संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
22-01-2025
मुंबईः इन्स्टाग्रावरील मित्राने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील छायाचित्र काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडित मुलीला धमकावून तिचे अश्लील छायाचित्र परिचीत व्यक्तींना पाठवले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे.
पीडित मुलगी १७ वर्षांची असून २०२२ मध्ये तिची ओळख इन्स्टाग्राम या समाज माध्यमावरून २३ वर्षीय आरोपीशी झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आरोपीने तिला स्वतःच्या व मित्राच्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या नकळत आरोपीने त्यांचे चित्रीकरण केले. पीडित मुलीने शारिरीक संबंध ठेवण्यास आरोपीला नकार दिल्यानंतर त्याने पीडित मुलीचे छायाचित्र तिचे नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. तसेच इन्स्टाग्रावरही पीडित मुलीचे छायाचित्र अपलोड केले. या संपूर्ण प्रकारामुळे मुलगी तणावाखाली होती. अखेर तिला एका परिचीत व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार तिने दहिसर पोलिसांकडे तक्रार केली.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments