ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
04-08-2024
आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुणीने नदी पात्रात उडी घेऊन केली आत्महत्या
भावाने केली पोलिसात तक्रार, प्रशासनाची युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू
मारेगाव:-
येथील एका तरुणीचे आई - वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे की काय परंतू तिने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे मारेगाव येथील प्रभाग क्र. पाच घरकुल कॉलनी मध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवतीने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला, या प्रकाराने मारेगाव तालुका हादरला आहे.
माधुरी अरुण खैरे, असे वर्धा नदीत उडी घेतलेल्या युवतीचे नाव आहे. तीचे डी-फार्म पर्यंत शिक्षण झाले असून वडील अरुण खैरे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले तर जि. प. शाळेच्या शिक्षिका उषाताई खैरे ह्या मागील मार्च महिन्यात कचरा जाळतांना पन्नास टक्के भाजल्या होत्या दिड महिन्याच्या दीर्घ उपचारानंतर त्यांचेही निधन झाले होते.
दि . २ ऑगष्ठ शुक्रवारला सकाळी १० वाजताचे सुमारास वणी कॉलेज ला जात असल्याची आपल्या भावाला सूचना करीत ही युवती वणीहून ऑटोरिक्षात बसून वरोरा मार्गे निघाली दुपारी १२.३० वाजताचे सुमारास पाटाळा वर्धा नदी जवळ माधुरी हिने थांबा घेतला. काही वेळात माजरी येथील एक दाम्पत्य 'त्या' ठिकाणी थांबले असता त्यांना मोबाईल, पर्स व चप्पल निदर्शनास आली. यावेळी माधुरी हिच्या मोबाईलवर कॉल आला असतांना घटनास्थळवरील हकीकत नातेवाईकांना विषद केली. आणि नातेवाईकांनी त्या ठिकाणी धाव घेत सि सि टी व्ही फुटेज तपासाअंती माधुरी ही वर्धा नदीत उडी घेत असल्याचे स्पष्ट झाले. भाऊ यश याने वणी पोलीस प्रशासनात तक्रार दाखल केली आहे. आई-वडील नसतांना आता बहिणीच्या टोकाच्या निर्णयाने एकुलता एक मुलगा एकाकी पडला आहे. सदर घटनेचे गांभीर्याने घेत प्रशासन तिचा शोध घेत आहेत.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments