नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
07-07-2024
स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय आलापल्ली येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)2020 च्या सभेचे आयोजन.
आलापल्ली:-
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्व महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू करण्यासंदर्भात दिनांक 6 जुलै 2024 ला दुपारी 3 वाजता स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय, आलापल्ली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थाध्यक्ष, प्राचार्य आणि प्राध्यापक वृन्दात, नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करताना अनेक समस्या भेडसावत होत्या. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदरणीय कुलगुरू महोदय यांच्या अध्यक्षतेखाली, प्र-कुलगुरू यांच्या प्रमुख उपस्थित सभा झाली
या सभेला मार्गदर्शन करतांना भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल , नवनवीन धोरण लागू करून त्यांची केलेली अंमलबजावणी आणि आता पूर्णपणे नव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) लागू करतांना विद्यार्थी एडमिशन, प्राध्यापक वर्कलोड, अतिरिक्त प्राध्यापक झाले तर होणाऱ्या समस्या यावर प्रश्नोत्तर चर्चा घेऊन त्यांचे निराकरण प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या कडून करण्यात आले.
या सभेचे अध्यक्ष दीपक दादा आत्राम हे होते तर, प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे , बबलूभैया हकीम, सिनेट सदस्य डॉ बूटे, प्राचार्य डॉ. मंडल विचार मंचावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल , प्राचार्य डॉ. टिपले , प्राचार्य डॉ. बूटे प्राचार्य डॉ. लाड , प्राचार्य डॉ. सोनकुवर हेही उपस्थित होते.
या सभेचे सूत्रसंचालन प्रा . राजेश गर्गम, प्रास्ताविक भाषण सिनेट सदस्य डॉ बुटे यांनी केलेत तर आभार प्रा अजय बरसागडे यांनी मानले.
या सभेच्या यशस्वीतेसाठी स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय. आलापल्लीचे संस्थाध्यक्ष दिपक दादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अमित कोहपरे यांच्या नेतृत्वात सर्व प्राध्यापक वृन्द आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments