ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
22-07-2024
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
धुळे:-
जिल्ह्यातील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा येथील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण झाली असून उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना आजार होत आहेत त्यामुळे सदर शाळेच्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधिक्षक,व ईतर बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक शाखा (साक्री) धुळे चे गणेश गावीत, तानाजी बहीरम यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे यांना निवेदन देऊन केली आहे
प्रत्यक्ष अनुदानित आश्रम शाळा कुसुंबा ता. जि.धुळे या शाळेला भेट दिली असता अजून 45 ते 47 विद्यार्थी बाधित आहेत.या घटने नंतर साफ सफाई करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून एकदा ही पाणी परीक्षण करण्यात आले नाही. स्वयंपाक चुलीवर बनवला जातो गॅसचे अनुदान लाटले जाते मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही.जे विद्यार्थी तक्रार करतात त्यांना बोर्डाच्या परीक्षेत टार्गेट केले जाते.म्हणून विद्यार्थी बोलत नाही.वरून संस्था एका भाजप पक्षाच्या राजकीय नेत्याची शाळा असून या शाळेत असा गंभीर प्रकार घडला आहे.यांच्यावर सरकार कायदेशीर कार्यवाही करणार का ? कुसुंबा येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे भयानक हाल व अपेष्टा होत आहेत
दि.20/7/2024रोजी कुसुंबा आदिवासी आश्रम शाळेतील दुषित पाणी पिल्याने उलट्या,ताप संडास विद्यार्थ्यांना व्हायला लागले.दि.17/7/2024 रोजी विहीरीतील पाणी आटल्याने बाहेरून पाण्याचे टँकर मागितले असेही सांगण्यात येत आहे.एकीकडे विहीरीत संडासाचे पाणी जमिनीत मुरते असे ही शाळेतील विद्यार्थी सांगत आहे.खर तर विद्यार्थाचे निवासी इमारत आहे.त्या इमारतीला लागून विहीर व संडासाचे कुंड्या ही विहीर जवळ आहे. असे दुषित पाणी पिल्याने शाळेतील विद्यार्थी उलट्या, संडास करतांना शिक्षकांना दिसून आल्या नंतर लगेच धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले तरी काही मुले ,मुली अजून ही शुद्धीवर नव्हत्या यात लहान मुले जास्त होते.त्याच दिवशी पुन्हा दुपारी आणि संध्याकाळी तीन मुले एम्बुलंस मध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचारासाठी आणले . धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा कुसुंबा येथील ज्या धडगाव शहादा तळोदा अक्कलकुवा या तालुक्यातील पालकांचे विद्यार्थी कुसुंबा आश्रम शाळेत असतील त्या पालकांना आपल्या मुलांना बघण्यासाठी यावे कारण की लहान लहान लेकरू या ठिकाणी राहतात ते कसे राहतात हे पाहणं गरजेचं आहे.अनुदानाच्या पायी लहान जीवाशी खेळलं जात आहे.मी स्वतः त्रास करताना बघितले आहे. तरी या शाळेतील या विद्यार्थ्यांना कशामुळे आजारी पडले याकडेही आपलं लक्ष दिलं पाहिजे प्रत्यक्षपणे आपल्या मुलांना विचारा कोणते पाणी पिले आणि ते पाणी कसे होते तेही विचारा आणि पुढील कारवाई आपल्या पालकांनीही करावी . 25 लोकांना करणे दाखवा नोटीस एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बजावली आहे.तसेच झालेल्या घटनेची चौकशी तीन अधिका-या मार्फत केली जाणार आहे.संबधित संस्थाचालक व इतर लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल का?असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments