अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
03-03-2024
शासनाच्या स्पर्धेत तुळशी येथिल शिवाजी विद्यालय तिन लाख रुपयांची मानकरी
गडचिरोली:-
मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधून तुळशी येथिल शिवाजी विद्यालयाने व जिल्हा परिषद व शासकीय शाळा व्यवस्थापनामधून कोंढाळा येथिल जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांनी वेगवेगळ्या गटातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून सदर शाळा प्रत्येकी तीन लाखांच्या तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा जिल्हा परिषद शाळां /शासकीय शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळां अशा दोन स्वतंत्र गटात ही स्पर्धा होती. या स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील सहभागी सर्व शाळांचे केंद्र व तालुका स्तरावर नियुक्त समितीकडून निकषांनुसार मूल्यमापन करण्यात आले होते. तालुक्यातून प्रथम आलेल्या शाळांचे जिल्हा मूल्यांकन समितीने भेट देऊन तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
विद्यार्थिकेंदित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यावर एकूण ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यावर एकूण ४० गुण अशा १०० गुणांच्या आधारे या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते. यात शाळा व परिसराचे साैंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग,शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम आदीं मुद्दे तपासणी तज्ज्ञ समितीच्यावतीने तपासणी करुन गुणदान करण्यात आले.
तुळशी येथिल शिवाजी विद्यालयात सध्या शाळेत विद्यादानाचे व अध्यापनाचे कार्य करत असलेले शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दुनेदार , शिक्षक कैलाश गजापूरे, दुर्गाप्रसाद चुलपार, नाशीक शेंडे हे चारही शिक्षक ,कर्मचारी कु.आरती दाते, कु.प्रियंका पोवळे, निलकंठ मारबते, संदीप शेंडे, मिलींद मेश्राम शाळेची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुळशी ग्रामपंचायतचे सरपंच चक्रधर नाकाडे ,उपसरपंच सुरेश तोंडफोडे, ग्रामपंचायत पदाधिकारी , देसाईगंज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे , आमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आनंदराव गुरनुले, गटसमन्वयक संजय कसबे, कुरुड केंद्राचे केंद्रप्रमुख मेघराज बुराडे,विसोरा केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ पिलारे तसेच गट संसाधन केंद्राचे अरविंद घुटके,जितेंद्र पटले ,रामकृष्ण राहंगडाले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments