ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
21-04-2024
लॉयड्स कालिअम्मल हॉस्पिटल हेडरी येथे रक्तदान शिबीर
संचालक बि. प्रभाकरन यांच्या सह 50 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग
अशोक खंडारे /मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९ एटापल्ली:-
लॉयड्स कालीअम्मल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी येथे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड द्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आज दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी आयोजन करण्यात आले असुन सर्व प्रथम लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांनी शिबिरात रक्तदान केले. लॉयड्स कंपनीचे 50 अधिकारी आणि कर्मचारी यांनीसुद्धा रक्तदान केले. सर्व समुहातील सदस्यांनी दर महिन्याला किमान 50 युनिट रक्त देण्याचे आश्वासन दिले आणि ते आजारी व्यक्तीला उपयोगात पडेल असा उद्देश ठेवला असून लॉयड्स टीम ही मोलाची कामगिरी करीत आहे.
अति दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागात उच्च दर्जेचा मोफत आरोग्य सुविधा
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी नक्षल प्रभावीत सुरजागड परिसरात मुलभूत आरोग्य सुविधा मिळणे ही कठीण होते पण परिसरातील आदिवासीना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याकरिता लॉयड्स मेटल्स कंपनीचे पुढाकाराने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काली अम्मल हॉस्पिटल सुरू केले आहे. अण या परिसरातील आदिवासी गरीब व गरजूंना मोठा आधार झालंय. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी 24/7 तास रुग्ण सेवा देत आहेत.
लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल 8 नोव्हेंबर 2023 ला सामान्यांच्या सेवेत कार्यन्वीत झाले. या ठिकाणी दहा तज्ज्ञ डॉक्टर 40 हुन अधिक आरोग्यं कर्मचारी परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देत आहेत. या हॉस्पिटल मधे सुरजागड, हेडरी, गट्टा, जांभिया एटापल्ली, भामरागड तालुका आलापल्ली, अहेरी सह गडचिरोली जिह्यातील दररोज शेकडो रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतांना दिसत आहेत
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments