समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
30-01-2024
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी धम्माची चळवळ अधिक गतिमान करावी- सोपानदेव मशाखेत्री.
अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक
भारत बौद्धमय करीन, या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी समस्त बौद्ध बांधवांनी धम्माची चळवळ अधिक गतिमान करून धम्म अनुसरण करावे असे मौलिक विचार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोलीचे विभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांनी केले .येणापूर येथील पंचशील बुद्ध विहारात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गडचिरोली जिल्ह्याचे वतीने चामोर्शी तालुका कार्यकारिणी गठीत कमिटीच्या सभेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते .सभेचे अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त नायब तहसीलदार आर.डी. राऊत होते. तर प्रमुख अतिथी काका गडकरी जिल्हा संस्कर प्रमुख, राधाताई नांदगाये जिल्हा महिला प्रमुख, खेमराज सोरते गडचिरोली तालुका सचिव उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमांन समोर दीप प्रज्वलित करून बुद्ध वंदना घेण्यात आली .व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांचे सहमतीने चामोर्शी तालुका दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून वसंत रामटेके, उपाध्यक्ष ॲड. दिनेश राऊत, महिलांच्या उपाध्यक्ष प्रतिभा कोरडे, कार्याध्यक्ष ईश्वर झाडे, सचिव विजय मेश्राम, कोषाध्यक्ष हेमंत पेटकर, सहसचिव प्रदीप सोरते, संस्कार प्रमुख छत्रपती चूनारकर ,संघटक दिलीप खोब्रागडे यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली .सभेला बहुसंख्य उपासक आणि उपासिका हजर होते . धम्माचे महत्त्व व उपासकांचे कर्तव्य यावर काका गडकरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच राधाताई नांदगाये यांनी धम्मोपदेशाची महती विशद केली. सभेचे संचालन अंकुश निमसरकार यांनी केले. आणि आभार ईश्वर झाडे यांनी मानले. यावेळी महिला तालुकाध्यक्ष सारिका गोंगले यांची सुद्धा निवड करण्यात आली.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments