Love marriage tradition : भारतात आज देखील नातेवाईकांच्या मनाविरोधात जाऊन लग्न करणे सोपे नाही. देशात बहुतकरुन आत्पस्वकियांच्या आणि कुटुंबातील लोकांच्या मर्जीनुसारच विवाह लावले जातात आणि केले देखील जातात. लव्ह मॅरेज किंवा ज्याला प्रेम विवाह म्हणतात ही पद्धत भारतात अद्याप रुजलेली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात म्हणजेच गुजरातमध्ये भाटपोर नावाचं एक गाव आहे, या गावातील लोकांचा विचार थोडा वेगळा आहे. या गावातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी प्रेमविवाह केलाय. इतकचं नाही तर मागील तीन दशकांपासून प्रेमविवाह करण्याची पद्धत या गावात वाढलीये. त्यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालंय.
भाटपोर हे गाव गुजरातमधल सूरतजवळ आहे. येथील जवळपास 90 टक्के लोक गावातल्या गावातचं विवाह करतात. येथील लोक त्यांच्या जोडीदाराला स्वत:निवडतात आणि आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने लग्न करतात. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ आणि वृद्ध लोक सुद्धा या परंपरेला सपोर्ट करतात. आजी-आजोबांनी देखील लव्ह मॅरेज केलेले असते. त्यामुळे तेही विरोध करत नाहीत.
स्वत:च्या गावातील जोडीदारच निवडतात
भाटपोर गावात अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "आमच्य गावात प्रेमविवाह करण्याची परंपरा आहे. गावातील मुलं आणि मुली प्रेम विवाहचं करतात. ही परंपरा 2-3 पिढ्यांपासून सुरू आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे." एखाद्याला प्रेमविवाह करायचा असल्यास गावातील वडीलधारी मंडळीही त्याची पूर्णपणे जबाबदारी घेतात. या परंपरेनुसार गावातील लोक गावाबाहेर लग्न करणे टाळतात.
भाटपोरमध्ये प्रेमविवाह हा ट्रेंड नसून परंपरा बनली आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की प्रेमाने बनवलेले नाते अधिक घट्ट असते आणि म्हणूनच ते स्वतःचा जोडीदार निवडतात. या गावात होणारे विवाह इतर गावांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, कारण येथे कुटुंबांना अशा निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही.
याशिवाय येथील लोक त्यांच्या नात्याकडे पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. कुटुंबियांचा असा विश्वास आहे की, जर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यास मोकळे आहेत. या गावातील वडीलधाऱ्यांचाही आपल्या मुला-नातवंडांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येथील नातेसंबंध घट्ट होतात आणि घटस्फोटाचे प्रमाणही खूप कमी आहे. भारतातील बहुतेक लोक लग्नाला योग्य मानतात, भाटपोर गावाचे हे उदाहरण दाखवते की प्रत्येक गावाची स्वतःची परंपरा आणि संस्कृती आहे. येथील लोक अभिमानाने ही परंपरा पुढे चालवत आहेत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
चामोर्शी येथे भजन स्पर्धा, पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार
चामोर्शी:-
हनुमान मंदिर, साधुबाबा कुटी चामोर्शी जि. गडचिरोली येथे जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था, तालुका कुणबी समाज संघटना, महिला कुणबी समाज संघटना, कृतिशील महिला बचत गट चामोर्शी द्वारा आयोजित संत तुकाराम महाराज (वैकुंठ गमन) निमित्त भजन स्पर्धा पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार समारंभ कार्यक्रमात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सत्कार स्वीकारून मार्गदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, अँड.संजयराव ठाकरे, प्रा.डॉ.विठ्ठलराव चौथाले, गंगाधर पाल, आनंदरावजी लोंढे, प्रा.सजय मस्के, दिलीप गौरकर, अतुल येलमुले, डॉ.सौ.वंदना चौथाले, सौ.ममता गौरकर, सौ.छायाताई भोयर, रजनीकांत मोटघरे, रूपेश टिकले पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.
बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या अधिपत्याखाली देण्यात आले पाहिजे
आष्टी व अधखोडा येथील बौद्ध बांधवांची मागणी
गडचिरोली जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठवले निवेदन
1949 चा ॲक्ट रद्द करा बौद्ध समाज बांधवांची मागणी
आष्टी :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे आष्टी व अनखोडा येथील बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध समाज समितीचा पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबे आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन बौद्ध समाज समितीने करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर , सत्यफुला डोर्लीकर,उत्तमचंद बारसागडे, मंगलदास चापले,सोमा चांदेकर, कैलाश दुर्गे,धनराज बावने,हंसप्रीत राऊत, मंगला अवथरे,गौतमा फुलझेले,निकीता निमसरकार,सुजाता देव्हारे, वैशाली लेगला,गोपीका कुकुडकर, भीमाबाई निमसरकार,आकांक्षा झाडे,राखी मडावी,वर्षा मेश्राम,संध्या बावणे,साहील साखरकर, वैशाली लाकडे, यांच्या सह बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते
बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या! 'बौद्ध अस्मिता रक्षण समिती' सर्कल येनापुर व बौद्ध समाज बांधवाची मागणी ....
1949 चा ॲक्ट रद्द करा बौद्ध समाज बांधवांची मागणी...
उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे निवेदन सोपविले ।
चामोर्शी :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे चामोर्शी उपविभागीय अधिकारी, यांच्या मार्फतीने बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापुर व बौद्ध समाज बांधवांनी आज दिनांक 28/02/2025 रोजी उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध अस्मिता रक्षण समितीचा पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनबौद्ध अस्मिता रक्षण समिती करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना' बौद्ध अस्मिता रक्षण समितीचे अध्यक्ष काजल मेश्राम , उपाध्यक्ष .राजेंद्र रामटेके ,सचिव प्रितम घोनमोडे सचिव, महासचिव सुनिल गोर्वधन, . प्रमोद उमरे संघटक , मंगलदास चापले (प्रवक्ता ) . आनंद गोडबोले प्रवक्ता ,.अँन्ड. दिनेश राऊत सल्लागार . संतोष मेश्राम ,. परीजन दहिवले कोषाध्यक्ष , .संदेश देवतळे सहसचिव ,गिरीधर उंदिरवाडे,.उत्तमचंद बारसागडे पुरुषोत्तम उंदिरवाडे , अंकुश निमसरकार , जितु झाडे , चंद्रशेखर पेटकर ,.रोशन गेडाम .मोरोती अवथरे सौ.शोभाताई कुरखेडे , सौ. रजनी बारसागडे ,सौ. अल्का रामटेके , सौ. योगीता रामटेके , आदीहस बहुसंख्य बौद्ध उपासक व उपासीका बांधव उपस्थित होते.
बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या!
1949 चा ॲक्ट रद्द करा अहेरी बौद्ध समाज बांधवांची मागणी
तहसीलदार मार्फत राष्ट्रपती कडे निवेदन सोपविले
अहेरी:- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे अहेरी तहसीलचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्फतीने बौद्ध समाज बांधवांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून त्यासाठी आमचाही पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केले आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन अहेरी तहसीलदार मार्फत भारताचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान , बिहार राज्याचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना बोधीसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे, रामचंद्र ढोलगे , करन दहागावकर, आशिष सूनतकर, प्रकाश दहागावकर, शिवाजी ढोलगे, संदीप ढोलगे, किशोर बुरबुरे, महेंद्र मेश्राम, संजय ओंडरे, रामदास ओंडरे, कपिल झाडे, मलयाजी दुर्गे, कपिल ढोलगे आदी व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
बुध्दगया येथील महाबोधी बुध्दविहारासाठी गडचिरोलीत 1 मार्चला धरणे आंदोलन
गडचिरोली दि.27: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या पूज्य बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून दिनांक 1 मार्च ला धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध धार्मिक स्थळे त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली असून बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेली 50 पेक्षाही अधिक वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि पूज्य बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे. तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही. ही अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी बाब आहे.
सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी भारतातील पूज्य बौद्ध भिक्षुनी गेली 12 फेब्रुवारी 2025 पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे दिनांक 1 मार्च 2025 ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली यांचे नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
सदर धरणे आंदोलनात भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आणि बौद्ध धम्मावर श्रद्धा असणाऱ्या सर्वांनी न चुकता दुपारी 11.30 वा. उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली, संविधान फाउंडेशन जिल्हा गडचिरोली, सम्यक समाज समिती गोकुळ नगर गडचिरोली, पंचशील बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली, प्रबुद्ध बुद्ध विहार विवेकानंद नगर गडचिरोली, प्रबुद्ध विचार मंच गडचिरोली, विशाखा महिला मंडळ गोकुळ नगर, बौद्ध समाज मंडळ नवेगाव, कॉम्प्लेक्स, इंदिरानगर, साईनगर, स्नेहनगर, फुले वार्ड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , गणेश कॉलनी, फुले वार्ड, विसापूर कॉम्प्लेक्स, कोटगल, त्रिशरण महिला मंडळ रामनगर, संबोधी बुद्ध विहार समिती गडचिरोली आदींच्या वतीने करण्यात येत आहे.
खूदीरामपली येथे नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रा शुभारंभ, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण
खूदीरामपली: 26 फेब्रुवारी 2025 रोजी खूदीरामपली येथील नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.गट)विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
या सोहळ्याला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थितांमध्ये प्राचार्य निखुले सर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञान कुमारी कौशी, संध्याताई मुगमोडे, गोबाटे ताई, माधुरीताई गोरकर, जयश्रीताई चिल्लरवार यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष हरिपद दास, सचिव बिजय विश्वास, कोषाध्यक्ष परेस विश्वास, उपाध्यक्ष प्रदीप मोहनदास आणि सहसचिव मनोज दास उपस्थित होते
लोकार्पण सोहळ्यात भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम यांनी विशेष योगदान दिले, ज्यामध्ये नाम कीर्तन सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी प्रदान केला. यामुळे या धार्मिक प्रकल्पाच्या पुन्हा एकदा महत्त्वाला वाव मिळाला आहे
मार्कंडेश्वर देवस्थानाच्या या नवनिर्मित सुविधेने स्थानिक आणि परिसरातील भक्तांना आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्याची संधी दिली आहे. देवस्थानच्या यात्रेचा आरंभ अनेक भक्तांसाठी एक पवित्र आणि उत्साही क्षण ठरला
नवीन किर्तन सभा मंडपाच्या लोकार्पणाने स्थानिक समाजाच्या एकजुटीला आणखी बल मिळाला आहे. ही इमारत भक्तांची विविध धार्मिक उपासना आणि कीर्तनांसाठी वापरली जाणार आहे, जेणेकरून संप्रदायाच्या सर्व अनुयायांसाठी अधिक जागा आणि सुवधता उपलब्ध होईल
ही यात्रा आणि लोकार्पण सोहळा सुंदरतेने पार पडला आणि सर्व उपस्थितांनी यावेळी देवाच्या आशीर्वादांची प्राप्ती केली
चपराळा येथील भव्य महाशिवरात्री यात्रा उत्सवाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते उद्घाटन
चामोर्शी: तालुक्यातील आष्टी शहरापासून जवळच असलेल्या प. पु. कार्तिक स्वामी महाराज प्रशांत धाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. येथील यात्रेकरीता तेलंगणा राज्यासह महाराष्ट्रील भाविक दर्शनासाठी येतात. आज दिनांक २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या यात्रेचे उद्घाटन आष्टी - ईल्लूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सलग चार दिवस महाशिवरात्री उत्सव असते त्याकरिता यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आष्टी, चामोर्शी, गोंडपिपरी, अहेरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे तरी भाविकांनी प. पु. कार्तिक स्वामी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन महाराजांचे दर्शन घ्यावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या रुपाली पंदिलवार यांनी उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी हनुमान मंदिर प्रशांत घाम चपराळाचे अध्यक्ष संजय पंदिलवार, रामचंद्र बामणकार यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.
मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
गडचिरोली, दि. 6: महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, निवास, विशेषत: स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेच्या पूर्वनियोजना आढावा जिल्हाधिकारी यांनी आज मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, तहसिलदार प्रशांत गोरूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पथदिवे, मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात, त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश
सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून यात्रेच्या तयारीत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अमृतसर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध
शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने, जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी
समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी
नगर - प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन सदरील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. वारंवार बाबासाहेबांचा पुतळा व संविधानाच्या विटंबनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी अमृतसर मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शिडीच्या सहाय्याने चढून एका समाजकंटकाने हातोड्याचे साहाय्याने सदर पुतळा फोडण्याचे कृत्य केले. सदर आरोपीला पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे कायदा करुन देशातील महापुरुषांचा अवमान व विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतुद केल्यास अशा प्रवृत्तींना लगाम लागणार आहे. देशात सातत्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाची विटंबना होत आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हेतू हा राजकीय भाग असल्याचे आंबेडकरी समाजाला जाणवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी परभणीत सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा मोठी दंगल झाली. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला, अद्यापि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वारंवार बाबासाहेबांच्या पुतळ्याची व संविधानाच्या विटंबनेच्या मागील मास्टरमाइंड शोधण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अमृतसर येथे घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. बाबासाहेब एका जाती धर्माचे नसून, सर्व धर्मीयांचे व समाजाचे आहे. संविधान देशातील सर्व समाजासाठी आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना होत असताना कोणताच राजकीय पुढारी पुढे येऊन निषेध नोंदवत नाही, तर ज्या समाजाला त्यांच्यामुळे आरक्षण मिळाले ते समाज देखील गप्प आहेत. इतर देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले जातात, मात्र आपल्या देशातील त्यांचे पुतळे असुरक्षित आहेत. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर देखील जातीयता संपलेली नसल्याची भावना आंबेडकरी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी सदर घटनेच्या चौकशीसाठी कमिटी नेमून अमृतसर व परभणी येथील घटनेच्या मागे कोण मास्टर मार्इंड आहे? याचा तपास करावा, महापुरुषांच्या पुतळ्याचे विटंबन करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.......................
30 जानेवारी रोजी खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांचे चिमूरमध्ये स्वागत - आझाद संघरामगिरीत संबोधित करणार
चंद्रपूर - चिमूर तहसीलच्या संघरामगिरी येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेअंतर्गत आयोजित महापरित्राण पथात आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद उपस्थित राहणार आहेत. बौद्ध धम्माच्या अनुयायांसाठी दरवर्षी 30 आणि 31 जानेवारी रोजी संघराम गिरी (रामदेगी) येथे धम्म संमेलन आयोजित केले जाते. यामध्ये हजारो भाविक सहभागी होऊन धम्मदेसनाचा लाभ घेतात. या काळात महापरित्राण पथाचेही आयोजन केले जाते. या परिषदेला संबोधित करण्यासाठी आझाद समाज पक्षाचे (भारत एकता मिशन) राष्ट्रीय अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद यांची नियुक्ती करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आझाद समाज पक्षाने अमित भीमटे यांच्या रूपाने आपला उमेदवार उभा केला होता. त्यांना मतदानात चौथा क्रमांक मिळाला. आझाद चिमूर मतदारांचे कृतज्ञता व धम्मदेसना स्वीकारून तथागत बुद्धांना नमन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी चिमूर शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. चिमूर शहरातील हजारे पेट्रोल पंप चौकात आयोजित स्वागत कार्यक्रमात पक्षाचे कार्यकर्ते व आंबेडकरी मिशनरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आझाद समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित भीमटे यांनी दिली अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
मार्कंडेश्वर मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा - मुख्य सचिव सुजाता सौनिक
मार्कंडा येथील मंदिरला भेट व पाहणी
गडचिरोली दि.२३: जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिव मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
श्रीमती सौनिक यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन विकासकामांचा आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट, वाहनतळ, बगीचा यांसारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मार्कंडा परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारे भव्य स्वरूप देण्याच्या सूचना दिल्या. त्यात जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वाराची उभारणी, शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय, बैठक व्यवस्था, पुस्तकालय, प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन यांचा समावेश करण्याचे सांगितले.
मंदिर परिसरात भाविकांसाठी सुयोग्य रस्ता आणि वाहनतळ उभारणे, भक्तनिवास दुरुस्ती व त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले. मंदिरालगतचे ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी ठराव मंजूर करून स्थानिक ग्रामस्थांची संमती तातडीने मिळवण्यावर भर देण्याचे सांगून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी व नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाल मंजुरी देणे सोयीचे होईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरातत्त्व विभागाद्वारे मुख्य मंदिराचे सुरू असलेल्या बांधकामांना गती देण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्य सचिवांनी या विकास कामांमध्ये विलंब न करता पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेवर निर्णय घेऊन कामे गतिमान करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त, पुजारी, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबई :
पतीची वागणूक सुधारण्यासाठी त्याच्याविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल करणे, या पत्नीच्या वागणुकीला विवाहित जोडप्याच्या सौहार्दपूर्ण नातेसंबंधात स्थान मिळू शकत नाही. अशी तक्रार करणे म्हणजे क्रूरताच आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करताना म्हटले की, पत्नीने पतीचे वर्तन सुधारण्यासाठी त्याच्याविरोधात खोटी पोलिस तक्रार केली. त्याचा त्रास पतीला आणि त्याच्या घरच्यांना झाला.
'पतीचे वर्तन सुधारण्यासाठी पोलिसांकडे खोटी तक्रार केल्याने पतीला व त्याच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. एकमेकांवर विश्वास, आदर असलेल्या सौहार्दपूर्ण वैवाहिक नात्यात पत्नीच्या या वागण्याला स्थान नाही. तसेच जोडीदाराविरुद्ध खोट्या खटल्याने
पत्नीचे कृत्य घटस्फोट मंजूर करण्यास पुरेसे खोटी पोलिस तक्रार करून विवाहटिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना तडा गेला आहे, त्यामुळे पत्नीची वागणूक ही एक प्रकारची क्रूरता आहे आणि हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कल १३(१) (आय-ए) अंतर्गत घटस्फोट मंजूर करण्याचा आधारही आहे. पत्नीचे हे कृत्य पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्यास पुरेसे कारण आहे, असे म्हणत न्यायालयाने कुटुंब न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या जोडीदाराचे मन दुखावले आहे. विवाहाचे गांभीर्य राखण्यासाठी जोडीदाराने सर्व विश्वासार्हता गमावली आहे, असे न्यायालयाने म्हटले.
Jaipal Singh Munda Story In Hindi: जयपाल सिंह मुंडा, जिन्हें प्यार से "मरांग गोमके" कहा जाता है, एक ऐसा नाम है जो आदिवासी समाज में प्रेरणा और नेतृत्व का प्रतीक है। 3 जनवरी 1903 को झारखंड के खूंटी जिले में जन्मे जयपाल सिंह मुंडा ने अपने जीवन में कई क्षेत्रों में महत्वपूर्ण योगदान दिया। वे एक महान आदिवासी नेता, विश्वस्तरीय हॉकी खिलाड़ी और प्रबुद्ध शिक्षाविद् थे।
जयपाल सिंह मुंडा भारतीय हॉकी के इतिहास में एक खास स्थान रखते हैं। 1928 के एम्स्टर्डम ओलंपिक में उन्होंने भारतीय हॉकी टीम की कप्तानी की और देश को पहला स्वर्ण पदक दिलाया। वे ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय में हॉकी खेलने वाले पहले भारतीय बने और "ऑक्सफोर्ड ब्लू" का खिताब प्राप्त करने वाले अकेले अंतरराष्ट्रीय खिलाड़ी रहे। उनकी खेल भावना और नेतृत्व क्षमता ने भारत को अंतरराष्ट्रीय हॉकी में पहचान दिलाई।
खेल के मैदान से विदा लेने के बाद, जयपाल सिंह मुंडा ने शिक्षा और सामाजिक सुधार के क्षेत्र में अपनी छाप छोड़ी। उन्होंने 1939 में 'आदिवासी' नामक पत्रिका की स्थापना की, जो आदिवासी मुद्दों को उठाने का प्रमुख माध्यम बनी। 1944 में उन्होंने 'गोवा सेवा मंडल' की स्थापना की, जो आदिवासियों के कल्याण के लिए काम करता था।
जयपाल सिंह मुंडा ने अपने पूरे जीवन में आदिवासियों के अधिकारों के लिए संघर्ष किया। वे संविधान सभा के सदस्य थे और संविधान में आदिवासियों के अधिकार सुनिश्चित करने में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही। उन्होंने झारखंड के लिए एक अलग राज्य की मांग की और आदिवासी समुदाय को एकजुट करने के लिए 'भारतीय आदिवासी महासभा' का नेतृत्व किया। उनकी दूरदृष्टि और निष्ठा ने उन्हें आदिवासी समाज का सबसे प्रमुख चेहरा बना दिया।
जयपाल सिंह मुंडा का जीवन यह दिखाता है कि मेहनत और समर्पण से कैसे असंभव को संभव बनाया जा सकता है। उन्होंने न केवल आदिवासियों बल्कि पूरे समाज को सिखाया कि अधिकारों के लिए लड़ना और शिक्षा को प्राथमिकता देना कितना जरूरी है।
20 मार्च 1970 को जयपाल सिंह मुंडा का निधन हुआ, लेकिन उनकी विरासत आज भी जीवित है। वे आदिवासी समाज के प्रेरणा स्रोत हैं और उनके योगदान को भुलाया नहीं जा सकता। उनके जीवन और काम पर आधारित कई पुस्तकें लिखी गई हैं, जैसे:
"In and with Adivasidom: An Auto Memoir of Marang Gomke, Jaipal Singh Munda"
"The Life and Times of Jaipal Singh Munda"
"The Adivasi Mahasabha (1938-1949): Launching Pad of the Jharkhand Movement"
जयपाल सिंह मुंडा का जीवन हमें यह सिखाता है कि हमें अपने अधिकारों के लिए लड़ने के साथ-साथ दूसरों के कल्याण के लिए भी काम करना चाहिए। वे एक सच्चे आदर्श हैं, जिनका जीवन हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
नोट: यदि आप जयपाल सिंह मुंडा के बारे में और अधिक जानना चाहते हैं, तो ऊपर दी गई किताबें पढ़ सकते हैं। उनके जीवन का हर पहलू हमें अपने भीतर नई ऊर्जा और दिशा प्रदान करता है।
महाराष्ट्र शूर वीरांची भूमी आहे,थोर संतांची भूमी आहे,प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्याची भूमी आहे आणि महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र माझ्या शिवरायांची भूमी आहे.दीनदलीत,वंचित,कामकरी,कष्टकरी जातीपातीचे राजकारण न करता गुण्यागोविंदाने सर्व समभाव बंधूभाव याचा आदर करीत एकोप्याने वास्तव्य करीत होते.
जातीपातीचा राजकारण आज महाराष्ट्रात सुरू होऊन खून,दरोडे,बलात्कार रोजच्या रोज वाढत जाताना दिसतो आहे. राज्याची अब्रू वेशीवर टांगल्या गेलेली आहे,असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.कारण गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाडून आलेली आहे.दिवसा ढवळे होणारे बलात्कार आणि खून दरोडे रोजच्या रोज होत असतील तर महाराष्ट्राची वाट लागायला विलंब होणार नाही,हे इथं खेदाने नमूद करावेसे वाटते.
एक दिवस महाराष्ट्र देखील युपी किंवा बिहार होऊन जाईल इतकी भयंकर बिकट अवस्था आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय.राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येऊन आजच्या घडीला महिना देखील उलटला नाही आणि असले प्रकार कानावर ऐकू यायला लागले तर राज्यातील सरकारची नितिमत्ता गहाण पडते की काय ? अशी खचखच मनात व्हायला लागते आणि ती सहाजिकच आहे.
मग बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संजय देशमुख असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी असो किंवा मूल तालुक्यातील रितिक शेंडे असो होणाऱ्या घटनेचा सारासार विचार करायला गेला तर नवीन नवनिर्वाचित सरकारची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत किंवा राज्य सरकारची नीतिमत्ता गहाण पडलेली आहे,अशी शंका कुशंका उपस्थित होतांना दिसतो आहे.वेळीच सावध व्हा आणि अन्यायाविरुद्ध दंड ठोप थोपटायला शिका याशिवाय राज्यातील जनतेकडे काहीच पर्याय उरलेला नसेल.
|| जागे व्हा वीरांनो वैऱ्याची रात्र आहे;
जिकडे बघावे तिकडे अन्याय होत आहे ||
परभणी घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको
संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी - डी. के. साखरे
मंगळवेढा :-भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक डी. के. साखरे यांनी केले.परभणी येथे देशद्रोही समाजकंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ व शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 18.12.2024 रोजी मंगळवेढा येथील शहीद किसन माने चौक (जुना बोराळे नाका )येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते मारुती (एम. के.)गायकवाड, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, विक्रम अवघडे, खंडू खंदारे, गणेश धोत्रे,मराठा आघाडीचे पोपट पडवळे,विजय शिकतोडे, सिद्धार्थ लोकरे,सागर जाधव,जनार्धन अवघडे,लक्ष्मण गायकवाड, नितीन सोनवले, विकास सोनवले,प्रदीप परकाळे,अशोक शिवशरण, प्रदीप खवतोडे,सागर जाधव, सागर खरबडे, नेताजी अवघडे, बाळासाहेब निकम, सुभाष भंडारे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना साखरे म्हणाले की, संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो.संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधीकाऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य व केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलकर्त्यांच्याकडून करण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड, सिद्धार्थ लोकरे, धनाजी माने, प्रदीप परकाळे व पोपट पडवळे आदिनी आपल्या मनोगतातून परभणी घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी मंगळवेढा तहसील च्या नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.तर
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी जातीने उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.