी पोटच्या गोळ्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ९ महिन्यांच्या बाळाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला.इतकंच नाही तर वैतागलेल्या आईनं स्वतः विष प्राशन करुन आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे.
ही धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील शेगाव इथे घडली आहे. देश इतका पुढे गेला मात्र अजूनही घरातल्या लक्ष्मीला हुड्यांसाठी किंवा घरातल्या कामावरुन छळण्याचे प्रकार कमी झाले नाहीत. हे धक्कादायक वास्तव आहे चंद्रपुरातलं. पल्लवी पारोधे असं मृत 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.

पल्लवीने कौटुंबिक वादातून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आपल्यानंतर बाळाचं कसं होणार या विचाराने तिने आपल्या 9 महिन्यांच्या मुलालाही विष पाजलं. मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुलाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या दुर्घटनेत आईचा मृत्यू झाला. मुलाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेच्या आईनं पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन हुंडाबळीची तक्रार दाखल झाली आहे. नवरा आणि दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हुंड्यासाठी पल्लवीचा छळ होत होता अशी प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 28, 2024

PostImage

उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांमुळेच पतसंस्थेची प्रगती- अनिल पाटील म्हशाखेत्री


उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांमुळेच पतसंस्थेची प्रगती- अनिल पाटील म्हशाखेत्री

पतसंस्थेच्या वतीने उत्कृष्ट ग्राहकांचा सत्कार


 गडचिरोली:-
 ज्या पतसंस्थेत समाधानी ग्राहकांची संख्या जितकी जास्त, तितकी त्या संस्थेला दीर्घकालीन व शाश्वत यश मिळण्याची संधी जास्त असते. दी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट व समाधानी ग्राहकांची साथ लाभल्यामुळे तिची उत्तरोत्तर प्रगती होत गेल्याचे गौरवोद्गार  दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हाशाखेत्री  यांनी  पतसंस्थेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून काढले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्थेच्या मानद सचिव श्रीमती सुलोचनाताई वाघरे, ज्येष्ठ संचालक पंडित पुडके  उपस्थित  होते.
  अनिल पाटील पुढे म्हणाले , दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 28 जून 1993 रोजी झाली असून  संस्थापक अध्यक्ष स्व . चुडाराम मुनघाटे,संस्थापक मानद सचिव  स्व. खुशालराव वाघरे विद्यमान  संचालक मंडळ व सेवक वर्ग यांच्या  अथक परिश्रमातून ही पतसंस्था अगदी कमी कालावधीत नावारूपास आली.  आज या पतसंस्थेच्या जिल्ह्यात ९ शाखा असून सर्व शाखा सीबीएस प्रणालीने जोडल्या आहेत. ग्राहक सेवेचा दर्जा पाहून संस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO 9001-2015 हे मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे.
   मागील पाच वर्षाच्या काळात ( २०१७-१८ ते २०२३-२४ ) संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 2 कोटी वरून 5.39 कोटी वर गेले. एकूण ठेवी 49.62 कोटीवरून 117.85 कोटीवर पोहोचल्या, एकूण गुंतवणूक 33.33 कोटीवरून 56.42कोटीवर पोहोचली. कर्ज वाटप 31.30, कोटीवरून 100.18 कोटीवर पोहोचले. संस्थेचा स्वनिधी 12.04 कोटी वरून 25 कोटीवर पोहोचला आहे. वरील  आकडेवारीवरून संस्थेचा आर्थिक पाया अत्यंत भक्कम असून, संस्थेची आर्थिक भरभराट झालेली दिसून येते.
 संस्थेच्या उत्तरोत्तर आर्थिक वाटचालीबद्दल संस्थेला सलग दोनदा 2022 व  2023 चा बँको पतसंस्था  ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन लिमिटेड   अमरावती तर्फे " गडचिरोली जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने" वेळोवेळी सन्मानित केले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. 
     यावेळी अनिल पाटील यांचा 62 वा वाढदिवस  केक कापून साजरा करण्यात आला. तसेच   शाल  व श्रीफळ देऊन संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार  करण्यात आला.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा शेषराव येलेकर, संचालन शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर  तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक  दिलीप  उरकुडे यांनी मानले. 
   


PostImage

Vaingangavarta19

June 28, 2024

PostImage

गडचिरोली' जिल्ह्यातील तीन शाळा अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन 


‘गडचिरोली' जिल्ह्यातील तीन शाळा अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन 

आष्टी येथील एका शाळेचा समावेश,पण शहरात अनाधिकृत शाळा असल्याचे फलक नाही 


गडचिरोली :-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळा शासन मान्यताप्राप्त असणे अनिवार्य आहे. परंतू गडचिरोली जिल्ह्यात काही शाळा अधिकृतपणे शासनाची मान्यता न घेताच सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्या शाळांवर द्रव्यदंडाच्या शिक्षेसह कायदेशीर कारवाई होईल. पण अशा कोणत्याही अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अनधिकृत असलेल्या शाळांमध्ये धानोरा तालुक्यातील पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल स्कूल मोहगांव, गडचिरोली तालुक्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टी या शाळांचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाने कळविले. याव्यतिरीक्त इतर काही अनधिकृत शाळा सुरु झाल्या असल्यास अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवू नये. पालकांनी पाल्याचे प्रवेश घेतेवेळी शासनाची मान्यता आहे किंवा नाही याची खात्री करावी, तसेच गडचिरोली जिल्हाात अशा अनाधिकृत शाळा निर्दशनास आल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली यांना लगेच लेखी स्वरुपात माहिती द्यावी असे आवाहन शिक्षणााधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब पवार व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी केले आहे
जिल्ह्यातील ज्या शाळा अनाधिकृत आहेत तशा शाळांचे फलक लावण्याचे जिल्हा प्रशासनाने गटशिक्षणाधिकाऱ्या कळविले आहे पण आष्टी शहरात मुख्य ठिकाणी शाळा अनाधिकृत असल्याचे फलक लावण्यात आले नाही फलक लावले असतेतर या अनाधिकृत शाळेबद्दल पालकांना माहिती मिळाली असती असे पालकवर्गातून बोलले जात आहे


PostImage

Vaingangavarta19

June 27, 2024

PostImage

श्री सद्गुरु साई बाबा विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन


श्री सद्गुरु साई बाबा विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन


 आष्टी :-

येथील स्थानिक श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  राजश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी के सिंग, मुख्य मार्गदर्शक  म्हणून रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. सुबोध साखरे, डॉ.अपर्णा मारगोणवार, डॉ. एम पी सिंग, डॉ.कश्यप, डॉ. सोनाली ढवस, डॉ.प्रकाश राठोड, डॉ. दीपक नागापुरे, प्रा. महेश कुमार सिलमवार, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. राहुल आवारी उपस्थित होते. मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य मार्गदर्शक प्रा. सुबोध साखरे यांनी शाहू महाराज यांचे आरक्षणाविषयी धोरण व त्यांच्या सामाजिक कार्यांच्या उल्लेख प्रबोधनातून केला. राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार हे आपल्या समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार वाचणे,समजणे व त्यानुसार विद्यार्थ्यांनी कृती करणे हे खरे अर्थाने काळाची गरज आहे असे विचार प्राचार्य डॉ.पी के सिंग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश कुमार सिलमवार तर आभार प्राध्यापिका जया रोकडे यांनी मानले. यावेळी मार्गदर्शक प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

June 27, 2024

PostImage

पोलीसांनी टाकली घरात धाड,मिळाला ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल


पोलीसांनी टाकली घरात धाड,मिळाला ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल 

आलापल्ली:-
पोलीसांनी एका अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या घरात धाड टाकली असता त्यांच्या घरामध्ये ७७ हजारांचा अवैध मुद्देमाल मिळून आला 
मौजा आल्लापल्ली येथील सचिन लक्ष्मण मिसाळ हे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहेरी पोलीसांनी धाड टाकली असता त्यांच्या घरामध्ये २१६ नग बिअर किंमत ५४ हजार रुपये ,२५० निपा देशी दारू किंमत २० हजार रुपये,१० बंपर काचेचे बिअर किंमत ३ हजार रुपये असा एकूण ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला व आरोपी विरुद्ध कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला आहे 
अहेरी पोलीसांनी सदर कारवाई केली असल्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 21, 2024

PostImage

दोन ट्रकच्या भीषण अपघातात ,एक ट्रक चालक जागीच ठार 


दोन ट्रकच्या भीषण अपघातात ,एक ट्रक चालक जागीच ठार 

आष्टी:-
येथून जवळच असलेल्या कोनसरी व सोमनपल्ली गावांच्या मधोमध दोन ट्रकच्या भिषण अपघातात एक ट्रक चालक जागीच ठार झाले  ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे 
गडचिरोली कडून ट्रक क्रं.CG 04 NJ 4834 हा आष्टी कडे येत असताना सुरजागड चे मेटल घेउन जाणारा ट्रक क्रं एम एच ४० सी एम ५६८५ ह्याने जोरदारपणे धडक दिल्याने समोरच्या गाडीतील चालक जागीच ठार झाला  समोरच्या ट्रक चा क्याबीन पुर्णपणे विस्कळीत झालेला आहे 
जखमी असलेल्या ईसमांचा अजूनही पत्ता लागलेला नाही मृतकाचे नाव विकास कुमार बिंद वय २४ रा.अलाहबाद असे आहे
सदर घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशन ला मीळताच पोलीस निरीक्षक विशाल काळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले व मृतकास आष्टी रुग्णालयात पाठविलें शवविच्छेदन करण्यात आल्या नंतर मृतदेह त्याच्या नातलगांना देण्यात येणार आहे


PostImage

Vaingangavarta19

June 20, 2024

PostImage

गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी : जिल्हा प्रशासनाचे आवाहन


गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यात वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी :
जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चिचडोहचे ३८ दरवाजे आज खुले करणार 

गडचिरोली,दि.19(जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून दिनांक 21 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे सर्व 38 दरवाजातून 190.23 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे या नदीकाठाने राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
गोसीखुर्द धरणातून 40 घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने दिनांक 29 जून 2024 पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा 179.800 मी. पर्यंत वाढेल, त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
    वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झालेले आहे. सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस 4 किलोमिटर अंतरावर आहे. याची एकूण लांबी 691 मीटर असून त्यावर 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. चिचडोह बॅरेजमध्ये दिनांक 18 जून 2024 रोजी पाणी पातळी 178.90 मी. व पाणीसाठा 11.285 द.ल.घ.मी. इतका आहे. 
*या गावांनी आहे धोका* : गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव, घारगाव, फराडा, वाघोली, चामोर्शी, हल्दीपूरानी, टेकडा, दोटकूली, कळमगाव, खंडाळा. एकोडी, अनकोडा, इल्लूर, नविन लोंढोली, आष्टी, चपराळा, गणपूर व कढोली. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली, उसेगाव, पार्डी, बेंबाळ, जिबगाव, पेठगाव, शिर्सी,साखरा, कोरंबी, बोरघाट, देवाळा (बु), चखठाणा,विठ्ठलवाडा, पिपरी व घाटकूळ.
वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.  
0000


PostImage

Vaingangavarta19

June 19, 2024

PostImage

तीन असाह्य अल्पवयीन भगीनींचा घेतला नराधमांनी फायदा,एक  मुलगी गर्भवती झाल्याने फुटले बींग


तीन असाह्य अल्पवयीन भगीनींचा घेतला नराधमांनी फायदा,एक  मुलगी गर्भवती झाल्याने फुटले बींग


 मुंबईः- नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे 3 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 1 वर्षापासून वेगवेगळे नराधम आरोपी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. वडील व्यसनाधीन असल्याने या 3 अल्पवयीन मुलींबाबत ही शोकांतिका आली.

या मुलीचे वडील पिढीत मुलींच्या आईला मारहाण करत होते, त्यामुळे त्यांची आई या मुलींना सोडून गेली. मुलींनाही त्यांचे वडील मारहाण करत होते. त्यामुळे गेल्या वर्षी 17 वर्षाची मुलगी घरातून निघून गेली. याच काळात दत्ता क्षीरसागर वय 35 वर्ष या नराधम आरोपीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आसरा दिला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला भेटण्यासाठी तिच्या दोन लहान बहिणी तिच्याकडे येत होत्या. या काळात नराधम दत्ता क्षीरसागर याने एका बहिणीवर अत्याचार केला. त्याचे दोन साथीदार निशाद खान वय 19 वर्ष आणि सय्यद अशा दोन व अन्य आरोपींनीदेखील मुलींवर अत्याचार केले. मागील वर्षापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे एक मुलगी गर्भवती राहिली.


अखेर या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. यातील दत्ता क्षीरसागर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत सुमारे 400 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

यावेळी पोलिसांनी नराधम आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 19, 2024

PostImage

विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडसा दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार : आ.कृष्णा गजभे


विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडसा दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार : आ.कृष्णा गजभे 


गडचिरोली - :
विश्वरत्न, भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र दिक्षाभुमीला सौंदर्याने नटविनार असे प्रतिपादन आ.कृष्णा गजभे यांनी केले आहे 

त्यांनी नुकताच (देसाईगंज) वडसा येथे दिक्षा भुमीच्या सौदर्यीकरण पायाभरणी कामाचे भूमिपूजन केले  आरमोरी विद्यानसभेचे आमदार कृष्णा गजभे यांनी सदर दिक्षाभुमी च्या कामांकरिता लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला  देसाईगंज वडसा येथील दिक्षाभुमीचा विकास मोठ्या झपाटयाने झाला पाहीजे कारण की विश्वरत्न भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ही भुमी पावण झालेली आहे  त्यामुळे या स्थळांना विशेष महत्व प्राप्त करून देण्याकरीता मी स्वतः विशेष लक्ष देणार आहे. असे आमदार कृष्णा गजभे यांनी सांगीतले. सौदर्गीकरणाच्या उदघाटनाप्रसंगी मंडळाच्या सचिव ममता जांभुळकर अध्यक्षा कविता मेश्राम सदस्य शामला राऊत, सरिता बारसागडे, मारोती जांभुळकर, प्रकाश बारसागडे ' संजय नंदेश्वर, पुरुषोत्तम बडोले आदि सहीत उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

June 19, 2024

PostImage

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना १ जुलैपासून लागू होणार : राज्य सरकारचा निर्णय


महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना १ जुलैपासून लागू होणार : राज्य सरकारचा निर्णय


वृत्तसंस्था / मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने या योजनेचा वार्षिक प्रीमियम ६० टक्क्यांनी वाढवून तो ३ हजार कोटी रुपयांहून अधिक केला आहे. नवी योजना १ जुलैपासून लागू होणार आहे.

नव्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळेल. २०१२ मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी या योजनेत इतका मोठा बदल करण्यात आला. या योजनेसाठी राज्य सरकारने नुकतीच निविदा प्रक्रिया निकाली काढली आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शूरन्सची निवड करण्यात आली आहे. राज्यातील १२.३ कोटी कुटुंबांसाठी सरकार प्रतिकुटुंब १ हजार ३०० रुपये प्रीमियम भरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये ५.७ लाख कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला.

दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील विमा रक्कम १.५ लाख रुपयांनी वाढवून ५ लाखांची घोषणा केली होती, पण हे लागू करण्यात आले नव्हते. आता विधानसभा निवडणुकांआधी महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाला ही योजना लागू करण्यासाठी पत्र लिहून परवानगी मागितली होती. आता आचारसंहिता संपल्यानंतर सरकारने ही योजना अंतिम टप्प्यात आणली. मिळालेल्या महितीनुसार आता ही योजना १ जुलैपासून नव्या स्वरुपात पुन्हा लाँच होणार आहे.

नवी योजना लागू होण्याआधी विमाधारकांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि एक लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते. मात्र आता सरकारने हे कागदपत्र जमा करणे गरजेचे नसून सर्व नागरिकांसाठी समान योजना लागू करण्याचे सांगितले आहे. आता उत्पन्नांचीही कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत १ हजार रुग्णालये होती. मात्र, आता वाढवून ती १ हजार ९०० करण्यात आली आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 18, 2024

PostImage

एका वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला सांगाडा


एका वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला सांगाडा


भद्रावती - :
शहरापासून एका वृद्धाचा  हाडाचा सांगाडा पिपर बोडी येथील जंगलात गळफास घेतला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. कपडे व गळ्यातील माळ यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही घटना दिनांक १५ रोज शनिवारला उघडकीस आली. प्रभाकर दादाजी नक्षीने वय ७२ वर्ष राहणार हनुमान नगर असे मृतकाचे नाव आहे.
 प्रभाकर हे दिनांक २६ मार्च पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुंटूबियानी इतर शोधाशोध केली परंतु ते मिळाले नाही. त्यानंतर त्यांची बेपत्ता असल्याबाबतची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली गेल्या तीन दिवसांपूर्वी भद्रावती येथील काही नागरिक पिपर बोडीच्या जंगलात लटकलेल्या अवस्थेत सांगाडा असल्याची चर्चा करत होते ही माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांनी पिपर बोडी गावापासून सहा किमी अंतरापर्यंत जंगल शोधून काढले असता त्यांना एका झाडावर अंगावर कपडे असलेला सांगाडा दिसला अंगात असलेले कपडे, गळ्यातील माळ व चप्पल यावरून बेपत्ता असलेल्या तक्रारीचा शोध घेण्यात आला. सचिन नक्षीने याचे वडील असल्याची माहिती मिळाली गळ्याला दोर बांधून  गकफास घेतल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. ही घटना तीन महिन्यापूर्वी असल्याने शरीरावरील संपूर्ण मास गळून पडले होते. वृद्धाचा सांगाडा हा फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासीसाठी पाठविला असून आत्महत्या की घातपात याचा शोध भद्रावती पोलीस घेत आहेत


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

खरचं होणार काय अवैध मुरूम  उत्खनन प्रकरणी २३५ कोटी रुपयांचा दंड 


खरचं होणार काय अवैध मुरूम  उत्खनन प्रकरणी २३५ कोटी रुपयांचा दंड 

 

अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

 गडचिरोली दि.१७ :  वडसा (देसाईगंज) या रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून  मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही  सुरू होती. आज ती पूर्ण झाली असून  संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस  तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम का आकारणी करू नये, याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख   तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली. तहसिलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीसा बजावल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर, कनिष्ठ अभियंता श्री इंदुरकर, शाखा अभियंता अभिजीत शिनगारे, भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्हि. एल. सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार  गडचिरोली यांच्याकडे  अहवाल सादर केला त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.

अहवालानुसार खरपुंडी येथे सर्व्हे क्रमांक ५३/२/अ आणि ५४ मध्ये १३ हजार २५७ ब्रास मुरूम उत्खननाकरिता ११ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये,  लांजेडा स.क्र. १४/२६ आणि २४० मध्ये ९ हजार ६९९ ब्रास करिता ८ कोटी ३४ लाख११ हजार ४०० रुपये, माडेतुकूम स.क्र.१८ मध्ये १८ हजार ३५८ ब्रास करिता १५ कोटी ७८लाख ७८ हजार ८०० रुपये, गोगाव स.क्र.१८ मध्ये २० हजार ७७५ ब्रास करिता १७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये, अडपल्ली स.क्र.१८ मध्ये ५० हजार १७६ ब्रास करिता ४३ कोटी १५ लाख१३ हजार ६०० रुपये, काटली स.क्र. १४५ आणि २७९मध्ये ५४ हजार ५७५ ब्रास करिता ४६ कोटी ९३ लाख ४५ हजार रुपये, मोहझरी स.क्र. २५, ३२,२१,९व १५ मध्ये ६२ हजार ६१७ ब्रास करिता ५३ कोटी ८५ लाख ६ हजार २०० रुपये आणि साखरा येथे स.क्र. १०२ व १५२ मध्ये ४३ हजार ८९४ ब्रास करिता ३७ कोटी ७४ लाख ८८ हजार ४०० रुपये असे एकूण २ लाख ७३ हजार ३५१  ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची गणना करण्यात आली आहे.  याविषयी  तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
 
000


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

आष्टी पोलीसांनी अवैध दारूसह बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त 


आष्टी पोलीसांनी अवैध दारूसह बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त 

दोन आरोपी ताब्यात 

आष्टी:-
येथील पोलीसांनी अवैध दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी ताब्यात घेतले आहे 
चंद्रपूर जिल्ह्यातून आलापल्ली कडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रं.एम एच ४० व्हाय १९०५ ला नाकाबंदी करून चेक केले असता सदर वाहनांमध्ये १५००० निपा  देशी दारू किंमत १२००००० लाख रुपये व ट्रक किंमत दहा लाख रुपये असा एकूण बावीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे 
ट्रक चालक राजेश फुलनसिंग यादव वय २७ रा जीमलगट्टा ता.अहेरी व अमोल बाजीराव मैस्कर वय ३५ रा. आलापल्ली ता अहेरी यांना ताब्यात घेण्यात आले व कलम ६५,(अ),९८(२),८३ मदाका नुसार कारवाई करण्यात आली आहे 
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक  मानकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक वनवे,पोहवा मडावी,करमे ,नापो शडमेक,पोशी डोंगरे,तोडासे,राजुरकर,मेदाळे, रायशिडाम  आदिंनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

आता ३०२, ३०७ सह अनेक कलमा होणार इतिहास जमा  १ जुलै पासून प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये आईपीसी ऐवजी बीएनएस लागू


आता ३०२, ३०७ सह अनेक कलमा होणार इतिहास जमा 
१ जुलै पासून प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये आईपीसी ऐवजी बीएनएस लागू

 

 

अमरावती : -
 हत्येकरिता ३०२, प्राणघातक हल्ल्याकरिता ३०७, बलात्काराकरिता ३७६ अशा फौजदारी कलमा अगदी जनसामान्यांनाही पाठ झाल्या होत्या, हे तीन अक्षरी आकडे भुवया उंचाविणारे होते. मात्र आता या भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसी च्या या कलमा इतिहास जमा होणार आहेत. सर्व पोलिस स्टेशनमध्ये १ जुलैपासून भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएसएस लागू होवून वेगळ्या कलमा दाखल कराव्या लागणार आहे. त्यामूळे पोलिसांनाही आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करताना वारंवार उजळणी करावी लागेल.

केंद्रीय गृह मंत्रालयाने १ जुलै ही तारीख अधिसूचित केली, जेव्हा भारतीय दंड संहिता आयपीसी, फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा अस्तित्वात नाहीसे होईल आणि फौजदारी गुन्ह्यांचे सर्व प्रथम माहिती अहवाल एफआयआर नोंदवले जातील. भारतीय न्याय संहिता बीएनएस अंतर्गत अभियोग आणि खटला अंतर्गत नोंदवलेल्या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय नागरी संरक्षण संहिता बीएनएसएस द्वारे विहित केलेल्या वेळेनुसार पुढे जाईल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड भारतीय पुरावा कायद्या अंतर्गत कायदेशीररित्या स्वीकार्य पुरावे बनतील.

महत्त्वाचे म्हणजे, बिएनएसएसमध्ये सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यातील घटनास्थळाची अनिवार्य फॉरेन्सिक तपासणी करण्याची तरतूद केली आहे, परंतु १ जुलै २०२४ पासून देशभरात एकसमान अंमलबजावणी होणार नाही. बिएनएसएस च्या कलम १७६ (३) मध्ये ज्या राज्यांनी त्यांची संबंधित फॉरेन्सिक क्षमता अद्याप विकसित केलेली नाही, त्यांच्यासाठी पाच वर्षाच्या वाढीव कालावधीची तरतूद केली आहे.

पुर्वीची आयपीसी कलम -

३०२, ३०४ (अ), ३०४(ब), ३०६, ३०७, ३०९, २८६, २९४, ५०९, ३२३, ३२४, ३२६, आरडब्ल्यू ३४, आरडब्ल्यू १४९, ३२५, ३५३, ३३६, ३३७, ३३८, ३४१,५४, ३५४ अ, ३५४ (ब), ३५४ (सी)

आता झालेली बीएनएस -

१०३, १०६, ८०, १०८, १०९, २२६, २८७, २९६, ७९, ११५, ११८(१), ११८(३), ३(५), १९०, ११८(२), १२१, १२५, १२६, ७४, ७५, ७६, ७७

गुन्हा (थोडक्यात) -

हत्या करणे, निष्काळजीपणामुळे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले, घरगुती हिंसेतून विवाहितेचा मृत्यु, आत्महत्येकरिता कारणीभूत ठरणे, हत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, घातपाताकरिता स्फोटक लावणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तवणूक करणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून लैंगिक छळ, मारहाण करुन जखमी करणे, शस्त्राने जखमी करणे, घातक शस्त्राने जखमी करणे, दोन पेक्षा अधिक व्यक्ती गुन्ह्यात सामील असणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हा करणे, स्वतहून दुसऱ्याला गंभीर जखमी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, एखाद्याची वाट रोखणे महिलेचा विनयभंग करणे महिलेकडे वाईट नजरेने पाहणे, महिलेवर हल्ला चढवून तिला निवस्त्र करणे, एखाद्या महिलेला तिचे खासगी कार्य करताना.


PostImage

Vaingangavarta19

June 17, 2024

PostImage

बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर अवैद्य जनावर तस्करी व दारूचा साठा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर अवैद्य जनावर तस्करी व दारूचा साठा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर यांची बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर अवैद्य जनावर तस्करी व अवैधरीत्या दारूचा साठा करणाऱ्या विरुध्द धडक कारवाई करत ३१ लाख ७९ हजार ५०० रुपये चा मुद्देमाल जप्त केले.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. त्या अनूशंगाने पो. नी. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी पथक नेमूण त्यांना अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले १६ जून २०२४ संपूर्ण चंद्रपूर जिल्हा परीसरात अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलींग करित असताना माहीती मिळाली की गोवंश जनावराना कत्तलीसाठी निर्देयतेने कोंबून वाहना मध्ये भरून त्यांना चंद्रपूर मार्गे घेवून जाणार आहे.

अशा माहिती वरून मौजा लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनुमान मंदीरा जवळ पंचासह नाकाबंदी केली असता एक अशोक लेयलैंड कपंणीचा दोस्त प्लस वाहना भरधाव वेगाने येत असताना दिसला त्यास ईशारा करून थांबविले असता सदर वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता सदर वाहना मध्ये निर्दयतेने कोंबलेले व त्यांचे पाय, मान दोरी ने बांधून चारा पाण्याची कसलीच व्यवस्था नसलेले एकूण ०७ जिवंत गोवंशीय गाय जनावरे किमंत ७० हजार रू. व एक जूना वापरता अशोक लेयलेंड कपंणीचा दोस्त प्लस कं. एम एच ३४ बि झेड ०१०४ किमंत ५ लाख ५० हजार रू. असा एकुण ६ लाख २० हजार चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आला.

तसेच अवैद्य धंद्यावर रेड व पेट्रोलींग करित असताना माहीती मिळाली की, मौजा सावली येथुन गडचीरोली जिल्हयात तीन वेगवेगळया वाहनामध्ये देशी विदेशी दारूचा साठा अवैधरित्या बाळगुन वाहतूक करित आहे अशा बातमी वरून मौजा पारडी ते सावली रोडवरील रुद्रापूर फाट्या जवळ नाकाबंदी केली असता दोन ईसम ज्युपीटर मो. सा. ने पायलेटींग करित असता मिळून आले व मुखबिरने सांगीतले प्रमाणे तिन वेगवेगळया वाहना मध्ये एकुण ५९ पेटी देशी विदेशी दारूचा मुदेमाल एकुण किमंत २ लाख १४ हजार ५०० रू. व दारू वाहतूकी करिता वापरलेले तिन चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहन किमंत २३ लाख ४५ हजार रू असा एकुण २५ लाख ५९ हजार ५०० रू. चा माल एकुण सात आरोपी संगणमत करून वाहतूक करित मिळूण आल्याने त्यांचे कडुन जप्त करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन सावली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु. शा. चे सपोनि मनोज गदादे, पोहवा दिपक डोंगरे, पोशि गोपीनाथ नरोटे, अमोल सावे स्थागुशा चंद्रपूर यांनी केले.


PostImage

Vaingangavarta19

June 12, 2024

PostImage

राजीरप्पा धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी ,नववधू झाली अवघ्या चार दिवसांत विधवा


राजीरप्पा धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन पर्यटकांना जलसमाधी ,नववधू झाली अवघ्या चार दिवसांत विधवा 


अहेरी:-
 गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध बिनागुंडाचा राजीरप्पा धबधब्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली  
 भामरागड तालुक्यातील सुप्रसिद्ध बिनागुंडा येथील राजीरप्पा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. नवनीत धात्रक (२८) रा.चंद्रपूर आणि बादल हेमके (३९) रा.आरमोरी हल्ली मुक्काम भामरागड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नाव आहेत
अबूझमाड परिसरात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर बाराही महिने वाहणारा राजिरप्पा धबधबा या भागाचा वैभव आहे. त्यामुळे या मोसमात निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. लाहेरी वरून पुढे १८ किलोमीटर खडतर प्रवास असून देखील बरेच पर्यटक दुचाकी आणि स्थानिक पातळीवरील चारचाकी भाड्याने घेऊन धबधबा पाहण्यासाठी जातात.
भामरागड तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नवनीत धात्रक पत्नी मयुरी धात्रक,ताई नेहा बादल हेमके व मुलगी तसेच त्याचा मित्र नानू साळवे त्याची पत्नी आणि छोटासा मुलगा असे ७ जण १० जून रोजी भामरागडात दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास तालुका मुख्यालयातील पर्यटन स्थळांना भेट देऊन रात्री नवनीत धात्रक याचा भाटवा बादल हेमके यांच्याकडे मुक्काम करून सकाळी बादल हेमके,पत्नी नेहा आणि मुलगी, मेवणा नवनीत धात्रक, पत्नी मयुरी धात्रक आणि मित्र नानु साळवे,त्याची पत्नी आणि मुलगी असे ८ जण ताडगाव येथील चारचाकी वाहन भाड्याने घेऊन बिनागुंडा गाठले.
धबधब्याच्या पाण्यात आंघोळ करताना नवनीत धात्रक खोल पाण्यात बुडत असल्याचे दिसताच बादल हेमके त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. लगेच हेमके आणि साळवे यांच्या पत्नीनी लाहेरी गाठून आपबीती सांगितल्यावर येथील काही नागरिकांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याबाबतची शून्य तक्रार लाहेरी पोलीस मदत केंद्रात दाखल करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र,रात्रीची वेळ असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही.
नवनीत धात्रक याचे चार दिवसांपूर्वी झालं लग्न
बादल हेमके यांचा मूळ गाव आरमोरी असून ते मागील तीन वर्षापासून भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतचे सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्या अगोदर ते चामोर्शी तालुक्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी नेहा बादल हेमके ह्या चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात वीज वितरण विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर साळा नवनीत धात्रक हा देखील चंद्रपूर येथील रहिवासी असून त्याची पत्नी मयुरी कापकर (धात्रक) ही गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महिला व बाल रुग्णालयात अधिक परिचारिका या पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे नवनीत धात्रक आणि मयुरी कापकर (धात्रक) यांचा ७ जून रोजी म्हणजे चार दिवसांपूर्वी लग्न झाला होता


PostImage

Vaingangavarta19

June 11, 2024

PostImage

भुमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे 75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण 


भुमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे 75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण 

गडचिरोली:-

येथील आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा. गडचिरोली यांच्या नावे गडचिरोली येथील जुना
सर्वे नंबर 548/2,549/2 (0.60) हेक्टर आर ही शेती 1995 पासून आहे. त्यांना फेरफार क्रमांक 912,913 असून शेतीवर न विचारता व साधा पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुनर मोजणी च्या नावाखाली नवीन सातबारा नंबर 513/1 (0.36) व 528/1 (0.24) मुळ मालकाच्या नावाने बनवले. त्यामुळे अजूनही त्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.सदर शेतकऱ्याला कार्यालयाचे कुठलेही हेलपाटे न मारता त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता माजी खासदार अशोक नेते यांनी दोन पत्र कार्यलयाला पाठवले त्याचप्रमाणे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी तीन पत्र दिले परंतु अधिकारी त्यांच्या पत्राकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे.

सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली व काही त्रुटी पूर्ण करुन 8 दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली ला उपविभागीय कार्यालयाने अवगत केले मात्र कार्यालयाने अजूनही कुठलीही त्रुटी पूर्ण न करता प्रकरण सादर केला. सातबारा दुरुस्ती च्या नावाखाली होणाऱ्या विलंबास जबाबदार कोण ? व माझ्या नावे नवीन सातबारा केव्हा तयार करून देणार ? या मागणीसाठी त्रस्त वृद्ध शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा.

गडचिरोली हे नाइलाजास्तव 24 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती उपोषणाच्या पत्रातून दिली आहे. तसेच जो पर्यंत माझा सातबारा भूमी अभिलेख कार्यालयातून सुधारणा होऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम राहणार आहे व माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सर्व जिम्मेदारी भूमी अभिलेख कार्यालयाची राहील असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर गंभीर प्रकरणाकडे प्रशासन काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले असून 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला केवळ सातबारा साठी उपोषणाला बसावे लागत असल्याची वेळ आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातबारा साठी वृद्ध शेतकरी उपोषणाला बसणार असल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष्यही लागले आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 10, 2024

PostImage

दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षल्यानी केले गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण 


दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षल्यानी केले गडचिरोली पोलीसासमोर आत्मसमर्पण 

गडचिरोली, ता. १०: अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या एका नक्षल्याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. किशोर उर्फ मुकेश पेंटा कन्नाके (३७) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

किशोर कन्नाके यांनी केंद्रीय राखीव दलाच्या अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. किशोर हा २०१४ मध्ये भामरागड दलममध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून सहभागी झाला. २०१५ मध्ये दंडकारण्य किसान मजदूर संघटेचा अध्यक्ष आणि पुढे २०१८ मध्ये नक्षल्यांच्या क्रांतिकारी जनता समितीचा सदस्य म्हणून २०२२ पर्यंत तो कार्यरत होता.

३ चकमकी, ४ खून आणि जाळपोळीच्या ४ घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. २०१७ मध्ये दरबा पहाडावर, २०२१ मध्ये कोपर्शी आणि २०२२ मध्ये पेनगुंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. २०१५ मध्ये मल्लमपोडूर तलावाजवळच्या रस्त्यावर एका नागरिकाचा झालेला खून, २०१८ मध्ये गोंगवाडा टी पॉईंटजवळ झालेला एका महिलेचा खून, २०१९ मध्ये जुव्वी नाल्याजवळ झालेली एका इसमाची हत्या आणि २०२३ मध्ये पेनगुंडा-गोंडवाडा रस्त्यावर झालेल्या एका नागरिकाच्या हत्येत त्याचा सहभाग होता.

शिवाय २०२१ मध्ये मरकनार-मुरुमभुशी मार्गावर, २०२२ मध्ये बोटनफुंडी-विसामुंडी, तसेच पेनगुंडा आणि २०२३ मध्ये हिदूर गावाजवळच्या जंगलात झालेली बांधकामावरील यंत्रे आणि वाहनांच्या जाळपोळीत किशोर कन्नाकेचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. किशोरला केंद्र व राज्य शासनाकडून एकूण साडेचार लाख रुपये मिळणार आहेत.

२०२२ पासून आतापर्यंत १५, तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६६३ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक जगदीश मीणा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे कमांडंट एम.एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात आत्मसमर्पणाची प्रक्रिया पार पडली.


PostImage

Vaingangavarta19

June 10, 2024

PostImage

तक्रार नोंदवन्यासाठी गेलेल्या तरुणीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी केली शरीर सुखाची मागणी


तक्रार नोंदवन्यासाठी गेलेल्या तरुणीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी केली शरीर सुखाची मागणी 

उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

 


भंडारा : -
प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूनासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली. त्यावेळी त्याने तिला स्पष्ट नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने या बाबतची माहिती सामाजिक संघटनेला दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले. चौकशीअंती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 अ,509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 9, 2024

PostImage

सासऱ्याची हत्या घडवून आणणाऱ्या गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांना अटक


सासऱ्याची हत्या घडवून आणणाऱ्या गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांना अटक

 

गडचिरोली,
 नागपूर येथील वडीलोपार्जित
सुमारे 300 कोटींच्या संपत्तीच्या वादातुन स्वतः च्या सासऱ्याची कट रचुन हत्या केल्या प्रकरणी गडचिरोली येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह इतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

नागपूर येथील शुभमनगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेल मृत्यू झाला होता. त्यांची सुमारे 300 कोटींची वडिलोपार्जित संपत्ती असुन त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सुन अर्चना पुट्टेवार व मुलगी आहे. दरम्यान पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या पत्नी शकुंतलाचे ऑपरेशन झाल्याने ते दवाखान्यातून मुलीच्या घरी जात असतांना कारच्या धडकेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताबाबत पुरुषोत्तम यांच्या चुलत भावाला संशय आल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली व तपासाला वेग आला. तपासाअंती त्यांच्या घरातील कारचालक सार्थक बागडे यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने चौकशी केली असता सचिन धार्मीक व नीरज निमजे उर्फ नायटी यांना पोलीसांनी चौकशीअंती ताब्यात घेतले असता त्यांनी पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या प्रकरणात आरापींनी दिलेल्या बयाणानुसार पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सुन व डॉ. मनीष यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी चालकाला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली. त्यामुळे पोलीसांनी अर्चना पुट्टेवार हिला अटक केली आहे. 
मालमत्तेचा मोह नडला

अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हया गडचिरोली येथे नगररचन सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या सासऱ्याच्या वडिलोपार्जित सुमारे 300 कोटींची संपत्ती असल्याने अर्चना पोर्लेवार यांनी त्या मालमत्तेच्या मोहात सासऱ्याच्या हत्येचा कट रचुन सुपारी देवून हत्या केली. मात्र हाच संपत्तीचा मोह आता त्यांना नडला असुन सासऱ्याच्या हत्ये प्रकरणी अर्चना पार्लेवार यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान अर्चना पार्लेवार हया गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली नगररचना विभागात नगररचना सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहे. तिच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचाही प्रभार आहे. आपल्या कार्यकाळात नगरक्षेत्रातील विकास आराखडा मंजूर करतांना मोठा घोळ केल्याची चर्चाही रंगू लागली आहे. तर गडचिरोली शहरालगत अवैधरित्या अकृषक केल्याच्या तक्रारी असल्याचे समजते. तर तिच्या अवैध संपत्ती बाबत चौकशी केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता असुन तिच्या अटेकेने आता गडचिरोली शहरातील भूमाफियांमध्ये खळबळ उडाल्याचे बोलल्या जात असुन अर्चना पार्लेवार यांच्याकडून पदभार काढून इतरांकडे देण्यात यावे असेही बोलल्या जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 8, 2024

PostImage

स्वतः हच्या जन्मदातत्याला जीवानीशी ठार करुन, दुकानात लपवला मृतदेह


स्वतः हच्या जन्मदातत्याला जीवानीशी ठार करुन, दुकानात लपवला मृतदेह


गोंदीया:-
 जन्मदात्याला ठार करुन आपल्या दुकानात प्रेत ठेऊन शोधण्याचा बनाव करणारा मुलगा शेवटी पोलीसांनी शोधला 

वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात. हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे (४८) यांना दारू पिण्याची सवय होती.

मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं.

या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला. यानंतर दुकान बंद करून निघून गेला. यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली, त्यावेळी राकेशवर संशय आला आणि स्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला
पोलीसांनी मुलाला अटक केली आहे


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

गौण खनिज अवैध उत्खननात कंत्राटदाराला मदत करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी वाघाडे यांचा ठिया आंदोलन


गौण खनिज अवैध उत्खननात कंत्राटदाराला मदत करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी वाघाडे यांचा ठिया आंदोलन 


गडचिरोल्ली;- जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा
वनसंपदा असलेला तालुका आहे. या तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. विकासकामे करतांना कंत्राटदार त्याला लागत असलेला अवैध मुरुम, माती, गिट्टी ही वनपरिक्षेत्रातून उत्खनन करून वाहतूक करुन कामासाठी वापरत असतात. यामध्ये त्या वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने हे काम केले जाते. मेंढरी- गर्देवाडा रा.मा. या कामासाठी कंत्राटदाराने खूप मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी अवैधरीत्या उत्खनन केले आहे. तसेच रेक्कलमट्टा ते रेंगाटोला या रस्ता बांधकामा दरम्यान सुद्धा गट्टा व एटापल्ली वनपरिक्षेत्रातून खूप मोठ्याप्रमाणात अवैध प्रमाणात मुरूम उत्खनन केला गेला आहे याबाबत श्रीकृष्णा वाघाडे यांनी मागील ३ महिन्यापासून तक्रार करूनसुद्धा यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे आजपासून मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जेव्हा पर्यंत वनपरीक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत नाही व कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात येत नाही तेव्हा पर्यंत सदर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील.

सदर ठिय्या आंदोलनास श्रीकृष्णा वाघाडे, रविंद्र सेलोटे बसलेले आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

एस टी महामंडळाच्या बस मध्ये वाढले चोरीचे प्रमाण,याला आळा घालणार कोण


एस टी महामंडळाच्या बस मध्ये वाढले चोरीचे प्रमाण,याला आळा घालणार कोण?

गडचिरोली:-
महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून याला आळा घालणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे 
गडचिरोली आगाराची बस गडचिरोली मौशीखाब २ वाजता जाणारी एस.टी. तत्बल साडेतिन वाजता उशिरा सुटली त्यामुळे सदर बसमधे जाणाऱ्यांची तोबा गर्दी झाली. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी दोन व्यक्तींच्या पैसाची चोरी केली. हि घटना आबेशिवणी येण्यापूर्वीच घडली परतु ज्यांची चोरी झाली त्यांना मौशिखाब उतरल्यावर माहीती झाली. गर्दीमधे चोर सापडला नाही. दि. ६ जुन ला गडचिरोली आगारांची बस उशिरा मौशीखाब कडे निघाली त्यामुळे बसमधे प्रचंड गर्दी झाली व या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लालाजी मेश्राम मौशीखाब यांच्या खिश्यातुन साडेनव हजार रुपयावर डल्ला मारला. लालाजी मेश्राम हा  तेंदूपत्ता बोद भरतीवरून गावाकडे मौशीखाबला जात होता.त्याची पुर्ण कमाई चोरीस गेली. जिजाबाई मसराम गोगाव हि लग्नाला जात होती. तिचीही 3 हजार रुपयाची चोरी झाली. सदर बाब बस कंडक्टर यांना सांगीतले परतु चोराला रंगेहाथ कुणीही पकडू शकले नाही त्यामुळे चोरट्याचे फावले. अश्या घटना अनेकदा घडल्या असल्याचे प्रवासांनी सांगीतले. खेडेगावातही
जाणाऱ्या बसमधे चोरी होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

विनापरवाना अवैध सावकारी करणाऱ्यांवर सावकारी कायद्यानुसार कार्यवाही करा


विनापरवाना अवैध सावकारी करणाऱ्यांवर सावकारी कायद्यानुसार कार्यवाही करा

शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांची पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहाय्यक निबंधक व पोलिस अधिक्षकांना निवेदनाद्वारे मागणी.

चंद्रपुर:- जिल्ह्यातील विनापरवाना व अवैध सावकारी करणाऱ्या बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सावकारी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना आदेश देवुन सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकरी, मजूर व शेतमजूऱ्यांचे होणारी आर्थिक पिळवणूकीला आळा घालून मानसिक व शाररिक शोषणाला जबाबदार सावकारांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यासंदर्भात शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांची पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहाय्यक निबंधक व पोलिस अधिक्षकांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
चंद्रपुर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून त्याचबरोबर शेती व्यवसाय करुन शेतकरी व शेतमजूऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. बळीराजाचा हंगामा सुरु झाल्याने नाइलाजस्तव शेतकऱ्यांना पिक व शेतीसाठी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असल्यामुळे याच संधी फायदा घेत चंद्रपुर जिल्ह्यातील विनापरवाना व अवैध सावकारी करणारे वर्षानुवर्षे अव्याढव्य व्याज वसूल करुन शेतकरी, मजूर व शेतमजूऱ्यांचे आर्थिक पिळवणूक करुन मानसिक व शाररीक शोषण देखील केले जात असल्याचे निदर्शात येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या सावकारी कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे संबंधितांना आदेश देवुन जबाबदार सावकारांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी.

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 कायद्यानुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद असताना देखील बेकायदेशीर व अवैध सावकारीला लगाम बसविण्यात प्रशासन असमर्थ ठरत असून अपरिहार्य कारणास्तव सावकारांकडून कर्ज घेणारे शेतकरी, मजूर व शेतमजूऱ्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याने निदर्शात येत आहे.

परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना पिकासाठी व शेतीसाठी कर्ज देताना स्थावर मालमत्ता तारण घेता न येणे, कर्जाच्या मुद्दलापेक्षा जास्त व्याज न घेणे, कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसऱ्याच्या नावावर सावकारी करणे, कोरी कागदपत्रे न घेणे, हिशेब पुस्तके, नोंदवह्या ठेवणे, व्याजावर व्याज न लावणे, शासनाने निश्चित केलेले व्याजदर आकारणे बंधनकारक आहे. तसेच कर्जदाराला कर्जखाते उतारा सावकाराने देणे, दर तीन महिन्याला पावती देणे बंधनकारक, दंड व शिक्षेची तरतूद, असून दरवर्षी सावकारी परवान्याचे नुतनीकरण बंधनकारक केले असतांना देखील अपरिहार्य कारणास्तव कर्ज घेणाऱ्या कर्जदारांस मिळणाऱ्या संरक्षणाचे हनन केल्या जात आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन बेकायदेशीर सावकारीला चाप लावण्यासाठी आणि परवानाधारक सावकारांवर बंधनासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश-2014 ह्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना देवुन परवानाधारक सावकारांचे सर्व आवश्यक अभिलेख तपासून या तरतुदींचे पालन न करणाऱ्यांवर कार्यवाही करुन बेकायदेशीर सावकारीपासून कर्जदाराला होत असलेल्या मानसिक व आर्थिक पिळवणूकीला आळा घालण्यास उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करता वेळेस शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, उपतालुका प्रमुख गुरुदेव मेश्राम, उपमहानगर प्रमुख विश्वास खैरे, पत्रु भोयर, विठ्ठल लोनबले, शंकर आस्वले, संदीप शिवणकर आदींची उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

गडचिरोली पोलिसांनी केले छत्तीसगढ नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त 


गडचिरोली पोलिसांनी केले  छत्तीसगढ नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त 

गडचिरोली:-
 छत्तीसगड राज्याच्या
सीमावर्ती भागात कोरची तालुक्यातील भिमनखोजी गावानजीकच्या जंगलात शुक्रवारी (दि.७) गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त केले भिमनखोजी जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षली एकत्र आले होते. ही माहिती मिळताच गुरुवारी संध्याकाळी अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविले. पोलिसांचा दवाब पाहून नक्षली पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन पिट्टू, औषध, पुस्तके आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले, याची पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली असून पुढील कारवाई करण्यात तत्पर राहावे असे मार्गदर्शन केले आहे


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून नवनिर्वाचित खा.डॉ. किरसान यांचा सत्कार 


अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून नवनिर्वाचित खा.डॉ. किरसान यांचा सत्कार 

गडचिरोली- :
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेस महाविकास आघाडीचे खासदार डॉ नामदेव किरसान यांचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. 
   रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉ किरसान यांच्या कार्यालयात भेट घेऊन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे हस्ते शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ किरसान यांचा सत्कार केला. यावेळी पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनीही नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 
   काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश सचिव केशवराव समृतवर, विधान सभा प्रभारी प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय  सचिव अशोक खोब्रागडे, युवा अध्यक्ष नरेंद्र रायपुरे , पुण्यवान सोरते,  शहर अध्यक्ष अनिल बारसागडे , तालुका सचिव विजय देवतळे, कैलास रामटेके,  महिला आघाडीच्या कल्पना रामटेके, कविता वैद्य व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
   काँग्रेसचे पदाधिकारी सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले हे सुद्धा उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

June 7, 2024

PostImage

अखेर प्रादेशिक विकास महामंडळ धान खरेदी अपहारातील व्येंकटी बुर्ले व गजानन कोटलावार या आरोपींना ठोकल्या बेड्या 


अखेर प्रादेशिक विकास महामंडळ धान खरेदी अपहारातील व्येंकटी बुर्ले व गजानन कोटलावार या आरोपींना ठोकल्या बेड्या 

सहा कोटी दोन लाख त्र्यानंव हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचा केला अपहार 

गडचिरोली:-

  गडचिरोली जिल्ह्यातील    शेतक­ऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असतात. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतक­ऱ्यांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडुन बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जातात. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यासह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करुन तयार होणार तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अधिनस्त गोदामात जमा करण्यात येतो. जमा केलेल्या तांदळाच्या स्विकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतू, काही अधिकारी/कर्मचारी यात गैरप्रकार करुन आपले आर्थिक हितसंबंध साधतात. 

    गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय, घोट अंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान अपहार झाल्याच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. सदर चौकशित मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2022-2023 या दरम्यान एकुण 59947.60 Ïक्वटल धान खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 31532.58 Ïक्वटल धान जावक झालेला आहे. परंतु मिलर्सना दिलेल्या एकुण वितरण आदेशापैकी 28415.02 Ïक्वटल धान प्रति Ïक्वटल 2040/- रुपये प्रमाणे 5,79,66,640/- रुपयांचा मिलर्सना प्राप्त झाला नाही, तसेच गोदामात देखील शिल्लक नाही. त्याचप्रमाणे, महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकुण बारदाण्यापैकी 71038 नग, प्रति नग 32.76/- रुपये प्रमाणे 23,27,204/- रुपयांच्या बारदाण्यांचा असा एकुण 6,02,93,845/- रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. याकरीता, तत्कालीन केंद्रप्रमुख, मार्कंडा (कं),आष्टी व्येकटी अंकलू बुर्ले, विपनन निरीक्षक आर.एस.मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आ.वि.महा. गडचिरोली जी.आर.कोटलावार असे जबाबदार असल्याचे, प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांच्या लेखी फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन आष्टी येथे कलम – 420, 409, 465, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची गती तीव्र करुन आरोपी नामे (1) व्यंकटी अंकलु बुर्ले, वय 46 वर्षे, व्यवसाय - नोकरी (कनिष्ठ सहाय्यक आदिवासी विकास महामंडळ व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी) रा. आष्टी  ता. चामोर्शी, जि. गडचिरोली (2) गजानन रमेश कोटलावार, वय 36 वर्षे, व्यवसाय - नोकरी (निलंबित प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, यवतमाळ व तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली) रा. कुंदलवाडी ता. बिलोली जि. नांदेड यांना गडचिरोली पोलीसांनी अटक केले असुन त्यांना मा. न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचेसमक्ष हजर केले असता, त्यांची दिनांक 15/06/2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर गुन्ह्राचे तपासात राकेश सहदेव मडावी, वय 34 वर्षे, व्यवसाय – नोकरी (प्रतवारीकार आ.वि.म.घोट) यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्ह्रासंबंधाने त्याचेकडे विचारपुस सुरु आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 6, 2024

PostImage

चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, दोघे  गंभीर जखमी


चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, दोघे  गंभीर जखमी

 

गडचिरोली:

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुरूवारी (दि ६) सायंकाळी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. गुरुदास मनिराम गेडाम (वय ४२, रा. गोवर्धन) आणि वैभव देवेंद्र चौधरी (वय २१, रा. शंकरपूर हेटी) अशी मृतांची नावे असून नीळकंठ भोयर (रा. तळोधी, मोकासा) व लेकाजी नैताम (रा. मारोडा) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चामोर्शी तालुक्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळ आले. त्यानंतर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. याच सुमारास गोवर्धन येथील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत होते. एवढ्यात त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. दुसऱ्या घटनेत शंकरपूर (हेटी) येथील वैभव चौधरी या युवकावरही वीज कोसळली. त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणखी एका घटनेत तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुनघाडा व तळोधी परिसरात वादळ आणि त्यानंतर जोरदार पाऊस आल्याने अनेकांच्या घरांवरील छताचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 6, 2024

PostImage

ग्रामपंचायत प्रशासना विरोधात ग्रामस्थांचे बेमुदत  आंदोलन


 ग्रामपंचायत प्रशासना विरोधात ग्रामस्थांचे बेमुदत  आंदोलन.

 

 

गडचिरोली:-:-

जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथे बाहेर गावातील व्यक्तींनी आबादी जागेवरती अतिक्रमण केल्याने येणाऱ्या काळात त्या गावातील लोकांसाठी एकही जागा शिल्लक नसल्याने या अतिक्रमणाच्या विरोधात व इतर मागण्यांसाठी पेसा समिती व सोनपूर येथील सर्व नागरिकांच्या वतीने दिनांक 6 जून 2024 पासून कोजबी ग्रामपंचायत कार्यालय समोर बेमुदत साखळी आंदोलन सुरू केले असून
यापूर्वी हे अतिक्रमण काढण्यासाठी सोनपूर पेसा समिती व गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालय तथा वरिष्ठ कार्यालयांना पत्र व्यवहार केला परंतु या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्याने शेवटी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला असून जोपर्यंत सोनपुर येथील अतिक्रमण पेसा समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करणे,ग्रामपंचायत प्रशासनाने गाव नमुना 8 अ वर बाहेरील व्यक्तींची व जागेची गरज नसलेल्या व्यक्तींची नोंद करू नये, बाहेरील व्यक्तींचे सुरू असलेले घर बांधकाम बंद करावे,रस्त्यालगत असलेले खताचे खड्डे हटविणे,पाणी टंचाईवर उपाय योजना करणे व इतर मागण्यांसाठी सोनपुर पेसा समिती व गावकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले असून मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.आंदोलनामध्ये रामदास डोंगरवार सुरेश तुमरेटी माजी सरपंच वैशाली डोंगरवार दर्शना वाकडे पुंडलिक सिडाम रसिका कुमरे गीता मडावी प्रीती रणदिवे रवींद्र डोंगरवार सुरेखा तूमरेटी पुष्पा गावडे सविता तुमरेटी संदीप कुंमरे देवराव चुधरी अशोक डोंगरवार रेखा डोंगरवार आकाश रणदिवे अरुण मडावी खुशाल ठाकूर उर्मिला डोंगरवार शांता ठाकूर संगीता डोंगरवार सीता डोंगरवार ज्ञानेश्वर शेंडे कुसुम बावणे दशरथ डोंगरवार अरुण डोंगरवार श्रीरंग ठाकूर लोमेश वाकडे विश्वनाथ तुमरेटी गोपाल डोंगरवार सुरज गावडे धिरज बडोले रमेश डोंगरवार व गावकरी आंदोलनात सहभागी आहेत.


PostImage

Vaingangavarta19

June 5, 2024

PostImage

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक


जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक 

 

वाशीम:-
वाशीम जिल्हात लाच घेणाऱ्यांचा कर्दनकाळ असणारे ACBचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी आज पुन्हा दबंग कारवाई केली आहे. त्यांच्यासह टीम ने सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला २५०० रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. सचिन शिवाजीराव बांगर वय ३९ वर्ष असे लाच घेणाऱ्या अधिकार्याचे नाव असून वाशीम सामान्य रुग्णालयातील वर्ग ३ चे अधिकारी होते. आरोपी विरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय तक्रारदार यांचे पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सही शिक्का घेण्या करिता आलोसे यांनी दि. 05/06/2024 रोजी पडताळणी करवाई दरम्यान 3000/-रु मागणी करून तडजोडी अंती 2500/-रु स्वीकारण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान 2500/-रु पंचासमक्ष स्वीकारले. आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

June 2, 2024

PostImage

उन्हाच्या काहलीत थंडीचा आनंद घेण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू


उन्हाच्या काहलीत थंडीचा आनंद घेण्याच्या नादात तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू


वनविभागाने खड्डा केल्यानंतर सुद्धा कुंपण न केल्याने युवकाचा अंत. नुकसान भरपाई देण्याची मागणी.


चंद्रपूर :-
दुर्गापूर येथील तनवीर शेख वय 19 वर्ष हा लालपेठ कॉलरी क्रमांक 2 मध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला असता त्या भागात वेकोली व वनविभागाच्या जागेत खोदलेल्या एका 40-30 चौरस फूट आराजी असलेल्या खड्ड्यात उष्णतेच्या तीव्रतेने थंडीचा आंनद घेण्यासाठी मित्रांसोबत पोहायला गेला असता त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी 1 ते 1.30 ची असून मृतदेह शोधण्यासाठी चंद्रपूर मनापाच्या रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या बोटीच्या साहाय्याने तब्बल तीन तासानंतर मृतदेह हाती लागला. या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त होतं आहे, मात्र एवढा मोठा खड्डा खोदताना वनविभागाने त्या खड्ड्याच्या सभोंवताला कुंपण घातले नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली त्यामुळे वन विभागाकडून मृतक च्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी होतं आहे.

शहरातील लालपेठ कॉलरी नंबर दोन मध्ये खुली जागा असून तिथे वनविभागाने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत जवळपास एक हेक्टर जागेवर झाडे लावण्याचे काम हातात घेऊन भूमिगत कोळसा खान बुजाविण्याच्या कार्यात रेती व माती जी टाकल्या जाते त्यात पाणी पण सोडल्या जाते ते पाणी साठवणूक करून त्या पाण्याच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी मोठा खड्डा खोदला होता त्या खड्ड्यात पाणी असल्याने दुर्गापूर येथील काही युवक जे लालपेठ कॉलरी येथे आले होते त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी पाण्यात उडया मारल्या दरम्यान काही युवक बाहेर आले पण एक युवक तनवीर शेख हा खड्ड्यात बुडाला आणि त्यातच त्यांचा अंत झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे


PostImage

Vaingangavarta19

June 2, 2024

PostImage

अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर 


अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर 

गडचिरोली,
  जिल्ह्यातील कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास एका बाजूनं धडक दिल्यामुळे दुचाकी चालक रस्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू  झाला तर मागे बसलेली दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली आहे. अज्ञात मालवाहू ट्रकने दुचाकी क्रमांक MH 33 AB 8324 ला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेला आहे.
         मृतक रुपेश गांगसाय नैताम वय २७ वर्ष रा. चांदागोटा तालुका कोरची असे युवकाचा नाव आहे. तर मिनाबाई नीलाराम कल्लो वय ५० वर्षे व महेश निलाराम कल्लो वय २५ वर्ष रा. नवरगाव तालुका कोरची हे दोघेही नात्यात माय-लेक असून गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मिनाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत असून महेशच्या उजव्या पायाला मार लागल्यामुळे दोघांना सुरुवातीला कोरची ग्रामीण रुग्णालयात  १०८ रुग्णवाहिकेनी नेण्यात आले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष विटणकर यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या दोघांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
    नातेवाईकांना याची माहिती झाली ते घटनास्थळी उपस्थित झाले त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं मृतक रुपेश नैताम याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी  रुग्णवाहिका पाठवा म्हणून फोनवरून कोरची ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरला विनंती केली परंतु येथील डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षक यांनी तीन तास लोटून सुद्धा १०२ रुग्णवाहिका पाठविली नाही रुग्णवाहिका का पाठवली नाही याचे कारण डॉक्टरला विचारले असता त्यांनी सांगितले की रुग्णवाहिकेचा वाहनचालक उपस्थित नव्हता आणि उपस्थित झाला तेव्हा जाण्यास तयार नव्हता माझ्याशीच अरे रावी केली असल्याचे डॉ आशिष विटनकर यांनी सांगितले त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचू शकली नाही आणि अपघातात मृत्यू पावलेल्या रुपेशची बॉडी रस्त्यावरच तीन तास पडून होती.
         यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी कोरची येथील माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांना घटनेची माहिती दिली तेव्हा माजी नगराध्यक्ष यांनी नगरपंचायतची स्वर्गरथ बोलावून त्यामध्ये मृतक रुपेश नैताम याला टाकून ग्रामीण रुग्णालय येथे आनले. मृतकांच्या नातेवाईकांनी वेळेवर रुग्णवाहिका पोहोचली नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात ग्रामीण रुग्णालयात रोष व्यक्त केला. अधिक तपास कोरची पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

June 2, 2024

PostImage

सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले


सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने चिरडले

 

गडचिरोली:-
सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या  विद्यार्थीनीला अज्ञात वाहनाने चिरडून टाकले ही घटना आज दि १ जून ला सकाळी घडली
मृतक विद्यार्थीनीचे नाव शर्वरी पद्माकर बनकर वय १४ रा देसाईगंज असे असून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक आंबेडकर वॉर्ड देसाईगंज येथील पांच सहा मैत्रिणी आरमोरी रोडवर सकाळी पाच वाजता फिरायला गेल्या असता रस्त्याच्या कडेला विश्रांतीसाठी बसलेल्या शर्वरी पद्माकर बनकर या विद्यार्थिनीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने ती जागीच मरण पावली.
       सदर विद्यार्थिनी ही स्थानिक प. पू.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय देसाईगंज (वडसा) येथे आठव्या वर्गात शिकत होती. घटनेची माहिती होताच तिला ग्रामीण रुग्णालय देसाईगंज (वडसा) येथे सकाळी दाखल करण्यात आले व लगेच शवविच्छेदन  करण्यात आले.
शर्वरी पद्माकर बनकर ही तिच्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील उदरनिर्वाहासाठी पुणे येथे कंपनीमध्ये काम करतात. मुलीचे कुटुंब फारच गरीब आहेत. आज दुपारी 2.00 वाजता  वैनगंगा नदी घाटावर तिच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले आहे


PostImage

Vaingangavarta19

May 24, 2024

PostImage

तहसीलदारांवर  अज्ञात इसमांनी चढवला हल्ला, गाडीच्या लोखंडी रॉडने फोडल्या काचा


तहसीलदारांवर  अज्ञात इसमांनी चढवला हल्ला, गाडीच्या लोखंडी रॉडने फोडल्या काचा

 


इंदापूर (पुणे) :-
 इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत
पाटील यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात हा प्रकार घडला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज दि २४ मे शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी इंदापूर शहरातील संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला चढवला.

सोबतच खाल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती; ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये शासकीय गाडीच्या काचा फुटल्या असून सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुका परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
सदर हल्ला का करण्यात आला याचा शोधही पोलीसांनी सुरू केला आहे


PostImage

Vaingangavarta19

May 24, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी मात्र पकडले तेलंगाणा वनविभागाने


गडचिरोली जिल्ह्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी मात्र पकडले तेलंगाणा वनविभागाने


गडचिरोली:-

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा वाळू, गांजा, दारु, तांदूळ , सागवान तस्करीमुळे सतत चर्चेत असते. आता त्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीची भर पडली आहे. 20 मे रोजी सिरोंचा वनविभागाचा तपासणी नाका ओलांडून दोन दुचाकीवरून बिनबोभाटपणे बिबट्याच्या कातडीसह तेलंगाणात प्रवेश केला. मात्र, तेलंगाणा वनविभागाच्या  सतर्कतेमुळे ते पकडले गेले. पवन (31) रा. वरदल्ली, बरेगुडा, भूपालपट्टणम, छत्तीसगड आणि बाबर खान (42) रा. लिंगापूर (वि), बरेगुडा, भूपालपट्टणम, छत्तीसगड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, दोन दुचाकी व दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील वनउपज तेलंगाणात जाऊ नये, यासाठी प्राणहिता व गोदावरी या प्रमुख नद्यांवर सिरोंचा वनविभागातर्फे दोन वननाके सुरु आहेत. 20 मे रोजी सिरोंचातून दोन दुचाकीवरून दोघे बिबट्याची कातडी घेऊन प्राणहिता नदीपुलावरुन तेलंगाणात पोहोचले. या पुलावर सिरोंचा वनविभागाचा नाका आहे; पण कर्मचाऱ्यांनी दोन्ही दुचाकी तपासल्या नाहीत. तेलंगाणातील मंचेरियल जिल्ह्यातील रापनपल्ली चेकपोस्टवर मात्र ते दोघे पकडले.

सिरोंचाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दुर्गम, अतिदुर्गम भागातील रस्ते, पुलाची कामे वनकायद्याचा दंडुका दाखवत रोखली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन समिती बैठकीत त्यांना यावरुन सुनावले होते. वनकायद्याचा धाक दाखवून विकासकामे रोखणाऱ्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या अखत्यारित आंतरराज्य सीमेवरील पुलावरुन वनउपज्ञाची तस्करी कशी काय होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 22, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टीचा निकाल पैकीच्या पैकी 


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टीचा निकाल पैकीच्या पैकी 

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय या शाळेचा इयत्ता बारावी चा निकाल १००% लागला आहे
या महाविद्यालयात १२९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते ते पैकीच्या पैकी पास झाले आहेत
त्यामधील हर्ष हुलके ७७.१७%,चिराग दयालवार ७२%, वैष्णवी अम्मावार ७०.५०% यांनी घवघवीत यश संपादन केले आहे
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी संस्था अध्यक्ष, प्र प्राचार्य पी.के सिंग, प्राध्यापक, व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत


PostImage

Vaingangavarta19

May 22, 2024

PostImage

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घुसले घरात एका महीलेचा मृत्यू 


चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घुसले घरात एका महीलेचा मृत्यू 

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

गोंदिया : आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथे मद्यपी ट्रॅक्टर चालकाच्या लापरवाहीने एका महिलेचा जीव गेला. अनियंत्रित ट्रॅक्टर थेट घरात शिरला. या घटनेत कापड धुत असलेली महिला ट्रॅक्टरमध्ये सापडल्याने ठार झाली तर घरातील इतर दोन मुली थोडक्यात बचावल्या. ही घटना किंडगीपार येथील आहे. किसनाबाई बुधराम चोरवाडे (५८) असे मृत महिलेचे नाव आहे.


माहितीनुसार, आमगाव नगर परिषद क्षेत्रातंर्गत येणाऱ्या किंडगीपार येथे किसनाबाई बुधराम चोरवाडे यांचे घर आहे.
घराला लागून रस्ता आहे. किसनाबाई बुधराम चोरवाडे ह्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे घरातील अंगणात कापड धुत होत्या. तर दोन मुली नात घरात खेळत होती. त्यातच मद्यधुंदीत असलेला संदीप कोरे हा शेत कामे आटोपून ट्रॅक्टर क्रं एमएच-३५/जी-१६३७ घेवून जात होता. किसनाबाई चोरवाडे यांच्या घराजवळ येताच ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. चालकाचा नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर थेट घरात शिरला.

या घटनेत ट्रॅक्टरखाली आल्याने किसनाबाई चोरवाडे यांचा मृत्यू झाला. तर घरात खेळत असलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या. प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  आरोपीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

उल्लेखनिय असे की, ट्रॅक्टरची ट्रॉली ही विनानंबर असलेली होती. तर चालक मद्यधुंदीत असल्याचे बोलले जात आहे. आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपासकार्याला सुरूवात केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 22, 2024

PostImage

मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे सापडले एसीबीच्या जाळ्यात ज


मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे सापडले एसीबीच्या जाळ्यात 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
तहसिल कार्यालय मुलचेरा  जिल्हा गडचिरोली येथील पुरवठा निरीक्षक राहूल भाउजी डोंगरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे

  राहुल भाऊजी डोंगरे वय ४०  वर्षे रा. आष्टी हे मुलचेरा तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यानी आपल्या पदाचा फायदा घेण्यासाठी राशन कार्ड धारकांना नेहमीच सतावून लाचेची मागणी करीत होते व महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५०० रुपये खर्च येतो ते तुम्ही द्या नाहीतर तुमचे काम होणार नाही असे सांगून हात झटकून टाकीत होते 
त्यामुळे त्रस्त झालेल्या वर्षा गुरुदास गेडाम यांनी एसीबीच्या अधिकारी यांना माहिती दिली त्यावरून प्रत्यक्ष शाहनिशा करुन मुलचेरा तहसील कार्यालयात सापळा रचला असता राहुल भाऊजी डोंगरे ५०० रुपये लाच घेताना साक्षीदार यांच्या समक्ष मिळूण आले 
 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मु. मुखडी टोला पो. गोविंदपुर ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन ते शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराची आई नामे जिवनकला गेडाम हिचे नावे असलेला शिधापत्रिका मध्ये वडील, मजवा भाऊ, वहीणी व भावाची मुलगी यांची नावे होती. तक्रारदार यांचे मजवा भाऊ गुरुदास यांच्या कुंटूबाचे नविन शिधापत्रिका वहीनी नामे वर्षा गुरुदास गेडाम यांचे नावे दि. ३०/०१/२०२४ रोजी तयार करण्यात आले. परंतू स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडे थम मशीनवर नाव न आल्याने शासनाच्या योजनेचे राशन मिळत नसल्याचे वहीनी वर्षा यांनी सांगीतले. तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे यांना माहिती दिली तेव्हा महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता ५००/-रू. लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली कॅम्प मुलचेरा येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.

पोलीस उपअधीक्षक, श्रीमती अनामिका मिर्झापुरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक, श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळ कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदाराचे वहीणीचे राशन कार्डवर राशन मिळत नसल्याने, महाफुड साईडवर कागदपत्रे अपलोड करण्याकरीता आरोपी राहूल भाऊजी डोंगरे, पद-पुरवठा निरीक्षक, तहसिल कार्यालय मुलचेरा, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली यांनी ५००/- रूपयाची पंच साक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी करून ५००/- रू. लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पो.स्टे. मुलचेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी डोंगरे यांचे आष्टी येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली चम्मु कडुन झडती घेण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, श्री राहुल माकणीकर, ॲन्टी करप्शन ब्युरो, नागपूर,  सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो. नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, पोना किशोर जोंजारकर, पोष्टि संदिप उडाण, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 19, 2024

PostImage

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट


जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट

हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी मांडल्या अनेक समस्या 

आष्टी: -
येथून जवळच असलेल्या हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिराला जिल्हाधिकारी सैजय दैने यांनी सपत्नीक प्रशांत घाम चपराळा येथे सदिच्छा भेट आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले  व मंदिर परिसरात पाहणी केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले 
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक १७ मे रोजी आपल्या कुटुंबासह भेट देऊन दर्शन घेतले आणि चौडमपल्ली, चपराळा मार्गावर असलेल्या जिर्ण झालेल्या पुलीयाची पाहणी केली
 कुनघाडा ते चपराळा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, प्राणहिता, वैनगंगा, व वर्धा नदीच्या संगमावर भाविक भक्तांना नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या कामाची व मंदिरातील समस्या देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या यावेळी चामोर्शी चे तहसीलदार गोन्नाडे, तलाठी महीन्द्रे,उपसरपंच कोकेरवार,, तमुस अध्यक्ष साईनाथ गुरनुले, वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव चौडमपल्ली, उपसरपंच रामचंद्र बामणकर  ईलूर,नायर,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

May 18, 2024

PostImage

कंटनेरची ट्रॅव्हल्स ला धडक दोन्ही वाहन चालक गंभीर तर दहा जखमी 


कंटनेरची ट्रॅव्हल्स ला धडक दोन्ही वाहन चालक गंभीर तर दहा जखमी 

 

★ २ दोघे गंभीर जखमींवर नागपूर तर १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता 19


नागभीड : भरधाव कंटेनरने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान नागभीड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कानपाजवळ घडली
.यात दोनही वाहनचालक गंभीर जखमी झाल्याने नागपूरला हलविण्यात आले,तर उर्वरित १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम.एच.४० बीजी- ६८१८) नागभीडकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एम.एच.४० सीडी ९६५६ कानपा जवळ साहेब नाल्यावर ट्रॅव्हल्सला जबर धडक दिली. 
या धडकेत ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी जखमी झाले. कंटेनरचालक अनितकुमार पटेल वय,२९ वर्ष मध्य प्रदेश व विजय राऊत वय,४६ वर्ष टॅव्हल्स चालक,रा.मूल हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले. 
गीता कायरकर वय,५४ वर्ष मेंडकी,आशा चिलबुले वय,३८ वर्ष,सचिन चिलबुले वय,४३ वर्ष, साची चिलबुले वय,१४ वर्ष,ताराबाई जांभुळे वय,६०वर्ष, धर्मदास राकडे वय,७० वर्ष,ज्योती चिलबुले वय,५१ वर्ष शोभा चिलबुले वय,४० वर्ष सर्व रा .नागभीड, लीला कामडी वय,६० वर्ष नवरगाव,रघुनाथ जिभकाटे वय,७२ वर्ष, ब्रह्मपुरी आदींवर नागभीड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 17, 2024

PostImage

८० लाख रुपयांची चोरबीटी  जप्त करून प्रशासनाने केली मोठी कारवाई 


८० लाख रुपयांची चोरबीटी  जप्त करून प्रशासनाने केली मोठी कारवाई 

चोर बीटी तस्करात माजली मोठी खळबळ
गोंडपिपरी:-
चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाने मोठी कारवाई करीत तब्बल ८० लाख रुपयाची चोरबीटी जप्त केली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथे भरारी पथकाने काल शेतात असलेल्या पक्क्या घरातून अनधिकृत बियाणांचा साठा हस्तगत केला. प्रशासनाच्या या कारवाईने चोरबीटी तस्करात एकच खळबळ माजली आहे. गेल्या काळातील हि सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथील नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात चोरबीटी चा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, वीरेंद्र राजपूत कृषी विकास अधिकारी, चंद्रकांत ठाकरे कृषी उपसंचालक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर कोल्हे, तंत्र अधिकारी गुणनियंत्रण, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, नागपूर , लकेश कटरे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्रावण बोढे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, चंद्रपूर, महेंद्र डाखरे कृषी अधिकारी,. विवेक उमरे, चंद्रकांत निमोड, नितीन ढवस, काटेखाये, कोसरे, जुमनाके, श्री. आत्राम व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोंभुर्णा व चमू यांनी भिमनी येथील नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात तपासणी केली असता याठिकाणी ३९.८८ क्विंटल संशयास्पद अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला.७६.57 लक्ष रुपयाचे हे बियाणे असून प्रशासनाने हा माल ताब्यात घेतला आहे. सदरहू अनधिकृत संशयित कापूस बियाण्याचा साठा इतरत्र परिसरात कुठेही विक्री केली आहे काय याचा तपास कृषी विभाग व पोलीस विभाग करीत आहेत.

शेतीचा हंगाम सुरु झाला आहे. याची तयारी म्हणून चोरबीटी तस्कराचे मोठे जाळे सर्वत्र पसरले आहेत. अशात प्रशासनाने केलेल्या या मोठ्या कारवाईने तस्करात चांगलीच खळबळ माजली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 17, 2024

PostImage

आठ महिन्याच्या गर्भवती महिलेची रुग्णवाहीकेतच झाली प्रसुती 


आठ महिन्याच्या गर्भवती महिलेची रुग्णवाहीकेतच झाली प्रसुती 

 

कोरची :-
कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेफर केलेल्या डिलीवरी च्या पेशंटला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत असतांना बेतकाठी ते पांढरीगोटा च्या दरम्यान असलेल्या डोंगरावर, खाचखळगे असलेल्या रस्त्याने येत असतांना जशी 108 ची गाडी खड्यात गेली तशीच महीलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली. 

सविस्तर वृत्त असे आहे की, दि, १७ एप्रिल ला 11.30 च्या दरम्यान कोरची तालुक्यातील देऊळभट्टी ( पाटील टोला) येथील रहिवासी सौ. लता मुकेश कोरेटी (29) हिला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या 8 महीन्याचा बाळ पोटात होता. त्यामुळे प्रसुतीला वेळ आहे म्हणून घरची लोक बिनधास्त होती. 
अचानक कळा आल्याने तिथून 2 किमी अंतरावर असलेल्या कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लागलीच घेऊन आले. 

तेथील डॉ. चौधरी आणि महिला डॉ. नाकाडे यांनी तपासणी केली आणि महीला रुग्णांना तात्काळ गडचिरोली च्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रेफर स्लीप क्रमांक 1120 दि. 15/5/2024 वेळ दुपारी 1.00.
गडचिरोली ला पेशन्टला घेऊन जाण्यासाठी  108 क्रमांकाच्या  गाडीला बोलाविण्यात आले.गाडी सोबत महिला डॉक्टर किंवा नर्स किंवा आशा वर्कर राहणे अत्यंत आवश्यक असतांना डॉ. चौधरी आणि डॉ. नाकाडे यांनी कुणालाही सोबत पाठविले नाही. 

108 च्या गाडीत डॉ. आतीश सरकार होते. सोबत लताचा पती मुकेश, तिचे नातेवाईक गिरजा कोरेटी ( माजी सरपंच)  ईलेश्वरी नैताम होते. 

पेशन्टची अवस्था पाहता,कोटगुल वरून गडचिरोली ला पेशन्टला न नेता डॉ.सरकारने पेशन्टला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे ठरविले. कारण कोटगुल ते गडचिरोली हा अंतर 140 किमी असून कोटगुल ते कोरची हा अंतर 25 किमी आहे.
कोटगुल वरून येत असतांना कोरची वरून 8 किमी अंतरावर, बेतकाठी ते पांढरीगोटा दरम्यान असलेल्या डोंगरावर जशी गाडी खड्यात गेली तशीच चालत्या गाडीतच बाईची डिलीवरी झाली. सोबत असलेल्या नातेवाईकांना शंका आली त्यामुळे त्यांनी गाडी थांबविली व बाईच्या पोटाला हात लावून तपासणी केली तेव्हा डिलीवरी झाली होती. बाळ बाईच्या साडीतच होता त्यामुळे त्यांना दिसला नाही. 

तिथे असलेले डॉ. सरकार यांनी प्राथमिक उपचार करून लगेच गाडी कोरची ला घेऊन आले. कोरची येथील
ग्रामीण रुग्णालयात बाळ व आईला भरती करण्यात आले. येथे बाळ व आई सुखरूप असून बाळ 8 महीन्याचे आहे व वजन 2.00 किलो आहे.नशीब बलवत्तर होते म्हणून पहिल्या खेपेतील बाळंत नार्मल झाले. परंतु आरोग्य विभागाच्या खेळखंडोबा मुळे बाळ व आई दोघांनाही धोका होता. 
गावात परीचारीका नियुक्त असूनसुद्धा कधीच उपलब्ध राहत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

May 17, 2024

PostImage

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


 गडचिरोली:-
कुरखेडा तालुका सीमे लगत असलेल्या कसारी फाटा नजीक भीषण अपघात होऊन दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना 17 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली
  कैलास मधुकर नाकाडे वय 45 रा .बोळधा  तालुका देसाईगंज असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे कसारी फाटा रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि कैलास हे पडलेले काही नागरिकांना दिसले  तेव्हा पोलिसांना माहिती दिली या घटनेचा तपास देसाईगंजपोलीस स्टेशन करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

May 16, 2024

PostImage

विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना मिळणार अनुदानित महाविद्यालयात बदली


विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना मिळणार अनुदानित महाविद्यालयात बदली 

मुबंई : राज्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेची काही अनुदानित
आणि काही विनाअनुदानित महाविद्यालये असतील, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्याच संस्थेच्या अनुदाणीत महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाने दि. 8 जून 2020 रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती विनियमन अधिनियम 1977 मधील नियम 41 अ मध्ये सुधारणा करून विनाअनुदानित विभागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या त्याच व्यवस्थापनाच्या अनुदानित विभागात बदल्या करण्याची तरतूद केली होती. या बदल्या करण्याबाबत दि. 1 एप्रिल 2021 रोजी शासननिर्णय काढण्यात आलेला होता. त्यानुसार 1 डिसेंबर 2022 पर्यंत बदल्या करण्यात येत होत्या. परंतु, अशा प्रकारच्या बदल्यांना मान्यता देताना शिक्षणाधिकारी कार्यालयात अनियमितता होत असल्याने आणि यासंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे कारण सांगून शासनाने संबंधित बदल्या स्थगित केल्या होत्या. यामुळे अनुदानित विभागात बदलीला शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता देण्यात येत नव्हती. यामुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बदली होऊनही वेतनापासून वंचित राहिले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या प्रीतम शिंदे विरुद्ध महाराष्ट्र शासन या रिट याचिकेत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी नागपूर खंडपीठाच्या दि.1/12/2022 चा शासननिर्णय रद्द केलेल्या निर्णयाची दखल घेतलेली नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील के. डी. ढमाले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि उच्च न्यायालयाने याबाबत शासनाला बदल्या सुरू करण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी युक्तिवाद करताना केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे शासनाने तातडीने परिपत्रक काढून अनुदानित महाविद्यालयाकडे होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांवरील स्थगिती शासन उठवत असल्याचे जाहीर केले. सदर प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये याच्या खंडपीठासमोर घेण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 16, 2024

PostImage

पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी


पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी

मला खर्रा का?  दिला नाही याचा राग धरुन केली मारझोड 


नागपूर :- 
मला  खर्रा का दिला नाही या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाचा पिता - पुत्राने चाकुने भोकसुन खुन केल्याचे उघडकीस आले आहे
.हत्येची ही घटना वाठोडा येथील संघर्ष नगर झोपडपट्टीत मंगळवारी सायंकाळी घडली. देवी नगर गल्लीत राहणारा ३५ वर्षीय जितेंद्र गुर्जर असे मृतकाचे नाव आहे. आरोपींमध्ये ६० वर्षीय आनंदराव बावनकर आणि त्यांचा मुलगा दिनेश बावनकर (२६) यांचा समावेश आहे. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.

 मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव हा खर्रा घेण्यासाठी घराजवळील पान टपरी येथे गेला होता. त्यावेळी मृतक जितेंद्रही तेथे पोहोचला होता. दोघेही दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या वेळी जितेंद्रने पान टपरीवरुन खर्रा विकत घेतला होता त्यावेळी आनंदराव यांनी जितेंद्रला खर्रा खायला मागितला  मात्र जितेंद्रने खर्रा देण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात जितेंद्रने आनंदराव यांना मारहाण केली. मात्र या घटनेनंतर आनंदराव यांनी  घरी जाऊन हा घडलेला प्रकार त्यांचा मुलगा दिनेश याला सांगितला. यानंतर दिनेश त्याचे वडील आनंदराव यांच्यासह जितेंद्रच्या शोधात बाहेर पडले. घरापासून काही अंतरावर त्यांनी जितेंद्रला मद्यधुंद अवस्थेत पाहिलं. दिनेश याने जितेंद्रला आपल्या वडिलांना का मारलं? याचा जाब विचारला असता त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि आरोपी पिता- पुत्राने जितेंद्रवर चाकूने हल्ला करुन जितेंद्रला जखमी केले आणि तेथून पळ काढला.

जितेंद्र गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला पाहून परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जितेंद्रला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. मात्र, नंतर दोघे पिता-पुत्र परिसरात फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 15, 2024

PostImage

अजून किती बळी घेतल्यानंतर गडचिरोली वनविभागाला येणार जाग


अजून किती बळी घेतल्यानंतर गडचिरोली वनविभागाला येणार जाग

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १८
गडचिरोली:  जिल्ह्यातील ज़ंगलात स्वापदानांमुळे आजपर्यंत बरेचसे बळी गेले असुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली नसल्याचे चित्र दिसत आहे कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी येथील तेंदू पत्ता मजूर नतीराम तुळशीराम नरेटी हा इसम आज दिनांक १५ सकाळी 8.30 वाजता जंगलामध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेला आणि तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानक जंगली डुकराने त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात वरील इसम गंभीर जखमी झाला असून त्याला 
उचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, दिनांक १३ मे रोजी झालेल्या आंबेशिवणी येथील पार्वता बालाजी पाल वय वर्षे ६४ यापूर्वी चार दिवसाअगोदर वाघाने हल्ला करून जागीच पडशा पाडला ,अहेरी तालुक्यात अशीच एका महिलेवर जंगलात तेंदुपत्ता संकलन करीत असताना रानटी डूक्कराने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आणि ती महिला आजही रुग्णालयात उपचार घेत आहे पुन्हा काल दिनांक १४ मे रोजी गडचिरोली तालुक्यातील सावरगाव येथे एका महिलेला तेंदू संकलन करीत असताना झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्या महिलेवर हल्ला करून नरडीच्या घोट घेतला तद्वतच कुरखेडा तालुक्यातील घाटी (गांगोली) येथे तेंदूपत्त्याचा शिजन सुरू झाल्याने घाटी येथील तिनशे ते साडेतीनशे मजूर एकत्रितपणे गाव शेजारी असलेल्या जंगलात पहाटे तेंदूपत्ता संकलनासाठी गेले सदर मजूर तेंदूपत्ता संकलन करीत असताना अचानकपणे जंगली हत्तीने आक्रोश करीत त्या मजूरावर हमला केला तेव्हा सदर मजूर भितीच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळून गेले मात्र इश्वर नामक मजूर एका झाडावर चढला तरीही रानटी हत्तीचा हैदोस कमी झाला नाही त्या हतींचा एवढा आक्रोश होता की मजूर चढलेल्या झाडाला खाली कोसळवले त्या झाडावर चढून बसलेला मजूर झाडासह खाली कोसळवला परंतु त्याचे नशीब बलवंत्तर म्हणून झाडासोबत खाली पडल्यानंतरही आपला जीव वाचवण्यासाठी उठून त्याने पळ काढला त्यामुळे तो स्वतःचा जीव वाचवू शकला लगेचच वनविभागाला देण्यात आली तेंव्हा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावात आले असता गावकऱ्यांनी घेराव घालून जर आमच्या जंगलात रानटी हत्ती आले होते तर आम्हाला गावामध्ये मुनारी का देण्यात आली नाही सर्वश्री जवाबदारी वनविभागाची आहे असा हेका गावकऱ्यांनी धरला होता गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता सिझन सूरू झाल्यापासून जंगली स्वापदाचे हमले हे मनुष्य प्राण्यावर होत असून नाहक गोरगरीबांचे बळी जात आहेत तेव्हा तेंदूपत्ता संकलन हा सिजन गोरगरीब मजूरांसाठी पोटपाण्याची भाकर आहे अशा परिस्थितीत त्यांची भाकर हिरावल्या जात असेल तर वनविभागाचे काम काय  ? आणि गडचिरोली जिल्ह्यात एकमेव  अभयारण्य सोडता जिल्ह्यात एवढे मोठे स्वापद आले कुठून आणि वनविभागाने ते आणले असतील तर का माहिती दिली नाही असा  प्रश्न जनता करित आहे अजून वनविभाग गडचिरोली जिल्ह्यातील स्वापदामार्फत किती बळी घेतल्यानंतर लक्ष देणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे


PostImage

Vaingangavarta19

May 14, 2024

PostImage

तेंदुपत्ता हंगामात वाघांनी घातले विघ्न,तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात  गेली महिला वाघाने हल्ला करून केले ठार.


तेंदुपत्ता हंगामात वाघांनी घातले विघ्न,तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात  गेली महिला वाघाने हल्ला करून केले ठार.

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

गडचिरोली : -
गडचिरोली मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक 411 मध्ये आज वाघाने केलेल्या हल्ल्यात 64 वर्षीय महिला ठार झाल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर महिला हि तेंदूपत्ता तोडणी करिता पहाटेला जंगलामध्ये गेली होती जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला चढवला व तिला ठार केले. 

मृतक महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल वय,64 वर्ष रा. आंबेशिवणी आहे.


सदर घटनेची माहिती गडचिरोली वन विभागाला देण्यात आलेली असून वन विभागाची टीम आंबेशिवणी येथील बामणी बीट मध्ये दाखल होऊन पंचनामा व पुढील कारवाई करत आहे.


 या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे सदर प्रकरणाची दखल घेत वन विभागाने मृतकाच्या परिवाराला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे.

 या परिसरात वावरत असणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा याप्रसंगी नागरिकांनी केलेली आहे.

सदर मृतक महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 14, 2024

PostImage

 10 वी CBSE परीक्षेत  सौम्या गायकवाड ने मिळविले नेत्रदीपक यश


 10 वी CBSE परीक्षेत  सौम्या गायकवाड ने मिळविले नेत्रदीपक यश

 अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

पिंपरी चिंचवड:-

वर्ग १० सिबिएससी बोर्डाने नुकताच निकाल जाहीर केला असून 2023-24 मध्ये झालेल्या CBCE  10 वीच्या परीक्षेत कु . सौम्या गायकवाड हिने घवघवीत यश संपादन केले आहे

सौम्या शशिकांत गायकवाड ही ब्लासम पब्लिक स्कूल ताथवडे पिंपरी चिंचवडची विध्यार्थीनी आहे व तिने ९४.०२ टक्के मिळवित आपल्या शाळेचे व आई -वडीलांचे नाव रोशन केले आहे 


सौम्या गायकवाड हिने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे दैनिक अचूक निदान चे संपादक प्रा डी . के . साखरे भाजप ओ बी सी मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे ,भीम बाबा संस्था सोलापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद मोरे ,  ब्लॉसम शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  तसेच आई वडील , आजी-आजोबा यांनी तीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 


PostImage

Vaingangavarta19

May 13, 2024

PostImage

कतरंगट्टा येथील पोलीस – नक्षल चकमकीत दोन महिला नक्षल्यांसह तिघांना कंठस्नान


कतरंगट्टा येथील पोलीस – नक्षल चकमकीत दोन महिला नक्षल्यांसह तिघांना कंठस्नान

वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली, दि. 13 : जिल्ह्यातील दक्षिणेच्या जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन महिला नक्षलींसह तिघांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. या घटनेने नक्षली संघटनेला मोठा हादरा बसल्याचेही बोलल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांच्या टीसीओसी कालावधी दरम्यान पेरमीली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात लपून बले असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली असता गडचिरोली पोलिस दलाचे सी-60 जवानांची तुकडी शोधमोहीम रबविण्याकरिता रवाना करण्यात आली. दरम्यान जवानांची तुकडी सदर परिसरात पोहचली असता नक्षल्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. काही काळ चाललेल्या या चकमकीत जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलाचा फायदा घेत पसार झाले. चकमकीनंतर परिसराची झडती घेतली असता एक पुरुष व दोन महिला नक्षालींचे मृतदेह आढळून आले. दरम्यान मृतकामध्ये पेरिमिली दलमछा प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांड वासू अशी ओळख पटली असून इतर दोन महिला नक्षल्यांची ओळख पटलेली नाही अशी माहिती आहे.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य व स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली असून नक्षल्यांच्या मोठा घातपात करण्याछा डाव होता असेही बोलल्या जात आहे. दरम्यान परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 13, 2024

PostImage

सांस्कृतिक भवन परिसरात टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी


सांस्कृतिक भवन परिसरात टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी

परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात,पिंकु बावणेचा आंदोलनाचा इशारा

 

 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

देसाईगंज-
      शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरीकांच्या कराच्या उत्पन्नातुन कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.सदर सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतांनाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याने दुर्गंधी सुटली असुन यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा यथाशिघ्र उचलुन विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी प्रशासनाला दिला असल्याने नगर पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
      देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य सोपस्कार पार पाडता यावेत करीता शहराच्या सर्व्हे नं. २४/५ मध्ये ८ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते.कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात.मात्र अलिकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु ठरू लागले असुन परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष झाला आहे.
     दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलुन डंपिंग यार्ड मध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा कार्यरत असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्र वास लगतच्या परिसरात  पसरला आहे.हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळे अनेकांना परिसरात वास्तव्य करणे कठिण होऊ लागले आहे.अनेकांना मळमळ, पोटाचे आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या आहेत.ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी केली असुन समस्या मार्गी लावण्यात न आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत नगर प्रशासन काय कारवाई करते याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 12, 2024

PostImage

सिनेस्टाईलने पकडले आष्टी पोलीसांनी अवैध दारू तस्करी करणारे वाहण


सिनेस्टाईलने पकडले आष्टी पोलीसांनी अवैध दारू तस्करी करणारे वाहण

१९ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी पोलीसांनी सिनेस्टाईलने अवैध दारू तस्करांची गाडी पकडून मोठी कारवाई केली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एका स्कार्पीओ वाहनातून अवैध दारू तस्करी होत असल्याचे माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी नाकाबंदी केली असता महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय समोरील रोडवर वाहनांची तपासणी करीत असताना एम एच ३२ एक एच ५५५६ ह्या वाहनास पोलीसांनी थांबविण्यास प्रयत्न केला तेव्हा सदर वाहन चालकाने पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला व तात्काळ वाहन मागे वळविला व आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चामोर्शी रोडकडे कुच केली
आष्टी पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला व चामोर्शी. पोलीसांना कळविले त्यानुसार दारु तस्कर वाहन भरधाव वेगाने पळून जात असताना  शासकीय बांधकाम विभाग चामोर्शी येथे पकडले व वाहंनाची चौकशी केली असता आय बी कंपनी चे ४८ बॉटली किंमत ९६००० रुपये,देशी दारू ४०  बॉक्स किंमत ३२००० रुपये व वाहण किंमत पंधरा लाख रुपये वापराती माल असा विस लाख रुपयांचा मुद्देमाल  पोलीसांनी जप्त केला आहे
आरोपी निखील राजू क्षिरसागर
वय २१ रा. गवराळा ता. भद्रावती ,  नितेश वशिष्ठ चंदनखेडे वय ३४ रा. भद्रावती याचे विरुद्ध कलम ३०७ ,३४भादवी सहकलम ६५(अ),८३ मदाका,१८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
सदरची  कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल,अतुल तराडे, देविदास मानकर, पोलीस शिपाई अतुल तोडासे,संतोश नागुलवार,मुनेश रायशिडाम,पराग राजुरकर,मेदाळे यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 12, 2024

PostImage

नदी पात्रात रेती उपसा करताना महसुल विभागाच्या पथकाने पकडले चार ट्रॅक्टर


नदी पात्रात रेती उपसा करताना महसुल विभागाच्या पथकाने पकडले चार ट्रॅक्टर 

 

प्रमोद झरकर - उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

 

मुल : 
तालुक्यातील मारोडा- पेटगांव मार्गावरील उश्राळा गावालगत असलेल्या उमानदीच्या पात्रातच रेती उपसा करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार ट्रॉक्टर पकडून मोठी कारवाई केली आहे 
मिळालेल्या माहितीच्या आधारे रेती उपसा करणा-यांवर आळा घालण्यासाठी नायब तहसिलदार नंदकिशोर कुमरे यांचे नेतृत्वात भरारी पथक तयार करण्यांत आले.तयार करण्यात आलेल्या भरारी पथकातील मंडल अधिकारी,संजय कानकाटे, दिपक गोहणे,तलाठी,शंकर पिदुरकर आणि महेश पेंदोर यांनी आज पहाटे 4 वाजता पासून उश्राळा रेती घाटालगत पाळत ठेवली. 
पाळतीवर असतांना चार ट्रॅक्टर सदर रेती घाटावर रेतीचा उपसा करण्यासाठी आले.दरम्यान 8.40 वा.चे दरम्यान भरारी पथकाने धाड मारत रेतीने भरलेले तीन आणि रेती भरण्याचे उद्देशाने उभा असलेला एक असे चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
 ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेतली असता सदर ट्रॅक्टर मारोडा येथील सचिन गुरनूले,विकास चौधरी,बाळु मंडलवार आणि श्रीकोंडावार यांच्या मालकीचे असल्याचे समजले. भरारी पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात आणले असून नियमानुसार कारवाई करण्यांत येत आहे.
ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर पैकी दोन ट्रॅक्टरवर नंबर प्लेट नसुन बांधकाम पुर्ण करण्यासाठी अनेकांना रेतीची आवश्यकता असल्याची संधी साधुन तालुक्यातील अनेक मंडळी रेतीचा अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत.
रेतीचा अवैद्य उपसा करतांना तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले, महसुल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईने रेती व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहेत


PostImage

Vaingangavarta19

May 11, 2024

PostImage

चेरपल्लीच्या महिलेवर तेंदू संकलन करताना रानडुकराचा हल्ला 


चेरपल्लीच्या महिलेवर तेंदू संकलन करताना रानडुकराचा हल्ला 

अहेरी 
जवळील  चेरपल्ली येथील एका महिलेवर तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे

 राजेश्वर बुचम रामटेके यांची पत्नी अंजली राजेश्वर रामटेके हे दिनांक 11 मे रोजी सकाळी तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर रान डूकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यामधे ती गंभीर जखमी झाली आहे सदर घटना आज दि ११ मे ला सकाळी सुमारे 8.30 ते 9 वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 
      सध्या अहेरी तालुक्यातील खेळेगावांमध्ये तेंदुपत्ता तोडण्याचा सिजन सुरू झाला असून सामान्यांपासून ते गोर गरीब परिवारातील नागरिक या कामासाठी पहाटेला जंगलात जात असतात मात्र त्यांना जंगली जनावरांचा सामना करावा लागेल याची कल्पना नसते त्यामुळे असे गंभीर अपघात होत असतात. त्यामुळे नागरिकांनी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातांना सावधान असणे आवश्यक आहे. जेणेकरून जंगली जनावरांच्या हल्ल्यापासून बचावता येईल.


PostImage

Vaingangavarta19

May 10, 2024

PostImage

भाडेकरूच्या घरात घरमालकाच्या मुलगी - जावयाने केली चोरी


भाडेकरूच्या घरात घरमालकाच्या मुलगी - जावयाने केली चोरी

मुलगी पोलीसांच्या ताब्यात तर जावई फरार 

भद्रावती:-
शहरातील गोविंद लेआउट येथे राहणाऱ्या घरातून १५ तोळे सोनं व रोख रक्कम चोरी झाल्याची घटना दिनांक 4 मे रोजी घडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या तपासात घरमालकाची मुलगी व जावईच या घरपोडीचे चोर निघाल्याने आज गुरुवारला मुलीला अटक करण्यात आली असून जावई फरार आहे.

सविस्तर वृत्त असे की, वैशाली सतीश कारेकर वय २८ वर्ष, सतीश कारेकर वय ३८ वर्ष राहणार वणी हल्ली मुक्काम भद्रावती असे आरोपीचे नाव असुन फिर्यादी महेश माशीरकर हे मंदा वरखडे राहणार गोविंद लेआऊट यांच्या घरी भाडयाने राहतात घटनेच्या दिवशी महेश यांचे आई- वडील बाहेर गावी गेले होते व महेश हा काही कामानिमित्त घरातील दरवाज्याला कुलुप न लावता काही वेळासाठी बाहेर गेला. ही संधी साधुन आरोपींनी किरायेदराच्या घरात प्रवेश  करून कपाटातून 15 तोळे सोनं व रोख रक्कम ७ हजार लंपास केले.

महेश घरी आल्यावर त्याला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरी शोधाशोध करून तसेच शेजारी चौकशी करूनही चोरीचा सुगावा न लागल्याने त्याने दिनांक 5 मे रोजी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार बिपिन इंगळे यांनी तपास सुरू करून घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज बघितले मात्र घटनेच्या वेळी बाहेरील कोणी व्यक्ती घरात प्रवेश करताना किंवा जाताना दिसला नाही त्यानंतर पोलिसांना घरमालकावर संशय आल्याने त्यांनी चौकशी केली अखेरीस वैशालीला पोलिसी हिसका दाखवताच तिने चोरीची कबुली दिली.

वैशालीला अटक करण्यात आली असून तिचे कडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील दुसरा आरोपी सतीश फरार आहे. सदर कारवाई ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी विरेंद्र केदार, गजानन तुपकर, अनुप आष्टूनकर, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुधरी, जगदीश झाडे, योगेश घाटोळे यांनी केली.


PostImage

Vaingangavarta19

May 10, 2024

PostImage

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या आषीशला वाघाने केले ठार


तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या आशिषला वाघाने केले ठार

 

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

मुल :-
तालुका अंतर्गत पदजारी -रत्नापूर जंगलामधील कक्ष क्र.३२४मध्ये गावातील चार ते पाच लोक तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यासाठी गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने आशिष सुरेश सोनुले वय ३४ याचेवर हमला करुन ठार केले 
मुल तालुक्यातील जंगलव्याप्त ग्रामीण भागात उन्हाळ्यात काम नसल्याने मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात साठी जातात. रत्नपुरा पडझरी परीषदेचे काही सदस्य पहाटे गावाजवळील जंगलात तेदुपत्ता तोडणी साठी गेले होते. नेहमीप्रमाणे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पाने तोडत असताना झुडपात बसलेल्या पट्टेरी वाघाने आशिष सोनुले यांच्यावर हल्ला करून काही अंतरापर्यंत खेचत नेले. वाघाने आशिषवर हल्ला केल्याचे शेजारी उपस्थित असलेल्या मित्रांना समजताच  आरडाओरडा केल्याने वाघ जंगलात पळून गेला 

 आज घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त करत काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली वाघांच्या बंदोबस्ताची मागणी लावून धरली. आज वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आशिष सुरेश सोनुले यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र सहायक पकेवार, वनरक्षक एस.जी. पकडले, वनरक्षक ज्योती दावेवार यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर क्षेत्र सहाय्यक पकेवार यांनी मृताच्या पत्नीला 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले व शासकिय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही सांगितले


PostImage

Vaingangavarta19

May 9, 2024

PostImage

अवैध रेती वाहतुक करणा-या रेती तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुस्क्या 


अवैध रेती वाहतुक करणा-या रेती तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुस्क्या 

चंद्रपुर :-पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे एक पथक पो.स्टे. शेगाव येथे पेट्रोलिंग करीत असता दि. 09.05.2024 गोपनिय बातमीदारा कडुन मिळाली की, काही ईसम ट्रॅक्टरनी अवैधरित्या बोथली नदी घाटातुन ट्रॅक्टरनी अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतुक करुन सावरी, गिरोला व आबमक्ता परीसरात करणार आहेत अश्या गुप्त माहिती वरून पहाटे 07.30 वा. दरम्यान सावरी ते गिरोला रोडवर कर्मविर शाळेजवळ सापळा रचुन तिन वेगवेगळ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्यांच्या दिशेने येताना दिसले. तेव्हा त्या तिन्ही ट्रॅक्टरला थांबवुन वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचासमक्ष पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तिन ब्रास रेती मिळुन आली. वर नमुद तिन्ही ट्रॅक्टर चे चालकास रेती वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारले असता त्याचे जवळ रेती वाहतुकीचा परवाना नसुन त्याने ती रेती बोथली नदीघाट येथुन चोरुन आणुन मौजा सावरी, गिरोला परीसरात विकण्याकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरच्या कारवाईत एकुण 03 ब्रास रेती किं. 15,000/- रु. व 03 ट्रॅक्टर किं. 18,00,000/- असा एकुण 18,15,000/-रु. (अठरा लाख पंधरा हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करुन चालक नामे चालक नामे 1) सुनिल शालीक गायकवाड वय 30 वर्षे रा. खानगाव ता.चिमुर जि. चंद्रपुर 2) रविंद्र अंबादास काळसर्पे वय 35 वर्षे रा. बेंबडा ता. वरोरा 3) नितेश नथ्थुजी झाडे वय 33 वर्षे रा. अमरपुरी ता. चिमुर व मालक नामे 4) प्रविण शंकर मोहारे वय 35 वर्षे रा. गिरोला ता. वरोरा 5) दामोघर ताराचंद शेंडे वय 51 वर्षे रा. गुजगव्हाण ता. चिमुर पाहीजे आरोपी नामे 6) प्रशांत उर्फ माकोडा जनार्धन शामकुळे वय 40 वर्षे रा. खडसंगी ता. चिमुर यांचेविरुध्द पो.स्टे. शेगाव येथे विविध कलमां अंतर्गत गुन्हा नोंद करुन जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी पो.स्टे. शेगाव यांचे ताब्यात देण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

May 9, 2024

PostImage

शेताची पाहणी करीत असताना  सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू 


शेताची पाहणी करीत असताना 
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू 

गडचिरोली:-
 कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा जवळील फरी येथील  एका शेतकऱ्याला  शेतीची पाहणी करीत असताना त्याला विषारी सापाने दंश केल्याने  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 धान कापनीचा मोसम सुरु झाला आहे परंतू मागील एक दोन दिवसांपुर्वी परिसरात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचून ओलावा झाला आहे. शेतातील साचलेल्या पाण्यामुळे धान कापनी करता येईल का हे बघण्यासाठी फरी येथील शेतकरी देवानंद सदानंद मडावी वय ३८ वर्षे शेतात गेला असता, शेतातच त्याला  विषारी सापाने दंश केला प्रथमोपचार करिता त्याला मालेवाडा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तेथुन पुढील उपचारासाठी कुरखेडा उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.


PostImage

Vaingangavarta19

May 9, 2024

PostImage

दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना 


दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना 


गोंडपिपरी, ता. ८ : नेहमी आपल्या घराजवळ खेळणारे काही चिमुकले न्यायालयाच्या बाजूला असलेल्या तलाव परिसरात गेले. यापैकी दोघे जण पोहायला तलावात उतरले अन् बुडाले. रात्री उशिरापर्यंत मुले घरी आले नाही. यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. शेवटी तलावाच्या जवळ दोघांचे कपडे आढळून आले. पोलिसांना बुधवार (ता. ८) सकाळी त्यांचे मृतदेह सापडले.

मंगळवारी दुपारी गोंडपिपरीत घडलेली ही घटना रात्री समोर आली. दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गोंडपिपरीकरांना हेलावून सोडले. गौरव विलास ठाकूर (वय १४), शौर्य भास्कर पिंपळशेंडे (वय १५) अशी मृतांची नावे आहेत. ते येथील शिवाजी चौकातील रहिवासी होते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास शिवाजी वार्डातील काही मुले फिरण्यासाठी गेले. त्यानंतर न्यायालयाजवळ असलेल्या परसबोडी तलावात त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात उतरले. काही वेळाने तेथील काही मुले घरी परतले. मात्र, बऱ्याच वेळेपर्यंत गौरव व शौर्य हे घरी परतले नाही. आई वडिलांनी त्यांना शोधण्यास सुरवात केली. जवळच असलेल्या तलावाजवळ ते पोचले. तिथे आपल्या मुलांचे कपडे बघून त्यांना शंका आली. लगेच आई वडिलांनी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र रात्र बरीच झाल्याने पथक पोहचू शकले नाही. दरम्यान तलावाजवळ रात्रभर पोलिसांनी पहारा दिला. सकाळी पोलिसांनी तलावातून दोन मृतदेह बाहेर काढले. आपल्या चिमुकल्या मुलाचे शव पाहता आई वडिलांनी हंबरडा फोडला.


PostImage

Vaingangavarta19

May 6, 2024

PostImage

विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट


विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट.

गडचिरोली:-
विध्वंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यानी पुरुण ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी उध्वस्त केले आहे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  2024 दरम्यान आय.ई.डी. हल्ले करण्याच्या योजनेत माओवाद्यांनी टिपागड परिसरात काही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स जमिनीत पुरुन ठेवली असल्याबाबतची विश्वासार्ह माहिती प्राप्त झाल्याने कोणत्याही संभाव्य घटना टाळण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 साठी त्या भागात क्षेत्राचे शोध अभियान राबविले आणि सुरक्षा दलांची जोरदार तैनाती करण्यात आली होती, ज्यामुळे माओवाद्यांना त्या वेळी या क्लेमोअर्स / स्फोटकांचा वापर करणे अशक्य होते. खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे काल टिपागड परिसरात एक निश्चित अचूक ठिकाण उघडकीस आले जिथे डोंगरावर ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स पुरुन ठेवण्यात आले होते.
  पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 02 बी.डी.डी.एस. च्या पथकासह सी - 60 चे एक पथक आणि सी.आर.पी.एफचे एक क्यु.ए.टी पथक डंप शोध मोहिम राबविणेकामी आणि गरज पडल्यास तो नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आले होते.  आज सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर आणि स्फोटकांनी आणि गंजलेले लोखंडी तुकडे भरलेले 03 क्लेमोर पाईप्स देखील सापडले.  उर्वरित 3 क्लेमोर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते.  पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले.  एकुण 9 आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बी.डी.डी.एस. पथकाच्या सहाय्याने घटनास्थळी नष्ट करण्यात आले.
तसेच घटनास्थळी असलेले उर्वरित साहित्य जागीच जळून खाक झाले आहे. पोलीस मदत केंद्रामध्ये आल्यानंतर गुन्हा नोदविण्याची तजवीज ठेवली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 5, 2024

PostImage

सिंगणपल्ली गावाकडे लोकप्रतिनिधीनी फिरवीली पाठ


सिंगणपल्ली गावाकडे लोकप्रतिनिधीनी फिरवीली पाठ

 रस्त्याचा प्रश्न केव्हा सुटणार, ग्रामस्थांचा सवाल 

लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात त्यानंतर ते गावात कधी फिरकतच नाहीत 

आष्टी: -
चामोर्शी तालुक्यातील सिंगणपल्ली या गावाला एकमेव पोचमार्ग असून तो पूर्णपणे उखडून गेला असल्याने गावकर्‍यांना ये - जा करण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सिंगणपल्ली हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येत असल्यामुळे रस्ता बनविण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे पण हे गाव चपराळा वन्यजीव अभयारण्यात असले तरी ये - जा करण्याकरिता पक्का  नको काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थ करीत आहेत 
चौडमपल्लीपासून 4 कि.मी.अंतरावर असलेल्या सिंगणपल्ली या गावाला जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्याची अशी चाळण झाली आहे की पादचाऱ्यांना काटकसर करावी लागते आहे. 
शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे, वैद्यकीय सुविधा, अशा अनेक मूलभूत गरजांसाठी  गावकर्‍यांना मोठी कसरत करावी लागते आहे
 या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी या गावाच्या गोरगरीब जनतेचा मुलभूत गरजांचा विचार करून कमितकमी ह्या रस्त्याकडे  लक्ष देतील काय? याकडे गावकरी आस लावून बसले आहेत. निवडणूकीच्यावेळी लोकप्रतिनिधी गावात येऊन मोठ मोठे आश्वासन देतात आणि निवडणूक झाली की विसरून जातात आमची जाण्यायेण्याची अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे


PostImage

Vaingangavarta19

May 5, 2024

PostImage

सप्तशृंगी गडावरुन खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीची आत्महत्या


सप्तशृंगी गडावरुन खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीची आत्महत्या

वणी:- आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील शीतकड्यावरून सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सप्तशृंगी गडावर मंगेश राजाराम शिंदे वय 24 वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक व अल्पवयीन मुलगी हे मोटर सायकल क्र. Мн 15 HJ 5915 ने वडनेर भैरव ता. दिंडोरी जि. नाशिक येथुन दि. 28/04/2024 रोजी वणी सप्तश्रृंगी गड येथे आले होते.
सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येवून सुमारे चारशे ते पाचशे फुट खोल दरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. शीतकड्यावरून उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह हा झाडाला अडकलेला तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेला आढळला. घटनेस साधारण सहा दिवस होवून गेलेले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

याबाबत भातोडे, ता. दिंडोरी चे पोलिस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी माहिती दिल्यानंतर वणी पोलिसांत खबर देण्यात आली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशा दरी पार करीत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर युवक व युवतीचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहीती असून याबाबत  वनी पोलिस अधिक चौकशी करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 5, 2024

PostImage

कत्तलखान्याकडे नेत असलेल्या जनावरांना पोलीसांनी दिले जीवदान


कत्तलखान्याकडे नेत असलेल्या जनावरांना पोलीसांनी दिले जीवदान

२२,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागभीड:-
कत्तलखान्याकडे नेत असलेल्या तिन वाहनांना रेल्वे क्रॉसिंग जवळ नागभीड पोलीसांनी तिन पिक अप मधील १२ बैलांना जीवदान दिले आहे
गुप्त माहिती वरून दि ५ में ला नाकेबंदी केली तेव्हा एम एच ३४ बी झेड १४४१ ,एम एच ३६ एए २८११ ,एम एच ३६ एए २८८४ या तिन वाहनांना थांबवून चौकशी केली असता प्रत्येक वाहनात ४ बैल असे १२ बैल मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अक्सर सय्यद अली सय्यद वय ४२ रा.ब्रम्हपूरी देवदास गोमा नेवारे वय ४० रा.सुकडी जिल्हा भंडारा, धनराज बडवाईक ४०, तौशीफ आशीफ पठाण वय २२ दोन्ही रा.पापडा जिल्हा भंडारा या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
तीन पिक अप वाहन किंमत २१ लाख रुपये व १२ बैल एक लाख विस हजार रुपये असा एकूण बाविस लाख विस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड,सपोनी पोटभरे, पोलीस अंमलदार अजीत, रोहीत, चापोशी गजानन यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 4, 2024

PostImage

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार


तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार

प्रमोद झरकर/उपसंपादक वैनगंगा वार्ता १८

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील  पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल )येथील ४ मे २०२४ ला सकाळी अंदाजे ८:३० वाजता तेंदूपत्ता गोळा  करण्यासाठी जंगलात गेलेल्या सौ. दीपा दिलीप गेडाम (३५) वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस स्टेशन चे ठाणेदार तुषार चव्हाण आणि त्यांची चमु, वनविभाग मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, क्षेत्र सहायक प्रधान शिवनी, वन रक्षक मडावी,  कोवे, शेख, भारत मडावी, सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर व पि आर टी सदस्य हजर होते.


PostImage

Vaingangavarta19

May 4, 2024

PostImage

आष्टी परिसरात अपघाताची मालीका सुरुच,उभ्या ट्रकला ट्रकने दिली धडक, ट्रकचालक जखमी 


आष्टी परिसरात अपघाताची मालीका सुरुच,उभ्या ट्रकला ट्रकने दिली धडक, ट्रकचालक जखमी 

आष्टी येथील महाकाली पेट्रोल पंपा जवळील घटना

आष्टी :- शहरापासून गडचिरोली  जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी शहराजवळील महाकाली पेट्रोल‌ पंपाजवळ सि .जी. ०७ बि. के. ४५१५ या क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. सि. जी. ०४ एल.पि.४४२९ या क्रमांकाच्या ट्रकने मागून धडक दिली हि घटना दिनांक ०४ मे रोजी दुपारी ०३ वाजता दरम्यान घडली रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली, या धडकेत ट्रकची कॅबिन चकनाचूर झाली असून सुभाष मेश्राम रा. डोंगरगाव ता. अर्जुनी जिल्हा गोंदिया असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. मागून धडक देणारा ट्रक चालक हा दारू पिऊन असल्याने क्लिनर बालू पुरषोत्तम उके,वय वर्षे १८ हा गाडी चालवित होता हा सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
मात्र दारुच्या नशेत असलेल्या चालकाचे प्राण बालंबाल बचावले आहेत 

चारचाकी वाहन असो की ट्रक याला साधा बेल्ट नसला की आरटीओ तसेच पोलीस विभाग तात्काळ चालान मारतात मात्र सध्या अवजड वाहने व नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई ही नाममात्र होत आहे. आष्टी शहराजवळील महाकाली पेट्रोल पंपाजवळ व आलापल्ली मार्गावरील कोहळे यांच्या पेट्रोल पंपाजवळ नेहमी ट्रकांच्या रांगा लागल्या असतात या दोन्ही पेट्रोल पंपाजवळ सुरजागड लोहप्रकल्पाचे सुरक्षा रक्षक नेहमी गस्तीवर असतात तरी या ट्रकांच्या रांगा कशा लागतात मग सुरक्षा रक्षकांचा काम काय? या वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या कडेला ट्रकस उभेच करू दिले नसते तर हा अपघात घडला नसता अशी चर्चा आष्टी शहरासह परिसरात आहे. या वर्दळीच्या ठिकाणी नियम बाहेर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ट्रकवर कुणाचा आशीर्वाद अशा चर्चांना उधान आले आहे. या जिवघेण्या सुरजागड लोहखप्रकल्पा मुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे
या बाबतीत कोन लक्ष घालणार असा यक्ष प्रश्न उपस्थित होतो आहे


PostImage

Vaingangavarta19

May 4, 2024

PostImage

दिड लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल समर्थकास  पोलिसांनी  केली अटक


दिड लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल समर्थकास  पोलिसांनी  केली अटक


सिरोंचा : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी
असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. शंकर वंगा कुडयामी वय, ३४ वर्ष, असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून, तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कांडलापार्ती येथील रहिवासी आहे.

सिरोंचा येथील पोलीस आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला सिरोंचा कालेश्वरम मार्गावर लावलेल्या नाकेबंदी दरम्यान अटक केली. शंकर हा कट्टर नक्षल समर्थक होता. नक्षल्यांना राशन पुरविणे, नक्षल्यांचे बॅनर लावणे, गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता. २०१५ पासून तो नॅशनल एरिया कमिटीत भरती झाला.

चार चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. २०२२ मध्ये छत्तीसगडमधील मोरमेड चिंतलपल्ली आणि २०२३ मध्ये बडा काकलेर व डम्मूर-बारेगुडा जंगलात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेलया चकमकीत तो सहभागी होता. शिवाय यंदा गडचिरोली जिल्ह्यातील लिंगमपल्ली-मोदुमडगू जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता, ज्यात चार नक्षली ठार झाले होते. २०२४ मध्ये कोरंजेड, कचलेर आणि छत्तीसगडमधील भोपालपट्टनम येथील प्रत्येकी एक अशा तीन निरपराध नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७९ नक्षल्यांना अटक केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

पिकअपला वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी,


पिकअपला वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी,


सुरजागडच्या मालवाहू वाहनाची अपघातांची मालिका सुरूच

आष्टी : ३ मे  :-  गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक अपघात झाला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पिकअपला धडक दिली या धडकेत तीन इसम गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना दिनांक ३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 
पिक अप वाहन हे अहेरी कडे जात होते समोरुन येणाऱ्या सुरजागडच्या मालवाहू ट्रकने जब्बर धडक दिल्याने सागर चुक्कावार पिकअपचा वाहनचालक गंभीर असून चंदा राजन्ना कडरला, राजन्ना कडरला श्रीनिवास जखमी आहेत या जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल  करण्यात आले आहे 
आष्टी – आल्लापली महामार्गावरील महाकाली मंदिराच्या वळणाच्या समोर हा अपघात  घडला. दिनांक २ मे रोजी आष्टी जवळील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाजवळ एका इसमाने आपली दुचाकी सोडून दिल्याने त्या इसमाचा जीव वाचला त्या इसमाची दुचाकी ट्रकमध्ये घुसल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला आणि नागरिकांच्या संतापाचे कारण असलेला गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील सुरजागड  या प्रकल्पामुळे रोजच काहीना काही दुर्घटना घडत असतात.
सुरजागड लोह प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत असून सामान्य नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. शिवाय प्रचंड धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यामुळे या सर्व बाबीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अपघाताचे निमित्त मिळताच सुरजागड प्रकल्पाला असलेल्या विरोधाचा उद्रेक होताना दिसून येत आहे


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, तीन जखमी 


दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार,
तीन जखमी 

आष्टी येथील को - आपरेटिव्ह बॅंक समोरील घटना
आष्टी:-
दोन दुचाकींची आमोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 मे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली.

अमोल रोहणकर वय 28 वर्ष रा. किष्टापुर ता. चामोर्शी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र एम एच ३३झेड १०२८ ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी - चामोर्शी मार्गावरील को -ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र एम एच ३३झेड ००३४ या दुचाकीस्वाराला समोरासमोर जबर धडक दिली यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये सागर दुर्गे वय २३ रा. अनखोडा , गुलचंद दुर्गे वय १४, वंश दुर्गे वय १२ दोन्ही रा. छल्लेवाडा ता अहेरी असे नावे आहेत
घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटना स्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

जादुटोण्याच्या संशयावरुन तिघांना जाळले जिवंत, पोलीसांनी १४ जणांना केली अटक


जादुटोण्याच्या संशयावरुन तिघांना जाळले जिवंत, पोलीसांनी १४ जणांना केली अटक

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील घटना 

गडचिरोली, ता. ३ः पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा होत असताना जादुटोण्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जीवंत जाळल्याची घटना १ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मृतकाचे नाव  जमनी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी (६०) आणि मुलगा दिवाकर तेलामी (२८) यांचा समावेश आहे.
जननी आणि देवू हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले, तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे ते जादुटोणा करतात, असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा-चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिनाभरापूर्वी एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा १ मे रोजी मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू जननी तैलामी आणि देवू आतलामी यांनी जादुटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन १ मे रोजी रात्री जननी आणि देवूच्या घरी गेले, त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले. याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १४ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली. घटनेनंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाच महिन्यातील दुसरी घटना

जादुटोण्याच्या संशयावरुन हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती, पत्नी आणि त्यांच्या नातीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातही मृतांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली होती. हे गावसुद्धा एटापल्ली तालुक्याच्या सीमेवर आहे. या घटनेनंतर आता बारसेवाडा येथे हत्याकांड झाल्याने जिल्हा हादरला आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 3, 2024

PostImage

रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी,  नवरगावच्या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी


रानटी हत्तीने केली पिकाची नासाडी,  नवरगावच्या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान - भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी.

 


गडचिरोली  / अशोक खंडारे 

 गडचिरोली वरून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगांव (पोर्ला) येथे रात्रौ चे सुमारास गडचिरोली जिल्हयात फिरत असलेले रानटी हत्ती नवरगाव शेत शिवारात आले
व कास्तकारांच्या उभ्या पिकाचे लाखोचे नुकसान केले. दि. २ मे चे रात्रौ जंगली हत्तीचा कळप नवरगाव जंगलातून दशरथ धाकडे व भगवंत चुधरी यांच्या शेतात घुसुन उन्हाळी धान पिकाचे नुकसान केले एवढेच नव्हे सदर शेतकऱ्याचे मोटार पॅम्प व पाईप लाईन ची तोडफोड केल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई वनविभागाने त्वरीत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी   केलेली आहे.तेंदू पत्ता सिझन चा हंगाम व कास्तकारांचे उन्हाळी पिक आहे. आता शेतात व जंगलात कसे जायंचे या विवेचनात नवरगांव गावकरी आहेत. वन विभाग पोर्ला चे RFO मडावी अजुनही आपल्या ताफ्यासहीत पाहणी करण्याकरीता पोहचले नाही असी माहिती प्राप्त झाली आहे


PostImage

Vaingangavarta19

May 2, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात खरचं दारुबंदी आहे काय? बंदी असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध कशी?


गडचिरोली जिल्ह्यात खरचं दारुबंदी आहे काय? बंदी असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध कशी?


आष्टी परिसरात अवैध दारू विक्री ,कुनाच्या आशिर्वादाने?

जिल्ह्यात दारूबंदी असताना रस्त्यावर दिसतात दारूच्या खाली बाटल्या 

आष्टी -:
 गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असुन सुद्धा देशी, विदेशी, बिअर च्या बाटला येतात कुठुन ? हे एक पोलीसांना आव्हानच आहे. बिअरच्या बाटल्या चोरट्या मार्गाने आणणे कठीण काम आहे. तरीही अवैध दारू तस्करांनी आपले मार्ग वेगळे शोधले काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे
एकतर बिअरच्या व इंग्रजी दारुच्या दोन लिटच्या बाटल्या मोठ्या असतात बिअर आणुन त्या फ्रिजमधे थंड कराव्या लागतात एवढे कठीण काम अवैध बिअर विक्रेत्यांना करावे लागतात. यावरून गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदिपार करून चोरट्या मार्गाने इंग्लीस व देशी दारू किती प्रमाणात येत असेल यांची कल्पना न केलेली बरी. निवडणुकीच्या काळात पोलीसाची नाकेबंदी होती तरीही एवढा दारुचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्यात झाला कसा असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
चामोर्शी तालुक्यातील 
आष्टी परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे तरीसुद्धा पोलीस नेहमी गस्तीवर असताना पुरवठा कसा होतो आहे की,याला जबाबदार पोलीसच आहेत अशी परिसरातील सुज्ञ नागरिकात चर्चा सुरू आहे
 आष्टी परिसरातील आष्टी,चंदनखेडी (वन), ठाकरी ,कोनसरी  जैरामपूर,मुधोली, चितरंजनपूर अनखोडा,येनापूर , रामक्रिष्णपूर,राममोहनपूर, व बऱ्याच गावात अवैध देशी दारूचे विक्रेते बिनबोभाट पणे दारू विक्री करीत आहेत मात्र पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शांत झोपले आहेत असेच दिसून येते आहे त्यामुळे "तेरी भी चूप व मेरी चुप" असाच प्रकार सुरू आहे हे दिसून येते आहे  व यात पोलीसांचे चांगभले होत आहे काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे 

सदर बाबीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष देतील काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यावरून जिल्ह्यात  खरचं दारू बंदी आहे की काय ? की बंदीच्या नावाखाली मात्तबरा़चे घर भरण्याच्या धंदा सुरू आहे?
असा विचारात्मक प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील सूजान नागरिकाना पडला आहे.


PostImage

Vaingangavarta19

May 1, 2024

PostImage

आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला


आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला 

मात्र कारवाई न करता पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आला 


आष्टी:- 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा चालू असून बुधवारी ता. १ मे रोजी सकाळी महसूल विभागाची गस्त चालू असताना आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला आहे. सदर ट्रॅक्टरला नंबर नसून पोलिस स्टेशन आष्टी येथे ठेवण्यात आला आहे 
तहसीलदार चामोर्शी यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता आमच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडला आहे व पंचनामा करून पोलिस स्टेशन आष्टी ठेवण्यात आला आज सुट्टी असल्याने कारवाई होऊ शकली नाही आणि कारवाई नक्कीच केल्या जाईल असे सांगितले सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता माझ्याकडे अजून कारवाईचे कागदपत्रे आले नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव व ट्रॅक्टर क्रमांक माहीत नाही अशी माहिती तहसीलदारांनी दिली.

 तालुक्यातील वैनगंगा पट्ट्यामध्ये सध्या वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात उपसा करून कहर  केला आहे. प्रशासनाकडून अधून मधून होणाऱ्या कारवाईने माफियांना वचक बसवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी होणाऱ्या कारवाईचा वाळू माफियांना फरक पडत नसल्याचे दिसत आहे. बुधवार एक मे रोजी सकाळच्या  सुमारास महसूल विभागाच्या नायब तहसीलदार यांनी तालुक्यातील आष्टी परिसरात पथका सोबत आले असताना मुख्य रस्त्यावर एक ट्रॅक्टर अवैध वाळू सह त्यांच्या निदर्शनास आला.
यावेळी सदरील ट्रॅक्टर जप्त करत पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशन आष्टी येथे  आणून लावण्यात आला आहे . पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्याचा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे यावेळी महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .

दरम्यान इल्लूर , ठाकरी,कुनघाडा, कढोली, इत्यादी ठिकाणी वैनगंगा नदी पात्रामधून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू असुन प्रशासनाने कारवाई करत अवैध उत्खनन थांबवावे अशी मागणी होत आहे
विना नंबर चा ट्रॅक्टर कुनाच्या मालकीचा आहे हा कुतुहलाचा विषय आहे त्या मालकावर खरच कारवाई करण्यात येणार काय असा प्रश्न उपस्थित होतो ऊ


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सुगंधीत तंबाखू व अवैध दारू तस्करांनवर केली कारवाई


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सुगंधीत तंबाखू व अवैध दारू तस्करांनवर केली कारवाई

 १०,१९,२२० रुपयांचा मुद्देमाल जप्त 


चंद्रपुर :-
 पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्याअनुषगाने पो. नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दि.२९/०४/२०२४ गोपनिय बातमिदाराकडुन पोलीस स्टेशन, मुल हद्दीतील मौजा राजगड फाटा ता. मुल, जि. चंद्रपुर येथुन एक महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ मध्ये अवेधरित्या दारूचा साठ वाहतुक करून गडचिरोली जिल्हयामध्ये जात आहे अशा खबरे वरून मौजा राजगड फाटा येथे नाकेबंदी करून नमुद वाहनाला थांबवुन त्यामध्ये गाडीचा चालक १) आदिल पठाण, रा. दसरा चौक, सिंदेवाही, जि. चंद्रपुर, व त्याचे सहकारी २) पलाश बांबोळे, रा. राम मंदिर जवळ, सिंदेवाही, जि. चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ३० नग खर्डाचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग रॉकेत संत्रा ९० एम. एल. देशी दारूनी भरलेली असे एकुण ३,००० नग प्रत्येकी नग ३५/- रू. प्रमाणे १,०५,०००/- रूपये चा माल तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३५ के. ४१५९ किमंत ७,००,०००/- रूपये असा एकुण ८,०५,०००/- रूपये असे जप्त करून आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, मुल यांचे ताब्यात देण्यात आले.
तसेच दिनांक २९/०४/२०२४ रोजी रात्रौ दरम्यान पोलीस स्टेशन, रामनगर परिसरात पेट्रोलींग दरम्यान मुखबिरचे खबरे वरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी. एम. बंगल्या मागे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचे घराची तसेच त्यांने किरायाने घेतलेल्या खोलीची पंचा समक्ष झडती घेतली असता, सदर दोन्ही ठिकाणी ईगल हुक्का सुगंधीत तंबाखू, होला हुक्का सुगंधीत तंबाखू तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाखू असा एकुण २,१४,२२०/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता रा. जी.एम. बंगल्या मार्गे, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर यास जप्त सुगंधीत तंबाखू बाबत विचारणा केली असता त्यांनी जयसुख ठक्कर रा. बल्लारशाह जि. चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले.

वरील दोन्ही कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकुण १०,१९,२२०/- रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार तर काका गंभीर


स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार तर काका गंभीर

आष्टी:-
स्कुटीला ट्रॉक्टर ने धडक दिल्याने एक मुलगी जागीच ठार झाली तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज दि ३० एप्रिल ला सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली
मृतक मुलीचे नाव सोनाली समरेश मिस्त्री वय 10 वर्षे रा.राममोहनपुर  तर गंभीर जखमीचे नाव अमुल्य प्रभात मिस्त्री वय २६ रा.राममोहनपूर असे असून अमुल्य हा आपल्या पुतनीला सोबत घेऊन स्कुटी क्र एम एच ३३ एक जी १३५८ ने आष्टी कडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉक्टर क्र एम एच ३३ व्ही ६१३७ ने जब्बर धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही खाली कोसळले तेव्हा सोनाली हिचे डोक्यावरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने तीचा जागीच करुन अंत झाला तर तीचा काका हा गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना आनंदग्राम ते अडपल्ली चे मुख्य मार्गावर घडली 
अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला तर सदर ट्राक्टर महेश मृणाल साणा सुभाषग्राम यांच्या मालकिची असल्याचे सांगितले जाते आहे 
घटनेची माहिती मिळताच 
आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला
तर गंभीर जखमीला उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले आहे
अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली ठार 


BIG Breking

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली ठार 

नारायणपूर, दि. 30 : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नारायणपूरच्या अबुझमाड परिसरात आज मंगळवार 30 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये 22 महिला नक्षलींचा समावेश आहे. घटनास्थळावरुन एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली असून चकमकीनंतर परिसरात शोध सुरु असल्याचे कळते.

अबुझमाडच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षली उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे सोमवारी रात्री उशिरा जवान शोधमोहीम करिता निघाले असता मंगळवारी सकाळी जवान या भागात पोहोचले असता नक्षल्यांनी जवानांवर अंधधुंद गोळीबार केला. जवानांनी मोर्चा सांभाळत प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 7 नक्षली ठार झाले त्यात दोन महिलांचा समावेश आहे  सदर चकमक महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा सीमेलगत असलेल्या परिसरात घडली असून. पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 30, 2024

PostImage

आष्टी शहरात सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा पडला विसर


आष्टी शहरात सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा पडला विसर

आष्टी - दि. १० (प्रतिनिधी) – वर्षभर विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्याचा डांगोरा पेटवणारे आणि आपल्या नावाच्या पुढे सामाजिक कार्यकर्ते लिहिणारे तथाकथित समाजसेवक यांना यंदाचा उन्हाळा सुरू झाला तरी गोरगरीब,पादचारी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आष्टी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आदी भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक - भगिनी मोठ्या प्रमाणावर येऊन या पाणपोईचा वापर करीत असतात . परंतू उन्हाळा सुरू झाला आहे तरीसुद्धा एकही सामाजिक कार्यकर्ता किंवा सेवाभावी संस्थेला पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी, याचे भान राहिले नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कामात मशगूल आहेत. वेळीच या पाणपोई सुरू झाल्या की त्याचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणि शहरातील पायी चालणारे नागरीक यांना उपयोगी पडणार आहे.

ग्रामपंचायत प्रशासनालाही पडला विसर 

आष्टी शहर हे चामोर्शी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात असून ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांची बसद्वारे येथे वर्दळ असते. बस स्टॅण्डवर उतरल्यानंतर पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बसस्टापर या पुर्वी आष्टी ग्रामपंचायत कडून १४ एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन करुण पाणपोई  सुरू करण्यात येत होती  पण यावर्षी उन्हाळा सुरू होऊनही पाणपोई सुरू करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाला विसर पडला का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे

 गोरगरिबांचे, पादचारी लोकांचे, आशीर्वाद आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद जर मिळवून घ्यायचे असतील तर या ठिकाणी पाणपोई त्वरित सुरू करणे हे सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर मतांसाठी गावोगाव फिरून मताचा जोगवा मागणारे तथाकथित पुढारीसुद्धा या पाणपोई पासून दूर आहेत. त्यांनीही पाणपोई सुरू करून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

पोलिस स्टेशन आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


पोलिस स्टेशन आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 

आष्टी दि-२९ :- ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची दखल घेत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून  दिनांक १ मे रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे सकाळी  ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना भविष्यात रुग्णालयात रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले तसेच आष्टी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवावा असे आवाहनही पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आष्टी पोलिसांशी संपर्क साधून रक्तदात्यांनी आपले नाव नोंदणी करून घेण्याचे पोलिस स्टेशन आष्टी कडून आवाहन करण्यात आले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

समोरच्याला वाचविण्याच्या नादात गमवावा लागला दुचाकीस्वार महिलेला स्वतःचा जीव


समोरच्याला वाचविण्याच्या नादात गमवावा लागला दुचाकीस्वार महिलेला स्वतःचा जीव 

मुलीसह भाचा जखमी

गडचिरोली : आपल्या मुलीला व भाचाला शाळेत सोडण्यासाठी स्कुटीने जात असलेल्या महिलेच्या समोर अचानक एक मुलगा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी अनियंत्रित होवून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर मुलगी व भाचा जखमी झाल्याची घटना शनिवारला सकाळी शहरातील धानोरा मार्गावर घडली. मेघा भरडकर, स्नेहनगर गडचिरोली असे मृतक महिलेचे तर जॉयश्री भरडकर (14) असे जखमी मुलीचे व रेहांश कोलते (5) असे भाचाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, स्नेहनगर येथील रहिवासी मेघा भरडकर यांची 14 वर्षीय मुलगी जॉयश्री व तिच्या भावाचा 5 वर्षीय मुलगा रेहांश हे धानोरा मार्गावरील कारमेल शाळेत शिक्षण घेतात. रोजच्या प्रमाणे त्या शनिवारला दोघांनाही शाळेत सोडून देण्यासाठी स्कुटीने घरून निघाल्या. दरम्यान, धानोरा मार्गावरील भंगार विक्रेत्याचा मुलगा अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मेघा भरडकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर मुलगी व भाचा जखमी झाले. गंभीर मेघाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने शहरात दररोज लहान-मोठे अपघात घडत असतात. मेघा भरडकर यांचा सुद्धा मृत्यू अतिक्रमणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. नगर परिषदेने अतिक्रमणाच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

दमनमरका गावातील घरे केली रानटी हत्तीने उध्वस्त


दमनमरका गावातील घरे केली रानटी हत्तीने उध्वस्त

मध्यरात्रीच त्या गावातील नागरिकांना सोडावे लागले गाव

प्रा.अजय बारसागडे , आलापल्ली प्रतिनिधी 

आलापल्ली:-
दमनमरका गावातील घरे रानटी हत्तीने उध्वस्त केले हि घटना २७ एप्रिल ला मध्यरात्री चे सुमारास घडली व त्याचवेळी त्या ग्रामस्थांनी आपले गाव सोडून दुसऱ्या गावात आश्रय घेतला 
 काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेल्या रानटी हत्तीचा कळप पुन्हा दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात परतला असून भामरागड तालुक्यातील दमनमरका गावात रविवारी मध्यरात्री हत्तीने धुमाकूळ घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे या गावातील गावकऱ्यांना आपले गाव सोडून जाण्यास भाग पडले आहे .
    या गावात तीन घरांची वस्ती असून येथील मजूर व शेतकरी अत्यंत काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. दहशत माजविणाऱ्या हत्तीने अचानक शनिवारी रात्री गावात प्रवेश करून तीन घरावर हल्ला चढवला त्यामुळे त्यांच्या घराचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान  झाले आहे. गावकऱ्यांनी हत्तीच्या दहशतीमुळे स्वतःच्या कुटुंबीयांचे जीव वाचवण्यासाठी आपले घरदार सोडले सदर तिनही घरातील कुटुंबीयांनी बाजूच्या फोडेवाला गावात आश्रय घेतला आहे.
सदर रानटी हत्तिंचा शासनाने तातडीने बंदोबस्त करावा जेणेकरून नाहक बळी जानार नाहीत  शेतकरी व गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत 
तेव्हा वनविभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या बाबतीत उदासीन न राहता लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शेतमजुरास गमवावा लागला जीव


आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शेतमजुरास गमवावा लागला जीव

विकासाच्या नावाखाली सर्वकाही थोडांत

गोंडपिपरी:- प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी ता.गोंडपिपरी येथील डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याने एका अपघातग्रस्त शेतमजूरास जीव गमवावा लागला ही घटना काल दि.२८ एप्रिलला घडली 
मृतक शेतमजुराचे नाव साईनाथ सुरकर वय ४० रा.भ़गारपेठ ता.गोडपिपरी जिल्हा चंद्रपूर असे आहे 
घरी शेतीचा लहानसा तुकडा त्यात काही भागत नाही म्हणून मिळेल ते काम करायचे अनं कसाबसा आपल्या कुटुंबियांचा रहाटगाडा चालवायचा. आपल्या वाटयाला आलेल्या वेदनांचे ओझे निमुटपणे पेलायचे. पण काल त्याचा काळ ठरला. काहीही चुक नसतांना एका दुचाकीस्वाराने मागून धडक दिली व तो रोडवर कोसळला त्याला खुप भयंकर दुखापत झाली तेव्हा घटनास्थळी जमलेल्या लोकांनी शंभर मिटरवर असलेल्या तळोधी आरोग्य उपकेंद्रात भरती केले पण तिथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. उपचाराअभावी कन्हत असलेल्या साईनाथ ला अखेर गोडपिपरी कडे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली

शासनाने मोठमोठया इमारती बांधून विकासाचे चित्र रंगविणा-या या व्यवस्थेचा तो बळी ठरला. साईनाथ सुरकर वय 40 गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील रहिवाशी. पत्नी वैशाली व अथर्व अनं अनमोल असा त्याचा लहानसा संसार आपल्या वाटयाला आलेल्या शेतीचा लहानसा तुकडयात काही भागत नाही म्हणून शेतमजूरी करण्याव्यतिरीक्त त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. आपल्या वाटयाला येत असलेल्या हालअपेष्टा आपल्या मुलांच्या पदरी येउ नयेत म्हणून रात्रदिवस एक करणा-या साईनाथसाठी कालची सायंकाळ मात्र काळच ठरली. दिवसभर रोजीरोटी करून बाजार करण्यासाठी आपल्या मार्गाने पायदळ निघालेल्या साईनाथला मागून येणा-या दुचाकिने धडक दिली. अनं होत्याच नव्हत झालं.

दरम्यान यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निकीलेश नाकतोडे यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेउन प्रतिक्रीया देउ असे ते म्हणाले.एकीकडे विकासाच्या बाता झाडल्या जात आहेत. मोठमोठया इमारती तयार केल्या जात आहेत. पण त्यात विकासाचा मात्र पत्ताच नाही. भंगाराम तळोधी येथे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी करोडो रूपये खर्चुन प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी इमारत तयार करण्यात आली. उपचारासाठी येथे दोन डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली. पण डॉक्टरच उपलब्ध राहत नाही. परिणामी साईनाथसारख्या निष्पापांना आपला जिव गमवावा लागत आहे. उदासिन लोकप्रतिनीधी, असंवेदनशिलतेच कळस गाठणारी प्रशासकिय व्यवस्था असली कि असे गरीबांचे नाहक बळी घेतले जाणार अशी संतप्त प्रतिक्रीया आता सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे 

यांना कोणी देणार का मदतीचा हात
 साईनाथ सुरकर या शेतमजूराचा गेलेला बळी प्रशासकिय व्यवस्थेची पुरती पोल खोलणारा ठरला आहे. त्याच्या पश्चात अथर्व व अनमोल या दोन चिमुकल्याचं आता कस होणार हाच विचार करित पत्नी वैशाली आसवांच्या गर्गेत बुडालेली आहे. त्यांना प्रशासन मदत करून आपल्या अनास्थेची भरपाई करणाार का हा खरा प्रश्न आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

एसटी बस महिला वाहकाने केली एका शिक्षकाची  पोलीसात तक्रार


एसटी बस महिला वाहकाने केली एका शिक्षकाची  पोलीसात तक्रार

सदर शिक्षक करतो नेहमीच हुज्जतबाजी,याला आवर घालणार कोन?


 हिंगणघाटः-
दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हिंगणघाट उमरेड या मार्गावर जाणाऱ्या बस वर महिला वाहक म्हणून सौ सुवर्णा साठोणे या कर्तव्यावर होत्या त्या वेळी बसमध्ये कही प्रवाशी प्रवास करीत होते. त्या दरम्यान हिंगणघाट येथून सिर्सी करीता एक शिक्षक नामे मोहन तिनगासे रा. हिंगणघाट हे सिर्सी या गावी जान्या करिता प्रवास करीत होते. त्यावेळी महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांनी तिकीट देण्याकरिता त्यांचे कडे गेली असता त्यांनी सिर्सी येथील तिकीट घेण्याकरिता दोनशे रुपयाची नोट महिला वाहकाला दिली. प्रवाशी संख्या कमी व पहिलीच सकाळची फेरी असल्यामुळे महिला वाहका जवळ सुटे पैसे नसल्यामुळे ६० रुपये तिकीटचे कापून १०० रुपये परत केले व उर्वरित ४० रुपये कर्तव्यप्रमाणे तिकीटच्या मागील बाजूस लिहून दिले व समोरील प्रवाशांना टिकट देण्यास निघून गेले असता मोहन तीनगासे या शिक्षकाने महिला वाहकाला अपमानस्पद शब्द वापरायला  सुरुवात केली  जेव्हा जेव्हा ती वाहक तिकिटे देत होती तेव्हा तेव्हा तो शिक्षक हुज्जतबाजी घालीत असल्याचे त्या महिला वाहकाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

शेवटी सिर्सी येथे उतरल्यानंतर महिला वाहकाने त्यांना उर्वरित ४० रुपये देण्याचा प्रयत्न केला असता मी तुला बघून घेईल, तू चोर आहेस, तू चोर आहेस असे मोठमोठ्याने ओरडून जणमाणसात त्या महिला वाहकाची बदनामी केली. आपल्या शिक्षकी पेश्याला काळिमा फसण्याचा प्रकार या शिक्षकाने केला. व पैसे नं घेता निघून गेला.परत आल्यानंतर त्या ४० रुपये लिहून असलेल्या तिकटावर एक शून्य वाढवून ४०० रुपये करून त्या महिला वाहकाची आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांचे कडे खोटी तक्रार केली. शिक्षकाला आपल्या शाळेच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तो शिक्षक नेहमी ४० किलोमीटर हिंगणघाट वरून जाणे येणे करतो आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाहकाशी चालकांशी वाद घालतो अशी चर्चा बस स्थानकावर सुरु होती.

मोहन तिनगासे त्याची वागणूक त्या महिला वाहकाला सहन नं झाल्याने माझी कुठलीही चुकी नसताना व मला सर्व प्रवशासमोर बदनाम केले असल्याने त्याची तक्रार  हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे दाखल केली व त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी बस आगारातील कामगार यांनी केली.यावेळी मोहन तीनगासे यांनी पण बसची महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांच्यावर गंभीर आरोप लावला असून त्याची तक्रार हिंगणघाट बस डेपो अधिकाऱ्याला केली आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि बस डेपो अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

आय.पी.एल. टी २० - २० क्रिकेट सट्टेबाज अहेरी पोलिसांच्या जाळ्यात


आय.पी.एल. टी २० - २० क्रिकेट सट्टेबाज अहेरी पोलिसांच्या जाळ्यात

 

गडचिरोली  :- 
सध्या देशात आयपीएलचा टि २०-२० क्रिकेट सीजन सुरु असुन ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या सट्टेबाजांचे रॅकेट अहेरी पोलिसांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस  येथे 27 एप्रिल रोजी पोलिसांनी छापा मारून सदर कारवाई केली. यावेळी सट्टेबाज हे बनावटी अँप (fake app) nice. 7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल सट्टा घेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन निखील दुर्गे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व रोख 9 हजार 420 रुपये जप्त केले.या दोन्ही आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता नामे इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुंडपवार रा. आलापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन (online) आय.पी.एल २०-२० क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात. त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली गुन्हयातील आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गे, 2) आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6) अक्षय गनमुकलवार, 7) फरमान शेख, 8) फरदिन पठाण, 9) इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी (Police Station Aheri) येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलोप्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक पोस्टे दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी यांनी पार पाडली.


PostImage

Vaingangavarta19

April 29, 2024

PostImage

वसुधा नाईक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर


वसुधा नाईक यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

साकुरी -

ओम साई प्रतिष्ठान आणि बी. सी. सी. फिल्म प्रोडक्शन तर्फे दिला जाणारा 2024चा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार पुणे येथील अरण्येश्वर विद्यामंदिर या प्रशालेच्या शिक्षिका सौ. वसुधा वैभव नाईक यांना जाहीर झाला असून त्याचे  वितरण शुक्रवार दि.03.05.2024 रोजी सायं.06 ते 10 यावेळेत शिर्डीपासून जवळच असलेल्या शिर्डी अहमदनगर रोडवरील सिद्ध संकल्प लॉन साकुरी शिर्डी येथे होत आहे.सदरचा पुरस्कार अतिशय भव्य दिव्य असून गेल्या 35 वर्षांपासून वसुधा नाईक ह्या वर नमूद विद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत.वसुधा नाईक ह्या सेवाभावी वृत्तीच्या असून स्टार ऍपवर त्यांची जवळजवळ 3000 गाणी प्रसिद्ध आहेत.नवनिर्मिती करणे व स्वहस्ते शैक्षणिक साधने बनवून नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा भर असून विविध प्रकल्पांची निर्मिती करून विविध क्षेत्रात त्यांनी आपला सहभाग हिरीरीने नोंदविला आहे.त्यांना यापूर्वी अनेक छोटेमोठे पुरस्कार मिळाले असून एक कृतिशील शिक्षिका म्हणून त्यांचा नाव लौकिक असुन महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये  लेखन करून त्यांनी आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवीला आहे.तसेच 'रमाची पाटी ' हा तत्यांचा लघुपट यू ट्यूब वर खूप गाजत आहे.यालाही त्यांना 60 च्या वर पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 28, 2024

PostImage

कोलपल्ली येथील रा.कॉ. (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश


कोलपल्ली येथील रा.कॉ. (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश

अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोलपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक व गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रावादी  काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते असलेल्या सडमेक, वेंकटेश चालूरकर, विजय शंकर चालूरकर, रंगू चालूरकर, भीमराव पुल्लिंवार, सिद्धार्थ सोयाम, अनेक वेलादी, चंद्र कोरेत, नयन कोरेत, विशाल, अश्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करीत काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला 
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा शाल व पक्षाचा दुप्पटा टाकून पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी अहेरी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम, देवलमरी ग्रामपंचायतचे सदस्य महेश लेकूर, श्रीनिवास राऊत, पुरषोत्तम आईलवार, दिवाकर गावडे, संजय गोंडे, कोमल सडमेक, शंकर बोरकूटे सह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

April 26, 2024

PostImage

स्वयंपाक खोलीत आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहीत महिला


स्वयंपाक खोलीत आढळली गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहीत महिला 


कुरखेडा :
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालूक्यातील बांधगाव येथे एका ३० वर्षीय विवाहित महीलेचे स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली असून मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे आहे कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळीवर केला आहे. घटनेची माहीती मिळताच पूराडा पोलीस स्टेशनच्या चमूने घटणास्थळ गाठत पंचनामा केला, शव उत्तरीय तपासणी करीता  उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा  सेंटरला पाठविण्यात आला आहे. मृतकाचे मागे पती व २ अपत्य आहेत. यासंदर्भात पूराडा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आले आहे. पूढील तपास पूराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांचा मार्गदर्शनात सूरू करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 26, 2024

PostImage

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद 


गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद 


अहमदनगर:-
दि.२५/०४/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा (अग्नीशस्त्र) लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पदरीत्या फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावून स्वताची सुरक्षितता बाळगून प्राप्त माहिती आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठीत पंचांना घेवुन जावून खात्री करुन व काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावून दमडी मशिदजवळ  पाहणी केली असता तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसून आल्याने पंचांची व पोलीसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोचलेला एक २५२००- रु किं चा लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुस असे आरोपी जाबीर सादिक सय्यद वय-३४ वर्षे रा. घर नं.-६ शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर याच्या कब्जात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोकों/ संदिप थोरात यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३/२०२४ आर्म ॲक्ट ३/२५ सह महा.पो.का.क.: (१) (३) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

April 25, 2024

PostImage

फक्त पाच हजार रुपयाची लाच पडली महागात ,पोलीस उपअधीक्षक एसीबीच्या जाळ्यात


फक्त पाच हजार रुपयाची लाच पडली महागात ,पोलीस उपअधीक्षक एसीबीच्या जाळ्यात 


धुळे :-
 नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या पाच महिलांकडून प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रूपये लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकरांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथे राहत्या घरी केली.

तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांच्या सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे 14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर होते. त्यामुळे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकड़न प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रुपये जमा करून आणून द्या, नाहीतर सर्वांना बिनपगारी करेल, असे तक्रारदारांना सांगितले होते. तक्रारदार यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले. मात्र, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.
  एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. एसीबीच्या पथकाने सापळा रचल्याचे समजताच पारसकर यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार, लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 24, 2024

PostImage

ट्रक ने चिरडले दुचाकीस्वारास, आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी 


ट्रक ने चिरडले दुचाकीस्वारास, आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी 


सुरक्षा रक्षकांची बघ्याची भूमिका 

आष्टी:-
एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना मार्कंडा (कं) क्रासींगवर आज दि.२४ एप्रिल ला ४.३० वाजताचे सुमारास घडली
एम एच ३४ बि जी ४२२४ हा ट्रक आष्टी कडून मार्कंडा (कं)कडे भरधाव वेगाने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्र एम एच ३३ के २१४५ ला जब्बर धडक दिल्याने दुचाकी समोरील चाकात फसली दुचाकीवरील आजोबा गंभीर तर दोन नातवंड जखमी जखमी झाले आहेत गंभीर इसमाचे नाव प्रभाकर लोणारे वय ५२ वर्षं  रा.मार्कंडा (कं) तर जखमी नातवंडाची नावे रिदांश कैलास लोणारे वय ७ वर्ष,सिदांश कैलास लोणारे वय ५ वर्ष असे आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, प्रभाकर लोणारे ची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे दोन नातवंडावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत 
मार्कंडा (कं) च्या क्रासींगवर सुरजागड लोह प्रकल्पाचे तीन सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत मात्र ते एकाच ठिकाणी बसून बघ्याची भूमिका घेत आहेत असे असेल त्या सुरक्षारक्षकांचे काम तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे
या ठिकाणी क्रासींग असल्याने मार्कंडा (कं) कडून येणाऱ्या वाहनांना आष्टी कडून येणारे वाहन दिसून येत नाहीत तेव्हा सदर सुरक्षा रक्षकांनी त्याच वळणावर दोन्ही बाजूला तत्परतेने नजर ठेवल्यास असे अपघात टाळण्यासाठी मदत होते यावर संबंधीतांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे


PostImage

Vaingangavarta19

April 23, 2024

PostImage

अतीभारी ट्रकला लागली आग,  ट्रक जळून खाक


अतीभारी ट्रकला लागली आग,  ट्रक जळून खाक


कोरपना:-
कोरपना तालुक्यातील आसन गावाजवळ अतीभारी गिट्टी भरलेल्या एका धावत्या हायवा ट्रकला अचानकपणे आग लागून ट्रक जळून खाक झाल्याची घटना आज 22 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास घडली.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून ट्रक मात्र पुर्णपणे जळाला.यवतमाळ जिल्ह्यातील मोहदावरून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना मागच्या टायरने अचानक पेट घेतला.टायर पेटत असल्याची माहिती रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी चालकास दिली असता तो वाहन थांबवून लगेच खाली उतरला.वाहनात कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने तो आग विझवण्यात अपयशी ठरला आणि पाहता पाहता आगीने भीषण रौद्ररूप  धारण केले. 
   राजुरा,गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मार्गाच्या कामावर असलेल्या पाणी टँकरच्या पाईपने सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न झाला.मात्र,आग नियंत्रणात आली नाही.दरम्यान घटनेच्या अर्धा तासानंतर गडचांदूर नगर परिषद व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन आले व आगीवर नियंत्रण मिळवले.तोवर हायवा ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला होता.आगीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व वाटसरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 23, 2024

PostImage

नान्ही येथे आदिवासी कंवर समाजाचे २९ जोडपी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध


नान्ही येथे आदिवासी कंवर समाजाचे २९ जोडपी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध

 

मागील २५ वर्षापासून सुरु आहे सामुहिक विवाह सोहळा आयोजनाची परंपरा

कुरखेडा:-
 कुरखेडा तालूक्यातील नान्ही येथे आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समीती नान्ही यांच्या वतीने दि .२२ एप्रिल सोमवार रोजी आदिवासी कंवर समाज आदर्श विवाह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंवर समाजाचे महाराष्ट्र व छत्तीसगढ़ या दोन राज्यातील २९ वर-वधू जोडपी विवाहबद्ध झाली. खाजगी विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळता यावा, समाज व वधु पक्ष कर्ज बाजारी होऊ नये याकरीता आदिवासी कंवर समाजाचा वतीने नान्ही येथे मागील सलग २५ वर्षापासून सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. आज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे उदघाटन स्थानिक  आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी कंवर समाज राजनांदगांव (छत्तीसगढ़) चे अध्यक्ष बिंदुलाल फुलकूवंर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतभाऊ दूधनांग, कंवर समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रा. मेघराज कपूर, माजी प. स. सभापती परसराम टिकले, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन नाट, गोंदिया जि. प. सदस्य श्रीकांत घाटबांधे, आदिवासी समाज कार्यकर्ते रामदास मसराम,सूनेर सोनटापर, ब्रिजलाल बागडेरीया,चंन्द्रभान हूंडरा,देवरी पंचायत समिति सभापती अंबिका बंजार,माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, माजी प.स .सभापती गिरीधर तितराम,गणपत सोनकूसरे,पत्रकार  सिराज पठान, चंपाबाई सोनकूकरा आदि मान्यवर उपस्थित होते.  यावेळी प्रास्ताविकातून डॉ.मेघराज कपूर यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह करीत शासकीय स्तरावरून आदिवासी कंवर समाजाचा समस्या मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आमदार कृष्णा गजबे यानी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यां जाणून घेण्याकरीता समाजाची बैठक  आयोजन करीत त्या मार्गी लावण्याकरीता शासन स्तरावर पाठपूरावा करण्याचे आश्वासन दिले.  कार्यक्रमाचे संचालन सोनू कपूर व गणेश सोनकलंगी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक कृष्ण चन्द्रमा यानी केले कार्यक्रमात महाराष्ट्र व छत्तीसगढ़ राज्यातील कंवर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थिती होते


PostImage

Vaingangavarta19

April 23, 2024

PostImage

अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची शिक्षकानी केली मागणी


अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची शिक्षकानी केली मागणी


 नागपूरः- 
येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम शिक्षकाने 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी बरोबर अश्लील चाळे करीत शरीर सुखाची मागणी केली. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला आहे.

वर्गात एकटीच अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थिनीला पाहून वासनांध शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षका विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अमोल पाटील वय 40 वर्ष रा. येरखेडा, कामठी, असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. अमोल विरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शिक्षक अमोल हा कोराडीतील एका खासगी शाळेत शिक्षक असून शिकवणी वर्गही घेतो. शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी पीडित अल्पवयीन 15 वर्षीय विद्यार्थिनी त्याच्याच वर्गात शिकते. तसेच तिने त्याच्याकडे शिकवणी वर्गही लावला आहे. गत 15 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास विद्यार्थिनी त्याच्याकडे शिकवणीला गेली होती. इतर विद्यार्थी यायचेच असल्याने ती वर्गात एकटी बसून अभ्यास करीत होती. दरम्यान आरोपी तिच्याजवळ आला. तिला एकटी पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असता अमोलने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. संबंध ठेवल्यास परीक्षेत पास होण्यासाठी मदत करण्याचे आमिषही शिक्षकाने दिले. मात्र, विद्यार्थिनीने त्याला वारंवार प्रतिकार केला. त्याला अनेकदा दूर लोटण्याचा प्रयत्न केला. ती चिडल्यामुळे शिक्षकाने माघार घेतली.

शिक्षकाने तिला कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर आईकडे रडायला सुरुवात केली. या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर शांतीनगर पोलिसात अमोल विरुद्ध तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवून घटनेचा तपास सुरू केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने  मांडले थैमान


गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने  मांडले थैमान

 


घरांच्या छतासह शेतातील रब्बी व भाजीपाला पिकाचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल 

 

गडचिरोली ता. २२:-
 
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवार व सोमवारला (ता.२१/२२) झालेल्या विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तर चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे विज कोसळल्याने एक मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे
आणि काही ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्याने  घरांवरील छत उडाले आहेत 
 रविवारी दिनांक (२१) ला तालुक्यातील कढोली येथे  आपल्या घराच्या दारात उभी असताना त्यांच्याच नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने एका १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.
 या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व विज कोसळून जखमी झालेल्या मुलीला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांनी केली आहे 
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. यातच रविवारी सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागासह जिल्हाभरात ढग दाटून आले. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरातील व तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांचे रब्बी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या भागामध्ये गारांचा पाऊस देखील झाला आहे.
जिल्ह्यातच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला या पिकांबरोबरच आंबा, फळबागा व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय कढोली येथे वीज पडून १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटनाही घडली आहे. काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेकडो क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्याबद्दल माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असतानाच त्यातच २१, २२ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान क्षेत्रात आता वाढ झाली आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक


देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी केली अटक

 महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस.

 

गडचिरोली; देश विघातक माओवाद्यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 21/04/2024 रोजी अटक करण्यात आली आहे 

काल दिनांक 21/04/2024 रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळून आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव दिलीप मोतीराम पेंदाम वय 34 वर्षे रा. नेलगंडा, तह. भामरागड जि. गडचिरोली असे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच दिनांक 22/03/2023 रोजी नेलगंडा
जंगल परिसरात 01 क्लेमोर व 02 कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. 01/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120 (ब) भादवि, सह कलम 4,5 भास्फोका, वाढीवकलम कलम 13, 16, 18, 20, 23, 38, 39 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष
सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 21/04/2024 रोजी सदर गुन्हात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता

शासनाने जाहिर केलेले बक्षीस. महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 78 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी, एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच  पोलीस अधीक्षक नीलोत्पल  यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

आंनंदनगरी चा राडा पोहचला  सरकारी दवाखान्यात व तिथेच तुफान हाणामारी, 16 लोकांवर गंभीर गुन्हे दाखल


आंनंदनगरी चा राडा पोहचला  सरकारी दवाखान्यात व तिथेच तुफान हाणामारी, 16 लोकांवर गंभीर गुन्हे दाखल 


आंबेजोगाई:-
शहरातील रस्त्यावर दोन गटात तुतू-मिमी झाली. याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. मार लागला म्हणून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात गेल्यानंतर विरुद्ध पार्टी तेथे आले असता रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये दोन्ही पार्ट्यांची तुंबळ हाणामारी होऊन सोळा लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुण्यासह इतर गुन्हे दाखल झाले आहेत शासकीय रुग्णालयात झालेल्या या हाणामारीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णालयामध्ये तरी हाणामारी करू नये असाच सूर शहरात सध्या उमटत आहे.

 आंबेजोगाई मंडी बाजार भागामध्ये पाटील चौक येथे आनंद नगरी म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद होण्यासाठी बाहेरगावाहून आनंद नगरी खेळणीचे साहित्य, विविध प्रकारचे वस्तू विक्री, झोके असे प्रकार असलेली आनंद नगरी गेल्या चार दिवसापासून सुरू झाली. या आनंदनगरी च्या समोर पार्किंग मध्ये मोटरसायकल लावण्यावरून दोन गटात कुरबुर झाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले गंभीर मार लागल्यामुळे यातील चार पाच जणांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागामध्ये उपचार चालू असताना तेथे दुसऱ्या गटातील पंचवीस ते तीस लोकांचा जमाव चालून गेल्यामुळे व तिथं परत बाचाबाची आणि तुफान हाणामारी चालू झाली याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन दंगे करणाऱ्या दोन्ही गटातील गुन्हेगारांना पोलिसांनी व रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी काट्याने बेदम चोप दिल्यानंतर हे दंगेखोर पळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णालयात अतिदक्षता लावण्याचे कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, काठी, दगड, लोखंडी एक किलो वजणाचे माप मारूण गंभिर दुखापत केली व लाथाबुक्याने मारहान करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून साकीब जहीर पठाण, जहांगीर मीर पठाण,दौलत मीर पठाण,साहील पठाण,सोहल नाजखन मिरखान पठाण,साकेब पठाण, आफताब अखीब शेख,
 मुशरफ माजीद शेख , पठाण फरद्यीम मिरखान , कलीम नियामत पठाण ,मार्ज पठाण, फेरोज पठाण, इफाजत मिरखान पठाण, नदीम जलील शेख , शारुख मिरखान पठाण , अख्तरखान पठाण सर्व रा. सदर बाजार अंबाजोगाई यांच्या विरोधात गुन्हा 174/2024 कलम 307,326,324,323,504,506, 143, 147, 148, 149 भादवी 135 मपोका. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

April 22, 2024

PostImage

वीज कोसळली मात्र नशीब बलवत्तर म्हणून नंदिनीला मिळाले जीवदान आष्टी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे दि २१ ला सायंकाळी ७ वाजता विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू


कढोली येथे वीज कोसळली,  नशीब बलवत्तर म्हणून नंदिनीला मिळाले जीवदान 

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील 
चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे दि २१ ला सायंकाळी  ७ वाजता विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि  क्षणार्धात विज कोसळली, ती विज नारळाच्या झाडावर पडली तेव्हा अंगनात असलेल्या नंदिनी ला शाक बसला व ती खाली कोसळली तेव्हा तीला त्वरीत ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले
मात्र नारळाच्या झाडाला आग लागली असल्याने चामोर्शी येथील अग्निशमन बोलाविण्यात आले व आग विझविण्यात आली व मोठा अनर्थ टळला आहे 

 नंदिनी भारत घ्यार वय १५ रा. कढोली हिच्या शेजारीच विज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असता प्रसंगावधान राखत  डॉक्टरांनी योग्य उपचार करुन तिचे प्राण वाचवले आहे 
सदर घटनेची माहिती होताच चामोर्शी तहसीलदार प्रशांत घोरुडे हे तातडीने ग्रामीण रुग्णालयात पोहचले व कुटुंबीयांना धिर दिला
नंदिनी ही नवव्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे आयुष्य मोठे असल्याने तीचा जीव वाचला आहे
 नारळाच्या झाडावर विज कोसळली व त्याने पेट घेतला त्यामुळे गावातील घरांना आग लागेल या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले होते मात्र अग्निशमन दलाचे वेळीच आग आटोक्यात आणली त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला 

झाली. नंदिनी ही आपल्या घरासमोरील अंगणात असताना तिथे असलेल्या नारळाच्या झाडावर विज कोसळली. ती झाडाच्या अगदी जवळच असल्याने विजेच्या धक्क्याने ती खाली कोसळली तीला त्वरित आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली व या घटनेची माहिती चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना कळविताच क्षणाचाही विलंब न लावता तहसीलदार प्रशांत घोरुडे तातडीने आष्टी येथील रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दीले. व कुटुंबीयांना धीर दिला. नंदिनी ही नवव्या वर्गात शिकत असून नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. विज कोसळल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. त्यामुळे वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला मात्र लवकरच हि आग आटोक्यात आल्याने धोका टळला.


PostImage

Vaingangavarta19

April 21, 2024

PostImage

 अंतीम आकडेवारीग गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 71.88 %


 

 अंतीम आकडेवारीग

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 71.88 %

गडचिरोली, दि. 21 :12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदान पक्रियेत एकूण 71.88 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदार संघात 69.25 टक्के, आरमोरी 73.69 टक्के, गडचिरोली 71.42 टक्के, अहेरी 66.93 टक्के, ब्रम्हपुरी 75.10 टक्के तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 74.41 टक्के मतदान झाले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लक्ष 17 हजार 702 मतदार आहे. यात 8 लक्ष 14 हजार 763 पुरुष मतदार, 8 लक्ष 2 हजार 434 स्त्री मतदार तर 10 इतर मतदार आहेत. यापैकी 5 लक्ष 95 हजार 272 पुरुष मतदारांनी (73.06 टक्के), 5 लक्ष 67 हजार 157 स्त्री मतदारांनी (70.68 टक्के) तर 5 इतर नागरिक असे 11 लक्ष 62 हजार 434 (71.88 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 21, 2024

PostImage

नाबालीक मुलीचे लग्न समारंभातून अपहरण करून केला बलात्कार व दगडाने ठेचून केली हत्या


नाबालीक मुलीचे लग्न समारंभातून अपहरण करून केला बलात्कार व दगडाने ठेचून केली हत्या

 

गोंदिया :-
 कुटुंबासह गावातीलच लग्न समारंभात गेलेल्या १२ वर्षाच्या नाबालीक मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमाने तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. सदर घटना १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्याच्या ककोडी परसिरातील वटेकसा येथील जंगलात घडली. काजल (१२) (बदललेले नाव) रा. गोठणपार असे मृत मुलीचे नाव आहे.

ककोडी परसरातील ग्रामपंचायत गोठणपार येथे १९ एप्रिल रोजी लग्नकार्यात घरातील सर्व मंडळी गेले. त्या लग्नाला काजल १२ ही देखील गेली. लग्न समारंभात ती असतांना अज्ञात आरोपीने तिचे अपहरण करून रात्री ८ वाजताच्या सुमारास वटेकसा येथील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांतर तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे अवघा गोंदिया जिल्हा हादरला आहे.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.गोठनपार येथे लग्न समारोह होता. या लग्नसमारंभासाठी पिडीत मुलगी आपल्या कुटुंबियासह आली होती. परंतु नराधमाने संधीचा फायदा पाहून तिचे अपहरण करून त्या चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. या घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी तिच्या वडीलाच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०२, ३७६, ३६३ सहकलम ४, ६ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासासाठी चमू रवाना -


दोषींना अटक करून फाशी द्या -

निरागस मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमाणूस कृत्य करीत तिचा जीव घेणाऱ्या नराधमाला त्वरीत अटक करा, या प्रकरणातील दोषीला फाशी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

लोकशाहीच्या आनंदावर लगेच पडले विरजन -

लोकशाही मजबूत करण्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान करण्यात आले. उमेद्वारांनी महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेचे वचन देत मत मागितले. परंतु मतदानाचे कार्य होताच १२ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्याचे अमाणूस कृत्य करण्यात आले. या संतापजनक घटनेमुळे गोंदिया जिल्हा हादरला आहे. मुलीच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 21, 2024

PostImage

लॉयड्स कालिअम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबीर


लॉयड्स कालिअम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबीर

संचालक बि. प्रभाकरन यांच्या सह  50 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग 

    अशोक खंडारे  /मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९                                                एटापल्ली:-
लॉयड्स कालीअम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड द्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आज दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी  आयोजन करण्यात आले असुन सर्व प्रथम लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक  बि. प्रभाकरन यांनी शिबिरात रक्तदान केले. लॉयड्स कंपनीचे 50 अधिकारी आणि कर्मचारी यांनीसुद्धा रक्तदान केले. सर्व समुहातील सदस्यांनी दर महिन्याला किमान 50 युनिट रक्त देण्याचे आश्वासन दिले आणि ते आजारी व्यक्तीला उपयोगात पडेल असा उद्देश ठेवला असून लॉयड्स टीम ही मोलाची कामगिरी करीत  आहे.

 अति दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागात उच्च दर्जेचा मोफत आरोग्य सुविधा 

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी नक्षल प्रभावीत सुरजागड परिसरात मुलभूत आरोग्य सुविधा मिळणे ही कठीण होते पण परिसरातील आदिवासीना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याकरिता लॉयड्स मेटल्स कंपनीचे पुढाकाराने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काली अम्मल हॉस्पिटल सुरू केले आहे. अण या परिसरातील आदिवासी गरीब व गरजूंना मोठा आधार झालंय. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी 24/7 तास रुग्ण सेवा देत आहेत.
   लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल 8 नोव्हेंबर 2023 ला सामान्यांच्या सेवेत कार्यन्वीत झाले. या ठिकाणी दहा तज्ज्ञ डॉक्टर 40 हुन अधिक आरोग्यं कर्मचारी परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटल मधे सुरजागड, हेडरी, गट्टा, जांभिया एटापल्ली, भामरागड तालुका  आलापल्ली, अहेरी सह गडचिरोली जिह्यातील दररोज शेकडो रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतांना दिसत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 19, 2024

PostImage

लोकसभा गडचिरोली-चिमुर मतदारसंघात  ६५.१९ %मतदान


लोकसभा गडचिरोली-चिमुर मतदारसंघात  ६५.१९ %मतदान

 


लोकसभा क्षेत्रात उत्स्फुर्त प्रतिसाद
 

गडचिरोली दि, 19 - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 65.19 टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी दुर्गम भागातील पथके परत आल्यावर स्पष्ट होणार आहे.

मतदार संघात आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. शहरी व ग्रामीण भागत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर  प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे निवडणूक प्रक्रियेवर चोख लक्ष होते. त्यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देवून मतदारांकडून मतदान सुविधेबाबत प्रतिक्रीया जाणून घेतल्या. रांगेत असलेल्या महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केंद्राध्यक्ष यांना दिल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1891 मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव विधानसभा मतदारसंघात 64.60 टक्के, आरमोरी 65.23 टक्के, गडचिरोली 66.10 टक्के, अहेरी 63.40 टक्के, ब्रम्हपुरी 67.02 टक्के आणि चिमुर 64.49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असल्याची अंदाजीत आकडेवारी निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. दुर्गम भागातील मतदान पथके परत आल्यावर तेथील आकडेवारी उशीरापर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून मतदाराना प्रोत्साहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते.  दैने यांचे वडीलांचे 15 एप्रिल रोजी दुःखद निधन झाल्यावर त्यांचे अंतिम संस्कार कार्य उरकून श्री दैने 17 एप्रिल रोजी तातडीने निवडणूकिच्या राष्ट्रीय कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांनी आज गडचिरोली येथे मतदान करून मतदानाचे कर्तव्य पार पाडून वडिलांना श्रद्धांजली वाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनीही मतदारांना निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनीही आज सहपरिवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिकेच्या शाळेत मतदान केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गोंडी भाषेतुन आवाहन करत ग्रामिण मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला होता. त्यांनी शहरातील पंचायत समिती येथील महिला संचालित पिंक मतदान केंद्रावर भेट देवून महिला मतदारांचा उत्साह वाढविला. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील मतदारांशी संवाद साधला.


PostImage

Vaingangavarta19

April 19, 2024

PostImage

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी बजावला मतदानाचा हक्क


महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी बजावला मतदानाचा हक्क

अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
अहेरी:-
महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी आपला मतदानाचा हक्क आज लोकसभा निवडणुकीत बजावला
भारताची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्व विदर्भात आज दि.१९ एप्रिल ला मतदान घेण्यात आले .चिमुर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राकरीता  अहेरी  विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा दिना चेरपल्ली मतदान केंद्रावर राज्याचे मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी मतदान केले व क्षेत्रातील सर्व मतदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मतांचा अधिकाराचा प्रत्येक व्यक्तींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले 
मतदान केंद्रावर खूप प्रमाणात गर्दी असल्याने सर्व मतदारांनी शांततेत मतदान करावे अश्या ही सुचना केल्या व पोलीसांनी सुद्धा सहकार्य करावे असेही मंत्रीमहोदय यांनी आवर्जून सांगितले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 19, 2024

PostImage

अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाचा  केला खून व  फेकला  शेतशिवारात 


अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाचा  केला खून व  फेकला  शेतशिवारात 


आरमोरी तालुक्यातील बोडदा येथील घटना

 

आरमोरी :-
तालुक्यातील  पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोडदा येथील नामे प्रशांत रामदास उरकुडे वय 24 वर्ष रा. बोडदा त. आरमोरी जिल्हा गडचिरोली हा युवक दिनांक 17-4-2024 ला रात्रीच्या दरम्यान सौचास खेमराज राऊत यांच्या शेताकडे गेला असता कुणीतरी अज्ञात दोन ते तीन व्यक्तींनी प्रशांत वरील रागामुळे  दोरीने  गळफास देऊन त्याला जीवानीशी ठार मारून त्याचा मृतदेह जवळच असलेल्या विजय राऊत यांच्या शेतामध्ये फेकून दिला दिनांक 18-4-2024 ला सकाळी या घटनेची वार्ता गावामध्ये पसरताच मृतकाचा भाऊ सुधीर रामदास उरकुडे यांनी घटनास्थळ गाठले आणि गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने आरमोरी पोलीस ठाणे गाठून अज्ञात मारेकरी विरुद्ध दिनांक 18-4-2024 ला पोलीस ठाणे आरमोरी येथे अज्ञात मारेकऱ्यां विरुद्ध फिर्याद नोंदविले लागलीच आरमोरी पोलीस घटनास्थळावर जाऊन मृतकाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता आरमोरी येथे पाठविले घटनेची मोका पंचनामा करून आरमोरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध अपराध क्रमांक व कलम 118, 2024 कलम ३०२, २०१,३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 
घटनेच्या पुढील तपास पोलीस निरीक्षक आरमोरी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस स्टेशन आरमोरी हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 18, 2024

PostImage

आलापल्ली येथील भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न


आलापल्ली येथील भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न 

 

आलापल्ली:-
श्रीरामनवमी निमित्ताने दि  १७ ला संध्याकाळी आलापल्ली शहरात श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली, माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांची ह्या शोभायात्रेत विशेष उपस्थिती होती, ह्यावेळी राजेंनी श्रीरामाचे विधिवत पूजन व आरती करीत दर्शन घेतले तसेच ह्या भव्य शोभायात्रेत सामील झाले.

अहेरी विधानसभा क्षेत्रात आलापल्ली हे शहर मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. याठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे केले जातात. रामनवमी निमित्त रामभक्तांनी कालपासूनच शहरात भव्य तयारी केली होती.सकाळपासून विविध कार्यक्रम घेत सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढली. हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक, युवती तसेच परिसरातील नागरिक या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यकर्त्याच्या विशेष आग्रहाने राजेंनी बेंजोच्या तालावर ठेका सुद्धा धरला तसेच यावेळी रामक्तांनी राजेंना खांद्यांवर घेऊन डान्स केला.
  

ठिकठिकाणी आलापल्लीकरांनी या भव्य रॅली व शोभायात्रेचे स्वागत केले. श्रीराम मंदिरातून निघालेली शोभायात्रा विर बाबूराव चौक, बस स्टँड चौक, श्रीराम चौक आणि वि.दा. सावरकर चौक परत तिथेच समापन झाले. यावेळी डिजे व बेंजोच्या तालावर महिला, पुरुष, युवक, युवती एकच जल्लोष केले तर चिमुकल्यांनी सुद्धा लेझिम डान्सद्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे आलापल्ली शहरात हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा पार पडली. यावेळी संपूर्ण शहर राममय तथा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते


PostImage

Vaingangavarta19

April 10, 2024

PostImage

उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली


उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली 

आष्टी : -
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  आष्टी - आलापल्ली महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयाजवळ आष्टी येथील चौकातून येत असलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हि घटना आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही ट्रक चालक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे 
ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ३६८३ हा  आष्टी येथील चौकातून आलापल्ली कडे जात होता व ट्रक क्रमांक एम एच ३४बी झेड ३९७३ हा ट्रक सूरजागड येथून लोहखनिजाचा कच्च्या माल घेऊन येत होता  या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे आष्टी कडून येणाऱ्या ट्रक चालकाने त्या वाहनाचा सुसाट वेग पाहून आपले वाहन उभे ठेवले तरी या उभा ठेवलेल्या ट्रकला सूरजागड कडून लोहखनिजाचा कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे 
या घटनेची आष्टी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या महामार्गावर सूरजागड लोहखनिजाची कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रका मोठ्या सुसाट वेगाने धावत असतात या महामार्गावर तर दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या महामार्गावर नेहमी अपघात होतच असतात आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत तरी संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालाची वाहतूक करणारे ट्रक चालक हे कोणाच्याच बापाला घाबरत नाही आहेत असे सामान्य नागरिकांकडून बोलल्या जात आहे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर एका सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे तरी याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जनसामान्यांतून केली जात आहे


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आष्टी शहरात होणार धुमधडाक्यात साजरा


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आष्टी शहरात होणार धुमधडाक्यात साजरा

 


आष्टी : -
येथील धम्मदिप बौध्द समाज मंडळाचे वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.  भारत सरकार सुद्धा राष्ट्रीय सन म्हणून साजरा करीत असतो
 यानिमित्ताने चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात धम्मदीप बौद्ध समाज मंडळाच्या वतीने दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वाजता बाईक रॅली व सायंकाळी ०६:०० वाजता  मुला - मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आणि दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वाजता मानवंदना व दुपारी १२:०० जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ भोजनदान देण्यात येणार असून सायंकाळी ०६:०० वाजता भव्यदिव्य समाजबांधवांची मिरवणूक काढण्यात येणार आहे करीता आष्टी शहरातील सर्व उपासक तथा उपासीकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धम्मदीप बौद्ध समाज मंडळ आष्टी चे अध्यक्ष अमित नगराळे, आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे आहे


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस ठार


स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस ठार


अहेरी:-
जवळील गेर्रा महागाव रोडवर एका स्कॉर्पीओने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाल्याची घटना दि. ९ एप्रिल ला दुपारी १२.३० वा.चे दरम्यान घडली
 पोलीस शिपाई चिन्ना विडपी वय ४० रा.अहेरी असे मृतकाचे नाव असून  चिन्ना हे वांगेपल्ली कडून आपल्या दुचाकीने येत असतांना अहेरी कडून महागाव कडे जात असलेल्या एम एच ३२ ए एच  ४०५४ स्कॉर्पिओ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाले 
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चिन्ना विडपी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
चिन्ना विडपी यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,वडील असा परिवार आहे
त्यांच्या अकाली निधनाने मित्र मंडळ व परीवारात शोककळा पसरली आहे
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

लग्न सोहळ्यात वाढतोय वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर


लग्न सोहळ्यात वाढतोय वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

ग्रामीण भागांतही लग्नात होतोय वारेमाप खर्च, सामूहिक विवाहाचा सोहळा काळाची गरज

 

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असून शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही खर्चिक लग्न सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. अलीकडे लग्नसाहित्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर महागाईचे सावट आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना आपल्या मुलांमुलीच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात. परंतु, दिवसेदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे लग्नसोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील लग्नसोहळे कमी खर्चात साध्यासुध्या पद्धतीने पार पाडले जात होते. परंतु हल्ली ग्रामीण भागातही शहरी थाटमाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे.
     प्रत्येकाला वाटते, लग्न एकच वेळा होते त्यामुळे लग्नासोहळ्यात मेंहदी, हळद, पाहुण्यांचा पाहुणचार, कपडे, स्वागतसमारंभ,भेटवस्तू, बॅन्डबाजा, डीजे, लाईटटिंग, मोठी एलएडी स्क्रीन शेवटी मांडव-वाढवणी झाल्याशिवाय पाहुणे जात नाही अशी कार्यक्रमासह खर्चाची यादी वाढली आहे. शिवाय व्हीडीओग्राफी, फोटोग्राफी, ड्रोन कॅमेरा सुटिंग खर्च एकूण गोळाबेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जाते. त्यामुळे ते थाटामाटात आणि अगदीत वाजतगाजतच वेगळ्या पद्धतीने झाले पाहिजे, असा आत्ताच्या तरुणपिढींचा आग्रह घरच्यानसमोर असतो. त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे. शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न ग्रामीण भागात व्हायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेती व्यवसाय हा कधी अवकाळी गारपीठ पाऊस, अतिवृष्टी, महापूर, इतर रोगामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो. त्यामुळे या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न नाहीच्या बरोबर असले तरी सध्या सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात सर्वच दोन ते तीन दिवसांत लाखो रुपयांचा खर्च होत असतो. वेळप्रसंगी लग्न थाटामाटात करण्याचा हट्ट वधू किंवा वर पक्षाकडून घातला जात असल्याने सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.


सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज
समाजात गरीब श्रीमंत अशा सर्वच घटकातील मुला मुलींचे हे सामुहिक विवाह सोहळ्यात करणे काळाची गरज आहे. अलीकडे अनेक धार्मिक, सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाहाचे आयोजन करतात. या माध्यमातून सर्वांचा खर्च, वेळ, पैसा व श्रम यात बचत तर होतेच व सामाजिक संस्थांकडून लग्न जोडप्यांना घरघुती संसाराकरिता आवश्यक सामान सुद्धा दिल्या जाते. गोरगरीब शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाहामुळे मोठी मदत होते. कर्जबाजारी होण्यापासून वाचता येते. लग्नसोहळयात अमाप खर्च केला जातो. त्यामुळे आर्थिक, कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी कमी खर्चात तसेच सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2024

PostImage

का उचलले टोकाचे पाऊल ? मित्राला फोन करून लगेच केली गळफास घेऊन आत्महत्या 


का उचलले टोकाचे पाऊल ? मित्राला फोन करून लगेच केली गळफास घेऊन आत्महत्या 


आपल्या मित्राला दुरध्वनी ने केला फोन आणि सांगीतले की मी आत्महत्या करतोय

 


अजय बारसागडे प्रतिनिधी आलापल्ली 
 आलापल्ली:+
 असे काय झाले की, त्याला  टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करावी लागली हे कोडे आता पोलीसच उलगडणार असे चित्र दिसत आहे
मी आत्महत्या करत आहे, असा कॉल मित्रांना करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ७ एप्रिल रोजी रात्री येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहन मोहुर्ले  वय ३०, रा.रंगयापल्ली असे मृताचे नाव आहे. अहेरी येथील त्याची सासुरवाडी आहे. त्यामुळे तो अहेरीतच भाड्याने खोली घेऊन  पत्नीसह राहत होता. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो तयारी करत होता. दरम्यान, कौटुंबिक कारणावरून मोहन मोहुर्ले
त्याचा पत्नीशी वाद होत असे. ७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता तो घराबाहेर पडला. गावालगतच्या शंकरराव बेझलवार महाविद्यालयाजवळील एका झाडास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

तत्पूर्वी त्याने एका मित्राला फोन करून मी आत्महत्या करीत आहे, असे सांगितले. मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला व तु कुठे आहेस असे विचारले असता मात्र त्याचे म्हणने न ऐकताच फोन कट केला   मित्रांनी रात्री सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच आढळला नाही व आठ एप्रिल ला सकाळी महाविद्यालय जवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले 
मोहन मोहुर्ले याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने हे पाऊल उचलल्याने मित्रांसह नातेवाइकांनाही हादरा बसला आहे.

 आत्महत्येची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024

PostImage

आष्टी ते गोंडपिपरी वैनगंगेच्या पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे, खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका


आष्टी ते गोंडपिपरी वैनगंगेच्या पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे, खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका

जनतेला करावा लागतोय जीवघेणा प्रवास 

पावसाळ्यात चिखलाचा मारा आणि उन्हाळ्यात धुरीचा मारा 

आष्टी  : -
आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मागील अनेक दिवसांपासून खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी आष्टी शहरातील नागरिकांसह आमदार डॉ. देवराव होळी यांनीही केली होती. तेव्हा अवघ्या आठ दिवसांत वैनगंगा नदी पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले मात्र पावसाळा संपला आणि आता उन्हाळा सुरू झाला तरीसुद्धा अवस्था जैसे थे आहे

   पुलावरील खड्डे 'जैसे थे' असल्याने शासन  जीव गेल्यावरच खड्डे बुजविणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 वैनगंगा नदी पुलावर मागील अनेक दिवसांपासून जीवघेणे खड्डे पडले असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी विघार्जनाकरीता आष्टी येथील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत व ते विद्यार्थी,विद्यार्थीनी सायकलने प्रवास करुन शिक्षण घेत आहेत तसेच आष्टी येथील गोडपिपरी तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या  शाळेत शेकडो विद्यार्थी जात आहेत. सायकलस्वार विद्यार्थ्यांना पुलावरील खड्डयांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकही विविध कामांसाठी तसेच रुग्णालयात आष्टी येथे येत असतात. त्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने पावसाळ्यात चिखलाचा मारा आणि  आता उन्हाळ्यात धुळीचा मारा सहन करावा लागत आहे. त्या खड्ड्यांमुळे एखादे वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका असतो. खड्ड्यांमुळे पुलावर अपघात होऊन जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
 सदर खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुलाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते परंतू त्यांनी या बाबींवर लक्ष दिले नाही त्यानंतर  आष्टी येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी नदीपुलावरच रास्तारोको आंदोलन केले होते  तेव्हा थातुरमातुर काही खड्डे  बुजविण्यात आले होते ते  अवजड वाहतुकीने काही दिवसातच अवस्था जैसे थे झाली गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव खासदार  यांनी या बाबतीत शासकिय अधिकारी यांना कधी सुचीत तर केलेच नाही व स्वतः लक्ष घालून पाहिले सुद्धा नाही अशी मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे व पुलावरील त्या खड्ड्यांची स्थिती 'जैसे थे'राहीली
सदरच्या खड्ड्यांमुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनक्यांचे ,कमरेचे आजार होत असल्याचे दिसून येते आहे 
 पुन्हा यावर्षीही पावसाळ्यात चिखलाचा मारा खाण्याची वेळ वाहन चालकांवर येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024

PostImage

खरंच केला काय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात पक्षप्रवेश 


खरंच केला काय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात पक्षप्रवेश 


चंद्रपूर :-

खरंच केला काय एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा)पक्षात पक्षप्रवेश असा प्रश्न मतदारांना मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे 
 ऐन लोकसभा निवडणुकीचा धुरळा आता सुरु झाला असतांनाच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातून इनकमिंग, आऊटगोइंग चे सत्र सुरु झालेले आहेत अशातच नुकतीच एक मोठी बातमी हाती आली आहे.एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीररीत्या पक्षप्रवेश केला आहे

आता तुम्हालाही धक्का बसेल पण हि बातमी खरी आहे. शिंदे यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील घाटकुळ येथे एका अतिशय सामान्य कार्यक्रमात शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करीत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आता एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. उबाठात प्रवेश करणारे एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नसून ते चंद्रपूरातील घाटकुळ या गावातील रहिवासी आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. अनेक आमदाराना हाताशी घेत त्यांनी भाजपशी हातमिळविनी केली. भाजपने त्यांना “रिटर्न गिफ्ट”दिलय. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता.यानंतर राज्यात खोके, गद्दार, मिंधे अशा विविध उपमांच राजकारण सुरु झालं. शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गेलं.आमदार गेले, चिन्हही गेलं. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेन आता चांगलाच बदला घेतला आहे.
होय आज रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचा उबाठात सार्वजनिक रित्या प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रपूरातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ यां गावात हा कार्यक्रम संपन्न झाला. पण उबाठात प्रवेश घेणारे हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री नसून ते घाटकुळ येथील रहिवासी आहेत. एकनाथ रावजी शिंदे असे त्यांचे पूर्ण नाव आहे आज यां एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना उबाठात प्रवेश घेतला. या शिंदेच्या प्रवेशाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.संदीप गिऱ्हे, सुरज माडुरवार, आशिष कावटवार यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2024

PostImage

पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला


 पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला 


आष्टी: -

एक महिन्यापूर्वी पासून पथदिवे बंद असल्याने पथदिवे सुरू करण्याचा मुहुर्त केव्हा मिळणार प्रशासनाला असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे 
चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील पथदिवे एक महिन्यापूर्वी पासून बंद आहेत. याकडे विज वितरण कंपनी व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आष्टी ग्रामपंचायतीकडून शहरातील विविध मार्गावर दुतर्फा पथदिवे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी शिकवणी वर्गाला जाणाऱ्या लहान मुलांना वनागरिकांना अंधारात चाचपडत जावे लागू नये, असाच त्या मागचा उद्देश आहे परंतु गत एक महिन्यापूर्वी पासून शहरातील काही भागातील पथदिवे बंद आहेत. यामध्ये गावातील मुख्य मार्ग ते आंबेडकर चौकदरम्यानचा मार्ग, तसेच अनेक प्रभागातील परिसरातील काही पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे परिसरात काळोख असतो. या अंधाराचा फायदा चोरटे सुद्धा घेण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रात्रीच्या वेळी नागरिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतरही भागातील काही पथदिवेसुद्धा काही दिवसांपासून बंद आहेत. विज वितरण कंपनी आणि ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देऊन शहरातील बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरू करावे, अशी मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2024

PostImage

आमच्या शेतजमीनीचे भूसंपादन झाले तेव्हा खासदार कुठे होते, संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे 'बॅनर' लावण्यास मनाई


आमच्या शेतजमीनीचे भूसंपादन झाले तेव्हा खासदार कुठे होते, संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे 'बॅनर' लावण्यास मनाई 

 प्रचारार्थ गेलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी केला विरोध,खासदार अशोक नेते यांच्या अडचणीत वाढ 

गडचिरोली : 
चामोर्शी तालुक्यातील १० गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत उभे असलेले भाजप चे उमेदवार खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ लावण्यात येणारे बॅनर लावण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला आहे
जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी अधिसूचना काढली आहे. यावरून जवळपास १० गावातील नागरिकांमध्ये असंतोष असून ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हाकलून लावले असून प्रचाराचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई केल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना शेवटच्या क्षणी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. मात्र, प्रचारादरम्यान त्यांना व कार्यकर्त्यांना ग्रामस्थां कडून फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यात अधिक भर पडली असून चामोर्शी तालुक्यातील जवळपास १० गावातील नागरिक भूसंपादनावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. दरम्यान, मुधोलीचक क्र. १ आणि जयरामपूर येथे भाजपचे काही नेते व कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले. इतक्यावरच न थांबता त्यांना गावात बॅनर लावण्यास मनाई केली आहे. भूसंपादनावरून बहुतांश गावातील नागरीकांमध्ये रोष बघायला मिळत असून याविरोधात वर्षभरापासून आंदोलन करण्यात येत असताना खासदार कुठे होते. आता निवडणुका आल्या की ते आमच्याकडे येत आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एक-दोन दिवसात सर्व प्रभावित क्षेत्रातील गावकरी एकत्र बैठक घेणार असून त्यानंतर पुढची भूमिका एकत्रितपणे ते जाहीर करणार आहेत.

 


गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, मुधोली चक क्र.१, सोमनपल्ली, जयरामपूर, मुधोलीचक क्र.२, पारडी देव यांच्यासह जवळपास १० गावातील ९६३.०५२२ हेक्टर जमीन शासनाने संपादित करण्याचे ठरवले आहे. परंतु या भूसंपादनाला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यांनी याविरोधात दोन वेळा मोर्चा देखील काढला होता. त्यावेळेस कोणत्याच लोकप्रतिनिधींनी साथ दिली नाही. यामुळे त्यांचा खासदारांवर रोष आहे


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2024

PostImage

आष्टीत भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा


आष्टीत भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा


आष्टी : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस शनिवारी (ता. ६) रोजी आष्टी येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश प्रकाश कुकूडकर यांच्या शुभ हस्ते आष्टी येथील जनसंपर्क कार्यालयावर पक्ष ध्वज फडकविण्यात आला.भारतीय जनता पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० साली झाली.आज भाजप पक्षाला ४३ वर्ष पूर्ण झाली असून जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

या प्रसंगी आष्टी शहरातील भाजपचे नेते संजय पंदिलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, विठ्ठल आवारी, प्रकाश बोबाटे, प्रभुदास खोब्रागडे, राजनाथ कुशवाह  आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2024

PostImage

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पांढरकवडा येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहाव्या लागल्या रिकाम्या खुर्च्या 


सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पांढरकवडा येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहाव्या लागल्या रिकाम्या खुर्च्या 

ओबिसीला उमेदवारी नाकारल्याने भाजपला पडणार काय महागात ?

 

पांढरकवडा :- १३ व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पहिली टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा मतदार संघात निवडणूक संपन्न होत आहे. यातील महायुती व भाजपचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पांढरकवडा येथे केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन केले असता या सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याचे गडकरी यांच्या सभेचा शो फ्लॉप झाल्याने भाजपच्या गोठ्यात कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपा कडून ओबीसी समाजाला उमेदवारी नाकारल्याने याचे परिणाम या प्रचार सभेतून निदर्शनास येत आहे. सुरवातीला थोडी फार गर्दी दिसून आली असली तरी नेत्यांच्या भाषणावेळी मात्र गर्दी ओसरू लागली होती

येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका संपन्न होत आहेत. यातील चंद्रपूर आर्णी वणी लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार हे ओबीसी समाजाचे असून त्यांच्या सोबतीला एस. सी. एस. टी. विजेएनटी व मुस्लिम समाज मतदार जवळपास १२ ते १४ लाखाच्या वर संख्या आहे. असे असताना देखील भाजपाकडून ओबिसी समाजाच्या नेतृत्वाला डावलून केवळ २ ते ३ हजार मतदान असलेल्या आर्य वैश्य कोमटी (सावकार) समजला उमेदवारी दिल्याने ओबीसी समाजात मोठी नाराजी पसरली आहे. या नाराजीचा परिणाम आता भाजप नेत्यांच्या प्रचार सभेत दिसून येत आहे. आयोजकांनी आयोजित केलेल्या प्रचार सभेतील शेकडो खुर्ध्या रिकाम्या दिसून आल्याने उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे
महागाई व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे धोरण ठरविण्यात भाजप पुर्णतः फेल झाल्याने सर्व सामान्य नागरिक मात्र चांगलेच नाराज आहे. त्यामुळे भाजपच्या सभेला देखील जाण्यास निरुत्साही असल्याचे दिसून आले आहे. पांढरकवडा येथील सभेत भाजपचे आमदार व अनेक पदाधिकारी उपस्थित असले तरी मतदारांची अनुपस्थिती बघून मात्र नेते मंडळींचा चांगलाच हिरमोड झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 6, 2024

PostImage

चिचडोह बॅरेजच्या पुलावरून होत होती अवैध दारु तस्करी म्हणून चारचाकी वाहनांचा झाला प्रवेश बंद


चिचडोह बॅरेजच्या पुलावरून होत होती अवैध दारु तस्करी म्हणून चारचाकी वाहनांचा झाला प्रवेश बंद

एलसीबी ने पकडली बारा लाख रुपयांची अवैध तस्करीतील दारु 

गडचिरोली - चिचडोह बॅरेज, लोढोंली घाटावर दोन सुमोत भरलेली १२ लाखाची दारू LCB गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी पाठलॉग करून पकडली असता दारू तस्करांनी जिवाची पर्वा न करता चिचडोह बॅरेजच्या पुलावरुन पाण्यात उडी मारली असता त्याचा पायच फॉक्चर झाला. सदर घटनेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल व पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी सदर पुलावरील रहदारीच बंद केली. दि. ५ एप्रिलच्या पहाटेला दारू तस्करांनी दोन सुमो गाड्यात दारूच्या पेट्या भरून लोंढोली वरून चामोर्शी मार्ग चिचडोह बरेंज वरून दारू तस्करी करीत असल्याचा सुगावा गडचिरोली LCB अधिकारी व कर्मचारी यांना लागताच त्यांनी दोन्ही गाड्याचा पाठलाग करून व चामोर्शी पोलीसांना माहीती देऊन चामोर्शी पोलीसांनी चामोर्शी कडील गेट बंद केला त्यामुळे दारू तस्करीच्या दोन्ही गाड्या चौकीदारांना न जुमानता सुसाट वेगाने जावून पुलाच्या मंध्यतरीच थांबल्या. त्यातील दारू तस्करीचा मोरक्या पुलावरून चक्क पाण्यात उडी घेतली तो पाण्याच्या खाली पडला. पाणी कमी होते परंतु अंदर खडक असल्यामुळे दारू तस्कराचा पाय मोडला त्यामुळे त्याला पळता आले नाही. सापडलेल्या दोन्ही गाड्यांत १२ लाखाची दारू सापडली. पोलीसांनी ती हस्तगत करून पाय मोडलेल्या दारू तस्कराला चामोर्शी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेमुळे जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली व पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी गेट समोर प्रवेश बंदचा बोर्ड  लावल्यामुळे आता रहद्दारीच बंद पडली. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीच्या गाड्या लग्नसराईतच बंद पडल्या आता त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर पुलावरून आवागमन करणाऱ्या सर्वच गाड्या दारूची तस्करी करणाऱ्या नसतात. लग्नसराईत जाणाऱ्या व दवाखाणात जाणाऱ्याना आता त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा
जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दोन्ही बाजुला पोलीस चौकी बसवावी परंतु रहदारी बंद करू नये तसेच रात्रौ गेट बंद करणाच्या वेळेत ७ ऐवजी रात्रौ १० वाजता पर्यंत गेट सुरु ठेवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष गोपाल रायपूरे व रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी निवेदनाद्वारे आवागमन करणाऱ्या प्रवाशांना त्रास देऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 4, 2024

PostImage

देसाईगंज पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक


देसाईगंज पोलीसांनी जबरी चोरी करणा­ऱ्या दोन आरोपींना केली अटक

 

वडसा (देसाईगंज):-
पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांचे आदेशान्वये सपोनि. संदिप आगरकर व पोस्टे स्टाफ हे पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, प्रभारी अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांनी ०१ एप्रिल २०२४ रोजी माहिती दिली की, मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरीे हिसकावुन चोरुन नेले. अशा मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारावर सपोनि. आगरकर व पोस्टे स्टाफ यांचे एक पथक तात्काळ महादेव पहाडी पळसगांव येथे गेले असता, तिथे फिर्यादी नामे जय सहदेव दोनाडकर रा. बरडकीन्ही तह. ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांनी सांगीतले की, जय व त्याचा मित्र हर्षल पहाडी चढत असतांना हर्षल यास दम आल्याने तो थोडा वेळ थांबला असता, हर्षलजवळ दोन अनोळखी पगडी बांधुन असलेले सरदार त्यांचेजवळ येतांना दिसुन आल्याने फिर्यादी जय हा हर्षलजवळ आले असता, पगडी बांधून असलेल्या दोन्ही इसमांनी त्यांना मारण्याची धमकी देऊन तुमच्याकडे असलेले पैस आम्हाला द्या असे धमकावल्याने फिर्यादी जय याने नकार दर्शविल्याने त्यापैकी एक मजबूत बांधा असलेल्या इसमाने फिर्यादी जय यांचे कॉलर पकडुन तुला मारुन टाकीन असे म्हणुन खिशात हात टाकुन खिशातील पॉकीटमध्ये असलेले ९५० रु. हिसकावुन घेतले. तसेच हर्षलकडे असलेले एक रिअल मी ७-१ कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे १३ हजार ५०० रु. हिसकावुन घेतले. त्यानंतर तिथे लोकं मदतीला येत असतांना पाहून, ते दोन्ही इसम पैसे व मोबाईल घेऊन पहाडीवर पळून गेले.


असे फिर्यादीने सांगितल्याने, सपोनि. आगरकर व त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी फिर्यादीस सोबत घेऊन महादेव पहाडी वरील झुडपी जंगलात शोध घेतला असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना पाहताच पळ काढला. सदर पळुन जाणाऱ्या दोन अनोळखी इसमांना पोलीस पथकांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, सदर संशयित इसमांची नावे १) बादलसिंग नैतरसिंग टाक (३२) व २) अनमोलसिंग निर्मलसिंग टाक (२८) दोघेही रा. अर्जुनी मोरगाव सिंगलटोली वार्ड नं. २, तह. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया असे असून फिर्यादी व इतर प्रथमदर्शी साक्षीदार यांचेकडे प्राथमिक तपास करुन तसेच आरोपीतांकडुन गुन्ह्रात जबरीने चोरुन नेलेला एकुण १४ हजार ४५० रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध फिर्यादीच्या रिपोर्ट वरुन पोस्टे देसाईगंज येथे अप क्र. १०८/२०२४ कलम ३९२, ३४ भादंवि अन्यये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. आगरकर करीत असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना न्यायालयाने ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे देसाईगंज पोनि. अजय जगताप, सपोनि. संदिप आगरकर, पोअं/५५३८ विलेश ढोके, पोअं/३७५५ शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

एलसीबीच्या अधिकाऱ्यांनीच मागीतली लाच मात्र सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


एलसीबीच्या अधिकाऱ्यांनीच मागीतली लाच मात्र सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक

धुळे : -
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड) व पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे) व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील (प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे

तक्रारदाराने 1 एप्रिल रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावून लाच पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी तडजोडीअंती दिड लाखांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व सोमवारी सायंकाळी दोंडाईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशी निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक शिंदे यांना अटक करण्यात आली.
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

Beed Braking News रामपुरी येथे पहाटेच्या सुमारास लागली घराला भिषण आग


Beed Braking News

रामपुरी येथे पहाटेच्या सुमारास लागली घराला भिषण आग 
 

बिड:-
 रामपूरी येथील पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घराला भीषण आग लागली असून, यामध्ये साडेतीनशे क्विंटल कापूस आणि संसार उपयोगी साहीत्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे
 तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने संपूर्ण घराची राखरांगोळी झाली आहे 
गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे पहाटेच्या दरम्यान घराला भीषण आग लागली असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंकुश जगदीश मस्के असे त्या घरमालकाचे नाव आहे. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर शेतकरी बागायतदार असून घरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस असल्याचे सांगण्यात आले. सदर घटना घडताच तात्काळ गेवराई येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सदर आग आज बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान लागली. यामध्ये सदर शेतकऱ्याचा साडेतीनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून, मात्र घरात साठवून ठेवलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील संसार उपयोगी साहीत्य जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

आलेरे बावा जंगली हत्ती चामोर्शी तालुक्यातील विकासपल्लीत


आलेरे बावा जंगली हत्ती चामोर्शी तालुक्यातील विकासपल्लीत


 चार शेतकऱ्यांच्या मक्का पिकांचे केले नुकसान

चामोर्शी:-
 तालुक्यातील घोट वनपरीक्षेत्रा अतर्गत येत असलेल्या विकासपल्ली येथे दोन हत्ती आल्याची माहिती रात्रो 7:30 च्या दरम्यान उजेडात आली असून चामोर्शी तालुक्याच्या शेवटच्या टोक असेलल्या विकासपल्ली येथे आता हत्ती शिरल्याची माहिती असून दोन शेतकरी शेतीची राखण करीत असतांना हत्ती पासून जीव वाचविण्यासाठी झाडावर चढून जीव वाच्यविण्याच्या प्रयत्न केला.

याबाबत घोटच्या वनपरीक्षेत्र अधिकारी निलेश वाडीघरे यांना माहीती देण्यात आली असून हत्तीने विकासपल्ली गावालगत असलेल्या गौतम गौरचंद मंडल, गौरग सिदाम सरकार, निशिकांत दुर्गाचरण गाईन व नरेश नारायण मिस्त्री या चार शेतकऱ्यांचे मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे घटनेचे माहिती मिळताच घोट वन विभागाचे पथक रात्रो व आज सकाळी विकासपल्ली रवाना झाले आहे तसेच ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हत्ती या परिसरात असल्याची माहिती मिळताच हुल्ला टिम सुद्धा या परिसरात दाखल झाली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2024

PostImage

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

 

आष्टी:-
 श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आष्टी च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांचा सहभाग व मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार  मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
       या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत मतदान करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे, मतदान जनजागृती च्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही अधिक मजबूत करावी असे आव्हान डॉ. रमेश सोनटक्के यांनी केले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती घोषणा फलक देऊन विद्यार्थ्यांनी ' आपल्या अमूल्य मताचे दान, आहे लोकशाहीची शान', 'मतदान करा, देश वाचवा' अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मतदारांना जागृती करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्रांगणातून घोषणा देत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला, ही रॅली आष्टी या गावातून फिरून  रॅलीच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मतदान करून व मतदारांमध्ये जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

Breaking news आपचे खासदार संजय सिंह यांचा जामीन मंजूर, तुरुंगातून निघाले बाहेर


Breaking news
आपचे खासदार संजय सिंह यांचा जामीन मंजूर, तुरुंगातून निघाले बाहेर


नवी दिल्ली : -
आपचे खासदार संजय सिंह यांचा जामीन मंजूर झाला असून तुरुंगातून ते बाहेर पडले आहेत 
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळ्यामध्ये तुरुंगात गेले आहेत. केजरीवाल यांना २१ मार्चला ईडीने अटक केली होती, सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. अशातच गेल्या सहा महिन्यांपासून दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जामिन मिळाला आहे.

यामुळे संजय सिंह राजकीय घडामोडींमध्ये, आपच्या प्रचारामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने संजय सिंह यांच्या जामिन अर्जावर सुनावणी घेतली होती. यामध्ये संजय सिंह यांना आतादेखील तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे, असा सवाल खंडपीठाने ईडीला विचारला होता. यावर सिंह यांच्या वकिलांनी पैशांच्या अफरातफरीचे काहीच सिद्ध करू शकले नाहीत, तसेच मनी ट्रेलही दाखवू शकले नाहीत, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते.
संजय सिंह यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक आणि रिमांडविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. यामध्ये खंडपीठाने सिंह यांच्याकडून कोणतेही पैसे जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच त्यांच्यावरील दोन कोटींची लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते, असे नमूद केले. ईडीच्या वकिलांनी आपण त्यांना सूट देऊ शकतो असे म्हटले होते.

संजय सिंह यांना गेल्या वर्षी ४ ऑक्टोबरला ईडीने अटक केली होती. हायकोर्टात ईडीने सिंह यांच्या जमिन अर्जाला विरोध केला होता. यानंतर तीन महिन्यांनी सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी मी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे, परंतु आजवर मला गुन्हा काय आहे आणि माझी त्यात भुमिका काय आहे, हे देखील सांगितले गेल नाहीय, असे म्हटले होते


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

९ नक्षल्यांचा पोलीसांनी केला खात्मा


९ नक्षल्यांचा पोलीसांनी केला खात्मा

बीजापूर, दि. 02 : जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात आज 2 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दुपारपर्यंत 4 नक्षली ठार झाल्याची माहिती समोर आली होती व ठार नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती दरम्यान दुपारनंतर आणखी 5 नक्षलीचे मृतदेह आढळून आल्याची माहिती पुढे येत असून ठार झालेल्या नक्षलींचा आकडा आता नऊ (9) वर पोहचला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई असल्याचे समजते.

बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्रा जंगल परिसरात गांगलूर एरिया कमिटीचे नक्षली मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ, कोबरा व सीआरपीएफ चे जवान संयुक्त कारवाई करण्यास निघाले असता चकमक उडाली. या चकमकीत नऊ नक्षल्यांचा खात्मा जवानांनी केला आहे.

घटनास्थळावरून नऊ नक्षल्यांचे मृतदेह, 01 LMG स्वयंचलित शस्त्र / BGL launchers, मोठ्या प्रमाणात साहित्य, स्फोटके व दैनंदिन साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या चकमकीत आणखी काही नक्षली जखमी व ठार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

बेलोरो वाहनातून अवैध दारू तस्करी तरीही सापडले पोलीसांच्या जाळ्यात


बेलोरो वाहनातून अवैध दारू तस्करी तरीही सापडले पोलीसांच्या जाळ्यात

आष्टी पोलीसांनी तिन लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त


आष्टी:-
दारू तस्करांनी वेगवेगळ्या शक्कली लढवून अवैध दारू तस्करी करीत आहेत परंतू पोलीस सुद्धा अलर्ट झाले असल्याने ते पोलीसांच्या जाळ्यात अडकणारच आहेत हे सर्वश्रुत आहे 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी दारुचा सुद्धा प्रयोग केला जातो म्हणून आष्टी पोलीस रात्रीची गस्त करीत असताना  येणापूर ते जैरामपूर मार्ग क्रमण करीत असताना मुधोली चक १ येथे एक बोलेरो  एम.एच.३४ एक.व्ही २१३६ हे वाहन संशयास्पद दिसले असता  पंचासमक्ष तपासणी केली तेव्हा सदर वाहनात ९० एम एल च्या  देशी दारूचे बाक्स किंमत ९६००० हजार रुपये व वाहनाची किंमत तिन लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  व कलम ६५ (अ) ८३ मुदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे 
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंडल, महिला पोलिस उपनिरीक्षक जगताप, पोलीस शिपाई राउत,मेंदाळे, चापोशी  येनगंटीवार यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात यावर्षी रामनवमी उत्सव साजरा होणार


श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात यावर्षी रामनवमी उत्सव साजरा होणार 

देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांची माहिती

अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी: चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.मंदिरापासून जवळच वर्धा-वैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांत धाम असे म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोरून आजु-बाजुला घनदाट सागवानाची झाडे व काही चंदनाचे वृक्ष आहेत. या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना व पर्यटकांना वृक्ष छायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते यावर्षी श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा येथील मंदिरात रामनवमी उत्सव व पालखी पदयात्रा कार्यक्रम बाबत श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळा मंदिर समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली आष्टी परिसरात श्री हनुमान मंदीर प्रशांत घाम चपराळाच्या वतीने पालखी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती श्री हनुमान मंदीर देवस्थानचे अध्यक्ष संजय पंदिलवार यांनी दिली


PostImage

Vaingangavarta19

April 2, 2024

PostImage

पाणी द्या हो पाणी द्याहो, गडचिरोलीतील लक्ष्मी नगर महिलांचा टाहो!


पाणी द्या हो पाणी द्याहो, गडचिरोलीतील लक्ष्मी नगर महिलांचा टाहो!

तिन महिन्यांपूर्वी पासून पाणीपुरवठा योजना बंद आहे 

गडचिरोली:-
 अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा नळ योजना तीन महिन्यापासून ठप्प पडली असून आरमोरी रोड,लक्ष्मी नगर मध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने लक्ष्मी नगर च्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . तीन महिन्यापासून लक्ष्मी नगर शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही नगर प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते आहे 
असे असूनही मात्र पाणी कर सुरुच आहे तिन महिन्यात पाणीपुरवठा करण्यात आला नाही तर पाणीकर का द्यावे असे प्रश्न लक्ष्मी नगरवासीयांना पडले आहे
 गडचिरोली शहरातील प्रशासन सुज्ञ असूनही या बाबतीत उदासीन का आहे हाही प्रश्न अनुत्तरित आहे 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी लक्ष्मी नगर शहरवासीयांना इतरत्र धाव घ्यावी लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ लक्ष्मीनगर शहरवासीयांवर आलेली आहे.
गडचिरोली शहराला ईतर वार्डात नियमित पाणीपुरवठा होतो आहे मात्र लक्ष्मी नगर मध्ये का होईना ?
 
तिन महिन्यापासून  पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.

कठाणी नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीपुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून नगर परिषद प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहीरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे  मात्र या बाबी कडे नगर परिषदेच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशीच स्थिती दिसून येते आहे
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लक्ष्मी नगर येथील ग्रामस्थांना  इतरत्र भटकावे लागत आहे

गडचिरोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही लक्ष देईना झाले आहेत 
आता प्रश्न असा  पडतो आहे की, ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी पुरवठा बंद झाल्याने लक्ष्मी नगर वासीयांची ससेहोळपड होते आहे तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन याबाबत उदासीन आहे असेच दिसते आहे
तात्काळ पाणी समस्या दुर करावी अशी मागणी आरमोरी रोड लक्ष्मी नगर येथील महिलांसह  पवन आखाडे,शंकर रनदीवे, विनोद खोब्रागडे ,नितीन तारवेकर,वैभव कहुरके,दिवाकर ठेंगरे,अवी झीलपे,पराये,दिलीप मानुसमारे,पडीशालवार,अशोक सुत्रपवार आदींसह लक्ष्मी नगर वासीयांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल


अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल


कूरखेडा-:
 शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़  केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षका विरोधात विनयभंग, पोक्सो व विविध कलमान्वये आज सांयकाळी कूरखेडा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला आहे 
 आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे वय ४७ असे असून तो तालूक्यातीलच एका जि प उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक आहे शाळेतीलच एका अल्पवयीन मूलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिचा शरीराचा मूका घेणे,चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मूलीचे पालकानी मूलगी व गावकऱ्यासह कूरखेडा पोलीस स्टेशन येथे पोहचत तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि ३५४(अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती आहे प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजूडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

काँग्रेस चे लोकसभा उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या गडचिरोली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन


काँग्रेस चे लोकसभा उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या गडचिरोली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

गडचिरोली:-
गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात इ़डीया आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या गडचिरोली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंडीया आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र चंदेल,  मल्लेलवार, माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राउत, हसन गिलाणी, महिला कांग्रेस जिल्हाध्यक्ष कविता माहोरकर,व जिल्ह्यातील इंडीया आघाडीचे सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार


आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार

    आष्टी :-  
   भिडेवाडा बोलला आंतरराष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल आयोजक कवी तथा गझलकार विजय वडवेराव यांनी नुकताचं जाहीर झाला असून  या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक येथील युवा कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला होता,या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक 31 मार्च 2024 ला महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह पुणे येथे नुकतेच पार पडले त्या कार्यक्रमात कवी,लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांना उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रा.डॉ.संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कार्यक्रमाध्यक्ष विजय वडवेराव, व्यंकनबाई चनलवाड जेष्ठ कवयित्री परभणी, कवी विशाल बोरे वृ.प्र.मुंबई दूरदर्शन, एम.डी.कदम संचालक शालेय शिक्षण भारती विद्यापिठ, दादासाहेब सोनवणे माझी संघ प्रमुख दलित स्वयंसेवक संघ, म.भा.चव्हाण जेष्ठ गझलकार, अहिल्या कांबळे राज्यसमन्वयक भिडेवाडा मुक्ती राज्यस्तरीय स्त्री शिक्षिका मोर्चा, गझलकार अनिल कांबळे अध्यक्ष गझलमंत्रण संस्था यांच्या समक्ष सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, हजार रुपये रोख रक्कम, मानाचा पट्टा, विजय वडवेराव लिखित काव्यसंग्रह बाभळीचा काटा, देऊन सत्कार करण्यात आला या सत्काराबद्दल उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी, गावकरी मंडळी या सर्वांकडून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..


PostImage

Vaingangavarta19

April 1, 2024

PostImage

जनक्रांती दलित पँथर सोलापूर लोकसभेची निवडणूक लढणार--गोविंद चुबुकनारायण


जनक्रांती दलित पँथर सोलापूर लोकसभेची निवडणूक लढणार--गोविंद चुबुकनारायण

 मंगळवेढा -दि.07. मे 2024 रोजी होणारी सोलापूर लोकसभेची निवडणूक जनक्रांती दलित पँथर सर्व शक्तिनीशी लढवणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष गोविंद चुबुकनारायण यांनी दिली. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
   पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून प्रणिती शिंदे व राम सातपुते हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत आहेत. हे दोन्हीही पक्ष प्रस्थापित असून त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणे घेणे नाही.
 सर्वसामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवणार असून सोलापूरची विमानसेवा तसेच मराठा आरक्षण हे आपल्या प्रचारातील प्रमुख मुद्दे असून याबाबतची पुढील रणनीती अखण्यात येत असल्याचे सुतोवाच चुबुकनारायण यांनी केले.
 यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजान पटेल, जिल्हा सचिव जहागीरदार काझी, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ मेटकरी व जिल्हा संघटक महादेव माने आदि उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 31, 2024

PostImage

ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास , जागीच झाला गतप्राण 


ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास , जागीच झाला गतप्राण 

कूरखेडा:-
 एका दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना कुरखेडा वडसा  राष्ट्रीय महामार्गावरी  नान्ही हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोर आज दि.३१ मार्च ला ११.०० वाजता घडली
 
मृतक दुचाकीस्वार यशवंत गहाणे अंगारा सालई खुर्द येथील आहे 
  दिपक ट्रान्सपोर्ट नागपूर येथील ट्रक क्रं.MH-31CB-8635 वडसा वरुन कुरखेडा येथे ट्रान्सपोर्ट सामान खाली करण्या करीता येत असताना नान्ही गावा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील एच पी पेट्रोल पंप समोर ट्रक मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात मोटार सायकल क्र.MH-33-Z-6124(हीरो-सीडी डिलक्स) मोटार सायकलस्वार ट्रकच्या समोरच्या चाकात आल्याने जागेवरच गतप्राण झाला.
अपघात होताच ट्रक चालक घटना स्थळावरुन भिती पोटी फरार झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस विभागाला माहिती होताच त्वरित घटनास्थळी पोहोचून परीस्थिती आटोक्यात आणली. मृतकाचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले व शवविच्छेदन झाल्यावर मृतकाचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
अधीक तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 30, 2024

PostImage

आष्टी शहरातील नळ योजना एक महिन्यापूर्वी पासून बंद, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची इलूर कडे धाव


आष्टी शहरातील नळ योजना एक महिन्यापूर्वी पासून बंद, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची इलूर कडे धाव 

 

आष्टी : अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी शहरातील पाणीपुरवठा नळ योजना एक महिन्यापासून ठप्प पडली आहे पाणी पुरवठा होत नसल्याने  शहरातील नागरिकांना ईल्लूरकडे पिण्याच्या पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. दोन महिन्यापासून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
आष्टी शहरातील ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असलेली ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात ओळख आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना ईल्लूरकडे धाव घ्यावी लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ आष्टी शहरवासीयांवर आलेली आहे. आष्टी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रातून पाणी पुरवठा केला जातो आणि या शहरात तीन पाण्याच्या टाक्या आहेत  याच दरम्यान वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे दोन महिन्यापासून  शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात पण नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे तर तेथील पाण्याच्या टाक्यातील गाळ उपसा करायला पाहिजे असे शहरवासियांची बोंब आहे.
दोन महिन्यापासून  पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.
वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीपुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहीरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे  मात्र या बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशीच स्थिती दिसून येते आहे
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आष्टी येथील ग्रामस्थांनी इलूर पेपरमील समोरील नळ हा चोविस तास सुरू राहत असल्याने त्या नळाचे पाणी आपल्या घरात पिण्यासाठी आणण्यास लगबग सुरू आहे असे दिसून येते आहे 

आष्टी शहरातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशिल डोर्लीकर यांना शहरातील पाणी पुरवठा एक महिन्यापासून ठप्प का पडला आहे असे विचारले असता त्यांनी वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली असल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे असे सांगितले 
आता प्रश्न असा  पडतो आहे की, ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी पुरवठा बंद झाल्याने गावकऱ्यांनी ससेहोळपड होते आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीन आहे असेच दिसते आहे
तात्काळ पाणी समस्या दुर करावी अशी मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2024

PostImage

अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद


अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी केले जेरबंद


देसाईगंज (वडसा) पोलीसांची अट्टल गुन्हेगारावर कारवाई 

देसाईगंज (गडचिरोली) :-
 अनेक घरफोड्या करणाऱ्या इसमास पोलीसांनी अटक केली आहे देसाईगंज (वडसा )पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले; विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने त्याचा पाठलाग करुन सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अधिक विचारपूस केली असता, सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले. सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.

सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली. सदर आरोपी वर जळगाव, भुसावळ, चंद्रपूर, भंडारा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत. तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 29, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या


 भामरागड :-
ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर लक्षवाद्यांनी आपले डोके वर काढले असून भामरागड 
तालुक्यातील ताडगाव येथे काल दि .२८ मार्च ला रात्रोच्या सुमारास नक्षल्यांनी एका इसमाची हत्या करून मृतदेह मुख्य रस्त्यावर फेकून दिले आहे. सदर इसमाचे नाव अशोक तलांडी असून तो दामरंचा येथील रहिवासी आहे. त्याला पोलीस खबरी असल्याचे सांगून त्याची हत्या केल्याची नक्षल्यांनी मृतदेह शेजारी पत्रक टाकून कळविले आहे. पुढील तपास भामरागड पोलीस विभाग करीत आहे


PostImage

Vaingangavarta19

March 27, 2024

PostImage

पोलीस नक्षल चकमकीत सहा नक्षली ठार तर अनेक नक्षली जखमी झाल्याची शक्यता


पोलीस नक्षल चकमकीत सहा नक्षली ठार तर अनेक नक्षली जखमी झाल्याची शक्यता

 

बीजापूर:-
 दि. 27 :  बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिप्पूरभट्टी परिसरात तालपेरु नदीजवळ सकाळच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत सहा (6) नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत असून त्यात दोन महिला नक्षलीसह डेप्युटी कमांडरचा सहभाग आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले होते. दरम्यान बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिकुरभट्टी आणि पुसाबका गावांच्या जंगलात चकमक झाली. या कारवाईमध्ये डीआरजी, सीआरपीएफ 229, कोब्रा टीमचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, चकमकीनंतर घटनास्थळावरून दोन महिला व चार पुरुष नक्षल्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षल्यांवर लाखो रुपयांचे बक्षीस होते. तर या चकमकीत अनेक नक्षली जखमी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनास्थळाची झडती घेतली असता सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त केल्या आहेत. अद्यापही जवान परिसरात शोध घेत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 26, 2024

PostImage

रंगपंचमीच्या दिवशी चामोर्शी पोलिसांनी 28,40,000/- रुपयाचा मोहसडवा केला नष्ट


रंगपंचमीच्या दिवशी चामोर्शी पोलिसांनी 28,40,000/- रुपयाचा मोहसडवा केला नष्ट 
 

चामोर्शी:- 
चामोर्शी पोलिसांनी २८४०००० रुपयाचा मोहसडवा केला नष्ट 
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 24/03/2024 रोजी पोस्टे चामोर्शी हद्दीतील मौजा जंगमपूर जंगल शिवारातील जंगमपूर नाल्याच्या शेजारी 1) जुगल लखन दास, 2) देवदास किसन मंडल, 3) सुब्रातो विश्वास व इतर रा. नेताजी नगर (गाव क्रमांक 74) तह. चामोर्शी, जि. गडचिरोली हे मोहा सळवा फुलाची दारु काढून अवैधरित्या विक्री करत आहेत, अशी गोपनिय बातमीदारंाकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोस्टे चामोर्शी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पुल्लरवार यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका शिंदे सह एक पथक चामोर्शी येथून सदर ठिकाणी रवाना करण्यात आले.

पोलीस पथक घटनास्थळावर पोहचताच सदर इसम पळून गेले.त्यानंतर सदर जागेची पाहणी केली असता, घटनास्थळावर 200 लीटर क्षमतेचे 26 प्लॅस्टीकचे ड्रम त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा फुल सडवा असे एकुण पाच हजार दोनशे लीटर अंदाजे किंमत 5,20,000/- चा मुद्देमाल आणि 200 लीटर क्षमतेच्या पांढऱ्या रंगाचे एकुण 116 प्लॅस्टीकच्या थैली त्यामध्ये प्रत्येकी 200 लीटर मोहा सडवा प्रमाणे 23 हजार 400 लीटर अंदाजे किंमत 23,40,000/- मोहा फुल सडवा असे एकुण 28 हजार 400 लीटर अवैध मोहा सडवा बाजार भाव विक्री किंमत 100 प्रती लीटर प्रमाणे एकुण 28,40,000/- चा मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मोक्यावर रीतसर सॅम्पल घेऊन वेळीच घटनास्थळी पंचासमक्ष नष्ट करण्यात आला. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करुन पोस्टे चामोर्शी येथे आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. राधिका शिंदे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार यांचे नेतृत्वात मपोउपनि. राधिका शिंदे, पोहवा/व्यंकटेश येलल्ला, पोअं/संदिप भिवणकर, मपोअं/मनिषा चिताडे, मपोअं/शिल्पा पोटे, चापोअं/सिंधराम यांनी केलेली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2024

PostImage

नाली उपस्याकडे मार्कंडा (कं) ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लेक्ष


नाली उपस्याकडे मार्कंडा (कं) ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लेक्ष

ग्राम निधीचे करताय तरी काय? ग्रामस्थांनचा सवाल


आष्टी - चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मार्कंडा कंन्सोबा येथील वार्ड क्र २ मधील बेघर वसाहतीतील भागात गेल्या कित्तेक वर्षापासून नालीची सफाई करण्यात आली नसल्याने नालीमध्ये सांडपाणी, मातीचे थर प्लास्टिक पिशव्या काडी कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पुर्णतः नाली ब्लॉक झाल्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या घराजवळ सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले असून या कडे ग्रामपंचायत प्रशासन अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे. वर्षभर नाली सफाई करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बुजलेल्या नाल्या, मातीचे व कचऱ्याचे थर जमा होऊन खराब सांडपाणी जागीच अडून दुर्गंधी पसरु लागली आहे. सध्या स्थितीत नालीची अवस्था बिकट स्वरूपाची झाली आहे. नालीच्या उपसा अभावी खराब सांडपाणी एकाच ठिकाणी जमा होऊन डास, किडे व जंत तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी वेगळीच परिस्तिथी निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून स्वच्छतेवर नाही तर गलिच्छतेवर भर दिसतो. त्वरित नालीचा उपसा करून साफसफाई करण्यात यावी अशी मागणी बेघर वसाहतीत राहणाऱ्या ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून विजकर, पाणीकर, आरोग्य कर,गृहकर घेतले जाते पण स्वच्छतेवर लक्ष देत नाही असाही सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2024

PostImage

भंगार गोळा करणाऱ्या महिलांना मोटारपंप चोरी प्रकरणी अटक


भंगार गोळा करणाऱ्या महिलांना मोटारपंप चोरी प्रकरणी अटक

अहेरी:-
शांतीग्राम डांबरप्लान्ट येथील  मोटारपंप चोरी प्रकरणी सहा भंगार गोळा करणाऱ्या महिलांना  अहेरी पोलीसांनी २२ मार्चला अटक केली आहे 
डांबरप्लांट  मधील मोटारपंप ची चोरी झाल्याची तक्रार  चौकीदार याने दिली असता अहेरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता पोलिसांना भंगार गोळा करणाऱ्या महिलांनवर संशय आल्याने मीरा खंडेलवार,बालनागी खंडेलवार,मनिषा जगन्नाथ, कविता जगन्नाथ, मिनाक्षी जगन्नाथ,वच्छला कुंभारे सर्व रा.शासकिय विज्ञान महाविद्यालय समोरील झोपडपट्टी गडचिरोली यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या सर्व महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली 
सदर महिला आरोपींकडून ८० हजार रुपये किंमतीची मोटारपंप जप्त करण्यात आली.याबाबतीत अहेरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करुन सहाही महिलांना अटक करण्यात आली ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक रोहन जावळे, पोलीस शिपाई पुंगाटी, महिला पोलिस शिपाई गोटामी यांनी केली


PostImage

Vaingangavarta19

March 23, 2024

PostImage

महसूल अधिकारी आले रे आले, ट्रॅक्टर घेऊन पळा या नादात तरुण गेला जिवानिशी


महसूल अधिकारी आले रे आले, ट्रॅक्टर घेऊन पळा या नादात तरुण गेला जिवानिशी 

 अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॉक्टर चालकाचे गाडीवरील सुटले नियंत्रण 

ब्रह्मपुरी;- 
तालुक्यातील बेलगाव देऊळगाव येथील वैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास अवैद्य रेती उपसा करीत असताना अचानक महसूल अधिकारी आले रे आले ट्रॅक्टर घेऊन पळा असे आवाज येताच ट्रॅक्टर घेऊन पळत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो खाली कोसळला व त्यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने त्याचा मृत्यू झाला
अवैध रेतीचे उत्खनन सुरू असताना पळापळीच्या नादात कुटुंबातील एकुलता एक मुलाला त्याचा जीव गमवावा लागला त्यामुळे गावावर व कुटुंबावर शोक कला पसरली आहे बेलगाव येथे घाटावरील रेती चोरीला आळा घालण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अनिल जिटावार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कावळे आत्राम यांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आला
 मृतक युवकाचे नाव गोलू उर्फ प्रणय गुरुदेव धोटे वय २० वर्षे रा. देऊळगाव असे आहे मागील वर्षी ब्रह्मपुरी तील काही रेती घाटाचा लिलाव झालेला होता बेलगाव देऊळगाव येथील रेती घाटाचा लिलाव झाला होता मुदतीत रेती साठ्याची विक्री न झाल्याने रेतीसाठा शिल्लक होता एका राजकीय पुढाऱ्याने रेतीसाठ्याची विक्री करण्याचे परवानगी प्राप्त केली ठेकेदाराने नदीपात्रामधून दिनांक 14 मार्च च्या रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर नी रेती उपसा करण्याचे काम सुरू केले असल्याचे घटनास्थळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले अशातच अधिकारी येत असल्याची चाहूल लागल्याने घाटावरील दिवाणजी यांनी सर्व ट्रॅक्टर वाल्यांना ट्रॅक्टर लपविण्याकरिता सतर्क केले ट्रॅक्टर हा देऊळगाव येथील तलमले यांच्या मालकीचा असल्याने ट्रॅक्टर वर चालक प्रणय गुरुदेव धोटे यांनी ट्रॅक्टर लपविण्याच्या नादात घाटाच्या जवळ असलेल्या शेतामध्ये जोराने वाहन नेल्याने त्यांचे नियंत्रण सुटले व तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ही घटना पहाटेच्या सुमारास घडली


PostImage

Vaingangavarta19

March 22, 2024

PostImage

वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू, घातपात की अपघातच चर्चेला उधाण 


वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू, घातपात की अपघातच चर्चेला उधाण 


गोंडपिपरी:- दि .२१ मार्चला विस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून घातपात की अपघातच अश्या चर्चेला गावात उधाण आले आहे 
गोंडपिपरी तालुक्यातील दरुर येथे ग्रामपंचायत समोर किरमिरी मुख्य मार्गावर गावातील युवक शाहीर अनिल आऊतकर वय २० वर्षे याचा मृतदेह आढळला. शाहीर याचे आई- वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले तो एकटाच असून आजी-आजोबांकडे राहून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मृतदेह असल्याच्या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी गोंडपिपरी पोलीसांना दिली. दि २२ शुक्रवारी सकाळी ८ वाजता घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोगरे, हवालदार शांताराम पाल, मत्ते, सुरपाम घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीला पाठविले आहे. एकीकडे पोलीस अपघात असल्याचे जाहीर करीत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठीविले असून गावात मात्र त्या युवकाचा  घातपात झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे. बेदम मारहान करून हत्या करून दुचाकीला बांधून ओढत मृतदेह गावाबाहेर मुख्य मार्गावर नेऊन ठेवल्याची चर्चा जोर धरत आहे. हत्या की अपघात प्रश्न अनुत्तरीत असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 21, 2024

PostImage

एक लाख विस हजारांचा मोह सडवा आष्टी पोलीसांनी केला जप्त


एक लाख विस हजारांचा मोह सडवा आष्टी पोलीसांनी केला जप्त

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वसंतपूर येथील गुळामोहाचा सडवा पोलीसांनी केला जप्त व दोन आरोपींना जेरबंद केले आहे 

माहे एप्रिल २०२४ मध्ये आगामी काळात देशात  लोकसभा निवडणुक जाहिर झाल्या असल्याने सदर निवडनूका शांततामय वातावरनात पार पडाव्या व प्रत्येक नागरीकास आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा या उद्देशाने पोलीस अधिक्षक  गडचिरोली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अहेरी तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांनी अवैद्य धंदयांवर वेळो वेळी धाडी टाकुन त्यांचे विरुध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिल्याने, दि. २०/०३/२०२४ रोजी पोस्टे आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे व त्यांची टिम पोस्टे परिसरात अवैद्य दारू विक्रेत्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने फिरत असतांना गोपणीय सुत्रांच्या माहिती आधारे  मौजा वसंतपूर येथील इंद्रजित शितल मंडल व परितोष प्रफुल मिस्त्री दोन्ही रा. वसंतपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली हे हातभट्टी गुळामोहाची दारू गाळण्या करीता वसंतपुर जंगल परीसरात मोठया प्रमाणात गुळा मोहाचा सडवा तयार करून ठेवला आहे. अशा खात्रीशीर माहिती  वरून मौजा वसंतपूर जंगल परीसरात शोधमोहीम राबविण्यात आली असता आरोपींच्या ताब्यात ०६ नग २०० लिटर क्षमतेच्या प्लॉस्टिक ड्रम मध्ये एकुन १२०० लिटर हातभट्टी गुळामोहाचा सडवा किंमत १,२०,०००/- रू चा माल मिळुन आला. तसेच एक होंडा शाईन कंपनिची दुचाकी वाहन किंमत अंदाजे ४०,००० रू व ०६ प्लॉस्टिक ड्रम असा एकुन १,६३,०००/- रू चा  मुद्देमाल अवैद्यरित्या मिळून आल्याने  आरोपीतां विरूध्द पोस्टे आष्टी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला पोस्टे आष्टी येथे सदरचा गुन्हयाचा तपास पोहवा  चंद्रप्रकाश निमसरकार हे उप विभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे  व पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 20, 2024

PostImage

आत्महत्येचा केला बनाव मात्र, पोलीसांनी अवघ्या ४८ तासात खुणाचा केला उलगडा


आत्महत्येचा केला बनाव मात्र, पोलीसांनी अवघ्या ४८ तासात खुणाचा केला उलगडा 

उसणे घेतलेले पैसे परत करीत नाही म्हणून हत्या करुन मृतदेह झाडाला लटकावला : एटापल्ली तालुक्यातील घटना

 

एटापल्ली:-
 उसने घेतलेले २६ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला मात्र अवघ्या ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत 

 प्राप्त माहितीनुसार, संपत लुला दुर्वा (३२) रा. पेठा ता. एटापल्ली असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी सर्व रा. पेठा यांचा आरोपींत समावेश आहे. तिघेही ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करीत होता. १७ मार्चला तो काही कामानिमित्य पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यामुळे घातपाताचा अंदाज होता. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीसांनी तपासचक्रे फिरवली. पो.नि. नीळकंठ कुकडे, उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, शुभम म्हेत्रे, रोहिणी गिरवलकर, हवालदार हिरामण मारटकर, कालेश पुपरेडीवार, पोलिस शिपाई प्रभाकर नाईक, मोहन शिंदे, पोलीस शिपाई, पंडीत मुंडे, श्रीकांत दुर्गे, कविता एलमुले, प्रकाश गडकर, जोगी मडावी, प्रियंका तुलावी यांच्या पथकाने ४८ तासांत गुन्ह्याची उकल केली.

तिघांचे मिळून २६ हजार उसने

मयत संपत दुर्वा याच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजू तपासल्या. यात त्याच्याकडे गावातीलच तिघांचे पैसे उसणे होते, अशी माहिती समोर आली. यातून त्यांच्यात वाद झाल्याची माहितीही मिळाली. हा धागा पकडून पोलिसांनी १९ मार्च रोजी तिघांना ताब्यात घेतले. आशिष कोरामी व सुखदेव मडावी यांचे प्रत्येकी सात हजार रुपये तर संजय कोरामी याचे १२ हजार रुपये उसणे होते. पैसे परत देत नसल्याने त्यांनी संपत दुर्वाला कट रचून संपविल्याचे निष्पन्न झाले.

 


PostImage

Vaingangavarta19

March 20, 2024

PostImage

वादळ-गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या  आमदार कृष्णा गजबे यांची मागणी


वादळ-गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

 आमदार कृष्णा गजबे यांची मागणी

देसाईगंज:-

गडचिरोली जिल्ह्यामध्ये आकस्मिक  गारपीटी सह आलेल्या वादळी पावसामुळे माझ्या आरमोरी मतदारसंघातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यातील उभे असलेले मक्याचे अन्य  पीक पूर्णतः उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेत पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रशासनाला केली आहे.

मक्याचे पीक झालेले असताना अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे  तोंडात आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार गजबे यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 20, 2024

PostImage

ट्राक्टरची शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक,चालक जागीच ठार


ट्राक्टरची शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक,चालक जागीच ठार

अवैध रेती तस्करी बितली जीवावर 

देसाईगंज
  तालुक्यातील मोहटोला येथे
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने शाळेच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना दि.२० मार्चला पहाटे ५.०० वाजताच्या सुमारास घडली

प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील अवैध रेती तस्कर योगेश शेंद्रे हा ट्रॅक्टरने रेतीची अवैध रित्या तस्करी करीत असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने मोहटोला येथील जि.प.शाळेच्या भिंतीला जबर धडक दिली. या अपघातात चालक राकेश गजबे रा. पोटगांव ता. देसाईगंज याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला नंबरप्लेट नव्हते. तर सदर प्रकरण  सावरण्याकरीता अवैध रेती तस्करांने हालचाली सुरु केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशिर्वादाने मोहटोला घाटातून दररोज अवैध रेती तस्करी केल्या जाते परंतू चिरीमिरी मिळत असल्याने अधिकारी वर्ग सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत तर परिसरातील गावांमध्ये OBC साठी आताच 15 दिवसापूर्वी प्रत्येक गावात जवळपास 25 ते 30 घरकुल मंजूर झाल्याने त्यांना अद्यापही शासनाने रेतीची पूर्तता केली नाही त्यामुळे त्यांना चोरीची रेती घेतल्या शिवाय पर्याय नाही. अश्यानांही शासनाने रेती दिली असती तर तसेच अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मुस्क्या आवळल्या असत्या तर सदर अपघात घडलच नसता अशी मोहटोला व परिसरात चर्चा सुरू आहे


PostImage

Vaingangavarta19

March 19, 2024

PostImage

BIG BREAKING   चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी केले चकमकीत ठार


BIG BREAKING 
 चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी केले चकमकीत ठार 


  गडचिरोली :- 
जिल्ह्यातील अहेरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल १८ मार्चला रात्री भीषण चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसांनी ठार केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी सर्चिंग ॲापरेशन सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीची अनेक पथक यासच अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरात शोधमोहीम सुरु आहे.
 
 
पुढेआलेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या कोलामार्का येथे आज पहाटे सर्च ऑपरेशन सुरु असताना सी-60 दलांच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतरपरिसराची झडती घेतली असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. naxalites killed in Repanpalli गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि  ⁠पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या नक्षल्यांवर ३६ लाखांचंबक्षीस होतं. या चकमक आणि कारवाई विषयी आज पोलीस अधीक्षक संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 11, 2024

PostImage

स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार -मंत्री धर्मराव बाबा आत्राम


स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार -मंत्री धर्मराव बाबा आत्राम

अंगणवाडी सेविकांना २३८ मोबाईल वाटप

अहेरी: अंगणवाडी केंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. त्यांचे वजन,उंची त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना विविध रजिस्टर मध्ये लिहून ठेवावा लागत होता.मात्र, शासनाकडून आता अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिल्याने अंगणवाडीतील विविध रजिस्टर आता हद्दपार होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी बाल विकास प्रकल्प कार्यालय,अहेरी द्वारा आयोजित अंगणवाडी सेविकांचा सन्मान व मोबाईल वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे भाग्यश्री ताई आत्राम,प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, तहसीलदार हमीद सय्यद,गटविकास अधिकारी राहुल वरठे,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्न प्रलंबित होते.काही प्रश्न सोडविण्यात आले असून उर्वरित प्रश्न देखील मंत्रिमंडळात सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकानी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान बाल विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत कार्यरत तब्बल २३८ अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिकांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते स्मार्ट फोन वाटप करण्यात आले.त्यामुळे अंगणवाडी केंद्रांची ही आता डिजिटल कडे वाटचाल सुरू झालेली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर बाल विकास प्रकल्प कार्यालय कडून पाहुण्यांचे शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 11, 2024

PostImage

त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,जारावंडीत आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन


त्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी,जारावंडीत आक्रोश मोर्चा, कडकडीत बंद,व रास्तारोको आंदोलन 

पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर


गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली  तालुक्यातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली हाेती. या घटनेच्या निषेधार्थ आज (साेमवार) ला जारावंडी सह परिसरातील गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. आज जारावंडीकरांनी आक्रोश मोर्चा  काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या माेर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. 

या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदाेलन केले हाेते. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली हाेती. तसेच जारावंडीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठान व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते.


आजच्या माेर्चात महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदविला. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करत जारावंडी सह  परिसर दणाणून साेडला.
दरम्यान महामहीम राष्ट्रपती,मुख्यमंत्री ,राज्यपाल, महाराष्ट्र शासन गृहमंत्री ,पोलीस महासंचालक ,पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक याना निवेदन देऊन कठोर शिक्षेची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 10, 2024

PostImage

चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार


चार वार्षीय बालिकेवर पन्नास वार्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार

 _जारावंडी येथील घटना,परिसरात हळहळ व्यक्त_ 

गडचिरोली:-

जिल्ह्यातील चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाकणारी घटना जारावंडी येथे घडली आहे ,या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष  नागोबा कोंढेकर  वय ५० असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

सविस्तर वृत्त असे की आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य  पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची,
यात आरोपी शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान  बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला,अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूरला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत  असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे

 या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे.आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 10, 2024

PostImage

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर


कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर 

१०८ वर प्रतिसाद न मीळाल्याने दूचाकीवरच न्यावे लागले रूग्णालयात

कूरखेडा-
  चांदागड वरून कूरखेडा कडे दूचाकीने येत असताना गोठणगांव नाक्यावरील चौरस्त्यावर दूचाकीची कारला धडक बसल्याने दूचाकीस्वार क्रीष्णा भजने वय ४० हा गंभीर झाला हा अपघात आज दि १० रोजी सकाळी १० वाजेताच्या सूमारास घडला
  दूचाकी कारला धडकताच दूचाकीस्वार क्रीष्णा भजने हा रस्त्यावर पडला यावेळी तो गंभीर जखमी असल्याने लगेच नाक्यावरील यूवकानी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेकरीता टोल फ्री क्रंमांकावर काल केला यावेळी रूग्णवाहीका बाहेर असल्याचे थोडा वेळ लागेल असे सांगण्यात आले अर्धा तास वाट बघूनही रूग्णवाहीका न पोहचल्याने अखेर गोठणगांव नाक्यावरील येथील  सोहम कावळे,पवन शिडाम,मोहीद शेख व अन्य यूवकानी दूचाकीनेच जखमी इसमाला दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात पोहचविले जखमीला रूग्णालयात पोहचविण्यात आले यावेळी १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका ही येथील उपजिल्हा रूग्णालयातच उभी होती याची चित्रफीत सूद्धा यूवकानी काढलेली आहे त्यामूळे १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेवरील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणीबाणीच्या प्रसंगीच १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका उपलब्ध होत नाही त्यामूळे येथील त्यांचा कार्यप्रणालीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरीकानी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 9, 2024

PostImage

 महाशिवरात्रीच्या कुलथा यात्रा महोत्सवात  एका तरुणाला जलसमाधी 


 महाशिवरात्रीच्या कुलथा यात्रा महोत्सवात  एका तरुणाला जलसमाधी 

    
गोंडपिपरी:-

तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. कुलथा येथे दोन नद्यांचा संगम असून मोठ्या प्रमाणात नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते अशातच आज दि ९ शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. 
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा हनुमान मंदिर येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन पाहायला मिळते.हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेणारे हजारो भक्त शिवरात्री,आषाढी एकादशीनिमित्त कुलथा यात्रा महोत्सवाला येतात हजारो भक्त दर्शनासाठी धार्मिक भावनेतून रांग लावतात.यावेळी हनुमानजीची मूर्ती त्यांचे दुःख दूर करतात हा तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा आत्मविश्वास आहे.
कुलथा हे गाव गोंडपिपरी - मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर आहे.अंधारी व वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा गाव आहे.
महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते. दि.७ गुरुवार पासून यात्रा महोत्सवाला सूरवात झाली असून ही यात्रा १२ तारखेपर्यंत असते तालुक्यातील धानापुर येथील आकाश अशोक शेडमाके वय २३ याला पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुळुन मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे दाखल होऊन पंचनामा करत प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे


PostImage

Vaingangavarta19

March 8, 2024

PostImage

कत्तलखान्याकडे गौवंश तस्करी करणाऱ्या  ट्रकांना उपविभागीय अधिकाऱ्यानी केले जेरबंद


कत्तलखान्याकडे गौवंश तस्करी करणाऱ्या  ट्रकांना उपविभागीय अधिकाऱ्यानी केले जेरबंद


 
तेलंगणा मध्ये नेणाऱ्या पाच ट्रक मधील १४३ गोधन केले जप्त

 गडचिरोली:-
कत्तलखान्याकडे नेत असलेले गोधन उपविभागीय अधिकारी कुरखेडा यांनी जप्त करुन जीवंत गोधन गोशाळे सुखरुप पाठविले आहे 
कोरची मार्गावर अवैध पणे गौवंशाची तस्करी करण्यात येत असल्याच्या माहीती वरून बूधवार रोजी रात्री गोठणगांव नाक्यावर पोलीसानी सापळा रचला होता मात्र तस्कराना याची पूर्वीच कूणकूण लागल्याने ते आड मार्गाने तेलंगाना कडे पळून‌ जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीसानी त्यांचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने त्याना अटकाव केला यावेळी तस्करानी सर्व ट्रकचे वायर तोडत ट्रक तिथेच ठेवत पळ‌ काढला त्यामूळे घटणास्थळावरून ट्रक पोलीस स्टेशन पर्यंत आणने अडचणीचे असल्याने  ट्रकना ट्रैक्टरने ओढत आणत कूरखेडा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. ट्रक मध्ये अमानूषपणे सर्व जनावरांचे पाय बांधत त्याना एकावर एक ठेवण्यात आले होते यावेळी १४३ पैकी ४ जनावरे दगावली होती तर मोठ्या संख्येत जनावरे मरनासन्न होती. लगेच जनावराना गौ शाळेत पाठविण्याकरीता पवनी जिल्हा भंडारा येथील गौ शाळा व्यवस्थापकांशी संपर्क करीत त्यांचाच वाहनाने जिवंत असलेले सर्व जनावराना तिथे पाठविण्यात आले मात्र यावेळी पाठविण्यात आलेले अनेक जनावरे ही सूद्धा मरनासन्न अवस्थेत असल्याने गौ शाळेत पोहचे पर्यंत सूद्धा अनेक जनावरे दगावली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रविन्द्र भोसले यानी दिली आहे.
        गौवंशाना अमानुष पणे वाहतूक करीत त्यांचा मृत्यूला कारणीभूत असणारे गौ तस्कराविरोधात कठोर कार्यवाही करीत त्याना अद्दल घडविण्याकरीता त्यांचा विरोधात कूरखेडा पोलीस स्टेशन येथे कलम २७९,४२९ भा द वि ५,५(अ),५(ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११(१),ड,ई,फ प्राण्याचा छळ अधिनियम सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम १८४ अन्वये अद्यात आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे या गून्ह्यात एकूण ५ ट्रक सह ५७ लाख ३९ हजाराचा मूद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींचा शोध सूरू असून लवकरच त्याना अटक करण्यात येईल अशी माहिती सूद्धा यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कूरखेडा रविन्द्र भोसले यानी दिली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 8, 2024

PostImage

महाशिवरात्रीच्या यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू


महाशिवरात्रीच्या यात्रेत बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू


आष्टी: -
चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरीता बंदोबस्तासाठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची घटना दिनांक आठ मार्च ला सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

भैय्याजी पत्रू नैताम वय 52 वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरअल्ली ता. मुलचेरा असे मृत  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले.आठ मार्च ला चार वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ गावी कोपरअल्ली येथे पाठविण्यात आले आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी दोन मुले व एक मुलगी असा  मोठा आप्त परिवार आहे


PostImage

Vaingangavarta19

March 7, 2024

PostImage

संतोष किराणा स्टोअर्स अनखोडा कडून महाशिवरात्री भक्तगणांना लाख- लाख शुभेच्छा!


संतोष किराणा स्टोअर्स अनखोडा कडून महाशिवरात्री भक्तगणांना लाख- लाख शुभेच्छा!

        🔹 शुभेच्छूक 🔹

मा.संतोष तिमाडे व परिवार अनखोडा ता.चामोर्शी जि.गडचिरोली 
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔


PostImage

Vaingangavarta19

March 7, 2024

PostImage

मंडळ अधिकारी कार्यालय आष्टी ता.चामोर्शी जि.गडचिरोली तर्फे महाशिवरात्री निमित्त समस्त जिल्हावासियांना अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा!


मंडळ अधिकारी कार्यालय आष्टी ता.चामोर्शी जि.गडचिरोली तर्फे महाशिवरात्री निमित्त समस्त जिल्हावासियांना अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा!


        🔸 शुभेच्छूक 🔸

 मा. विनोद ढोरे मंडळ अधिकारी आष्टी.
मा.सचिन गुरनुले, तलाठी आष्टी
मा. चंदन महीन्द्रे, तलाठी कुनघाडा
मा.  सी.डी. नाईक ,तलाठी अनखोडा
मा.अरुण नागरगोजे,तलाठी गुंडापल्ली
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


PostImage

Vaingangavarta19

March 7, 2024

PostImage

प्रशांत धाम, श्री हनुमान मंदिर संचालक मंडळ चपराळा ता.चामोर्शी जि.गडचिरोली  कडून महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!


प्रशांत धाम, श्री हनुमान मंदिर संचालक मंडळ चपराळा ता.चामोर्शी जि.गडचिरोली  कडून महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा!


         शुभेच्छूक
मा. संजयराव  नानाजी पंदिलवार
अध्यक्ष श्री हनुमान मंदिर चपराळा


PostImage

Vaingangavarta19

March 5, 2024

PostImage

"ईव्हीएम हटवा देश वाचवा " याकरिता गोंडपिपरीत विविध पक्षांचे हजारो नागरिक रस्त्यावर


"ईव्हीएम हटवा देश वाचवा "
याकरिता गोंडपिपरीत विविध पक्षांचे हजारो नागरिक रस्त्यावर

गोंडपिपरी:-  "ईव्हीएम हटवा देश वाचवा " या मागणीसाठी गोंडपिपरी येथील विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आंदोलन केले आहे 
ईव्हीएम मशीनचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करीत गोंडपिपरी तालुक्यातील जनतेकडून याचा तीव्र विरोध सुरू आहे.यादरम्यान विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून सोमवारी तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले.

ओबीसी कृती समिती,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),वंचित बहुजन आघाडी,गोंडवाना गणतंत्र पार्टी,सीआयटियु,एआयटियु,भारतीय बौद्ध महासभा,निवृत्त कर्मचारी संघटना,शिक्षण रोजगार बचाव समिती,शासकीय कंत्राटी कर्मचारी संघ यांच्यासह अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी शासकीय धोरणाचा निषेध केला.ईव्हीएम हटाव,जि.प.शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा,स्वामिनाथन आयोग लागू करा,क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी,जबरानजोत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे,जातनिहाय जनगणना व्हावी अशा अनेक मागण्या घेऊन येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत शहरात जनआक्रोश मोर्चा काढला.ईव्हीएममुळे निवडणुका पक्षपाती होत आहेत.जगातील विकसित राष्ट्र या प्रणालीचा वापर करीत नाही.त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएमचा आग्रह का केला जातोय,असा प्रश्न यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला संबोधित करतांना केला.सभेनंतर तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.मोर्चात हजारो युवक,महिला,शाळकरी मुलांचा सहभाग होता.यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार के.डी.मेश्राम,संवर्ग विकास अधिकारी शालिकराव माऊलीकर,ओबीसी कृती संघर्ष समितीचे मोरेश्वर सुरकर,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे, वंचित बहुजन पार्टी तालुका अध्यक्ष प्रकाश तोहोगावकर,ओबीसी नेते शंकर पाल,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक वनिता देवगडे,रियाज कुरेशी,तुकाराम सातपुते,गौरव घुबडे,पंकजसिंह डांगी,दर्शन वासेकर,अशपाक कुरेशी,शुभम ढपकस,शैलेशसिंह बैस,संदीप लाटकर,नबात सोनटक्के,प्रशांत खेडेकर,सरपंच देविदास सातपुते,गौतम झाडे,सारनाथ बक्षी,अशोक कुडे,सुनील फलके,अड.चैताली फुलझले,काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सोनी दिवसे,रेखा रामटेके,नितेश मेश्राम यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता.


PostImage

Vaingangavarta19

March 5, 2024

PostImage

लॉर्ड्स मेटल ऄड एनर्जी लिमिटेड प्रकल्प कोनसरीतील उद्योगाकरिता शेतजमिनीची दलाली करणाऱ्यांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ व गुलाल उधळून दिला चोप


लॉर्ड्स मेटल ऄड एनर्जी लिमिटेड प्रकल्प कोनसरीतील
उद्योगाकरिता शेतजमिनीची दलाली करणाऱ्यांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहाथ व गुलाल उधळून दिला चोप 

उद्योगाकरिता शेतजमिनी  देण्यास  शेतकऱ्यांचा नकार

गडचिरोली :   लॉर्ड्स मेटल ॲड एनर्जी लिमिटेड कंपनी कोनसरीतील  उद्योगाकरिता शेतकऱ्यांना जमिनी देण्यास परावृत्त करण्यासाठी आलेल्या दलालांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला असल्याचे उघडकीस आले आहे 
चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन अधिग्रहित करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी याअगोदर रिकाम्या हाताने पाठवले आहे 
उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे  विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे, व जगायचे कसे असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता’ प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.


एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती अब्जो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोली (चक) २, जयरामपूर, पारडी (देव), सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली (तुकुम) या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे सुपीक असलेली शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाहीत. याविरोधात एकत्र येत या गावातील शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले होते.गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोली (चक) नं २, सोमनपल्ली या गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही गावात येऊ नये असे फलक लावण्यात आले आहेत वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचं कसं असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत. गावकऱ्यांचे असे मत असताना लायड्स मेटल ॲड एनर्जी कंपनीचे काही दलाल शेतकऱ्यांना भुलथापा देउन जमीन देण्यास बाध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे वास्तव  अखेर आज समोर आले असून तालुक्यातील सोमनपल्ली या गावी जमीनीची दलाली करणाऱ्या चाणाक्ष डोनुजी संदुकवार आलापल्ली, आंबोलीचे सेवानिवृत्त ग्रामसेवक अरुण विठ्ठल उंदिरवाडे,शिवराम नारायण बारसागडे चामोर्शी यांना पकडून चांगलाच चोप दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे आणि समज देऊन सोडून देण्यात आले आहे अशीही माहिती पुढे आली आहे


PostImage

Vaingangavarta19

March 4, 2024

PostImage

ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर


ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर

सोनापूर क्रांसिंग जवळ  झाला अपघात 

चामोर्शी :- 

एका ट्रकने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चामोर्शी जवळील सोनापूर फाट्यावर घडली चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून,  सुरेश महादेव दुधबावरे, रा - सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH33 Z 6877 या दुचाकीने चामोर्शीला गेले होते  वापस येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला जब्बर  धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 4, 2024

PostImage

जन्मदात्याने 2  तरुण मुलीसह, पत्नीची झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या


जन्मदात्याने 2  तरुण मुलीसह, पत्नीची झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या

 

नागभीड--:
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी (बाळापूर )येथील वडील अंबादास लक्ष्मण तलमले वय 50 वर्षे याने स्वतःची पत्नी सह 2 तरुण मुलीची हत्या केली असल्याचा प्रकार आज दिनांक 3 मार्च 2024 सकाळी 6=00 वाजता उघडकीस आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वडील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
मौशी येथील अंबादास, पत्नी अल्का वय 40 वर्ष मुली  तेजस्विनी वय 20 वर्ष, प्रणाली वय वर्ष 17  व 
अनिकेत वय 15 असे चार व्यक्ती घरी राहत होते   मोठ्या एका मुलीचे लग्न झाले होते,  वडील अंबादास हा व्यसनाधीन असल्याने नेहमी पत्नीला पैसे मागायचा आणि दारू प्यायचा. घटनेच्या दिवशी वडील यांने हत्या करून सकाळी 5=00 वाजता बाहेर गेला आणि 6 वाजता बाहेरून आला असता आरोपीचा मुलगा  अनिकेत हा वर्ग 10 वीत असल्याने अभ्यास  करुण बाहेर  फिरण्यास गेलेला  होता, घरी आल्यावर हा प्रकार दिसला ,यांने काका नामदेव तलमले याला झालेला प्रकार सांगितला. लगेच आरोपीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी न झाल्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पत्नी व  2 मुली यात एक  12 वी ची परीक्षा देत असल्याचे कळते तर मुलगा 10 वी परीक्षा देत आहे. पत्नी व मुली यांचे घटना स्थळावर पंचनामे करून शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पाठविण्यात आले असून घटना स्थळाला पोलीस अधीक्षक सुदर्शन, अप्पर पो अधीक्षक रीना जनबंधू, उप विभागीय पो अधिकारी  दिनेश ठोसरे , पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी भेट दिली असून आरोपीस अटक करून अपराधक्र 75 /2024 अन्वये गुन्हा दाखल करून कलम 302 भा, द वी प्रमाणे अटक करून पुढील तपास ठाणेदार विजय राठोड करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 3, 2024

PostImage

शासनाच्या स्पर्धेत तुळशी येथिल शिवाजी विद्यालय तिन लाख रुपयांची मानकरी


शासनाच्या स्पर्धेत तुळशी येथिल शिवाजी विद्यालय तिन लाख रुपयांची मानकरी

गडचिरोली:-
 मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधून तुळशी येथिल शिवाजी विद्यालयाने व जिल्हा परिषद व शासकीय शाळा व्यवस्थापनामधून कोंढाळा येथिल जि.प.वरिष्ठ  प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांनी वेगवेगळ्या गटातून  तालुकास्तरावर  प्रथम क्रमांक पटकावला असून सदर शाळा प्रत्येकी तीन लाखांच्या तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ  सुंदर शाळा स्पर्धा जिल्हा परिषद शाळां /शासकीय शाळा  तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळां अशा दोन स्वतंत्र गटात ही  स्पर्धा होती. या स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील सहभागी सर्व शाळांचे केंद्र व तालुका स्तरावर नियुक्त समितीकडून निकषांनुसार मूल्यमापन करण्यात आले होते. तालुक्यातून प्रथम आलेल्या शाळांचे जिल्हा मूल्यांकन समितीने भेट देऊन तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
 विद्यार्थिकेंदित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यावर एकूण ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर एकूण ४० गुण अशा १०० गुणांच्या आधारे या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यात शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग,शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदीं मुद्दे तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने तपासणी करुन गुणदान करण्यात आले.
  तुळशी येथिल शिवाजी विद्यालयात सध्या शाळेत विद्यादानाचे व अध्यापनाचे कार्य करत असलेले शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दुनेदार , शिक्षक कैलाश गजापूरे, दुर्गाप्रसाद चुलपार, नाशीक शेंडे हे चारही शिक्षक ,कर्मचारी कु.आरती दाते, कु.प्रियंका पोवळे, निलकंठ मारबते, संदीप शेंडे,  मिलींद मेश्राम शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी  प्रयत्नशील आहेत. तुळशी ग्रामपंचायतचे सरपंच चक्रधर नाकाडे ,उपसरपंच सुरेश तोंडफोडे, ग्रामपंचायत पदाधिकारी , देसाईगंज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे , आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आनंदराव गुरनुले, गटसमन्वयक संजय कसबे, कुरुड केंद्राचे केंद्रप्रमुख मेघराज बुराडे,विसोरा केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ पिलारे तसेच गट संसाधन केंद्राचे अरविंद घुटके,जितेंद्र पटले ,रामकृष्ण राहंगडाले यांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे


PostImage

Vaingangavarta19

March 3, 2024

PostImage

देवलमारी येथील मंचर्ला परिवारातील तीन घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान, शासनाने करावी तात्काळ मदत


देवलमारी येथील मंचर्ला परिवारातील तीन घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान, शासनाने करावी तात्काळ मदत 
          
अहेरी  :-
 मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी येथील शेखर मुत्तय्या मंचर्ला,संतोष मुत्तय्या मंचर्ला,मुत्तय्या मंचर्ला या तिघांचे घरे व घरातील संपूर्ण साहित्य, कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू  अचानकपणे आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले
यात लाखो रुपयाचे वस्तू जळून खाक झाली आहेत.3 मार्चला रात्री सुमारे तीन सव्वातीन वाजताच्या सुमारास घराला आग लागली त्यावेळी घरातील कुटुंबातील लोक गाढ झोपेत होते आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कुटुंब घराबाहेर निघाले व गावात आरडा ओरडा केले तेव्हा गावातील नागरिकांनाही धाव घेतलीआणि आग नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू केले.

"ह्या"घटनेची माहिती नागरिकांन कडून आविसं - काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगताच अजयभाऊंनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिली.अधिकाऱ्यांनी लगेच अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून आग आटोक्यात आणली.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन.घटनेची माहिती जाणून घेतले आहे.दूरध्वनी वरून घटनेची माहिती उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून मंचर्ला कुटूंबाला शासना कडून मदत करण्यात यावी अशी मागणी केली त्या पिडीत तीन कुटुंबियांना प्रथम अत्यंत घरच्या अत्यावश्यक गरजू वस्तूसाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

जगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी- राजरत्न आंबेडकर


जगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी- राजरत्न आंबेडकर 

देसाईगंज:-
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस  1956  ला बुद्धाच्या धम्माची धम्मदीक्षा दिल्यानंतर आजही आपण जुन्या जातीच्या नावाने दलीत या शब्दात गुरफटून न राहता आता आपली जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
     ते दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया ग्रामशाखा कोंढाळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन संस्था बौद्ध समाज कोंढाळा यांचे वतीने आयोजीत धम्म प्रबोधन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपूरी येथील सामाजीक विचारवंत प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी देखिल उद्घाटनपर मार्गदर्शन केले.
       याप्रसंगी अतिथी म्हणून भन्ते सचित्त बोधी, दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड, उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, महिला महासचिव यशोधरा नंदेश्वर, महिला प्रतिनिधी दर्शना शेंडे, विभागीय संघटक प्रा.सुरेंद्र तावाडे, इंजि. नरेश मेश्राम, गांवच्या सरपंच अपर्णा राउत,  नितीन राऊत, देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे, सल्लागार  अशोक बोदेले, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, उद्धवराव खोब्रागडे, बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हा मुख्य सचिव हंसराज लांडगे, काका गडकरी, राधा नांदगाये, अनिल सोरते,आनंद मेश्राम, रोहीणी सहारे, रमेश रंगारी, नागसेन खोब्रागडे, किशोर साखरे, प्रा.एस.टी.मेश्राम, सुधीर रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते जे.बी.लांडगे, मुकुंदा मेश्राम यांनी विचारमंचावर स्थान भूषविले.
     कार्यक्रमाचा प्रारंभ तथागत बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आले. उपस्थित सर्वांचे सुमधूर स्वागत गीताने महिला व मुलींनी केले. पिवळा पितांबर - त्यात लोकशाहीची जळ... या लेझीम नृत्याने उपस्थितांचे मन आनंदाने भरून गेले. या कार्यक्रमाचे संचलन बुद्धिस्ट सोसायटीच्या विभा उमरे, सुकेशिनी ऊके यांनी, प्रास्ताविक बोद्ध समाजाचे कार्याध्यक्ष नागोराव ऊके तर आभार प्रबोधन संस्थेचे राजेंद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता शेंडे, मंगला शेंडे, तुषार ऊके, प्रशांत मंडपे , रोशन शेंडे, पल्लवी घुटके, प्रज्ञा शेंडे , उत्तरा मेश्राम व बौद्ध समाजाच्या सर्वांनी परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा - रिपब्लिकन पक्षाचे आवाहन


संविधानवादी व धर्मनिरपेक्ष शक्तीं सोबत उभे रहा - रिपब्लिकन पक्षाचे आवाहन

गडचिरोली- आज देशाचे संविधान,लोकशाही व धर्म निरपेक्ष स्वरूप धोक्यात आले असून ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकी मध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केले आहे. 
   पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत  चांदेकर भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी हे आवाहन करण्यात आले.
    रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रदेश सचीव  प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवर, गडचिरोली विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, आरमोरी विधान सभा प्रमुख कृष्णा चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
   या सभेत देशातील सध्याची परिस्थिती आणि जिल्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तथा अल्पसंखांक लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. बेरोजगारी, महागाई सोबतच शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न जटील झाले आहेत परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. गडचिरोली जिल्यातील मौल्यवान वन व खनिज संपत्ती लुटल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगाच्या नावावर बळकावल्या जात आहेत याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले आणि या सर्व प्रश्नांवर व्यापक जनलढा उभारण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष पद्धतीने लढविण्यासाठी ईव्हीएम त्वरित बंद करण्यात याव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 
   संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण हि आजची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.  त्यासाठी आज देशभर मोठे आंदोलन सुरु असून याकामी पुढाकार घेणाऱ्या सर्व संगठना व नेत्यांना  बैठकीत पूर्ण समर्थन जाहीर करण्यात आले. 
   या सभेला साईनाथ गोडबोले,दादाजी धाकडे, अरुण भैसारे, हेमाजीं सहारे, कविता वैद्य यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

 विश्चसुंदरीने दिला चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ व्याघ्र संवर्धनाचा संदेश


 विश्चसुंदरीने दिला चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ व्याघ्र संवर्धनाचा संदेश

वनमंत्री ना.सुधीर मुंनगंटीवार यांच्या पुढाकारातून तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
 

चंद्रपूर :
 ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या. चंद्रपुरातील व्याघ्र संवर्धनाचा मूलमंत्र आपापल्या देशात घेऊन जाण्याचा निर्धार करीत पुन्हा एकदा ताडोबाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकारातून तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन्यजीव सद्भावना दूत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रविना टंडन, विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते. 

ज्युलिया मॉर्ले म्हणाल्या, ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अतिशय सुदंर वाघ आहेत. वाघांना वाचविले तरच आपण आपले पर्यावरण आणि सृष्टीचे भविष्य सुरक्षित करू शकतो.’ वनमंत्री ना .सुधीर मुनगंटीवार यांनी आमंत्रित केल्याबद्दल मॉर्ले यांनी आभार मानले. जमील अजमल सैद्दी म्हणाले, ‘वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहण्याचे सौभाग्य लाभले. ताडोबा एक वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन हेच जीवन आहे, असे मानून आपले भविष्य सुरक्षित करा.’ 
2015 मधील ‘मिस इंडीया’ नवीनी देशमुख म्हणाल्या, ‘वाघ हे दुर्गामातेचे वाहन आहे. वाघ धैर्याचे प्रतिक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाले म्हणून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. विश्वसुंदरी स्पर्धेतील कॅरोलिना व्हेरिस्का म्हणाल्या, ‘वाघांचे संरक्षण या प्रकल्पाबद्दल ऐकून खूप आनंद झाला. येथे कुटुंबासह वाघ बघण्याचा योग आला. वाघ हा सृष्टीच्या जीवनचक्राचा महत्वाचा भाग आहे. सन 2021 आणि 2022 मधील मिस इंडिया सिनी शेट्टी म्हणाल्या, चंद्रपुरात येऊन आज अतिशय आनंद झाला. वाघांचे संरक्षण या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.’ ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टिन लाइज यांनी ‘सेव्ह द टायगर प्रोजेक्ट’ ही अतिशय महत्वाची आणि तेवढीच सुंदर संकल्पना असल्याचे म्हटले. इंग्लडच्या जेसिका म्हणाल्या, ‘येथे येऊन स्वत:ला भाग्यशाली समजत आहे. या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनू शकलो, याचा आनंद आहे. स्पेनच्या पोला म्हणाल्या, वाघ हे धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे. जैवविविधतेसाठी वाघ महत्वाचा घटक असून अशा उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण होईल.


PostImage

Vaingangavarta19

March 2, 2024

PostImage

एस.टी.ने घेतला पेट मात्र गाडीत अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने विझविली आग


एस.टी.ने घेतला पेट मात्र गाडीत अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने विझविली आग

 

आष्टी :-
एस टी ने घेतला पेट मात्र अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने आग विझविली हि घटना मुलचेरा - घोट मार्गावर भर जंगलात घडली प्रसंगावधान राखून प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.
गडचिरोली  जिल्हयात अगोदरच एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आणखी एक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास घोट जवळील निकतवाडा गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाश्यांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली.त्यानंतर वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले होते.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची एसटी बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्रो मुक्कामाणे असते ती बस दररोज पहाटे ६ वाजता मुलचेरा वरून घोट-चामोर्शी भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते.शुक्रवार (१ मार्च) रोजी एम एच- ०७ सी-९३१६ क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे पहाटे ६ वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती.घोट पासून 3 किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बस मध्ये असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातळीने बसमधून खाली उतरले. जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती समोर येत असून सर्वजण सुखरूप आहेत.

एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटऱ्यामध्ये शार्ट सर्कीटने आग लागत असल्याने प्रसंगावधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाश्यांना खाली उतावरले आणि स्वतःही आपला सामानसुमान घेऊन खाली उतरले.त्यानंतर लगेच बसने पेट घेतला.या बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले.तर चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसवर दारमदार असल्याने बस मध्ये तांत्रिक बिघाड होणे,भर रस्त्यावर बस बंद पडणे,आग लागणे अश्या घटना हे नित्याचेच झाले आहे.शुक्रवारी सकाळच्या सुमारास तर बसने पेट घेतल्याने प्रवासी चांगलेच भयभीत होऊन धाव घेतली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापक राखडे यांना विचारले असता बसमध्ये असलेल्या बॅटऱ्या जळाले असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 1, 2024

PostImage

कर्दूळ येथील पोलिस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना  सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांचेकडून गोळा भेट


कर्दूळ येथील पोलिस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना 

सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांचेकडून गोळा भेट

 

 

घोट:- कर्दूळ या गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रशिक्षणाकरीता मदत व्हावी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक नितेश गोहणे यांनी गोळा भेट देण्यात आला 

 पोलीस मदत केंद्र घोट येथील प्रभारी अधिकारी हे नेहमीच परिसरातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी , समस्या समजून घेऊन विद्यार्थ्यांकरिता विविध रचनात्मक उपक्रम, मार्गदर्शन कार्यक्रम राबवत असतात. 

 काही दिवसापूर्वी कर्दूळ या गावातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विध्यार्थ्यानी पोलीस मदत केंद्र घोट चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांना भेटुन पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी गोळा नसल्याबाबत अडचण मांडली तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना पाहिजे असलेला गोळा गडचिरोली येथून विकत मागितला व काल दिनांक 26/02/2024 रोजी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराकरिता 01 गोळा भेट म्हणून देण्यात आला व गोळा फेक मैदान सुद्धा तयार करून देण्यात आले.

 कर्दूळ गावातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या उमेदवार यांना पोमके घोट कडून गोळा व गोलाफेक मैदान तयार करून दिल्याने तेथील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच गडचिरोली पोलीस दलाचे व प्रभारी अधिकारी सपोनि नितेश गोहणे यांचे मनापासून आभार मानले व वेळोवेळी अशीच मदत व मार्गदर्शन करावे असे उपस्थित विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2024

PostImage

अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी, सतर्क पोलिसांनी दाखविला इंगा


अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी, सतर्क पोलिसांनी दाखविला इंगा

तिन बैलब़डी व अवैध विदेशी दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त 


गडचिरोली:- अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी मात्र सतर्क पोलिसांनी दाखविला आपला इ़गा व बैलगाडी सह अवैध दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलबंडीांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन  आले आहे  दिनांक 27/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले. 
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणा­ऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणा­ऱ्या तीन बैलबंडी व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलबंडी मध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.  सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाडी व ईतर साहित्य 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2024

PostImage

धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शनडचिरोलीतून 400 भाविक रवाना


धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत आयोध्या दर्शनडचिरोलीतून 400 भाविक रवाना

गडचिरोली, 28 फेब्रुवारी
रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर ठिकठिकाणाहून भाविक प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरीता आयोध्येत दाखल होत आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविकांना इच्छा असूनही आयोध्येत जाता आले नाही. या भाविकांसाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सहकार्याने मोफत अयोध्या दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 400 भाविक आज अयोध्येकडे रवाना झाले असून ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी या भाविकांसाठी 10 बसेसची मोफत व्यवस्था केली. आज सकाळी या बसेस भाविकांना घेऊन अयोध्येकडे निघाले आहेत. भाविकांसाठी मोफत बसेसची व्यवस्था केल्याने त्यांनी यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांचे आभारही व्यक्त केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगीतल्या जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2024

PostImage

उद्योगाकरिता शेतजमिनी देण्यास चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा नकार


उद्योगाकरिता शेतजमिनी देण्यास चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा नकार

शेतजमिनी मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी पाठवले वापस

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन हस्तगत करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी रिकाम्या हाताने पाठवले आहे 
उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे  विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे,असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता’ प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोली (चक) २, जयरामपूर, पारडी (देव), सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली (तुकुम) या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे सुपीक असलेली शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाहीत. याविरोधात एकत्र येत या गावातील शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले होते.
गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोली (चक) नं २ गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही गावात येऊ नये असे फलक लावण्यात आले आहेत वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचं कसं असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती उद्योगासाठी अधिग्रहित करण्यात येत आहे त्यामुळे  परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता वेदराज पिंपळकर आणि सुनील गौरकार म्हणाले की, आमच्या दोन पिढ्या या शेतीवर मोठ्या झाल्या. मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ ,घर सांभाळून पुन्हा शेतीकरिता मिळकत शिल्लक ठेवणे हे सगळे या शेतीच्या बळावर झाले. सिंचनाच्या सोयीमुळे येथील शेतजमीन सुपीक आहे. त्यामुळे आम्ही शेतीतून १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न काढत असतो कंम्पणीला जमिनी दिल्या तर नाममात्र वेतनावर काम करीत राहावे लागते

सूरजागड टेकडीवर उत्खनन करणाऱ्या लॉयडस मेटल्स कंपनीचा कारखाना कोनसरी येथे उभा उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले आहे. सोबतच जिंदाल, मित्तल, सूरजागड इस्पात सारख्या कंपन्यांनी १ लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पण यासाठी जमीन कुठून आणणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात ७५ टक्के जंगल आहे. खासगी भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. एवढेच गरजेचे असेल तर शासनाने कायद्यात बदल करून वनजमिन उद्योगांसाठी द्यावी असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2024

PostImage

एस टी बसेस चा तुटवडा असलेल्या आगारातून  पंतप्रधानाच्या सभेसाठी पाठविल्या एस टी .बसेस


एस टी बसेस चा तुटवडा असलेल्या आगारातून 
पंतप्रधानाच्या सभेसाठी पाठविल्या एस टी .बसेस

 

प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे 

गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध आगारातून बसेस पाठविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून देखील तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने बसेसचा तुटवडा निर्माण झाला. वेळेवर बस सेवा नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तासंतास ताटकळत प्रतिक्षा करावी लागत आहे. अगोदरच अहेरी आगारात नियमित बससेवा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशात मोदींच्या कार्यक्रमासाठी येथील १० बसेस यवतमाळला पाठविल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

अहेरी आगारात मागील अनेक वर्षापासून नवीन बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. या भागातील रस्ते अन् भर रस्त्यावर बसेसमध्ये होणारी बिघाड यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. अहेरी ते सिरोंचा १०७ किलोमीटरचा अंतर असलेल्या या मार्गावर मागील काही वर्षापासून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे अन् एसटी महामंडळात असलेल्या बसची कमतरता यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशात मंगळावर (२७ फेब्रुवारी) रोजी अहेरी आगारातून सिरोंचा साठी सकाळच्या सुमारास केवळ एक बस सोडण्यात आली.

जवळपास ८ वाजेपासून सिरोंचासाठी एकही बस नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना जवळपास ५ तास ताटकळत प्रतिक्षा करावी लागली. अखेर दुपारी १ वाजताच्या सुमारास अहेरी - सिरोंचा बस आलापल्ली बस स्थानकात दाखल झाली. मात्र ती बस अगोदरच फुल्ल भरून आल्याने येथील प्रवाशांना नाईलाजास्तव भरगच्च भरलेल्या बसमधून उभ्यानेच प्रवास करावा लागला. उन्हाळ्याचे दिवस असून वयोवृद्ध, लहान मुलांना याचा चांगलाच फटका बसला होता. अगोदरच तब्बल ५ तास प्रतिक्षा केल्यावर येथील प्रवाशांना पुन्हा तब्बल ४ ते ५ तास उभ्याने प्रवास करण्याची नामुष्की ओढवली होती.

विशेष म्हणजे वाहकाला तिकीट देण्यासाठी जागा नव्हती. वाहक चक्क प्रवाशांच्या डोक्यावरून बसमध्ये ये-जा करत उभं असलेल्या प्रवाशांना मागे करत होता. यावरून भर उन्हाळ्यात प्रवाशांचे काय हाल सुरू आहे, याची प्रचिती येते. प्राप्त माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यवतमाळ - नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांसाठी गावातच बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रत्येक आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस पाठविण्यात आले असून अहेरी आगारातून देखील १० बस पाठविल्या आहेत. एकीकडे नेत्यांचा कार्यक्रमासाठी तामजाम केली जात आहे तर दुसरीकडे बसेस अभावी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभर विविध मार्गावरील प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसला होता. तर सिरोंचा मार्गावरील सर्वात जास्त प्रवासी बस स्थानक परिसरात आढळून आले. एसटी महामंडळाविषयी प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2024

PostImage

जिल्ह्यातील महाशिवरात्री भरणाऱ्या यात्रेत भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी संजय मीणा


जिल्ह्यातील महाशिवरात्री भरणाऱ्या यात्रेत भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी संजय मीणा

 


गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी निर्देश दिले आहेत महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज दिल्या.

जिल्ह्यात मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र, चपराळा देवस्थान, महादेव डोंगरी यासह विविध ठिकाणी महाशिवरात्री निमित्त 8 मार्चपासून यात्रा प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजना संदर्भात श्री संजय मीणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी ओंकार पवार, विवेक सांळुके, उत्तम तोडसाम, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार तसेच मार्कडा, चपराळा व पळसगाव येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यात्रेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, धर्मशाळेची दुरुस्ती, औषधाचा पुरेसा साठा व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता, पथदिवे, अखंडित विद्युत पुरवठा, मोबाईल शौचालयाची व्यवस्था, भाविकांसाठी पुरेशा बसेस, अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका आदी आवश्यक सोयी सुविधा भाविकांसाठी सुसज्ज ठेवण्याचे व संबंधित विभागाला नेमून दिलेले कामे व्यवस्थितपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मीणा यांनी दिले. तसेच यात्रेदरम्याने दुर्घटना घडू नये यासाठी संबंधीतांना गॅस सिलेंडर वापरण्यास मनाई करण्याच्या सूचना देण्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून यात्रेसाठी अतिरिक्त सुविधेच्या आवश्यकतेबाबत विचारणा करून माहिती जाणून घेतली. चपराळा येथे पाण्याची मोटर, मार्कंडा येथे पोलिस बचाव पथकाला बोट व आवश्यक तेथे दुरुस्ती व डागडुजी आदी बाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2024

PostImage

महाराष्ट्र शासनाच्या सहा लाख बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक


महाराष्ट्र शासनाच्या सहा लाख बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

गडचिरोली:- महाराष्ट्र शासनाच्या सहा लाख रुपये बक्षीस असणाऱ्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने जेरबंद केले आहे 
माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल दिनांक 25/02/2024 रोजी अटक केले.

काल दिनांक 25/02/2024 रोजी मागील वर्षी माहे एप्रिल 2023 मध्ये

मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. 37/2023 कलम 307, 353, 143, 147, 148, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25, 5/28, 8/27 भाहका, 3, 4 भास्फोका, 13, 16, 18 (अ), 20 बे. कृ. प्र. अधिनियम मधील आरोपी जहाल महिला माओवादी नामे राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय 30 वर्षे, रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) हिला गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून अटक केली.

अधिक तपासात असे दिसून आले की, दिनांक 30/04/2023 रोजी

मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता ज्यामध्ये 03 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. तसेच पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिला सदर चकमकीच्या अनुषंगाने दाखल पोस्टे तोयनार येथे दाखल अप. क्र. 05/2018 कलम 307, 147, 148, 149, भादंवि. सहकलम 25, 27 भाहका मध्ये सन 2019 मध्ये अटक करण्यात आली होती.

△ अटक जहाल महिला माओवाद्याबाबत माहिती नामे राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा * दलममधील कार्यकाळ

सन 2006 साली चेतना नाट मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली. सन 2010-11 साली चेतना नाट मंचामध्ये उप-कमांडर या पदावर

पदोन्नती झाली.

सन 2016 साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.

सन 2019 साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.

सन 2020 मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.

A8 कार्यकाळात केलेले गुन्हे

* चकमक 04

* सन 2016 मध्ये मौजा करेंमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* सन 2016 मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल

परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* सन 2018 मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात

पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* सन 2023 मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

* शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

8 महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर 6 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 73 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता ,अपर पोलीस अधीक्षक अहेरी  एम. रमेश  यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 26, 2024

PostImage

देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 


देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 
    
 आजपासून मागण्या मंजुर होईपर्यत श्याम मस्के  पाटलांचे उपोषण सुरु 

देसाईगंज:- येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला व आपल्या मागण्यांचे निवेदन रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले तद्वतच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्याम म्हस्के पाटलांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे 
 मागिल १५ दिवसांपुर्वी शेतकऱ्यांना रब्बी पिकाला सुरळित पाणिपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्राच्या उर्जामंञ्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे १२ तास कृषी पंपांना विजपुरवठ्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे ते पुर्ण करावे यासाठी देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपधारकांनी आंदोलन उभारले होते तेव्हा स्थानिक आमदारांनी चर्चा करुन ३ दिवसात आरमोरी विधानसभा क्षेञासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरळित विज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली परंतू तब्बल १५ दिवस उलटुनही विजपुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने पिक धोक्यात आल्याने शेकडो भुमिपुञांनी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंज च्या  उपविभागिय कार्यालयावर मोर्चा च्या माध्यमातून धडक दिली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाची सुरुवात कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी केली              निसर्गाशी नेहमीच दोन हात करित शेतकरी शेतात पिक उभारत असतो आपल्या कुटुंबाच्या पोटाची खडगी भागविण्यासाठी कधी तुडतुडा, कधी रानटी जनावरांच्या हैदोषांवर मात करीत शेतकरी शेतात पिक उभे करतो  कालव्याच्या सिंचनाची सोय नसलेले शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातुन रब्बी पिकाची लागवड करतात मागिल दोन वर्षापासुन देसाईगंज तालुक्यात कृषिपंपांना विजपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला असून सुरळित पाणिपुरवठा होत नसल्याने धान पिक धोक्यात येवुन करपण्याच्या मार्गावर लागले आहे या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी १५ दिवसापुर्वी रामदास मसराम यांनी शेकडो शेतकऱ्याना सोबत घेवुन देसाईगंज च्या विद्युत विभागाच्या कार्यालयाला घेराव केल्याने शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तथा उर्जामंञी देवेंन्द्र फडणविस यांच्याशी चर्चा करुन तिन दिवसात संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातिल कृषीपंपधारक शेतकऱ्यांना १२ तास सुरळित विजपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली माञ १५ दिवस उलटुनही विद्युत विभागाकडुन कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही सद्या रब्बी पिकांच्या रोवणी चे काम जोरात सुरु असुन कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या शेतात माञ भेगा पडल्या असुन धान पिक धोक्यात आल्याने भुमिपुञ असलेल्या रामदास मसराम यांच्या नेतृत्वात चोप कोरेगांव बोडधा, शंकरपुर, विहिरगांव, किन्हाळा, मोहटोला आणि देसाईगंज तालुक्यातिल सर्वच कृषिपंपधारक शेकडो  शेतकऱ्यानी उपविभागिय कार्यालयावर मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन उभारले एवढेच नव्हे तर कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी कार्यालयाच्या सामोर शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे शासनासमोर आव्हान उभे करुन आजपासुनच आमरण उपोषनाला सुरुवात केली   

    निवेदन सादर करतांना रामदास मसराम म्हणाले की  उर्जा मंञ्यांनी दिलेल्या १२ तास कृषी पंपांना सुरळित विद्युत पुरवठ्याच्या आश्वासना नुसारच शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली १५ दिवस उलटुनही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शासन व प्रशासन गांभिर्याने विचार करत नाही पिक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल होईल  आत्महत्येचे प्रमाण वाढतिल शेतकऱ्यांना आर्थिक अडचणिंचा सामना करावा लागेल यासाठी उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना २४ तास विजपुरवठ्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी शासकिय धान खरेदी केन्द्रावर हेक्टरी ५० क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात यावा आधारभूत धान खरेदी ३५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामिण भागात विज पुरवठा करणाऱ्या शंकरपुर पॉवर ट्रान्सफार्मर वर ५ एमव्हिए ऐवजी १५ एमव्हिए चा ट्रान्सफार्मर लावण्यात यावा या सर्व मागण्या पुर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोरेगांव चे श्याम मस्के पाटिल यांनी आमरण उपोषण सुरु केले असुन शासन व प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा शेतकऱ्यांच्या संयमाचा सत्ताधाऱ्यांनी अंत पाहु नये असा सज्जड इशारा या प्रसंगी रामदास मसराम यांनी दिला आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2024

PostImage

अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम 1 मार्च पासून पूर्ववत सुरु होणार


अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम 1 मार्च पासून पूर्ववत सुरु होणार

 प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर  उपोषणाची सांगता


गडचिरोली:-
अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने  मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम १ मार्च पासून सुरू होणार असून मुर्लीधर महाराज याचे उपोषण वडेट्टीवार यांनी निंबुपाणी पाजून मागे घेण्यास भाग पाडले आहे 
गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराची पुनर्बांधणीच्या नावावर तेथील दगडांची उकल करण्यात आली होती. याला एक दशकाचा काळ उलटला असतानाही प्रशासन व पुरातन विभागाने काना डोळा केला. या मंदिराचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याची मागणी घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोली येथे मोठे जण आंदोलन करून मार्कंडा येथे  उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाच्या या दुर्लक्षित धोरणाविरुद्ध मंदिराच्या दुरावस्थेला जबाबदार लोकप्रतिनिधी प्रशासन व पुरातत्व विभागाला खडे बोल सुनावले होते. आज उपोषणाच्या नवव्या दिवशी पुरातत्त्व विभागाने महसूल प्रशासन करवी येत्या 1 मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणकर्ते संत मुरलीधर महाराज व प्रशासन यांच्या मध्यस्थी करून उपोषणाची सांगता केली.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे गेल्या हजारो वर्षांपूर्वी चे पुरातन काळातील हेमाडपंथी शिव मंदिर आहे. जशी काशी येथे गंगा नदी उत्तर वाहिनी होते तशीच मार्कंडा देव येथे वैनगंगा नदी ही उत्तर वाहिनी होते. यामुळे या सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे प्रचंड मोठी अशी यात्राही भरते. मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी सदर पुरातन हेमाडपंथी मंदिराची पुनर्बांधणी करणे नियोजनार्थं स्थानिक लोकप्रतिनिधी व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मोठा गाजावाजा करून या मंदिराची दगडे उकलून अडगळीत पाडून ठेवत अर्धवट काम केल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. भाविकांची प्रचंड श्रद्धा असलेल्या शिव मंदिराच्या पुनर्बांधणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी शिव मंदिराच्या अर्धवट बांधकाम संदर्भात दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी गडचिरोली येथे जन आंदोलन करून मार्कंडा देवस्थान येथे  उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंदिराच्या दुरावस्याथे बाबत गंभीर दखल घेऊन प्रशासनाला व पुरातत्त्व विभागाला प्रसिद्धी मध्यामातून सज्जड इशारा दिला होता.तर आज उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता स्थानिक तहसीलदार प्रशांत घरुडे, पोलीस निरीक्षक चामोर्शी, जन आंदोलन व उपोषण समितीचे पदाधिकारी  यांच्याकडून परिस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी गडचिरोली व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून उपोषणाची गांभीर्य पटवून दिले व मंदिराच्या दुरवस्थेबाबत कळवून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सांगितले. विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांच्या मध्यस्थीनंतर यावर पुरातत्व विभागाने महसूल विभागा करवी उपोषण कर्ते मुरलीधर महाराज यांना लेखी पत्र देऊन येत्या एक मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल असे पत्र देताच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते निंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनु. जमाती प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा अध्यक्ष हसन गिलानी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकड्यालवार, नंदाताई कोडवते, कवडूजी कुंदावार , सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते, उपोषण समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

 आश्वासन पाळा... अन्यथा मोठे आंदोलन

मंदिराची पुनर्बांधणीचा गाजावाजा करत मार्कंडेश्वर मंदिराची दुरावस्था करण्यात आली.याला एक दशकाचा काळ लोटला असून एका संताला मंदिराच्या दुरुस्तीसाठी उपोषणाला बसावे लागले.ही फार मोठी खेदाची बाब आहे.तर देशाच्या ईतर मंदिरासाठी कोट्यावधींचा खर्च करणाऱ्या सरकारने या मार्कंडेश्वर मंदिराला निधी दिला पाहिजे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी हे या सर्वस्वी जबाबदार आहेत.तर आज पुरातत्त्व विभागाच्या वतीने महसूल प्रशासन हातून लेखी आश्वासन देत येत्या 1 मार्च पासून मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे बाबत आश्वासन दिले. तर दिलेल्या तारखेस काम सुरू न झाल्यास मुरलीधर महाराज यांच्या सोबत,प्रचंड भाविक व नागरिकांच्या उपस्थितीत विशाल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.

 तर मंदिरात उपोषणास बसणार.

प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. यामुळे आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शब्दावर मी अन्नत्याग उपोषण मागे घेत आहे. प्रशासनाने मंदिर बांधकामास दिरंगाई केल्यास चक्क मंदिरातच उपोषणास बसणार असे संत मुरलीधर महाराज यांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2024

PostImage

शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे ् -प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले


शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे
् -प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले 


चामोर्शी :-
 शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात  विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाकरिता शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वृद्धिंगत करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावलेल्या आहेत .विद्यार्थी हा व्यावसायिक झाला पाहिजे .त्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारांचा अभ्यास करुन शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पडावे असे प्रतिपादन  प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर्फे चामोर्शी येथील गटसाधन केंद्रामध्ये आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून गट समनवयक चांगदेव सोरते , संजय कुनघाडकर , राकेश इनकते , हेमंत पेटकर , शिवराम मोगरकर , प्रमोद भांडारकर , अशोक गजभिये , विवेक केमेकर आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चांगदेव सोरते म्हणाले अध्यापन करतांना विविध साधनांचा वापर करा.विद्यार्थी हा कृतिशील असला पाहिजे.मुलांमध्ये  आत्मविश्वास निर्माण करा.आणि मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील असावे असे मत व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आठवी ते बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे  सर्वसमावेशक प्रशिक्षण गटसाधन केंद्र चामोर्शी येथे २२ ते २४ फेब्रुवारी पर्यंत आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला चामोर्शी तालुक्यातील सरकारी व खाजगी शाळेतील एकूण ८० शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थी  मुख्याध्यापक पालांदूरकर , सुधीर फरकाडे , रुचिता बंडावार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन तज्ञ मार्गदर्शक हेमंत पेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना नेरकर यांनी केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2024

PostImage

तरुणांमध्ये संस्कार,गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे: राजे अम्ब्रिशराव आत्राम


तरुणांमध्ये संस्कार,गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे: राजे अम्ब्रिशराव आत्राम

 

आलदंडी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

 

अहेरी:- देशाची भावी पिढी अर्थात आजचे तरुण ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.ते आलदंडी येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी सहउद्घाटक म्हणून युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,तर प्रमुख पाहुणे प्रशांत ढोंगे,कारे आत्राम गाव पाटील,मासू गावडे,पेडू गावडे,शंकर कुंभारे,सुनील कांबडे,संजय सडमेक,रागेंद्र इष्टाम ग्रा.पं.सदस्य पेरिमिली ,सुधाकर दुर्गे ग्रा.पं.सदस्य पेरिमिली, महेश मडावी,राजेंद्र मडावी,तिरुपती कोसरे,सुरज मलिक,महेश हजारे,उमेश चांदेकर,सचिन सिद्धमशेट्टीवार, पंकज एगलोपवार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना युवक हे देशाचे आधारस्तंभ असून युवक सुदृढ राहण्यासाठी आरोग्य हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी दैनंदिन व्यायाम आणि विविध खेळ खेळणे महत्त्वाचे आहे.पूर्वी तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जायचे.तिथे ग्रामीण भागातील मोजके खेळाडूंना संधी मिळायची.मात्र,आता प्रत्येक खेड्यापाड्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.त्यामुळे प्रत्येक गरीब तरुणांना देखील आपल्या मधील क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे,ही आनंदाची बाब आहे. आलदंडी सारख्या दुर्गम भागात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घेतला. असाच प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.त्यासाठी वाटेल ती मदत देण्यासाठी मी तत्पर असल्याचे देखील त्यांनी ग्वाही दिली.

दरम्यान पाहुण्यांचा गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी मंडळाचे सदस्य,परिसरातील नागरिक व कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2024

PostImage

पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापक यांना निरोप तथा सत्कार समारंभ 


पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापक यांना निरोप तथा सत्कार समारंभ 

लगाम:-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम मुख्याध्यापक दिलीप बारसागडे , उच्च श्रेणी मुख्याध्यापक कोसे  बोंदागुडम यांची पद्दोन्नती झाल्याने निरोप  तथा सत्कार समारंभ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम येथे शाळा व्यवस्थापन समिती लगाम व ग्राम पंचायत लगाम, जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेदिकाताई गणलावार ,प्रमुख अतिथी म्हणून  गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे मुलचेरा हे होते, यावेळी सत्कार मुर्तीचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रम प्रसंगीं  गटशिक्षणाधिकारी मुलचेरा यांनी सत्कार मुर्तीच्या कामाचे कौतुक केले व पुढील काळात उत्कृष्ट कार्य करण्यास शुभेच्छा दिल्या, कार्यक्रम प्रसंगीं लगाम केंद्राचे केंद्रप्रमुख  कोमरेवार, लगाम शाळेचे मुख्याध्यापक  समुद्रालवार , लगाम ग्रामपंचायत चे सरपंच  दिपक मडावी, उपसरपंच  मधुकर  गेडाम  व सचीव राकेश दुर्गे , यांनी आपले मते प्रकट केली अतिथी म्हणून  श्रीकोंडावार  गटसमन्वयक मुलचेरा फुलोरा समन्वयक महेश मडावी, दिवाकर मादेशी, तंटामुक्ती समिती लगाम चे अध्यक्ष  क्रिष्णा गावडे व पो. पा. गिरमा मडावी आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचलन  किशोर कोंडावार  तर आभार प्रदर्शन नागपुरवार यांनी केले. 
कार्यक्रमचे यशस्वीतेसाठी अशोक दुर्गे  व  सौ.दाहगावकर , बंडावार, सुरेश मडावी , अशोक दुर्गे ,  शिवराम मडावी  यांनी परिश्रम घेतले  या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती लगाम चे सर्व सदस्य, , ग्रामपंचायत चे सदस्य व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2024

PostImage

इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल सुभाषग्राम येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप


 इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल सुभाषग्राम येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे सावित्री च्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले
इंदिरा गांधी मेमोरियल हॉयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम येथे सत्र २०२३-२४ करिता मानव विकास मिशन अंतर्गत शालेय शिक्षणासाठी बाहेर गावावरुन ये - जा  करणाऱ्या विद्यार्थीनी करिता वेळेवर ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत उपस्थित होता यावे यासाठी इयत्ता ८ वी ते १२ च्या २७ विद्यार्थींना नुकतेच सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती आकुलीताई बिस्वास,माजी सरपंच सतीश रॉय, प्राचार्य बेपारी ,शाळा समिती उपाध्यक्ष निताई विश्वास,पालक संघ सदस्य कालिदास दास आदिंसह शाळेचे शिक्षक वृंद  शिक्षकेतर कर्मचारी , व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

 "भिडे वाडा बोलला" राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन


 

 "भिडे वाडा बोलला" राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन

 देश विदेशातील कवींचा असणार सहभाग

पुणे, दि. २२ (प्रतिनिधी) पुण्यातील भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान, स्त्री मुक्ती चळवळीचा जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे. हा विषय घेऊन 'भिडे वाडा बोलला' या सुप्रसिद्ध कवितेचे कवी  प्राथमिक शिक्षक विजय वडवेराव यांनी भिडे वाडा बोलला या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भारतातीलच नव्हे तर विदेशातील कवी देखील सहभागी होणार आहेत. विदेशातून आतापासूनच कवितांचा ओघ सुरू झाला आहे.
     महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८ साली पुण्यात बुधवार पेठ येथील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत शिकवायला फातिमाबी शेख या सुध्दा सावित्रीबाईंसोबत सहकारी स्त्री शिक्षिका होत्या. आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांनी या शाळेसाठी महात्मा फुले यांना संरक्षण पुरवले होते. अशा स्त्री शिक्षणाच्या उगम स्थानाची, बहुजनांच्या ऐतिहासिक प्रेरणा स्थळाची जी इतकी वर्षे दुरावस्था होती,
तेव्हापासून ते आता भिडे वाड्याचे होऊ घातलेले भव्य राष्ट्रीय स्मारक इथवर भिडे वाड्याचा आत्मकथनपर प्रवास या रचनेत अपेक्षित आहे.
भिडे वाडा ( देशातील मुलींची पहिली शाळा) स्त्री शिक्षणाचे उगमस्थान , स्त्री मुक्ती चळवळीचा आशय केंद्रबिंदू असलेली रचना असावी.
स्पर्धेसाठी कसल्याही प्रकारचे प्रवेश मूल्य नसल्याचे आयोजकांनी सांगितले.
अक्षरछंद, वृत्तबद्ध कविता, गजल, पोवाडा, भारुड, मुक्तछंद अशा कोणत्याही काव्य प्रकारात ही रचना लिहिता येऊ शकेल. कवितेसाठी ५० ओळींची मर्यादा दिलेली आहे. संपूर्ण भारतातून (भारता  बाहेरीलही) कोणत्याही वयोगटाची व्यक्ती या राष्ट्रीय काव्य स्पर्धेत भाग घेऊ शकते. फक्त रचना स्वरचित असावी.
स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम तारीख १ मार्च २०२४ अशी आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला पाच हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. तर द्वितीय क्रमांकाला तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक तर तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके १० आहेत. प्रत्येकी एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह , शाल, पुस्तक असे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि.३१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे सायं. ५ वाजता होणार आहे.
भिडे वाड्या सारख्या देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान असलेल्या, स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्र बिंदू असलेल्या ऐतिहासिक वास्तूबद्दल , महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख , वस्ताद लहुजी साळवे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल लोकांनी माहिती शोधावी, वाचन करावे, अभ्यास करावा व आशयघन लेखन करावे या एकमेव उद्देशाने या राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केल्याचे
आयोजक विजय वडवेराव  यांनी सांगितले.
सुरुवातीला ही काव्य लेखन स्पर्धा राज्यस्तरीय ठेवली होती पण महाराष्ट्राबाहेरील गोवा, कर्नाटक, गुजरात, या राज्यातून, सिल्वासा येथून कवींनी संपर्क साधून काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवून या स्पर्धेसाठी आपल्या रचना पाठवल्याने या स्पर्धेचे स्वरूप आपोआपच राष्ट्रीय झाले. स्पर्धेसाठी भारताबाहेरील इतर देशांतूनही कविता येण्याची शक्यता असल्याने ही काव्य लेखन स्पर्धा आंतरराष्ट्रीय होऊ शकते 
स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम मुदत १ मार्च २०२४ पर्यंत आहे.
 आलेल्या कवितांमधून काही निवडक कवितांचा *भिडे वाडा बोलला* या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात  समावेश करणार असल्याचे काव्य संग्रहाचे संपादक व स्पर्धेचे आयोजक प्राथमिक शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आपली रचना विजय वडवेराव यांच्या 9021097448 या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा vijaywadverao@gmail.com या मेल आयडीवर
दि. १ मार्च २०२४ पर्यंत पाठवावी, असे आवाहन आयोजक कवी विजय वडवेराव यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

युवा पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करावेत:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


युवा पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करावेत:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

गडचिरोली:- 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारामध्ये भारतीय लोकशाहीची बीजे रोवली होती. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच होती. निष्पक्ष, निरपेक्ष राज्यपद्धतीतून त्यांनी राज्यकारभार केला असल्याचे सांगत आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत,अशी अपेक्षा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व्यक्त केली.

गुरुवार (२२ फेब्रुवारी) रोजी शिवजन्मोत्सव समिती टायगर ग्रुप देसाईगंज (वडसा) तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य जाहीर व्याख्यान कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी आमदार कृष्णा गजबे,पद्मश्री डॉ परशुराम खुणे, युवानेते अवधेशराव आत्राम,सुप्रसिद्ध युवा व्याख्याते,समाज प्रबोधनकार सोपान कानेरकर महाराज,डॉ.नामदेव किरसान,आकाश अग्रवाल,गणेश फाफट,रामदास मसराम,विक्की बाबू रामाणी,शालू दंडवते,प्रिन्स अरोरा, मोहन वैद्य आणि अतुल डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश पुढे चालला आहे.येणाऱ्या काळात भारत देश इतर देशांच्या तुलनेत बरोबरी करणार अशी आशा आहे. मात्र,त्यासाठी युवा पिढीला सुद्धा पुढाकार घ्यावा लागणार आहे. देशाचे भविष्य हे युवा पिढीच्या खांद्यावर आहे.त्यामुळे तुम्ही शिवरायांनी सांगितलेल्या मार्गावर चला असे आवाहन देखील त्यांनी केले. टायगर ग्रुपच्या या कार्यक्रमामुळे वडसा शहरात परत एकदा येण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.यापुढे देखील प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. दरम्यान शहरात आगमन होताच टायगर ग्रुप तर्फे त्यांचे जंगी स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात आमदार कृष्णा गजबेसह इतर मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.तर युवा व्याख्याते,समाज प्रबोधनकार सोपान दादा कानेरकर आपल्या प्रबोधनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व युवा व्याख्याते सोपान कानेरकर महाराज सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते हे विशेष.त्यामुळे हजारो नागरिकांची उपस्थिती होती.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

शासनाकडून पुरवठा न होताही अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप झालेच कसे


शासनाकडून पुरवठा न होताही अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप झालेच कसे?


जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी पुरवठा निरीक्षक व  गोदाम व्यवस्थापक यांना बजावले कारणे दाखवा नोटीस

गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्फत शासकीय योजना अंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात येणार होते परंतू गडचिरोली जिल्ह्यात पुरवठा न होताच  अहेरी तालुक्यात साड्या वाटप केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी पुरवठा निरीक्षक आडेपवार व गोदाम व्यवस्थापक ताकवाले यांना तहसीलदार अहेरी यांच्या मार्फत २०/०२/२०२४ ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

कॅप्टिव्ह  मार्केट योजने अंतर्गत  अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दरवर्षी साडीचे वाटप करण्यात यावे यासाठी  यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्त  करण्यात आली असून जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील एका महिला सदस्यांना साडी चे नियतन मंजूर झालेले आहे 
मात्र या जिल्ह्याकरीता साड्यांचा पुरवठा करण्यातच आलेला नाही
तरीसुद्धा अहेरी तालुक्यातील  कार्डधारकांना AePDS ऑनलाईन प्रणालीवर  ५६३ साड्यांचे वाटप केल्याचे दिसून येते आहे 
गडचिरोली जिल्ह्यात साड्यांचा पुरवठा झलेला नसताना  अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी साड्यांचे वाटप कुठून केले  व साड्याचा ऑनलाईन स्टाक कसाकाय उपलब्ध करून देण्यात आला आहे  आपल्या स्तरावरुन साड्यांचे वाटप झालेच कसे व साड्यांची रक्कम वसुल करण्याचे शासनाचे  निर्देश प्राप्त झाल्यास  आपणाकडून ५६३ साड्यांचे पैसे वसूल का करण्यात येऊ नये  या करिता नोटीस मिळाल्यानंतर २४ तासाचे आत खुलासा करावा  अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम १९७९  चे तरतुदीनुसार  यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरुन  आपणा विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई चे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल असे पत्रात नमूद केले असून अशा अधिकाऱ्यांनर खरोखर कारवाई होणार का औसुख्याचा विषय जनतेसमोर उभा ठाकला आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 23, 2024

PostImage

 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन


 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल भाऊ वरघंटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन 

 

चामोर्शी,

चामोर्शी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी पहाटे 5.35 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे निधन झाले. भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याची ही अकाली एक्झिट धक्कादायक ठरली आहे. खासदार अशोक नेते यांचे ते खूप खंबीर सहकारी होते.

वरघंटे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच खा. अशोक नेते यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना यांना योग्य उपचार मिळण्यासंबंधी सूचना करून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. परंतु हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा पहाटे ५-३५ लाच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एकदा उमदा, निष्ठावंत, गोरगरिबांच्या मदतीस धावणारा, पक्षाला बळकट करणारा, सहकारी गमावला, सर्वत्र कडून स्व. स्वप्नील वरघंटे यांना आपुलकीची भावना व्यक्त करत श्रद्धांजली देत पूर्ण चामोर्शी शहर दुःख व्यक्त करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

भरधाव दुचाकीची झाडाला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार


भरधाव दुचाकीची झाडाला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

धानोरा :-
गोडलवाही येथून दुचाकी ने स्वगावी परत येत असताना भरधाव दुचाकीची झाडाला धडक लागून दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना 21 फेब्रुवारी  ला रात्री सात वाजताच्या सुमारास घडली
 देवाजी दसरू कोडाप 48 रा. कनारटोला ता. धानोरा जि . गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा 21 फेब्रुवारीला गोडलवाही येथे एकटाच कामानिमित्त नातेवाईकांकडे गेला होता काम आटोपून दुचाकीने परत येत असताना गोडलवाही पासून दीड किमी अंतरावर असलेल्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसली यामध्ये त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने व वेळेवर उपचार न मिळाल्याने तो जागीच ठार झाला घरी त्याची पत्नी व मुले तो येणार म्हणून वाट पाहत होती परंतु रात्र होऊनही पती घरी न पोहोचल्याने पत्नीने गोडलवही येथे त्यांचे नातेवाईकांना फोन करून विचारले असता तो त्यांचे घरून दुचाकीने गेला असल्याचे समजले तेव्हाच नातेवाईक त्याला पाहण्यासाठी गेले असता तो रस्त्याचे कडेला पडून असल्याचे दिसले घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली तेव्हा त्याला रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

वांगेपल्ली येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने चक्काजाम आंदोलन


वांगेपल्ली येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वतीने चक्काजाम आंदोलन 

अहेरी:-
विदर्भ राज्य आंदोलन समिति गडचिरोली द्वारा विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे तसेच अहेरी जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी  तेलंगाना राज्याच्या बार्डर वरती अहेरी वांगेपल्ली वैनगंगा नदीच्या तिरावर चक्का जाम आंदोलन करीत,आम्हचा जिल्हा अहेरी जिल्हा,आम्हचे राज्य विदर्भ राज्य
अशा प्रकारचे फलक लावण्यात आले.याआंदोलना करीता विदर्भ राज्य आंदोलन समितिचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, अहेरी जिल्हाकृती समितिचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विदर्भ आं.स.तालुका अध्यक्ष विलास रापत्तिवार, नागसेन मेश्राम, मोतीराम लाडेलवार, अरुण शेडमाके, महादेव करमकार असे विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वरील प्रकारचे आंदोलने विदर्भात अनेक ठीकाणी होत आहेत.
लवकरच सिरोंचा बार्डर वरती माजी आ. वामणराव चटप यांच्या नेत्रुत्वात खुप मोठे जन आंदोलन करण्यात येणार आहे .
हे आंदोलन विदर्भ राज्य घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.असे अशोक पोरेड्डीवार यांचे ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनात  मत व्यक्त केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

तालुका काँग्रेस कमिटीचा बुथ पदाधिकारी मेळावा सम्पन्न


तालुका काँग्रेस कमिटीचा बुथ पदाधिकारी मेळावा सम्पन्न

अहेरी:-
 गडचिरोली जिल्ह्यातील"अहेरी तालुका काँग्रेस कमिटी"  बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न झाला, यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहून बूथ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
  आगामी लोकसभा - विधानसभा निवडून जिंकून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात एकहाती सत्ता आणण्याकरिता नियोजनबद्द व एक दिलाने कार्य करण्याच्या  सूचना  गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
   यावेळी बैठीकस माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. पेंटारामजी तलांडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, काँग्रेस नेत्या सगुणाताई तलांडी नगराध्यक्ष रोजा करपेत, मुस्ताक हकीम, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंत मडावी, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. अब्दुल (पप्पू) हकीम, निताताई तलांडी,  रज्जाक पठाण, बबलू शडमेक, अजय नैताम, अरुण बेज्जलवार, प्रमोद आत्राम सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 22, 2024

PostImage

युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम


युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

मूलचेरा :-

 अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आणि अनेक गावात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आपण युवकांना सहकार्य करत असतो.क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपले युवक पुढे जावे आणि आपले भविष्य उज्वल करून या क्षेत्राच नावलौकिक करावा,तसेच युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे असे मत कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते तर अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम,प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,महामंत्री सुभाष गणपती,शहराध्यक्ष दिलिप आत्राम,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक,माजी सरपंच रविभाऊ झाडे,अनु.जाती आघाडी अध्यक्ष प्रफुल दुर्गे,उपाध्यक्ष स्वरूप पोद्दार,बंगाली आघाडी अध्यक्ष मोंटु सरकार,सामाजिक कार्यकर्ते बंडू कुमरे हे होते.

त्यावेळी सर्व मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.लहान मुलींनी सामूहिक नृत्याच सुंदर सादरीकरण केल.
यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग,युवा वर्ग आणि स्थानिक गावकरी,भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकारातून आरमोरीत दिव्यांग शिबिर


सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकारातून आरमोरीत दिव्यांग शिबिर.

 

शिबिरात २६१ दिव्यांगाची झाली तपासणी
 

आरमोरी:-

 तालुका प्रशासनाचे वतीने उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दिव्याग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात आले.सदर शिबिरात तालुक्यातील ग्रामीण भागांतील २६१ दिव्यांग बांधवांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी करूण घेतली

भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय  परिविक्षाधीन अधिकारी ओमकार पवार हे आरमोरी येथे रूजू होताच त्यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे.  तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक दिव्यांग आहेत. मात्र त्यांच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या आर्थिक लाभापासून ते वंचित आहेत. हि बाब भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार यांच्या लक्षात आल्याने त्यानीं प्रत्येक गावागावात महसूल विभागाच्या वतीने तलाठी यांचे मार्फत सर्व्हे करूण तालुक्यातील दिव्यागं बांधवाची माहिती गोळा केली . जे दिव्यांग् असूनही ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही व जे शासनाच्या लाभापासून वंचित आहेत अशा गरीब गरजु दिव्यांगासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले.

दिव्यांग तपासणी  शिबिरात  कान नाक घसा तपासणी २८, अस्थिव्यंगरोग ८६, मानसिक रोग ४३, फिजीसियन तपासणी.. ३५, बालरोग १६, नेत्र तपासणी,३५, इतर रुग्ण १८ अशा एकुण २६१ दिव्यंगाची नोंदणी करूण तपासणी करण्यात आली व ५४ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.


 सदर शिबिरात गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टराना बोलवण्यात आले. शिबिरात तालुक्यातील दिवांग बांधवाना महसूल प्रशासनाने शिबिरस्थळी आणून त्यांची तपासणी करून घेतली.
तपासणी केलेल्या दिव्यांगणा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. गरजू व गरीब दिव्यांगाना त्यांचे आवश्यक असलेले कागदपत्र महसूल प्रशासनाच्या वतीने काढून त्यांना शासनाच्या दिव्यांग योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

 शिबिराला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, नायब तहसीलदार ललित लाडे, डी.एम वाकुलकर, मंडळ अधिकारी जि. एम. कुमरे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. नागदेवते, डॉ. मनोज मस्के, डॉ. प्रतीक चकोले डॉ. छाया उईके तसेच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रमुख अनुप्रिया आत्राम व त्यांची वैद्यकीय चमू तसेच तालुक्यांतील तलाठी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी कोतवाल उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम 


 अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम 

 

अहेरी:-

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे कमलापूर दौऱ्यावर असताना आलापल्ली ते पुसूकपल्ली दरम्यान सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कळताच त्यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. एवढेच नव्हे तर अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी आपल्या ताफ्यातील एक वाहन सुद्धा दिला

प्राप्त माहितीनुसार गुडडीगुडम येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षिका शाळा सुटल्यावर दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसून आलापल्लीकडे परत येताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे नियंत्रण सुटून त्या दुचाकीचा अपघात झाला.मागे बसलेल्या त्या शिक्षिकेच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.हे दृश्य माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी आपला ताफा थांबवून विचारपूस करत तात्काळ उपचार मिळावा यासाठी स्वतःचं वाहन दिले.

अपघातग्रस्तांना मदत करा असे शासन आणि प्रशासनाकडून नेहमीच आवाहन करण्यात येते.राजे अम्ब्रीशराव आत्राम सारखे व्यक्तिमत्व स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात सामान्य नागरिकांसमोर एक उदाहरण घालून दिले आहे.


पुन्हा एकदा राजेंनी दिली माणुसकीची दर्शन

दानशूर म्हणून ओळख असलेले राजे अम्ब्रीशराव आत्राम हे नेहमीच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात.त्यांच्या दारावर गेलेले कुणीही आजपर्यंत खाली हात परत आले नाहीत.स्वतः उपस्थित नसले तरी त्यांच्यातर्फे आर्थिक मदत दिली जाते.हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे.आज तर रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहन मदतीला देऊन त्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा परिचय  दिला आहे 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ' चामोर्शी तालुक्यातील एका युवकाने बॅनरबाजी करुन मोदी सरकारचा केला निषेध 


'मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ' चामोर्शी तालुक्यातील एका युवकाने बॅनरबाजी करुन मोदी सरकारचा केला निषेध 

गडचिरोली,

 केंद्राची कुठलीही योजना ही करदात्याच्या पैशाने राबविली जाते. त्यामुळे ती भारत सरकारची हमी अशी असायला हवी. मात्र असे न होता ती 'मोदी सरकारची हमी' अशा नावाने भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी असे प्रश्न बऱ्याच तरुणांना पडले आहेत त्याच अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावातील संतोष तिमाडे या युवकाने गावातील आपल्या एका छोट्याशा दुकानासमोर मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ व इव्हिएम हटाव देश बचाओ अशाप्रकारे बॅनर लावण्यात आले असल्याने आष्टी परिसरात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे सदर बॅनर हे भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या गावात हे बॅनर लावण्यात आले आहे भारत सरकारव्दारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. या योजना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळावी, या उद्देशाने योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. असे काही पोस्टर्स भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर या बॅनर्सवर भारत सरकार व्दारा राबविलेल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजना ह्या मोदी सरकारची हमी असा उल्लेख त्यावर केला केलेला आहे.या योजना कोणासाठी? याचे निकष काय? लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा? अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही.
भारत लोकशाही राष्ट्र असून देशाचा कारभार हा पंतप्रधान मार्फत चालविल्या जातो. मात्र, शासनाच्या जाहीरातीत व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख कधीच केल्याचे पाहण्यात आले नाही परंतु  शासनाच्या योजना या भारत सरकारच्या योजना असतांना मोदी सरकारच्या योजना असा उल्लेख करणे उचित नाही. त्‍यामुळे मोदी सरकारची हमी असा उल्लेख असलेले बॅनर्स लावून भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर लावून गावोगावी मोदी सरकारची हमी अशे या बॅनर मधून दाखविले जात आहे मग मोदी सरकारची हमी का भारत सरकारची हमी हे कळायला मार्ग नसल्याने मोदी सरकार होऊ नये म्हणून मी भारत सरकार वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकार हटाओ भारत सरकार बचाओ असे माझ्या दुकानासमोर लावले मी कोणत्या राजकीय पक्षांच्या वतीने लावले नसून संविधान वाचविण्यासाठी हे बॅनर लावले असल्याचे संतोष तिमाडे यांनी सांगितले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 21, 2024

PostImage

आलापल्ली परिसरातील शालेय मुलींचा प्रवास झाला सुकर, मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद


आलापल्ली परिसरातील शालेय मुलींचा प्रवास झाला सुकर,
मुलींच्या चेहऱ्यावर झळकला आनंद


आलापल्ली:-
येथील धर्मराव हॉयस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय,आलापल्ली येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज व कोषाध्यक्ष कुमार अवधेशराव  बाबा यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले.बाहेर गावावरून विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्याकरिता मोठी अडचण निर्माण होत होती
शालेय शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाच किमी अंतर पायी जावे लागत होते त्यामुळे शाळेच्या उपस्थितीवर परिणाम होत होता. मानव विकास मिशन अंतर्गत ५८ सायकलचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य  कोडेलवार, पर्यवेक्षक खोब्रागडे, सहाय्यक शिक्षक वैद्य, खनगन, मामीडपल्लीवार, खरवडे,  राऊत , सौ. किरंगे, बांबोडे ,टिपले , झिलकलवार, ताजने, उपलवर  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 20, 2024

PostImage

विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करा अहेरी पोलीस निरीक्षक यांना महिलांचे साकडे


विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करा अहेरी पोलीस निरीक्षक यांना महिलांचे साकडे 

अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील  अवघ्या दोन तीन कि. मी. अंतरावर असलेले भूंजगंरावपेठा व वांगेपल्ली येथील महिलांनी अहेरी पोलीस निरीक्षक काळबांधे यांना विषयुक्त अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी साकडे घालून निवेदनातून  अवगत करून देण्यात आले 
सदर गावातील आबालवृद्ध  तरूण व्यक्ती दारूच्या व्यसनात मग्न झाले आहेत दररोज दिवसात चार पाच वेळा जावून वांगेपल्ली येथील दारू पित असतात विक्रेते हे आवक वाढत असल्यामूळे लवकर दारू चे उत्पादन वाढावे  म्हणून गावठी दारू मध्ये पटकी, नवसागर , अमोनिया, व अनेक झाडांचे साली चे वापर करतात त्यामूळे मूबलक दारू झपाट्याने निघत असल्यामूळे पिण्याऱ्याचे जथ्थे परत जाऊनये  म्हणून असे गैरप्रकार करीत असताना दिसत आहेत. त्यामूळे कित्येक गावातील तरूणांना जीव गमवावे लागले कित्येक जन आजाराने ग्रस्त झालेले आहेत. त्यामूळे कित्येक महीलाना तारूण्यातच विधवांचे जिवन व्यथीत करावे लागत आहे . त्यामूळे गावातील महिला मंडळी एकत्रीत येवून अहेरी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवून निवेदन देवून लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी विंनती करण्यात आली आहे.अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे निवेदन स्विकाराताना पोलीस निरिक्षक  काळबांधे व पोलीस उपनिरीक्षक जावळे  व हवालदार तोरे  ,मडावी  उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 20, 2024

PostImage

आष्टी येथे शिव छत्रपती जन्मोत्सव थाटामाटात साजरा


आष्टी येथे शिव छत्रपती जन्मोत्सव थाटामाटात साजरा

आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री छत्रपती शिवस्वराज्य सेव संस्था आष्टी यांच्या सौजण्याने 18 फेब्रू. रोजी भव्य रांगोळी स्पर्धा तसेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर आधारित झाकी ( थीम ) व मराठी संस्कृती दर्शन तसेच वारकरी संप्रदाय कीर्तन व संपुर्ण गाव जेवण ठेवण्यात आले. आणि 19 फेब्रु. रोजी सकाळी 11वाजता भव्य बाईक रॅली व सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित झाकी (थीम) चे व रांगोळी स्पर्धेचे उदघाटक म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम व अध्यक्ष स्थानी आष्टी ग्रामपंचायत सरपंच सौ.बेबीताई बुरांडे उपस्थित होत्या सोबतच बाईक रॅली चे उद्घाटक आ. डॉ.देवराव होळी  व शोभा यात्रेचे उद्घाटक माननीय खासदार अशोक नेते  यांच्या हस्ते करण्यात आले झालेल्या दोन दिवशीय कार्यक्रमात श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी 
अध्यक्ष.पवन रामगिरकर उपाध्यक्ष .संदीप लोड्डेलीवार सचिव संदीप तिवाडे व सर्व सदस्य तथा गावकरी मंडळी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा आष्टी, लिटिल हार्ट कॉन्व्हेंट आष्टी राजे धर्मराव हायस्कूल आष्टी तसेच खूप मोठ्या प्रमाणात आष्टी वासीय सहभागी होऊन सुरळीतपणे दोन दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळा पार पाडला. .


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट


घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट


गडचिरोली,
 घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटके गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट 
 जिल्ह्यातील उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन कोटगुल पासुन 500 मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले होते.

गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा हा घातपाताचा डाव उधळून लावत प्रेशर कुकरमध्ये ठेवलेले स्फोटक नष्ट केल्याची कारवाई आज 19 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आली.

गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताहात तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने आज 19 फेब्रुवारी रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे कोटगुल पासुन 500 मीटर अंतरावर असलेल्या पहाडीच्या पायथ्याजवळ गोडरी जंगल परिसराकडे जाणाया पायवाटेवर माओवाद्यांनी पोलीस पथकांला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले आहे
अशी गोपनिय खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी कोटगुल धनंजय कुलकर्णी यांना मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली त्यावरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले. बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणाद्वारे जंगल परिसरात सर्चिग करत असतांना, एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, अंदाजे दिड ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले प्रेशर कुकर मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे 02 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरचं नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात पोस्टे कोटगुलचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय कुलकर्णी, बीडीडीएस पथक प्रभारी अधिकारी मयुर पवार, पोहवा पंकज हुलके, पोहवा अनंतराव सोयाम, पोअं संचिन लांजेवार व चापोअं तिम्मा गुरनुले यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मियांचे राजे होते- सारिका खिलारे


छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मियांचे राजे होते- सारिका खिलारे

डोंगरगाव (ता.मंगळवेढा)-

छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या विशिष्ट जातीधर्माचे राजे नव्हते तर ते सर्वधर्मियांचे राजे होते असे प्रतिपादन डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त डोंगरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित केलेल्या शिवजयंत्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
         सर्वप्रथम सार्वजनिक जयंत्ती मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात संगम विद्यालय डोंगरगाव या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक नलवडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे तत्वनिष्ठ राजे होते. त्यांच्या राज्यात शेतकरी, व महिलांचा  सन्मान केला जायचा, त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. राजांचे विचार आचरणात आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून मंडळ राबवित असलेले विविध  कार्यक्रम व उपक्रमाबद्दल त्यांनी मंडळाचे कौतुक केले.
        यावेळी सरपंच सारिका खिलारे, माजी सरपंच भीमराव मोरे, मंडळाचे अध्यक्ष आण्णासो जाधव, सहदेव मोरे, मधुकर मोरे, दत्तात्रय भूसे, तुकाराम कारंडे, अमोल मेटकरी, पंकज मस्के, दादा खिलारे, मोरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कांबळे, अंगणवाडी सेविका सुशीला गवळी,गणिम पठाण, ज्योतीराम क्षीरसागर, तानाजी मिसाळ. ग्रामसेवक सुशांत कसबे, श्रेयश पाटील, मोरेवाडी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष निसार पठाण, तात्या खिलारे, पंडित साखरे, सखू साखरे, बिभीषण लोहार, नामदेव लटके, अमोल लटके , विजय भूसे, जगन्नाथ मिसाळ, म्हाळप्पा खरात, संजय माळी यांच्यासहमोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

दानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळवाटप


दानशूरचा राजा गणेश मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे फळवाटप

अहेरी:-
आज अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून व सामाजिक उपक्रम राबवत संपन्न झाली. यावेळी उपजिल्हा रुग्णालया अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप व इतर कार्यक्रम दानशूर गणेश मंडळ तर्फे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले 

यावेळी दानशूरचा राजा गणेश मंडळाचे साईकुमार जिल्लेवार,राजू रामगीरवार,राजू जंगमवार,प्रसाद मूडपल्लीवार,कपिल येमुलवार,अजय पुल्लूरवार,आदित्य इप्पावार,राहुल येमुलवार,अभिषेक येमुलवार,अभिषेक मुन्नूरवार,विनीत पुल्लीवार,तरुण येमुलवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

शिवजयंतीच्या निमित्ताने काटली येथे स्वच्छता अभियान


शिवजयंतीच्या निमित्ताने काटली येथे स्वच्छता अभियान

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील व तालुक्यातील काटली येथे शिवजयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 
 यावेळी सरपंच अरुण उंदिरवाडे, उपसरपंच पार्वताबाई खेडेकर,  ग्रामपंचायत सदस्य विद्या मुन्घाटे, वनिता गेडाम,रजनी उंदिरवाडे,सुरेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश उंदिरवाडे, गौतम खंडारे, काशिनाथ ठाकरे,मनोज डोईजड, कृष्णकांत मुन्घाटे, सुनिल डोईजड, नामदेव मानकर, अमित जेट्टीवार, पांडुरंग धारणे, राजेंद्र ठाकरे,रवी मेश्राम आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
सर्व ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सहकार्य केले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

जिवती तालुक्यात खनिज संपत्तीचे उद्योग उभारावे - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 


जिवती तालुक्यात खनिज संपत्तीचे उद्योग उभारावे - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 
 
चंद्रपूर:-
 चंद्रपूर जिल्ह्या हा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखली जाते.हा जिल्हा खनिज संपत्तीने संपन्न आहे.याच चंद्रपूर जिल्हयाचे अगदी टोकावर तेलंगणा राज्याच्या सिमावर्ती भागालगत जिवती तालुका बसलेला असुन हा तालुका नक्षल प्रभावित आणि सुख सुविधांचा अभाव असलेला अतिमागास व अतिदुर्गम तालुका म्हणून  परिचित आहे.

या तालुक्याच्या शेजारील तालुक्यात मोठ मोठे उद्योग निर्माण झाले आहेत.त्यामुळे तेथील दळणवळण आणि  रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने आर्थिक बाजू बळकट झाली. परंतु जिवती तालुक्याची स्थिती जैसे थे आहे.या तालुक्याचा विकास खुंटला असल्याने सरकारी पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर विकास होणे अपेक्षित असून त्या करिता प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. जिवती तालुक्यातील बेरोजगार युवकांना तसेच स्थानिक लोकांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी जिवती तालुक्यात मोठे उद्योग धंदे उभारणे आवश्यक आहे. तालुक्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी जिवती तालुक्यात खालील उद्योग व्यवसाय उभे केल्यास जिवती तालुका राज्याला रोजगार देणारा तालुका ठरु शकतो.

 जिवती तालुक्यात लोह खनिज चा साठा मोठ्या प्रमाणात आढळत असून, हया ठिकाणी
सुरजागड प्रकल्पासारखे प्रकल्प उभे करता येते.त्याचप्रमाणे या तालुक्यात सिमेंटचे उत्पादन करण्याकरीता वापरण्यात येणारे दगडाचे मोठे साठे आहेत.त्याला अनुसरून  सिमेंट कारखाने उभे करता येते.तसेच शासनाने पुढाकार घेतल्यास येथे एम.आय.डी.सी. देखील स्थापन करता येऊ शकते .करिता शासनाने आणि प्रशासनाने या बाबीकडे लक्ष वेधून तालुक्यातील बेरोजगर युवकांच्या आणि स्थानिक लोकांच्या हितार्थ  उद्योगधंदे उभारून जिवती  तालुक्याचा विकास साधण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख भारत बिरादार 
 यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आणि रोजगाराची मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 19, 2024

PostImage

 माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच केली शिवजयंती  साजरी 


 माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी घरीच केली शिवजयंती  साजरी 
    
चामोर्शी:-

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे आपल्या घरात थाटामाटात साजरा करण्याची परंपरा तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथे  राहणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी जोपासली आहे. यंदा घरीच त्यांनी शिवजयंती साजरी केली.

'शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात' ही संकल्पना गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील घराघरांत रूजते आहे. याच धर्तीवर आपणही राजांची जयंती दणक्यात साजरी करावी या हेतूने  भास्करने पाच वर्षांपूर्वी तिथीनुसार आपल्या घरीच शिवजयंती सोहळा आयोजित केला. यंदा या सोहळ्याचे सहावे वर्ष होते. ही संकल्पना ह‌ळूहळू महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उत्साहाने साजरी व्हावी यासाठी हा एक छोटा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भास्कर फरकडे यांनी दिली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 17, 2024

PostImage

श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचा कार्यक्रम ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार


श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचा कार्यक्रम ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार

आष्टी:-

आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून ही स्पर्धा ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत सम्पन्न होत आहे
दि १८ फेब्रुवारी ला सायंकाळी ५.०० वाजता महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली महीला अध्यक्ष शाईन हकीम, उपाध्यक्ष पुष्पा व्यंकटी बुर्ले, आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष सोयाम, विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणय बुर्ले जिल्हा उपाध्यक्ष नोमेश जुवारे जिल्हा संघटक हेमंत भाकरे,गोलू पोटवार, जिल्हा उपाध्यक्ष नेमाजी घोगरे,शहर अध्यक्ष राहुल डांगे, जिल्हा सरचिटणीस हरिश मंगाम,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी परिसरातील समस्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी च्या वतीने करण्यात आले आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 13, 2024

PostImage

घराला लागली आग , क्षणार्धात पाच लाखांचे साहित्य स्वाहा


घराला लागली आग , क्षणार्धात पाच लाखांचे साहित्य स्वाहा

 


सिरोंचा :-
 तालुक्यातील नरसिंहापल्ली येथील एका घराला मध्यरात्री आग लागून पाच लाखांचे साहित्य जळून खाक झल्याची घटना दहा फेब्रुवारी ला घडली
रविंद्र शंकर चेनूरी असे आग लागून घर व साहित्य जळालेल्या इसमाचे नाव असून घटनेच्या दिवशी संपुर्ण कुटुंब गाढ झोपेत होते तेव्हा अचानक घराला आग लागली. झोपडीच्या घराला आगीने काही क्षणातच कवेत घेतले. यात घरातील 30 क्विंटल कापूस व जीवनाउपयोगी साहित्य जळून खाक झाले
 घराला आग लागल्याचे लक्षात येताच संपुर्ण कुटुंब घराबाहेर पडले म्हणून सुदैवाने कुटुंब थोडक्यात बचावले
 .रवींद्र शंकर चेनुरी रा. नसिंहापल्ली हे झोपडीवजा घरात वास्तव्यास रहात होते. 10 फेब्रुवारी रोजी चेत्रुरी कुटूंब नित्याप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली. यात शेतातील पिकवलेला तीस क्विंटल कापूस साठा करून ठेवला होता तो 30 क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाला. संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राखरांगोळी झाली. यात अडीच लाखांचा कापूस व इतर साहित्य, असे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा रवींद्र चेनुरी यांनी केला आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे नेमके कारण समोर आलेले नाही. आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

वर्षभर केलेली मेहनत क्षणात गेली वाया

दरम्यान, चेनुरी यांना दोन एकर शेती आहे. दुसऱ्याची तीन एकर शेती त्यांनी कसायला घेतली होती. पाच एकर शेतीत मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला होता. कापसाचे दर सध्या गडगडले असल्याने दर वाढेल या आशेने त्यांनी त्यांनी कापूस विकला नव्हता. मात्र, आगीने घात केला व वर्षभर केलेली मेहनत क्षणात वाया गेली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 12, 2024

PostImage

देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कामाला सुरुवात


देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कामाला सुरुवात

देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणेंच्या उपोषणाचे फलित

देसाईगंज-
       शहराच्या सिटी सर्व्हेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ९ एप्रिल २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला होता.दरम्यान आवश्यक प्रमाणात रक्कम भरुनही भुमिअभिलेख कार्यालयाच्या गतिहीन भुमिके विरोधात देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष यांनी भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करताच धास्तावलेल्या संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांनी धसका घेत काम सुरु करण्याची हमी भरत अखेर सिटी सर्व्हेच्या कामास सुरुवात केली असल्याने हे बावणे यांच्या आमरण उपोषणाचे फलित असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
     देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेसाठी येथील भुमिअभिलेख कार्यालयाच्या मागणीनुसार नगर परिषदेच्या वतिने जवळपास ८० टक्के रक्कम २०१८ मध्येच शासन जमा करण्यात आली होती. मात्र तब्बल पाच वर्षाचा कालावधी लोटुनही शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रीका देण्यात न आल्याने येथील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
      गरजु व पात्र लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देता यावेत करीता शासकीय स्तरावरुन प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गरजु लाभार्थ्यांना देता यावा करीता नगर प्रशासनाने शहराचे सिटी सर्व्हे करून अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्या संदर्भात देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या मागणीपत्रानुसार भुमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपये शासन जमा केले आहेत. ही रक्कम एकुण मागणीपत्राच्या ८० टक्के असली तरी भुमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कामचुकारपणाचा कळस गाठत विविध कारणे उपस्थित करत सिटी सर्व्हेचे काम तब्बल पाच वर्षापासून थंडबस्त्यात ठेवले होते.
      देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरीकांना पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असतांना शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सिमा निश्चित केल्या नसल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडत चालली होती.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणे यांनी भुमिअभिलेख कार्यालयाला याबाबत वारंवार निवेदन देऊन समस्या अवगत करून देण्यासह आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.परंतु दिलेल्या इशाऱ्यालाही जुमानत नसल्याचे पाहू जाता २४ जानेवारी २०२४ रोजी भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असता भुमिअभिलेख कार्यालयाच्या हादरलेल्या यंत्रणेणे त्याच दिवशी उपोषण मंडपास भेट देऊन येत्या सहा महिन्यांत सिटी सर्व्हेचे काम पुर्ण करण्याची हमी भरली होती.त्या अनुषंगाने अखेर प्रत्यक्ष सिटी सर्व्हेच्या कामास सुरुवात केली असल्याने शहरवाशियांतुन बावणेंचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे  विजयी


नाट्यश्री कविता स्पर्धेतील सहाव्या सत्रात पुरुषोत्तम लेनगुरे  विजयी

 

गडचिरोली :- 
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
      या उपक्रमाचे सहावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली येथील नवोदित कवी पुरुषोत्तम लेनगुरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या  "रमाई' या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
       पुरुषोत्तम लेनगुरे हे झाडीपट्टीतील नवोदित  कवी असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रानगर्भ फुलत आहे ' मध्ये त्यांच्या दोन कविता समाविष्ट आहेत.
        त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या सहाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  संगीता रामटेके, पुरुषोत्तम लेनगुरे, कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे, सुनील मंगर, प्रतिभा सुर्याराव,  मनिषा हिडको, संजय बन्सल, चरणदास वैरागडे, रुपाली म्हस्के,  वंदना मडावी,  सुजाता अवचट , प्रब्रम्हानंद मडावी, उपेंद्र रोहनकर,  प्रेमिला अलोने, ज्योत्स्ना बन्सोड , बाबाजी हुले,  प्रभाकर दुर्गे, दिनेश देशमुख, मधुकर दुफारे, अनुराग मुळे,  प्रशांत गणवीर, राजरत्न पेटकर , मुर्लीधर खोटेले , खुशाल म्हशाखेत्री, प्रमोद बोरसरे ,मिलिंद खोब्रागडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
        या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुक्याचा ऐतिहासिक विजय


जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुक्याचा ऐतिहासिक विजय

गडचिरोली :

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची दि.१० च्या रात्री सांगता झाली. या चार दिवसीय महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांमध्ये धानोरा पंचायत समिती सर्वसाधारण विजेता,तर गडचिरोली पंचायत समितीचे कर्मचारी उपविजेता ठरले.शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमध्ये भामरागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री स्वप्नील मगदूम यांच्या आणि गटशिक्षणाधिकारी श्री जनार्दन वडलाकोंडा यांच्या नेतृत्वात शालेय क्रीडा संमेलनात सर्वाधिक स्पर्धामध्ये आघाडीवर राहून जिल्हाभरात भामरागड तालुका प्रथम स्थान पटकाऊन ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे सर्व स्थरावरून कौतुक केल्या जात आहे तर प्राथमिक विभागात धानोरा आणि माध्यमिक विभागात चामोर्शी पंचायत समितीने द्वितीय स्थान पटकावले.शनिवारी रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांसह बक्षीस वितरण सुरू होते.जिल्हा परिदेच्या प्रांगणात संध्याकाळी समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी ओमकार पवार (भाप्रसे), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार (सा.प्र.), फरेंद्र कुतीरकर (जलजीवन मिशन),चेतन हिवंत (पंचायत), अर्चना इंगोले (महिला व बालकल्याण), अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सतीशकुमार साळुंके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावल साळवे,कार्यकारी अभियंता (बांधकाम) विजय दोरखंडे यांच्यासह जि.प.चे सर्व खातेप्रमुख आणि जिल्हाभरातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी एकल व समुह नृत्य सादर केले. यादरम्यान अधिकाऱ्याच्या हस्ते प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या चारही दिवसांच्या कार्यक्रमांची संपूर्ण व्यवस्था लिलाधर भरडकर आणि त्यांच्या चमुने चोखपणे सांभाळली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

काटली येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन


काटली येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन

अशोक खंडारे/ मुख्य संपादक

गडचिरोली:-
जिल्ह्यातील काटली येथे  डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वतीने  शांतीचे अग्रदूत  तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे भुमीपुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अरुण पाटील मुन्घाटे, दिप प्रज्वलन ॲड.एम.डी.सहारे, पोलीस पाटील  के.पी.मुन्घाटे, अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक वाळके,सह अध्यक्ष सरपंच अरुण उंदिरवाडे प्रमुख अतिथी म्हणून  मुन्घाटे शाळेचे शिक्षक राउत, उपसरपंच पार्वतीबाई खेडेकार, तमुस अध्यक्ष गोविंदा नेवारे,माजी नगर सेवक सहारे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भोयर काटली,मंडळ अधिकारी एस डी शिंपी, प्रभाकर सावकार डोईजड, सेवानिवृत्त नायब तहसीलदार पि एन खंडारे, दादाजी उंदिरवाडे, चुडाराम खंडारे, ओमप्रकाश उंदिरवाडे, काशिनाथ खंडारे, नरेश उंदिरवाडे, कैलाश शिंपी, अमर उंदिरवाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधीवत पूजन करून कुदळ मारुन उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन  व आभार प्रेमदास उंदिरवाडे यांनी केले , बहुसंख्य ग्रामस्थ, तथा बौध्द उपासक व उपासीका उपस्थित होते 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 11, 2024

PostImage

येनापूर येथे बस थांब्यावर शेडअभावी प्रवासी त्रस्त


येनापूर येथे बस थांब्यावर शेडअभावी प्रवासी त्रस्त


निवारा शेड उभारण्यासाठी  लोकप्रतिनिधीं लक्ष देणार काय?

आष्टी - :
येणापूर  येथे बस थांब्यावर शेड अभावी प्रवासी त्रस्त झाले असून महामार्गाचे काम होऊनही प्रवासी निवारा बांधण्यात आलेला नाही त्यामुळे प्रवाशांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात गडचिरोली ते आष्टी महामार्गावरील येनापूर हे गाव महत्वाचा मानला जातो.  चामोर्शी तालुक्यातील मध्यभागी असलेल्या येनापूर येथे लक्ष्मणपूर, वायगाव आष्टी, चामोर्शी  जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना येथूनच जावे लागते. पंरतु महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून अद्यापपर्यंत येनापूर येथे वाहनांची वाट बघणार्‍या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वारा ,पाऊस, उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. वास्तविक पाहता महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ते शेड उभारून द्यायला पाहिजे होते परंतू असे झालेले नाही त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात तसेच सद्यपरिस्थितीत भंयकर अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशी वर्गाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या उन्हामध्ये वाहनांची वाट बघत राहणार्‍या अनेक प्रवाशांमध्ये चक्कर येऊन पडण्याची संख्या देखिल वाढलेली आहे. त्यामुळे येनापूर येथे प्रवाशी शेड नसल्यामुळे प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत. त्यामुळे येनापूर येथील बसथांब्यावर प्रवासी निवारा बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे म्हणून परिसरातील जनतेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

स्वःताच्या विकास कामावर विश्वास नसल्याने ७० वर्षांपूर्वीच्या विकास पर्वावर टिका - आ.अभिजीत वंजारी


स्वःताच्या विकास कामावर विश्वास नसल्याने ७० वर्षांपूर्वीच्या विकास पर्वावर टिका - आ.अभिजीत वंजारी 


कूरखेडा- :
  भारताचा स्वातंत्र्यानंतर प्रथम पंधरा वर्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नेतृत्वात विकासाचा ढाचा उभा करण्यात आला यावेळी दर्जेदार शैक्षणिक, आर्थिक केंद्र तसेच सिंचन सूविधा निर्माण करीत देशाचा विकासाला दिशा देण्यात आली मात्र या तोडीचे कार्य मागील १० वर्षात भाजपा प्रणीत केंद्र शासनाला करता न आल्याने व त्याना स्वतःचाच विकास कार्यावर विश्वास नसल्याने ७० वर्षापूर्वी झालेल्या विकास पर्वावर आज संसदेत टिका करण्यात येत आहे असा घणाघात विधान परिषद सदस्य आ. अभिजीत वंजारी यानी केला
            गडचिरोली जिल्हा कांग्रेस पक्षाच्या वतीने येथील किसान मंगल सभागृहात तालुका बूथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी मेळाव्याचे उदघाटन म्हणून मार्गदर्शन करताना आ. अभिजीत वंजारी बोलत होते कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान कांग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ ,डॉ .नामदेव उसेंडी माजी आमदार आनंदराव गेडाम प्रदेश सरचिटणीस डॉ. नितीन कोडवते महीला कांग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. चंदा कोडवते किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसाकडे,माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी,लता पेदापल्ली,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कूमरे, रामदास मसराम माजी जि प सदस्य तथा आविसचे सरसेनापती नंदू नरोटे तालूका यूवक कांग्रेसचे अध्यक्ष गिरीधर तितराम महिला तालूका अध्यक्ष आशाताई तुलावी नगरसेवीका प्राचीताई धोंडणे नगरसेवीका कूंदा तितीरमारे नगरसेवीका हेमलता नंदेश्वर,माजी जि प सदस्य आशाताई कूमरे,माजी प स उपसभापति श्रीराम दूगा, कपील पेंदाम, राजकुमार बावनथळे तथा मोठ्या संख्येत कांग्रेस कार्यकर्ते हजर होते यावेळी नामदेव किरसान यानी मार्गदर्शन करताना सांगीतले की निवडणूक ही व्यक्ति किंवा नेता जिंकत नाही तर निवडणूक जिंकण्याकरीता बूथ स्तरावरील कार्यकर्तांची फळी मजबूत असणे गरजेचे असल्याचे सांगीतले यावेळी‌ डॉ नामदेव उसेंडी माजी आ गेडाम यानी सूद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूका कांग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट संचालन जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे तर आभार प्रदर्शन माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी यानी केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

जन्मदात्या बापानेच केला  पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार


जन्मदात्या बापानेच केला  पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार


भद्रावती :-
जन्मदात्या बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे 
सतत तीन वर्षांपासून आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 55 वर्षीय नराधम बापास भद्रावती पोलिसांनी दिनांक ९.२.२०२४ रोज शुक्रवारला सकाळी आठ वाजता पोस्को कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकाराने बाप व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भद्रावती शहरात उघडकीस आली आहे

शहरातील एका भागात राहणाऱ्या या आरोपीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहते. मात्र मुलगी ही बापाजवळ राहत होती. सदर नराधम बाप हा आपल्या पोटच्या मुलीवर 2021 पासून लैंगिक अत्याचार करीत होता. या प्रकाराची माहिती सदर मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने सदर मुलीसह भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर आईच्या समक्ष मुलीने भद्रावती पोलिसात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

म.ज्यो.फुले हॉयस्कूल आष्टी येधे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप


म.ज्यो.फुले हॉयस्कूल आष्टी येधे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप

 

 आष्टी :-

 महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी सावित्रींच्या लेकींना सायकलचे वाटप करण्यात आले. मानव विकास मिशन योजनेअंतर्गत या विद्यार्थिनींना बाहेरगाव वरून ये-जा करण्याकरिता सुविधा उपलब्ध व्हावी व त्यांचे शिक्षण सुकर व्हावे या उदात्त हेतुने महाराष्ट्र राज्य मानव विकास योजना अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी वन वैभव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बबलूभैया हकीम , नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षा शाहीनभाभी हकीम,आष्टी येथील सरपंच बेबीताई बुरांडे, मार्कंडा (कंसोबा) येथील सरपंच वनश्री चापले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य शैलेंद्र खराती, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,पर्यवेक्षक किशोरसिंह बैस, पालक तथा कला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी एकूण 124 सायकली विद्यार्थिनींना वाटण्यात आल्या. सायकल मिळाल्याचा आनंद विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॉक्टर व चार ट्रकवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई


अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॉक्टर व चार ट्रकवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई 

तुमसर:-
10 फेब्रुवारी : भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. त्यामुळे या वाळूला मोठीं मागणी आहे. वाळू माफिया मिळेल त्या मार्गाने वाळूची अवैध वाहतूक करत आहेत. तुमसर तालुक्यातील तामसवाडी घाटातून वाळू चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर नव्याने रुजू झालेले तहसीलदार मोहन टिकले व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

तर प्रभारी उपविभागीय अधिकारी अनय नवंदर यांनी रॉयल्टी नसताना वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई केली. आयएएस असलेले प्रभारी उपविभागीय अधिकारी अनय नवंदर यांनी तुमसर तालुक्याचा दौरा केला. दरम्यान, तुमसर शहराबाहेरील सिहोरा रस्त्यावर चार वाळूचे टिप्पर त्यांना आढळले. त्यांनी सदर टिप्पर थांबवून रॉयल्टीची विचारणा केली. परंतु टिप्पर चालकाजवळ रॉयल्टी नव्हती. त्यामुळे चार ट्रकवर कारवाई केली. या कारवाई मुळे वाळू माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

मोबाईल रेंज अभावी मजुरांची हजेरी लावणे ग्रामरोजगार सेवकांना कठीण


मोबाईल रेंज अभावी मजुरांची हजेरी लावणे ग्रामरोजगार सेवकांना कठीण 


नागभीड-:
-मनरेगाची कामे सुरळीत होतील असे उद्देश ठेऊन ग्रामीण भागात असलेल्या अनेक लोकांना काम मिळावे यासाठी पेपर हजेरी न लावता ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवक यांच्या हस्ते करण्यात आली.परंतु थोडिजरी रेंज भटकली तर मस्टर ओपन होत नाही.त्यामुळे त्या कामावरील मजुरांच्या हजेरी लागत नाही. सकाळची हजेरी न लागल्यामुळे दुपारचे फोटो घेत नाही.परिणामतः मजुरांची मजुरी मिळत नाही.परत दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थिती तीच राहिली तर ज्या ठिकाणावरून जिओ टॅग केलं आहे तिथंच सर्व मजुरांना हजेरी घेण्यासाठी यावे लागते.
काम परिसरात कोठेही असूद्या.  नवीन नियमानुसार १० मीटर अंतर हे निश्चित झाले आहे.पण वेळ अल्प आहे. टाईम आऊट लवकर होत असल्याने हजेरी घेणाऱ्या रोजगार सेवकांना पुन्हा ॲप सुरु करून मस्टर ओपन करावे लागते.तेव्हा ग्रामीण भागात कवरेज राहत नसल्याने जास्त अडचण निर्माण होत आहे.दिवसभर साईट वर राहावे लागते .तेव्हा ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार करतांना यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करावी.अशी ग्रामरोजगार सेवक संघटनेची मागणी आहे.असे संघटनेचे सचिव यशवंत निकुरें  यांनी कळविले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

दहा दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या इसमाचा विहीरीत सापडला मृतदेह 


दहा दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या इसमाचा विहीरीत सापडला मृतदेह 

सोपानदेव म्हशाखेत्री 
धानोरा:- 
गेल्या दहा दिवसापासून चातगाव मधून बेपत्ता असलेल्या योगेश बारीकराव पेंदाम वय  39 वर्ष याचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळला. सदर इसम 29. 1 .2024 ला रात्री एक वाजून पाच मिनिटांनी घरून कोणाला काही न सांगता निघून गेला असल्याची माहिती त्याच्या पत्नीने सौ. कीर्तना पेंदामं यांनी पोलीस स्टेशनला दिनांक 30.1.2024 ला सायंकाळी साडेसहा वाजता तक्रार दिली. त्या अनुषंगाने पोलीसांनी तपास सुरू केला पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस विभागाने शोध मोहीम सुरू केली .गावात दवंडी देऊन शोधमोहीम सुरू केली . पण कोठेही पत्ता लागला नाही गावकऱ्यांनी सुद्धा चातगाव येथे गावात दवंडी दिली होती .शेवटी त्याचे मृतदेह चातगाव येथीलच सुधाकर मारोती मडावी  यांचे शेत शिवाराला लागून असलेल्या विहिरीमध्ये दिसून आल्याची माहिती  पोलीस स्टेशन चातगाव ला देण्यात आली. चातगाव पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला व त्याचे शव शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी मृत्यूचे कारण अजूनही कळलेले नसल्याचे  सांगितले. चातगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यात माता रमाई यांचे मोलाचे सहकार्य


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यात माता रमाई यांचे मोलाचे सहकार्य.

वैरागड - :
माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंबीर साथीच्या बळावर बहुजन उध्दाराची चळवळ चालवली तसेच धारवाडच्या उपाशी विद्यार्थ्यांना जेवणाची सोय व्हावी हणून सोन्याच्या बांगड्या विकल्या  त्यामुळे त्यांना रमाई नाव पडले. त्यांच्या कार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यात माता रमाई यांचे मोलाचे सहकार्य झाल्याचे प्रतिपादन वैरागड येथील सरपंचा संगीता पेंदाम यांनी केले.

वैरागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात ९ फेब्रुवारी रोजी बौध्द समाज आणि तक्षशिला महिला मंडलच्या वतीने माता रमाई यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सरपंचा संगीता पेंदाम बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्या मनीषा खरवडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष मिलिंद भोयर, सचिव मनोज खोब्रागडे, बौध्द समाज अध्यक्ष संजय भैसारे, तक्षशिला महिला मंडळ अध्यक्ष उर्मिला मेश्राम, ताराबाई वासनिक, स्मिता वासनिक, जासुंदा भानारकर, अस्मिता वासनिक उपस्थित होते. 

 बौध्द समाज, तक्षशिला महिला मंडळ आणि युवक मंडळा मार्फत माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि सह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्थे भगवान गौतम बुध्द, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा प्रतिमेला पुष्पहार आणि द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.  सांस्कृतिक कार्यक्रमात भीम व रमाईच्या भगिनी ,लेकरांनी अप्रतिम नृत्य सादर केले. 

झालेल्या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार दिपाली वासनिक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तक्षशिला महिला मंडळ सचिव तक्षशिला प्रलय सहारे, शिंदू सरदारे, बबिता टेंभूर्णे, कल्पना बरडे, इंदुबाई खोब्रागडे, प्रेमिला बरडे, बळीराम तागडे, राजू खोब्रागडे, लक्ष्मण भानाराकर, धर्मराव वासनिक, अनुज सहारे, शुभम मेश्राम, प्रशांत सहारे, गोलू बरडे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावातील तसेच परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 10, 2024

PostImage

संजो कॉन्व्हेंटच्या  शिक्षकाने एका विद्यार्थीनीकडून लुटले सहा तोडे सोने 


संजो कॉन्व्हेंटच्या  शिक्षकाने एका विद्यार्थीनीकडून लुटले सहा तोडे सोने 

 फसवून केल्या प्रकरणी पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

गोंडपिपरी:-
येथील संजो कॅन्व्हेंटचे शिक्षक अखिल रोहनकर याने एका विद्यार्थीनी कडून सहा तोडे सोने लुटले असून पालकाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
गोंडपिपरी शहरातील संजो कॉन्व्हेंट मध्ये  कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने मावशीची तब्येत बरी नसल्याने उपचारासाठी पैशाची नितातं गरज असल्याचे  सांगून त्याच शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह पालकांकडून पैसे  मागितले. एका विद्यार्थीनीने तब्बल सहा तोळे सोने शिक्षकाला दिले.
 काही दिवसांनी दिलेले सोने परत मागितले असता शिक्षकाने सोने देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक  झाल्याचे लक्ष्यात येताच विद्यार्थींनीने पालकाच्या सोबतीने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव अखिल रोहणकर रा.वडसा असे आहे.


गोंडपिपरी येथील 
संजो कॉन्व्हेंट ही सिबीएससी पॅटर्नची शाळा आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने मुलांच्या उज्जल भविष्यासाठी  शहरातील मोठे अधिकारी , विविध विभागातील कर्मचारी , लहान-मोठे व्यावसायिक यासह सधन शेतकऱ्यांची मुले या कॉन्व्हेंट मधून शिक्षण घेत आहेत . वडसा येथील अखिल  रोहणकर यांची संगीत शिक्षक म्हणून संजो कॉन्व्हेंट मध्ये नियुक्ती करण्यात आली. अल्पावधीतच सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह पालकात सुद्धा चांगली ओळख झाली. नामांकित शाळेत शिक्षक असल्याचा फायदा घेत रोहनकर  यांनी मावशीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने पैशाची नितांत गरज असल्याचे एका विद्यार्थीनिला सांगीतले . घरच्यांना काहीही न सांगता  तब्बल सहा तोटे सोने विद्यार्थीनीने शिक्षकाकडे आणून दिले.  दरम्यान लवकरच सोने परत करणार असल्याचा विश्वास  शिक्षकाने दाखविला. काही दिवसांनी विद्यार्थीनीने शिक्षकाला दिलेले सोने परत मागितले असता सोने देण्यास शिक्षकाने टाळाटाळ   केली.  आपली फसवणूक झाल्याचे समजून येताच विद्यार्थिनीने सदर बाब आई वडिलांना सांगितली. लागलीच गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरोधात फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली. तात्काळ गोंडपीपरी पोलिसांनी आरोपीस अटक केली. सदर बाब गोंडपीपरी शहरात पसरताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही दिवसापूर्वी  असेच  कारण पुढे करीत सदर शिक्षकाने अनेक पालकांच्या घरी जाऊन पैसे मागितले.
 अडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे असे म्हणत अनेक पालकांनी आपल्या क्षमतेनुसार  पाच हजार, दहा हजार, विस हजार तर काहींनी ५० हजार पर्यंतची रक्कम त्या शिक्षकाला दिल्याचे चर्चतून समोर आले आहे. फसवणूक व विश्वासघात केल्या प्रकरणी
गोंडपिपरी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर  करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांकडून ओरोपीची कसून चौकशी व्हावी करीता न्यायालयाने एक दिवसासाठी  पीसीआर  (पोलीस कस्टडी रिमांड) दिला आहे. 
पुढील तपास गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोगरे करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

पाली भाषा प्रचार परीक्षेत धम्म बांधवांनी सहभाग नोंदवावा- सोपानदेव मशाखेत्री


पाली भाषा प्रचार परीक्षेत धम्म बांधवांनी सहभाग नोंदवावा- सोपानदेव मशाखेत्री

 

. धानोरा:-

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध कालीन पाली भाषेचे ज्ञान अवगत व्हावे, पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, आणि पाली भाषेचे अनुवाद करणे सोयीचे व्हावे, पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी धम्म बांधवांनी पाली भाषा प्रचार परीक्षेत सहभाग नोंदवावा ,असे आवाहन धानोरा तालुका पाली भाषा परीक्षा  नियंत्रक सोपानदेव मशाखेत्री  यांनी केले. ते धानोरा येथील प्रकाश बौद्ध महिला मंडळ च्या वतीने आयोजित माता रमाई जयंती दिनी कार्यक्रमात परीक्षार्थींना पाली भाषा प्रचार परीक्षा चे प्रमाणपत्र पाहुण्यांचे  हस्ते वाटप करताना मार्गदर्शन करीत होते. सम्राट बुद्ध विहार येथे डिसेंबर 23 मध्ये पहिली, दुसरी, तिसरी, व चौथी पाली भाषेची परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थी नितेश मशाखेत्री  प्रथम श्रेणीत, अस्मिता घोडेस्वार दुसऱ्या श्रेणीत ,वेणू मशाखेत्री, प्रथम श्रेणीत ,प्रीती मशाखेत्री , प्रथम श्रेणीत, मृगल गव्हर्न प्रथम श्रेणीत, पायल बोरकर प्रथम श्रेणीत, मयुरी उंदीरवाडे प्रथम श्रेणीत, गुंजन मशाखेत्री प्रथम श्रेणीत, हेमलता सहारे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .तर दुसऱ्या परीक्षेतील परीक्षर्थी मृगाल  गवरणा याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.  या कार्यक्रमात पाहुण्यांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येऊन त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अलका मशाखेत्री नगरसेविका नगरपंचायत धानोरा, उद्घाटक स्थानी सीमा थूल  नगरसेविका ,प्रमुख अतिथी पौर्णिमा सयाम नगराध्यक्ष नगरपंचायत धानोरा, माजी नगराध्यक्ष वर्षाताई चिमूरकर, प्रतिष्ठित महिला नेत्राताई साळवे, प्रतिमा मोहरले ,देवांगणी चौधरी नगरसेविका, कल्याणी गुरूनुले नगरसेविका ,किरणताई सोनुले माळी समाज अध्यक्ष , भुमाला पराचाके  आदिवासी समाज अध्यक्ष ,प्रकाश बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी मशाकेत्री, सचिव वेणू मशाखेत्री,रसिकाताई मार्गिया पर्यवेक्षिका महिला बचत गट, प्रतिभा शिंपी इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी जेष्ठ महिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जास्वंदा सहारे थी बुद्धीस्त  सोसायटी ऑफ इंडिया धानोरा तालुका महिला अध्यक्ष यांनी केले .प्रास्ताविक वेणू मशाखेत्री सचिव प्रकाश बौद्ध महिला मंडळ यांनी केले, तर आभार निशा मशाखेत्री यांनी मानले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तिघे भावंडं जागीच ठार


हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तिघे भावंडं जागीच ठार

बीड:-

वनविभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या तीन बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.८) सकाळी ९.४५ च्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेल समोर घडली. हे तिघेही मूळचे जिंतूर तालुक्यातील आहेत. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिली.

झाल्टा फाट्याकडून तिघेही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा-देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते.

सकाळीच वनविभागाच्या परिक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडांच्या दुचाकीला धडकला.

दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस दाखल झाले.

घटनास्थळी वनविभागाच्या परिक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडलेले होते. त्यावरून पोलिसांना मृत भावंड्यांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजू येथे राहायला होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती
 संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार


गडचिरोली जिल्ह्यातील जखमी वाघावर प्राणी संग्रहालय गोरेवाडा येथे होणार उपचार

गडचिरोली:-
दिनांक ०५/०२/२०२४ रोजी रात्रो ९.०० वाजेदरम्यान एम. एन. चव्हान, सहाय्यक वनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांना भ्रम्हणध्वनीव्दारे एक वाघ जखमी असल्याचा माहीती मिळाल्या नंतर वनपरिक्षेत्र अधिकरी वडसा व सहाय्यक वनसंरक्षक वडसा यांनी रात्रो शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यावर जावुन पहाणी केली असता वडसा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र शिवराजपुरचे कक्ष. क्रमांक. ९३ मधे वनक्षेत्रात रस्ता क्रास करूण एक जखमी वाघ लंगडत शिवराजपुर लगतचे शेतशिवारात गेल्याचे माहीती मिळाली तसेच सदर वाघ रस्ता ओलांडत असत्यांनाचा व्हिडिओ ची पाहणी केली असता एक जखमी वाघ ज्याच्या समोरच्या उजव्या पायाला जखम असुन लंगडत चालत असल्याचे दिसुन आले त्यानुसार रात्रो ११.३० वाजता ड्रोन कॉमेरा बोलावुन पहाणी केली असता ड्रोनमध्ये शिवराजपुर ते उसेगाव रस्त्यापासुन अंदाजे २०० मीटर अंतरावर शेतात झोपलेल्या अवस्थेत दिसुन आला. तेव्हा रात्रोभर सदर वाघावर क्षेत्रीय कर्मचा-या कडुन पाळत ठेवण्यात आली. व जवळील गांवाना सर्तक करण्यात आले.

दिनांक ०६/०२/२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता ड्रोन व्दारे शेतशिवारात पहाणी केली असता सदर वाघ मिळाला नाही. तेव्हा वडसा, आरमोरी व कुरखेडा येथील वनकर्मचारी मिळुन पाई संयुक्त गस्त केली असता सदर वाघ शिवराजपुर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ९३ मधील मिश्र रोपवनात १५.०० हेक्टर चे पश्चिम दिशेला चेनलिंग फेनसिंगचे आतमध्ये २० मीटर अंतरावर पडलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमदर्शनी पाहता सदर वाघाचे उजव्या पायाला जखम असल्याचे दिसून आले.

दिनांक ०६.०२.२०२४ ते दिनांक ०८.०२.२०२४ पर्यत सदर वाघ त्याच परिसरात होता व तो कोणत्याही प्रकारची शिकार करण्यांस असर्मथ असल्यामुळे दिनांक ०८.०२.२०२४ रोजी सायंकाळी ३.४७ वाजता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख,  अजय मराठे शुटर RRT TATR व त्यांची RRT TATR चमु यांनी सदर वाघास बेशुध्दीचे इंजेक्शन देवुन त्यास पकडले. सदर जखमी वाघास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR तथा RRT TATR प्रमुख यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता त्याला मा. बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा, यांचे मार्गदर्शनाखाली  पवनकुमार जोंग (भा.व.से.) परिविक्षाधिन अधिकारी,  मनोज चव्हाण उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा,  विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा, यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी  कराडे,  तिजारे क्षेत्रसहाय्यक व  गजभिये, वनरक्षक तसेच RRT TATR सदस्य योगेश लाकडे, वसीम शेख, प्रफुल वाडगुरे, गुरुनानक ढोरे, विकास ताजणे, दिपेश टेंभुर्णे, वाहन चालक (RRT), श्री अक्षय दांडेकर,  अमोल कोरपे, वाहन चालक मनन शेख, वाहन चालक, वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

सुमो वाहनाच्या अपघातात चार महिला ठार तर तेरा जन गंभीर


सुमो वाहनाच्या अपघातात चार महिला ठार तर तेरा जन गंभीर

 

ब्रम्हपुरी:-

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील मौजा माहेर येथून वर्धा जिल्ह्यात चना कापायला गेलेल्या 17 महिला काम आटोपून सुमो या वाहनाने परत येत असताना आज दिनाक 8 ला सायंकाळी 7.30 दरम्यान उमरेड तालुक्यातील सिर्सी जवळ वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महीलांचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मारन पावली वाहनाच्या चालकासह 13 महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ब्रम्हपुरी शहराजवळील माहेर येथील 17 महिला या मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चना कापणीच्या कामाला जात होत्या. एक सुमो रोज त्यांना चना कापणी करता घेऊन जात असे व सायंकाळी परत वापस माहेर येथे आणून देत असे रात्रौ चालक वाहनं सोबत माहेर येथे मुक्कामी राहत होता.

मागील काही दिवसा प्रमाणे माहेर येथील 17 महिला आज दिनाक 8 ला पहाटे सुमो या वाहनात बसून पिंपरी या गावी चना कापणीला गेल्या होत्या. सायंकाळी 7.30 वाजता परत येत असताना उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ त्यांच्या वाहनं पलटून गंभीर अपघात झाला. वृत्त लिहे पर्यंत प्राप्त माहिती नुसार अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,संगीता देविदास आडकिने, विना विक्रांत अडकिने, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे
मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजुरकर यांना होताच यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुगणवाहिकेतून तीन महीलाचे शव उमरेड येथे पाठवण्यात आले. उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुरकर जखमी सोबत नागपूरला गेले असून सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. घटनेची माहिती माहेर येथे होताच सर्व गावात शोककळा पसरली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार पाय उतार 


 विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार पाय उतार 


पत्रकार परिषदेतून सुमित सरकार, उपसरपंच प्रभाष सरकार यांच्यासह ग्रा.प. पदाधिकाऱ्यानी दिली माहिती

गडचिरोली/

 प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाल्याने (कायद्यान्वये) प्रशासनाने अपात्र घोषित केले. चामोर्शी तालुक्यातील विक्रमपुर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घरकुल मंजूर करण्याच्या नावाखाली पैसाची मागणी करुन गैरव्यवहार केल्याने कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये, पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने प्रशासनाने, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई यांचे शासन परिपत्रक दिनांक १८/०६/२०११ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे

कलम ३९(१) नुसार सरपंच व सदस्य पदापासून अपात्र घोषित केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले असल्याची माहिती सुमित सरकार, विक्रमपुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रभास सरकार सह ग्रा.प.सदस्यांनी पत्रकार परिषदेतुन दिलेली आहे. सविस्तर वृत्त असे की, सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नवग्राम येथील तरुण तारीनी खॉ यांच्या कडून दहा हजार रुपयांची मागणी केली असता, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली येथील कार्यालयात तक्रार दाखल करुन तडजोडी अंती ९००० रुपये दिनांक ०१/०९/२०२२ ला सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांनी घेतले असता संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हिच बाब लक्षात घेऊन, विक्रमपुर ग्रामपंचायतीचे सुमित सुभाष सरकार यांनी अपर आयुक्त नागपूर विभाग, नागपूर. येथे तक्रार दाखल करून सरपंच्यानी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना पदापासून दुर करण्यात यावे व त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. तेव्हा संबंधित विभागाने दिनांक २९/०१/२०२४ ला अंतिम सुनावणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचा दिनांक १०/११/२०२३ रोजी चा चौकशी अहवाल व अभिप्रायाचे अवलोकन करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांना पुढील कालावधीकरिता सरपंच व सदस्य या पदापासून अपात्र घोषित करण्यात येत आहे. असा आदेश अपर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी दिनांक

०१/०२/२०२४ ला दिलेला असल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. या पत्रकार परिषदेला सुमित सुभाष सरकार, उपसरपंच प्रभास सरकार,तरुण तारीनी खॉ, ग्रा.प.सदस्य दिपकदास, मंजु मिस्त्री, हिरामती गाईन उपस्थित होते.

याबाबत विक्रमपुरचे सरपंच श्रीकांत
ओल्लालवार यांची प्रतिक्रिया,,
प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना संबंधित
प्रशासनाने कोनत्याही प्रकारे माझे
म्हणणे ऐकून न घेता,लोकप्रतिनिधींच्या
दबावामुळे मला दोषी ठरवून अपात्र
करण्यात आले. त्यामुळे माझ्यावर
करण्यात आलेले आरोप सुडभावनेने
चुकीचे आणि निरर्थक असुन राजकीय
द्वेषापोटी करण्यात आलेले आहेत. याबाबत मी संबंधितांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 9, 2024

PostImage

मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा


मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारा
 
शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी 

गडचिरोली:-
 जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील  विविध भागात अपुरी बससेवा, प्रवासी निवाऱ्याचा अभाव, बससेवेअभावी दररोजची पायपीट यामुळे विद्यार्थी,
विद्यार्थिनींची गैरसोय सुरूच आहे. ठिकठिकाणच्या रस्त्यावर उन्हाचे चटके,  पाउस,वारा झेलत कितीतरी तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने आता लालपरीवर  शालेय विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील फाट्यावर  बसच्या प्रतीक्षेत शालेय विद्यार्थिनींना कितीतरी तास थांबावे लागत आहे. त्यात निवारा नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो आहे  तर मार्कंडा कंन्सोबा येथील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आष्टी येथे बसच्या प्रतीक्षेत कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी  लागत आहे.

तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा परिषद शाळा खाजगी संस्थेचे विद्यालये व महाविद्यालय डी .एड, बी एड कॉलेज असल्याने परिसरातील १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील जवळपास २० गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी येथे विद्यार्जन करण्यासाठी येतात. चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली,चंदनखेडी, मार्कंडा कंन्सोबा, लगाम सिंगनपल्ली  या गावातील विद्यार्थ्यांना आष्टी येथे जावे लागते.

आष्टी मधून परत स्वगृही परत जाण्यासाठी बाजूला निवारा आहे, तोही मोडकळीस आलेला आहे व अखेरची घटका मोजत आहे परंतु आष्टी येथून परत जात असताना आष्टी या शहरात  विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेमध्ये तासभराहून अधिक काळ थांबावे लागत आहे, त्या बाजूला विद्यार्थिनींना बसण्याच्या निवारा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी बसण्यासाठी निवारा व्हावा,अशी शालेय विद्यार्थिनींच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांच्याकडून मागणी  केली जात आहे
सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे.  मागील काही काळात प्रवासी निवारा मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर बांधण्यात आला आहे परंतु त्या प्रवासी निवाऱ्याची संपूर्ण दुर्दशा झाली असून बसण्यायोग्यही नाही  उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून बचाव होण्यासाठी आजूबाजूच्या झाडांचा प्रवाशांना आश्रय घेऊन एसटीची प्रतीक्षा करावी लागत असे. एसटी आली की प्रवासी तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एसटी तेथून निघून गेलेली असते. उन्हाळ्यात, तर प्रवाशांना व विध्यार्थांना उन्हापासून बचाव करण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एक तर मार्कंडा कंन्सोबा फाट्यावर तीनही बाजूंनी वाहने आली की मोठ्या प्रमाणावर धुरळा उडतो. नाका-तोंडात धुळीकण जात असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी  शेड उभारण्यात यावा अशीही मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार भास्कर फरकडे यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 7, 2024

PostImage

महसूल विभागाच्या मुख्य लिपीकास लाच घेतांना रंगेहाथ पकडले  कूरखेडा:- 


महसूल विभागाच्या मुख्य लिपीकास लाच घेतांना रंगेहाथ पकडले

 कूरखेडा:- 
 मुख्य लिपिक उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाच घेणारा मुख्य लिपिक नागसेन प्रेमदास वैद्य वय ४६ उपविभागीय कार्यालय कुरखेडा असे असून यांनी १३०००/- हजार रुपयाची लाच स्वरूपात नगद रक्कम स्वीकारतांना एन्टी करप्शन ब्यूरो च्या पथकाने दी.०५/०२/२०२४ ला रंगेहाथ पकडले
तक्ररदार यास आदिवासी ते आदिवासी जमीन विक्री करण्याकरिता परवानगी आदेश तयार करुण दिल्याचा मोबादला म्हणून आरोपी वैद्य यांनी तक्रारदार यांच्या कड़े मागणी केली होती मात्र लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गड़चिरोली येथे भेटून तक्रार नोंदविली 
 पोलिस अधीक्षक श्रीमती अनामीका मिर्झापुरे ला.लू.वी. गड़चिरोली यांच्या पर्यवेक्षनात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रार गोपनीय ठेवत सहानीशा करित कार्यवाही करिता सापळा कार्यवाहीचे आयोजन केले, आरोपी कारकुन ने तक्रार कर्त्याला १५०००/- रुपायाची मागणी केली असता, तक्रार कर्त्याने १३०००/-  रुपये  देण्याची सहमती दर्शवित व दोघांत तडजोड झाल्यावर लाचेची उप विभागीय  कार्यालय येथील  स्वःताच्या कक्षात लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ मिळून आल्याने आरोपी वैद्य त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन कूरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या नंतर आरोपी नागसेन वैद्य यांच्या निवास स्थान वडसा येथे A.C.B च्या अधिकाऱ्यांनी आपल्या चमुसह झड़ती घेतली
या सर्व प्रकरणाची कार्यवाही पोलिस अधीक्षक  राहुल माकनिकर. एन्टी करप्शन ब्यूरो नागपुर,  सचिन कदम पोलिस अधीक्षक ला. प्र.वि. नागपुर, संजय पुरन्दरे अप्पर पोलिस अधीक्षक ला. प्र. वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलिस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगीरीवार, संदीप उडाल, प्रफुल डोर्लीकर, लाच लुचपत प्रतिबंध विभाग गड़चिरोली यांनी केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 3, 2024

PostImage

हुंड्यासाठी केला जाच म्हणून  महिलेने लावला गळफास


हुंड्यासाठी केला जाच म्हणून  महिलेने लावला गळफास

 पती व सासु-सासऱ्याला अटक

पिंपरी :-
 नवीन फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहुन लाखो रुपये आणाण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक केला जाच म्हणून सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सांगवी पोलिसांनी पती व सासु-सासऱ्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी साडेबारा ते दोन या कालावधीत पिंपळे निलख येथील पंचशिलनगर येथे घडली. 

गायत्री किरण माने (वय-26 रा. मुद्रा हाईट्स, पंचशिलनगर, पिंपळे निलख) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत गायत्री यांचे वडिल खंडु उत्तम जाधव (वय-49 रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सासु, सासरे परशुराम दिनकर माने, पती किरण परशुराम माने, नणंद यांच्यावर आयपीसी 306, 498 (अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती, सासू-सासऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 26 वर्षीय मुलीचे आरोपी किरण याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपींनी संगनमत करुन गायत्री हिने नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख आणावेत यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अपमानित केले. तसेच तिला क्रुरपणे व हिनतेची वागणूक दिली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गुरुवारी (दि.1) राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पती, सासु-सासऱ्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खलाटे करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Feb. 3, 2024

PostImage

आशा स्वयंसेविका यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार   -ना. धर्मराव बाबा आत्राम


आशा स्वयंसेविका यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार   -ना. धर्मराव बाबा आत्राम

चामोर्शी:-
  चामोर्शी येथील पंचायत समितीमध्ये आयोजित शासकीय आढावा बैठकी दरम्यान पुष्पा वेंकटी बुर्ले महिला जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड. ,डॉ.नोमेश जुवारे जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड.,डॉ.हेमंत भाकरे जिल्हा संघटन सचिव रा.काँ.पा गड. ,प्रणय बुर्ले विधानसभा अध्यक्ष रा.यु.काँ. गडचिरोली यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांच्या राज्य भर सुरु असलेल्या वेतनवाढ आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले व चर्चा सुद्धा घडवून आणण्यात आली त्यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सोबत बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न  लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.
त्यावेळी तालुक्यातिल संपूर्ण अधिकाऱ्यांसोबत पक्षाचे वैद्यकिय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.मिथुन रायसिडाम,सेवादलचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,बंडू मेश्राम,सागर जांपलवार व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

शेतात ट्रॅक्टर  झाला पलटी चालक जागीच ठार


शेतात ट्रॅक्टर  झाला पलटी चालक जागीच ठार

आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेत शिवारातील घटना.

आरमोरी:-
शेतीकाम करण्यास जात असलेला ट्रॅक्टर शेतात चिखलात फसल्याने, फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात घडली. सूरेश दुधराम लट्ठे (वय ५० वर्षे) रा. ठाणेगाव असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक सुरेश लट्ठे हा दुपारच्या सुमारास ठाणेगाव शेतशिवारातील शेतीकाम करण्यासाठी जात होता दरम्यान ऋषिजी नैताम रा. ठाणेगाव यांच्या शेतात अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसला. त्यावेळी मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरखाली चिखलात दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळी जात पोलिसांना घटनेची माहिती दिली. या माहितीवरून आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल होत इंजिनखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला विच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला.

घटनेचा अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

भरधाव पिकअपच्या धडकेत एका ईसमाचा जागीच मृत्यू 


भरधाव पिकअपच्या धडकेत एका ईसमाचा जागीच मृत्यू 


आष्टी :-
  आष्टी- आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत 60 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.

महादेव मडावी वय 60 वर्ष रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृत ईसमाचे नाव आहे.

शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आष्टीकडून आलापल्ली कडे जाणाऱ्या पिक अप वाहनाने चौडमपल्ली येथे पायी रस्त्याने जात असलेल्या महादेव मडावी यांना जबर धडक दिली. यात महादेव मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पिक अप चालक वाहन घेऊन पसार झाला असून घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी पोहोचले. व मृतकाला शवविच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचा पुढील  तपास आष्टी पोलिस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

नवीन शैक्षणिक धोरणासाठी तयार राहावे --प्रा.डॉ.रुपेंद्र कुमार गौर      


नवीन शैक्षणिक धोरणासाठी तयार राहावे --प्रा.डॉ.रुपेंद्र कुमार गौर      

आष्टी:-

  विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाकरिता तयार राहावे आणि त्यानुसारच येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याला अभ्यासासोबतच त्याच्या कला कौशल्य   याला वाव असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास या शैक्षणिक धोरणात आहे असे मार्गदर्शन प्रा. डॉ. रुपेंद्र कुमार गौर फुले- आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली यांनी महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील नवीन शैक्षणिक धोरण यावरील कार्यशाळेत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. रूपेंद्र कुमार गौर यांनी विविध विषयाला हाताळून विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका- प्रश्न याचे समाधान संवाद साधून केले.  जसे की एकाच वेळी तीन शाखेतील विषय घेतल्यास कोणती पदवी मिळेल, विषय कसे निवडायचे, ऑनलाईन कोर्स कसे करायचे असे एक नाही तर अनेक प्रश्न- संवाद यावेळी विद्यार्थ्यांनी केले आणि त्यांचे समाधान देखील डॉ.रूपेंद्र कुमार गौर यांनी विविध उदाहरणे देऊन समाधान केले. महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले याचा मार्गदर्शना खाली नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय,राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालय, एस चंद्रा महाविद्यालय या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा  डॉ  भारत पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. केशब बैरागी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्राचार्य डॉ. पी.के.,प्रा.नंदकिशोर पडोळे प्रा.डॉ.प्रदीप कश्यप, डॉ. एम. के. सिंग,प्रा. ओ. पी. सिंग, प्रा. इंगोले, प्रा. टिकले, प्रा. घोगडे, प्रा. पी. एम. झाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळेला डॉ. केशब बैरागी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी देखील विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्यांचे समाधान केले व नवीन शैक्षणिक धोरण कसे युवा पिढीला हिताचे आहे याविषयी उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून प्रा. डॉ. भारत पांडे यांनी देखील   विद्यार्थ्यांच्या स्थानिक उदाहरणे देऊन कला कौशल्याला कसा वाव आहे नवीन पिढी शिकल्यानंतर बेरोजगार राहणार नाही आणि ही संधी या नवीन शैक्षणिक धोरणात आहे याविषयी मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ.गणेश खुणे यांनी तर प्रस्ताविक प्रा. डॉ. रवी शास्त्रकार यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रा.रवी गजभिये यांनी केले त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. राज मुसणे,प्रा.ज्योती बोभाटे,प्रा. बल्की,प्रा.नाशिका गबणे यांनी केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2024

PostImage

सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम -         माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार


सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम -         माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार


आष्टी (प्रतिनिधी)##
 प्रतिकूल परिस्थितीत शाळेचा विकास घडवून शाळेला नावलौकिक प्राप्त झाला .स्नेहसंमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.शाळा हे सुसंकृत पिढी घडविण्याचे माध्यम आहे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांनी केले.                                    राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.      अध्यक्षस्थानी आष्टी च्या सरपंच बेबीताई बुरांडे या होत्या तर
 तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अर्जुन दाते ,सेवानिवृत्त प्राचार्य महादेव उरकुडे ,माजी पोलीस पाटील शंकर मारशेट्टीवार , माजी उपसरपंच सुंदरदास उंदिरवाडे , प्राचार्य एन.एस.बोरकुटे , मुख्याध्यापक केशव खेवले , प्राचार्य डी.डी.रॉय  , प्रभारी प्राचार्य रमण पडिशालवार , गोसावी गोंगले आदी मान्यवर उपस्थित होते.  
सुरवातीला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज ,स्व.राजे सत्यवानराव महाराज , माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
पुढे बोलतांना प्राचार्य दोंतुलवार म्हणाले या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर , इंजिनिअर झाले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन यश प्राप्त करावे.        प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी प्राचार्य दाते म्हणाले नागरिकांनी इंग्रजी शाळेच्या मागे न लागता मराठी शाळेतूनच मुलांना शिक्षण द्यावे .या शाळेतील बरेच विद्यार्थी उच्च पदावर पोहचले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी प्राचार्य उरकुडे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेऊन चांगला विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा. सांस्कृतिक कार्यक्रमात आपली छाप उमटवून  व शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर पोहचून शाळेचा  नावलौकिक करावे. 
याप्रसंगी वर्षभर शाळेमध्ये राबविलेल्या स्पर्धेतील  वाचन स्पर्धा , वर्ग सजावट , भाषण स्पर्धा , निबंध स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , आदर्श वर्ग स्पर्धा , आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.डी.रॉय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिता नलोडे व प्रा.नारायण सालूरकर यांनी केले 
तर आभार प्रदर्शन सुधीर फरकाडे यांनी केले.
कार्यक्रमाला पालक ,गावातील नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
    सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक अरुण नागुलवार ,  शिक्षक कृष्णाजी पारखी , शिक्षिका छाया नागुलवार , शिक्षक बाबुराव कत्रोजवार , किशोर गोविंदवार , शिक्षक मंडल , लिपिक बंडोपंत मलेलवार , लिपिक गेडाम , शिपाई बंडोपंत अमलपुरीवार यांचा सत्कार करण्यात आला


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2024

PostImage

पैठणीचा जिंकू मान,हळदी कुंकवाचे लुटू वाण  ! असा कार्यक्रम अहेरी नगरीत प्रथमच


पैठणीचा जिंकू मान,हळदी कुंकवाचे लुटू वाण  ! असा कार्यक्रम अहेरी नगरीत प्रथमच


अहेरी :-
 अहेरी नगरीत प्रथमच महिलांच्या सन्मानार्थ पैठणीचा जिंकू मान, हळदी कुंकवाचे लुटू वाण हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या  भाग्यश्री हलगेकर (आत्राम) यांच्या नेतृत्वात आज  30 जानेवारी ला एक आगळावेगळा कार्यक्रम  घेण्यात आला सदर कार्यक्रमात पैठणीचा जिंकू मान, हळदी कुंकवाचे लुटू वाण ,महिला भगिनींचा करू सन्मान आनंदाला येई उधान" या संकल्पनेला डोळ्यासमोर ठेवून लकी ड्रॉ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम   इंडियन पॅलेस फंक्शन हॉल अहेरी येथे आयोजित करण्यात आला.यात 24 महिलांना प्रत्येकी एक पैठणी तर प्रथम विजेत्या महिलेला एक सोन्याची नथ व एक नाशिक येवला येथील पैठणी बक्षीसाच्या स्वरूपात देण्यात आली व  इतर उपस्थित जवळपास 1000 महिलांना एक साडी वाण म्हणून देण्यात आले व यात विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांचा स्वांत्वन देखील करण्यात आले ज्यात शहीद जवानांच्या पत्नी सुद्धा उपस्थित झाल्या होत्या सदर कार्यक्रमाला गानली समाज संघटना अहेरी यांनी सुद्धा   सच्छिदा  भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली  सदर कार्यक्रमला सौ सारिका गटपल्लीवार अहेरी तालुका महिला अध्यक्ष, ज्ञान कुमारी कौशी, गीताताई दुर्गे,  स्मिता निमसरकार, मायाताई सुनतकर, जयश्री चिदलवार, लईझा   तालुरकर , पोटदुखे मॅडम, पडालवार ताई, रमा गट्टूवार, सुवर्णाताई  पुसालवार, पुष्पाताई अलोने,  सुवर्णाताई सडमेक, पद्मीनीताई आत्राम, सुचीताताई खोब्रागडे, पूर्वा डोंतुलवार या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच संपूर्ण तालुकाध्यक्ष तसेच इतर महिला भगिनी  मोठ्या संख्येने  उपस्थित झाल्या.  सौ. सारिका ताई गडपल्ली वार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अहेरी यांनी सर्वांचे आभार मानले


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2024

PostImage

कोरंबी ग्रामस्थांनी वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण कामाचे केले उद्घाटन


कोरंबी ग्रामस्थांनी वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण कामाचे केले उद्घाटन


                         

नागभीड --:
सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा  कोरंबी ता. नागभीड च्या वतीने सामूहिक वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण कामाचा शुभारंभ तसेच सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे कार्यालयाचे उद्घाटन दिनांक २९जानेवारी २०२४ रोजी दिलीप गोडे आणि डॉ  किशोर मोघेयांचे हस्ते समन्न झाला आहे.
वनहक्क कायदा 2006 अंतर्गत समूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना 30 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णय नुसार रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळाली आहे. सदर शासन निर्णयान्वये ग्रामसभा कोरंबी ला वनहक्का क्षेत्रात वृक्षारोपण  कामासाठी रु. ४६७८३४८रुपयांची निधीस तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी प्रशासकीय मान्यता नुकतीच दिली आहे. या वृक्षारोपण कामाला सुरुवात करण्याचे हेतूने वृक्षारोपण शुभारंभ कार्यकामाचे आयोजन समूहिक वनहक्क समिती कोरंबी च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी हनुमान मंदिर पासून एक पालखी तयार करून वृक्ष दिंडी,लेझीम,भजन व बँड पथकासह पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.  तसेच  पुष्पगुश्चाने दिलीपजी गोडे, कार्यकारी संचालक विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर , डॉ किशोरजी मोघे ,संस्थापक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ, गुणवंत वैद्य, रुपचंदजी दखने कुरखेडा यांचा सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी केशव जांभुळे , अध्यक्ष सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती कोरंबी, डॅनिअल देशमुख, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कोरंबी,यशवंत मेश्राम, सरपंच मांगरूड,  रिवॉर्ड्स संस्थेचे समन्वयक भोजराज नवघडे, कैलास नन्नावरे, , ग्रुप ऑफ ग्रामसभा नागभीड चे सचिव मनोहर मगरे, कोरंबी ग्रामसभेचे सल्लागार केशव खंडाते, प्रफुल मसराम,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे कार्यकारी संचालक दिलीप गोडे आणि  किशोरजी मोघे ,संस्थापक ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ यांच्या हस्ते वृक्ष रोपण व कार्यालयाचे उद्घाटन करून सुभारंभ करण्यात  आले. प्रमुख ग्रामस्थांना   प्रमुख अतिथीची समयोचित मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत गीत जिहा परिषद शाळा कोरंबी यांनी सादर केले,  संचालन शंकर नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॅनिअल देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समूहिक वनहक्क समितीचे सर्व पदाधिकारी, महिला प्रतिनिधींनी तसेच सर्व कोरंबी वासियानी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2024

PostImage

माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार


माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार

गडचिरोली:-

माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे 
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली मार्फत आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कुरुडचे उपक्रमशील मुख्याध्यापक वकील शेख यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.वकील शेख यांनी जिल्हास्तरावर सादर केलेल्या 'माझी तंबाखूमुक्त आदर्श शाळा' या नव उपक्रमास माध्यमिक गटातून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.वकील शेख यांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर दखल घेतली जात आहे.
     जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या सभागृह मध्ये प्राचार्य  धनंजय चाफले यांच्या हस्ते आणि अधिव्याख्याता  डाॅ.विनीत मत्ते,अधिव्याख्याता  पुनित मातकर,अधिव्याख्याता वैशाली येग्लोपवार ,विषय सहाय्यक  डाॅ.विजय रामटेके यांच्या‌ प्रमुख उपस्थित पुरस्कार‌ सोहळा पार पडला.मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे अधिव्याख्याता तथा आदर्श शाळेचे जिल्हा समन्वय  गुलाबराव राठोड,व्यवसाय समुपदेशक डाॅ. प्रभाकर साखरे आणि शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वकील शेख यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2024

PostImage

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी धम्माची चळवळ अधिक गतिमान करावी-  सोपानदेव मशाखेत्री. 


विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी धम्माची चळवळ अधिक गतिमान करावी-  सोपानदेव मशाखेत्री. 

अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक

भारत बौद्धमय करीन, या  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी समस्त बौद्ध बांधवांनी धम्माची चळवळ अधिक गतिमान करून धम्म अनुसरण करावे असे मौलिक  विचार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोलीचे विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांनी केले .येणापूर येथील पंचशील बुद्ध विहारात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्ह्याचे वतीने चामोर्शी  तालुका कार्यकारिणी गठीत कमिटीच्या सभेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते .सभेचे अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त नायब तहसीलदार आर.डी. राऊत होते. तर प्रमुख अतिथी काका गडकरी जिल्हा संस्कर प्रमुख, राधाताई नांदगाये जिल्हा महिला प्रमुख, खेमराज  सोरते गडचिरोली तालुका सचिव उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमांन समोर दीप प्रज्वलित करून बुद्ध वंदना घेण्यात आली .व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांचे सहमतीने चामोर्शी तालुका दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून वसंत  रामटेके, उपाध्यक्ष ॲड. दिनेश राऊत, महिलांच्या उपाध्यक्ष प्रतिभा कोरडे, कार्याध्यक्ष ईश्वर झाडे, सचिव विजय मेश्राम, कोषाध्यक्ष हेमंत पेटकर, सहसचिव प्रदीप सोरते, संस्कार प्रमुख छत्रपती चूनारकर ,संघटक दिलीप खोब्रागडे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली .सभेला बहुसंख्य उपासक आणि उपासिका हजर होते . धम्माचे महत्त्व व उपासकांचे कर्तव्य यावर  काका गडकरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच राधाताई नांदगाये यांनी  धम्मोपदेशाची महती विशद केली. सभेचे संचालन अंकुश निमसरकार यांनी केले. आणि आभार ईश्वर झाडे यांनी मानले. यावेळी महिला तालुकाध्यक्ष सारिका गोंगले यांची सुद्धा निवड करण्यात आली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

हृदयद्रावक स्वतःच्या पोटच्या मुलाला शितपेयात विष देऊन बापाने घेतला जीव 


हृदयद्रावक
स्वतःच्या पोटच्या मुलाला शितपेयात विष देऊन बापाने घेतला जीव 

सोलापूर :-
जन्मदात्या बापानेच मुलाला शितपेयात विष देऊन जीव घेतला असल्याची घटना घडली आहे सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एका लहान मुलगा पडून असल्याचे दिसून आले होते. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होत. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वय- १४ वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर अशी पटली.

आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनस्थळ पर्यंतचे सिसी टीव्ही फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांसोबत सतत खोड्या करायचा व त्याचे शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरुन वरील वेळी व ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मोटार सायकलवर घेवून जावुन त्यास शितपेयात सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून मुलगा विशाल यास पाजुन जिवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोलिस निरीक्षक जगताप हे करत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

घोट पोलीस स्टेशनच्या वतीने तीन आदिवासी आश्रमशाळेत विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सम्पन्न


घोट पोलीस स्टेशनच्या वतीने तीन आदिवासी आश्रमशाळेत विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सम्पन्न


अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक 

आष्टी:-
 जिल्हा पोलीस प्रशासना अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक  निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक  कुमार चिंता ,अप्पर पोलीस अधीक्षक  यतीश देशमुख  व  उपविभागीय पोलीस अधिकारी  मयूर भुजबळ  गडचिरोली यांचे मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाडबडी, स्वर्गवासी वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळा रेखेगाव, स्वर्गवासी सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव येथे   प्रयास उपक्रमा अंतर्गत वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा  परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
  सदर स्पर्धा परीक्षेला मौजा भाडबडी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता  पाचवी ते दहावीचे 218 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच स्वर्गवासी वसंतराव नाईक व स्वर्गवासी सूरजमल चव्हाण प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा रेखेगाव येथील 117 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 
  गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रयास उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञानावर आधारित  दररोज दहा प्रश्न  दिले जातात व त्याच प्रश्नांवर आधारित तिमाही स्पर्धा परीक्षा घेतली जात असते. व आज रोजी आयोजित वीर बाबुराव शेडमाके सामान्यज्ञान स्पर्धेकरिता पोलीस मदत केंद्र घोट हद्दीतील 02 आश्रम शाळेतील  एकूण 335 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन परीक्षेला चांगला प्रतिसाद दिला.
    सदर परीक्षा ही पोलीस मदत केंद्र घोट चे प्रभारी अधिकारी सपोनि नितेश गोहने व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाडभीडीचे मुख्याध्यापक  मैंद तसेच शाळेतील शिक्षक वृंद, व पोलीस स्टाफ यांचे उपस्थितीत शांततेत पार पडली.
 परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले की, प्रयास उपक्रम हा खूप सुंदर उपक्रम असून विद्यार्थ्यांची ज्ञान क्षमता वाढवण्याचे हे एक उत्तम साधन असून यानंतर सुद्धा असेच उपक्रम राबवावे व  परीक्षेचे आयोजन करावे असे मनोगत व्यक्त करून  विद्यार्थ्यांनी  गडचिरोली पोलीस दलाचे व पोलीस मदत केंद्र घोट चे आभार मानले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

गडचिरोली पोलीसांनी केली नागपूर येथील खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद


गडचिरोली पोलीसांनी केली नागपूर येथील खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद 

 

 गडचिरोली : -
 येथील एका शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावून त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली.  तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील गवई (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास 28,000/- रुपये तसेच 2 ते 3 लाख रुपये नगदी पेड केले असल्याचे भासविले असता, सर्व आरोपीतांनी संगणमताने बेकायेदेशिरित्या गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचुन फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोधर राहीली आहे असा खोटा आरोप लावुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर जबरदस्ती केली असल्याच्या तोंडी रिपोर्ट वरुन अप क्र. 60/2024 कलम 384, 389, 120 (ब) भादवि अन्वये पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला. 
सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशिर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन गुन्ह्रातील आरोपी नामे 1) सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, 2) रवीकांत कांबळे रा. नागपूर, 3) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर 4) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले.  तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे.  वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली आहे.  सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2024

PostImage

संत्रानगरी नागपूर येथे युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार


संत्रानगरी नागपूर येथे युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार


आष्टी:-
संत्रानगरी नागपूर येथे युवा कवी लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला 
मैत्रिकट्टा कवी मनाचा साहित्य समूह संभाजीनगर द्वारा आयोजित दुसरे मैत्रिकट्टा साहित्य संमेलन २०२४ नागपूर येथे दिनांक २८.०१.२०२४ रोजी पुस्तक प्रकाशन सोहळा, पुरस्कार सोहळा अशा विविध सत्रात राज्यभरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.   त्यात गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक या खेळेगावचे युवा कवी, लेखक. प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील साहित्यसंमेलनात सहभाग होता. त्यांनी आपली स्वलिखित "विचार केलास का कधी...?" प्रेमीयुगलांना हेलावून सोडणारी हृदयस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व मान्यवर, कवी, कवयित्री व जमलेल्या संपूर्ण रसिक वर्गाच्या टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकून घेतली.
 त्यांचा असा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहुन उपस्थित मान्यवर कवी संमेलनाध्यक्ष मा. वैभव धर्माधिकारी पुणे (व्याख्याते तथा सदस्य साहित्य विचारपीठ मुंबई), संमेलनाध्यक्ष मा. अशोक कांबळे (ज्येष्ठ साहित्यिक नागपूर) व विशेष अतिथी म्हणून लाभलेले प्रसिद्ध कवी, राज्य साथरोग शास्त्रज्ञ, फँड्री चित्रपटातील कलाकार, नागराज मंजुळे यांचे जिवलग मित्र मा. डॉ. प्रदिप आयटे सर यांच्या हातुन सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल त्यांचे आप्तजन, मित्रपरिवार, साहित्यिक सहकारी व गाववासीयांत आनंदाचा, आपुलकीचा, गर्वाचा गंध दरवळत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2024

PostImage

दत्तक घेतले खासदारानी गाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे  - महेंद्र ब्राह्मणवाडे


दत्तक घेतले खासदारानी गाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे  - महेंद्र ब्राह्मणवाडे

 

गडचिरोली :-
 मागील दहा वर्षापासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, जिल्ह्यातील विद्यमान खासदार अशोक नेते हे भाजपचे आहे खासदारानी दत्तक ग्राम योजने अंतर्गत तालुक्यातील येवली गाव दत्तक घेतले. त्याअर्थी  गावातील युवक, महिला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या खासदाराचे गाव असल्याने गावाचा विकास होईल, गावात विकासाची गंगा वाहू लागेल, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील असे वाटतं होते मात्र मागील 10 वर्षात या उलट झाले, ना गावाला कोणतीही विशिष्ट ओळख मिळाली नाही कोणत्या तरुणाना रोजगार मिळाले नाही खासदार अशोक नेते तर साधे गावात भेटी सुद्धा दिल्या की नाही याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शंका उपस्थिती केली आहे.
ओबीसी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या  मतांसाठी भाजप राजकारण करीत आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे असा आरोपही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केला, जय सियाराम कबड्डी क्लब येवली च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनिय सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जितेंद्र मुनघाटे, ग्रा.प. शिवनीचे सरपंच किरण ताटपल्लीवार , ग्रा.प.सदस्य चोखाजी बांबोळे, चोखाजी भांडेकर, मोरेश्वर भांडेकर,  जितेंद्र मुनघाटे, नितेश राठोड, ग्रा.प.सदस्य प्रकाश गेडाम, विजय सोमनकर, से.निवृत्त पोलीस मेश्रामजी, भीमराव मेश्राम, सेमसर, गेडाम, मंडळाचे अध्यक्ष विजय भोयर, प्रमोद पिपरे, संदीप ठाकरे, राहुल काळे, ज्ञानदीप कुद्रपवार, राकेश भोयर, सुशील शर्मा, हर्षद गोहणे, मयूर भोयर, विजय भोयर, स्वप्नील भांडेकर, सुरेश पेडपल्लीवार, निखिल पुण्यप्रेडीवार, सुरज मेश्राम, वृषभ धात्रक, वृषभ भोयर, आदी बहुसंख्येने गावातील नागरिक , खेळाडू उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2024

PostImage

बहुजनवादी राजकारण हाच सक्षम पर्याय - ॲड. सुरेश माने


 

बहुजनवादी राजकारण हाच सक्षम पर्याय - ॲड. सुरेश माने 

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी जनविरोधी धोरणांना शह देण्यासाठी बहुजनवादी राजकारण करणे हाच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे स्पष्ट वैचारीक भूमिका असणाऱ्या पक्षांची आघाडी असणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केले. 

बिआरएसपीच्या कार्यकर्ता बैठकीनिमित्य ॲड. सुरेश माने गडचिरोलीत आले होते. त्यानिमित्त त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यादरम्यान चर्चा करतांना ते म्हणाले की, देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी अजेंड्याला सामान्य जनता कंटाळली आहे. अशावेळी प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेसने सर्वांना एकत्र घेवून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. तसे झाले नाही तर किमान प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील बहुजनवादी विचारांच्या पक्षांनी स्पष्ट भूमिका घेवून निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरील बांधणीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते यांनी ॲड.सुरेश माने यांचे शेकापच्या वतीने स्वागत केले. यावेळी बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ॲड. विशेष फुटाणे, प्रदेश सचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, दिक्षा रामटेके, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2024

PostImage

पत्त्यांचा जुगार खेळणे पडले महागात,अडकले पोलीसांच्या जाळ्यात


पत्त्यांचा जुगार खेळणे पडले महागात,अडकले पोलीसांच्या जाळ्यात

भद्रावती :-
तालुक्यातील तांडा गावामागील जंगलात सुरू असलेल्या एका जुगारावर भद्रावती पोलिसांनी धाड टाकीत जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती भद्रावती पोलिसां तर्फे देण्यात आली. सदर कारवाई 26 जानेवारीला तांडा गावाजवळील जंगलात करण्यात आली. सदर घटनेत चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गोपनीय माहिती द्वारे तांडा गावाच्या मागच्या भागातील जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना केले. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांपैकी काही जुगारी जंगलात पळून गेले तर आठ जुगारी पोलिसांच्या हाती लागले. या कारवाई जुगारातील पैसे व आठ मोटरसायकली असा चार लक्ष 62 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. सदर आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, कोल्हे तथा इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली


PostImage

Vaingangavarta19

Jan. 27, 2024

PostImage

गणपूर नाव दुर्घटनेतील तिन महिलांचे मृतदेह शोधण्यात आष्टी पोलीसांना आले यश


गणपूर नाव दुर्घटनेतील तिन महिलांचे मृतदेह शोधण्यात आष्टी पोलीसांना आले यश

शुक्रवारी मायाबाई राऊत हिचा मृतदेह लागला हाती

 

आष्टी:- दिनांक:-26/01/2024 तालुक्यातील गणपूर येथिल सहा महिलांचा 23 जानेवारी मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून दुर्दैवी मृत्यू झाला. नावेने चंद्रपुर जिह्यातील गावात मिर्ची तोडण्यासाठी या शेतमजूर महीला जात होत्या. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सहा पैकी दोन महिलांचा मृतदेह 23 जाने ला संध्याकाळी शोधून काढण्यात यश आले तर तिसरा मृतदेह 24 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मिळाला. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने इतर तीन मृतदेह शोधून काढण्याचे शोधपथकासमोर फार मोठे आवाहन होते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे मृतदेह जैरामपूर, रामपूर लगतच्या नदीपात्रात वाहून आल्याची शक्यता लक्षात घेऊन आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह नदीपात्रात शोधपथकासोबत सकाळपासूनच मोहीम राबविली व अथक परिश्रम घेतले दिनांक 25 जानेवारी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सुषमा राउत व साडेतिन वाजताच्या सुमारास बुधाबाई राऊत या दोन महीलांचे मृतदेह शोधून काढण्यात यश आलें. रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली आज दिनांक 26 जा नेवारी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम राबविली गेली सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण अणि पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले हे आपल्या पथकासह वैनगंगा नदीच्या पाण्यात पोहून नदीपात्रात शोधमोहीम राबविली असता शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मायाबाई अशोक राऊत हिचा मृतदेह जैरामपुर
नदीघाटावर शोधण्यात यश आले.

आष्टी ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या जैरामपुर नदीघाटात तीन महिलांच्या मृतदेहांचा शोध लावण्यासाठी आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्या मार्गदर्शनात श्री वाकुडकर, प्रशांत चुदरी, व विश्वनाथ पोतराजे या पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2024

PostImage

महसूल विभागातील*अव्वल कारकून व मंडळ अधिकारी बणनार नायब तहसिलदार


*महसूल विभागातील*अव्वल कारकून व मंडळ अधिकारी बणनार नायब तहसिलदार*

 *३०६ जणांना पदोन्नतीने पदस्थापना*

 

मुंबई,
 एकीकडे राज्याच्या महसूल विभागात आधुनिकता आणत असताना विभागातील अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीने पदस्थापना देत  सुंदर मेळ साधला आहे.  आज महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे., अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

राज्याच्या कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपुर या महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. 
छत्रपती संभाजीनगर विभागात (छत्रपती संभाजीनगर 8, जालना 5, परभणी16, हिंगोली4 , बीड 5, लातूर 5  , धाराशिव 8, नांदेड 8) एकूण 59.
अमरावती विभागात (अमरावती 14, अकोला 10, बुलडाणा 14, वाशिम 7, यवतमाळ 6) एकूण 52
नागपुर विभागात (नागपुर 12, भंडारा 4, गोंदिया 6, चंद्रपुर 18, गडचिरोली 13, वर्धा 4) एकूण 57
नाशिक विभागात(नाशिक 9, अहमदनगर 10, जळगाव.9, धुळे 4, नंदुरबार4) एकूण 36
कोकण विभागात (मुंबई शहर 13, मुंबई उपनगर 22, ठाणे 17, पालघर 9, रायगड 19, रत्नागिरी 13, सिंधुदुर्ग  6, विभागीय आयुक्त कोंकण यांचे कार्यालय 2, राज्य निवडणूक आयोग 1) एकूण 102
०००००
*जनसंपर्क विभाग (महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई)*


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

आता सचिन कसे सांभाळणार  दिड वर्ष व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना


आता सचिन कसे सांभाळणार  दिड वर्ष व नऊ महिन्याच्या चिमुकल्यांना

आई व आजीचे सुद्धा एकाच वेळी निधन 

आष्टी 
चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील सात महीला मिर्ची तोडण्यासाठी शेजारी चंद्रपूर जिल्ह्यातील गावात जाण्यासाठी दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी वैनगंगा नदीतून नावेने जाण्यासाठी निघाल्या. मात्र नावेत क्षमतेपेक्षा जास्त जण झाल्याने नाव नदीत उलटली यात सहा महिलांना जलसमाधी मिळाली तर एका महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. नावाडी मात्र सुखरूप बाहेर आला. या घटनेने गणपुर गावावर शोककळा पसरली असुन तिन महिलांचे मृतदेह हाती लागले असून तीन महिलांचा शोध घेणे सूरू आहे.

या दुर्दैवी घटनेत गणपुर येथिल राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सासू मायाबाई राऊत वय 45 वर्ष सून सुषमा राऊत वय 25 वर्ष या दोघींचाही करुण अंत झाला. माया राउत या सुखरूप बचावल्या होत्या मात्र सुनेला वाचविण्यासाठी हात देत असतानाच पाण्याच्या प्रवाहात त्याही वाहून गेल्या. सचिन राऊत यांच्यावर आई आणि पत्नी यांच्या निधनानं दुहेरी संकट कोसळले असुन सुषमा हीला नऊ महिन्यांचा व दीड वर्षाचा अशी दोन मुल आहे. आता ही लहानगी मुले आजी आणि आईच्या प्रेमाला पोरखी झाली आहेत. या घटनेची माहिती कळताच सचिन हा सैरभर होवुन नदीच्या दिशेने सुसाट निघाला पण आई अणि पत्नीला वैनगंगेने आपल्या कुशीत घेतल्याने त्याच्या दुःखाला पारावार उरला नाही. नदीकिनाऱ्यावरील शोकमग्न वातावरण पाहून उपस्थितांची मन गहिवरून आली होती. गाव शोकसागरात बुडाले तर नातेवाईकांनी गणपुरच्या दिशेने धाव घेतली. आतापर्यंत जिजाबाई राऊत, पुष्पा झाडे, आणि रेवांता झाडे या तीन महिलांचे मृतदेह हाती लागले अन्य तीन महिलांच्या शोधासाठी पोलिसांनी नावेच्या सहायाने शोधमोहीम युद्धपातळीवर राबवित असुन मृतकांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडल्याने सारे गाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर  पोलिसांची कारवाई


अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर  पोलिसांची कारवाई

विस लाख विस हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह मजूर पोलीसांच्या ताब्यात 


भद्रावती:-
 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावाच्या नजीक असलेल्या नाल्यामधून रेतीची ट्रॉक्टरने तस्करी करीत असताना पोलिसांनी पकडले व कारवाई करण्यात आली आहे

मांगली नाल्यात भरपुर मोठ्या प्रमाणावर नैसर्गीक रेतीचा साठा असल्याने त्या नाल्यामधून रात्रीदरम्यान रेती तस्करांकडुन अवैद्यरित्या रेतीची सतत चोरी होत असल्याची माहीती दिनांक २४/०१/२०२४ चे रात्रौदरम्यान 'भद्रावती पोलीसांना प्राप्त झाली होती 

त्या अनुशंगाने भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी रेती तस्करांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन भद्रावती येथील सपोनि राहुल एस किटे  पोहवा धर्मराज मुंडे ,चालक पो. हवा. जगदिप, नापोअ जगदिश झाडे, नापोअ निकेष बेंगे, ना.पो.अ. विष्वनाथ चुदरी यांचे पथक तयार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यावरून दिनांक २४/०१/२४ रोजी मांगली येथील नाल्याजवळ रात्रौदरम्यान पंचासह सापळा रचुन मांगली नाल्यामधुन एकापाठोपाठ एक असे एकुण चार ट्रॅक्टर येत असतांना दिसल्याने त्यांना नाल्यामध्येच थांबवुन पंचासमक्ष ट्रॅक्टरची पाहणी केल असता त्यामध्ये प्रत्येकी १ ब्रास प्रमाणे एकुण ४ ट्रॅक्टरमध्ये ४ ब्रास रेती अवैद्यरित्या चोरी करून घेवुन जात असतांना मिळुन आले

 त्यावरुन विना क्रमांचा एक महिंद्रा ट्रॉक्टर, MH 29 V1713, 
 MH 32 B 1177 व लाल रंगाची ट्रॉली MH 34 L 9081, MH 36L2151, असे चार वाहन व आरोपी १) प्रजीत सुभाष खामनकर वय २६ वर्ष  २) समीर बंडू चौधरी वय २१ वर्ष  ३) आशिक नामदेव कोटनाके वय २८ वर्ष , ४) विकास भिमराव कोटनाके वय ३० वर्ष ५) महेन्द्र महादेव बोढेकर, वय २४ वर्ष,  व मजूर रितीक अजाब पाटील, वय २१ वर्ष, सनी कमलाकर कुमरे, वय २४ वर्ष , मनोहर चिंदु
कोटनाके, वय ४० वर्ष , अमोल परशुराम कोटनाके, वय ३० वर्ष ,  तुकाराम अशोक बोढेकर, वय २९ वर्ष, गणेश वसंता डेंगळे, वय ३० वर्ष, सर्व रा.मांगली  व पाहीजे असलेले ट्रॅक्टर मालक आरोपी नामे राकेश कामटकर रा. सुमठाना भद्रावती ,रूपेश उरकुडे रा. सुमठाना भद्रावती , श्रीकृष्ण जिवतोडे रा. गवराळा भद्रावती , भारत बोढेकर रा. मांगली ता. भद्रावती त्यांचेवर कलम ३७९,३४. भा.दं. वि. प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो


धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो

लिंक फेल चे कारण दाखवून आँनलाईन ची सुविधा केली बंद

गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांना महामंडळात धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो पहायला दिसून येते आहे व लिंक फेल आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथील कार्यालयात त्यांनी आपला कर्मचारी ठेवने बंद केले आहे
गडचिरोली तालुक्यातील दोन ते तीन हजार शेतकरी अजूनही सातबारा आँनलाईन करण्यापासून वंचित ठेवले आहेत मात्र दि १६ जानेवारी पासून ते शासनाने ३१ जानेवारी ही मुदत वाढवून देण्यात आली असली तरी फेडरेशन ने १६ जानेवारी पासून ते २३ जानेवारी पर्यंत एकही सातबारा आँनलाईन केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे 
दररोज नित्य नेमाने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथील कार्यालयात येतात व दिवसभर भुकेताहनेने थांबून सायंकाळी आल्या पावली परत जाताना दिसून येते आहे
शासनाने या बाबीची दखल घेउन तात्काळ लिंक सुरू करुन द्यावी किंवा ती सुरुच असेलच तर फेडरेशन ला ते करवून घेतले पाहिजे तसे होत नसल्यास ऑफलाईन फार्म स्विकारून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Jan. 24, 2024

PostImage

पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार


पैशाच्या हव्यासापोटी काकूने दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन केले ठार

 

 

 

 बीड:- 

एका लालची काकुने आपल्याच दोन चिमुकल्या पुतण्यांना विष देऊन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेनंतर बीड गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या असून 20 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. तनूजा वय 2 वर्ष किशोर अमोल भावले वय 13 महिने अशी मृत बालकांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असं आरोपी काकूचे नाव आहे.

 

 

प्राप्त माहितीनुसार, ही खळबळजनक घटना 29 डिसेंबर 2023 रोजी घडली होती. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या दोन भांवडाची पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे समोर आले आहे. 29 डिसेंबरच्या दुपारी अचानक उलट्या सुरु झाल्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. किशोरला बीडच्या रुग्णालयात तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

 

या प्रकरणात सुरुवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी ही घटना हत्येची असल्याचे समोर आले. पोलिसांनी घरात चौकशी सुरु केली आणि तपास करीत असताना त्यांना आरोपींचा शोध लागला

 काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही म्हणून तिने बदला घेण्याचा चंग बांधला होता. त्यांनी बदला घेण्यासाठी सुखदेव ची सुन स्वाती हिला चार लाख रुपयांचे व त्या घरची मालकीण होण्याचे स्वप्न दाखविले तुने तुझ्या पुतण्यांना ठार केल्यास कुनालाही संशय येणार नाही असीही खात्री दिली त्यामुळे सखुबाई च्या आमिश्याला बळी पडून स्वातीने आपल्या दोन लहान चिमुकल्या पुतण्यांना उंदिर मारण्याचे औषध चाटविले

 असे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

 

 सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणून दिलेले उंदिर मारण्याच्या व्यूबमधील औषध स्वाती हिने बोटाने काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले, त्यानंतर त्यांना उलव्या झाल्या आणि उपचारा सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला. अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून सखुबाई भावले, स्वाती उमाजी भावले यांच्याविरूध्द कलम 302, 102-ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.