अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
15-07-2024
ठाणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना... पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी असून घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने मन:शांतीसाठी ती 6 जुलै रोजी शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली.
दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना त्या चहामध्ये त्याने भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आपलं बिंग फुटेल या भितीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं, यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला.
दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भाविकाला डोंगरावर जंगलात पडलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोघांना अटक केली. मात्र तिसरा आरोपी श्यामसुंदर शर्मा हा तिथून फरार झाला. पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला ट्रॉम्बे इथळ्या चिता कॅम्प परिसरातून अटक केली. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीनही आरोपींना अटक करण्यात आलीय... सदर घटनेचा जाहिर निषेध... आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे...
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments