PostImage

Asmita Ramteke

Yesterday   

PostImage

Kamthi News: प्रेमसंबंधातून तरुणीवर लैंगिक अत्याचार


Kamthi News: कामठी: प्रेमसंबंधातून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ब्रेकअपनंतर तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले आणि पोलिसांनी आरोपीस अटक केली. हा प्रकार कामठी शहरात नुकताच घडला.

शुभम अनिल नितनवरे (22, रा. विदूतबाबानगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम व कामठी शहरांतील विदूतबाबा नगरात राहणारी 22 वर्षीय तरुणी पुणे शहरातील खासगी कंपनीत नोकरीला होते. तिथेच त्यांची आपसांत ओळख व पुढे घट्ट मैत्री झाली. त्यामुळे दोघेही काहीकाळ एकाच खोलीत वास्तव्याला होते.

या काळात त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित केले. शुभमने मोबाइल फोनने तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते तर काही व्हिडीओ क्लिप तयार केल्या होत्या. या प्रेमसंबंधाविषयी दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती होती. मे 2024 मध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तरुणीच्या भावासोबत शुभमचा वादही उदभवला होता.

दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार नोंद‌विण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, तक्रार दाखल न करता निघून आले. त्यानंतर शुभमने तिचे आक्षेपार्ह फोटो टेलिग्रामवर व्हायरल केले. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 74, आयटी अॅक्ट सहकलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सचिन यादव व दीप्ती मोटघरे करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ


आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ

 

गडचिरोलीःनक्षलविद्यांनी एका आत्मसमर्पीत नक्षलवाद्याची र्गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करीत होते 25 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.

नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तोच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली.

विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात मात्र सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

Pankaj Lanjewar

Yesterday   

PostImage

विष प्राशन करून वृध्द व्यक्तीची आत्महत्या


नागपूर सावनेर :


सावनेर पोलीस यांच्या माहितीनुसार

 

विषप्राशन करून मृतक:राजुभाउ गजभिये यांनी जीवनयात्रा

संपविली, मूकबधिर शाळेजवळ वॉर्ड no ३ येथील रहिवाशी


पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील घटना


रात्री ११.३० चे दरम्यान


त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. यांनी मृत

 घोषित केले.


टीप......


.रात्रीच वेळी मृतदेह मारचूरी मध्ये घेउन जातांना वाढलेले गवत

धोकादायक बसून येथे रात्री बे रात्री पोलिसांना ambulece

वाले, नातेवाईक, यांचा जीवाला धोका नाकारता येतं नाहीं

अशीच एक घटना काल रात्रीच वेळी राजू गजभिये याचा मृतदेह

 शवाविच्छेदन ब करण्याकरता मृतदेह रात्री ठेवत

असताना,गाडीतून उतरताना गवतावर पाय ठेवला असता,

सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच पायावरून धामण

जातीचा बिनविषारी साप गेला, त्याचं ठिकाणी विषारी साप

असता तर जीवावर बेतली असती, नगरपरिषद प्रशासनाने तिथे

वाढलेला गवत पूर्णपणे साफसफाई करण्यात यावी पुढील

तपास सावनेर पोलीस यंत्रणा करीत आहे

 

 


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी …


आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी - महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

 

नवी मुंबई:-

नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या. आज पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. आयोगाने लगेच दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास यादरम्यान चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.

चाकणकर यांनी गुरुवारी (दि.२५) पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई-वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी असेही पोलिसांना सांगितले आहे. या भेटीच्या वेळी सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगितली

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरे जात होती. त्यांच्यावर देखील योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठी ही आयोग प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्दैवाने एखाद्या महिलेला घराबाहेर पडावे लागले; तर नजीकचे पोलीस स्टेशन, वन स्टॉप सेंटर यांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. अश्या महिलांना मदत मिळू शकते, असा विश्वास देण्याची गरज आहे. माध्यमांनी जनजागृतीसाठी पुढाकार करावा, असेही त्यांनी माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू


सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू 


वरोरा:-
 वरोरा तालुक्यातील टेमृर्डा येथून जवळपास सात लाखाची चोरी करणाऱ्या चोरांना अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सहा आरोपींना जेरबंद केले आहे 
मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शरद सीताराम गुघाणे वय 53 वर्ष हे टेभूर्डा येथे आपल्या पत्नीसह चहाचे दुकान चालवतात 17 जुलै रोजी ते व त्यांची पत्नी उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरांनी चहाच्या दुकानातून सोन्याचे दागिने, रोख एक लाख रुपये, कोको कंपनीचा मोबाईल असा एकूण 7, 80, 500 रुपयाचा माल चोरून नेला. यासंबंधीची तक्रार शरद गुधाने यांनी वरोरा पोलीस ठाण्यात करताच वरोरा येथील गुन्हे शाखा तसेच  चंद्रपूर व कोरपणा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे शिताफिने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे प्रदीप संजय शिरकुरे, आकाश नारायण शिरकुरे, चिंतामण संजय शिरकुरे, हरिणा प्रदीप शिरकुरे, माया देवगडे सर्व राहणार पारधी गुडा धोपटाळा तालुका कोरपणा यांचे सह विकास काळे राहणार चिनोरा यांना अटक केली व त्यांचे जवळून आठ सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चार बांगड्या, एक चपला कंठी, सोन्याचे कानातले दागीने, सोन्याची पोत व सोन्याचा गोफ या दागिन्यासह दोन मोबाईल व चोरी करण्यासाठी वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच 34 ए ए 3324 व एक्टिवा क्रमांक एम एच
31 ईव्ही 9188 असा एकूण 6,85000 रुपयाचा माल जप्त केला. या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचे जवळून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम,  चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोन्डावार, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना व पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शाखा पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं. संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल …


गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

 


गडचिरोली, दि. 24 : गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल नक्षल्याने पोलीसासमोर आत्मसमर्पण केले आहे 
 शासनाने 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 24 जूलै 2024 रोजी जिल्ह्यात मुसाधर पाऊस असतानाही गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, (वय 45), रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार लच्चु ताडो 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून नक्षल्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षल्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षल्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल नक्षल्यांना माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके जनतेपर्यंत पोहचविणे व इतर काम तो करीत होता. 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. त्याचा 2022 मध्ये ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्यशासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षल्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप- महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

Sanket dhoke

July 23, 2024   

PostImage

Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू


Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसापासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून राजुरा शहरात आज  दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता  दोन अज्ञात व्यक्तीने शिवज्योत सिंग देवल यांच्यावर गोळीबार केला. 

जिल्ह्यात सतत गोळीबाराचे सत्र सुरू असून Chandrapur व बल्लारपूर नंतर आता राजुरा शहरात गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दुचाकीवर अज्ञात दोघांनी शिव ज्योत सिंग देवल यांच्यावर गोळ्या झाडल्या, यामध्ये देवल यांचा जागीच मृत्यू झाला.

राजुरा शहरात आज  डोहे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आजच्या घटनेतील मृतक सख्खा भाऊ असल्याची माहिती समोर आलेली आहे.

 

अधिक वाचा :- सूर्या आज मना रहे है ४९ वां बर्थडे, एक्टिंग में दिलचस्पी नहीं थी, ७३६ की सैलरी में कम किया

अधिक वाचा  :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात

अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची

अधिक वाचा :- One Nation One Rate :- सोन स्वस्त होणार, देशात लागू होणार नवीन पॉलिसी, 'वन नेशन, वन रेट'काय आहे ?

अधिक वाचा :- Chandrapur News :- मुलानेच केली वडिलांची हत्या

अधिक वाचा  :- Today Horoscope :- २३ जुलै २०२४ ; धनलाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल

अधिक वाचा :- मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले

अधिक वाचा  :- SRK ने ४० कोटीचे गिफ्ट तर सलमानने १५ कोटीचे, तर इतर बॉलीवूड स्टार्सनी अनंत अंबानी-राधिका काय गिफ्ट केलं

अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला

ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?

अधिक वाचा :- रक्ताने भरलेले हात घेऊन पोलीसांना म्हणतो मी माझ्या ‘पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

   ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024   

PostImage

मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ


मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

वैरागड :-
 आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये दारुबंदी असली तरी बहुतेक गावामध्ये दारुचा महापूर वाहत आहे. मेंढेबोडी आणि मोहटोला जवळील बहुतेक गांवात दारुबंदी असल्याने दारु पिण्यासाठी मेंढबोडी आणि मोहोला या गावात दररोज संध्याकाठी तळीरामांची गर्दी असल्याने महिलांचे जगणे कठीन होत असून याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हयात दारुबंदी कायद्याने बंदी असली तरी संपूर्ण जिल्हयात
दारुचा महापूर वाहत आहे गडचिरोली लगतच्या चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह‌यातून जिल्ह्यात दररोज देशी विदेशी दारुचा पुरवठा होत असतो. तर काही गावात गावठी मोहफुलाची अवैध्य दारू विक्री सुरु आहे असाच प्रकार आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतेक गोव्यामध्ये सर्रासपणे दारुविक्री सुरु असल्याचे दिसून येतेय. काही गांवात महिलाच्या व बचतगटाच्या पुढाकाराने दारुबंदी केल्याचे दिसून येते परंतु आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढेबोडी आणि मोहटोला येथे मुबलक दाऊ विक्री केली जाते. मोहझरी,सुकाळा,शिवणी या गावात दारुबंदी असल्याने नजीकच्या मेंढेबोडी  येथे दारु पिणाऱ्या तळीरामांची सायंकाळच्या सुमारास गर्दी दिसून येते तर कोजबी, लोहारा, करपडा, विहीरगांव येथे दारुबंदी असल्याने न‌‌जीकच्या मोहटोला येथे दारु पिणा-यांची वर्दळ असते त्यामूळे मेंढेबोडी आणि मोहटोला ही दोन्ही गावे तडीरामासाठी आवडीचे ठिकाण असल्याचे दिसून येत आहे 

प्रतिक्रिया,
" दाऊ विक्रेत्यांचा शोध घेणे सुरु असून दाऊ विक्रने विक्री करतांना आढवल्यास त्याचे वर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल"

सागर बिट अमलदार वैरागड.


PostImage

Sanket dhoke

July 23, 2024   

PostImage

Chandrapur News :- मुलानेच केली वडिलांची हत्या


Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा या गावी दारू पिऊन घरी येतो, भांडण करतो या कारणावरून मुलगा अमित अशोक रामटेके (२४) याने वडील अशोक आबाजी रामटेके यांना मारहाण केली.

 या मारहाणीत वडील अशोक रामटेके यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी वडीलांच्या हत्ये प्रकरणी मुलाला अटक केली आहे. ही घटना सोमवार २२ जुलैच्या दुपारची आहे.

म्हणतात ना गुन्ह्याला कारण नसते असाच एक गुन्हा नेहमीच्या वादातून घडला, वडीलाला दारूचे व्यसन, नेहमी होणारी भांडणना त्रासापासून मुक्तता व्हावी यासाठी मुलगा वडिलांसोबत वाद घालतो, मात्र वादाचे रूपांतर हाणामारीत होते, आणि या हाणामारीत वडीलाचा मृत्यू होतो.

ही घटना घडली आहे Chandrapur जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा या गावी वडील अशोक रामटेके यांच्या दारूच्या व्यसनाने कुटुंब चिंतीत होते , व्यसनामुळे नेहमी वाद व्हायचे.

पोलीस ठाणे Sindhevahi हदीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील देवेंन्द्र तलांडे यानी फोनवरूण ठाणेदार तुषार चव्हाण ठाणेदार यांना माहीती दिली. 

आंबेडकर चौक वार्ड क २ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा वासेरा, याने वडीलांला मारहान करूण गंभीर जखमी केले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जखमी अशोक रामटेके यांना रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी रामटेके यांना मृत घोषित केले.

 या प्रकरणी पोलिसांनी मुलगा अमित अशोक रामटेके, रा. वासेरा याचेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत.

अधिक वाचा :- Today Horoscope :- २३ जुलै २०२४ ; धनलाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल

अधिक वाचा :- मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवून पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले

अधिक वाचा  :- SRK ने ४० कोटीचे गिफ्ट तर सलमानने १५ कोटीचे, तर इतर बॉलीवूड स्टार्सनी अनंत अंबानी-राधिका काय गिफ्ट केलं

अधिक वाचा :- Chimur News :- पुरात वाहून गेलेल्या दोन बँक कर्माऱ्यांनी झाडाला अडकून जीव वाचवला

अधिक वाचा :- Sawan Somwar Vrat 2024 : आज सावन का पहला सोमवार, जानिए तिथि, शुभ मुहूर्त- मंत्र और धार्मिक महत्व

अधिक वाचा :- Today Horoscope :- २२ जुलै २०२४ ; आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल 

अधिक वाचा :- विक्की कौशल ने खुलासा किया कि पर काम करते समय रेत माफिया ने उन्हें लगभग पीटा था

अधिक वाचा :- आंबोली धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा मृत्यू, बाईक घसरली अन् क्षणात सगळं संपलं

ये पढ़िए :- ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन का ग्रे तलाक होगा? Grey Divorce क्या है?

अधिक वाचा :- Gadchiroli News : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही ६ तास लढला

अधिक वाचा :- Chandrapur News :-  चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून 

अधिक वाचा :- रक्ताने भरलेले हात घेऊन पोलीसांना म्हणतो मी माझ्या ‘पत्नीला आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’

अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा 

अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

         ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा 

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024   

PostImage

जन्मदात्या बापाचा मुलाने दगड मारुन केला खून


जन्मदात्या बापाचा मुलाने  दगड मारुन  केला खून.


उपसंपादक/ प्रमोद झरकर 


सिंदेवाही : दिनांक २२/०७/२०२४ रोजी सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील श्री देवेंद्र तलांडे यांनी फोन वरून श्री तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांना माहिती दिली की,आंबेडकर चौक वॉर्ड क्र.२ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा.वासेरा यांनी आपल्या वडीलाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

 

या माहिती नुसार सपोनी तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही  तात्काळ पोलीस ठाण्याचे सपोनि स्थूल,पोउपनी सागर महल्ले,पोहवा विनोद बावणे,पोलीस अंमलदार रणधीर मदारे यांचेसह वासेरा गावासाठी रवाना झाले.परंतु प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट घोषित केला होता.अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वासेरा गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद होते.त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी आव्हान होते.

 

शेवटी अथक परिश्रम व पोलीस मित्र तसेच आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने वाकल ते जामसाळ्या मध्ये असलेल्या शेतातील नाल्यातिल कमरेच्या वर पाण्यातुन ट्रॅक्टरने मार्ग काढत जामसाळ्या पर्यँत पोहचुन पुढील प्रवास ट्रक्टरच्या मुंडीवर बसून घटनास्थळ गाठले.

 

पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्या नंतर जखमी अवस्थेत असलेले अशोक आबाजी रामटेके यांना पोलीस पथक व वासेरा गावातील युवक व त्यांचे नातेवाईक यांचे मदतीने आल्या मार्गानेच परत सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

सदर घटनेसंबंधाने मृतक याची पत्नी अर्चना अशोक रामटेके यांनी सिंदेवाही पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की,मृतक हा उसनवार घेतलेले पैसे परत करावयाचे आहेत.तुझे कानातील सोन्याचे रिंग मला दे असे म्हटल्याने मृतकाच्या पत्नीने त्याला ५०० रुपये दिले व ज्याचे घेतले त्याला दे म्हणून सांगितले.

 

मृतकाने त्यातील ४०० रुपये देऊन १०० रुपये स्वतःकडे ठेवून घेतले.त्याबाबत मृतक व त्याचा चुलत भाऊ कैकाडू रामटेके याचे सोबत मृतकाच्या पत्नीसोबत बोलचाल करीत असतांना यातील आरोपी हा येऊन मृतकास तू दारू पिण्यासाठी घरी पैसे का मांगतोस ? तुला दारू प्यायची सवय आहे तर दारू पिऊन चुपचाप झोपस का नाही ? असे म्हटल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.झगडा भांडण होऊन आरोपीने मृतकास लाथाबुक्क्यानी मारहाण करून खाली पाडले.

 

त्यानंतर मृतक उठून मनोज रामटेके यांच्या घराकडे चालत चालत जात असतांना आरोपीने मृतकास जिवाने मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील दगड मृतकास फेकून मारल्याने कानाचे मागील बाजूस  डोक्यावर लागून मृतक गंभीर जखमी झाला.

 

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे डॉक्टरांनी तपासनिअंती मृत घोषित केले.मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा अमित अशोक रामटेके वय २४ रा.वासेरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार,तुषार चव्हाण करीत आहेत.

 

सदर कामगिरी  मुम्मका सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तुषार चव्हाण सिंदेवाही यांचे नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल,पोउपनी सागर महल्ले,अनिल चांदोरे,विनोद बावणे,रणधीर मदारे,सुहास करमकर,मोहीत मेश्राम यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 21, 2024   

PostImage

दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी


दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी 


 देसाईगंज:- 
दोन दुचाकींच्या आमोरासमोरच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कोंढाळा गावाजवळ आज सकाळी १०.३० वाजताचे सुमारास घडली 


प्राप्त माहितीनुसार एक तरुण आपली दुचाकी क्रं.MH40BU8293 ने देसाईगंज कडे जात होता तर विरुद्ध दिशेने आरमोरी कडे एक वयस्क इसम आपल्या स्कुटी क्रं.MH 34 BT8541 ने येत असताना कोंढाळा जवळील धोंडीनाला येथे दोन्ही दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक झाली त्यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले 
 ४० वर्षीय ब्रम्हपुरी येथील वयस्क इसमाचे पाय मोडले असून निलज येथील २९ वर्षीय तरुनही गंभीर जखमी झाला आहे 
सदर घटनेबाबत गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी  झाली होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश तुपाट यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. वृत्त लिहिपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाहीत.


PostImage

Vaingangavarta19

July 20, 2024   

PostImage

नाबालीक मूलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका यूवकाला अटक


नाबालीक मूलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात एका यूवकाला अटक

 


कूरखेडा-
   शहरातीलच एका नाबालीक मूलीला फूस लावत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपा वरून येथील आझाद वार्ड निवासी शूभम सूरेश जौसीया वय २७ या यूवकाला आज कुरखेडा पोलीसांनी अटक केली आहे 
 नाबालीक मूलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत हा यूवक अल्पवयीन मूलीचे मागील काही महिण्यापासून लैंगिक शोषण करीत होता  सदर बाब तिचा कूटूंबियाना समजताच त्यानी त्या यूवका विरोधात पोलीस स्टेशन कूरखेडा येथे तक्रार दाखल केली तक्रारीवरून आरोपी शूभम यांच्या विरोधात भारतिय न्याय संहिता ६४(१) ६४(२) एम.आय.,६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपीला गून्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला होता यावेळी पोलीसानी तत्परता दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या माहीतीवरून त्याला अटक केली.घटनेचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.


PostImage

Sanket dhoke

July 20, 2024   

PostImage

रक्ताने भरलेले हात घेऊन पोलीसांना म्हणतो मी माझ्या ‘पत्नीला आणि …


त्या दिवशी नवऱ्याने पत्नी पूजाच्या नातेवाईकाला घराच्या आसपास फिरताना पाहिलं. त्यानंतर काही वेळाने पूजाने पतीला मार्केटमध्ये जायला सांगितलं. नवऱ्याला आधीपासूनस संशय होता. त्यामुळे दाखवण्यासाठी पती घरातून निघाला. पण तो मार्केटला गेलाच नाही.


सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरची बरीच प्रकरण समोर येत आहेत. या विवाहबाह्य संबंधांमुळे चांगले सुखी, संसार उद्धवस्त होत असल्याचे दिसून येते आहेत. विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर भांडण आणि घटस्फोटाने विषय संपतो.

 पण काही प्रकरणात कोण काय करणार काही सगता येत नाही. यात नेमका कोणाचा बळी जातो काही सागता येत नाही नवरा.

असच एका  धकाधायक  प्रकरण समोर आले आहे. एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आपल्याच घरातील खोलीत एकत्र पाहिलं. तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पत्नीच हे रुप त्याला सहन झालं नाही. त्याचं डोकं फिरलं.


त्याने घरात असलेली कुऱ्हाड उचलली व दोघांची कापून हत्या केली. त्यानंतर आरोपी तिच कुऱ्हाड हातात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याचा सगळा हात रक्ताने माखलेला होता.

 ‘मी माझ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला कापून आलोय’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.


खोलीतील दृश्य पाहून  पोलीस हैराण

हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिले.

 पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी खोलीतील दृश्य पाहून हैराण झाले. चिडलेल्या नवऱ्याने अत्यंत क्रूरतेने दोघांची हत्या केली होती. त्यांनी आरोपीला हत्येच कारण विचारलं, त्यावेळी त्याने सर्व सांगितलं. आधीपासूनच पत्नीवर विवाहबाह्य संबंधांचा संशय होता, असं त्याने सांगितलं.

 

प्रियकर पत्नीचा नातेवाईक

आरोपी मध्य प्रदेशच्या सिविल लाइन भागातील बाग गावचा रहिवासी आहे. पोलीस चौकशीमध्ये त्याने सांगितलं की, “पत्नी पत्नी पूजा वंशकारच तिच्या दूरच्या नातेवाईका सोबत प्रेम प्रकरण सुरु होतं.

 त्याला संशय होता. पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला आपल्याच घरातील खोलीत पाहिल्यानंतर संशयावर शिक्कामोर्तब झालं”

 

दाखवण्यासाठी पती घरातून निघाला, पण….

गुन्हा घडला त्या दिवशी नवऱ्याने पूजाच्या नातेवाईकाला घराच्या जवळपास फिरत असल्याचे पाहिलं. त्यानंतर काही वेळाने पूजाने पतीला बाजारात जायला सांगितलं. नवऱ्याला आधीपासूनस संशय होता. त्यामुळे दाखवण्यासाठी पती घरातून निघाला. पण तो मार्केटला गेलाच नाही. 

थोडावेळा इथे तिथे फिरुन अचानक घरी आला. घरी आला, त्यावेळी आतून दरवाजा बंद होता. बराचवेळ त्याने कडी वाजवली. घराच्या आत गेल्यानंतर बेडरुममध्ये पत्नीला नातेवाईकासोबत पाहिलं. त्यावेळी त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने थेट दोघांना संपवण्याच टोकाच पाऊल उचललं.

अधिक वाचा :- Today Horoscope :- २० जुलै २०२४ ; नवीन काम करायला दिवस शुभ आहे, धनलाभ होईल 

अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा 

अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

अधिक वाचा :- Entertainment News :- नताशा स्टेनकोविक और हार्दिक पांड्या ने अलग होने की घोषणा की: 'यह हमारे लिए एक कठिन निर्णय था...'

अधिक वाचा :- Today Horoscope :- १९ जुलै २०२४ ; नोकरी किंवा व्यवसायात यश आणि वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल

अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या

अधिक वाचा :-  Entertainment News :- बैड न्यूज़ रिव्यू: विक्की कौशल ने फिल्म को 'बचाया' 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

         ⬇️

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Vaingangavarta19

July 18, 2024   

PostImage

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या


 पत्नीची हत्या करुन मृतदेहाजवळ  बसून राहिला पती

 

अहेरी: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करीत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे. ही घटना गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यात १७ जुलै रोजी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केला आहे. रत्ना सदशिव नैताम (३५) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सदाशिव लखमा नैताम (४५ रा. मांड्रा ता.अहेरी) असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, सदाशिव लखमा नैताम हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. बुधवारी १७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास दोघांत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी पतीने पत्नीच्या तोंडावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप दोन वार केले अन् ती रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळली. त्यांनतर आरोपी पती देखील रक्ताच्या थारोळ्यात तिच्याच बाजूला बसून  राहिला.
 सदाशिव नैताम याचा १८ वर्षीय मुलगा चिरंजीव नैताम हा आपल्या शेतात काम करीत असताना घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने हत्या केली. त्याला रक्ताने माखलेल्या कपड्यावर आणि रत्नाला रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याचे पाहून चिरंजीवचा चुलत भाऊ राहुल हनमंतू नैतामने शेतात धाव घेऊन चिरंजीवला माहिती दिली. मुलगा चिरंजीव घरी येऊन पाहताच त्याने एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली.
चिरंजीवने आपल्या आजी आजोबा आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्याच्या वडिलांना बांधून ठेवले व घटनेची माहिती दामरंचा पोलिसांना दिली. त्यांनतर लगेच रत्नाला चारचाकी वाहनाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्ना सदाशिव नैताम यांना मृत घोषित केले. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रयावरून व फिर्यादी मुलगा चिरंजीव सदाशिव नैताम याच्या बयानावरून गुन्हा नोंद करून अहेरी पोलिसांनी तपासात घेतला आहे.या घटनेचा पुढील तपास जिमलगट्टा उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात दामरंचा उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024   

PostImage

पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात 'एमबीबीएस' तरुणीची आत्महत्या


 

अनेकांनी काढला व्हिडीओ : आत्महत्येचे कारण अस्पष्ट

 

 ब्रह्मपुरी : येथील एका 'एमबीबीएस' पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीने प्रथम नदीत उडी घेतली. पाणी कमी असल्याने ती बचावली, मात्र पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. ईशा घनश्याम बिंजवे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

ब्रह्मपुरी येथील रहिवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी ईशा घनश्याम बिंजवे ही मंगळवारी (दि.१६) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अॅक्टिवाने (क्रमांक एमएच- ४९, झेड- ४१७६) वडसा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर आली. पुलावर दुचाकी उभी केली. त्या गाडीवर आपल्या चप्पल ठेवल्या. त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली. नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र, आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही. या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला. मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. घटनेनंतर पोलिसांनी तिचाशोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता. बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिने आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही.

 

 

वाचविण्यासाठी नागरिक धावले असले तर...

 

वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली. त्यानंतर तिने आत्महत्या केली. या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ, तर काहींनी फोटो काढले. मात्र, तिला वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024   

PostImage

चक्क बापानेच लादले मुलीवर मातृत्व


 

 आश्रम शाळेला सुटी लागल्याने आली होती गावी

 

 नागभीड पत्नीच्या गैरहजेरीचा फायदा घेत स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी कुकर्म करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम बापास नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना नागभीड तालुक्यातील एका गावात घडली. विशेष म्हणजे, आश्रम शाळेला सुटी लागल्याने मुलगी आपल्या गावी आली होती.

 

पती, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब तालुक्यातील एका गावात राहत होते. एप्रिल महिन्यात आरोपीची पत्नी पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या राज्यात मजुरीसाठी गेली होती. याचवेळी तालुक्यातीलच एका आश्रम शाळेत आठव्या वर्गात शिकत असलेली १३ वर्षीय ही अभागी मुलगी शाळेला सुट्या लागल्याने गावी आली.

 

पत्नी घरी नसल्याने मुलीला पाहून आरोपीच्या अंगातील सैतान जागा झाला. त्याने पोटच्या मुलीशीच बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे सुरू केले. मुलीने विरोध केला. पण धमकावून तो तिला चूप ठेवत होता. भलेही आरोपी मुलीस चूप राहण्यास भाग पाडत होता. मात्र शरीरधर्म त्याचे कर्तव्य बजावत होता. अशातच शाळा सुरू झाली आणि मुलगी परत शाळेत गेली. शाळेच्या नियमित आरोग्य तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले आणि शाळा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.

 

शाळेतील महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.