STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
14-11-2024
Kurkheda news: दि. 14 : मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास उराडी येथील कुथे पाटील हायस्कूल जवळ घडली. ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे (वय 30) रा. तूलतूली ता. आरमोरी व दुचाकीस्वार महेंद्र दूगा (वय 30) रा. काकडयेली (दूधमाळा) ता. धानोरा असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमएच 33 एफ 3280 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने मोठे दगड वाहतूक करीत होता तर एमएच 33 वाय 5453 क्रमांकाच्या दुचाकीने दुचाकीने दोघेजण जात असताना दुचाकी व ट्रॅक्टरची उराडी येथील कूथे पाटील हायस्कूल नजीक समोरासमोर जबर धडक बसली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी झाली.
सोनसरी येथील डोंगरावरून चव्हेला डॅमच्या बांधकामाकरीता मोठ्या दगडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर कूथे पाटील हायस्कूल उराडी जवळ मुख्यरस्त्यावर काही शेतकऱ्यांनी धान पीक वाळविण्याकरीता धानाची रास पसरवलेली होती या धानाचा राशीवरून घसरत ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होत हा अपघात झाल्याची माहीती आहे.
अपघात घडला यावेळी ट्रॅक्टर इंजन वरुन उडी मारत असताना पलटत असलेल्या ट्राली मधील मोठे दगड ट्रॅक्टर चालकाला लागल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यु झाला तर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीसानी घटणास्थळावर पोहचत प्रेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पाठविले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments