RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
08-01-2025
भीमशक्ती महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी : पद्मिनी शेवडे
सोलापूर :-काँग्रेस (i)पक्षाचे राष्ट्रीय नेते व राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी वरिष्ठराव शेवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परवा सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नागनाथ बंगाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड घोषित करण्यात आली.
शेवडे ह्या आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्यां असून विविध आंदोलनात सहभाग नोंदवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद (नाना )प्रेक्षाळे, समता सैनिक दलाच्या वैशाली उबाळे,नंदा चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विलास सरवदे व लहुजी शक्ती सेनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राहुल मस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना शेवडे म्हणाल्या की माननीय हंडोरे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय बहुजन समाजाला पर्याय नसून भीम शक्ती च्या माध्यमातून उपेक्षीताना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असून कामाच्या माध्यमातून आपण संघटना बांधणी करणार आहे.
शेवडे यांची कर्मभूमी जरी मुबई असली तरी त्यांचे जन्म भूमी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही आहे. त्यांच्या निवडीचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments