समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
23-07-2024
मे़ढेबोडी, मोहटोला येथे लागते तळीरामांची रिघ
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
वैरागड :-
आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये दारुबंदी असली तरी बहुतेक गावामध्ये दारुचा महापूर वाहत आहे. मेंढेबोडी आणि मोहटोला जवळील बहुतेक गांवात दारुबंदी असल्याने दारु पिण्यासाठी मेंढबोडी आणि मोहोला या गावात दररोज संध्याकाठी तळीरामांची गर्दी असल्याने महिलांचे जगणे कठीन होत असून याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हयात दारुबंदी कायद्याने बंदी असली तरी संपूर्ण जिल्हयात
दारुचा महापूर वाहत आहे गडचिरोली लगतच्या चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्हयातून जिल्ह्यात दररोज देशी विदेशी दारुचा पुरवठा होत असतो. तर काही गावात गावठी मोहफुलाची अवैध्य दारू विक्री सुरु आहे असाच प्रकार आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतेक गोव्यामध्ये सर्रासपणे दारुविक्री सुरु असल्याचे दिसून येतेय. काही गांवात महिलाच्या व बचतगटाच्या पुढाकाराने दारुबंदी केल्याचे दिसून येते परंतु आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढेबोडी आणि मोहटोला येथे मुबलक दाऊ विक्री केली जाते. मोहझरी,सुकाळा,शिवणी या गावात दारुबंदी असल्याने नजीकच्या मेंढेबोडी येथे दारु पिणाऱ्या तळीरामांची सायंकाळच्या सुमारास गर्दी दिसून येते तर कोजबी, लोहारा, करपडा, विहीरगांव येथे दारुबंदी असल्याने नजीकच्या मोहटोला येथे दारु पिणा-यांची वर्दळ असते त्यामूळे मेंढेबोडी आणि मोहटोला ही दोन्ही गावे तडीरामासाठी आवडीचे ठिकाण असल्याचे दिसून येत आहे
प्रतिक्रिया,
" दाऊ विक्रेत्यांचा शोध घेणे सुरु असून दाऊ विक्रने विक्री करतांना आढवल्यास त्याचे वर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल"
सागर बिट अमलदार वैरागड.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments