CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
20-07-2024
Gadchiroli News :- सहकाऱ्यांची काळजी, त्यांच्याबद्दलची माया हे नैसर्गिक मानवी गुणधर्म प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात असतात.
जर एखाद्याला एका हातातून गोळी आरपार गेल्या नंतरही आपल्या सहकाऱ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून माओवाद्यांच्या (Naxal) बेछूट गोळीबारात ६ तास लढा देत असेल तर त्या व्यक्ती बद्दल तुमच्या काय भावना असणार?
Gadchiroli Police C-60 या कमांडो पथकाचे शंकर पोटावी या जवानांने संकटात अडकलेल्या आपल्या सहकाऱ्यांसाठी असेच अतुलनीय शौर्य गाजवले आहे.
गोळी हातातून आरपार गेली, तरीही दिला तब्बल ६ तास लढा
महाराष्ट्राच्या आणि छत्तीसगड सीमेवर बुधवारी १७ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक घडली. या पोलीस-नक्षलवादी चकमकीत महाराष्ट्राच्या विशेष दलाच्या C-60 कमांडोंनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.
या भीषण चकमकीत प्रथम नक्षलवाद्यांनी C- 60 च्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यामुळे चकमकीच्या पहिल्या काही मिनिटांमध्येच पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी झाले.
त्यानंतर पुढील काही मिनिटात शंकर पोटावी आणि विवेक शिंगोळे हे ही जखमी झाले. शंकर पोटावी यांच्या उजव्या हातातून गोळी चक्क आरपार निघाली.
साधारणपणे अशा स्थितीत जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस अधिकरी आणि C-60 त्यांचे ऑपरेशन मागे घेऊन जखमींना सुरक्षित बाहेर काढते.
मात्र, त्यादिवशी हातातून गोळी आरपार निघून गेली तरी शंकर पोटावी याने आपल्या सहकाऱ्यांना सोडून सुरक्षित बाहेर जाण्यास नकार दिला आणि जखमी अवस्थेमध्ये ही नक्षलवाद्यांशी पुढील ६ तास लढा सुरू ठेवला. सोबतच आपल्या अनुभवाच्या आधारावर नक्षलवाद्यांचा घेरा तोडून दाखवला.
रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलं!
शंकर पोटावी यांच्या या शौर्यामुळे नक्षलवाद्यांच्या चक्रव्युवहात अडकलेल्या सोबतच्या अनेक जवानांचे जीव तर वाचलेच. शिवाय सोबतच जखमी असलेला आपला एक सहकारी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून लढतो आहे, हे पाहून सोबतच्या जवानांमध्ये ही नवा जोश निर्माण केला आणि ते सर्व नव्या उत्साहाने नक्षलवाद्यांविरोधात लढले.
त्यानंतर अनेक तास दोन्ही बाजूंनी जबरदस्त गोळीबार झाला आणि अखेरीस C-60 च्या पथकाने नक्षलवाद्यांच्या तीन कमांडरसह बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
परिणामी नक्षलवाद्यांचे टिपागड दलम आणि चातगाव -कसनसूर दलम कायमचे संपुष्टात येऊन उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त होऊ शकला आहे.
शूरवीर शंकर पोटावी यांच्या शौर्याचे सध्या सार्विकडे कौतुक केलं जात आहे. सोबतच संपूर्ण C-60 च्या पथकाच्या अतुलनीय शौर्या रक्तरंजित नक्षली चळवळीचं कंबरडं मोडण्यात आलेले आहे.
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर सुरूच, दोघे जण गेले वाहून
अधिक वाचा :- Gadchiroli News :- जनता वाऱ्यावर, पालकंत्र्यांना फ्कत उधोग्यासाठी वेळ
अधिक वाचा :- Today Horoscope :- २० जुलै २०२४ ; नवीन काम करायला दिवस शुभ आहे, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Chandrapur News :- पत्नी ने संपवली पतीची जीवन यात्रा
अधिक वाचा :- Warora News :- रागाच्या भरात तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या
अधिक वाचा :- Entertainment News :- बैड न्यूज़ रिव्यू: विक्की कौशल ने फिल्म को 'बचाया'
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Redefine your style
book your appointment now
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments