आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
27-12-2024
पुणे : हडपसर येथील शेतकरी व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा खून त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्या सांगण्यावरून अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर याने साथीदारांना पाच लाख रुपयांची सुपारी देऊन केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी मोहिनीने अक्षयला किती व कशा प्रकारे रक्कम दिली; तसेच सतीश वाघ यांचा खून करण्यामागे मोहिनीचा नेमका कोणता हेतू होता, त्यामागे अनैतिक संबंध, की आर्थिक कारण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून मोहिनी वाघ (वय ४८, रा. फुरसुंगी फाटा, मांजरी फार्मजवळ) हिला बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मोहिनीने पती सतीश वाघ यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मोहिनीला गुरुवारी वानवडी येथील लष्कर न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले.
मोहिनीला पोलिस कोठडी
ही घटना पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी आहे. सतीश वाघ यांचा खून करण्यामागे मोहिनीचा नेमका कोणता उद्देश होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहे. मोहिनीने सुपारीच्या रकमेपैकी अक्षयला किती रक्कम दिली, ती कशा प्रकारे दिली आहे. अक्षयने हा गुन्हा नक्की कोणत्या कारणासाठी केला, आरोपींनी गुन्हा करण्यासाठी हत्यार नक्की कोठून आणले, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने मोहिनी वाघला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सतीश वाघ यांच्या मालकीच्या खोलीत आरोपी अक्षय जावळकर आपल्या आई-वडिलांसोबत सुमारे पंधरा वर्षे वास्तव्यास होता. त्याने २०१६ मध्ये सतीश वाघ यांचे घर सोडून त्याच वसाहतीत पाचशे मीटर अंतरावर दुसरे घर भाडेतत्त्वावर घेतले होते. अक्षयने चारही मारेकऱ्यांना पाच लाख रुपयांची सुपारी देण्याची कबुली दिली होती. त्यापैकी आगाऊ म्हणून दिलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मोहिनीकडून अक्षयला सुपारीची रक्कम कशी देण्यात आली, याबाबतचे पुरावे शोधण्यात येत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी माध्यमांना सांगितले
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments