STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
22-04-2024
कढोली येथे वीज कोसळली, नशीब बलवत्तर म्हणून नंदिनीला मिळाले जीवदान
अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील
चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे दि २१ ला सायंकाळी ७ वाजता विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि क्षणार्धात विज कोसळली, ती विज नारळाच्या झाडावर पडली तेव्हा अंगनात असलेल्या नंदिनी ला शाक बसला व ती खाली कोसळली तेव्हा तीला त्वरीत ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले
मात्र नारळाच्या झाडाला आग लागली असल्याने चामोर्शी येथील अग्निशमन बोलाविण्यात आले व आग विझविण्यात आली व मोठा अनर्थ टळला आहे
नंदिनी भारत घ्यार वय १५ रा. कढोली हिच्या शेजारीच विज कोसळल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तीला ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असता प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी योग्य उपचार करुन तिचे प्राण वाचवले आहे
सदर घटनेची माहिती होताच चामोर्शी तहसीलदार प्रशांत घोरुडे हे तातडीने ग्रामीण रुग्णालयात पोहचले व कुटुंबीयांना धिर दिला
नंदिनी ही नवव्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे आयुष्य मोठे असल्याने तीचा जीव वाचला आहे
नारळाच्या झाडावर विज कोसळली व त्याने पेट घेतला त्यामुळे गावातील घरांना आग लागेल या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले होते मात्र अग्निशमन दलाचे वेळीच आग आटोक्यात आणली त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला
झाली. नंदिनी ही आपल्या घरासमोरील अंगणात असताना तिथे असलेल्या नारळाच्या झाडावर विज कोसळली. ती झाडाच्या अगदी जवळच असल्याने विजेच्या धक्क्याने ती खाली कोसळली तीला त्वरित आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली व या घटनेची माहिती चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना कळविताच क्षणाचाही विलंब न लावता तहसीलदार प्रशांत घोरुडे तातडीने आष्टी येथील रूग्णालयात दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दीले. व कुटुंबीयांना धीर दिला. नंदिनी ही नवव्या वर्गात शिकत असून नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. विज कोसळल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. त्यामुळे वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला मात्र लवकरच हि आग आटोक्यात आल्याने धोका टळला.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments