बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
18-06-2024
एका वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला सांगाडा
भद्रावती - :
शहरापासून एका वृद्धाचा हाडाचा सांगाडा पिपर बोडी येथील जंगलात गळफास घेतला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. कपडे व गळ्यातील माळ यावरून मृतदेहाची ओळख पटली. ही घटना दिनांक १५ रोज शनिवारला उघडकीस आली. प्रभाकर दादाजी नक्षीने वय ७२ वर्ष राहणार हनुमान नगर असे मृतकाचे नाव आहे.
प्रभाकर हे दिनांक २६ मार्च पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुंटूबियानी इतर शोधाशोध केली परंतु ते मिळाले नाही. त्यानंतर त्यांची बेपत्ता असल्याबाबतची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली गेल्या तीन दिवसांपूर्वी भद्रावती येथील काही नागरिक पिपर बोडीच्या जंगलात लटकलेल्या अवस्थेत सांगाडा असल्याची चर्चा करत होते ही माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांच्यापर्यंत पोहोचतात त्यांनी पिपर बोडी गावापासून सहा किमी अंतरापर्यंत जंगल शोधून काढले असता त्यांना एका झाडावर अंगावर कपडे असलेला सांगाडा दिसला अंगात असलेले कपडे, गळ्यातील माळ व चप्पल यावरून बेपत्ता असलेल्या तक्रारीचा शोध घेण्यात आला. सचिन नक्षीने याचे वडील असल्याची माहिती मिळाली गळ्याला दोर बांधून गकफास घेतल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. ही घटना तीन महिन्यापूर्वी असल्याने शरीरावरील संपूर्ण मास गळून पडले होते. वृद्धाचा सांगाडा हा फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासीसाठी पाठविला असून आत्महत्या की घातपात याचा शोध भद्रावती पोलीस घेत आहेत
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments