ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
27-07-2024
Sarkari Yojana 2024: सणासुदीच्या दिवसात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्यक्रम रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. लाखांवर कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी साहित्य आहे. आता गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण केला जाणार आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: बीज प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत अनुदान
सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारे रेशन दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य दिले जाते. याशिवाय सणासुदीच्या दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरण केला जातो. केवळ शंभर रुपयांमध्ये रवा, साखर व चणाडाळ प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर तेल दिले जाते. आता गणपती उत्सव साजरा करता यावा, याकरिता आनंदाचा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारा मागणी नोंदविण्यात येत आहे.
या किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान संबंधित रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे.
गौरी गणपतीनिमित्त 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा लाभ मिळणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments