CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
23-02-2025
अवघ्या दोन दिवसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांना समाजकंठकांना पोलीसांनी केले जेरबंद
आष्टी:-
पोलीस स्टेशन आष्टी हद्दीमधील मौजा सोमनपल्ली व दुर्गापूर येथे गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांद्वारे विकृत पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण,मानवी अवयवांची चिन्हे, आकृत्या काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणाचा आष्टी पोलीसांकडून तपास सुरु होता. यादरम्यानच दिनांक 21/02/2025 रोजी मौजा सोमनपल्ली येथील सार्वजनिक बस थांब्यावरील शेडच्या पत्र्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अवमानजनक व आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे परिसरातील नागरिकांनी पोलीसांना कळविले होते. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली होती. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आष्टी पोलीसांना दिला होता.
तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विशाल काळे, पोस्टे आष्टी, पोनि. अरुण फेगडे, स्थागुशा गडचिरोली यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन आष्टी व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची एकूण 10 तपास पथके तयार करण्यात आली होती. पथकांनी केलेल्या तपासामध्ये निदर्शनास आले की, आसपासच्या 10 कि.मी. हद्दीतील परिसरात सदर घटनेमध्ये वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या शाईसारख्याच शाईने विविध अश्लील आकृत्या अज्ञातांद्वारे मागील तीन दिवसांपासून बनविल्या जात आहेत. पोलीस पथकांनी आष्टी व चामोर्शी हद्दीतील अनेक गावांना भेट देऊन मिळविलेल्या गोपनिय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे इसम नामे सुमित जगदिश मंडल, वय 18 वर्षे रा. दुर्गापूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली याने व एक अल्पवयीन आरोपी यांनी सोमनपल्ली बस थांब्यावर सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी तातडीने सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्राविषयी अधिक विचारणा केली असता, आपल्याकडून सदर कृत्य घडल्याचे आरोपींनी कबुल केले आहे. मानसिक विकृतीतून सदर आरोपीतांनी हे कृत्य केले असल्याचे लक्षात येते आहे. आष्टी पोलीसांकडून आरोपी सुमित जगदिश मंडल याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असून अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. गुन्ह्राचा अधिक तपास पोस्टे आष्टीचे पोनि. विशाल काळे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आष्टीचे पोनि. विशाल काळे, स्थागुशा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. राहुल आव्हाड, पोस्टे आष्टीचे सपोनि. मदन म्हस्के, पोउपनि. मनोज जासूद, पोउपनि. सोमनाथ पवार, पोउपनि. दयाल मंडल, पोउपनि. काशिनाथ शेडमाके, मपोउपनि. प्रतिक्षा वनवे, पोस्टे आष्टी व स्थागुशा गडचिरोलीचे अंमलदार यांनी केला आहे. सामाजिक सलोख्याचा विचार करुन अशा प्रकारचे कोणतेही कृत्य जिल्ह्रातील नागरिकांकडून करण्यात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन गडचिरोली पोलीसांनी केले आहे
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments