समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
29-09-2024
Chandrapur News: सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे एक अत्यंत संतापजनक घटना शनिवारी (दि. 28) सकाळी अकराच्या सुमारास घडली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक शिक्षिका, उज्वला पाटील, यांनी दोन विद्यार्थिनींवर पाण्याच्या बाटलीत काहीतरी घातल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. यामध्ये लावण्या कुमदेव चुधरी आणि धनश्री हरिदास दहेलकार या दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात गेले होते. शिक्षिका उज्वला पाटील यांनी अचानक सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावले आणि त्यांना विचारले, "माझ्या पाण्याच्या बाटलीला हात का लावला? त्यात काहीतरी द्रव्य का टाकले?" शिक्षिकेच्या या प्रश्नांवरून तणाव वाढला आणि त्यांनी चक्क लावण्या आणि धनश्री या विद्यार्थिनींचे केस ओढून त्यांच्यावर मारहाण सुरू केली.
गंभीर दुखापत या घटनेनंतर दोन्ही विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लावण्या ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तर धनश्री शिक्षणमंत्री होती.
हे देखील वाचा: Kids Tips: सावधान ! मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती होत आहे कमी
शिक्षिका उज्वला पाटील यांच्यावर गुन्हा दाखल या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या पालकांनी संतप्त होत सावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारावर शिक्षिका पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता 118 (1) बालन्याय अधिनियम कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली. संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक, गट शिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तातडीने शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण रुग्णालयातही लावण्या आणि धनश्री यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली. पालकांनी शिक्षिका पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments