Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मुलगी आत्महत्येच्या आधी एका 19 वर्षीय तरुणासोबत लॉजवर राहिली होती. यानंतर, मुलीने तरुणावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
बल्लारपूर शहरातील या घटनेत सोमवारी रात्री अल्पवयीन मुलगी आणि 19 वर्षीय तरुण एका लॉजवर थांबले होते. घरच्यांनी मुलीकडे विचारणा केल्यानंतर, तिने तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
परंतु बुधवारी या मुलीने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर, पोलिसांनी त्वरित तपासाची गती वाढवून लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला लॉजवर राहण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.
Ajab Gajab News In Hindi: भारत अपनी विविध और समृद्ध संस्कृति के लिए विश्वभर में प्रसिद्ध है। यहां हर राज्य की अपनी खास प्रथाएं हैं, जिनमें जन्म से लेकर विवाह तक की रीतियां भी अलग-अलग होती हैं। इन्हीं में से एक अनोखी प्रथा है, जिसमें एक ही लड़की परिवार के सभी भाइयों से शादी करती है।
क्या आपने महाभारत में द्रौपदी की कहानी सुनी है, जो पांच पांडव भाइयों की पत्नी बनी थी? ऐसी ही प्रथा आज भी हिमाचल प्रदेश और अरुणाचल प्रदेश के कुछ क्षेत्रों में मौजूद है। इसे बहुपति प्रथा के नाम से जाना जाता है, जहां एक महिला एक से अधिक भाइयों से विवाह करती है।
यह प्रथा भारत के हिमाचल प्रदेश और अरुणाचल प्रदेश में प्रचलित थी। कुछ रिपोर्ट्स के अनुसार, यह प्रथा अब खत्म हो चुकी है, लेकिन जानकारों का मानना है कि यह अभी भी कुछ गांवों में चोरी-छिपे चलन में है। इसी तरह की प्रथा तिब्बत के कई हिस्सों में भी देखी जा सकती है।
इस प्रथा के अनुसार, जब एक भाई अपनी पत्नी के साथ होता है, तो उसकी टोपी कमरे के बाहर लटकी रहती है। यह संकेत होता है कि उस समय कोई अन्य भाई अंदर प्रवेश नहीं कर सकता। इससे परिवार के भाइयों के बीच समय का बंटवारा सुनिश्चित किया जाता है। हालांकि, अब यह प्रथा बहुत कम जगहों पर बची है और धीरे-धीरे समाप्त हो रही है।
ये भी पढे : Kailash Parvat: भगवान शंकर का रहस्यमय धाम जहाँ इंसान अब तक नहीं पहुंच पाया
बहुपति प्रथा की शुरुआत का मुख्य कारण जमीन का बंटवारा रोकना और कर प्रणाली से बचना था। 1950 तक तिब्बत में बौद्ध भिक्षुओं की संख्या बहुत अधिक थी, और परिवार के सबसे छोटे बेटे को अक्सर भिक्षु बनने के लिए भेजा जाता था। ऐसे में जमीन का बंटवारा रोकने के लिए परिवार की महिला एक ही परिवार के कई भाइयों से विवाह करती थी।
दिल्ली/06:- गडचिरोली आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जाजावंडी गावातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली येथे गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला. श्री बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगाची चित्रफीत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
Gadchiroli News: राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका जिल्हयातील एसटी प्रवाशांना बसला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला गडचिरोली विभागातील तब्बल 610 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विशेष म्हणजे अहेरी आगारात संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला. परिणामी या आगारात 233 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसटी प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
हे देखील वाचा: Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना
राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची 14 ऑगस्ट रोजी बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला 27 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कामगारांच्या कार्यकारिणीने निदर्शने करून 3 सप्टेंबरपासून एसटी महामंडळ कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता.
तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे बुधवारी मंदावली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत तसेच गणेशोत्सव काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात एसटीची सेवा ठप्प झाली आहे.
संघटनेचे विभागीय सचिव अमित ठाकूर, रेखा बाळेकरमकर, कल्पना सोनवने, विठ्ठल गेडाम, जयंत इंगळे, प्रल्हाद भानारकर, गजानन नागोसे, किशोर चौधरी, किशोर वानखेडे, अरविंद उईके, संतराज कलिये धरणे देत होते.
शासनाच्या कर्मचान्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतनवाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, करारातील त्रुटी दूर कराव्यात, शिस्त आणि आवेदन पद्धतीमधील बदल करावा, वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एसटी महामंडळ संघटनांनी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. गडचिरोली व अहेरी आगारासमोर कर्मचायांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन लहान भावंडांचे तापामुळे निधन झाल्यानंतर, पालकांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमीचा कठीण प्रवास केला. या भागातील बिकट रस्त्यांमुळे शववाहिका उपलब्ध नसल्याने त्यांना हा मार्ग स्वीकारावा लागला.
4 सप्टेंबर रोजी रमेश वेलादी यांच्या बाजीरावला (वय 6 वर्षे) ताप आला, आणि त्यानंतर त्याचा लहान भाऊ दिनेश (3 वर्षे) आजारी पडला. योग्य वैद्यकीय उपचाराऐवजी, त्यांना जवळच्या रुग्णालयात न नेता एका पुजाऱ्याकडे नेण्यात आले. पुजाऱ्याने त्यांना जडीबुटी दिली, परंतु या काही वेळातच मुलांची प्रकृती आणखी खालावली. काही वेळातच बाजीरावने आपला प्राण गमावला, आणि त्यानंतर दुपारी दिनेशचेही निधन झाले.
मुलांच्या मृत्यूने खचलेले पालक आपल्या दोन निष्पाप लेकरांना घेऊन शेवटचा उपाय म्हणून जवळच्या आरोग्य केंद्रात पोहोचले. पण तिथेही उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केलं. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा इतकी गंभीर होती की शववाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. हताश पालकांना मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलात, नाल्यातून चालत 15 किमी अंतर पार करावं लागलं.
या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे गडचिरोलीतील अपुऱ्या आरोग्य सेवांवर आणि अविकसित दळणवळण सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच, अद्यापही काही भागांत अंधश्रद्धेचा प्रभाव कायम असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.
गडचिरोलीतील ही हृदयद्रावक घटना प्रशासन आणि समाजासाठी एक मोठा धडा आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आणि अंधश्रद्धेवर अवलंबून राहण्यामुळे अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात का, हा विचार करण्याची वेळ आली आहे.
Indian Cow: आजकल दूध और दूध से बने प्रोडक्ट्स की मांग तेजी से बढ़ रही है, जिसके चलते पशुपालन एक लाभदायक व्यवसाय बन गया है। कई पशुपालक दूध की बिक्री से अच्छी खासी कमाई कर रहे हैं। लेकिन सवाल यह है कि किस प्रकार की गाय या भैंस पालकर सबसे अधिक दूध और मुनाफा कमाया जा सकता है? जब बात ज्यादा दूध देने वाले पशुओं की होती है, तो अधिकांश लोग भैंसों को प्राथमिकता देते हैं। भैंस के बारे में यह माना जाता है कि वे गायों की तुलना में अधिक दूध देती हैं, लेकिन यह पूरी तरह सही नहीं है। कुछ गायें भी ऐसी हैं जो भैंसों को दूध उत्पादन में कड़ी टक्कर देती हैं। अगर आप भी पशुपालन के जरिए तगड़ी कमाई करना चाहते हैं, तो आपको इन गायों के बारे में जानकारी जरूर होनी चाहिए।
ये भी पढे : Food Not To Fridge: भूल कर भी फ्रिज में न रखें ये 5 पदार्थ, हो सकता है भारी नुकसान
गिर गाय गुजरात के गिर क्षेत्र से संबंधित है और यह भारत की प्रमुख दूध देने वाली नस्लों में से एक है। इस गाय की खासियत यह है कि यह औसतन 10-12 लीटर तक दूध प्रतिदिन देती है, और कुछ विशेष मामलों में यह 15-20 लीटर तक भी पहुंच सकता है। गिर गाय का दूध A2 प्रकार का होता है, जो कि स्वास्थ्य के लिए बेहद लाभकारी माना जाता है। इसकी देखभाल के लिए नियमित आहार, साफ-सफाई और समय पर टीकाकरण की आवश्यकता होती है। साहिवाल गाय पंजाब और हरियाणा की प्रसिद्ध नस्ल है। यह गाय प्रतिदिन 8-10 लीटर तक दूध देती है, और इसकी दूध की गुणवत्ता बेहद उच्च मानी जाती है। साहिवाल गाय के दूध में फैट की मात्रा अच्छी होती है, जिससे यह बाजार में ऊंची कीमत पर बिकता है। इसकी देखभाल में भी खास ध्यान देने की जरूरत होती है, खासकर इसके आहार और स्वच्छता पर।
ये भी पढे : Parent Child Relationship: बच्चों को कुछ कहने से पहले ये 4 बातें जरूर जान लीजिए
रेड सिंधी गाय मुख्य रूप से सिंध क्षेत्र से संबंधित है, और यह भी एक प्रमुख दूध देने वाली नस्ल मानी जाती है। यह गाय प्रतिदिन 6-8 लीटर तक दूध देती है, और इसकी दूध की गुणवत्ता भी बेहतरीन होती है। यह गाय अन्य नस्लों की तुलना में बीमारियों के प्रति अधिक प्रतिरोधी होती है, जिससे इसका पालन आसान होता है। रेड सिंधी गाय की देखभाल के लिए पोषक आहार और स्वच्छ पानी की आवश्यकता होती है। इन गायों को उच्च गुणवत्ता वाला आहार देना जरूरी है, जिसमें हरा चारा, सूखा चारा, दाने, खनिज मिश्रण और साफ पानी शामिल हो। साथ ही, इनकी नियमित टीकाकरण और समय पर डॉक्टर से चेकअप भी आवश्यक होता है। साफ-सफाई का भी खास ख्याल रखना चाहिए ताकि गायें स्वस्थ रहें और अधिक दूध दे सकें। अगर आप अपने पशुपालन व्यवसाय से अधिक कमाई करना चाहते हैं, तो इन गायों का पालन एक बेहतरीन विकल्प हो सकता है। इन गायों के दूध से आप न सिर्फ अपने परिवार की जरूरतें पूरी कर सकते हैं, बल्कि बाजार में भी अच्छी कीमत पर बेच सकते हैं। सही देखभाल और पोषण के साथ, ये गायें आपको तगड़ी कमाई करने में मदद करेंगी।
hhattisgarh Naxalites killed : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता आजही(दि.3) छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील लोहगाव पेडियाच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार(3 सप्टेंबर) रोजी सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम राबवली होती. यादरम्यान त्यांना पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर सकाळी 10.30 वाजता चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून, घटनास्थळावरुन एसएलआर, 303 आणि 12 बोअरची शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला आहे.
Chhattisgarh Naxalites killed : गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिम तीव्र केली आहे. या मोहिमांमध्ये अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता आजही(दि.3) छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील लोहगाव पेडियाच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार(3 सप्टेंबर) रोजी सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहिम राबवली होती. यादरम्यान त्यांना पश्चिम बस्तर विभागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर सकाळी 10.30 वाजता चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी भीषण गोळीबार झाला. या चकमकीत जवानांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून, घटनास्थळावरुन एसएलआर, 303 आणि 12 बोअरची शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याला दुजोरा दिला आहे.
यापूर्वी 3 नक्षलवादी ठार यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी नारायणपूर-कांकेर सीमेवर नक्षलविरोधी अभियानांतर्गत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. दरम्यान, ऑगस्टमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून अनेक नक्षलवाद्यांना पकडले, तर अनेकांना ठारही केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही दंतेवाडा पोलिसांना मोठे यश मिळाले होते. चकमकीत एक कट्टर नक्षलवादी ठार झाला होता.
65 नक्षलवादी लपून बसल्याचा संशय अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5 ते 7 किमीच्या परिसरात सूमारे 65 नक्षलवादी लपून बसल्याचा संशय आहे. सध्या या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, शोध मोहिम राबवली जात आहे. विशेष म्हणजे, बस्तर प्रदेशात दंतेवाडा आणि विजापूरसह सात जिल्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, या वर्षात आतापर्यंत छत्तीसगडमध्ये विविध चकमकीत सुरक्षा दलांनी 154 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
दिलीप अहिनवे, मुंबई व ठाणे शहर प्रतिनिधी
भिवंडी (जि. ठाणे), दि. ३१ : बृहन्मुंबई महानगरपालिका जांबोळी जलविभाग, भिवंडी येथे दि. ३० ऑगस्ट रोजी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण माने यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रवीण माने यांनी मुंबई महापालिकेत २९ वर्षे निष्कलंक व निर्विघ्नपणे अखंड सेवा पुर्ण केली. जांबोळी जलविभागाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पिसे - पांजरापूर, जांबोळी, तानसा, मोडकसागर,व कापूरबावडी जलविभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून जांबोळी जलविभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय चव्हाण, धामणगाव मनपा शाळेचे मुख्याध्यापक मनोज गायकवाड, फोरमन मधुकर बिडवी, मनपा शिक्षण विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ पर्यवेक्षक निवृत्ती कानडे, सेवानिवृत्त फोरमन दिलीप वाकचौडे व जगन्नाथ राठोड हे उपस्थित होते.
उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करताना डॉ. माने यांच्याबाबत आपापल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कनिष्ठ अभियंता अक्षय चव्हाण यांनी सांगितले की, डॉ. माने २१ मे १९९५ रोजी मुंबई महापालिका मालाड पी/नॉर्थ विभागात रुजु झाले. सन १९९७ मध्ये ते तानसा मोडकसागर येथे सलग ८ वर्षे कार्यरत होते. सन २००४ मध्ये ते भांडुप कॉम्प्लेक्स येथे सेवा करत होते. जुलै २००७ पासून आजतागायत जांबोळी जल विभागात सेवा केली. येथे कार्यरत असताना ते मध्य वैतरणा येथे देखील आठवड्यातून एकदा वैद्यकीय सेवा देण्यासाठी जात होते.
मुख्याध्यापक मनोज गायकवाड यांनी सांगितले की, जांबोळी विभागातील कर्मचारी, धामणगाव शाळेतील मुले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील निवृत्त कर्मचारी व त्यांचा परिवार यांना वैद्यकीय समस्या आली तर डॉक्टरांकडून उत्तम सेवा मिळत होती. आज आमच्या नवीन शाळेचे उदघाटन डॉक्टरांच्या सेवापूर्ती समारंभाने झाले हे आमचे भाग्य आहे. मुलांचे आरोग्य त्यांनी जपले. त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी देखील जपली. आपल्या कार्याचा गवगवा त्यांनी कधीही केला नाही.
सेवानिवृत्त कनिष्ठ पर्यवेक्षक निवत्ती कानडे यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत डॉक्टर उपलब्ध नसताना त्यांनी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत वैद्यकीय सल्ला देऊन खुप मोठी समाजसेवा केली. त्यांचा स्वभाव परोपकारी असल्यामुळे लोकांना नेहमीच मदत करत होते. ते आमचे केवळ डॉक्टर नाही तर मित्र आहेत. माणसे जोडण्यात ते प्रवीण आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जांबोळी जल विभागातील कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदररित्या अनिकेत जाधव यांनी केले.
UP News: उत्तर प्रदेश के अंबेडकरनगर जिले में प्रेम और विश्वासघात की एक खौफनाक घटना सामने आई है, जहां दो महिलाओं ने मिलकर अपने प्रेमी की बेरहमी से हत्या कर दी। इस घटना ने पूरे इलाके में सनसनी फैला दी है और गांव में डर और हैरानी का माहौल बना हुआ है।
गांव सीहमऊ मोलनापुर में 26 अगस्त की रात एक दिल दहला देने वाली वारदात हुई। पुलिस को गन्ने के खेत में 27 वर्षीय संदीप चौहान का अर्धनग्न शव मिला, जिसके सिर पर गंभीर चोटों के निशान थे। जांच में पता चला कि संदीप का प्रेम संबंध गांव की दो महिलाओं से था, और यही रिश्ता उसकी मौत का कारण बना।
संदीप पिछले कुछ समय से दोनों महिलाओं को ब्लैकमेल कर रहा था। उसकी इस हरकत से तंग आकर दोनों महिलाओं ने उसे सबक सिखाने की योजना बनाई। उन्होंने संदीप को रात में गन्ने के खेत में मिलने बुलाया। वहां पहुंचने पर, दोनों महिलाओं ने चाइनीज टॉर्च से संदीप के सिर पर वार किए, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। हत्या के बाद, वे उसे वहीं छोड़कर फरार हो गईं।
पुलिस ने जब इस मामले की जांच शुरू की, तो प्रेम प्रसंग का सच सामने आया। दोनों महिलाओं को हिरासत में लेकर सख्ती से पूछताछ की गई, जिसमें उन्होंने हत्या की बात कबूल की। पुलिस ने हत्या में इस्तेमाल की गई चाइनीज टॉर्च और संदीप का पर्स भी बरामद कर लिया है।
इस खौफनाक घटना ने पूरे गांव को हिलाकर रख दिया है, और लोग अब भी सदमे में हैं। पुलिस ने दोनों महिलाओं को गिरफ्तार कर जेल भेज दिया है, और मामले की जांच अभी भी जारी है।
मुंबई : केवळ गुन्ह्याच्या आरोपावरून कोणालाही अटक केली जाऊ शकत नाही. पोलिसांनी आधी आरोपांतील तथ्य तपासणे शहापणाचे ठरेल, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने खंडणी प्रकरणात ठाण्याच्या पत्रकाराला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.
ठाण्याचे पत्रकार अभिजित पडाळ यांना बेकायदेशीरपणे अटक केल्याप्रकरणी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने सरकारला २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. पडाळ यांचा स्वातंत्र्याचा अधिकार पोलिसांनी हिरावून घेतल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. पत्रकाराला अटक करणाऱ्या वाकोला पोलिसांच्या वर्तवणुकीची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांना दिले.
पोलिसांनी आपल्याला सीआरपीसी कलम ४१-अ अंतर्गत नोटीस बजावली नसल्याने अटक बेकायदेशीर ठरवावी, अशी मागणी पडाळ यांनी याचिकेद्वारे केली. पडाळ यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याअंतर्गत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्याशिवाय त्यांच्यावर ४१-अ अंतर्गत नोटीसही बजावण्यात आली नाही. पोलिसांनी नोटीस तयार तर केली; पण ती बजावली नाही. ४१-अ अंतर्गत नोटीसचे अस्तित्वच हे असे मानण्यासाठी पुरेसे आहे की, याचिकाकर्त्याला अटक करणे अजिबात आवश्यक नव्हते, असे न्यायालयाने म्हटले.
पोलिसांना अटक करण्याचे अधिकार आहेत. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांना अटकेची कारणेही सिद्ध करता आली पाहिजेत. एखाद्याव्यक्तीवर केलेल्या गुन्ह्याच्या आरोपावरून कोणालाही अटक करू शकत नाही. आरोपांतील तथ्य तपासणे शहाणपणाचे ठरेल, असे न्यायालयाने म्हटले.
वर्तनाची चौकशी करण्याचे निर्देश
राज्याची कृती न्याय्य असली पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पडाळ यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे आणि त्यांचा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावण्यात आला आहे. त्यामुळे खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांना उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला वाकोला पोलिस ठाण्याच्या वर्तनाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई
वाकोला पोलिसांनी १५ जानेवारी२०२२ रोजी मोहम्मद सिद्दिकीच्या तक्रारीवरून पडाळ यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पडाळ यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांचा जामीन मंजूरही झला. बेकायदेशीर अटक करण्यात आल्याने पडाळ यांनी गुन्हा रह करण्यासाठी याचिका दाखल केली. पाच कोटींची नुकसानभरपाई देण्याचे सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी पडाळ यांनी केली.
नागपूर : परस्परांच्या प्रेमात पडल्यानंतर तरुण-तरुणीने घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला. चार वर्षे सुरळीत सुंसार सुरु होता. मात्र, अचानक फेसबुकवरुन एका दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी सूत जुळले. दोघांनीही आपापल्या संसारावर पाणी सोडून पुण्यात पलायन केले. मात्र, भरोसा सेलने दोघांचाही शोध घेऊन त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर विस्कटलेल्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली.
निशांत आणि सुरक्षा (बदललेले नाव) हे दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. शिक्षण घेताना दोघांची मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण आटोपताच निशांत हा एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला तर सुरक्षासुद्धा एका खासगी कार्यालयात नोकरी करीत होती. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांशी प्रेमविवाहाबाबत चर्चा केली. कुटुंबियांनी होकार दिल्यानंतर निशी आणि सुरक्षाचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. त्यांना गोंडस मुलगा झाला. तिघांचाही संसार सुरळीत सुरु असताना निशांतची फेसबुकवरून शिल्पा (काल्पनिक नाव) हिच्याशी ओळख झाली. सुरवातीला दोघांचा फेसबुकवरून ‘चॅटिंग’च्या माध्यमातून संवाद झाला आणि एकमेकांच्या संपर्कात आले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. शिल्पाला दोन मुले असून तिचा पती सधन शेतकरी आहे. शिल्पाला निशांतने भूरळ घातली. दोघेही एकमेकांच्या कुटुंबियांच्या लपून भेटायला लागले. शिल्पासुद्धा निशांतच्या पार प्रेमात वेडी झाली होती.
दोघांनी केले पुण्यात पलायन
निशांतशी असलेले अनैतिक संबंधाची कुणकुण पतीला लागल्यामुळे तो तिला त्रास द्यायला लागला. त्यामुळे कंटाळेल्या शिल्पाने निशांतला पुण्यात पळून जाण्याची कल्पना सूचवली. पत्नी आणि मुलासह सुरु असलेल्या संसार सोडून तो शिल्पासोबत पळून जाण्यास तयार झाला. तर शिल्पानेही दोन्ही मुलांचा त्याग करुन नवा डाव मांडण्याचे ठरविले. शिल्पाने पतीची काही रक्कम आणि दागिने घेऊन जून महिन्यात निशांतसोबत पळ काढून संसार थाटला.
पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात
शिल्पा आणि निशांत अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी दोन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या. जवळपास दीड महिन्यानंतर दोघेही पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निशांतचे शिल्पाने आणलेल्या पैसे खर्च केले तसेच तिचे दागिनेसुद्धा विकले. एका कंपनीत कामावर जाऊन कसेबसे घर तो चालवित होता. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नागपुरात आणले.
विस्कटलेला संसार पुन्हा सुरळीत
शिल्पा आणि निशांतला भरोसा सेलमध्ये आणण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनाही बोलविण्यात आले. आईशिवाय दोन्ही मुलांची कशी अबाळ होत असल्याचे शिल्पाच्या लक्षात आले तर पती बेपत्ता झाल्यापासून सुरक्षासुद्धा खचली होती. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समिधा इंगळे यांनी शिल्पा व तिच्या पतीची आणि निशांतच्या पत्नीचे समूपदेशन केले. दोघांनीही एकमेकांसोबत न राहण्याचा निर्णय घेतला तर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या चुका पदरात घेतल्या. शिल्पाने पतीची माफी मागितली आणि मुलांसह पतीकडे निघून गेली. निशांतही पत्नी व मुलासह घरी परतला.
पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे. याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.
Lek Ladaki Yojana 2024: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली, सरकारने "लेक लाडकी योजना" सुरू केली आहे, जी मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये योजनेची उद्दिष्टे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मिळणारे फायदे यांचा समावेश आहे.
लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट आहे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना आवश्यक मदत पुरवणे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
1. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे.
2. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
3. मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे.
4. कुपोषण कमी करून मुलींचे शारीरिक आरोग्य सुधारणे.
5. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे.
हे देखील वाचा : Hospital Bill: तुम्ही पण हॉस्पिटल च्या खर्चाने आहात त्रस्त तर अशाप्रकारे करा बिल कमी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा : Pm Kisan Yojana 2024 : PM किसान योजनेत होणार बदल, अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा असून, तो जवळच्या अंगणवाडी केंद्रात सादर करायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडीत संपर्क साधा.
लेक लाडकी योजना अंतर्गत, मुलींना त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते:
लेक लाडकी योजना 2024 हा मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची खात्री देते. जर तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल, तर अर्ज करण्यासाठी योग्य कागदपत्रे तयार ठेवा आणि आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात अर्ज सादर करा. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याचा पाया या योजनेच्या माध्यमातून रचला जाऊ शकतो.
Transmitto Development Foundation : ट्रांन्समिटो डेव्हलपमेंट फाउंडेशन हा एक राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेला उपक्रम आहे, जो संपूर्ण भारतभर विविध प्रकल्प राबवितो. त्याच्या अंतर्गत 'सपोर्ट इंडिया डेव्हलपमेंट' कार्यक्रम हा महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमाचा उद्देश बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, व्यवसाय प्रशिक्षण देणे, आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्रज्ञानासंबंधी प्रशिक्षण देणे हा आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकारी व्यक्तींना, जसे की श्री. सुनील सूर्यवंशी (अपर जिल्हाधिकारी), श्री. निलोत्पल (पोलीस अधीक्षक), आणि श्रीमती आयुषी सिंग (जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी), यांना या संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ट्रांन्समिटो डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जिल्हा प्रभारी श्री. प्रेमकुमार मडावी, तसेच तालुका प्रभारी श्री. कैलाश वानखेडे (सिंदेवाही), श्री. मोसम मेश्राम (चामोर्शी), आणि श्री. खुशाल रायशिडाम (अरमोरी वडसा) यांच्यासह सहायक श्री. राहुल सिडाम हे उपस्थित होते.
फाउंडेशन शेतकऱ्यांना एरोपोनिक शेतीच्या प्रशिक्षणासाठी मदत करते आणि त्यासाठी आवश्यक साधनसामग्री नि:शुल्क उपलब्ध करून देते. याशिवाय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मदतही केली जाते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतात.
हा उपक्रम गडचिरोलीसारख्या भागात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे.
Ajab Gajab News In Hindi: शाहजहांपुर के राजकीय मेडिकल कॉलेज में डॉक्टरों की एक टीम ने एक जटिल सर्जरी के दौरान 17 वर्षीय लड़की के पेट से 16 सेमी x 5 सेमी का बालों का गुच्छा सफलतापूर्वक निकाला. डॉक्टरों के अनुसार, यह बालों का गुच्छा लड़की के आंतों में जाकर लिपट गया था, जिससे उसे पेट में तेज दर्द, बेचैनी और उल्टियों की समस्या हो रही थी.
खुशी गौतम, जो कि सिंधौली थाना क्षेत्र के गांव आमडार की निवासी है, पिछले कुछ समय से इन समस्याओं से जूझ रही थी. खुशी को 'ट्राइकोबीजोर' नामक एक दुर्लभ बीमारी है, जिसमें व्यक्ति को अपने ही बाल खाने की आदत होती है. इस स्थिति के कारण उसके पेट में बालों का गुच्छा जम गया था.
खुशी के अभिभावक, सिद्धार्थ कुमार, अपनी बेटी को लेकर राजकीय मेडिकल कॉलेज शाहजहांपुर पहुंचे, जहां डॉक्टरों ने पेट का सीटी स्कैन करवा कर बालों के गुच्छे की पहचान की.
ये भी पढ़ें : Kailash Parvat: भगवान शंकर का रहस्यमय धाम जहाँ इंसान अब तक नहीं पहुंच पाया
डॉक्टरों ने तुरंत ऑपरेशन करने का निर्णय लिया और सर्जरी के दौरान खुशी के पेट से 16 सेमी x 5 सेमी का बालों का गुच्छा निकाला. ऑपरेशन के बाद खुशी अब पूरी तरह स्वस्थ है और उसे दर्द से राहत मिली है. इस सफल ऑपरेशन ने खुशी को नया जीवन दिया है.
ST Mahamandal: एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 ऑगस्टला बैठक आयोजित केली होती. परंतु ही बैठक काही कारण सांगून पुढे गेल्याने एसटी कामगार संतापले. कृती समितीच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी नागपूरात रस्त्यावर उतरून पुन्हा मागण्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीकडून शुक्रवारी गणेशपेठ आगार परिसरात द्वारसभा घेण्यात आली.
या आंदोलनात एसटीच्या सुमारे 13 संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. एस. टी. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या व एस. टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांएवढे करण्यासाठी राज्यातील बहुतांश संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली. या मागण्यांसाठी 3 सप्टेंबरला आंदोलनाचा निर्णय झाला आहे. त्याबाबत एसटी प्रशासनाला नोटीसही बजावण्यात आली आहे.
7 ऑगस्टला दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कामगारांना न्याय देण्याची घोषणा करावी. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास 3 सप्टेंबरपासून राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल. गणेशोत्सवादरम्यान प्रवासी वाहतूकीचा खोळंबा झाल्यास शासन जबाबदार राहील. असा इशारा एस टी कामगारांनीं दिलेला आहे. अजय हट्टेवार, महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समिती.