अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
15-01-2025
मला का हटकले म्हणत पेचकसने पाठीत केला वार, उपसरपंच गंभीर
गोंदिया:-
शिवीगाळ करीत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला तू शिवीगाळ कशाला करतोस, असे हटकले असता उपसरपंचाला शिवीगाळ करून पेचकसने भोसकले. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी येथे रविवारी (दि. 12) ला सायंकाळचे सुमारास घडली.
गंभीर जखमी उपसरपंच नेपाल देवनाथ शेंडे वय वर्षे 45 रा. कोरंभी असे असून त्यांचे गावात मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दुकान बंद करून ते गावातीलच आंबेडकर चौकात बसून होते. यावेळी अशोक गुलाब मेश्राम (50) हा रस्त्याने शिवीगाळ करीत जात होता. दरम्यान नेपाल यांनी त्याला विनाकारण शिवीगाळ कशाला करतोस असे म्हणत हटकले. दरम्यान अशोकने अश्लील शब्दात शिवीगाळ करून नेपालच्या पाठीवर पेचकसने वार केला. त्यानंतर विलास केवळराम मेश्राम (35) हा देखील तेथे आला. त्यानेही शिवीगाळ करून ढकलून मारहाण केली. यात नेपाल शेंडे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी प्राप्त तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments