CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
10-01-2025
कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी घातली कांस्य पदकास गवसणी
अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी कांस्य पदकास गवसणी घातली आहे
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल ,खणीज संपत्ती आणि जमीन यांनी समृद्ध आहे.
अत्यंत दुर्गम भागात क्रीडा सुविधांची वानवा असतानाही त्यांनी आपल्या मेहनतीने गाव व जिल्ह्याला नाव लौकिक मिळवून दिले आहे सामान्य कुटुंबातून जन्माला आलेला 22 व्या अखिल महाराष्ट्र वू-शू असोसिएशनच्या मान्यतेने खेळाची आवड असलेल्या 3 दिवसीय राज्यस्तरीय वू-शू कराटे स्पर्धेत यशवंत महाविद्यालय क्रीडा संकुल नांदेड जिल्ह्यामध्ये गडचिरोली वू-शू झिग-झॅग अकॅडमीचे प्रतिनिधित्व करीत
महेश पांडुरंग शेंडे याने आपल्या अथक परिश्रमाने आणि आपल्या असामान्य खेळाचे चमकदार प्रदर्शन करून कांस्य पदक जिंकून गावासह जिल्ह्याचे नाव उंचावले. त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, क्रीडा प्रशिक्षक मिलिंद साळवे, वु-शू मास्टर गुलाब मेश्राम, कराटे मास्टर कपिल मसराम, मार्गदर्शक विनय बोडखे, आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पवार, पीएसआय वनवे, पोलीस उपनिरीक्षक जगताप आदिंनी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत शारीरिक तंदुरुस्ती सोबतच या ठिकाणी पोहोचण्यात मोलाचा वाटा उचलला. आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments