PostImage

Vaingangavarta19

March 25, 2025   

PostImage

महागाव येथे जागतिक क्षयरोग दीनानिमीत्य विशेष मार्गदर्शन


महागाव येथे जागतिक क्षयरोग दीनानिमीत्य विशेष मार्गदर्शन 

 

महागाव (अहेरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे माजी सरपंच विनोद वेलादी होते, तर ग्राम पंचायत सदस्य राजेश दुर्गे आणि महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, आरोग्य सहायीका शीतल डोंगरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

डॉ. लुबना हकीम यांनी क्षयरोगाच्या लक्षणे, प्रसार मार्ग आणि उपचार पद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. त्याची लक्षणे म्हणजे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, संध्याकाळी ताप येणे, रात्री घाम येणे इत्यादी आहेत. उपचार न केल्यास हा रोग इतरांना पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे उपचार घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रमात क्षयरोगावर यशस्वीपणे मात केलेल्या रुग्णांचा सत्कार करण्यात आला. सत्कारित रुग्णांमध्ये जनाबाई अलोने, कोंडाया हिरवकर, वसंत तोरण, संतोष आलम, पापाया आत्राम, पार्वती आत्राम आणि मंगेश पेंदाम यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभवांनी इतरांना आशा आणि प्रेरणा दिली.

या कार्यक्रमाला  आरोग्य साहायीका घोगे , आरोग्य साहायीका शितल डोंगरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि इतरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे गावात क्षयरोगाविषयी जागरूकता वाढली असून, रुग्णांना योग्य उपचार मिळविण्यास मदत झाली आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025   

PostImage

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरण्यात यावीत -पवण रामगीरकर


आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे भरण्यात यावीत -पवण रामगीरकर 

 


आष्टी:-
 येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था अध्यक्ष तथा रुग्णकल्यान समिती सभासद  पवन रामगिरकर यांनी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ  माधुरी किलनाके गडचिरोली यांनी २१/०३/२०२५  ग्रामीण रुग्णालय आष्टी  येथे भेट दिली तेव्हा आष्टी ग्रामीण रुग्णालया बाबतीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पवण रामगीरकर यांनी तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर , बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ याची ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे गेल्या काही वर्षापासून अभाव आहे तरी या पदावरती लवकरात लवकर बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ यांची तात्काळ ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली , यावेळी ग्रा. रु. अधीक्षक डॉ. ऋषिकेश बरडे , शंकर पाटील मारशेट्टीवार, कुळमेथे साहेब आदी सह कर्मचारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

March 24, 2025   

PostImage

आशा वर्कर म्हणजे समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा- डॉ …


आशा वर्कर म्हणजे समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा- डॉ लूबना हकीम

आशा दिनानिमित्त आशा वर्करांचा सत्कार
विविध स्पर्धांचे आयोजन

अहेरी :-
     आरोग्य विभाग आणि समाज यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे आशा वर्कर असून त्यांच्या सेवा,समर्पण आणि कार्य यामुळेच समाजात वैद्यकीय सेवा देणे सोयीचे होते म्हणून त्या वैद्यकीय सेवेतील अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन महागाव आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम यांनी केले. यावेळी कल्याणी नैताम बीसीएम,भारती गोगे एलएचवी आणि श्रीकांत चव्हाण बीसीएम मुलचेरा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
   राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग गडचिरोली जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील कन्यका मंदिर येथे आयोजित आशा दिना निमित्त त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. पुढे डॉ हकीम म्हणाल्या की आशा वर्कर यांनी आपल्या कार्याने आणि परिश्रमाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचे स्तर उंचावत आहे त्यांच्यामुळे कार्य आणि सेवा अनमोल असून त्यांनी आपल्या कार्याने न केवळ आरोग्य सेवा सुलभ केल्या तर समाजात आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सेवेविषयी मानसिकता आणि विश्वासहर्ता निर्माण केली. आशा वर्कर म्हणेच फक्त नावातच आशा नसून आरोग्य विभाग आणि समाज यांच्या मधातील आशा आहेत.
  यावेळी उत्कृष्ट कामगिरी बद्दल आशा वर्कर यांच्या सन्मान करण्यात आला. उमा चाकूरकर यांना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार,राजुबाई पुल्लूरवार यांना द्वितीय पुरस्कार मिळाला,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आशा वर्कर ज्योतिका तलांडे,हर्षा गर्गम,सरिता आत्राम,आलापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आशा वर्कर छाया उराडे,आशा सातारे यांच्यासह जिमलगट्टा येथील दोन,देचलीपेठा येथील दोन,कमलापूर येथील तीन, पेरमिली येथून तीन आशा वर्कर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांना तलावात जलसमाधी


पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांना तलावात जलसमाधी 

चंद्रपूर:-

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेले पाच युवकांना तलावात जलसमाधी मिळाली ही घटना शनिवारी, १५ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवसी चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

सदर युवक हे चिमूर तालुक्यातील सारगाव कोलारी येथील आहेत, जनक किशोर गावडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजरा बालाजी गावंडे व तेजरा संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या युवकांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन घुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे.
शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाय कोलारी वैधील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाडारी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले, त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावडे यश किशोर गावडे, अनिकेत यशवंत गावडे तेजस बालाजी गावंडे. तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.
सर्व मुले १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.

तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवध्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पाचही मुले उलावातच बुढालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना सारगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

अधिक तपास पोलीस करीत आहेत 


PostImage

Vaingangavarta19

March 15, 2025   

PostImage

दोन सख्ख्या मावसभावांचा पाण्यात बुडून मृत्यू


दोन सख्ख्या मावसभावांचा पाण्यात बुडून मृत्यू 

 

यवतमाळ:-  रंगपंचमीच्या  दिवशी दोन मावस भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित दोन भाऊ धुळवडीसाठी पाहुणे म्हणून आले होते. पण धुळवड साजरी करण्याचा उत्साह त्यांना चांगलाच महागात पडला. दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मयत भावंडं इतर सहा जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पण आठ पैकी पाच जण अचानक पाण्यात बुडू लागले. इतर तीन जणांनी कसंबसं स्वतःला वाचवलं. पण दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा मृतदेह अद्याप सापडला नाही.

ही घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर घडली आहे. बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

परिसरात अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह सापडला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 1, 2025   

PostImage

पोलीस हवालदार मंथनवार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू


 

पोलीस हवालदार मंथनवार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू 

गडचिरोली : कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार (वय ४९) यांचे शुक्रवारी (दि. २८) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

संतोष मंथनवार हे अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी होते. आज सकाळी ते गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर होते. साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना गॅरापत्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंथनवार हे पूर्वी आलापल्ली येथे कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 25, 2025   

PostImage

तालुका रक्तदूतपदी प्रशांत गावडे यांची नियुक्ती


तालुका रक्तदूतपदी प्रशांत गावडे यांची नियुक्ती


प्रमोद झरकर   उपसंपादक वैनगंगा वार्ता  गड़चिरोली मो. न. ९३२५७६६१३४

गडचिरोली जिल्ह्यातील जनहित ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था, येणापुर द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत प्रशांत प्रकाश गावडे यांची चामोर्शी तालुका रक्तदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
    संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान जनजागृती व रक्तदाता नेटवर्क निर्माण करण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच अभियानाला अधिक बळ मिळावे आणि तालुका स्तरावर रक्तदान चळवळीला गती द्यावी, या उद्देशाने प्रशांत गावडे यांना तालुका रक्तदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  संस्थेच्या अध्यक्षा तथा संचालिका सौ. सुनीताताई बंडावार यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रशांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात रक्तदान चळवळ अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा विश्वास आहे.”

तालुका रक्तदूत म्हणून प्रशांत गावडे यांच्यावर रक्तदाता नेटवर्क तयार करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि रक्तदानाविषयी जनजागृती वाढवणे या जबाबदाऱ्या राहतील.

"रक्तदान - सर्वश्रेष्ठ दान!"


PostImage

Vaingangavarta19

Feb. 24, 2025   

PostImage

विहीरीची दरड कोसळून एक मजूर ठार


विहीरीची दरड कोसळून एक मजूर ठार

 

 धानोरा, दि.23 : शेतशिवरात विहीर बांधकाम करतांना दरड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील पनेमारा येथे शुक्रवारी घडली. वसंत बुधेसिंग फाफामारिया (अंदाजे वय 38) रा. बेलगाव आहे मृतकाचे नाव आहे. पन्नेमारा येथील लछ्चन तुलावी यांच्या शेतात महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीचे बांधकाम सुरु आहे. खोदकाम केलेल्या विहिरीत रिंग टाकण्याचे काम सुरु होते. अचानक वरच्या बाजूने मातीची दरड कोसळल्याने मातीमध्ये तिन मजुर सापडले. बांधकाम करीत असलेल्या तीन मजुरांपैकी वसंतच्या कपाळावर काँक्रीटचा मार लागला आणि वरून मातीचा ढिगारा कोसळल्याने तो मांडीपर्यंत विहिरीच्या आत दबल्या गेला. यावेळी त्याच्या बाजूला असलेले दोन मजूर सामू मालिया व संदीप पोयाम यांनी लगेच पावड्याने माती ओढून त्याला बाहेर काढले असता वसंत हा पूर्णता बेशुद्ध अवस्थेत आढळला. विहिरीच्या काठावर असलेल्या मजुराच्या साह्याने त्याला वर काढण्यात आले व तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. राहुल बनसोड यांनी तपासून मृत घोषित केले व पोलीस विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी उत्तरीय तपासणी करिता मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोरा येथे पाठविण्यात आले.
मृतक वसंत फाफामारिया या मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत असून मृतक मजुराला नुकसान भरपाई कोण आणि कुठून दिली जाणार असा सुद्धा प्रश्न विचारीत आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर MRGS चे पं. स.अभियंता खराटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व मृतक मजुराकडे MRGS योजनेचे जॉब कार्ड असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे, कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर


आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर

 


प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची हमी आणि गाव तेथे रस्त्याचे नियोजन करा- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके 

 

गडचिरोली, दि. ६: आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४८२ कोटी ३६ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

निधीवाढीसह प्रस्ताव सादर
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर्वी १९७ कोटी ९६ लाख रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कार्यान्वयन यंत्रणेकडून २८४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आल्याने एकूण ४८२ कोटी ३६ लाखांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

गाव तेथे रस्ता – आदिवासी विकास मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील प्रत्येक गाव रस्त्याने जोडला जावा, यावर भर देण्याचे व ‘गाव तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बैठकीत दिले.

शिक्षणाला प्राधान्य – प्रत्येक विद्यार्थ्याला संधी

शाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या सुविधा अधिक सुटसुटीत आणि सर्वसमावेशक करून आदिवासी समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळण्यासाठी  पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास यावर भर देवून महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची गरज असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. 


या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (एटापल्ली) तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदिवासी वार्षिक उपयोजनेचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते


PostImage

Raj Thakre

Feb. 6, 2025   

PostImage

आयुर्वेदिक चिकित्सा और जिवन शैली :-


आयुर्वेद एक प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धति है जो शरीर, मन और आत्मा के संतुलन को बनाए रखने पर आधारित है। यह 5000 साल से भी अधिक पुरानी है और इसमें प्राकृतिक तत्वों जैसे जड़ी-बूटियाँ, आहार, और जीवनशैली के उपायों का उपयोग किया जाता है। आयुर्वेद का मुख्य उद्देश्य शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक स्वास्थ्य को बनाए रखना है।

आयुर्वेद के प्रमुख सिद्धांत:
पंचमहाभूत: आयुर्वेद में पाँच प्रमुख तत्वों का वर्णन किया गया है – पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश। इन पाँच तत्वों का शरीर में संतुलन बनाए रखना महत्वपूर्ण होता है। प्रत्येक व्यक्ति की प्रकृति इन तत्वों के संतुलन पर आधारित होती है।
त्रिदोष: आयुर्वेद में तीन प्रमुख दोषों का उल्लेख है – वात, पित्त और कफ। ये शरीर और मन के कार्यों को नियंत्रित करते हैं। संतुलन बनाए रखने के लिए इन दोषों को समझना और उनका उपचार करना ज़रूरी होता है।
आहार: आयुर्वेद में आहार को विशेष महत्व दिया गया है। यह माना जाता है कि सही आहार शरीर और मन के संतुलन को बनाए रखता है। प्रत्येक व्यक्ति का आहार उसकी प्रकृति (वात, पित्त, कफ) के आधार पर निर्धारित किया जाता है।
जीवनशैली: आयुर्वेद में दैनिक दिनचर्या, योग, प्राणायाम, और ध्यान जैसी आदतों को अपनाने की सलाह दी जाती है। यह शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को बनाए रखने के लिए आवश्यक माना जाता है।
आयुर्वेद के फायदे:
प्राकृतिक उपचार: आयुर्वेद में औषधियाँ और उपचार प्राकृतिक संसाधनों से प्राप्त होती हैं, जिससे दुष्प्रभावों का खतरा कम होता है।
व्यक्तिगत उपचार: आयुर्वेद में प्रत्येक व्यक्ति की शारीरिक प्रकृति के अनुसार उपचार किया जाता है, जिससे अधिक प्रभावी परिणाम मिलते हैं।
मानसिक शांति: आयुर्वेद में मानसिक संतुलन और तनाव मुक्त जीवन जीने के लिए ध्यान और योग को भी शामिल किया जाता है।
आयुर्वेद में उपचार के तरीके:
हर्बल औषधियाँ: आयुर्वेद में जड़ी-बूटियाँ और पौधों से बनी औषधियाँ उपयोग की जाती हैं, जो शरीर को प्राकृतिक रूप से संतुलित करती हैं।
पंचकर्म: यह आयुर्वेद का एक प्रमुख उपचार तरीका है जिसमें शरीर को शुद्ध करने के लिए विभिन्न प्रक्रियाओं का उपयोग किया जाता है, जैसे तेल मालिश, बवासीर का उपचार, और सूक्ष्म चिकित्सा।
आहार और पोषण: आयुर्वेद में आहार का सेवन शरीर के दोषों और प्रकृति के अनुसार किया जाता है, जिससे शरीर की शक्ति और रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ती है।


PostImage

Vaingangavarta19

Feb. 5, 2025   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - …


 

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल पासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 


 मुंबई : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिरोधकता निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरियावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासह २०१७ मध्ये विविध निर्णय घेण्यात आले होते. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया निर्मूलन टास्क फोर्स सुरू करण्यात आला होता. त्यानुसार, टास्क फोर्सने राष्ट्रीय आणि जागतिक तज्ञांच्या शिफारशींचा समावेश करून गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. गडचिरोलीत येत्या १ एप्रिल २०२५ पासून या आराखड्यातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेट्स फाउंडेशन आणि सन फार्माचेही सहकार्य गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाच्या या कामासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यामार्फतही महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सन फार्मा/एफडीईसी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. सन फार्मा कंपनीच्या FDEC ने मलेरिया निर्मूलनासाठी मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात काम केले आहे. मलेरिया दूर करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गांचे मॉडेल विकसित केले आहे. मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, फील्ड प्रोग्रामचे निरीक्षण करणे, तांत्रिक पुनरावलोकन यासारख्या विविध गोष्टींमध्ये सन फार्मा कंपनीमार्फत मदत करण्यात येणार आहे. गेट्स फाउंडेशन आणि सन फार्मा यांच्या योगदानामुळे गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण मटत मिल शक्तेल असे मख्यमंत्री फटाणतीस यांनी सांगितले


PostImage

Zadipatti VC News and Business

Feb. 3, 2025   

PostImage

यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड तर्फे अपघात झालेल्या विद्यार्थी ला आर्थिक …


गडचिरोली -:

        विहान बहुउद्देशिय संस्था संचालीत तिरंगा मेरी शान प्रकल्पा अंतर्गत मेरा गाव मेरी पहचान,मेरा स्कुल मेरा अभिमाण या परियोजना प्रकल्पाची सुरुवात यशोदा धर्माजी निकुरे यांच्या मरण दिवसा निमित्य 26/11/2023 रोजी सुरुवात करण्यात आली या परियोजना मध्ये गावातील सर्व नागरीक व शाळेचे विद्यार्थी यांना आतापर्यंत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात 50 हजार स्टुडन्ट ला मोफत यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड वितरण करण्यात आले या कार्ड चा लाभ ऍक्सरे व प्लास्टर ला झालेला खर्चाला आर्थिक मदत म्हणून 50% रक्कम संस्था देणार त्यात नुकताच जिल्हा परिषद उच्छ प्राथमिक शाळा भवराळा ता. मूल,जी. चंद्रपूर या शाळेतील सातव्या वर्गातील विध्यार्थी अनार्य मनोज दुधे याच्या हाताला दिनांक 30/12/2024 ला अपघात झालेला आहे असे वर्ग शिक्षक व विद्यार्थी चे पालक मनोज दुधे यांनी माहिती दिली x-ray व प्लास्टर साठी काही आर्थिक खर्च झालेला आहे व आपण यशोदा स्वास्थ सहाय्यता कार्ड च्या माध्यमातून आज दिनांक 03/02/2025 ला अर्धा खर्च विहान बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे व व्हॉइस चेअरमन सौ.मनाली कबिर निकुरे,व तनुष्का कबिर निकुरे यांनी काही आर्थिक नुकसानी चे भरपाई म्हणून अनार्य दुधे ला नगदी स्वरूपात आर्थिक मदद करण्यात आली,, संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे, व्हॉइस चेअरमन सौ. मनाली कबिर निकुरे, तनुष्का कबिर निकुरे व जिल्हा परिषद भवराळा शाळेचे प्रिन्सिपल एकनाथ गेडाम सर , शिक्षिका अनघा जक्कुलवार, देवांगणी सुरपाम, मनोज दुधे सर यांनी तर आपल्या शाळेत आपल्या मुलाला नेवून शिक्षण देत आहेत असे फार कमी बघायला मिळते आपल्या मुलाला आपल्याच शाळेत नेवून शिक्षण देणारे एकमेव शिक्षक मनोज दुधे यांना सॅल्यूट,,,,संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार आर्थिक मदत देण्यात आली.

          संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे है नेहमीच कुणाची ना कुणाची मदत करीत राहतात व 2008,पासून सामाजीक कार्यात सक्रीय आहेत हे सर्वांची गोरगरिब असो स्वास्थ ने खचलेले असोत हे मदत करित असतात. संस्थेच्या वतीने आतापर्यंत दुर्धर आजार ग्रस्तचे , जोडप्यांचे लग्न सुद्धा लावुन देतात कोरोना 2020 मधे गरीब लोकांना अन्न धान्य वाटून खूपच मोलाचे काम त्यांनी केले आहे. 

             हा आर्थिक मदत कार्यक्रम जिल्हा परिषद भवराळा शाळेच्या आवारात पार पाडण्यात आला यावेळी कार्यक्रमात उपस्थित विहान बहुउद्देशिय संस्थेचे चेअरमन कबिर यशोदा धर्माजी निकुरे संस्थेचे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 31, 2025   

PostImage

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव …


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा गटप्रवर्तकांचे विविध मागण्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन

 

अहेरी:-

महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनाच्या वतीने देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अशा गटप्रवर्तक यांच्या विषयी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात याव्या अशा मागणीची निवेदन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनातून आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा तसेच सामाजिक सुरक्षा लागू करावी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.


PostImage

MH 33 NEWS

Jan. 30, 2025   

PostImage

डॉक्टर नाही तर मोहल्ला क्लीनिक कशाला? - आजाद समाज पार्टी …


 

गडचिरोली : येथील फुले वार्डात नागरिकांच्या तक्रारी वरून आजाद समाज पार्टीने वॉर्डातील आयुष्यमान आरोग्य केंद्राला भेट दिली असता गेल्या 15 -20 दिवसापासून दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आली. शहरातील इतर वार्डातील माहिती घेतली असता बरेचदा डॉक्टर च उपस्थित राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉक्टर आणि कर्मचारीच नाही तर शासनाने मोहल्ल्यात दवाखाना कशासाठी उघडला असा सवाल उपस्थित केला. शहरातील गोर, गरीब, मजूर, कामगार लोकांना तातडीने मोफत उपचार घेता यावा या करीता असे हॉस्पिटल शासनाने वार्डा वार्डात सुरु केले पण कर्मचाऱ्यांची अभावी ही दवाखाने ओस पडल्याचे चित्र शहरात आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे असल्याने आरोग्य विभागात मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकाच डॉक्टर ला 2 ते 3 दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे नागरिकांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  लवकरच आजाद समाज पार्टी च्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे या संदर्भात मागणी करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. दवाखान्यात भेटी दरम्यान जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार,, आशिष गेडाम, गडचिरोली शहर सचिव कैलास रामटेके उपस्थित होते.


PostImage

Zadipatti VC News and Business

Jan. 26, 2025   

PostImage

आता पेट्रोल पंपावरील स्वच्छालय राहणार लोकांना उघडे


  पेट्रोल पंपावरील स्वच्छालय सामान्य लोकांच्या वापरासाठी आता खुले करण्यात आली आहे. याचा वापर करू न दिल्यास  त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी रिलायन्स पेट्रोल पंप शहरातील सर्व चालकांना बजावणी दिली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयाने तसे आदेश मानपा सर्व पालिकांना काढले आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छालय हे सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहणार आणि यामध्ये अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे केंद्रीय गृहनिर्माण व नागरिक कायदा मंत्रालय यांचे कडून आले आहे. ही अधिसूचना सर्व पेट्रोल पंप  धारक मालकांना देण्यात आली आहे.


PostImage

Vaingangavarta19

Jan. 25, 2025   

PostImage

जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर


जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

     
प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गड़चिरोली

मो. 9325766134

 

          जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्ह्यातील युवकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देण्यासाठी देण्यात येतो. या पुरस्काराच्या माध्यमातून युवा विकासाचे काम करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन मिळते. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दिल्या जाते.
              महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली द्वारा सन 2022 -23 या वर्षांसाठी जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्काराचे वितरण दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री.ना.ॲड. आशिष जयस्वाल, यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक  नीलोत्पल व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  रवींद्र सुनीता मोहन बंडावार यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 
               जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये व वेळेवर गरजू व्यक्तीला तात्काळ रक्तसेवा उपलब्ध होण्याच्या दृतिकोनातून त्यांनी जिल्ह्यात क्तदाता शोधमोहिम व जनजागृती अभियान गडचिरोली हा नवीन उपक्रम यांच्या संकल्पनेतून राबिण्याबाबत येत आहे. ज्यांना रक्ताची गरज भासली अशा आजपर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त व्यक्तीला मदत केली आहे. सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी मोलाचं वाटा असतो. निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या अशा युवकाचा प्रशासनाने दखल घेवून त्यांची आज जिल्हा युवा पुरस्कार म्हणून निवड होऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे श्रेय आई-वडील, मित्र परिवार यांना दिलं आहे.