आलापल्ली येथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खूप उत्तम रित्या पार पडला. सदर मेळाव्यात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहुन लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सुद्धा काँग्रेस पक्षासोबत राहून सत्तेत असलेल्या भ्रष्ट सरकारला उखडून फेकणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली हनुमंत मडावी, बानय्या जंगम,जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविता मोहरकर,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली
रुपेश टिकले,जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे,सगुणा तलांडी, सोनाली कंकडालवार, सुरेखा आत्राम, सुरेखा गोडशेलवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अहेरी डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतिश जवाजी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुलचेरा रमेश गंपावार,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी भामरागड लक्ष्मीकांत बोगामी सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
*कंकडालवारांचे "कौतूक",आत्रामांवर "निशाना"....! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार*
आलापल्ली : अहेरीतील पितापुत्री एकच आहेत,हे धोकेबाज अनं खोकेबाजही आहेत.लोकांना मुर्ख बनविण्यासाठी त्यांची हि सर्व नौटंकी आहे.राजनगरी असलेल्या या भूमीला खडडेनगरी करणा-यांना आता त्यांची जागा दाखवून दया.अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडावार यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल अनं जिंकेलही.एकीकडे कंकडालवार यांचे कौतूक करतांना दुसरीकडे त्यांनी आत्राम परिवारावर निशाणा साधला. आता आपल्याच भागातील काॅग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आमदार होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचच सरकार येणार आहे.अशावेळी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याच्या सुचना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.आज दि. २९ रोजी अहेरी येथे काॅग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी ते बोलत होते.
काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेसचे समन्वयक अजय कंकडालवार,हनुमंतू मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.आज काॅग्रेसने अहेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.गेल्या दिवसात याठिकाणी दोन मोठया सभा झाल्या.पण आज झालेला मेळाव्यातील गर्दी हि या मतदारसंघात काॅग्रेसच विजयी ठरणार हे दाखविणार असल्याचे व वडेट्टीवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने अहेरी मतदारसंघात मोठया मतांची आघाडी घेतली.राज्यात यावेळी महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.
अशावेळी आता अहेरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आवश्यक आहे.आपला उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवितील पण या भागातील भूमीपूत्रच आता आमदार होणार आहे.हि काळया दगळावरची रेघ आहे.भाजपवाले संविधान बदलवायला निघाले होते.मोठया तो-यात चारशे पार चा नारा देत होते.पण देशातील जनतेनी यांचा 56 इंच वाला सिना 32 वर आणून ठेवला.यांची नौंटकी आता लोकांच्या लक्षात आली आहे.हे सरकार पुंजीवांदयाचे आहे.अडाणीला एवढे देउनही यांचे समाधान झाले नाहीत्यामुळे आता त्यांना शाळाही देण्यात येत आहे.पण आम्ही महाराष्ट्राचा सातबारा अडाणींच्या नावे करू देणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
कंकडालवारांचे कौतूक....
आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडालवार यांचे भरभरून कौतूक केले.अहेरी मतदारसंघात सत्ताधा-यांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष नाही.त्यांच्या व्यथा,वेदंनाशी त्यांना काही घेणे देणे नाही.पण अजय कंकडालवार हे सामान्यांशी जुळून आहेत.गावागावातील अनेक गरीबांच्या मदतीसाठी ते नेहमीच तप्तर असतात.अनेक गरजूंना ते सातत्याने मदतीचा हात देत आहेत.अनेकांच्या सुखदुखात भावाप्रमाणे ते धावून जात आपली जबाबदारी पार पाडत आहेत.येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्याच नेतृृत्वात काॅग्रेसचे नेते या मतदारसंघात जिंकून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*राजघराने सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त, जनता मात्र त्रस्त : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर सडकून टीका
My khabar 24 : आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ताचा पार पडला भव्य मेळावा
अहेरी, दि.२९ -गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे.विकासाच्या बाबतीत माञ प्रचंड असंवेदनशीलता बाळगत आहे.क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे.स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या मस्तीत व्यस्त असताना क्षेत्रांतील जनता माञ वेदनांनी त्रस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.मंत्री धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघात आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या खोटारड्या विकासाचे पितळ उघडे पाडले.
आयोजित मेळाव्यास गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, भानय्या जंगम, महीला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर,सगुणा तलांडी,सोनाली कंकडालवार,सुरेखा आत्राम,सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, गंपावर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा आपल्या शैलीतून खरपूस समाचार घेतला.एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकता, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात हातभार लावता,अशा निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्न औषध प्रशासन मंत्राच्या क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडतो आणि कारवाई होत नाही. राज्यात कायदा असा राबवला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुली मध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित आहे, अशी टीका केली. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करावे असे आवाहन गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षेत्रातली जनतेच्या समस्या मांडल्या. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाकरिता गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ नामदेव किरसान आणणार हक्कभंग
- संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
चिमूर -
चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड व चिमूर तालुक्यात होणाऱ्या विविध निधीतून तयार झालेल्या शासकीय इमारती व भूमिपूजन कार्यक्रमाचा सपाटा सुरु आहे मात्र या कार्यक्रमात स्थानिक बांधकाम विभाग शासकीय प्रोटोकालला बगल देत कार्यक्रम घेत असल्याचा आरोप कांग्रेस पक्षाचे विधानसभा समनव्यक डॉ सतिष वारजूकर यांनी शनिवार ला पत्रकार परिषदेतून केला आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड व चिमूर तालुक्यात वेगवेगळ्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या मार्फत सुरु आहेत या कार्यक्रमात प्रोटोकाल नुसार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत असणे गरजेचे आहे मात्र संबंधित बांधकाम विभागाचे उपअभियंता उपगन्लावार व स्थानिक अधिकारी शासनाच्या प्रोटोकालला बगल देऊन राजशिस्टाचाराचा भंग करीत असल्याचा आरोप माजी जीप अध्यक्ष डॉ सतिष वारजूकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांना हेतुपुरस्कर या शासकीय निधीतून होणाऱ्या कार्यक्रमातून वगळण्यात येत आहे याविषयाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे चिमूर तालुका कांग्रेस कमेटी तर्फे करण्यात आली असून याबाबतचा हक्कभंग ठराव येत्या अधिवेशनात खासदार डॉ किरसान आणणार असल्याचेही डॉ सतिष वारजूकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला चिमूर विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर, राज्य काँग्रेस सेवादल सहसचिव प्रा. राम राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ विजय गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गजानन बुटके, शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, काँग्रेस सेवादल तालूका सचिव घनश्याम चाफले, डॉ रहेमान, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विवेक कापसे, काँग्रेस जेष्ठ नेते धनराज मालके, युवक काँग्रेस चिकर विधानसभा उपाध्यक्ष राकेश साठेणे, विपूल बुटके आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
..............................
चिमूर शहरात या कामांचे झाले भूमिपूजन -अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करने कामांची किमंत ३५०.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम करने कामांची किमंत ४३५.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तासीलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करने कामांची किमंत १४३१.६३ लक्ष रुपये, ठेव बांधकाम योजना अंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी - १ या कार्यालयाच्या नविन इमारीतीचे बांधकाम करने कामांची किमंत २१४. २६ लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत सार्वजनीक बांधकाम उपविभाग चिमूर या कार्यालयाच्या इमारत बांधकामा कामांची किमंत २२२. २८ लक्ष रुपये व वाल्मीक समाज सामाजिक सभागृह बांधकामाचा किंमत १००.०० रुपये आदी कामांचे भूमीपुजन गुरुवार ला पार पडले.
प्रशासकीय इमारत, पटवारी निवासगृह व सभागृह यांचे बांधकाम
चिमूर -
तहसील परिसरातील दुय्यम निबंधक श्रेणी - १ प्रशासकीय कार्यालय इमारत, प्रशासकीय भवनाच्या वरच्या माळ्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम, सार्वजणीक बांधकाम विभागाच्या नविन इमारतीचे बांधकाम व वाल्मीकी समाज सामाजिक सभागृहाचे बांधकाम आदी भूमिपूजनांचा कार्यक्रम तहसिल कार्यालयातील राजीव गांधी सभागृह, पिडब्ल्युडी कार्यालय व शिवालय पार्क ओपन पेस, मासळ रोड, चिमूर शहरातील कोट्यावधी रुपयांच्या विवीध विकास कामांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते प्रशासकीय अधिकारी व नागरीकांच्या उपस्थितीत गुरुवार ला पार पडला.
तहसिल कार्यालयात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात मंचावर उपविभागीय अधिकारी तथा प्रभारि अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, सहाय्यक जिल्हा निबंधक अंकिता तांदळे, तहसिलदार श्रीधर राजमाने, भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजपा तालूका अध्यक्ष राजू झाडे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने आमदार भांगडीया यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार एकनाथ थुटे यांनी केले.
.........................................................
कोणत्या बांधकाम विकास कामाला किती निधी -
अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करने कामाची किमंत ३५०.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत चिमूर येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम करने कामाची किमंत ४३५.०० लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तासीलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करने कामाची किमंत १४३१.६३ लक्ष रुपये, ठेव बांधकाम योजना अंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी - १ या कार्यालयाच्या नविन इमारीतीचे बांधकाम करने कामाची किमंत २१४. २६ लक्ष रुपये, अर्थसंकल्प योजना अंतर्गत सार्वजनीक बांधकाम उपविभाग चिमूर या कार्यालयाच्या इमारत बांधकामा कामाची किमंत २२२. २८ लक्ष रुपये व वाल्मीक समाज सामाजिक सभागृह बांधकामाचा किंमत १००.०० रुपये आदी कामाचा भूमीपुजन सोहळा संपन्न झाला.
काल चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष हा जोमाने तयारीला लागला आहे
सध्या महाराष्ट्रात निवडणूकची तयारी जोमात सुरू आहे आणि सगळीकडेच त्याच प्रचार प्रसार चालू आहे अशातच
काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेकाँग्रेस पक्ष जोमाने तयारीला लागला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुर येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा बैठक घेण्यात आली