समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
07-02-2024
महसूल विभागाच्या मुख्य लिपीकास लाच घेतांना रंगेहाथ पकडले
कूरखेडा:-
मुख्य लिपिक उपविभागीय अधिकारी कार्यालय कूरखेडा यास लाच घेताना रंगेहाथ पकडले
लाच घेणारा मुख्य लिपिक नागसेन प्रेमदास वैद्य वय ४६ उपविभागीय कार्यालय कुरखेडा असे असून यांनी १३०००/- हजार रुपयाची लाच स्वरूपात नगद रक्कम स्वीकारतांना एन्टी करप्शन ब्यूरो च्या पथकाने दी.०५/०२/२०२४ ला रंगेहाथ पकडले
तक्ररदार यास आदिवासी ते आदिवासी जमीन विक्री करण्याकरिता परवानगी आदेश तयार करुण दिल्याचा मोबादला म्हणून आरोपी वैद्य यांनी तक्रारदार यांच्या कड़े मागणी केली होती मात्र लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गड़चिरोली येथे भेटून तक्रार नोंदविली
पोलिस अधीक्षक श्रीमती अनामीका मिर्झापुरे ला.लू.वी. गड़चिरोली यांच्या पर्यवेक्षनात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रार गोपनीय ठेवत सहानीशा करित कार्यवाही करिता सापळा कार्यवाहीचे आयोजन केले, आरोपी कारकुन ने तक्रार कर्त्याला १५०००/- रुपायाची मागणी केली असता, तक्रार कर्त्याने १३०००/- रुपये देण्याची सहमती दर्शवित व दोघांत तडजोड झाल्यावर लाचेची उप विभागीय कार्यालय येथील स्वःताच्या कक्षात लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ मिळून आल्याने आरोपी वैद्य त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन कूरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या नंतर आरोपी नागसेन वैद्य यांच्या निवास स्थान वडसा येथे A.C.B च्या अधिकाऱ्यांनी आपल्या चमुसह झड़ती घेतली
या सर्व प्रकरणाची कार्यवाही पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर. एन्टी करप्शन ब्यूरो नागपुर, सचिन कदम पोलिस अधीक्षक ला. प्र.वि. नागपुर, संजय पुरन्दरे अप्पर पोलिस अधीक्षक ला. प्र. वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलिस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे यांचे पर्यवेक्षणात पो नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगीरीवार, संदीप उडाल, प्रफुल डोर्लीकर, लाच लुचपत प्रतिबंध विभाग गड़चिरोली यांनी केली आहे
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments