CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
04-07-2024
Pm Kisan Yojana 2024 : भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते. कारण देशाची अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनामार्फत देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. अशीच एक योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. ही केंद्र सरकार तर्फे राबवण्यात येणारी योजना असल्याने याचा फायदा केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होत आहे. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून ती सतत चालू आहे.
या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांची वार्षिक मदत दिली जात आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत व्हावी म्हणून ही योजना केंद्र सरकार ने सुरु केली आहे.
या योजनेत दिलेली रक्कम एकरकमी शेतकऱ्यांना दिली जात नाही. हे पैसे केंद्र सरकार प्रत्येकी 2000 रुपयांचा एका हप्ता या प्रमाणे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात.
हे देखील वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेद्वारे आतापर्यंत एकूण 17 हफ्ते पात्र लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहेत. 17 वा हप्ता काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
या योजनेद्वारे आतापर्यंत एकूण 17 हफ्ते पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. नरेंद्र मोदी नी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्या घेतल्या 17 व्या हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या गेली. परंतु, आता या योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार या योजनेत मात्र काही बदल करु शकते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत मिळणारी 6000 (सहा हजार) रुपयांची रक्कम ही आता वाढवुन दिल्या जान्याची शक्यता आहे. या योजने मार्फत मिळणारा निधी हा पुरेसा नसल्याने हा निधी वाढवून द्यावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे.
हे देखील वाचा : Success Story: घर-घर जा कर बेचती थी चाकू-छुरी, आज चलाती हैं BMW, करोड़ों की कंपनी की है मालकिन!
पी एम किसान सम्मान निधी या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रूपये दिल्या जात आहेत. या रकमेत 2000 रुपयांची भर करून ही रक्कम वार्षिक 8000 रुपये इतकी होऊ शकते. असे सांगितल्या जात आहे.
या बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पी एम किसान योजनेची रक्कम वाढवणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments