निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
22-01-2025
पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 03, 42, 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गडचिरोली
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी एका चारचाकी सिल्वर करलची फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहनाने काही इसम आरमोरी दिशेकडून वडसा मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे, अशी गोपनिय माहिती पोअं/शैलेश तोरकपवार, पोस्टे वडसा यांना मिळाली. सदरची माहिती वडसा येथील पो.नि. अजय जगताप यांना याबाबत कळविले असता, पो.नि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोस्टे वडसा येथील पोलीस पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला. पाठलाग करत असतांना शंकरपूर येथून वाहन चालक हा पोलीसांना चकमा देवून कुरखेडाच्या दिशेने वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर बाबत पो.नि. जगताप यांनी पोस्टे कुरखेडा येथील पो.नि. महेंद्र वाघ यांना माहिती दिली.
सदर माहितीवरुन पोस्टे कुरखेडा येथील पो. नि. महेंद्र वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह गोठणगावाजवळ सापळा रचून बसले असता, रात्री 22.00 वा दरम्यान एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसली. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन थांबविण्याचे प्रयत्न केले असता, वाहन चालक पोलीसांना हुलगावणी देवून भरधाव वेगाने पळून गेला. त्यानंतर सदर वाहनाचा पाठलाग करुन मौजा कढोली येथील तूकाराम विदयालयासमोर वाहनाला थांबविण्यात आले. त्यावेळी वाहन रस्त्यावर उभी करुन वाहन चालक अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. त्यानंतर सदर वाहन चालकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात खाखी रंगाच्या खडर्यामध्ये एकुण 25 पेटी ज्यामध्ये प्रत्येकी देशी दारू टायगर ब्रॉन्ड संत्रा कंपनीचे 90 एम.एल. मापाच्या 95 नग निपा असे एकुण 2375 नग निपा किंमत अंदाजे 1,42,500/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी फोर्ड कंपनीची फिएस्टा वाहन क्र. एम. एच. 31 सी. एन. 7120 किंमत अंदाजे 2,00,000/- रु. असा एकुण 3,42,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे कुरखेडा येथे अप.क्र. 12/2025 कलम 65 (अ) महा. दा. का. सहकलम 184 मो.वा.का. अन्वये अज्ञान इसमा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा पो. नि. श्री. महेंद्र वाघ, पोउपनि. दयानंद भोंबे, पोहवा/शेखलाल मडावी, पोअं/ संदेश भैसारे, पोअं/नरसिंग कोरे, चासफौ/घागी, तसेच पोस्टे वडसा येथील पो.नि.श्री. अजय जगताप, सपोनि. मनीष गोडबोले,
पोउपनि, चेतन परदेशी, पोहवा/राकेश डोनाडकर, पोअं/शैलेश तोरकपवार, पोअं/नितेश यांनी पार पाडली.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments