STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
31-10-2024
देलनवाडी: शेतकऱ्यांना हमीभाव धान खरेदी करण्याकरिता ऑनलाइन नोंदणी करावी लागते; परंतु मागील आठ दिवसांपासून पोर्टलची साइट बंद असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत. देलनवाडी परिसरातील शेतकरी आठवडाभरापासून शेतकरी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यलयात हेलपाटे मारत आहेत.
आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत हमीभाव धान खरेदीकरिता सन २०२४-२५ करिता २० आक्टोबर २०२४ पासून हमीभाव धान खरेदीचे फार्म भरणे सुरू झाले आहे. त्यासाठी दररोज १०० ते २०० शेतकरी ऑनलाइन नावनोंदणी करण्याकरिता कामधंदे सोडून सोसायटीत येतात. मात्र, काम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरापासून साईट बंद असल्याने पुन्हा घरी परत जावे लागते. शेतकरी नावनोंदणीची पोर्टल
शासनस्तरावरूच बंद असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिना उलटत असतानाही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पोर्टल सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments