आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
15-07-2024
मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी केला पुरातून जीवघेणा प्रवास
भामरागड:- मलेरिया ग्रस्त चिमुकलीसाठी वडीलानी पुरातून जीवघेणा प्रवास करत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे
राज्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याचे काम केले जात आहे. याठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाली असली तरी कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे अजूनही बरेच ठिकाणी मुख्य रस्ते, नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात दुर्गम भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच १३ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील बंगाडी गावात ३ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून लेकीला खांद्यावर घेत तुडुंब भरलेले दोन नाले ओलांडत प्रवास केला होता आणि तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे छत्तीसगड सीमेवर वसलेला भामरागड तालुका जंगल, नदी-नाल्यांचा प्रदेश असल्याने हा तालुका 'इंडोमिक झोन' मध्ये मोडतो. त्यामुळे येथे नेहमीच मलेरियाचे रुग्ण आढळून येतात. लाहेरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बंगाडी गावातील रविना पांडू जेट्टी हिला ताप येत असल्याने सकाळच्या सुमारास तिच्या वडिलांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर तिला मलेरिया असल्याचे कळले. त्यामुळे तिला भरती करून तिच्यावर उपचार करणे गरजेचे होते, तसा सल्ला देखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र भरती राहून उपचार घेण्यासाठी पांडू जेट्टी तयार नव्हता. अखेर त्याने दवाखान्यातून पळ काढला. भामरागड तालुक्यात आजही अशीच परिस्थिती आहे.
मात्र उपचाराअभावी रविना जेट्टी हिच्या जीवाला धोका संभवला होता. त्यामुळे येथील आरोग्य विभागातील अधिकारी आणि तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मीकांत गोगामी आणि ग्रामपंचायतचे संगणक परिचालक ज्ञानेश्वर भांडेकर यांनी लाहेरी वरून ६ किलोमीटर अंतरावर असलेले बंगाडी गाव गाठून पांडू जेट्टीची समजूत घालून चिमुकलीला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यासाठी विनवणी केली.
त्यांनतर त्या मुलीच्या वडिलांनी होकार देताच बाप लेकीला घेऊन तुडुंब भरलेल्या दोन नाले ओलांडत सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी लाहेरी गाठले. अखेर रविना जेट्टी या चिमुकलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे यांनी दिली आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील प्राथमिक आरोग्य केंद्र
भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड सीमेवर असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ९ उपकेंद्रातील जवळपास ४४ अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. गोरगरिबांना याचा मोठा त्रास संभवतो आहे
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments