PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

लक्ष प्राप्ती होईपर्यंत कधीही थांबू नका - अब्दुल जमीर अब्दुल …


लक्ष प्राप्ती होईपर्यंत कधीही थांबू नका -  अब्दुल जमीर अब्दुल हकीम      

 

आष्टी :-       केवळ बाह्य सौंदर्य म्हणजेच व्यक्तिमत्व नसून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिस्त अनुशासन अभ्यास रोज नवनवीन ज्ञानात भर टाकून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा व त्यातून आपल्या राष्ट्राची सेवा करावी असे आआवाहन  अब्दुल जमीर अब्दुल हकीम( बबलू भैया) यांनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून केले

त्यासोबतच विज्ञानाशी मित्रता करून अनेक नवीन आदर्श पुढे ठेवून सातत्य साधना चिकाटी यातूनही व्यक्तिमत्व घडत असतो असे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला प्रमुख उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. डी.जे. मशाखेत्री कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय चामोर्शी यांनी देखील युवकांनी व्यसन न्युनगंड वाद भौतिकवाद यापासून दूर राहून ज्ञानसाधना करावी व सतत व्यक्तिमत्व घडवत राहावे असे आवाहन केले यावेळेला शून्यातून विश्व निर्माण करणारे राहुल जवादे यांनीदेखील अल्पशा पगारापासून ते उद्योगपती पर्यंत कसा प्रवास केला याविषयी आपले अनुभव कथन केले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला प्राचार्य किशोर पाचभाई यांनी देखील छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्ती घडत असतो असे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले त्यासोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझेले यांनी देखील विद्यार्थ्यांनी अनेक आदर्श पुढे ठेवावे आणि आपल्या समाजाचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेची प्रस्तावना प्रा. डॉ. भारत पांडे कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी विकास विभाग यांनी केले तर संचालन प्रा. डॉ. गणेश खुणे यांनी केले त्यासोबतच  ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. राज मुसने,डॉ. रवी शास्त्रकार डॉ. श्याम कोरडे प्रा. रवी गजभिये प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. विजया सालुरकर,प्रा. नाशिका गबणे ,राज लखमापूरे, निलेश नाकाडे इरफान शेख, मोहम्मद मुस्ताक, प्रभाकर भोयर,संचित बाचाड, दीपक खोब्रागडे   संतोष बारापात्रे आदींनी सहकार्य केले


PostImage

Vaingangavarta19

March 25, 2025   

PostImage

शाळा व्यवस्थापन समिती जयनगर यांनी शाळेला ताला ठोको आंदोलन केले …


शाळा व्यवस्थापन समिती जयनगर यांनी शाळेला ताला ठोको आंदोलन केले सुरू 


चामोर्शी:-
तालुक्यातील जयनगर शाळेतील 
मुख्याध्यापक व विषय शिक्षिका  यां दोन्ही शिक्षकांना बळतर्फ करण्यासाठी जयनगरच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापक समिती व गावकऱ्यांच्या पुढाकाराने आज मंगळवार दि.25.03.2025 पासून शाळेला ताला ठोको आंदोलनाला सुरवात केली आहे .

मुख्याध्यापक , विशेष शिक्षिका यांना जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन यांना बडतर्फ करणार नाही.तोपर्यंत जयनगर शाळेला तालाबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा व्यवस्थापन समितीने संकल्प केलेला आहे.

या ताला बंद आंदोलनाला अनेकांनी. आपला पाठिंबा सुध्दा दर्शविलेला  असून आंदोलन  तीव्र होण्याच्या मार्गावरती  असल्याचे सांगितले जात आहे

 प्रसंगी न्याय न मिळाल्यास आंदोलन रस्त्यावर येऊन करण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025   

PostImage

संविधान सन्मान महोत्सव : निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन


संविधान सन्मान महोत्सव : निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन

 मुलचेरा :-  नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी अंतर्गत, २४ आणि २५ फेब्रुवारी २०२५ रोजी संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रणजीत मंडल होते. त्यांच्यासोबत डॉ. शनिवारी, डॉ. बाचार, डॉ. वाणी आणि शेंडे  आदी मान्यवर उपस्थित होते. या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची महत्ता आणि त्याचे पालन याबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश होता.
निबंध स्पर्धेत अंतिम वर्षाची कुमारी कामेश्वरी मराठे आणि कु. मेरी डिकोंडा यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटकावले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत कुमारी स्मिता बाला (प्रथम वर्ष) आणि कुमारी सोनाली मंडळ (तृतीय वर्ष) यांनी क्रमशः प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींबद्दल आपले ज्ञान प्रदर्शित केले, आणि त्याच्या अभ्यासातून संविधानाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पिंपळ शेंडे यांनी केले, आणि प्रास्ताविक डॉ. सचिन शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. राय यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी  उपस्थित होते.
या संविधान सन्मान महोत्सव चर्चासत्रात विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयाच्या संपूर्ण कुटुंबाने संविधानाच्या मूल्यांची पुन्हा एकदा महत्त्वाची ओळख करून घेतली आणि त्याच्या पालनासाठी प्रेरणा मिळवली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 28, 2025   

PostImage

डोळ्यात अश्रूंचा पाट वडीलाचे शव घरात, जड अंतःकरणाने ती पोहचली …


 डोळ्यात अश्रूंचा पाट वडीलाचे शव घरात, जड अंतःकरणाने ती पोहचली परीक्षा केंद्रात!

एका शेतकरी कन्येवर झाला आघात 

 कोठारी :- अचानक झालेल्या वडीलाच्या मृत्यूने मुलीच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहत होता तरीही वडीलाचे शव घरात असताना तिने जड अंतःकरणाने बारावीचा पेपर सोडविला ही घटना कोठारी गावात घडली 
बारावीचा पेपर असल्याने मुलगी रात्रभर अभ्यास करीत होती  वडिलांची तब्येत अचानक बिघडली. बघताबघता विपरीत घडलं वडिलांनी शेवटचा निरोप घेतला. कुटुंबावर फार मोठ्या संकटाच आभाळ कोसळले. दुःख बाजूला ठेवले, वडिलांचा मृतदेह घरी असताना ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांत पाणी आणि थरथरत्या हाताने पेपर सोडविला. घरी पोहचली आणि हरबंडा फोडत दाटलेल्या अश्रृंना मोकळी वाट करून दिली. हे दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावात गुरुवारी हा वेदनादायी प्रसंग घडला. कोठारी येथील रहिवासी लक्ष्मण विरूटकर त्यांना तीन एकर शेती त्यावरच कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवायचे. मोठ्या मुलीचे लग्न झाले. एक मुलगी आणि मुलाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. पण बुधवारची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली.
मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र राबणारा बाप कायमचा सोडून गेला. कुटुंबावर दुःखाचा अस्मानी डोंगर कोसळले. मुलगी परी हिचा बारावीचा जीवशास्त्राचा पेपर होता. अभ्यास करतानाच तिने वडिलांना अखेरचा श्वास घेताना तिने बघितले होते. वडिलांचा मृतदेह घरी आणि दुसरीकडे बारावीचा पेपर. ती द्विधा मनस्थितीत होती तेव्हा तीच्या आईने तीला हिंमत दिली म्हणून तीने परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिले वडिलांनी जगाचा निरोप घेतला हे दुःख बाजूला ठेवून जड अंतःकरणाने न डगमगता थरथरत्या हाताने पेपर सोडवून पेपर सुटताच ती धावतच घरी पोहचली. वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून तिने हंबरडा फोडला आणि लेकीचा आक्रोश बघून उपस्थितांचेही मन गहीवरुन आले  लक्ष्मण विरूटकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कर्ता वडील गेल्याने आता परीवरच घराची जबाबदारी आली आहे


PostImage

Vaingangavarta19

Feb. 27, 2025   

PostImage

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात संविधान महोत्सवाचे आयोजन, संविधानावर व्याख्यान


नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात संविधान महोत्सवाचे आयोजन, संविधानावर व्याख्यान

मुलचेरा – नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे संविधान महोत्सवाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संविधानाची महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला गेला.
कार्यक्रमात राजे धर्मराव महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वेस्कडे  हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, त्यातील मौलिक अधिकार, तसेच विविध अनुच्छेद याबाबत सविस्तर माहिती दिली. संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेतील महत्वाच्या घटना आणि संविधानाच्या तत्त्वज्ञानावर सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रणजीत मंडल यांची उपस्थिती होती. त्यांनी संविधानापूर्वी आणि संविधानानंतरची परिस्थिती यावर भाष्य केले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीसाठी केलेल्या अविरत कष्ट आणि त्यांचे कौशल्य विशद केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मंडल, व्याख्याते डॉ. वेस्कडे , डॉ. शनिवारे , डॉ. पिंपळशेडे , डॉ. वाणी  यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन पुसतोडे  यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. सचिन शेंडे  यांनी केले. विद्यार्थ्यांना संविधानाच्या महत्वाची आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजावून सांगितल्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले.
संविधान महोत्सवाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधानाची गहन माहिती मिळाली आणि त्यांनी आपल्या देशाच्या संवैधानिक संरचनेबद्दल अधिक जाणून घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025   

PostImage

विस्तार अधिकारी प्रभाकर बारसिंगे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार


विस्तार अधिकारी प्रभाकर बारसिंगे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार 

 

गडचिरोली:-

स्थानिक कन्नमवार  वार्ड नंबर 17 गडचिरोली  येथे दिनांक  20/02/2025 रोजी शेजारी मित्रपरिवार मंडळातर्फे श्री प्रभाकर बारसिंगे यांच्या  सेवानिवृत्ती  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ रमेश सोनटक्के  ,प्रमुख अतिथी प्रा  शेषराव येलेकर ,श्री विठ्ठलराव साखरे ,श्री दिगंबर पिल्लेवान, मंचावर उपस्थित होते श्री प्रभाकर बारशिंगे हे 1986 ला प्रायमरी शिक्षक नियुक्त झाले तर ते विस्तार अधिकारी या पदावरून ते 31 जानेवारी 2025 ला सेवानिवृत्त झाले ते कन्नमवार वार्ड 17 मध्ये  राहत असून त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे शेजाऱ्यांमध्ये एक कौटुंबिक संबंध निर्माण झाल्यामुळे  सेवानिवृत्त शेजाऱ्यांचा सत्कार करण्याची अनोखी परंपरा या वार्डातील लोकांनी निर्माण केली असल्यामुळे श्री प्रभाकर बारशिंगे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू व त्यांचा मुलगा सिद्धांत व विभास यांना भेटवस्तू  देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ रमेश सोनटक्के  यांनी वार्डातील विविध जाती धर्माचे व संस्कृतीचे लोकांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध प्रस्थापित व्हावे व जातीय सलोखा समन्वय व प्रेम निर्माण होऊन यातून सामाजिक स्वास्थ सुदृढ राहावे हा मुख्य उद्देश या सत्कारामागील आहे असे विचार व्यक्त केले प्रा शेषराव येलेकर   ,प्रा सौ संध्या येलेकर, सिद्धांत बारशिंगे, चि. आभास बारशिंगे , श्री सचिन लसुंते श्री विकी लसुंते या सर्वांनी आपले विचार व्यक्त केले सत्कारमूर्तींनी आपल्या भाषणातून सर्वांना भावुक करून मी सदैव आपल्या ऋणामध्ये व आपल्या अंतकरणांमध्ये जे मी स्थान  निर्माण केले आहे ते कायम राहील व जे प्रेम आपण मला दिले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन व जेवणाची व्यवस्था वार्डातील सर्व महिला मंडळ  प्रा सौ  संध्या येलेकर, सौ ज्योती सोनटक्के, सौ अंजू पिल्लेवान, सौ.कालीनदिनी साखरे ,सौ वैशाली लसुंते , यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन श्री दिगंबर पिल्लेवान यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संध्या येलेकर यांनी केले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 16, 2025   

PostImage

येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न


येणापूर येथे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन संपन्न

 गडचिरोली: विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने आयोजित गडचिरोली जिल्हा अधिवेशन इंदिरा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालय, येणापूर येथे संपन्न झाले. या प्रसंगी आमदार रामदासजी मसराम  सत्कारमूर्ती व  प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. आमदार रामदासजी मसराम  यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

त्या प्रसंगी  आमदार  सुधाकरजी अडबाले , सचिव,गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ,येनापुर जयंतजी येलमुले, अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ अरविंद देशमुख,जिल्हा कार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ जिल्हा भंडारा,राजेश धुर्वे, सचिव,यंग टीचर्स असोसिएशन गोंडवाना विद्यापीठ डॉ. विवेक गोर्लावार, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा गडचिरोली. गुरुदेव नवघडे, अध्यक्ष विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन गडचिरोली प्रा. विजय कुत्तरमारे, अध्यक्ष,अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना  सतीश पवार, आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना प्रमुख प्रकल्प अहेरी, सुरेंद्र अडबाले कार्यवाह चंद्रपूर शहर.सुरेंद्र शेळके अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा,दीपक धोपटे,  अजय लोंढे ,अजय वर्धरवार , रवींद्र नैताम, नरेंद्र भोयर,  शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 14, 2025   

PostImage

मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड


मंथन मोहिते यांची महसूल सहाय्यकपदी निवड

डोंगरगाव :-मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गावचे सुपुत्र मंथन अण्णासाहेब मोहिते यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यपदी निवड झाली आहे.त्यांनी अत्यंत जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करून आपली वर्णी लावली आहे.त्यांनी 1 ली ते 4 थी प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथ. शाळा कचरेवाडी, 5 वी ते 10 वी चे शिक्षण  इंग्लिश स्कूल मंगळवेढा, उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी कॉलेज मंगळवेढा, सिव्हिल इंजिनिअर प्रशिक्षण नांदेड येथे पूर्ण केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आ. समाधान आवताडे, युटोपियन शुगरचे सर्वेसर्वा उमेश परिचारक, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते,कचरेवाडीचे माजी सरपंच बाळदादा काळुंगे, दादा जाधव, डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका खिलारे, दैनिक अचूक निदानचे संपादक डी. के. साखरे,  वैनगंगा वार्ता न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक अशोक खंडारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के यांच्यासह मंगळवेढा पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या …


पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम  

सुंदरनगर:-
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवनात पुढे जान्याचा मार्ग मीळतो असे मनोगत शाळेच्या क्रीडा व  सांस्कृतीक कार्यक्रम समारोपप्रसंगी  डॉ.लुबना हकीम  यांनी व्यक्त केले
 नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सुंदरनगर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सत्र 2024-2025 मध्ये शिक्षण विभागातर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच विद्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव (ता. अहेरी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, राणी दुर्गावती विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक लोनबले, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य पाल, प्रा. रॉय, स्वर्णकार , वांढरे , तसेच प्राचार्य निखुले उपस्थित होते.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जीवनात महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,"केवळ पुस्तकांचे ज्ञानच नव्हे, तर कला, नाट्य, संगीत आणि खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडते.       ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत, ते त्यांची मेहनत, समर्पण आणि जिद्द यामुळे मिळवत आहेत. परंतु प्रत्येक सहभाग देखील महत्त्वाचा असतो, कारण विजयापेक्षा मोठे असते, ते म्हणजे शिकण्याची वृत्ती आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द."त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना "मेहनत करा, सातत्य ठेवा आणि यश निश्चितच मिळेल" असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 4, 2025   

PostImage

सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई …


सेवा निवृत्तीचा सन्मान करणे शिक्षण  संस्थेचे कर्तव्य - शाहीन ताई हकीम 

 

अहेरी:-

आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. सी. व्ही. रमण सायन्स कॉलेज आणि भगतराव कला महाविद्यालय, सिरोंचा मध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण व्यक्ती – प्राध्यापक  ए. व्ही. कांताराव आणि वरिष्ठ लिपिक  एफ. एम. शेख यांच्या सेवानिवृत्तीचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले. बबलू भैया हकीम यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनोगतात प्रकट केले की, सेवानिवृत्तीचा प्रत्येक क्षण साधारणत: एक नवीन अध्याय सुरू करतो. शिक्षक व कर्मचारी यांच्या समर्पणाची आणि त्यांच्याद्वारे केलेल्या योगदानाची नेहमीच कदर करायला हवी. त्यांच्या मनोगतात शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात शिक्षणाचा प्रभाव यावर देखील त्यांनी भाष्य केले
शाहीन ताई हकीम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. त्या वेळी, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक संदेश दिला की, शिक्षक व कर्मचारी आपल्या जीवनातील आदर्श असतात आणि त्यांचा आदर्श जीवनभर पाठलाग करणे आवश्यक आहे असे भाष्य केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उरकुडे सर यांनी केले. त्यात, त्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या कामगिरीचा उल्लेख केला
यावेळी त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितली की, "शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जीवनात केवळ शाळेतील शिक्षण पुरवणे नाही, तर त्यांचा मानसिक, सामाजिक आणि आचारधर्मात्मक विकास होण्यासाठी मार्गदर्शन करणे हेसुद्धा आहे
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक जक्कु सर यांनी केले. त्यामध्ये, त्यांनी सर्व उपस्थितांचा, विशेषतः बबलू भैया हकीम, शाहीन ताई हकीम, आणि डॉ. लुबना हकीम यांचे आभार मानले व उपस्थितांचे आभार मानले


PostImage

Vaingangavarta19

Feb. 2, 2025   

PostImage

लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


लिटिल हर्ट्स विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
 
आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटिल हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दि. २८ ते ३० जानेवारी २०२५ रोजी तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, मा. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी  यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून लेझीम पथक व परेडद्वारे पाहुण्यांना पाचारण केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते महात्म्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक श्री. कृष्णामूर्ती गादे यांनी विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होतात. दरवर्षी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के असून मागील वर्षी दहावीतून शिवम पोलोजीवार हा विद्यार्थी आष्टी केंद्रातून प्रथम आला. तसेच गोळाफेक या स्पर्धेत इयत्ता आठवीतील तन्मय फुलझेले हा विद्यार्थी शारीरिक शिक्षक नितेश पुंगाटी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच जिल्हास्तरावर विविध खेळात विद्यालयातील विद्यार्थी प्राविण्य पटकाविले. असे बोलून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सहकार्य केल्याबद्दल सर्व पालकवर्गाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रथमत: लेझीम व परेड द्वारे केलेल्या पाहुण्यांच्या स्वागताविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात अभ्यासाबरोबर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्याकरिता मेहनत करणे आवश्यक आहे. 
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनिल आल्लूरवार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, विद्यालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मिळणाऱ्या पारितोषिकच्या रुपाने आवडत्या क्षेत्राची निवड त्याविषयी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यालयात आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन समारोह म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा, स्टेज डेअरिंग निर्माण होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे तसेच शालेय जीवनात आवश्यक मूलभूत बाबी च्या माध्यमातून व विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रात आपले स्थान निश्चित करता यावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा चे अध्यक्ष श्री. अनिल आल्लुरवार, आष्टी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. विशाल काळे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. बेबीताई बुरांडे, सरपंच ग्रामपंचायत आष्टी, मा. रविंद्र ओल्लालवार माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, मा. दिलीप बारसागडे केंद्र प्रमुख आष्टी,  मा. रमेश आरे सचिव, साईराम बहुद्देशीय शिक्षण संस्था सिरोंचा, संस्थेच्या सहसचिव सौ. दिपा आल्लूरवार, सदस्या सौ. भवानी निलम, सौ. सरिता गादे, तसेच शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाल, सदस्या सौ. सपना पांडे, सदस्य श्री. जितेंद्र निमसरकार, म.ज्यो. फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरडे, श्री. कपिल मसराम, शारी. शिक्षक सावित्रीबाई फुले विद्यालय आष्टी, कु. श्वेता कोवे राष्ट्रीय धनुर्विद्या खेडाळू, श्री. कृष्णमुर्ती गादे मुख्याध्यापक लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी, श्री. प्रमथ मंडल मुख्याध्यापक शिशु मंदिर पब्लिक स्कूल आष्टी, डॉ. ओ. पी. सिंग प्राध्यापक महिला महाविद्यालय आष्टी, डॉ. पी. के. सिंग सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी, श्री. शरद कोदेट्टीवार, श्री. अनिल बोमकंटीवार, श्री. गणेश सिंगाडे पत्रकार आष्टी, तसेच पालकवर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 30, 2025   

PostImage

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश


मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

 

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

 

गडचिरोली, दि.३० – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक ३०६ मध्ये दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या. कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी. रघुवंशी, सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले. प्रा. डॉ. नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध, श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला. मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे. शेंडे यांनी परिश्रम घेतले. सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 29, 2025   

PostImage

लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न


लिटील हर्टस विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

विज्येत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण

आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील लिटील हर्टस इंग्लिश मिडीयम हायस्कूल आष्टी येथे तीन दिवसीय (दि. २८ ते ३० जाने.) वार्षिक स्नेहसंमेलन समारोहाचे आयोजन करण्यात आले असून प्रथम दिवशी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव  रमेश आरे यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी शालेय जीवनात घडतो त्यांच्या आत असलेले सुप्तगुण प्रदर्शित करण्याची त्यांना प्राप्त व्हावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत इयत्ता नर्सरी ते दहावीतील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अश्या चार गटात १५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असून विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून प्रदर्शन केले. 
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन सादर करीत पूर्व प्राथमिक गटातून प्रथम मास्ट. द्विज अलोणे, द्वितीय कु. अगस्त्या आभारे, तृतीय कु. परी खामनकर, प्राथमिक गटात कु. तमना कडते, द्वितीय मास्ट. श्रीहीत आरे, तृतीय कु. वंशिका बामनकर, उच्च प्राथमिक गटात कु. लिजा हलदार, कु. अंजली वेलादी, तृतीय मास्ट. निवृत्ती नागरगोजे तर माध्यमिक गटात कु. अर्नवी रोहनकर, द्वितीय कु. तनवी मंडल, तृतीय मास्ट. आर्यन मुद्रिकवार अश्याप्रकारे क्रमांक पटकाविला विज्येत्या विद्यार्थ्यांना उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळीच्या शुभहस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला साईराम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष  अनिल आल्लूरवार, सचिव  रमेश आरे, सदस्या भवानी आरे, सरिता गादे, मुध्याध्यापक  कृष्णमूर्थी गादे तसेच या स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून  रोशनी अवथरे,  सपना पांडे, सुहासिनी बोरकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमची शोभा वाढविली.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 28, 2025   

PostImage

गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले …


गरीबीवर मात करीत पल्लवी चिंचखेडे हिने गाठले यशोशिखरावर,आयएएस परीक्षेत केले सुयश प्राप्त

 

अमरावती:-
अमरावतीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गरीब वस्तीत राहणारी कु. पल्लवी देविदास चिंचखेडे ही मुलगी युपीएससीची आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. तिचे वडील घराला रंगकाम देण्याचे काम करतात. तर तिची आई मशीनवर शिलाई काम करते. कुमारी पल्लवी ही अमरावती कॅम्प विभागातील बिच्छू टेकडी चपराशी पुरा या स्लम एरियामध्ये राहते. बिच्छू टेकडीतून पाहणाऱ्या नाल्याच्या काठावर तिचे घर आहे. एवढ्या आधुनिक काळातही तिच्या घराला जायला अद्यापही रस्ता नाही.

ती जेव्हा सातव्या वर्गात होती तेव्हा मिशन आयएएस अमरावती या संस्थेने आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी  तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी ती गेली होती. तिचे वडील तिला या कार्यशाळेला घेऊन गेले होते. या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाल्यामुळे तिचे वडील तिला दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांची भेट घेतली.  काठोळे सर हे गेल्या पंचवीस वर्षापासून गरीब व होतकरू विद्यार्थी यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करतात. पल्लवीने त्यांचे मार्गदर्शन घेतले. प्रा. काठोळे यांनी तिला स्पर्धा परीक्षेची काही पुस्तके सप्रेम भेट दिली. त्यानंतर जेव्हा जेव्हा अमरावतीला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व्हायच्या तेव्हा तेव्हा तिने त्या स्पर्धा  तुकाराम मुंढे यांच्यापासून तसेच त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन कुमारी पल्लवीने मी आयएएस अधिकारी होणारच असा निर्णय पक्का केला व त्या दृष्टिकोनातून तिने सातव्या वर्गापासूनच परीक्षेला तयारीला सुरुवात केली. तिच्या आजूबाजूला साधारणता मजूर वर्ग सामान्य कुटुंबातील लोक राहतात. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक समाविष्ट आहेत. घरात पुरेशी जागा नाही. अभ्यासाचे वातावरण नाही पण त्या परिस्थितीवर मात करून तिने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावती शहराच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवला आहे. ती ज्या भागात राहते त्या भागात अगोदर रान वन होते. त्या भागात विंचू जास्त निघायचे म्हणून त्या भागाला आजही बिच्छू टेकडी या नावाने ओळखले जाते. या टेकडी जवळच वडाळी नावाचा तलाव आहे. परीक्षा कार्यशाळेमध्ये भाग घेतला.पल्लवीच्या घरासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलेला आहे. या मार्गावरून सतत ट्रकची येजा सुरू असते. त्यामुळे अभ्यास करताना सतत व्यत्यय येत असतो. पण अशा विपरीत परिस्थितीवर मात करून आज पल्लवी यूपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले वडील देवीदासजी चिंचखेडे यांच्या प्रोत्साहनाला दिले आहे. अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने एका खाजगी कंपनीमध्ये तीन वर्ष नोकरी केली. परंतु त्यामध्ये तिचे मन रमले नाही. तिला तुकाराम मुंढे यांचे शब्द आठवत होते. मी आयएएस अधिकारी होणारच, व अखेर तीने यशोशिखरावर गाठलेच.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025   

PostImage

स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी …


स्कुल बसच्या अपघातात एका चिमुकलीचा करुन अंत तर बरेच विद्यार्थी जखमी 

 

 

यवतमाळ:-

जिल्ह्यात स्कुल बस चा अपघात होऊन एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमधील उमरखेडमध्ये स्कूल बसला अपघात झाला आहे. यात अपघातात एक विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थिनीचे नाव महिमा आप्पाराव सरकटे असं नाव आहे. ती दिवटीपिंपरी येथे राहात होती. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान ही घटना घडली आहे. उमरखेडच्या दिवटीपिंपरीवरून ही स्कूल बस दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येत होती. यावेळी हा अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्वरित वैद्यकीय सेवा बोलवून जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी धाव घेतली. मुलांच्या गाडीचा झालेला अपघात पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लहान मुलांचा आक्रोश अंगावर काटे आणणारा होता. यात एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.


PostImage

MH 33 NEWS

Jan. 24, 2025   

PostImage

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची शासकीय वसतिगृहाला भेट: विद्यार्थिनींशी …


 

गडचिरोली:- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज रात्री गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या सोयीसुविधांबाबत आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शिक्षण आणि राहणीमानाच्या विकासासाठी शासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याबाबत मंत्री उईके यांनी माहिती घेतली.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी  राहुल मीना उपस्थित होते.