आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
29-03-2025
सुरक्षादलाने चकमकीत केले १६ नक्षलवाद्यांना ठार
सुकमा : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाने आक्रमक कारवाया करत नक्षलवाद्यांना जेरीस आणले आहे. दरम्यान आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आणखी एक मोठी कारवाई करत १६ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. शनिवारी छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. तर या चकमकीत दोन जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलात झाली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा रिझर्व्ह गार्ड आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या भागात नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
१६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर सीआरपीएफच्या दोन जवानांना किरकोळ जखम झाली आहे. सुकमा जिल्ह्यातील केरलापाल क्षेत्रात नक्षलवादी असल्याचा सूचना २८ मार्च रोजी डीआरजी आणि सीआरपीएफ यांच्या दलाने ही संयुक्त कारवाई केली. नक्षल्यांसोबत चकमक सुरू झाली. गोळीबाराने हा संपूर्ण परिसर दणाणून गेला.
२० मार्चला बीजापूरमध्ये ३० नक्षलवादी ठार
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात पोलीसांनी मोठी मोहीम सुरु केली आहे. २० मार्च रोजी पोलीस आणि संयुक्त सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेत नक्षलवाद्यांवर प्रहार करण्यात आला. गंगालूर पीएस लिमिटजवळ बीजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले होते. याठिकाणी जवळपास ४५ नक्षलवादी होते. शोध मोहिमेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा मिळाला. या चकमकीत बीजापूर डीआरजीचा एक जवान शहीद झाला.
२० मार्च रोजी नक्षलवादी चकमकीनंतर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देश लवकरच नक्षलवाद मुक्त करण्याचे सूतोवाच केले होते. त्यांनी एक्सवर याविषयी पोस्ट लिहिली होती. नक्षलवाद मुक्त भारत अभियानात आपल्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. बीजापूर आणि कांकेर या दोन ठिकाणी दोन सशस्त्र दलांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवादी ठार झाल्याचे ते म्हणाले होते. इतक्या सुविधा देऊनही जे नक्षलवादी आत्मसमर्पण करणार नाही, त्यांच्यासाठी झिरो टॉलेरन्सचे धोरण राबवण्यात येईल, असे ते म्हणाले होते. ३१ मार्च २०२६ रोजी देश नक्षलवाद मुक्त होईल असे त्यांनी नमूद केले होते.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments