संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
19-09-2024
लिटील हार्ट्स विद्यालयात ‘एक झाड आईच्या नावे "अंतर्गत वृक्षारोपण
आष्टी:-
येथील लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम हॉयस्कूल येथे केंद्रीय जल आयोग, नागपूर विभाग निवली वैनगंगा उपप्रभाग चंद्रपूर यांच्या सौजन्याने CWC आष्टी द्वारा ‘एक झाड आईच्या नावे "अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यालयात २० झाडे लावण्यात आली
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ज्यू. व्यवस्थापक मो. आसिफ यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले व अश्याप्रकारच्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग होण्यासाठी प्रोत्साहित केले. पर्यावरण विषयक जागरुकता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षरोपणाचे महत्व पटवून देणे काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यात वृक्षरोपनाबरोबरच इतर पर्यावरण पूरक उपक्रम विद्यालयात राबविणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अश्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
यावेळी CWC आष्टी येथील ज्यु. इंजिनियर मो. आसिफ, बी. शामकुमार (OBE), बी. शंकर सहा. कुशल कर्मचारी, प्रफुल चतुर, टेमाजी बांगरे, पियुष पोत्राजवार, चेतन बेल्कीवार, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णमूर्ती गादे, सचिव रमेश आरे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments