नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
10-05-2024
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या आशिषला वाघाने केले ठार
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
मुल :-
तालुका अंतर्गत पदजारी -रत्नापूर जंगलामधील कक्ष क्र.३२४मध्ये गावातील चार ते पाच लोक तेंदूपत्ता संकलनाचे काम करण्यासाठी गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने आशिष सुरेश सोनुले वय ३४ याचेवर हमला करुन ठार केले
मुल तालुक्यातील जंगलव्याप्त ग्रामीण भागात उन्हाळ्यात काम नसल्याने मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात साठी जातात. रत्नपुरा पडझरी परीषदेचे काही सदस्य पहाटे गावाजवळील जंगलात तेदुपत्ता तोडणी साठी गेले होते. नेहमीप्रमाणे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी पाने तोडत असताना झुडपात बसलेल्या पट्टेरी वाघाने आशिष सोनुले यांच्यावर हल्ला करून काही अंतरापर्यंत खेचत नेले. वाघाने आशिषवर हल्ला केल्याचे शेजारी उपस्थित असलेल्या मित्रांना समजताच आरडाओरडा केल्याने वाघ जंगलात पळून गेला
आज घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त करत काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली वाघांच्या बंदोबस्ताची मागणी लावून धरली. आज वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आशिष सुरेश सोनुले यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र सहायक पकेवार, वनरक्षक एस.जी. पकडले, वनरक्षक ज्योती दावेवार यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यानंतर क्षेत्र सहाय्यक पकेवार यांनी मृताच्या पत्नीला 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले व शासकिय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही सांगितले
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments