नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
04-02-2025
कुरुड येथे ६ फेब्रुवारी एका रात्री नऊ नाटकांची मेजवानी
नाट्यनिष्ठा व सांस्कृतिक अस्मिता जोपासणारे गाव
गडचिरोली :पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही जनसामान्य रसिक प्रेक्षकांच्या आश्रयावर आधारलेली नाट्यप्रयोगाच्या लक्षणीय संख्येमुळे लोकप्रिय आहे. दिवाळी ते होळी दरम्यान चालणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीतील विविध सामाजिक, कौटुंबिक, समस्याप्रधान नाटकातून रंजन व प्रबोधन केले जाते. एकाच रात्री अनेक नाटकांचे प्रयोग हाउसफुल चालणारी अनेक गावे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असण्याच्या मल्टिमीडियाच्या काळातही झाडीपट्टीमध्ये प्रकर्षाने आहेत. कुरुड ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली येथे सहा फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंकरपट व मंडईचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने झुरे मोहल्यात प्रल्हाद नाट्य रंगभूमीचे दत्तप्रसाद एक नाट्य समाज झुरे मोहल्ला आयोजित प्रल्हाद मेश्राम लिखित संगीत ' पेटलेल्या चुली 'श्रीराम मंदिर देवस्थान कमेटी सुभाष वार्ड जय दुर्गा नाट्य मंडळाचे , कसे तोडू मी मंगळसूत्र' हे नाटक श्री दत्त प्रासादिक नाट्य समाज पारधी मोहल्ला येथे रंगतरंग नाट्य रंगभूमीचे ' अंधारलेल्या वाटा ',हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ पाटीलपुरा आयोजित शिवचंद्र नाट्य कला रंगभूमीचे संगीत 'अंधारातील लाल दिवा ', हे नाटक नूतन शेतकरी नाट्य संपदा कांबळी मोहल्ला येथे युवा रंगमंचचे ' लाडका ' हे नाटक ,कस्तुरबा समाज मंदिर ढीवर मोहल्ला येथे स्थानिक मंडळाचे' सौदा सुहासिनीचा' हे नाटक ,पंचशील नाट्य कला मंडळचे गुरुदेव रंगभूमीचे 'आहुती '९ हे नाटक अशा प्रकारे ग्रामपंचायत असलेल्या कुरुड या गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये एकाच रात्री नऊ नाटकाचे विविध मोहल्यात आयोजन करण्यात आलेले आहे. झाडीपट्टीतील समृद्धता दर्शविणारे एकाच रात्री विविध मोहल्यात एकापेक्षा अनेक म्हणजेच नऊ नाटकाचे आयोजन करणारे देशातील हे एकमेव गाव असावे. झाडीपट्टीतील नाट्य रसिकता व नाटक विषयक सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविणारे हे उत्तम उदाहरण आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments