अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
09-02-2024
पाली भाषा प्रचार परीक्षेत धम्म बांधवांनी सहभाग नोंदवावा- सोपानदेव मशाखेत्री
. धानोरा:-
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध कालीन पाली भाषेचे ज्ञान अवगत व्हावे, पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, आणि पाली भाषेचे अनुवाद करणे सोयीचे व्हावे, पाली भाषा जिवंत ठेवण्यासाठी धम्म बांधवांनी पाली भाषा प्रचार परीक्षेत सहभाग नोंदवावा ,असे आवाहन धानोरा तालुका पाली भाषा परीक्षा नियंत्रक सोपानदेव मशाखेत्री यांनी केले. ते धानोरा येथील प्रकाश बौद्ध महिला मंडळ च्या वतीने आयोजित माता रमाई जयंती दिनी कार्यक्रमात परीक्षार्थींना पाली भाषा प्रचार परीक्षा चे प्रमाणपत्र पाहुण्यांचे हस्ते वाटप करताना मार्गदर्शन करीत होते. सम्राट बुद्ध विहार येथे डिसेंबर 23 मध्ये पहिली, दुसरी, तिसरी, व चौथी पाली भाषेची परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थी नितेश मशाखेत्री प्रथम श्रेणीत, अस्मिता घोडेस्वार दुसऱ्या श्रेणीत ,वेणू मशाखेत्री, प्रथम श्रेणीत ,प्रीती मशाखेत्री , प्रथम श्रेणीत, मृगल गव्हर्न प्रथम श्रेणीत, पायल बोरकर प्रथम श्रेणीत, मयुरी उंदीरवाडे प्रथम श्रेणीत, गुंजन मशाखेत्री प्रथम श्रेणीत, हेमलता सहारे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .तर दुसऱ्या परीक्षेतील परीक्षर्थी मृगाल गवरणा याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या कार्यक्रमात पाहुण्यांचे हस्ते त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येऊन त्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अलका मशाखेत्री नगरसेविका नगरपंचायत धानोरा, उद्घाटक स्थानी सीमा थूल नगरसेविका ,प्रमुख अतिथी पौर्णिमा सयाम नगराध्यक्ष नगरपंचायत धानोरा, माजी नगराध्यक्ष वर्षाताई चिमूरकर, प्रतिष्ठित महिला नेत्राताई साळवे, प्रतिमा मोहरले ,देवांगणी चौधरी नगरसेविका, कल्याणी गुरूनुले नगरसेविका ,किरणताई सोनुले माळी समाज अध्यक्ष , भुमाला पराचाके आदिवासी समाज अध्यक्ष ,प्रकाश बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी मशाकेत्री, सचिव वेणू मशाखेत्री,रसिकाताई मार्गिया पर्यवेक्षिका महिला बचत गट, प्रतिभा शिंपी इत्यादी मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी जेष्ठ महिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जास्वंदा सहारे थी बुद्धीस्त सोसायटी ऑफ इंडिया धानोरा तालुका महिला अध्यक्ष यांनी केले .प्रास्ताविक वेणू मशाखेत्री सचिव प्रकाश बौद्ध महिला मंडळ यांनी केले, तर आभार निशा मशाखेत्री यांनी मानले.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments