ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
14-07-2024
Chandrapur News :- चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या Mahakali mandir लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, महाकाली मंदिराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
मंदिराच्या कामासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला होता. शुक्रवारला झालेल्या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांच्या सदर काम करण्याबाबत घोषणा केलेली आहे, त्यामुळे आता लवकरच २५० कोटी रुपयांतून माता महाकाली मंदिर यात्रा परिसराचे रुपडे पालटणार आहे.
आमदार किशोर जोरगेवार Kishor Jorgewar यांनी Chandrapur येथील पवित्र दीक्षाभूमी आणि माता महाकाली मंदिर Mahakali mandir परिसर या भागाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्यांच्या प्रयत्नांमुळे दीक्षाभूमी येथील विकास कामांना मंजुरी मिळाली असून यासाठी ५६.९० कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
तर माता महाकाली मंदिर Mahakali mandir परिसराच्या विकासासाठी त्यांच्या पाठपुराव्या नंतर २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला होता.
चंद्रपूर ची आराध्य दैवत श्री महाकाली मातेचे Mahakali mandir १६ व्या शतकातील प्राचीन जागृत असे मंदिर गोंड राजवंशाने बांधले आहे.
दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र नवरात्री दरम्यान महाकाली यात्रा सुरू होते. या यात्रेमध्ये नांदेड, मराठवाडा सह तेलंगाना, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातूनही लाखोच्या संख्यने भाविक यात्रेसाठी येत असतात.
वर्षातील चैत्र नवरात्री व अश्विनी नवरात्री या दोन्ही नवरात्री दरम्यान श्री महाकाली माता मंदिर Mahakali mandir परिसरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.
परंतु सदर यात्रा परिसरात भाविकांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. यात्रेकरूंच्या संख्येच्या तुलनेत निवास, शौचालय, स्नानगृहे, भोजनकक्ष व्यवस्था नसल्यामुळे महिला भाविकांना उघड्यावरच दैनंदिन कार्य उरकावे लागत आहे.
तसेच नैसर्गिक आपत्तीत ऊन, वारा व पावसापासून संरक्षित सभामंडप नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे भाविकांच्य जीवितास हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंदिराच्या यात्रा परिसरात भाविकांसाठी सुविधांसह विकास कामांची गरज होती.
मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर २५० कोटी रुपयांच्या या आराखड्यानुसार मंदिर परिसरात शेड व शौचालयाचे बांधकाम, मंदिर परिसर प्रवेशद्वार व सीमा भिंतीचे बांधकाम, पाईपलाइन व पाण्याच्या टाकीचे काम, मंदिर परिसरात विद्युतीकरण, भक्त निवास आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यासाठी आमदार किशोर जोरगेवार Kishor Jorgewar यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले दिसत आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री Eknath shinde यांनी सदर २५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यानुसार विकासकामे करण्याची घोषणा केली.
त्यामुळे आता मंदिर Mahakali mandir यात्रा परिसराच्या विकास कामाला गती येणार आहे. विशेष म्हणजे आश्विन नवरात्री दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरात Chandrapur माता महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे.
या महोत्सवाच्या भव्यतेमुळे माता महाकाली देवस्थान देशपातळीवर पोहोचले आहे. परिणामी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा परिणाम येथील व्यवसायावरही दिसून येत आहे.
जगप्रसिद्ध ताडोबा Tadoba अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि इतर पर्यटकांना माता महाकाली मंदिराकडे वळविण्यासाठी सदर महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
मात्र Mahakali mandir येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने सोयीसुविधांच्या येथे व्यवस्था नाहीत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते, यीसाठी येथे विकासकामे केले जाणे गरजेचे होते.
दरम्यान, आता श्री महाकाली मंदिर Mahakali mandir यात्रा परिसराचा सर्वांगीण विकास कामे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी केली असल्याने येथे सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
याचा फायदा येथील व्यवसाय वाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन आदी क्षेत्रांवर दिसून येणार आहे. मंदिर परिसराचा विकास व्हावा, येथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम भक्त निवास असावा हा संकल्प आपण केला होता.
मुख्यमंत्री यांची घोषणा ही या संकल्प पूर्ततेकडील वाटचाल असून चंद्रपूरच्या Chandrapur नागरिकांच्या आणि महाकाली मातेच्या भक्तांच्या वतीने आपण मुख्यमंत्री Eknath shinde यांचे आभार मानतो, असे किशोर जोरगेवार Kishor Jorgewar यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope :- १४ जुलै २०२४ ; विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात लाभ, शुभ दिवस आहे
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास
अधिक वाचा :- Today Horoscope :- १३ जुलै २०२४ ; हातात घेतलेली कामे पूर्ण होतील, मान सन्मान मिळेल
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही
अधिक वाचा :- Chandrapur News :- चक्क २७ विद्यार्थिनींना वसतिगृहात भाड्याने ठेवले
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments