नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
22-06-2024
Bank Loan Recovery Rules : लोकांजवळ जर पैसे नसतील तर लोक कोणतीही वस्तू खरेदी करत नसत. याच कारण असे की कर्ज घेऊन वस्तू घेणे प्रत्येकाला योग्य वाटत नव्हते. परंतु जसा जसा काळ बदलत गेला, परिस्थीती ही बदलत गेली. आजच्या काळामध्ये मोबाईल पासून ते घरच्या वापरायच्या वस्तू पर्यंत सर्व गोष्टी कर्ज घेऊन च विकत घेतल्या जात आहेत.
काही ग्राहक क्रेडिट कार्ड चा वापर करून घेतात, तर काही लोक बँकेकडून कर्ज घेतात तर काही जन प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत असतात. बरेच लोक पर्सनल लोन, कारं लोन, होम लोन ची गरज पडते.
तुम्ही पण अशा प्रकारचे लोन घेतले असणार किंवा घेण्याचा विचार करत असणार, तर तुम्हाला खाली दिल्या प्रमाने काही प्रश्न नक्कीच पडत असतील.
१. कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू झाला तर, उरलेल्या कर्जाची परतफेड कोण करणार?
2. त्या कर्जदाराच्या वारसदाराला तर भरावे लागणार नाही ना ?
तर जाणून घेऊया काय म्हणतात नियम...
कार लोन : कार लोन हे एकदम सुरक्षित असलेले कर्ज आहे. कार लोन घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक त्यांच्या परिवातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यास सांगते. परंतु असे न झाल्यास कुटुंबातील एकाही व्यक्ती ने कर्जाची परतफेड न केल्यास बँक त्यांची कार विकून परस्पर आपल्या कर्जाची रक्कम वसुली करते.
होम लोन : होम लोन घेताना बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावयाची असते. होम लोन घेत असताना कर्जदारला घराची कागदपत्रे गहान ठेवावे लागतात पण जर एखाद्या व्यक्तीने होम लोन घेतले आहे आणी लोन घेतलेल्या व्यक्ती चा जर अचानक मृत्यू झाला तर कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी ही त्याच्या को-बॉरोअर किंवा त्याच्या वारसाना ची असते. जर कर्जदार व्यक्ती चा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसान असलेल्या व्यक्तिने जर कर्जाची परतफेड केली नाही तर बँक त्या गहान ठेवलेल्या मालमत्ते चा लिलाव करते आणि कर्जाची वसुली करते. याही पेक्षा आता बँकांनी यावर एक नवीन उपाय वापरात आणलेला आहे तो म्हणजे कर्ज देत असताना बँक ही कर्ज दाराचा विमा काढते व जर कर्जदाराचा म्रुत्यु झाल्यास बँक विम्याद्वारे पैसे वसुली करते.
पर्सनल लोन : पर्सनल लोन हे बँकेच्या नजरेत अजिबात सुरक्षित लोन मानल्या जात नाही. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक ही इतर कोणत्याही व्यक्ती कडून कर्जाची वसुली करू शकत नाही. पर्सनल लोन बाबतीत वारसाना वर कर्जफेडीची कोणतीही जबाबदारी नसते. त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाल्यास लोन बंद केल्या जाते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments