समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
20-07-2024
गडचिरोली : पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते वाहून गेले. राष्ट्रीय महामार्गाची कामे अपूर्ण आहेत. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना पालकमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही.
केवळ उद्योग आणि उद्योजकांसाठी ते उपलब्ध असतात. मग Gadchiroli मधील जनतेने जावे तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने जिल्ह्यातील असुविधेबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे.
उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणारे किमान प्रश्न तरी सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात होती.
Devendra Fadnavis यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून गडचिरोली शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा असल्याचे सांगितले. जिल्ह्यात प्रस्तावित आणि सुरु असलेले लोहखनिज प्रकल्प म्हणजे Gadchiroli चा विकास असे चित्र रंगाविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.
Devendra Fadnavis यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. कित्येकदा आढावा बैठकीत हा प्रश्न येतो त्यावर ते अधिकाऱ्यांना खडसावतात पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
दक्षिण Gadchiroli ला जोडणारा आष्टी - आलापल्ली - सिरोंचा आणि आलापल्ली - भामरागड महामार्ग पहिल्याच पावसात ठप्प झाला.
मागील ४ वर्षापासून या महामार्गांची कामे सुरूच आहे. २ दिवसांपूर्वी एका गर्भावती महिलेला JCB मध्ये बसून नाला ओलांडावा लागला. यावर राज्यभर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी एका ४ वर्षाच्या चिमुकल्याला रुग्णवाहिकेअभावी जीव गमवावा लागला.
सामान्य नारीकांना या मार्गाने प्रवास करू शकत नाहीत. जी कामे झालेली आहे, त्यांचा सुमार दर्जा प्रत्येक पावसात उघडा पडतो. सिरोंचा महामार्ग तर दरवेळेसच बंद होतो. या मार्गांवर अपघाता मध्ये तर शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. तरी पण मार्ग काही पूर्ण झाला नाही.
यावर पालकमंत्री कधीच काही बोलत नाहीत. त्यांना केवळ उद्योग आणि लोहखनिज दिसतात. सामान्य जनतेचे होत असलेले हाल दिसत नाही का. काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी अशी टीका केली आहे.
निकृष्ट बांधकाम, रस्ते आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर
२ दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागात अनेक रस्ते वाहून गेले आहे. भामरागड तालुक्यातील रस्त्याचे बांधकाम तर काही महिन्यातच उखडताना दिसून आले.
जारावंडी ते पुढे छत्तीसगड जाणाऱ्या मार्गांवर मोठे मोठे भागदाड पडले आहेत. आलापल्ली ते सिरोंचा हा महामार्ग आहे की गावातील रस्ता हेच कळायला मार्ग नाही. भामरागड महामार्गाचे बांधकाम त्याहूनही निकृष्ट आहे. अधिकारी यावर बोलण्यासाठी तयार नाही.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील यासाठी वेळ नाही. आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा विकट पारिस्थितीतही पालकमंत्री जिल्ह्यात वेळ देत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments