STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
23-07-2024
Sarkari Yojana 2024: अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेंतर्गत बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येईल. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेकांना विकास साध्य करता येणार आहे.
अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजना सन 2024-25 या वर्षात बीज प्रक्रिया संच प्राप्त लक्ष्यांकाच्या अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र राहणार. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा.
बँके कडून कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी, किंवा संघ अनुदानाच्या लाभास पात्र राहणार. संबंधित पात्र शेतकरी उत्पादक कंपनी, संघ तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास पात्र राहतील. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ अर्ज करताना ज्या कार्यक्षेत्रात कंपनी आहे, त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विहित प्रपत्रात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : Gadchiroli News: वैरागडच्या दगडात दडलाय मौल्यवान हिरा
शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे nationalized banks प्रकल्प सादर करावा लागेल. बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख रुपये मिळतात.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना होणार लागू
शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे अर्ज 31 जुलै 2024 अखेर आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करू शकतील.
अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनी, संघाच्या लेटरहेडवर अर्ज, शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कमिटी ठराव, मागील तीन वर्षांची बॅलेन्स शिट किंवा ऑडिट रिपोर्ट, संच उभारणीचे नियोजन आहे.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments