बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
28-02-2024
उद्योगाकरिता शेतजमिनी देण्यास चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा नकार
शेतजमिनी मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी पाठवले वापस
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लोहखनिज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन हस्तगत करुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी रिकाम्या हाताने पाठवले आहे
उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे विकासाला आमचा विरोध नाही. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे,असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरात उद्योगाकरिता’ प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोली (चक) २, जयरामपूर, पारडी (देव), सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली (तुकुम) या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे सुपीक असलेली शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाहीत. याविरोधात एकत्र येत या गावातील शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले होते.
गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोली (चक) नं २ गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही गावात येऊ नये असे फलक लावण्यात आले आहेत वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे शेतजमिनी उद्योगासाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे व जगायचं कसं असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती उद्योगासाठी अधिग्रहित करण्यात येत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता वेदराज पिंपळकर आणि सुनील गौरकार म्हणाले की, आमच्या दोन पिढ्या या शेतीवर मोठ्या झाल्या. मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ ,घर सांभाळून पुन्हा शेतीकरिता मिळकत शिल्लक ठेवणे हे सगळे या शेतीच्या बळावर झाले. सिंचनाच्या सोयीमुळे येथील शेतजमीन सुपीक आहे. त्यामुळे आम्ही शेतीतून १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न काढत असतो कंम्पणीला जमिनी दिल्या तर नाममात्र वेतनावर काम करीत राहावे लागते
सूरजागड टेकडीवर उत्खनन करणाऱ्या लॉयडस मेटल्स कंपनीचा कारखाना कोनसरी येथे उभा उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले आहे. सोबतच जिंदाल, मित्तल, सूरजागड इस्पात सारख्या कंपन्यांनी १ लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पण यासाठी जमीन कुठून आणणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात ७५ टक्के जंगल आहे. खासगी भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. एवढेच गरजेचे असेल तर शासनाने कायद्यात बदल करून वनजमिन उद्योगांसाठी द्यावी असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments