नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
09-04-2024
स्कॉर्पीओच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस ठार
अहेरी:-
जवळील गेर्रा महागाव रोडवर एका स्कॉर्पीओने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाल्याची घटना दि. ९ एप्रिल ला दुपारी १२.३० वा.चे दरम्यान घडली
पोलीस शिपाई चिन्ना विडपी वय ४० रा.अहेरी असे मृतकाचे नाव असून चिन्ना हे वांगेपल्ली कडून आपल्या दुचाकीने येत असतांना अहेरी कडून महागाव कडे जात असलेल्या एम एच ३२ ए एच ४०५४ स्कॉर्पिओ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस ठार झाले
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चिन्ना विडपी यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
चिन्ना विडपी यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा,आई,वडील असा परिवार आहे
त्यांच्या अकाली निधनाने मित्र मंडळ व परीवारात शोककळा पसरली आहे
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे हे करीत आहेत
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments