CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
02-03-2024
जगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी- राजरत्न आंबेडकर
देसाईगंज:-
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस 1956 ला बुद्धाच्या धम्माची धम्मदीक्षा दिल्यानंतर आजही आपण जुन्या जातीच्या नावाने दलीत या शब्दात गुरफटून न राहता आता आपली जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
ते दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया ग्रामशाखा कोंढाळा व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन संस्था बौद्ध समाज कोंढाळा यांचे वतीने आयोजीत धम्म प्रबोधन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपूरी येथील सामाजीक विचारवंत प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी देखिल उद्घाटनपर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अतिथी म्हणून भन्ते सचित्त बोधी, दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड, उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, महिला महासचिव यशोधरा नंदेश्वर, महिला प्रतिनिधी दर्शना शेंडे, विभागीय संघटक प्रा.सुरेंद्र तावाडे, इंजि. नरेश मेश्राम, गांवच्या सरपंच अपर्णा राउत, नितीन राऊत, देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे, सल्लागार अशोक बोदेले, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, उद्धवराव खोब्रागडे, बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हा मुख्य सचिव हंसराज लांडगे, काका गडकरी, राधा नांदगाये, अनिल सोरते,आनंद मेश्राम, रोहीणी सहारे, रमेश रंगारी, नागसेन खोब्रागडे, किशोर साखरे, प्रा.एस.टी.मेश्राम, सुधीर रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते जे.बी.लांडगे, मुकुंदा मेश्राम यांनी विचारमंचावर स्थान भूषविले.
कार्यक्रमाचा प्रारंभ तथागत बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आले. उपस्थित सर्वांचे सुमधूर स्वागत गीताने महिला व मुलींनी केले. पिवळा पितांबर - त्यात लोकशाहीची जळ... या लेझीम नृत्याने उपस्थितांचे मन आनंदाने भरून गेले. या कार्यक्रमाचे संचलन बुद्धिस्ट सोसायटीच्या विभा उमरे, सुकेशिनी ऊके यांनी, प्रास्ताविक बोद्ध समाजाचे कार्याध्यक्ष नागोराव ऊके तर आभार प्रबोधन संस्थेचे राजेंद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता शेंडे, मंगला शेंडे, तुषार ऊके, प्रशांत मंडपे , रोशन शेंडे, पल्लवी घुटके, प्रज्ञा शेंडे , उत्तरा मेश्राम व बौद्ध समाजाच्या सर्वांनी परिश्रम घेतले.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments