STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
27-07-2024
नागराज व्हनवटे यांच्या प्रयत्नातून कलावंतांच्या मानधनात वाढ
पुणे :राज्यातील वृद्ध कलावंताना देण्यात येणाऱ्या मानधनात नुकतीच राज्य सरकारने वाढ केली आहे. राज्यातील वृद्ध कलावंताना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी ही मागणी मूळचे सलगर खुर्द ता.मंगळवेढा येथील रहिवाशी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्य करून असलेले सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांनी गेल्या अनेक दिवसापासून सरकार दरबारात ही मागणी लावून धरली होती.पूर्वी या योजनेतून अ वर्ग कलावंतास 3150 रुपये, ब वर्ग कलावंतास 2700 रुपये व क वर्ग कलावंतास 2250 रुपये मानधन मिळत होते. आता सुधारित शासन निर्णयानुसार या मानधनात वाढ करण्यात आली असून सर्वच वृद्ध कलावंताना सरसकट 5000 रुपये मानधन मिळणार आहे.गेल्या दहा वर्षांपासून व्हनवटे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
वृद्ध, महिला, दिव्यांग कलावंत ज्यामध्ये मृदुंगवादक, टाळकरी, कीर्तनकार, ढोलकी वादक, जागरण गोंधळी, साहित्यिक इत्यादी प्रकारचे कलावंत म्हणून ओळख असलेल्या 55 वर्षांपुढील लाभार्थ्यांना दरमहा मानधन दिले जाते.
या योजनेच्या लाभासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती मार्फत प्रस्ताव स्वीकारले जातात. विहीत नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, कलावंत म्हणून काम केल्याचे काही पुरावे, कात्रणे, तसेच आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यापैकी एकाची शिफारस असलेले पत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून कलावंतांनी त्या त्या पंचायत समितीत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागराज व्हनवटे यांनी केले आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments