संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
23-07-2024
जन्मदात्या बापाचा मुलाने दगड मारुन केला खून.
उपसंपादक/ प्रमोद झरकर
सिंदेवाही : दिनांक २२/०७/२०२४ रोजी सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील श्री देवेंद्र तलांडे यांनी फोन वरून श्री तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांना माहिती दिली की,आंबेडकर चौक वॉर्ड क्र.२ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा.वासेरा यांनी आपल्या वडीलाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.
या माहिती नुसार सपोनी तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही तात्काळ पोलीस ठाण्याचे सपोनि स्थूल,पोउपनी सागर महल्ले,पोहवा विनोद बावणे,पोलीस अंमलदार रणधीर मदारे यांचेसह वासेरा गावासाठी रवाना झाले.परंतु प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट घोषित केला होता.अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वासेरा गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद होते.त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी आव्हान होते.
शेवटी अथक परिश्रम व पोलीस मित्र तसेच आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने वाकल ते जामसाळ्या मध्ये असलेल्या शेतातील नाल्यातिल कमरेच्या वर पाण्यातुन ट्रॅक्टरने मार्ग काढत जामसाळ्या पर्यँत पोहचुन पुढील प्रवास ट्रक्टरच्या मुंडीवर बसून घटनास्थळ गाठले.
पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्या नंतर जखमी अवस्थेत असलेले अशोक आबाजी रामटेके यांना पोलीस पथक व वासेरा गावातील युवक व त्यांचे नातेवाईक यांचे मदतीने आल्या मार्गानेच परत सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनेसंबंधाने मृतक याची पत्नी अर्चना अशोक रामटेके यांनी सिंदेवाही पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की,मृतक हा उसनवार घेतलेले पैसे परत करावयाचे आहेत.तुझे कानातील सोन्याचे रिंग मला दे असे म्हटल्याने मृतकाच्या पत्नीने त्याला ५०० रुपये दिले व ज्याचे घेतले त्याला दे म्हणून सांगितले.
मृतकाने त्यातील ४०० रुपये देऊन १०० रुपये स्वतःकडे ठेवून घेतले.त्याबाबत मृतक व त्याचा चुलत भाऊ कैकाडू रामटेके याचे सोबत मृतकाच्या पत्नीसोबत बोलचाल करीत असतांना यातील आरोपी हा येऊन मृतकास तू दारू पिण्यासाठी घरी पैसे का मांगतोस ? तुला दारू प्यायची सवय आहे तर दारू पिऊन चुपचाप झोपस का नाही ? असे म्हटल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.झगडा भांडण होऊन आरोपीने मृतकास लाथाबुक्क्यानी मारहाण करून खाली पाडले.
त्यानंतर मृतक उठून मनोज रामटेके यांच्या घराकडे चालत चालत जात असतांना आरोपीने मृतकास जिवाने मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील दगड मृतकास फेकून मारल्याने कानाचे मागील बाजूस डोक्यावर लागून मृतक गंभीर जखमी झाला.
ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे डॉक्टरांनी तपासनिअंती मृत घोषित केले.मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा अमित अशोक रामटेके वय २४ रा.वासेरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार,तुषार चव्हाण करीत आहेत.
सदर कामगिरी मुम्मका सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तुषार चव्हाण सिंदेवाही यांचे नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल,पोउपनी सागर महल्ले,अनिल चांदोरे,विनोद बावणे,रणधीर मदारे,सुहास करमकर,मोहीत मेश्राम यांनी केली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments