अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
15-07-2024
• मुंबई, (वा.) आत्महत्येच्या अकरा महिन्यांनंतर MHB पोलिसांनी मृताच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरी उर्फ आयुषी चेतन मुसले असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पती चेतनवर मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे. चेतनच्या डायरीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस लवकरच गौरीचा जबाब नोंदवणार आहेत.
वास्तविक, २९ ऑगस्ट २०२३ रोजी चेतनने बोरिवली पश्चिम येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यादरम्यान कौटुंबिक वादातून नैराश्येतून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केला होता.
मात्र नुकतीच मृत चेतनच्या आईला एक डायरी सापडली. ज्यामध्ये चेतनने पत्नी गौरी उर्फ आयुषीबद्दल लिहिले होते. ती त्याचा मानसिक छळ करत असल्याचे डायरीत लिहिले होते. याला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला गौरी उर्फ आयुषी जबाबदार असल्याचे डायरीत लिहिले होते. त्यामुळे मृताच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गौरीविरुद्ध पतीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन त्या महिलाचे अजून कोणी साथीदार आहेत ते तपासून पाहणार असल्याचे सुत्रांकडून समजते
.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments