नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
19-02-2024
जिवती तालुक्यात खनिज संपत्तीचे उद्योग उभारावे - शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्या हा ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखली जाते.हा जिल्हा खनिज संपत्तीने संपन्न आहे.याच चंद्रपूर जिल्हयाचे अगदी टोकावर तेलंगणा राज्याच्या सिमावर्ती भागालगत जिवती तालुका बसलेला असुन हा तालुका नक्षल प्रभावित आणि सुख सुविधांचा अभाव असलेला अतिमागास व अतिदुर्गम तालुका म्हणून परिचित आहे.
या तालुक्याच्या शेजारील तालुक्यात मोठ मोठे उद्योग निर्माण झाले आहेत.त्यामुळे तेथील दळणवळण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने आर्थिक बाजू बळकट झाली. परंतु जिवती तालुक्याची स्थिती जैसे थे आहे.या तालुक्याचा विकास खुंटला असल्याने सरकारी पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर विकास होणे अपेक्षित असून त्या करिता प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. जिवती तालुक्यातील बेरोजगार युवकांना तसेच स्थानिक लोकांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी जिवती तालुक्यात मोठे उद्योग धंदे उभारणे आवश्यक आहे. तालुक्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी जिवती तालुक्यात खालील उद्योग व्यवसाय उभे केल्यास जिवती तालुका राज्याला रोजगार देणारा तालुका ठरु शकतो.
जिवती तालुक्यात लोह खनिज चा साठा मोठ्या प्रमाणात आढळत असून, हया ठिकाणी
सुरजागड प्रकल्पासारखे प्रकल्प उभे करता येते.त्याचप्रमाणे या तालुक्यात सिमेंटचे उत्पादन करण्याकरीता वापरण्यात येणारे दगडाचे मोठे साठे आहेत.त्याला अनुसरून सिमेंट कारखाने उभे करता येते.तसेच शासनाने पुढाकार घेतल्यास येथे एम.आय.डी.सी. देखील स्थापन करता येऊ शकते .करिता शासनाने आणि प्रशासनाने या बाबीकडे लक्ष वेधून तालुक्यातील बेरोजगर युवकांच्या आणि स्थानिक लोकांच्या हितार्थ उद्योगधंदे उभारून जिवती तालुक्याचा विकास साधण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख भारत बिरादार
यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आणि रोजगाराची मागणी केली आहे
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments