संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
17-01-2025
संस्था उपाध्यक्ष बबलुभैय्या हकीम यांनी घेतली नॅशनल आर्चरी चॅम्पियन कु.श्वेता कोवे ची गृहभेट.
आष्टी:-
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेली दिव्यांग विद्यार्थिनी कु. श्वेता कोवे तिने अलीकडेच जयपूर येथे झालेल्या सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये तिने रौप्य पदकाची कमाई केली. त्यानिमित्त तिच्या या कर्तबगारीच्या सन्मानार्थ वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलूभैय्या हकीम तसेच त्यांच्या सहचरणी नागपूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष शाहीनभाभी हकीम यांनी श्वेताच्या गावी कढोली येथे तिच्या राहत्या घरी जाऊन, तिचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. व तिची आस्थेने विचारपूस केली. कढोली येथून आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी ती एका हाताने सायकल चालवत येणे जाणे करायची. दरम्यान, दुसऱ्यांच्या शेळ्या चारण्याचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांचे छत्र तिच्या डोक्यावरून हरपले. याही वेळी डॉ. श्याम कोरडे यांनी तिला मदतीचा हात दिला व तिच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी स्वखर्चाने उपलब्ध करून देऊन तिचा सराव सतत कायम ठेवला. परिस्थितीची जाण ठेवून श्वेताने ही आटोकाट मेहनत केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत श्वेताने हे यश संपादन केले. यास्तव शाईनभाभी हकीम यांनी तिचे खूप खूप कौतुक केले. श्वेताचे मनोबल वाढवण्यासाठी तिला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. या तिच्या नॅशनल पॅरा नॅशनल चॅम्पियनशिप पर्यंतच्या प्रवासात तिला अनमोल योगदान देणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक डॉ. श्याम कोरडे महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी यांचे सुद्धा शाहीन हकीम व बबलूभैया हकीम यांनी तोंड भरून कौतुक केले व या निमित्ताने का होईना महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकविल्याने तिच्या पाठीवर सर्व उपस्थितांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी कढोली या गावाचे सरपंच जितेंद्र हुलके श्वेताची आई मंजुषा भास्कर कोवे, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, डॉ. राज मुसने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डाॅ. श्याम कोरडे व गावातील नागरिक उपस्थित होते
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments