RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
25-07-2024
सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू
वरोरा:-
वरोरा तालुक्यातील टेमृर्डा येथून जवळपास सात लाखाची चोरी करणाऱ्या चोरांना अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सहा आरोपींना जेरबंद केले आहे
मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शरद सीताराम गुघाणे वय 53 वर्ष हे टेभूर्डा येथे आपल्या पत्नीसह चहाचे दुकान चालवतात 17 जुलै रोजी ते व त्यांची पत्नी उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरांनी चहाच्या दुकानातून सोन्याचे दागिने, रोख एक लाख रुपये, कोको कंपनीचा मोबाईल असा एकूण 7, 80, 500 रुपयाचा माल चोरून नेला. यासंबंधीची तक्रार शरद गुधाने यांनी वरोरा पोलीस ठाण्यात करताच वरोरा येथील गुन्हे शाखा तसेच चंद्रपूर व कोरपणा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे शिताफिने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे प्रदीप संजय शिरकुरे, आकाश नारायण शिरकुरे, चिंतामण संजय शिरकुरे, हरिणा प्रदीप शिरकुरे, माया देवगडे सर्व राहणार पारधी गुडा धोपटाळा तालुका कोरपणा यांचे सह विकास काळे राहणार चिनोरा यांना अटक केली व त्यांचे जवळून आठ सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चार बांगड्या, एक चपला कंठी, सोन्याचे कानातले दागीने, सोन्याची पोत व सोन्याचा गोफ या दागिन्यासह दोन मोबाईल व चोरी करण्यासाठी वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच 34 ए ए 3324 व एक्टिवा क्रमांक एम एच
31 ईव्ही 9188 असा एकूण 6,85000 रुपयाचा माल जप्त केला. या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचे जवळून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोन्डावार, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना व पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शाखा पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं. संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments